#मिपाफिटनेस - ऑगस्ट २०१७ - पळण्यासाठी जन्म आपुला !!

Primary tabs

माझीही शॅम्पेन's picture
माझीही शॅम्पेन in जनातलं, मनातलं
1 Aug 2017 - 2:12 pm

नमस्कार मंडळी, दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही आपल्या समोर एक मिपाकर आपली व्यायामगाथा सांगणार आहेत. ह्या महिन्याचे मानकरी आहेत "माझीही शँपेन"!

शँपेनराव पळतात. भरपूर पळतात आणि मॅरेथॉनसंबंधी अनेक वेगवेगळ्या गोष्टी आनंदाने शेअर करतात.

आपल्यालाही आपले अनुभव मांडायचे असतील तर आम्हाला जरुर व्यनि करा.

टीम #मिपाफिटनेस - मोदक, प्रशांत, डॉ श्रीहास.
****************************

"I always loved running...it was something you could do by yourself, and under your own power. You could go in any direction, fast or slow as you wanted, fighting the wind if you felt like it, seeking out new sights just on the strength of your feet and the courage of your lungs."
- Jesse Owens

-------------------------------------------------------------------------------------------------------

प्रसंग १ :- तुफान वाऱ्यासह आकाशातुन जोरदार सरी कोसळत आहेत , ढगांचा गडगडाट होतोय आणि घड्याळाचा गजर वाजतोय
प्रसंग २ :- भल्या पहाटे तापमान १० डिग. से . आहे , थंडी मुळे चिडीचूप शांतता आहे , सगळे जण घोरतायेत आणि घड्याळाचा गजर वाजतोय
प्रसंग ३ :- उकडयाने जीवाची काहिली होतेय , पहाट असूनही घामानं अंग भिजून गेलय आणि घड्याळाचा गजर वाजतोय

असे आणि अनेक प्रसंग येतात गजर वाजला कि आपल्या बेड भोवती एखाद कृष्ण विवर आहे आणि त्यातून पूर्ण जोर लावून बाहेर येतोय आणि सगळं जग झोपेत आहे तेव्हा वॉर्म अप करून पळण्यास सुरु करतोय असं आता नेहमीच झालाय.
चला एवढं नमनाला घडा भर तेल टाकून लेखाला सुरुवात करतो.. जे काही लिहिणार ते काही आत्मचरित्र वा प्रौढी नाही तर जे मी आणि माझ्यासारखे अनेक सहज करू शकतात म्हणजे पळणं त्याविषयी थोडंस ! आपण पळू शकतो तर बाकीचे का नाही हेच लॉजिक , नाही म्हणता म्हणता ५ अर्ध-मॅरेथॉन आणि जवळपास १० हुन अधिक १० किमीच्या स्पर्धात भाग घेऊन जे काही ज्ञान कमावतोय ते वाटण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न तेंव्हा चु भु द्या घ्या

खरं तरी माझी आणि पळायची गट्टी तिशीत आल्यावर जमली ती पण जिम पासून , अमेरिकेत असताना आजूबाजूच्या पोरी कसल्या सुसाट धावायच्या आणि मी माझा अगडबंब देह घेऊन आधी चालायचो , नंतर हळू हळू जस वजन कमी होऊ लागलो तस जॉगिंग आणि मग पळायला लागलो मध्ये पुन्हा खंड झाला , पुन्हा वजन ८५च्या पलीकडे गेलं आणि जेव्हा भारतात परत आलो परिस्थिती हात बाहेर गेली होती.

पुन्हा पळायला सुरुवात केली पण कधीच रस्त्यावर पळूया असा विचार केला नव्हता , एक दिवस ऑफिसात एक बातमी ऐकली आमचे CEO जो मुंबई मॅरेथॉन पूर्ण करेल त्याला ताज मध्ये डिनर देणार झालं जे अगोदर पळायचे ते एकदम खुशीत असायचे मी मनात विचार केला असाही आपण जिम मध्ये निरर्थक पळतो आहे मॅरेथॉन साठी तयारी करूया आजूबाजूचे दोन सहकारी तयार झाले आणि आमची तयारी सुरु झाली

सुरुवातीला घरातील जे स्पोर्ट शूज सापडले ते घालून पळायचो , कुठलाही वॉर्म अप नाही किंवा कुल डाउन नाही , दोनदा तीनदा असा ४/५ किमी धावल्यावर गुढगा / पोटरी सर्व स्नायूंनी संप पुकारला (सर्व स्री वर्गाची क्षमा मागून) प्रत्येक सराव केल्यावर गरोदर बाई सारखा हळू हळू चालायचं , कुठे तरी आपण फुल्ल चुकतोय हे कळायचं , मग कशी बशी ३ तासात अर्ध मॅरेथॉन पूर्ण केली पण कुठे तरी आपलं गंडलंय आणि सुधारायला पाहिजे हे कळत होत.

अशातच आमच्या कंपनीची एका धावायचं व्यावसायिक ट्रेनिंग देणाऱ्या कंपनी बरोबर टाय अप केलं आहे अशी बातमी लागली , कुठून तरी चौकशी करून एकाने उद्या सकाळी ५:३० ला अमुक तमुक ठिकाणी भेट तुझी कोच लोकांशी ओळख करून देतो , ठरल्या प्रमाणे भाईने ओळख करून दिली आणि गायब झाला (तो आजतागायब ) , नंतर ट्रेनिंग बरोबरच बराच वाचन केलं , तू-नळी वरचे व्हिडिओ पहिले , प्रत्येक स्नायू दुखावून / सुधारून ज्ञान जमा केलं त्याच थोडासा सार

१) कोण पळू शकत :- कोणीही ज्याला पायाच्या स्नायूंचा किंवा हृदयाचा आजार नाही किंवा गरोदर नाही , अगदीच सुरुवात करणार असाल डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या , तिथे मिलिंद सोमणची आई सत्तरीत पळते तर कोणीही धावू शकत

२) रनिंग शुज - सर्वात महत्वाची accessory , शूज , थोडा विचार करून घ्यावा अगदी १ हजारापासून ते १ लाखापर्यंत सहज मिळतात , पण प्रत्येक चांगल्या ब्रँडची धावायची कॅटेगरी वेगळी असते शक्यतो त्यातील निवड करावी , हल्ली मोठ्या शहरांमध्यें शूज आणि जिमच सामान एकत्र मिळत , म्हणजे जिथे ट्रेड मिल आणि शूज एकत्र मिळतात तिथे शूज घालून स्वतः पळून ट्राय करावेत , तस ओव्हर प्रोनेशन आणि अंडर प्रोनेशन असे दोन प्रकार असतात त्या प्रमाणे शूज सुद्धा घेता येतात , जोडे कितीही महत्वाचे असले तरी फक्त तेच नाही ठरवत तुम्ही किती आणि कसे पळणार ते , आज काल डेकेथलोन सारख्या दुकानात तुम्ही आठवड्यात किती पळता त्यावर सुद्धा जोडे कुठले घ्यावे ह्याचे मार्गदर्शन करतात

३) वॉर्म अप :- वॉर्म अप कधीच टाळू नये , सर्व स्नायूत रक्ताभिसरणं आणि पुढे येणाऱ्या आघात सहज पणे टाळण्यास मदत होते , मी किती वेळा पाहतो लोक डायरेक्ट पळायला सुरुवात करतात ते चूक आहे , वॉर्म अप करताना पाय , घोटे , पोटऱ्या , गुडघे , कंबर , पाठ , खांदे , मान वैगरे सर्व स्ट्रेच होतील असं पाहावं साधारण ५ / १० मिन वॉर्म अप पुरे असतो

४) कूल डाउन :- साधारण हया कडे सर्वात दुर्लक्ष केलं जात , पळून आलयावर सर्व स्नायू सावकाश स्ट्रेच केले तर पुढील सेशनसाठी रिकव्हरी चांगली होते , तु नळी वर बरेच व्हिडीओ आहेत , रनिंग करताना वाढलेला हार्ट रेट हळुहळु नॉर्मलला आणुन स्नायू स्ट्रेच होतील असं पाहावं

५) कोर व्यायाम :- पाठीचा खालचा भागापासून ते नितंबापर्यन्त एक काल्पनिक पट्टा म्हणजे कोर बेल्ट् , निसर्गानी दिलेला वरदान पट्टा ह्यात साधारण पणे
खालील भाग येतात
Rectus abdominis (उदर पोकळी) + Erector spinae (पाठीचा कणा ) + Multifidus (कण्याचा खालचा भाग ) + External & Internal obliques (कंबर) + ओटीपोट + नितम्ब
कुठलाही कार्डिओ (पळताना , सायकल , स्विमिंग , दोरीच्या उडया ) करताना तुमचा कोर मजबूत पाहिजे , खरंतर हे ऐकायला थोडं विचित्र वाटत पण ते अगदी महत्वाचं आहे , त्यासाठी , प्लँक्स पासुन कंबरेचे व्यायाम करावे लागतात , पुढील संकेत स्थळावर सोप्पे आणि चांगले व्यायाम दिले आहे

https://www.verywell.com/quick-core-workout-routine-3120075

६) डी-हैड्रेशन टाळा :- सुरुवात करताना पाणी पिऊन घेतलं तर डी-हैड्रेशन होऊ नये म्हणुन साधारण पाण्याची छोटी बाटली जवळ ठेवावी , थोड्या थोड्या वेळाने घोट घेणं बेस्ट , खुप जास्त पाणी पिऊन फार फायदा होत नाही :) खरं तर फक्त पाण्याच्या कामतरतेमुळे डी-हैड्रेशन होत नाही तर त्या बरोबरच क्षार सुद्धा कमी होणं हेही आहे , पण हा विषय मोठा आहे आणि अजुन मी विद्यार्थीदशेत आहे

७) आहार :- केवळ पळण्यासाठी असा काही वेगळा आहार नाही पण आपण पळतो म्हणुन काय वाट्टेल ते खाऊ शकत नाही हे कळायला सुद्धा मला बराच वेळ लागला , संतुलित आहार , पुरेश्या प्रमाणात कर्बोदके , प्रथिने , कॅल्शिअम , पोटॅशिअम इत्यादी असलेला असेल तर व्यायामाला मदत होते. अजून एक महत्वाचे जर ५ किमी पेक्षा जास्त पळणार असाल तर एक उकडलेला बटाटा / केळे साधारण १५/२० मिनिटे आधी खाऊन निघावं , त्या पेक्षा जास्त प्रमाणात खाऊ नये

-----------------------------------------------------------------
अजुनही रनिंगवर बरच काही लिहू शकतो , पण कार्यबाहुल्यांमुळे आवरत घेतो ! जाता जाता आता माझी पुढची स्पर्धा सातारा मॅरेथॉन (हाफ) ज्या साठी चढाई वर पळण्याचा सराव चालु आहे , पुढील वर्षी फुल मॅरेथॉन आणि मग आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन गेम इज ऑन !!!

-----------------------------------------------------------------
"Ask yourself: 'Can I give more?'. The answer is usually: 'Yes'."
-Paul Tergat, Kenyan professional marathoner

जीवनमान

प्रतिक्रिया

डॉ श्रीहास's picture

1 Aug 2017 - 2:58 pm | डॉ श्रीहास

२ जुलै ला ३०० किमी चं BRM केलं त्या १५ मिनीटे ऊशीरा पोहोचल्यामुळे Late Finish (मेडल नाही मिळणार) आणि दुसरं २९ जुलै ला ६०० किमी साठी सुरू केल्यावर २०३ किमी नंतर (mental block) आला आणि पुढे गेलोच नाही ....

ह्या दोन्हीत जरी अपयश आलं तरीपण जे काही शिकायला मिळालं ते आयुष्यभर साथ देणारं आहे.... अपयश नेहेमीच अनुभवसमृद्ध करणार असतं , पुढे त्याचाच फायदा होतो..._/\_

डॉ श्रीहास's picture

1 Aug 2017 - 3:00 pm | डॉ श्रीहास

माझंच घेऊन बसलो... माफ करा ... मस्त जमुन आलाय लेख... तुमच्या पुढच्या मॅरेथाॅन साठी शुभेच्छा ...

माझीही शॅम्पेन's picture

10 Aug 2017 - 10:41 pm | माझीही शॅम्पेन

धन्यवाद डॉ श्रीहास , तुमचे पराक्रम वाचलेत त्यापुढे हे काहीच नाही

इरसाल कार्टं's picture

1 Aug 2017 - 5:11 pm | इरसाल कार्टं

मस्त माहिती.

मयुरा गुप्ते's picture

1 Aug 2017 - 8:40 pm | मयुरा गुप्ते

मी इथे ह्या लेखामध्ये माहितीत भर घालु का?
-मयुरा.

माझीही शॅम्पेन's picture

1 Aug 2017 - 8:44 pm | माझीही शॅम्पेन

होय अर्थातच , नक्की घाला सर्वानांच त्याचा फायदा होईल

मयुरा गुप्ते's picture

2 Aug 2017 - 3:43 am | मयुरा गुप्ते

खरतरं ह्या प्रश्नाला निश्चित उत्तर नाहि देउ शकत कोणी..
मी ज्या क्षेत्रात काम करते, खरतर ज्या कंपनीत काम करते त्या कंपनी मध्ये तर ह्या प्रश्नाचे सगळे नियम , सगळे आयामच वेगळे आहेत.
कृत्रिम हात अथवा कृत्रिम पाय लावुन मोठमोठ्या स्पर्धांतुन भाग घेणारे स्पर्धक, धावपटु प्रत्यक्ष बघण्याची संधी जेव्हा मिळाली तेव्हा व त्यानंअतर तर मी धावु शकेन का, किंवा मला हे अंतर पार करता येईल का हे प्रश्नच बाद झाले. पूर्ण धडधाकट शरीर नसतानाही केवळ मनोधैर्याच्या जोरावर,, कुठल्यातरी आंतरीक शक्तीने ह्या स्पर्धा पूर्ण करणारे स्पर्धक म्हणजे डोळ्यातअंजन,.. एक सणसणीत चपराक देणारं वास्तव आहे.

पण अर्थात अतिशय नियोजन पुर्वक घेतलेली मेहेनत, त्याला आधुनिकतेची जोड, शास्त्रशुद्ध ट्रेनिंग ह्या सगळ्या गोष्टींद्वारे लक्ष साध्य करु शकतो.
--मयुरा

माझीही शॅम्पेन's picture

10 Aug 2017 - 10:44 pm | माझीही शॅम्पेन

पूर्ण धडधाकट शरीर नसतानाही केवळ मनोधैर्याच्या जोरावर,, कुठल्यातरी आंतरीक शक्तीने ह्या स्पर्धा पूर्ण करणारे स्पर्धक म्हणजे डोळ्यातअंजन,.. एक सणसणीत चपराक देणारं वास्तव आहे.

बाप रे मी असा कधीच विचार केला नव्हता __/\__,
खरंय जे आपल्या कडे असत त्याची महती नसते आपल्याला

गुडघे दुखणार्यानी पळावे का? जर पळु शकु तर काय काळजी घ्यावी?

अप्पा जोगळेकर's picture

3 Aug 2017 - 5:45 pm | अप्पा जोगळेकर

गुडघे दुखत असतील तर पळण्याऐवजी सायकल चालवावी किंवा पोहावे.

माझीही शॅम्पेन's picture

10 Aug 2017 - 10:47 pm | माझीही शॅम्पेन

मी डॉक्टर नसल्याने नक्की सांगू शकत नाही पण योग्य त्या डॉक्टरांचा (ऑर्थो ) आणि फिसिओ थेरपिस्ट , मी बरेच जण पाहिलेत जे योग्य उपचार घेऊन चांगले पळताना पाहिलेय

वैयक्तिक कळवलं आहेच!!

प्रास's picture

2 Aug 2017 - 1:45 pm | प्रास

हा जिव्हाळ्याचा विषय आहे. वय, वजन, शरीर पळू देईल का असा प्रश्न होता. तरी मनाचा हिय्या करून सुरू झालो नि मजल १२ किमी पर्यंत गेली. पण अचानक टाचदुखी उद्भवली नि आम्ही थांबलो.
धावण्याचा टाचदुखीशी संबंध असावाच. दुखणं आता जरा कमी आहे तर 'जय शँपेन'च्या गजरात पुन्हा सुरूवात करावी म्हणतो...
शँपेनराव, लेख उत्तम!
आवडला...

समाधान राऊत's picture

4 Aug 2017 - 12:10 am | समाधान राऊत

बहुदा ही अडचण वजन कमी करण्याच्या उद्देशाने अचानक सुरु केलेल्या धावण्याने होते, किंवा धावताना आपण पायाचा पंजा कसा टेकवतो हे सुद्धा परिणाम दाखवते, भरपूर वेळा असे निरीक्षण केले आहे कि नवीन धावणारे लोक उतार लागला असता पायाचा पंजा जोरात आपटत पळत सुटतात नि मग बोर्या वाजतो..शिवाय काही जनाचे पाय जन्मात: सारखे नसतात, दोन पायाच्या आकारात फरक असतो पण सहज ओळखू येईल इतका फरक नसतो. म्हणून लहानपनापासूनच एका पायाला चप्पल, बूट, सॅंडल, ढिले येतात,पण याकडे कळत न कळत दुर्लक्ष केले जाते, तो पाय आयुष्य भर हे दुखणे निमूटपणे सहन करत असतो, धावताना तर विचारच नको मग...सुज्ञ धावपटू म्हणून या गोष्टीचा विचार करून प्रत्येक पायाचा बूट वेग वेगळ्या नंबर चा select करतात..

मित्रहो's picture

2 Aug 2017 - 3:11 pm | मित्रहो

जमले नाही. प्रयत्न करुन पाहीले. पाच किमीच्या वर जमले कधीच जमले नाही. पाय दुखतात. प्रचंड दुखतात. फॉर्म चुकला असेल असे काहींनी सांगितले.

खटपट्या's picture

2 Aug 2017 - 3:35 pm | खटपट्या

चांगला लेख

देशपांडेमामा's picture

2 Aug 2017 - 4:50 pm | देशपांडेमामा

" गजर वाजला कि आपल्या बेड भोवती एखाद कृष्ण विवर आहे आणि त्यातून पूर्ण जोर लावून बाहेर येतोय " हे खासच! खुप वेळा अनुभवलय हे :-)

देश

अरिंजय's picture

2 Aug 2017 - 8:13 pm | अरिंजय

प्रसंग १, २ व ३ अगदी स्वतः अनुभवले, सलग चार वर्षे. त्यानंतर मात्र केवळ आळसापोटी व्यायाम बंद झाला. मध्यंतरी वॉकींग, रनिंग अधुन मधुन हुक्की आल्यावर चालु केले, परत बंद. परंतु आता मात्र निश्चय करुन पुन्हा चालु केलंय. अपडेट्स देतच राहीन.

मस्त माहिती दिली आहेत तुम्ही. सध्या नवर्‍याला पळण्याचे व्यसन लागले आहे (१ तास सलग पळतो तो). त्याला दाखवते हा लेख.
मी स्वतः फार जास्त पळत नाहिये. ३०-४० मिनिटे चालण्याच्या मधे दिड दोन मिनिटे सलग पळत होते ती गाडी अता हळूहळू ३ -४ मिनिटांकडे सरकली आहे.
या लेखामुळे जास्तीत जास्त पळायचा प्रयत्न करेन आता.

अप्पा जोगळेकर's picture

3 Aug 2017 - 5:46 pm | अप्पा जोगळेकर

मस्त.

शारीरिक क्षमतेची कमी असल्याने धावणे जमत नाही, पण नियमित चालतो. थोडा परीघ वाढवावा एवढा हुरूप या लेखाने नक्की आला आहे.

असे आणि अनेक प्रसंग येतात गजर वाजला कि आपल्या बेड भोवती एखाद कृष्ण विवर आहे आणि त्यातून पूर्ण जोर लावून बाहेर येतोय

हा हा मस्तच! उत्तम लेख. आवडला.

पिलीयन रायडर's picture

4 Aug 2017 - 3:57 am | पिलीयन रायडर

लेख आवडला. खुपच माहितीपुर्ण आहे! मला मध्येच झटका आला होता तेव्हा ट्रेडमिलवर पळायचे. मग ओव्हर कॉन्फिडेन्स आला. रस्त्यावर पळुन पाहिलं एका दिवशी. मग आपली काही कुवत नाही हे कळालं. तेव्हा पासुन मानसिक धक्का बसुन पळणंच बंद केलं. आता तुमचं वाचुन जरा जरा वाटायला लागलंय खरं...

बादवे, ताज मध्ये डिनर मिळालं का मग?

माझीही शॅम्पेन's picture

15 Aug 2017 - 7:35 pm | माझीही शॅम्पेन

बादवे, ताज मध्ये डिनर मिळालं का मग?

नाही हो , ती अफवा होती , पण ती माझ्यासाठी फायदेशीर ठरली , एकदा आळासाचा बोळा निघाला की मग लवचिकपणा आणि सातत्य येत

अजित पाटील's picture

10 Aug 2017 - 12:25 pm | अजित पाटील

मी हि आत्ताच रुंनींग चालू केले आहे. रुंनींग ची थोडी भीती असल्यामुळे मी हळू हळू रुंनींग चालू केले आहे. आत्तापर्यन्त ३ वेळा १० किमी आणि २ वेळा २१ किमी पूर्ण केले आहे. आमच्या ग्रुप मध्ये बरेच जण महिन्याला २०० किमी रुंनींग करणारे आहेत त्यामुळे मागच्या महिन्यात ४०+ किमी रुंनींग केले.
मी रुंनींग चा काही चाहता नाही पण ग्रुप मुळे रुंनींग चालू केले आहे ४२ किमी ( फुल्ल मॅरेथॉन ) इच्छा आहे माहित नाही कधी पूर्ण होईल.
फक्त वरती सांगितले तसे सुरवातीला काळजी घेऊन सुरवात करा
सायकलिंग सुरु करून नंतर रुंनींग सोपे जाईल. ( स्वतःचाच अनुभव आहे ) मी रुंनींग चे प्रॅक्टिस न करता २१ किमी न थांबता मागील रविवारी पूर्ण केले

शॅम्पेन एक आनंदी विनोदी माणूस. ऐकावसं वाटतं.
पळून जाण्यासारखे प्रसंग बरेचदा येत असले तरी प्रत्यक्ष पळण्याचे प्रसंग कमीच येतात. शाळेत एनसिसिसाठी आठवीत तपासणी करताना सपाट पावले असल्याने बाद केले तेव्हा किती आनंद झाला होता! काहीही न करताच सुटका झाली॥
पावले जेवढी बाकदार तेवढा शरीर पेलण्याला जोर येतो हे नंतर कळले.
बाकी पळणाय्रा लोकांबद्दल आदर आहेच.
पळापळापळा पळत राहा.
हम तुम्हारे साथ नही हैं।

मिलिंद सोमणने फेबुवर लाईक केलाय हा लेख.

जियो शँपेनराव...!!!!

पाटीलभाऊ's picture

11 Aug 2017 - 1:41 pm | पाटीलभाऊ

मस्त लेख...
पावसाळ्यामुळे सध्या पळण्याचे थांबवले आहे...लवकरच सुरु करेल आता परत.

प्रशांत's picture

14 Aug 2017 - 10:03 pm | प्रशांत

पळणे कधी जमले नाही लेख वाचल्यावर कालपासून थोड़ थोड़ चालायला/पळायला सुरुवात केली
दी. १३: ५ किमी ५८ मिनिटात
दी. १४: २ किमी २२ मिनिटात

मी सायकलिंग नियमित (?) करतो, या महिन्यात आतापर्यंत ४२९ किमी सायकलिंग झाली.

उमेश धर्मट्टी's picture

29 Aug 2017 - 5:11 pm | उमेश धर्मट्टी

अतिशय उपयुक्त लेख!