तंत्रज्ञान आणि पेटंट चे महत्व

आपला निखिल's picture
आपला निखिल in तंत्रजगत
3 Sep 2017 - 10:25 pm

Intellectual Property Rights (IPR) अर्थात बौद्धिक संपदा, इतर सर्व संपतीं प्रमाणेच माणसाची बौद्धिक, वैचारिक क्षमता किंवा कलात्मकता हि देेखील एक प्रकारची संपत्तीच आसून प्रत्येक माणसाने आपली बुद्धिमत्ता आणि कलात्मकता वापरून तयार केलेल्या प्रत्येक कृती वर त्याचा अधिकार आहे. ह्याच भावने मधून बौद्धिक संमपदेचा अर्थात IPR चा उगम झाला. IPR मागचा प्रमुख हेतू हा प्रत्येक व्यक्ती ला त्याच्या बौद्धिक कार्यावर अधिकार मिळवून देणे आणि इतर लोकांकडून त्या कार्याचा unauthorized वापर थांबवणे हा आहे.

IPR चे बरेच प्रकार असले तरी मुखात्वे तीन प्रकार आहेत:

1. Copyright: हा प्रकार सर्वाधिक प्रसिद्ध असून कलाकारांना किंवा Artistic लोकांना त्यांच्या कलात्मक कृतीं वर अधिकार मिळवून देतो. Movies, paintings, books, drama, sculputures हि ह्या प्रकारातली उत्तम उदाहरणे म्हणता येतील. Copyright चा अधिकार एकदा apply केल्यावर हा आयुष्यभर व author च्या मृत्यु नंतर पुढे 50 वर्षा पर्यंत राहतो.

2. Trademark: प्रत्येक business साठी त्याचे मार्केट मधील नाव हे सर्व काही असते. एका विशिष्ट नावाने प्रत्येक business, company हि ओळखाली जाते जेणेकरून त्याची समाजा मध्ये एक ओळख, प्रतिष्ठा निर्माण होते. त्यालाच आपण image, brand किंवा goodwill म्हणतो. प्रत्येक कंपनी साठी त्याची इमेज, ब्रँड म्हणजे खूप मोठी संपत्ती असून त्याच्या वापरा वर फक्त आणि फक्त त्याच कंपनीचा अधिकार असतो. हा अधिकार प्रत्येक कंपनीला Trademark द्वारे जपता येतो. ह्याची उत्तम उदाहरणे म्हणजे TATA, MAHINDRA, McDonald, Coca cola इत्यादी. Trademark चा अधिकार 10 वर्षा पर्यंत राहतो, नंतर मार्क परत renew करता येतो.

3. Patent: सर्वात महत्वाचा गणला गेलेला प्रकार म्हणजे Patent. हा प्रकार Technological, Research, Inventor लोकांसाठी अत्यंत महत्वाचा असून नवीन technologies, inventions, new products, processes protect करणे हे patent चे मूळ उद्धिष्ट आहे. सध्याच्या स्पर्धेच्या जगात innovation आणि नविन तंत्रज्ञान ह्याला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. सर्वच कंपन्यांनी रिसर्च चे महत्व जाणले आहे जे रिसर्च मध्ये मागे ते मार्केट मध्येही मागे पडत असल्याचे चित्र दिसत आहे. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे एके काळची कॅमेरा लीडर Kodak कंपनी. कंपन्या बराच पैसा, वेळ, रिसोर्स खर्च करून नवीन तंत्रज्ञान तयार करतात, ज्या वर प्रत्येक कंपनी चा अधिकार असतो. हा अधिकार कंपन्यांना patent मिळवून देते. कंपन्यांन प्रमाणेच अनेक scientists, individual inventors, professors, students असे जे कोणी नवीन रिसर्च करते ते आपल्या कार्यावर पेटंट घेऊ शकतात.

पेटंट हे सर्व तांत्रिकक्षेत्रा मधील कार्यासाठी घेता येऊ शकते.ह्या मध्ये biotechnology चा हि समावेश होतो. तुमचा प्रॉडक्ट, innovation हे पेटंट साठी नवीन आसणे खूप महत्यवाचे असून जगात कुठेही अस्तित्वात नको हि पेटंट साठी मुख्य अट आहे.

पेटंट हे मुख्यत्वे नवीन products किंवा processes साठी मिळते. Animals, Medical processes & treatment, Artistic work, research papers ह्या करता पेटंट मिळवता येत नाही.

पेटंट हे प्रत्येक देशा पुरते मर्यादित असून त्याचा कालावधी हा 20 वर्षांसाठी असतो नंतर त्याचा वापर कोणीही करू शकते. बाहेरील देशानं मध्येही पेटंट apply करता येऊ शकते. Individual आणि स्टार्टअप व small scale industry साठी पेटंट ची गव्हर्नमेंट फी 10,000 ते 15,000 पर्यंत आहे, परंतु lawyers ची प्रोफेशनल सर्विस घेतल्यास खर्च वाढू शकतो.

भारतात पेटंट ऑफिस हे मुंबई, कलकत्ता, दिल्ली आणि चेन्नई येथे असून भारत सरकार च्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स च्या अधिपत्या खाली आहे.

Shares मध्ये पेटंट चे महत्व: एखाद्या कंपनी कडे किती पटंट्स आहेत ह्या वरून त्या कंपनी ची technological strength कळू शकते. ज्या कंपनीची technical strength जास्त त्यांचा मार्केट शेयर हि जास्त, जसा कि Samsung, Apple, Google, Microsoft. दर वर्षी प्रत्येक कंपनी आपल्या Annual Report मध्ये Intellectual Property चा clause ऍड करते ज्या मध्ये पेटंट शी संबंधित सर्व माहिती public करते. तसेच पेटंट related काही litigation चालू असल्यास तेहि disclose करते. हि माहिती Investors साठी उपयुक्त ठरू शकते. पुढच्या वेळेस शेयर्स खरेदी करताना हि माहिती देखील तुम्ही वाचाल हि आशा आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधल्यास नक्की आवडेल
माझा मेल ID आहे आहे : visitnikhil88@gmail.com
मोबाइल क्रमांक: ९९२२९२६७९७

- निखिल

प्रतिक्रिया

बौद्धिक स्वामित्व हक्कांची थोडक्यात ओळख आवडली. यात अजून माहिती देऊ शकला असता. उदा. पेटंट मिळवण्यासाठी 10000 ते 15000 काय आहे, रुपये की डॉलर? पेटंट मिळवून देणाऱ्या फर्म असतात. त्यात जे वकील काम करतात त्यांना पेटंट अॅटर्नी असे म्हणतात. प्रोसेसबेस्ड पेटंट हे मला वाटते बंद झाले असावे. आता प्रॉडक्टबेस्ड पेटंट असते. पूर्वी प्रोसेसचे पेटंट असायचे तेव्हा भारतीय औषधनिर्मिती कंपन्या ह्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची औषधे वेगळ्या प्रोसेसने बनवून विकत असत. आता प्रॉडक्ट बेस्ड पेटंट असल्याने तेच औषध वेगळ्या पद्धतीने बनवले तरी मूळ कंपनीचा बौद्धिक संपदा स्वामित्व अधिकार डावलता येत नाही. कॉपीराईट हा मूळ निर्मात्याच्या मृत्यूनंतर पन्नास नव्हे तर साठ वर्षांपर्यंत लागू राहतो अशी माझी माहिती आहे.

या सर्व माहितीत काही चूक असल्यास सांगावे. तसेच या विषयावर अजून लिहावे ही विनंती.

आपला निखिल's picture

4 Sep 2017 - 10:03 pm | आपला निखिल

तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद... पेटंट बद्दल लिहण्यासारखे बरेच काही असून तुम्ही सांगितल्या प्रमाणे ह्या वर आजून माहिती लिहायला नक्कीच आवडेल.
१०००० ते १५००० खर्च रुपयांमध्ये आहे.
पेटंट एजन्ट आणि attorney बद्दल मी सविस्तर माहिती देईन.
प्रोसेस पेटंट हे पूर्वी पासून भारता मध्ये आस्तित्वात आहेत परंतु प्रॉडक्ट पेटंट्स १९९५ साला पर्यंत बंद होते. भारताने TRIPS ऍग्रीमेंट accept केल्यानंतर त्या अंतर्गत झालेल्या बदल मध्ये भारतात देखील प्रॉडक्ट पेटंट चालू झाले. ह्या वर देखील पुढील लेख मध्ये माहिती देईन.
Copyright तुम्ही सांगितल्या पर्यंत ६० वर्षां पर्यंत देखील अस्तित्वात असतात काही देशां मध्ये मात्र ५० वर्षांपर्यंत कालावधी आहे.

पेटंटबद्दल इथे लेखाला सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद. वाचकांनी प्रश्न विचारले पाहिजेत.
कॅापीरिइटविषयी थोडी चर्चा कुठेतरी झाली आहे परंतू अशा लेखांना एकदोन वर्षांनी पुन्हा लिहावे लागते.
तुम्ही शेवटी शेअर्सबद्दल लिहिले आहे ते फार बारी प्रिंटमध्ये सर्व न निर्णय झालेल्या जबाबदाय्रा liabilities दिलेल्या असतात.
छान!

आपला निखिल's picture

8 Sep 2017 - 8:53 pm | आपला निखिल

धन्यवाद... वाचकांसाठी हि माहिती उपयुक्त आहे असे वाटल्यास आजून लिहण्यात मजा येते. तुम्ही सांगितल्या प्रमाणे वाचकांनी प्रश्न विचारले पाहिजेत.