माझे पहिले (आणि दुसरे) अँड्रॉइड अँप..

Primary tabs

सांरा's picture
सांरा in तंत्रजगत
10 Sep 2017 - 2:29 pm

दोन महिन्यांआधी अनेक वेळा अर्ध्यात सोडलेला प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले.
प्रकल्प होता स्वतःचा अँड्रॉइड अँप तयार करणे.
अनेक वेळा इन्स्टॉल करतांना आलेल्या अडचणी सुदैवाने यावेळी आल्या नाहीत आणि एकदाचा अँड्रॉइड स्टुडिओ इन्स्टॉल झाला. सगळीकडे एक्लीप्स
वापरतात पण माझ्याकडून ते इन्स्टॉल करणे नाही जमले त्यामुळे जे होईल ते पाहून घेऊ म्हणत सरळ उडी टाकली. एखादी गोष्ट अडली कि तुनळी वर पाहायची, नाही जमले तर दुसरी गोष्ट करून बघायची असे करत करत गणनाकार, टिक टाक टो असे साधे अँप बनवले आणि काही मोठे करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यातून आठवले, एकदा पुण्यात बस पकडताना कसा ताप आला होता ते...
त्यासाठी डाटाबेस तयार करणे, लोगो बनवणे, लॉजिक बनवणे इत्यादी दिव्यांतून पार पडत आता शेवटी हे अँप तयार आहे. ते तुम्ही इथे बघू शकता. या अँप मधली प्रत्येक गोष्ट मी आयुष्यात पहिल्यांदाच केलेली असल्याने चुका असतीलच. हे अँप मी मित्रांना दिले आणि बहुतेकांना आवडलेही. परंतु मित्राला सरळ कसे सांगावे म्हणून त्यांनी चुका सांगितल्या नसतील असे मला वाटते. त्यामुळे मी इथे हा धागा काढलाय. तुम्ही अँप वापरून बघा आणि सांगा तुम्हाला ते कसं वाटतेय. त्यानुसार मी बदल करीन. प्रामाणिक टीका अपेक्षित. अँपमध्ये जेवढे टाकता येईल तेवढे फीचर्स टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
दुसरे साधे सुधे अँप म्हणजे होकायंत्र. ते तुम्ही इथे पाहू शकता. काही अँप चुंबकीय उत्तर दाखवतात पण मी यात लोकेशन प्रमाणे बदल करून खरी उत्तर दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या तरी मला फीचर्स कमी वाटत आहेत, अजून काही टाकण्याचं विचार सुरु आहेत. यात मी १० भाषांचा सपोर्ट दिला आहे. परंतु मला काहीच भाषा येतात, त्यामुळे तुमच्यापैकी काही बहुभाषिक मिपाकर असतील तर त्यांची मदत अपेक्षित आहे. असाच धागा मी रेडिट वर टाकला होता पण त्याला काही प्रतिसाद आला नाही. पण मिपा कडून तरी राक्षसाला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.

टिप१:हा धागा आधीच काढणार होतो पण मोबाईल प्रकरण झाल्याने बेत समोर पडला.
टिप२: अँप टंकतांना अनुस्वार येतो, तो काढता येत नाहीये. कृपया त्याला अनुल्लेखाने मारावे (इग्नोर मारावे).

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

10 Sep 2017 - 2:41 pm | मराठी कथालेखक

मी अ‍ॅप लवकरच बघतो.
बाकी

काही अँप चुंबकीय उत्तर दाखवतात पण मी यात लोकेशन प्रमाणे बदल करून खरी उत्तर दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

हे नीट कळाले नाही, थोडं विस्ताराने सांगाल काय ?

सांरा's picture

10 Sep 2017 - 2:54 pm | सांरा

पृथ्वीला दोन प्रकारचे ध्रुव असतात. एक स्वतः भोवती फिरण्याचा साधा आणि एक चुंबकीय. पृथ्वी हे एक मोठे चुम्बकच आहे म्हणाना कारण हा चुंबकीय प्रभाव पृथ्वीच्या आतील वितळलेल्या लोहाच्या हालचालीमुळे असतो. पण हि दोन्ही ध्रुवे एकाच ठिकाणी नसतात. जसे चुंबकीय ध्रुव सतत ५० ते ६० किमी दर वर्षी दक्षिणेला रशियाच्या दिशेने सरकत आहे आणि सध्या 86.5°N 172.6°W इथे आहे. त्यामुळे चुंबक जेव्हा उत्तर दाखवते तेव्हा ते चुंबकीय उत्तर दाखवते जे खऱ्या उत्तर ध्रुवापासून दूर असते. आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे दाखवते.

मराठी कथालेखक's picture

10 Sep 2017 - 3:45 pm | मराठी कथालेखक

विस्ताराने स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद.
मी तुमचे होकायंत्रचे अ‍ॅपच बघणार होतो, पण माझा मोबाईल त्यासाठी योग्य नाही असे प्लेस्टोर म्हणत आहे, माझ्या मोबाईल मध्ये कंपास नसल्याने असे होत असावे.

पैसा's picture

10 Sep 2017 - 6:14 pm | पैसा

अभिनंदन! असेच उपयोगी अँप्स बनवत राहा!

सांरा's picture

10 Sep 2017 - 11:46 pm | सांरा

धन्यवाद पैसाताई

अभिनंदन आणि आभार अशासाठी की फीडबॅक मागवला आहे. मला बरेच प्रश्न अॅप्सबद्दल आहेत ते नंतर विचारेनच पण अगोदर एखाद्या android वर तुमची अॅप्स टेस्ट करतो आणि नक्की कळवतो. विंडोजवर अॅप्स आता फारच थोडे लोक बनवतात कारण मायक्रोसॅाफ्टचा उत्साह संपला.
गणनाकार = word counter / visiter counter?
tictocto -= फुली गोळा खेळ?

तुमच्या अॅपला डेवलपरचे नाव काय दिले आहे? कारण बय्राच अॅप्सची नावे सारखी असतात शोधायला अवघड पडते॥

कंजूस's picture

10 Sep 2017 - 9:45 pm | कंजूस

Prinia Apps नाव दिसत आहे.

माझ्या वाचनात आले होते की-
१) मॅग्नटोमिटर सेन्सर फारच कमी android हँडसेट्समध्ये असतो. त्याऐवजी e-compass हा जिपिएसवर चालणारा देतात.
२)काही android हँडसेट्समध्ये gps चिप न देता A-GPS म्हणजे assisted gps अर्थात सिम कार्डाच्या डेटावर आधारित gps असतो. रेंज नसेल तर जिपिएस चालत नाही.

हे तुमच्या अॅप्ससंबृधित प्रश्न॥ थोडक्यात सिम कार्ड काढून टाकले/ डेटा बंद ठेवला तरी होकायंत्र चालते का?

त्यामुळे घरी राहणाऱ्या वटवट्याचे नाव दिले आहे.
राखी वटवट्या = Prinia
aGPS मला माहित नव्हते. जमल्यास टाकीन.

थोडक्यात सिम कार्ड काढून टाकले/ डेटा बंद ठेवला तरी होकायंत्र चालते का?

सिम कधी काढून बघितले नाही. परंतु इंटरनेटचा वापर दिशा ठरवण्यासाठी होत नाही. फक्त खऱ्या उत्तर दिशेला GPS लोकेशन चा वापर केलेला आहे आणि बहुतेक GPS ला डेटा लागत नाही. त्यामुळे सिम काढल्यावरही अँप चालायला हवे. जास्तीत जास्त एक दोन डिग्री चा फरक पडेल.

गणनाकार = word counter / visiter counter?

calculator हो, त्याला तसे टंकणे फार कठीण काम. म्हणून जो शब्द सुचला तो लिहिला.

tictocto -= फुली गोळा खेळ?

तोच तो.

कंजूस's picture

11 Sep 2017 - 9:33 am | कंजूस

1) punebus app - उत्तम झालं आहे.

२) disha ( compass app) -
* मराठी / इतर भाषांतील नावे प्रयोग आवडला.
# मध्यभागी लेवल + हवी म्हणजे फोन बरोबर आडवा धरला जाईल.
# तळाशी longitude , latitude data इतर लोकेशनपेक्षा वेगळा का येतो?

सांरा's picture

11 Sep 2017 - 9:12 pm | सांरा

1) punebus app - उत्तम झालं आहे.

धन्यवाद

# मध्यभागी लेवल + हवी म्हणजे फोन बरोबर आडवा धरला जाईल.

लेवल आधी टाकली होती पण कोडे बरोबर जमत नव्हता. ट्रायल अँड एरर सुरु आहे. एकदा अचूक जमल्यावर टाकता येईल.

# तळाशी longitude , latitude data इतर लोकेशनपेक्षा वेगळा का येतो?

थोडं पॉईंट मध्ये फरक येतो खरा पण कारण मला माहित नाही. मी मोबाईल मधून सरळ लोकेशन डेटा घेतो आणि डिस्प्ले करतो. राऊंड ऑफ करतांना कमी जास्त होत असावे.

अजून काही अॅप्स करणार असाल तर सांगेन.

नोटस अॅप - आताच्या कोणत्याही अॅपमध्ये 'कॅापी ओल' बटण/ फिचर नाही. संपूर्ण मोठे लेखन स्क्रोल करून कॅापी करावे लागते. ओफलाइनमध्ये लेख थोडाथोडा लिहून ठेवायचा आणि नंतर कॅापी करून मिपाला पेस्ट करायचा यासाठी.

सालदार's picture

11 Sep 2017 - 5:24 pm | सालदार

तुम्ही google keep वापरले आहे का? वापरायला अतिशय सोपे आहे आणि त्याचा backup आपोआप क्लाऊड वरती जमा होतो.
Long touch करुन select all पर्याय निवडुन कॅापी केल्याने 'कॅापी ओल' होतं.

कंजूस's picture

11 Sep 2017 - 8:02 pm | कंजूस

select all आहे का? पण ओफलाइन नाही उघडणार ना?

सालदार's picture

11 Sep 2017 - 9:04 pm | सालदार

select all आहे. ऑफलाईन चालते. Cloud Backup चा फायदा असा कि, अ‍ॅप डिलीट झाले किंवा नविन मोबाईल घेतला तर फक्त एकदा लॉगिन करायचे सर्व माहिती पुर्ववत होते (sync होते).

कंजूस's picture

12 Sep 2017 - 8:26 am | कंजूस

nimbus note web वापरतो त्यात हे सर्व आहे, सर्व ओएसवर अॅप आहे, फक्त कॅापी ओल नाही. त्यांना इमेल केलेत.
गुगल कीप विंडोजला नाही म्हणून अडते.

कंजूस's picture

12 Sep 2017 - 8:26 am | कंजूस

nimbus note web वापरतो त्यात हे सर्व आहे, सर्व ओएसवर अॅप आहे, फक्त कॅापी ओल नाही. त्यांना इमेल केलेत.
गुगल कीप विंडोजला नाही म्हणून अडते.

सांरा's picture

11 Sep 2017 - 9:29 pm | सांरा

पूर्वी एव्हरनोट वापरायचो पण ते लिहून ठेवलेल्या गोष्टी ऑनलाईन असल्याशिवाय सेव्हच करायचे नाही. त्यामुळे मी स्वतःसाठी रोजच्या गोष्टी लिहिण्यासाठी एक नोट अँप बनवले होते. त्यात काहीच नव्हते - बस लिहा आणि मोबाईल मध्ये सेव्ह करा.
बरे झाले एव्हरनोटमधल्या गोष्टी त्यात ट्रान्सफर केल्या नाहीत. नाहीतर आता मोबाईल सोबत तीनचार वर्षांचे जर्नल, नोट्स, जमाखर्च सुद्धा गेले असते जे सध्या माझ्या अकाउंट मध्ये सुखरूप आहे.
म्हणून म्हणतो ऑनलाईन हेच खरं, बाकी 'सिलेक्ट ऑल' साठी सालदार यांनी सांगितल्या प्रमाणे गूगल कीप करत असेल तर ते वापरा.

jinendra's picture

12 Sep 2017 - 12:20 am | jinendra

select all, copy, and paste या साठी swype हा की बोर्ड वापरता येईल. Paid अॅप आहे पण कॉपी पेस्ट करायला उत्तम आहे.

वा! फारच छान प्रयत्न आहे. कंजूसकाकांनी दिलेल्या टिप्सही उपयुक्त.

सांरा's picture

11 Sep 2017 - 9:19 pm | सांरा

धन्यवाद

पंतश्री's picture

13 Sep 2017 - 1:26 pm | पंतश्री

एकदम मस्त आहे. छानच.
मी designer आहे. काहि मदत हवी असल्यास सान्गा

सांरा's picture

13 Sep 2017 - 10:18 pm | सांरा

मी तयार केलेले ओबड धोबड ग्राफिक्स तुम्हाला कसे वाटले?

योगी९००'s picture

16 Sep 2017 - 7:25 am | योगी९००

अ‍ॅप्स आवडलीत...

मला अ‍ॅन्ड्रॉइड शिकायचे आहे. एखादे पुस्तक सुचूवू शकता का? (मला C, C++, JAVA चांगले येते.. १०-१२ वर्षाचा अनुभव आहे). ढिगाने पुस्तके आहेत. कुठले घ्यावे ते कळत नाही.

सांरा's picture

16 Sep 2017 - 1:25 pm | सांरा

नका घेऊ काही.
तुम्हाला जावा चा अनुभव आहे म्हणजे अर्धे अँड्रॉइड तुम्ही आत्ताच शिकलात. उरलेले तुम्ही वापर करता करता शिकून जाल. माझी कामाची पद्धत अशी आहे कि मी एकीकडे अँड्रॉइड स्टुडिओ आणि दुसरीकडे क्रोम उघडून बसतो. काही अडले कि ते आणि त्याची माहिती पाहून घेतो.
नवख्यांसाठी हि ऑफसिअल साईट मस्त आहे. बहुतेक पुस्तकांत ट्युटोरिअल्स असतात आणि तीही जुन्या व्हर्जन वर. पण इंटरनेट वरून तुम्ही अद्ययावत माहिती घेऊ शकता. शिवाय युट्युब वरही ढिगाने ट्युटोरिअल्स आहेत.

फक्त सावधगिरीचा सल्ला हाच देऊ इच्छितो कि एखाद्य ट्युटोरिअल मध्ये आणि आपल्या प्रत्यक्ष अनुभवात फार अंतर असू शकते. उदाहरणार्थ एखादी गोष्ट ट्युटोरिअल वाला शिक्षक लवकर करतो पण तसेच आपण करून बघितल्यास एरर वर एरर येते.

कंजूस's picture

16 Sep 2017 - 5:32 pm | कंजूस

सांगकाम्या राक्षस,
फोनमध्ये OTG सपोर्ट नसल्यास तो अॅपमधून मिळवता येईल का? हार्डवेरही लागते?

सांरा's picture

17 Sep 2017 - 3:36 pm | सांरा

OTG सपोर्ट हार्डवेर सॉफ्टवेर मिळून लागतो. जर तुमचा मोबाईल ४.० (ऐसक्रीम सँडविच ) च्या वर असेल तर त्याला सपोर्ट असेलच . नसेल तर सांगता येत नाही. स्लेव्हला मास्टर बनवण्यासाठी फोन रूट हा एक पर्याय आहे. पण ते कठीण तर आहेच आणि फोन चा टॅबलेट होव शकतो .

कंजूस's picture

17 Sep 2017 - 4:02 pm | कंजूस

ओके

आदूबाळ's picture

18 Sep 2017 - 1:03 am | आदूबाळ

एर्रोर मारतंय ते.

सांरा's picture

18 Sep 2017 - 3:40 am | सांरा

गॅलॅक्सि वाले तुम्हीच का?
अँप सुरु झाल्या झाली क्रॅश होतंय कि अजून काही? मला नेमका प्रॉब्लेम सापडत नाहीये. तुम्ही थोडं विस्ताराने सांगाल तर बरे होईल.

नाही ग्यालेक्षी नाही. सोनी झेड कितवातरी आहे.

प्रॉब्लेम: प्ले स्टोरवरच 'this app is not compatible' असं सांगणारा संदेश येतोय. डाऊनलोड/इंस्टोलचं बटणच येत नाही.

>>>>सोनी झेड कितवातरी आहे.>>
settings मध्ये about : काय नंबर/ मॅाडेल लिहिला आहे? ( c 6602/ 03/?)>>

सांरा's picture

18 Sep 2017 - 8:03 pm | सांरा

तुमचा मोबाईल अँड्रॉइड ६.० च्या आधीचा आहे का?
रच्याकडेने एका सॅमसंग गॅलॅक्सि वर अँप क्रॅश होत असल्याचे रिपोर्ट येत आहेत.

कोणते अॅप एर्रोर मारतंय ?

आदूबाळ's picture

18 Sep 2017 - 8:53 am | आदूबाळ

बस.

कंजूस's picture

18 Sep 2017 - 7:34 am | कंजूस

PuneBus : जरा डिटेलमध्ये-

१) from to पर्याय निवडल्यास येणाय्रा बस नंबरवर क्लिक केल्यास लगेच स्टॅाप्स-रूट येत नाही. लोकेशन सर्विस मागते.
शिवाय सिलेक्ट फ्रॅाम लिस्ट ओफ बसस्टॅाप्स हवे.
२) प्रत्येक पर्यायाला back / home button हवे॥
फोनमधली back key वापरावी लागते.
--
दुसरे एक punebus ( developer skoogle) तुलना करून पाहा. वरच्या दोन मुद्यांसाठी.

सांरा's picture

18 Sep 2017 - 11:38 pm | सांरा

१) from to पर्याय निवडल्यास येणाय्रा बस नंबरवर क्लिक केल्यास लगेच स्टॅाप्स-रूट येत नाही. लोकेशन सर्विस मागते.
शिवाय सिलेक्ट फ्रॅाम लिस्ट ओफ बसस्टॅाप्स हवे.

लोकेशन सर्व्हिस लागते कारण पुढचं पेज मॅप वाल आहे. अन मॅप मध्ये तुमची लोकेशन दिसेल अशी व्यवस्था आहे. जर तुम्हाला नको asel tr deny kara आणि दुसऱ्यांदा विचारल्यावर पुन्हा विचारू नका म्हणून चेक box yeto tyavar clik kara.

२) प्रत्येक पर्यायाला back / home button हवे॥
फोनमधली back key वापरावी लागते.

एकदा मोबाईलला बॅक बटण असल्यावर पुन्हा तेच का द्यावे असा आळशी विचार माझ्या डोक्यात तेव्हा होता. आता मात्र टाकावं
लागेलसे वाटते

सांरा's picture

18 Sep 2017 - 11:38 pm | सांरा

१) from to पर्याय निवडल्यास येणाय्रा बस नंबरवर क्लिक केल्यास लगेच स्टॅाप्स-रूट येत नाही. लोकेशन सर्विस मागते.
शिवाय सिलेक्ट फ्रॅाम लिस्ट ओफ बसस्टॅाप्स हवे.

लोकेशन सर्व्हिस लागते कारण पुढचं पेज मॅप वाल आहे. अन मॅप मध्ये तुमची लोकेशन दिसेल अशी व्यवस्था आहे. जर तुम्हाला नको asel tr deny kara आणि दुसऱ्यांदा विचारल्यावर पुन्हा विचारू नका म्हणून चेक box yeto tyavar clik kara.

२) प्रत्येक पर्यायाला back / home button हवे॥
फोनमधली back key वापरावी लागते.

एकदा मोबाईलला बॅक बटण असल्यावर पुन्हा तेच का द्यावे असा आळशी विचार माझ्या डोक्यात तेव्हा होता. आता मात्र टाकावं
लागेलसे वाटते

कंजूस's picture

19 Sep 2017 - 6:01 am | कंजूस

source- destination मध्ये सिलेक्ट फ्रॅाम लिस्ट ओफ बसस्टॅाप्स हवेच.
बसने जाणाय्रास मॅप लोकेशनची गरज नसते.
इन अॅप बॅक /होम बटण प्रत्येक पेजवर असले की अॅप structured होते. जसं मोठ्या प्रदर्शनात जागोजागी exit/canteen/washroom च्या पाट्या असतात.
( ओनलाइन बँकिंग अॅपमध्ये अॅपच्या आतलेच बॅक बटण न वापरता फोनचे वापरले तर लॅागाउट होते.)

सांरा's picture

19 Sep 2017 - 5:27 pm | सांरा

source- destination मध्ये सिलेक्ट फ्रॅाम लिस्ट ओफ बसस्टॅाप्स हवेच.

हे थोडं विस्ताराने सांगा. काही कळलं नाही.

Shivaji लिहिलं की त्या नावाचे स्टॅाप्स येतात पण सर्वच स्टॅाप्स दाखवणारा पर्यायही ठेवा एवढंच. कारण कुणी Sivaji / Poona सर्च केलं की येत नाहीत
बाकी खुप सिरिअस नाही.

सांरा's picture

21 Sep 2017 - 1:26 pm | सांरा

इथे आतापर्यंत झालेली चर्चा फार प्रोडक्तीव झाली. अनेकांनी विचार लावणारे सल्ले दिले त्याबाबत मी त्यांचे आभार मानतो. कंजूस काका आणि पंतश्री यांनी अप्प पूर्ण पिळून काढून त्यातील उणीवा मला दाखवल्या(ज्या मी चटई खाली दाबण्याचा प्रयत्न केलेला) त्यांचेही आभार.
या सर्व चर्चेचा सारांश म्हणून मी अप्प च्या अपडेट मध्ये पुढील गोष्टी टाकण्याचे ठरवले आहे.
पुणेबस-----------
बॅक, होम बटन
स्टॉप आणि बस शोधतांना आधीच पूर्ण लिस्ट
लोकेशन सपोर्ट असेल पण त्याची जबरदस्ती जी आहे ती काढण्यात येईल.
अजून चांगले ग्राफिक्स
डेटाबेस मध्ये काही चुका असतील तर त्या काढीन
दिशा---------
लेवेल फिचर
लोकेशन दुरुस्ती
अजून दोन तीन भाषा (जर कोणी मिपाकर मला आठही दिशांची वेगवेगळ्या भाषेतील नावे दितील तर अजून सोपे होईल.)
ग्राफिक्स दुरुस्ती
बाकी त्यापुढच्या अपडेट मध्ये पाहता यईल.

पंतश्री's picture

21 Sep 2017 - 4:23 pm | पंतश्री

जवळचा बस स्टोप शोधण्याची सुवीधा पण असु द्या

कंजूस's picture

21 Sep 2017 - 5:06 pm | कंजूस

भारी काम!!

सांरा's picture

2 Nov 2017 - 1:14 am | सांरा

वरील प्रतिसादानुसार पुणेबस चे नवीन अद्यतन आज मी मोकळं केलं आहे. त्यात वरील प्रमाणे सर्व गोष्टी टाकल्या आहेत. पंतश्री यांनी सुचवल्याप्रमाणे जवळपासचा स्टॉप शोधणे टाकणार होतो पण त्यासाठी युजर डेटा घ्यावा लागला असता आणि त्याची कोडिंग तापदायक असल्याने तूर्तास पास.

होकायंत्राला प्रतिसाद मिळत नसल्याने त्याचा सपोर्ट काढण्याचा विचार सुरु आहे.

कंजूस's picture

2 Nov 2017 - 9:50 pm | कंजूस

ओके आहे.

सांरा's picture

13 Dec 2017 - 11:48 pm | सांरा

पुणेबस चे नवीन अद्यतन आज मी मोकळं केलं आहे.
मागचा पूर्ण महिना डेटाबेस अपडेट करण्यात गेला. मागे पंतश्री यांनी सुचवल्याप्रमाणे जवळपासचा स्टॉप शोधण्याचा अल्गोरिथम शेवटी मला जमला, त्यामुळे ते एक जास्तीचे फिचर टाकले आहे. पीएमटी सध्या चालवत असलेल्या सर्व बसेस या अद्यतनांत मी टाकल्या आहेत. अनेक जणांना मॅप्स आधी दिसत नसत, तो बग आता काढून टाकण्यात आला आहे. इतर अँप वापरल्यावर मलातरी माझे अँपच उजवे वाटले अर्थात मला तर वाटणारच. बघूया तुम्हाला कसे वाटते ते.

शेवटी दिशा होकायंत्राचे अद्यतनही आज पूर्ण झाले. त्यामध्ये लेव्हलचे फिचर आता टाकले आहे. हि दोन अँप्स बनवतांना फार मजा अली. कधी एखादी गोष्ट आता जमत नाही असे वाटल्यावर तीच गोष्ट थोडा अजून प्रयत्न केल्यावर जमून जायची. मिपाकरांनीहि अँप्स ला चांगला प्रतिसाद आणि सल्ले दिले. हा धागा म्हणजे एक प्रकारे या अँप्सची खरडवहीच झालाय.
आता २०१८ मध्ये बघू काही नवीन कल्पना सुचतात का ते..
लिंक: दिशा, पुणेबस

स्क्रिनशॉट:
दिशा
Disha

Disha

Disha

पुणेबस

PuneBus

PuneBus

PuneBus

PuneBus