बाप्पाचा नैवेद्यः केळ्याच्या पुर्‍या

सविता००१'s picture
सविता००१ in पाककृती
2 Sep 2017 - 9:18 am

साहित्यः

चांगली पिकलेली ३ केळी,
अर्धी वाटी साखर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता),
यात मावेल एवढी कणीक,
तळण्यासाठी तेल.

कृती:

केळी छान कुस्करून घेउन त्यात साखर घालावी.
गॅसवर ठेवून सतत हलवत रहावे.
२-३ मिनिटांत साखर विरघळली की गॅस बंद करून मिश्रण थंड होउ द्यावे.
नंतर या मिश्रणात बसेल एवढीच कणीक घालून (मला दीड वाटी कणीक लागली) घट्ट पीठ भिजवून ठेवावे.
साधारण अर्ध्या तासाने कणीक खूपच घट्ट वाटली तर दुधाचा शिपका मारून कणीक सारखी करून नेहमेसारख्या पुर्‍या लाटून तळून घ्याव्यात.
या पुर्‍या अजिबात पाणी नसल्याने बर्‍याच टिकतात. त्यामुळे प्रवासात वगैरे सहज नेता येतात. अगदी खुसखुशीत होतात. छान लागतात.

शेवटी बाप्पा खूष तर आपणही खूष. नाही का?

1

प्रतिक्रिया

अनन्न्या's picture

2 Sep 2017 - 10:11 am | अनन्न्या

लहानपणी आई खूप वेळा करायची

सानिकास्वप्निल's picture

5 Sep 2017 - 7:40 pm | सानिकास्वप्निल

असेच म्हणते.

आई नेहमी बनवते. आवडता प्रकार.

स्वाती दिनेश's picture

2 Sep 2017 - 2:43 pm | स्वाती दिनेश

केळ्याच्या पुर्‍या छान दिसत आहेत.
ह्या पुर्‍यांवरून जपानचे दिवस आठवले. त्यावेळी तिथे खाण्याचे ऑप्शन्स खूपच कमी असल्याने डाबा बाटली बरोबर असायची. केळ्याच्या पुर्‍या किवा पोळ्या प्रवासात नेत असू.
स्वाती

पैसा's picture

2 Sep 2017 - 6:12 pm | पैसा

छान दिसत आहेत मात्र तळणीचे पदार्थ फार कमी खाते त्यामुळे केल्या तर संपवायचा प्रॉब्लेम होईल

गम्मत-जम्मत's picture

2 Sep 2017 - 9:35 pm | गम्मत-जम्मत

सहल वैगरे असेल तर हमखास डब्यात मिळणारा पदार्थ!!
bake पण करता येईल ना? Banana Cake च्या जवळ जाणारी पाकृ वाटत आहे.

मस्त आलाय फोटू. बरं झालं पदार्थ समजला. प्रमाण असे नसल्याने जितकी केळी असतील त्यातून करता येईल. कालच मी एकदम ३ केळी पिकल्याने बनाना ब्रेड केलाय. आता पुर्‍या करून पाहीन.

कंजूस's picture

3 Sep 2017 - 12:58 pm | कंजूस

छान लागतात.
मला वाटलं शिंगाडं पिठातली केळ्याची भजी करणार

नूतन सावंत's picture

3 Sep 2017 - 5:07 pm | नूतन सावंत

आमच्यकडे यात तांदळाचे पीठ घालतात आणि याला केळ्याचे उंबर म्हणतात,हाताने थापाता येतात.

इडली डोसा's picture

3 Sep 2017 - 9:53 pm | इडली डोसा

असेच असतात, पण त्यात साखर नाही घालत आम्ही, आणि खोबऱ्याच्या चटणीबरोबर खातो, मस्त लागतात.

तुझ्या पुऱ्या खूप छान दिसतायेत.