"अशा का वागतात काही मुली?"

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
31 Jul 2017 - 4:06 pm
गाभा: 

आत्ताच एका 'फक्त प्रौढांसाठी' असणार्‍या WhatsApp ग्रुपवर(आता कुठला ग्रुप ते इथं नका विचारु!)एका वेगळ्या विषयावर चर्चा झाली.यात काही मिपाकरही होते.

तर चर्चेचा विषय असा होता की 'तशा प्रकारच्या व्हिडिओजपैकी,काही व्हिडिओज हे मुलींना फसवून त्यांच्याच मित्राकडून नंतर डिलीट करण्याच्या वायद्याने काढले जातात.अर्थातच असं काही होत नाही.मैत्रिणीच्या आपल्यावर असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन हे व्हिडिओज संकेतस्थळांवर लिक केले जातात.

यात एका सदस्यांनी असा मुद्दा मांडला की "या मुलींना कळत कसं नाही? बॉयफ्रेंडच्या नको त्या मागण्यांना या मुली बळी कशा पडतात? यामुळे आपलं आयुष्य पणाला लागू शकतं हे या मुलींना का कळत नसावं?

या फसवणूकीला जशा मुली जबाबदार आहेत तशीच त्यांना फसवणारे त्यांचे बॉयफ्रेंडही तेवढेच जबाबदार आहेत.पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत यातून सर्वात जास्त त्रास हा मुलींनाच होतो.भोगावं त्यांना लागतं.घरातल्यांची नाचक्की होते ती वेगळीच!

अशा प्रकारचे व्हिडिओज चोरुनही काढले जातात.पण हा प्रकार घडतो केव्हा? जेव्हा ती मुलगी अशा प्रकारे मित्राच्या खुशीसाठी संमती देते तेव्हा! मग प्रश्न असा येतो की या मुली का तयार होतात अशा प्रकारांना? का ठामपणे नकार देऊ शकत नाहीत?बरं हा प्रकार अल्पशिक्षित मुलींबरोबर,खेड्यातच घडतो असं नाही अगदी शिकलेल्या शहरी मुलीही याला बळी पडतात.

बरं हे असे लबाड लांडगेच या मुलींना आवडतात.त्यांचं स्टायलिश वागणं,कपडे,गाडी हेही जोडीला असतं.
पण एखाद्या साध्या सरळ मुलानं यांना प्रपोज केलं की, "मी तुला किती चांगला समजत होते.तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती!" असं उत्तर मिळतं.

मुली किती लेवलपर्यंत जाऊन माती खाऊ शकतात याचं एक उदाहरण पाहण्यात आहे.
ही मुलगी BE Electronics चांगल्या मार्कांनी पासआऊट होती.एके ठिकाणचा कामाचा चांगला अनुभव होता.त्यानंतर आमच्या कंपनीत आली.इथे आधीपासूनच एक मुलगा टेस्टींगसाठी होता.याचं त्याच्या कॉलेजमधल्या दुसर्‍या एका मुलीबरोबर अफेअर होतं.तिच्याचबरोबर लग्नही ठरलं होतं.भावी बायकोबरोबर सगळे उद्योग करुन झाले होते.

ही कंपनीत आलेली मुलगी त्याने पाहिली.हीला मी पटवणारंच असं म्हणून प्रयत्न सुरु केले.तिचा पाठलाग करणे वगैरे प्रकार सुरु झाले.ती आणि तिची मैत्रीण दोघी एकत्रच घरी जायच्या अॅक्टीवावरुन.सुरुवातीला ही मुलगी आपण भलं आपलं काम भलं अशी होती.
हीच्या जोडीदार मैत्रिणीचे विचार म्हणजे प्रेमात पडायचं,नवर्‍याचा स्वभाव आधीपासून माहित असलेला चांगला अशा टाईपचे.तिच्या संगतीने हीचेही तसेच विचार.(अर्थात असे विचार काही गैर नाहीत)
पण तसा कोणी हीच्या जिवनात नव्हता.मग ह्या ठोंब्याचे प्रयत्न सुरु होतेच.आणि वाढले.तिच्या शिव्या खाऊन,अपमान होऊनही पिच्छा सोडत नव्हता.ती बोलली नाही की हा डबा खायचा नाही.
आता हीची ही जोडीदारीण हे सर्व प्रकार पाहत होती.तिने सुचवलं अगं एवढा मागं लागलाय तर नाही का म्हणतेस? प्रेमविवाह करायचा असं ठरलंय ना आपलं? दे त्याला रिस्पॉन्स!
डिपार्टमेंटमधल्या काही लोकांनी त्या मुलाबद्दल सांगितलं तरीही ती बदलली नाही.
स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची मुळातच अक्कल नसल्याने तिने या मुलाला होकार दिला.तिला याचं लग्न ठरलंय हेही माहित होतं.तरीही मी निर्णय बदलायला लावीन असा विश्वास.दोघंही वाहवत गेले.सगळे "उद्योग" करुन झाले.यानं त्याचे फोटोही काढून ठेवले.
या मुलीच्या घरी ती या नालायकाबरोबर बोलत असताना बापानं पकडलं.झोडपून काढलं पण लग्न करीन तर याच्याबरोबरचं म्हटल्यावर बापानं मुंबईचं एक स्थळ काढलं.तो मुलगा स्वभावानं कसा आहे वगैरे न पाहता जबरदस्तीनं लग्न लावून दिलं.
या ठोंब्याच्या होणार्‍या बायकोलाही आपला होणारा नवरा इतका नालायक आहे हे माहित होतं तरीही गावभर फिरल्याने सगळीकडे प्रसिध्दी झाली होती.मग तिच्याबरोबर याचं लग्नही झालं.
या एका प्रसंगात एक नव्हे तर चक्क तीन पूर्ण बिंडोक मुली पाहिल्या.त्या पण शिकलेल्या,इंजिनियर मुली.

अजून एका सदस्यांनी असाच प्रेमज्वराचा अनुभव सांगितला.तो त्यांच्याच शब्दात.

"आमच्या मित्राला ३ बहीणी आहेत... त्यातली ही दुसरी!
दिसायला फार सुंदर. तीचं आणि एका मुलाचं प्रेम साधारण ८वी ते ९ वीच्या दरम्यान जुळलं.. ती त्याच्यापेक्षा ६ महिन्याने मोठी... १२ वी नंतर त्या दोघांमध्ये खूप जवळीक झाली... ती मुलगी, तिची लहान बहीण आणि आजी गावी तर बाकी मुंबईला होते.. तो मुलगा दररोज त्या मुलीच्या रात्री १२ च्या नंतर घरी यायचा... तो मुलगा गावात बहिणीकडे राहायला होत म्हणून गावात रात्री मुलांच्या कट्ट्यावर येत असे... त्यामुळे संशय ही कोण घेत नसे... एखादा सापडला.. गुरालाही मारत नसतील एवढा बेदम मारला... त्या मुलीला दोन ठेवून दिलेल्या... पण घरी सांगितलं नाही... वाटलं सुधारेल... पण परत ६ महिन्यांनी ह्यांचे प्रकरण चालू... अाख्या गावभर झालं.. तरी ती मुलगी बेफिकर... शेवटी घरच्यांना समजलं... एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं.. पण ती एवढी बेफिकीर की करीन तर हाच.. दोघानी ही २१ पार केल होतं.. तिला फार समजावलं पण ऐकेनाच... पळून जाऊ नये म्हणून मग लग्न लावायचा विचार केला... आम्ही सांगून टाकलं लग्नानंतर परत तोंड नाही दाखवायचं ती उलट बोलली तुमच्या सारख्या सैतानांकडे मला यायचं ही नाही.

त्या मुलाची परिस्थिती फार बिकट... अगोदरच बहिणीकडे शिकायला... राहतं दोन खणांचं कौलारू घर.. १० ते १२ गुंठे जमीन, अर्धवट शिक्षण म्हणून नोकरी नाही,आईवडील गावात एकाकडे स्ट्रॉबेरीच्या मळ्यात कोणाकडेतरी रोजंदारीवर जायचे.

आणि मुलीचे वडील मातब्बर, भाऊ सॉफ्टवेअर मध्ये, मोठी बहीण पण जॉबला... परिस्थिती ने तर जहागिरदार.. देखणेपणावरती तर त्या मुलीला कुणीही पसंत केलं असतं.

तिला इतके बोलूनही ती ऐकेना... समजावणार्‍यांनाच शिव्या द्यायची!.. शेवटी भातुकलीच्या खेळासारखं त्या बाहुला बाहुलीच लग्न(सगळ्यांच्या तोंडात हेच) मंदिरात लावून दिलं.

आता वर्ष झालं असेल मुलगा कुठंतरी दुकानात जॉब करतो... परिस्थिती बिकट म्हणून तीही आता सासू बरोबर मजुरी करते.... कुठं ते राजकुमारीच जगणं आणि कुठं आता काबाडकष्ट!

एकदा तिच्या नवऱ्या बरोबर नाश्ता करताना हॉटेल मध्ये भेटली... अक्षरशः रडली, वडील अाणि भाऊ बोलत नाहीत घरात येऊ देत नाहीत...मला मध्यस्ती कर म्हणून सांगत होती... विचारलं तिलाच शिव्या देताना थोडा का विचार केला नाहीस..??? तो पोरगा काहीच बोलला नाही.. बडवलेला म्हणून!

(सैराटचीच कथा फुलवल्यासारखी वाटेल पण हे खरं आहे.)

म्हणजे वास्तव समोर आलं की मग विचार करतात... पण त्याअगोदर केला असता तर ही वेळ अाली नसती.

कुठे चुकतं या मुलींचं? विश्वास ठेवण्यायोग्य माणूस त्यांना अोळखता येत नाही की प्रेमात पडल्यावर मेंदूत काही रासायनिक बदल होतात? की कशाची भितीच वाटत नाही यांना?

अशा का वागतात काही मुली?

प्रतिक्रिया

आता मूळ मुद्द्यावर येत "सज्ञान" मुलीने तिचा जोडीदार ठरवला तर तिला तसे करण्याचा अधिकार तुमच्या लेखी आहे कि नाही?

प्रश्न इन्व्हॅलिड आहे.
व्हॅलिड असल्यास उत्तर नाही असे आहे.
=========================================
मूळात मूलीचं "वास्तविक भलं" आणि "तिच्या कुटुंबियांची तिच्या भल्याची कल्पना"या संकल्पना परस्परविरोधी आहेत हि धारणा मिथक आहे. (एखाद्या क्रिमिनल कुटुंबात सोडून.).
सबब असा अधिकार अनावश्यक आहे.
शिवाय लग्नानंतरचे जीवन कसे असते याचा अनुभव पालकांस असतो, पाल्यास नाही. म्हणून भलं काय ते त्यांना ठरवू द्यावं. त्यांना व्हेटो असू दिलेला बरा.

झिंगाट's picture

2 Aug 2017 - 10:26 am | झिंगाट

तर चर्चेचा विषय असा होता की 'तशा प्रकारच्या व्हिडिओजपैकी,काही व्हिडिओज हे मुलींना फसवून त्यांच्याच मित्राकडून नंतर डिलीट करण्याच्या वायद्याने काढले जातात.अर्थातच असं काही होत नाही.मैत्रिणीच्या आपल्यावर असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन हे व्हिडिओज संकेतस्थळांवर लिक केले जातात.

यात एका सदस्यांनी असा मुद्दा मांडला की "या मुलींना कळत कसं नाही? बॉयफ्रेंडच्या नको त्या मागण्यांना या मुली बळी कशा पडतात? यामुळे आपलं आयुष्य पणाला लागू शकतं हे या मुलींना का कळत नसावं?

हा धाग्याचा पहिला भाग कोणीच का वाचत नाहीये???
बॉयफ्रेंडच्या अवाजवी मागण्यांना पूर्ण करणे पण शहाणपणाचे आहे असे प्रतिसादकर्त्यांना वाटते का???
धाग्यातील दुसरा किस्सा घेऊन त्यातील मारहाणीचा विरोध करण्यापेक्षा पहिल्या भागावर बाकीच्यांची मते वाचायला आवडतील....

विशुमित's picture

2 Aug 2017 - 11:05 am | विशुमित

लेखाच्या पहिल्या भागाबाबत बोलायचं तर माझं तर स्पष्ट मत आहे, आताच्या ह्या व्हर्चुवल जगात सख्या (?) नवरा-बायकांनी सुद्धा अति रोमँटिक फोटो किंवा व्हिडिओस काढण्याची हौस करू नये. घरात लहान मुले मोबाईल हाताळत असतात, दुर्दैवाने कोणाला व्हॉट'सअप msg करतील सांगू शकत नाही. किंवा सिस्टिम हॅक सुद्धा होऊ शकते.

आताच्या नवंतरुण प्रेमी युगलांना असे फोटो किंवा व्हिडिओस का काढावेसे वाटतात हे समजून घेण्यासाठी या पिढी मध्ये थोडे मिसळावे लागेल.

आताच्या नवंतरुण प्रेमी युगलांना असे फोटो किंवा व्हिडिओस का काढावेसे वाटतात हे समजून घेण्यासाठी या पिढी मध्ये थोडे मिसळावे लागेल.

हा काय प्रश्न झाला? सेक्यूरिटी हा अस्पेक्टच नाही असं समजा एक क्षण, नव्या पिढिनं काय करू नये याचं मार्गदर्शक तत्त्व काय?
=================================================================
जुनी पिढी का नाही म्हणे काढत (त्यांना अजून पुरेसा रोमँटिकपणा आहे मानू.)? हे तर न मिसळता कळेल. प्रॉब्लेम काय? फक्त सेफ नाही म्हणून तर तरुणांची रिस्क घ्यायची कपॅसिटि जास्त असते. पण मुळात "प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे झक मारू देत" हेच तत्त्व असेल तर असा संकुचित विचार आपल्या मनात कसा आला हा विस्मय झाला आहे.

उपयोजक's picture

2 Aug 2017 - 4:08 pm | उपयोजक

"प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे झक मारू देत" हेच तत्त्व असेल तर असा संकुचित विचार आपल्या मनात कसा आला हा विस्मय झाला आहे.

हेच म्हणतो

असे तत्व माझ्या कुठल्या प्रतिसादात तुम्हाला दिसले ते सांगा.
(तुमचा वरचा प्रतिसाद माझ्या वाचनातून सुटला होता)
जोशी बुवा मी माझ्या कोणत्याच प्रतिसादात कधीही अश्लाघ्य भाषेचा वापर शक्यतो करत नाही. तुम्हाला निर्वाणीचा इशारा, पुन्हा असले शब्द माझ्या लेखणीत वदवून घेण्याचा प्रयत्न केला तर जाहीर अपमानित करण्यात तमा बाळगणार नाही.

arunjoshi123's picture

3 Aug 2017 - 11:38 am | arunjoshi123

क्षमस्व.
माझ्या कोणत्याही लिहिण्याचा उद्देश कोणाला दुखावणे हा नाही. एखादा शब्दप्रयोग वापरू नये असा संकेत असेल तर मला पाळायला आवडेल.
==========
आपली इच्छा नसताना आपल्याकडून काही अपवचन लिहून घ्यावं अशा दुष्ट विचारांचा मनुष्य मी नाही, उद्देशाबदला शंका घेऊ नये ही विनंती.

उपयोजक's picture

2 Aug 2017 - 11:16 am | उपयोजक

धन्यवाद झिंगाटजी,
आपल्या सोयीचा,धागाकर्त्याला झोडपायला बरा पडेल असाच भाग निवडून त्यावरच बर्‍याच जणांची चर्चा चालू आहे.कारण पहिल्या भागातून खरमरीत,धागाकर्त्याला रानटी,असंस्कृत म्हणावं असं काहीच हाती लागत नाहीये.
या लोकांचा उद्देश धाग्याच्या विषयाशी संबंधित अशी चर्चा करणं हा नाहीच मुळात!

आपल्या सोयीचा,धागाकर्त्याला झोडपायला बरा पडेल असाच भाग निवडून त्यावरच बर्‍याच जणांची चर्चा चालू आहे

टीकेचा त्रास होत असेल तर असे लिखाण टाकू नये.

उपयोजक's picture

2 Aug 2017 - 11:44 am | उपयोजक

त्रास टीकेचा नाही,धाग्याचं अर्धवट वाचन करुन उतावळेपणानं दिलेल्या प्रतिसादांचा होतो.

त्या मुलाची परिस्थिती फार बिकट... अगोदरच बहिणीकडे शिकायला... राहतं दोन खणांचं कौलारू घर.. १० ते १२ गुंठे जमीन, अर्धवट शिक्षण म्हणून नोकरी नाही,आईवडील गावात एकाकडे स्ट्रॉबेरीच्या मळ्यात कोणाकडेतरी रोजंदारीवर जायचे.

आता सांगा कि तो कामधंदा न करणारा, भंपक, रिकामटेकडा कसाकाय. इथे तुम्ही सविस्तर सांगतही नाहीये. कदाचित तो हुशार पण परिस्थितीने गरीब कॅटॅगिरीतला असू शकेल. आणि तसं असल्याशिवाय तो जहागिरदारच्या पोरीला पटवूच शकत नाही.

आता यात अर्धवट वाचन, उतावळेपणानं दिलेला प्रतिसाद वगैरे कसा येतो ते सांगा.

दोन ओळीत मुलाची माहीती, त्या वरून तो भंपक आणि प्रतिसादकर्ते उतावळे आणि त्यांच वाचन अर्धवट. नमस्कार.

उपयोजक's picture

2 Aug 2017 - 4:23 pm | उपयोजक

तो मुलगा दररोज त्या मुलीकडून रात्री १२ च्या नंतर घरी परत यायचा... तो मुलगा गावात बहिणीकडे राहायला होत म्हणून गावात रात्री मुलांच्या कट्ट्यावर येत असे... त्यामुळे संशय ही कोण घेत नसे...

आता वर्ष झालं असेल मुलगा कुठंतरी दुकानात जॉब करतो... परिस्थिती बिकट म्हणून तीही आता सासू बरोबर मजुरी करते....

यावरुन नाही दिसत का? मुलगा किती गुणवान असावा ते?

म्हणून म्हटलं अर्धवट वाचन आणि उतावळे प्रतिसाद!

अकिलिज's picture

2 Aug 2017 - 5:12 pm | अकिलिज

तो मुलगा दररोज त्या मुलीकडून रात्री १२ च्या नंतर घरी परत यायचा... म्हणजे रात्री १२च्या नंतर मुलींच्या कडून घरी येणारे भंपक असतात.

तो मुलगा गावात बहिणीकडे राहायला होत म्हणून.... गावात बहिणीकडे रहाणारे भंपक असतात.

कि गावात रात्री मुलांच्या कट्ट्यावर येत असे... रात्री कट्ट्यावर येणारे भंपक असतात.

आता वर्ष झालं असेल मुलगा कुठंतरी दुकानात जॉब करतो.. कुठंतरी दुकानात जॉब करणारे भंपक असतात.

यातलं कुठलं एकतरी लॉजिक बरोबर आहे कां हे सांगा. नाहीतर फक्त तुम्ही म्हणताय म्हणून मुलाला भंपक समजूयात.

arunjoshi123's picture

2 Aug 2017 - 1:32 pm | arunjoshi123

केसची माहीती तुमच्यापेक्षा प्रतिसादकांनाच जास्त असणार!!!
================================================
कारण त्या उदारमतवादी वर्तनाचे, मतांचे नियम ठरलेले आहेत. ती मुलं आता उदारमतवाद्यांचे कन्हैया कुमार झालेली आहेत आणि त्यांवर टीका असंभव आहे.

शब्दबम्बाळ's picture

2 Aug 2017 - 1:38 pm | शब्दबम्बाळ

आता तुम्ही काहीतरी प्रतिसाद दिलाय त्याच अनुषंगाने मुलींना "राखी सावंत" म्हणावे का?
का फक्त मुलांना दोषी करार देण्यात आलेला आहे? जी "भोळ्या भाबड्या" मुलींना फसवतात?

या लोकांचा उद्देश धाग्याच्या विषयाशी संबंधित अशी चर्चा करणं हा नाहीच मुळात!

हे पहा कोणी आमंत्रण पाठवलं नव्हतं तुम्हाला. या आणि धागा काढा म्हणून!! आता धागा काढला आहे तर लोक त्यांच्या मनातले विचार मांडणारच. त्या मुलीने तुमच्या मनासारख्या मुलाशी लग्न करायला हवं होतं आता मिपाकरांनी पण तुमच्या मनासारखी मतं मांडावी म्हणता का?

उपयोजक's picture

2 Aug 2017 - 4:26 pm | उपयोजक

माझ्या मनासारखी मते नकाच मांडू. फक्त धाग्याच्या विषयाला धरुन मते मांडलीत तरी पुरे!

कारण पहिल्या भागात चर्चा करण्यासारखं खरंच काही नाहीये. बरेचदा प्रेमात पडलेली मुलं मुली हे फोटो - व्हिडीओ प्रकार करत असले तरी त्यात कोणालाही फसवण्यापेक्षा नवीन टेकनॉलॉजी वापरणं, मित्र -मैत्रिणीवर इंप्रेशन मारणं हा उद्देश असतो. पूर्णपणे फसवायच्या दृष्टीने मुलाने सगळ्या गोष्टी केल्या असतील तर चर्चा करण्यापेक्षा पोलिसांची मदत घेतलेली बरी.

किती उदाहरणं आहेत, जिथे अगदी दाखवून बघून लग्न झालाय आणि मुलीचे हाल झालेत, सासरी त्रास झालाय, प्रसंगी जीव जायची, वेड लागायची पाळी अली त्या मुलीवर? नवऱ्या मुलाकडचे लोक एकावर एक मागणी करत सुटलेत, सरळ दिसतंय कि हे थांबणार नाहीये, अशा वेळी किती लोक पुढे जातात लग्न थांबवायला? मुलीची सिलेक्टिव्ह काळजी फक्त जेव्हा ती स्वतःचा निर्णय स्वतः घेते.

तुमच्या त्या पहिल्या उदाहरणातील मुलगी बी इ आहे, स्वतःची नोकरी करतीये, सज्ञान आहे, आणि स्वतःला हवं तसं वागत्ये. आता त्यात चूक असेलही पण किती लोकांचं मॉरल पोलिसिंग करत बसणार तुम्ही, तुमच्याच ऑफिस मध्ये ४ लोक ड्रग घेणारे असतील, अलकोहोलिक असतील, सिगारेट फुकून शरीराचे हाल करून घेत असतील, लोन वर लोन घेऊन स्वतःला अडकवून घेत असतील, आणि अशा लोकांबद्दल तुम्हाला आणि आसपास च्या बऱ्याच लोकांना वाईट पण वाटत असेल. त्याच्या अख्या कुटुंबाला पण त्रास होत असेल. पण ते त्यांच्या आयुष्यात चुकीचे निर्णय घेतायत म्हणून कोणीही जाऊन त्यांना मारणं कितपत बरोबर? खरं तर या उदाहरणात जर आसपासच्या लोकांनी "उसे उसके हाल पे छोड दो " आणि फक्त कामापुरते संबंध ठेवलेत ना तर ती मुलगी पटकन सावरेल. पण एवढ्या लोकांना कोण समजावणार बदलायला. त्या मुलीला नाव ठेवणं सोपं जास्त.

सज्ञान, कमावत्या व्यक्तीला "समजवायचा प्रयत्न करणे / जमेल ती लागेल ती मदत करणे " या पलीकडे उपाय नाही हा बऱ्याच मारामारी विरोधी लोकांचा दृष्टिकोन असतो. आणि निर्णय चुकतात, दुनियेतल्या सगळ्या लोकांचे चुकतात, अनेक लोक फसवतात. अगदी टाटा अंबानी सारख्याना फसवल्याची सुद्धा उदाहरण असतील. अडनिड्या वयातली मुलं (खासकरून मुलगी) फसली तर त्यांना परत आयुष्य नव्याने सुरु करता येईल असा आपला समाज नाही हे आपलं दुर्दैव. किमान शहरामध्ये बऱ्याच घरामध्ये "समाज काय म्हणेल" म्हणून आयुष्य जगणं कमी झालाय, आणि असंच व्हावं हीच इच्छा.

तुम्ही धाग्याचा उद्देश नीट समजावूनच घेतला नाही.
बरेचदा प्रेमात पडलेली मुलं मुली हे फोटो - व्हिडीओ प्रकार करत असले तरी त्यात कोणालाही फसवण्यापेक्षा नवीन टेकनॉलॉजी वापरणं, मित्र -मैत्रिणीवर इंप्रेशन मारणं हा उद्देश असतो. पूर्णपणे फसवायच्या दृष्टीने मुलाने सगळ्या गोष्टी केल्या असतील तर चर्चा करण्यापेक्षा पोलिसांची मदत घेतलेली बरी.
मुध्दा हा आहे की मुले मुलींना असे न्युड व्हिडीओ काढायला सांगतात आणि नंतर व्हायरल करतात. पुढे दोघांचे फिस्कटले तर केवळ असल्या व्हिडीओमुळे लग्न होत नाही अशी उदाहरणे आहेत. तेव्हा आज आपला केवळ बॉयफ्रेंड सांगतो आहे म्हणून असे व्हिडीओ काढू नका हाच घाग्याचा उद्देश आहे. एकदा व्हिडीओ सगळीकडे पसरल्यानंतर पोलिसांची मदत घेउन काय फायदा?
तुमच्या त्या पहिल्या उदाहरणातील मुलगी बी इ आहे, स्वतःची नोकरी करतीये, सज्ञान आहे, आणि स्वतःला हवं तसं वागत्ये. आता त्यात चूक असेलही पण किती लोकांचं मॉरल पोलिसिंग करत बसणार तुम्ही, तुमच्याच ऑफिस मध्ये ४ लोक ड्रग घेणारे असतील, अलकोहोलिक असतील, सिगारेट फुकून शरीराचे हाल करून घेत असतील, लोन वर लोन घेऊन स्वतःला अडकवून घेत असतील, आणि अशा लोकांबद्दल तुम्हाला आणि आसपास च्या बऱ्याच लोकांना वाईट पण वाटत असेल. त्याच्या अख्या कुटुंबाला पण त्रास होत असेल. पण ते त्यांच्या आयुष्यात चुकीचे निर्णय घेतायत म्हणून कोणीही जाऊन त्यांना मारणं कितपत बरोबर? खरं तर या उदाहरणात जर आसपासच्या लोकांनी "उसे उसके हाल पे छोड दो " आणि फक्त कामापुरते संबंध ठेवलेत ना तर ती मुलगी पटकन सावरेल. पण एवढ्या लोकांना कोण समजावणार बदलायला. त्या मुलीला नाव ठेवणं सोपं जास्त.
हे मुळ घाग्यातील वाक्य
स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची मुळातच अक्कल नसल्याने तिने या मुलाला होकार दिला.तिला याचं लग्न ठरलंय हेही माहित होतं.तरीही मी निर्णय बदलायला लावीन असा विश्वास.दोघंही वाहवत गेले.सगळे "उद्योग" करुन झाले.यानं त्याचे फोटोही काढून ठेवले.
या मुलीच्या घरी ती या नालायकाबरोबर बोलत असताना बापानं पकडलं.झोडपून काढलं पण लग्न करीन तर याच्याबरोबरचं म्हटल्यावर बापानं मुंबईचं एक स्थळ काढलं.तो मुलगा स्वभावानं कसा आहे वगैरे न पाहता जबरदस्तीनं लग्न लावून दिलं.
या ठोंब्याच्या होणार्‍या बायकोलाही आपला होणारा नवरा इतका नालायक आहे हे माहित होतं तरीही गावभर फिरल्याने सगळीकडे प्रसिध्दी झाली होती.मग तिच्याबरोबर याचं लग्नही झालं.
या एका प्रसंगात एक नव्हे तर चक्क तीन पूर्ण बिंडोक मुली पाहिल्या.त्या पण शिकलेल्या,इंजिनियर मुली.

ह्यात कंपनीतील लोकांनी मारहाण केल्याचा उल्लेख कुठे आहे? किमान समोरची व्यक्ती चुकीच्या मार्गाने चालली आहे तर थांबवण्याचा प्रयत्न करणे गुन्हा आहे का?

सर्वप्रथम डिस्क्लेमर: मी जन्मापासून मुबंईत राहिलोय, आणि ग्रामीण भागातील सामाजिक परिस्थितीचा मला अजिबात अंदाज नाही.

लहानपणापासून मी एका बऱ्यापैकी लिबरल कुटुंबात वाढलो. आई-बाबांनी त्यांची मतं माझ्यासमोर मंडळी असली तरी लादली नाहीत कधीच. बऱ्याच बाबतीत मला निर्णय आणि आचार स्वातंत्र्य होतं. वयात येताना मुलींबद्दलचंआकर्षण, चोरी-छुपे रिलेशनशिप्स इ सुद्धा होतंच. मात्र एखाद्या मुलीचा, तिच्या माझ्यावरच्या विश्वासाचा गैरफायदा घ्यावा असं कधी मनात आलं नाही.

आता जाणवतंय, कि याचं मुख्य कारण आई-बाबांनी त्यांच्या वागण्या-बोलण्यातून केलेली माझी जडण-घडण. संस्कार वगैरे मोठे शब्द वापरणार नाही मी, मात्र आई-बाबांचा माझ्याशी असलेला संवाद, माझी मतं मोकळेपणे मांडण्याचं दिलेलं स्वातंत्र्य, नि:संकोचपणे मतभेद व्यक्त करण्याची लावलेली सवय या साऱ्यांचा सकारात्मक परिणाम झालेला जाणवतोय.

वर म्हटल्याप्रमाणे आई-वडिलांनी जाणीवपूर्वक आपल्या मुलांवर आणि मुलींवर संस्कार करणं हेच महत्वाचं आहे.

आई-वडिलांनी जाणीवपूर्वक आपल्या मुलांवर आणि मुलींवर संस्कार करणं हेच महत्वाचं आहे.

पर्फेक्ट. सज्ञान झाल्यावर भारतीय राज्यघटनेला मधे आणून अधिकार वैगेरे भाषा करण्यापेक्षा चांगले संस्कार कधीही श्रेयस्कर.

मुली अश्या प्रकारे क्लिप्स कश्या काय करू देतात हा प्रश्न मलाही पडतो. अशी मागणी करणारी मुलं नालायक असतात. नंतर मित्रांना दाखवून स्वतःचा पुरुषार्थ दाखवतात. मुलींनी या प्रकाराला बळी पडू नये.
ह्या क्लिप्स नेटवर/कायप्पावर चवीने पहिल्या जातात. अर्थात ते पाहणाऱ्यांमध्ये मी सुद्धा आहे. त्यांना दाखवायला लाज नाही तर आम्ही का बाळगावी असं आमचं लॉजिक आहे.
पण स्वतः असं कुठल्या मुलीबरोबर करण्याचा विचारही मनात येत नाही.

arunjoshi123's picture

2 Aug 2017 - 1:26 pm | arunjoshi123

मुलींनी या प्रकाराला बळी पडू नये.

उदारमतवादी इथे देखिल तुम्हाला मोराल पोलिसिंगच्या कटघर्‍याता खडे करतील का? पडू द्या ना बळी, तुम्ही कोण जाणिव देणारे? १८ वर्षे झाली तर आपले व्हिडिओ बनवणारे त्यातल्या रिस्क्सची जाणकारी ठेऊन असतीलच, इ इ. बळी पडणे हे बळी पडणे असं तुम्ही पाहता, त्यांना कदाचित आवडत असू शकेल, इ इ पुढे. किंवा देहात वा शॄंगारात वा प्रणयात न दाखवावं असं मुळात काही नसतंच. विकसित देशांत दाखवतातच, इ इ इ इ.

चिनार's picture

2 Aug 2017 - 5:16 pm | चिनार

मंग पडू द्या ना बाप्पा त्याईले बळी..आम्ही आहोच ना पाहायला डोळे फाडू फाडू...

arunjoshi123's picture

2 Aug 2017 - 12:57 pm | arunjoshi123

(गंभीर किंवा विनोदी अंगाने उत्तरे दिलेली चालतील)
१. बदडणे हा गुन्हा (भारतीय कायद्याने) आहे का? त्याला काय सजा आहे?
२. सरकारी सजांमधे बदडून काढणे नावाची कोणती सजा नाही. मग बदडणे हा प्रकार लोकांनी (गुन्हा आहे म्हणून) त्यागला आणि सरकारने (शिक्षा नाही म्हणून) त्यागला तर हा प्रकार पृथ्वीतलावरून नष्टच होऊन जाईल. न बडवणारे जग तुम्हाला आवडेल का?
३. लहान मुलांना चापट मारणे हा गुन्हा आहे का?
४. कोणाला पाठीत गुद्दा घालणे हा गुन्हा आहे का?
५. कायमची शारिरिक जखम होणार नाही अशी काळजी घेऊन प्रेमपूर्वक बदडता येते का?
६. काउंसेलिंगने बदडण्यापेक्षा उत्तम परिणाम होतो हे कसे सिद्ध कराल? काउंसेलिंगवर असा कोणता मंत्र शिंपडलेला असतो कि ती इतकी परिणामकारक असते?
७. महान अशा पाश्चात्य संस्कृतीतून बडवण्याच्या रानटी प्रथेचे उच्चाटन कधी झाले? मंजे आपण (अ‍ॅज यूज्वल) किती वर्षे मागे आहोत?
८. बडवण्याच्या इतका विरोध असणारांस आपल्या आईने, बापाने, आज्जीने, आजोबांनी एखादी थुतरीत दिलेली आठवते काय? त्याविरोधात ते कधी कोर्टात गेले? निकाल काय आला?
९. प्रत्येकच शिक्षा केवळ सरकारनेच द्यावी असे असते काय? म्हणजे आमच्या ईशानने गृहपाठ केला नाही तर मी कोणत्या कोर्टात जाऊन त्याला "आदेश" आणून द्यावा?
१०. नात्यानात्यांमधे आज्ञा देण्याचा अधिकार (पोरी, असं करू नको गं इ इ टाईपचा) देखिल केवळ शासनाकडे उरला आहे का? सज्ञान झालेल्या सर्व मूर्खांस अक्कल आलेली आहे असे गृहित धरून समीकरणे सोडवायची काय?
११. इतरांच्यात पडणे हा देखिल घटनात्मक अधिकार केवळ शासनाकडे उरला आहे का? केवळ माझ्या पेशींतील एका रेणूमुळे हा माणूस (उदा. माझा बाप) त्याचा माझा काही संबंध नसताना (सरकारचे दोन भिन्न, स्वतंत्र नागरीक या अर्थाने) माझ्या आयुष्यात उगाच लूडबूड करत असतो अशी फिर्याद मला करता येईल काय? बाप किंवा बॉस किंवा आई यांची लूडबूड कायद्याने थांबवता कशी येईल?
================================
धाग्यावर जी उदारमतवादी मते व्यक्त झाली आहे ती थोडी अपुरी वाटली म्हणून प्रश्न विचारले आहेत.

अत्रे's picture

2 Aug 2017 - 1:04 pm | अत्रे

प्रश्न आवडले!

१. बदडणे हा गुन्हा (भारतीय कायद्याने) आहे का? त्याला काय सजा आहे?

UNDER Indian Penal Code

Section 319 - Hurt.- Whoever causes bodily pain, disease or infirmity to any person is said to cause hurt.

Section 323 -Punishment for Hurt- Whoever, except in the case provided for by section 334, voluntarily causes hurt, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to one year, or with fine which may extend to one thousand rupees, or with both.

Section 334 - Whoever voluntarily causes hurt on grave and sudden provocation, if the neither intends nor knows himself to be likely to cause hurt to any person other than the person who gave the provocation, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to one month, or with fine which may extend to five hundred rupees, or with both.

Section 350 - Criminal force.-Whoever intentionally uses force to any person, without that person’s consent, in order to the committing of any offence, or intending by the use of such force to cause, or knowing it to be likely that by the use of such force he will cause injury, fear or annoyance to the person to whom the force is used, is said to use criminal force to that other.

“Injury”.—The word “injury” denotes any harm whatever ille­gally caused to any person, in body, mind, reputation or proper­ty.

Section 351. Assault - Whoever makes any gesture, or any preparation intending or knowing it to be likely that such gesture or preparation will cause any person present to apprehend that he who makes that gesture or preparation is about to use criminal force to that person, is said to commit an assault. Explanation.—Mere words do not amount to an assault. But the words which a person uses may give to his gestures or preparation such a meaning as may make those gestures or preparations amount to an assault.

Source : https://www.quora.com/Is-slapping-a-person-an-assault-and-is-it-punishab...

शिक्षक सुद्धा मुलांना बडवू शकत नाहीत. तुमच्या माहितीत असे कोणी शिक्षक असल्यास पोलिसात तक्रार करू शकता.

हेमंत८२'s picture

2 Aug 2017 - 3:53 pm | हेमंत८२

१. बदडणे हा गुन्हा (भारतीय कायद्याने) आहे का? त्याला काय सजा आहे?:::::----कोर्ट ऊठेपासून जन्मेठेपे पर्यंत सर्व शिक्षा यात सामाविस्ट होऊ शकतात.. फक्त कसे बदडले याला महत्व आहे.
२. सरकारी सजांमधे बदडून काढणे नावाची कोणती सजा नाही. मग बदडणे हा प्रकार लोकांनी (गुन्हा आहे म्हणून) त्यागला आणि सरकारने (शिक्षा नाही म्हणून) त्यागला तर हा प्रकार पृथ्वीतलावरून नष्टच होऊन जाईल. न बडवणारे जग तुम्हाला आवडेल का?::::--- नाही मुळीच नाही. त्याची तर गरज आहे आणि माझ्यासारखा असे मुळमुळीत जगू शकत नाही..
३. लहान मुलांना चापट मारणे हा गुन्हा आहे का?:::--- पहिल्यांदा मारत असत तर नक्कीच. पण जर सवय असेल तर नाही आणि स्वतःच्या....... दुसऱ्याच्या नाही..
४. कोणाला पाठीत गुद्दा घालणे हा गुन्हा आहे का?:::--- कोणाला गुद्दा मारत आहे याच्यावर अवलंबून आहे..
५. कायमची शारिरिक जखम होणार नाही अशी काळजी घेऊन प्रेमपूर्वक बदडता येते का? ::::--- हो हा प्रयोग मी बाrच्यादा केला आहे अनुभव हवा असेल तर प्रत्यक्षात भेटावे..
६. काउंसेलिंगने बदडण्यापेक्षा उत्तम परिणाम होतो हे कसे सिद्ध कराल? काउंसेलिंगवर असा कोणता मंत्र शिंपडलेला असतो कि ती इतकी परिणामकारक असते?::::--- यासाठी आपण मुन्ना भाई mbbs हा चित्रपट आणि गांधीजी यांचे चरित्र वाचावे...( हलके घ्या)
८. बडवण्याच्या इतका विरोध असणारांस आपल्या आईने, बापाने, आज्जीने, आजोबांनी एखादी थुतरीत दिलेली आठवते काय? त्याविरोधात ते कधी कोर्टात गेले? निकाल काय आला?:::--या सर्वठिकाणी तो माझ्यातरी विरोधात गेला होता.
९. प्रत्येकच शिक्षा केवळ सरकारनेच द्यावी असे असते काय? म्हणजे आमच्या ईशानने गृहपाठ केला नाही तर मी कोणत्या कोर्टात जाऊन त्याला "आदेश" आणून द्यावा?::::--- त्याला होम मिनिस्टर कोर्टमध्ये उभे करावे. अपोआपच तुम्हाला न्याय मिळेल..
११. इतरांच्यात पडणे हा देखिल घटनात्मक अधिकार केवळ शासनाकडे उरला आहे का? केवळ माझ्या पेशींतील एका रेणूमुळे हा माणूस (उदा. माझा बाप) त्याचा माझा काही संबंध नसताना (सरकारचे दोन भिन्न, स्वतंत्र नागरीक या अर्थाने) माझ्या आयुष्यात उगाच लूडबूड करत असतो अशी फिर्याद मला करता येईल काय? बाप किंवा बॉस किंवा आई यांची लूडबूड कायद्याने थांबवता कशी येईल?:::--आजकाल कोणी पण जनहित याचिका दाखल करतात...

जमेल त्या प्रयत्नाने उत्तर देण्याचं प्रयत्न केला आहे ((( हलके घ्या )))

साधारण १ वर्ष झाले असतील या घटनेला...

माझ्या मित्राचा एक मुस्लीम मित्र आहे त्याने त्याचा laptop वर त्याचे आणि त्याचा मैत्रिणीचे काही फोटो आणि विडीओ (एकांतातील) साठवून ठेवले होते. एक दिवशी त्याचा दुकानात काम करणारा एक उत्तरभारतीय कामगाराने बराच ऐवज, पैसे या बरोबर तो laptop सुद्धा लंपास केला आता या महाभागाची तंतरली, एक नशीब कि laptop ला password होता सेटिंग लावून आणि 25 हजाराच्या laptop साठी साधारण ५ लाख खर्च करून या हिरोने आणि त्याचा मित्रांनी गोरखपूरवरून एका दुकानदाराकडून तो laptop एकदाचा मिळवला.

हे असे मूर्ख असतात एक एक ...

मराठी कथालेखक's picture

2 Aug 2017 - 1:16 pm | मराठी कथालेखक

आता वर्ष झालं असेल मुलगा कुठंतरी दुकानात जॉब करतो... परिस्थिती बिकट म्हणून तीही आता सासू बरोबर मजुरी करते.... कुठं ते राजकुमारीच जगणं आणि कुठं आता काबाडकष्ट!

पण गरीबी आहे इतकंच.. मुलगा वाईट आहे असं कुठे (तुम्ही जितकं लिहिलं त्यावरुन तरी) दिसत नाही. दुकानात जॉब करतो म्हणजे रिकामटेकडा पण म्हणता येणार नाही.
बाकी मुलगी रडली ते गरीबीमुळे , माहेरच्यांची आठवण आल्यामुळे असेल कदाचित पण म्हणजे तिला पश्चाताप होतो आहे किंवा ती दु:खात आहे असं म्हणता येत नाही.

बाकी मुलगी रडली ते गरीबीमुळे , माहेरच्यांची आठवण आल्यामुळे असेल कदाचित पण म्हणजे तिला पश्चाताप होतो आहे किंवा ती दु:खात आहे असं म्हणता येत नाही.

समजा म्हणता येत नाही. पण तिला जसा "कष्टांत पण आनंदात" जगायचा अधिकार आहे तसा लेखकमहाशयांना "तिच्याबद्दल दु:खात नि स्वतः श्रीमंतीत" जगायचा तितकाच समान आणि आदरणिय अधिकार आहेच कि!!!

मुलगी का रडली त्याचे कारण धागाकर्त्याने दिलेले आहेच.

अक्षरशः रडली, वडील अाणि भाऊ बोलत नाहीत घरात येऊ देत नाहीत...मला मध्यस्ती कर म्हणून सांगत होती...

माहेरच्यांनी संबंध तोडले म्हणून ती रडली, मी गरीब आहे, मला (पैश्याची) मदत करा म्हणून नाही!

अभिजित - १'s picture

4 Aug 2017 - 9:53 pm | अभिजित - १

@ परिंदा - नाव बदला . तुमच्या बिनडोक विचार सरणीला हे नाव शोभत नाही.

मुलगी का रडली त्याचे कारण धागाकर्त्याने दिलेले आहेच.

अक्षरशः रडली, वडील अाणि भाऊ बोलत नाहीत घरात येऊ देत नाहीत...मला मध्यस्ती कर म्हणून सांगत होती...

माहेरच्यांनी संबंध तोडले म्हणून ती रडली, मी गरीब आहे, मला (पैश्याची) मदत करा म्हणून नाही!

१. धागालेखक इथेच आहे, त्याला सांगू द्या. त्यांनी का रडली ते नीट लिहिलं नाही.
२. आणि त्याही पेक्षा निर्णयाबद्दल पश्चात्ताप आहे का हे महत्त्वाचं...
३. आणि समजा नाही तरिही "का वागतात" हा लेखकाचा विचार त्याच्या बाजूने योग्य असू शकतो. एखाद्या सुविद्य, सुशिक्षित, सुंदर, सुधन तरुणीस मजुरिण बनण्यात आनंद का येत आहे असा तो प्रश्न आहे. तिची आत्मसुखाची भावना चूक आहे म्हणून लेखक दु:ख व्यक्त करूच शकतो. श्रीगुरुजिंच्या उदाहरणातील केसही अशिच आहे. मुलीला पाकिस्तानात जाऊन छळ करून घेत विधवा म्हणून सासूची सेवा करणे ही भावना आनंददायक वाटत असेल, पण श्रीगुरुजींना नाही.

एस's picture

2 Aug 2017 - 2:25 pm | एस

धाग्यावर अजो आले. आता धाग्याचे किमान तीनशे तरी कुठे नाही गेले. चला, पॉपकॉर्न घेऊन बसतो.

सूड's picture

2 Aug 2017 - 2:27 pm | सूड

होय =))

रॉयल्टी देत नाय राव तुमी. कमई पन व्हायला पायजे का नाई?

...पार्वती, आधी रिसर्च पेपर लाव.

- कॅप्टन रिसर्चगाडे

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2017 - 3:39 pm | श्रीगुरुजी

धाग्यात दोन वेगळे प्रश्न आहेत. दोन्हींए वेगवेगळे उत्तर देतो.

१) काही प्रत्यक्ष घडलेले प्रसंग सांगतो.

बेळगावमधील आशा पाटील नावाची मुलगी आंतरजालावरील ओळखीवरून एका पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात पडली. कालांतराने त्यांनी लग्न करायचे ठरविले. दोघांनीही एकमेकांना प्रत्यक्ष पाहिलेले नव्हते. तरीसुद्धा तिने धर्म बदलला व मुस्लीम झाल्यानंतर एका मौलवीच्या सहाय्याने आंतरजालावरून पाकिस्तानी मुलाशी लग्न केले. लग्नानंतर बराच प्रयत्न केल्यानंतर तिला व्हिसा मिळाला व ती पाकिस्तानमध्ये नवर्‍याकडे गेली. गेल्यानंतर वर्षाभरातच तिला मूल झाले. पहिल्या मुलानंतर ती लगेचच दुसर्‍यांदा गर्भवती असताना अचानक तिचा नवरा वारला. नवरा वारल्यानंतर तिच्या सासूसासर्‍यांनी तिचा छळ सुरू केला व घराबाहेर पडण्याची मनाई केली. नवर्‍याच्या मृत्युनंतर तिने आपल्या दिराशी लग्न करावे यासाठी ते दडपण आणू लागले. शेवटी भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्यानंतर व दीर आणि सासू-सासर्‍याविरूद्ध पोलिस तक्रार केल्यानंतर तिला भारतात परत येता आले. भारतात परत आल्यानंतर काही काळाने तिने परत पाकिस्तानात परत जायची तयारी सुरू केली कारण तिला म्हणे नवर्‍याच्या पश्चात सासूसासर्‍यांची सेवा करायची होती. आपल्याला सासूसासरे त्रास देणार आहेत हे माहीत असूनसुद्धा पाकिस्तान नावाच्या नरकात परत जायचा विचार करणार्‍या या मुलीला मूर्ख म्हणावे का भोळीभाबडी?

२) कलकत्त्यातील सुस्मिता मुखर्जी (नावाविषयी खात्री नाही) नावाची एक सुशिक्षित तरूणी मित्राशी ब्रेकअप झाल्यामुळे दु:खी अवस्थेत असताना तिला एक अफगाणी मुस्लिम भेटला व ती त्याच्या प्रेमात पडली. ती स्वतः सुशिक्षित होतीच व तिचे आईवडीलही सुशिक्षित व चांगल्या परिस्थितीतील होते. या मुलीने अफगाणीशी लग्न करून ती त्याच्या बरोबर काबूलला रहायला गेली. तिथे रहायला गेल्यानंतर तिला दिसले की त्याचे घर अत्यंत छोटे असून (म्हणजे मातीच्या १-२ खोल्या) त्यात ८-१० जण रहात आहेत. रोजचे खाणे म्हणजे नान चहात बुडवून खाणे. त्याहून वाईट गोष्ट म्हणजे तिच्या नवर्‍याचे आधीच एक लग्न झाले होते व त्याची पहिली बायको व त्यांची मुले तिथेच रहात होती. आपले लग्न झाल्याचे त्याने तिच्यापासून लपवून ठेवले होते. ही मुलगी मूर्खासारखी तिथेच ७-८ वर्षे राहून घरकाम करीत बसली कारण तिथे गेल्यानंतर काही दिवसांनी तिला तिथेच सोडून तिचा नवरा कलकत्त्यात परतला. तो काळ तालिबानचा असल्याने अफगाणिस्तानमध्ये स्त्रियांना एकट्याला कोठेही जायची परवानगी नव्हती. त्यामुळे या मुलीला काबूलमधून भारतात परत येता आले नाही. या सुशिक्षित तरूणीने ७-८ वर्षे त्या मातीच्या घरात सासू, सासरे, दीर, सवत व सवतीची मुले यांची सेवा करण्यात घालविली. नोकरी करणे, काही उद्योगव्यवसाय करणे शक्यच नव्हते कारण त्या प्रकाराला बंदी होती. शेवटी ७-८ वर्षानंतर धाडस दाखवून ती पाकिस्तानमार्गे कलकत्त्यात परतली. नवर्‍याने एवढी घोर फसवणूक करून आयुष्याची वाट लावली तरीसुद्धा तिला त्याच्याबद्दल राग नव्हता. कलकत्त्यात परत आल्यानंतर तो तिला परत भेटला व परत त्यांचे मनोमीलन झाले काही वर्षानंतर तालिबानी गेल्यानंतर ते दोघे काबूलला परत जाऊन त्यांनी पुन्हा एकदा संसार सुरू केला. आपल्या अनुभवांवर तिने एक पुस्तक लिहिले असून त्याचा मराठी अनुवाद 'काबुलीवाल्याची बंगाली बायको' या नावाने प्रसिद्ध आहे. या पुस्तकातून तिने तालिबानची बदनामी केली असा तालिबान्यांची समजूत झाल्यामुळे ३-४ वर्षांपूर्वी काही अज्ञात तालिबान्यांनी तिला काबूलमध्ये वयाच्या ५० व्या वर्षी गोळ्या घालून मारून टाकले. ज्याने आपली घोर फसवणूक करून आपल्या संपूर्ण आयुष्याची वाट लावली त्याच्याचबरोबर परत काबूलमध्ये जाऊन आत्मघात करून घेणार्‍या या मुलीला मूर्ख म्हणावे का भोळीभाबडी?

माझ्या परिचयात प्रेमप्रकरणात पडून आयुष्याची वाट लागलेल्या २-३ मुलींची उदाहरणे आहेत. "काही मुली अशा का वागतात?" हे या मुलींच्या बाबतीत एक गूढच आहे.

आता दुसरा मुद्दा.

वरील लेखात एका प्रेमात पडलेल्या मुलीचा व त्यातून मुलाला व मुलीला मारहाण झाल्याचा संदर्भ आहे. त्यावर बरीच धुमश्चक्री सुरू आहे. मी अशा प्रसंगात नक्की कसा वागेन हे सांगता येणे अवघड आहे. मुलीला समजावून सांगण्याचा नक्कीच भरपूर प्रयत्न करीन. परंतु सांगूनही मुलगी ऐकत नसेल आणि मुलगी ज्या मुलाच्या प्रेमात पडली आहे त्याच्याशी तिचे लग्न झाले तर तिच्या आयुष्याची वाट लागेल असे स्पष्ट दिसत असेल तर मुलीला त्यापासून परावृत्त करण्यासाठी पुढची कृती काय असेल हे आतातरी सांगता येणे खूप कठीण आहे. काठावर उभे राहून सूचना देणे खूप सोपे असते. मुलगा-मुलगी सद्यान आहेत, त्यांचे निर्णय त्यांना घेऊ देत, कायदा हातात घेऊ नका, बळजबरी करू नका, त्यांचं आयुष्य त्यांना ठरवू देत असे सल्ले सहज देता येतात. कोणतेही आईवडील कधीही आपल्या मुलांचं अहित करीत नाहीत. जर एखादे पालक आपल्या मुलीच्या लग्नाच्या निर्णयाला कसून विरोध करीत असतील तर त्यामागे निश्चितच काहीतरी सबळ कारणे असणार. जर एखाद्या विशिष्ट मुलाशी लग्न झाले तर आपल्या मुलीचे नक्कीच अहित होईल असे त्यांना वाटले व त्यातून त्यांनी अशा लग्नाला कसून विरोध केला तर ते नक्कीच समजण्यासारखे आहे. अर्थात मारहाण करणे, धमक्या देणे असे प्रत्येकजण करीलच असे नाही. किंबहुना सुशिक्षित समाज या मार्गांचा अवलंब करण्याची शक्यता कमी असते. वर दिलेल्या २ प्रसंगावरून असे दिसते की या मुलींच्या घरच्यांनी त्यांच्या निर्णयाला कसून विरोध करायला हवा होता व कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलीला ते लग्न करण्यापासून परावृत्त करायला हवे होते. तसे झाले असते तर आज स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना मुलीची वाईट अवस्था बघावी लागली नसती.

माझ्या परिचयात प्रेमप्रकरणात पडून आयुष्याची वाट लागलेल्या २-३ मुलींची उदाहरणे आहेत. त्यांच्या आईवडीलांनी मुलीला लग्नापासून परावृत्त करण्याचा फारसा प्रयत्न केला नव्हता त्याचा त्यांना आता नक्कीच पश्चाताप होत असणार.

असो.

खर्‍या अर्थाने संतुलीत आणि घाग्याचा विषय समजावून घेउन दिलेला प्रतिसाद.
मागे एक तासगावच्या मुलीने फे,बु. वरुन पाकिस्तानातील एका मुलाशी मैत्री केली होती. सर्वांनी समजावून सुध्दा तीने पाकिस्तानात जावून त्या मुलाशी लग्न केले. पुढे तीचा छ्ळ झाला म्हणून ती परत आली. आयुष्याचे धिंडवडे काढणार्‍या या घटना. या वेळीच थांबवायला नकोत ( अर्थात मारहाण न करताच) का पाडगावकरी कविता म्हणाव्यात अशी ईथल्या तथाकथीत उदारमतवाद्यांची अपेक्षा आहे ? एखादी व्यक्ती चुकत असेल तर तीला थांबवणे हा सुध्दा गुन्हा आहे हे इथे कळले.
दुसरा मुध्दा त्या मारहाण झालेल्या प्रसंगाचा. अशीच घट्ना एखाद्या मोठ्या शहरात झालेली असेल तर कदाचित आई-बापाचा दॄष्टिकोण "तीच्या नशिबात आहे ते होईल" असे म्हणून कदाचित गप्प बसण्याचा असेल. मुख्य म्हणजे शहरात असल्या चर्चेसाठी कोणाला वेळ नसल्याने एखाद्या दिवशी चर्चा होउन दुसर्‍या दिवशी नित्य व्यवहार सुरु होतील. कदाचित तो मुलगा चांगला निघाला तर सुखांत शेवट हि होइल.
पण गाव पातळीवर अशीच विचारपुर्वक प्रतिक्रिया उमटेल हे सांगणे कठीण आहे. एकतर छोटा आकार आणि बहुतेक सगळे एकमेकाना ओळखतात. अश्या परिस्थितीत एखाद्या घरतल्या मुलीने असे केले की तीच्या भावंडाची व भावकीतील लग्ने होणे कठीण होते. वरच्या उदाहरणात समजावून सांगितले असणारच. उगाच कोणी मारामारीवर येत नाही. निदान महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर कायद्याची भीती सर्वांनाच आहे. पोटच्या पोरीचे नुकसान होताना कोणत्या आई-वडीलांना आनंद वाटेल? आणि कल्पना करा कि एकाच गावात तो मुलगा आणि मुलगी रोजच सामोरे येणार. त्याची चर्चाही रोजच होत राहणार. असे एखादे प्रकरण म्हणजे गावातल्या रिकामटेकड्या मंडळींसाठी ज्वलंत विषय. त्या कुटुंबाची रोजची होणारी मानसिक कुंचबणा यातूनच हे असले टोकाचे पाउल उचलले जाते. एकतर कायद्याने तो मुलगा व मुलगी दोघेही स न म्हणजे पोलिस व कायद्याची मदत हि दारेही बंद. या कोंडलेपणातूनच मारहाणीचा प्रकार झाला असावा ( जो निषेधार्ह आहे) असा माझा तर्क. त्यामुळे केवळ शहरी चष्मा लावून किमान या घटेने कडे न पहाता, मुलींना वेळीच सावरायला हवे यासाठीच ह्या धाग्याचा मुळ उद्देश.

बाकी ठीक आहे पण गावकरी-गावकरी म्हणून त्यांनी किती दिवस मागासलेले राहायचे. त्यांनी पण आता दृष्टिकोन बदलायला हरकत नाही.

दुर्गविहारी's picture

2 Aug 2017 - 7:38 pm | दुर्गविहारी

तिथेही बदल होत आहेत. पण गावपातळीवर होणार्‍या बदलांचा वेग हा नेहमी मंद असतो.

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Aug 2017 - 9:39 pm | हतोळकरांचा प्रसाद

श्रीगुरुजी, उत्तम प्रतिसाद!

अप्पा जोगळेकर's picture

3 Aug 2017 - 10:33 am | अप्पा जोगळेकर

गुरुजी,
हा धागा आणि विषय इतका फालतू आणि वैयक्तिक आहे की तुम्ही असल्या लांबलचक प्रतिक्रिया इथे देऊ नयेत.
नाही होते काय की आमच्यासारखे लोक त्या ताज्या घडामोडी वाल्या धाग्यावर तुमच्या आणि ट्रुमन साहेबांच्या प्रतिसादांची वाट पाहत बसतात.
आणि तुम्ही इथे कसले टंकन करताय.

arunjoshi123's picture

3 Aug 2017 - 11:21 am | arunjoshi123

तुम्ही इथे कसले टंकन करताय.

जर असेंच असेंल तर तुम्हीं इथेच वाचन कसलें करतांय?
(अप्पा हे कर्नाटकच्या सीमेवरच्या लोकांचं पेटंट तुम्ही मोडताय म्हणून इतके अनुस्वार ओतलेत.)

अप्पा जोगळेकर's picture

3 Aug 2017 - 2:48 pm | अप्पा जोगळेकर

तिथले सगळे वाचून संपले होते. म्हणून लिहिले.

अभिजित - १'s picture

4 Aug 2017 - 9:59 pm | अभिजित - १

खूप मेहनती दिसतोय हा पठाण. यांच्यात काहीच वाईट्ट नाहीए. - मिसळपाव वरील कनहैया लोकांचे मत असेल बहुतेक असेच ..

इरसाल's picture

2 Aug 2017 - 4:19 pm | इरसाल

१. डॉ. आंबेडकरांनी "घटना" लिहीली असती,
२. म. गांधींनी अहिंसा पालन करा असे सांगितले असते,
३. लो. टिळकांनी असहकार करा हा नारा,
४. लाल बहादुर शास्त्रींनी " जय जवान जय किसान" म्हटले असते

तर कितपत यशस्वी झाले असते याबद्द्ल मला शंका आहे.
अनुभवी, मध्यम-अनुभवी, किंचीत-अनुभवी, ताजी-अनुभवी आणी अन-अनुभवी पिढी लैच प्रश्न विचारते (चुक की बरोबर की पांचट की फालतु हे अलहिदा)

arunjoshi123's picture

2 Aug 2017 - 4:23 pm | arunjoshi123

म्हणे लिडर बना, सक्षम व्हा.
फॉलोअर्स नसतील काय क्षाक्ष्क्षं लिडर बनणार?

दुर्गविहारी's picture

2 Aug 2017 - 7:23 pm | दुर्गविहारी

शंभर टक्के सत्य!

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

2 Aug 2017 - 4:40 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

व्यक्तीस्वातंत्र्यात चोंबडेपणा कशाला??? स्वतः ला करायला मिळत नाही म्हणून मॉरल पोलिसिंग!!!
आणि गडकिल्ल्यांचे पावित्र जपायचे म्हणजे काय करायचे? उद्या हे वाढत गेले तर किल्ल्यावर येताना पुरुषांनी धोतर व बायकांनी साडी नेसून यावी असा फतवा देखील हे संस्कृतीरक्षक काढतील.

arunjoshi123's picture

2 Aug 2017 - 5:25 pm | arunjoshi123

उद्या हे वाढत गेले तर किल्ल्यावर येताना पुरुषांनी धोतर व बायकांनी साडी नेसून यावी असा फतवा देखील हे संस्कृतीरक्षक काढतील.

इथेच कसे थांबणार? परवा काय करतील याचा अंदाज पण सांगा.

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

2 Aug 2017 - 10:08 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

खरय जोशीजी, उगाचच काहीही लांबवुन भुतं घालायची लोकांच्या मनात. हे चुकच ....

आपल्यासारखे फुंके आणि थुंके आले नाही तर फार मोठे उपकार होतील. थोडे साफसफाईचे काम तरी कमी होईल.
बाकी गड किल्ल्यावर जाण्यासाठी टि-शर्ट आणि जीन्स किंवा स्पोर्ट्स पँट हा अत्यंत सोयीचा ड्रेस स्री आणि पुरूष दोघांसाठी आहे. असले दिव्य शोध का लागताहेत हे आधी बघा.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

3 Aug 2017 - 10:52 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

फुंकणारा वाईट असतो हे कूणी सांगितले?.मि ट्रेकला जातो व मन्सोक्त स्मोकींग करतो.ते राहीलेले फिल्टर जाळतो काडीने किंवा शेकोटीत टाकतो.
पावित्र्य म्हणजे काय??? काय कल्पना आहेत पावित्र्याच्या???
ते कोण एक सांगलीचे मुच्छड गुर्जी आहेत ,ते म्हणे शिवरायांच्या पवित्र भुमीला चप्पल लागू नये म्हनून बिनचपलीचे फिरतात.त्यांच्या संडास बाथरुममधला मलमुत्र मैला थेट आकाशात सोडायची सोय त्यांनी केली असावी काय?
आपण काय करतो,सभ्यता कधी स्तोम होते हे भारतीयांना कळतही नाही.त्यामुळे ते गड किल्ले मंदिरे मशिदी यांचे पावित्र्य वगैरे मुद्दे उकरुन उगाच वाद वाढवू नये.धाग्याचा विषय वेगळा आहे.

अनुप ढेरे's picture

3 Aug 2017 - 10:54 am | अनुप ढेरे

हा हा हा!

चला, कशालाच पावित्र्य नसतं, किंवा टू मेक इट मोअर कंविनिएंट, पावित्र्य नावाचं काही नसतंच, तसली संकल्पनाच नसते असं मानायला चालू करू...
================================
(का? तर म्हणे पावित्र्य काय आणि काय नाही हे ठरवता येत नाही, वा ठरवताना मतांतर होतं.)

धाग्यचा विषय वेगळा आहे म्हणूनच आपल्याला हा शेवटचा प्रतिसाद.
आपण गडावर गेल्यानंतर सिगारेट विझवत असाल तर नक्कीच आभार. हेच सगळ्यांनी करणे अपेक्षित आहे.
बाकी कारण नसताना आणि धाग्याशी आणि चाललेल्या चर्चेचा संबध नसताना आपण सांगलीचे मुच्छड गुर्जीना मधे आणले आहे. त्यांचे काही विचार मला नक्कीच पटत नाहीत, पण त्यांच्या कार्याविषयी आदरच आहे. आधी त्यांच्या कार्याची पुरेशी माहिती घ्या ईतकेच सुचवेन.त्यांच्या विषयी तुम्ही ज्या शब्दात गरळ ओकलय ते बघुन हा प्रतिसाद आहे हे लक्षात घ्या. त्यांच्या एका हाकेवर महाराष्ट्रातील हजारो तरूण जमतात आणि नेमुन दिलेले कार्य करतात. ते सुध्दा स्वताचे पैसे खर्च करून. तेव्हा त्या मुच्छड गुर्जीची चिंता करण्यापेक्षा आपल्या प्रत्येक धाग्यावर अंताक्षरी का खेळली जाते आहे याची चिंता करा. वाढलेल्या केसातून आपल्या मेंदुपर्यंत हे विचार पोहचतील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो.

विशुमित's picture

5 Aug 2017 - 9:17 pm | विशुमित

एक आठवण: बंडा तात्या कराडकरांच्या व्यसनमुक्ती कार्यक्रमा दरम्यान सांगलीच्या गुरुजींचे बोध अमृत आम्ही ऐन तारुण्यात प्रदार्पण करते वेळी तुळापूर इथे ऐकले होते. कार्यक्रम अर्ध्यावर सोडून आमच्या वाडीतील पोरांना पिटाळून घरी आणलं होतं.
वाई मधील पोरं खूप संवेदनशील आहेत गुरुजींबाबत. माझ्या एका नातेवाईकाच्या (मेव्हणा होता) पोस्ट वर मी कंमेंट टाकली होती. त्याने लगेच मला फोन करून म्हंटलं "भावजी तुमच्या पाया पडतो प्लिज कंमेंट काढून टाका. माझं जीवन हराम करतील माझे मित्र".
------------------------
अवांतर: तरुणांना दिलेल्या हाके वरून आठवलं- मुंबईचा पण एक असाच अवलिया होता त्याच्या हाकेवर मुंबई बंद पडायची आणि तरुण थाड थाड एस टी च्या काचा फोडायचे. असो..

धनावडे's picture

8 Aug 2017 - 3:25 am | धनावडे

वाई पूर्व भागातील म्हणा पश्चिमेकडे नावही माहीत नाही जास्त लोकांना

धर्मराजमुटके's picture

2 Aug 2017 - 4:44 pm | धर्मराजमुटके

दम लागला ब्वॉ ! एवढे प्रतिसाद वाचून. काल मी एक प्रतिसाद टाईपला होता पण तो मिपावरुन गायब झाला. असो.

१. मुलगा / मुलगी प्रेमविवाह करण्याचे स्वप्न बघत असेल आणि काही कारणांस्तव पालकांस मंजुर नसेल तर हरप्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा. थर्ड पार्टिलाही बोलावून समजून सांगावे. त्यांची बाजू ऐकून घ्यावी. पुढील येऊ शकणार्‍या अडचणींची कल्पना द्यावी. आपल्या मुला / मुलीस प्रसंगी दोन-चार झापडी मारल्यास जास्त वाईट वाटुन घेऊ नये. मात्र हात पाय मोडेस्तोपर्यंत / मरेपर्यंत मारु नये. त्याने काँप्लीकेशन्स वाढतात. थर्ड पार्टीला तर अजिबात मारहाण करु नये. त्याचे / तिचे हातपाय मोडल्यास त्यांचे हगणेमुतणे काढणे, औषधोपचाराचा खर्च त्यांच्या पालकांच्या माथी येतो. कोणीही पालकांना विचारुन प्रेम करत नसल्यामुळे पाल्यांच्या प्रेमाची सजा पालकांस देऊ नये.
२. याउप्परही ऐकत नसल्यास जी काशी करायची आहे ती करुन द्यावी. पुढे जाऊन उभयता सुखी झालेच तर झाले गेले विसरुन जाऊन सुखाने नांदावे. पुढे जाऊन बरेवाईट झालेस तर आपल्या मुला / मुलीस अथवा थर्ड पार्टीस 'बघा आम्ही सांगत होतो तेव्हा ऐकले नाही. भोगा आता कर्माची फळे' असे वारंवार सुनवावे. त्यामुळे न मारताच समोरचा अर्धमेला होऊन जातो. तेव्हाच मेलो असतो तर बरे झाले असते असे त्यांना वारंवार वाटते.
३. मुलगा / मुलगी फसली तर प्रेमपुर्वक त्याला परतायची दारे उघडी ठेवावी. न जमल्यास तु आम्हाला नि आम्ही तुला मेलो असे निर्वाणीचे ऐकवून काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा.
४. स्वत:च्या अनुभवातुन शिकतो तो माणूस आणि दुसर्‍याच्या अनुभवातुन शिकतो तो हुशार माणूस ! जगात ९५% लोक्स हे पहिल्या प्रकारचे असतात. तेव्हा किती लोड घ्यायचा ते स्वतः ठरवून घ्यावे.
५. सामाजिक जबाबदारी म्हणून दुसर्‍याच्या भावा/ बहिणीच्या मॅटर मधे पडू नका. उद्या तुमच्यावर तीच पाळी आली तर ते तुमच्या मदतीला येतीलच असे नव्हे.

तसेही एकदा सुरुवातीचे फुलपंखी दिवस निघून गेल्यावर दोघांनाही आटे-दालचा भाव माहित होते. महंगाई की मार म्हणजे एकदम बेस्ट. आवाज होत नाही. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. दुसर्‍याच्या दु:खात आपले सु:ख सामावले आहे याची जाणिव ठेवा.

असो. कोणता पर्याय पटतो तो निवडा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. लाजु नका !

विशुमित's picture

2 Aug 2017 - 5:05 pm | विशुमित

राजे.... घ्या आमचा दंडवत..!!

हे पटलं भाऊ आपल्याले..जवळच्या नात्यातला माणसाच्या भानगडीत पडून हात पोळून घेतले आहेत..तेंव्हापासून प्रेमप्रकरण म्हटलं की 'देव तुमचं भलं करो' असं म्हणून बाजूला होतो...आता भविष्यात माझ्याच मुलीच्या बाबतीत काही घडल्यास लक्ष घालावेच लागेल..त्यासाठी तुमचा प्रतिसाद लक्षात ठेवतो..

बाकी एक वाचलेला किस्सा सांगतो..खरा-खोटा माहिती नाही.
एक मुलगी परधर्मीयाच्या प्रेमात पडली. दोघे पळून गेले. पोलिसांनी लगेच कारवाई करून दोघांना आईबापा समोर उभे केले. मुलीनी स्पष्ट सांगितले, लग्न करेल तर याच्याशीच आणि त्याच्या धर्मातील/ घरातील पद्धतीशी जुळवून घेईल. पोलिसाने शक्कल लढविली, म्हणाला एक दिवस तर जुळवून दाखव..बाजारातून मांसाहाराचे सामान आणले आणि मुलीला म्हणाला पूर्ण स्वयंपाक करून दाखव...शाकाहारी घरात वाढलेल्या मुलीने सगळा ताल बघून बापाच्या घरी जाणे पसंद केले.

विशुमित's picture

2 Aug 2017 - 6:23 pm | विशुमित

<<<<जवळच्या नात्यातला माणसाच्या भानगडीत पडून हात पोळून घेतले आहेत>>>
==> आमच्या बंधूंची नोकरी धोक्यात आली होती नात्यातल्या भानगडी पायी. काहीही कारण नसताना. याना काय बोलाय जातंय उदारमतवादी म्हणून.

इथेच बघा की धागा लेखकाला म्हंटलं बाबा मारझोडीच्या फंदात पडणे चांगले नाही तर तोच आपल्यावर डाफरतोय. मग म्हंटलं कर बाबा तुला काय करायचं (जोशी बुवा चे वाक्य(तत्व) इथे नाही वापरत) ते. यात आपल्या सारख्या (उदारमतवादी) त्रयस्थाच काय चुकलं?
हायला आपण कसे काय उदारमतवादी ह्याची काय टोटल लागेना ...!!

मला तर या धाग्यावर काहीच टोटल लागत नाहीये..

१. धागाकर्त्यांनी दोन विषय एकत्र का केले? न्यूड व्हिडीओ आणि घरच्या लोकांच्या विरोधात लग्न हे दोन वेगळे विषय आहेत.
२. लोकांना आपले अनुभव सांगावे तर ते आपल्याच अंगावर का येतात?
३. काही लोकं अगम्य भाषेत का लिहितात?

धाग्याचा पार केजरू झाला आहे. वास्तविक आजकाल सगळ्याच धाग्यांचा केजरू होतोय..

पिलीयन रायडर's picture

2 Aug 2017 - 7:04 pm | पिलीयन रायडर

धाग्यावर "९६" नवे प्रतिसाद पाहुन अवाक होऊन धागा उघडला, मग अजो दिसले...

अजोंचे प्रतिसाद इग्नोर करत शेवटाला यायला वेळ लागला नाही. पण बरं झालं सगळं वाचलं.. हे रत्न त्यामुळेच हाती आलंय!

एक नंबर प्रतिसाद धर्मराज भाऊ!! थोडक्यात महत्वाचे काय? तर ते हे आहे.

यू आर मिसिंग अ लॉट ऑफ फन.
======================
बट अनफॉर्च्यूनेटली यू वूड मिस धिस टू.

यशवंत पाटील's picture

2 Aug 2017 - 7:40 pm | यशवंत पाटील

धर्मराज मुटके, तुम्ही सांगितलत ते भारी आहे. पण भावकी कधिकधी बेकार असते हो दादा. मनात नसल तरी पडाव लागतं त्यात. मारहाण नको हे कबुल आहे. कुणी सांगाव, उद्या मार खाणारा आपलाच निघायचा. मला वाटत की यात मुलीकडल्यांच आणि मुलाकडल्यांच वेगळवेगळ मत असेल. आपली बाजू कोणती ते पण बघतात लोकं आणि मग ठरवतात - पडतं घ्यायचं का मारायच ते.

धर्मराजमुटके's picture

2 Aug 2017 - 7:57 pm | धर्मराजमुटके

एकंदरीतच गावगाड्यात निष्पक्ष राहणे अवघड असते याचा फर्स्ट हँड अनुभव आहे. गावात राहयचं तर कोणत्यातरी एका गोटात / कळपात राहावेच लागते मजबुरी म्हणून. पण त्यात बरेचदा अप्रिय निर्णयांचे समर्थन करावे लागते. मी या सगळ्या गोष्टीपासुन प्रथमपासुन दुर राहतो त्यामुळे गावी गेल्यावर भाऊबंद अतिशहाणा समजतात. पण त्याला इलाज नाही.

फर्स्ट हँड अनुभव हा शब्द लै दिवसांनी वाचला. :)

लेखाच्या पहिल्या भागावर प्रतिसाद -

मुली/मुले यांनी आपापले नग्न/इतर अवस्थेतले फोटो काढणे आणि शेअर करणे हा फक्त आपल्याकडे असलेला प्रॉब्लेम नाही. याची सुरवात पाश्चात्य देशात झालेली दिसते. जसा हा प्रॉब्लेम त्यांच्यासाठी जुना आहे तसेच या बाबतीत तिकडे जनप्रबोधनही मागच्या दशकापासून सुरु आहे. आपल्याकडेही शाळा, कॉलेजेसमधून मुलांना आपले "सार्वजनिक होऊ नये असे वाटणारे" फोटो / व्हिडीओ न काढण्याचा सल्ला दिला पाहिजे.

For the best part of a decade, young women like Erin have been told by police, parents and schools not to take any photographs that they would not want shared with the world

https://www.theguardian.com/australia-news/2016/sep/01/nude-selfies-what...

एका मुलीला तिच्या आईने विचारले - की तू असा फोटो बॉयफ्रेंडला का पाठवला - तर तिने असे उत्तर दिले की "मला वाटले आम्ही प्रेमात आहोत. मला वाटलेच नाही की तो त्या फोटोचा गैरवापर करेल"

When one teenage girl’s picture was shared after she sent it to a boy with whom she was in a long-distance relationship, her mother asked her why she’d sent it. “I thought we were in love,” she said. “I didn’t think he would do anything like that.”

https://www.theguardian.com/society/2015/nov/10/sexting-becoming-the-nor...

म्हणजे मुलांना प्रेम म्हणजे काय असते हे घरी समजावून दिले पाहिजे आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा हे पण आधीच घरी शिकवायला पाहिजे. हा विषयच घरी निघाला नाही तर त्यांना तरी कसे समजणार ..

म्हणजे मुलांना प्रेम म्हणजे काय असते हे घरी समजावून दिले पाहिजे आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा हे पण आधीच घरी शिकवायला पाहिजे.

अगदी मनातलं बोललात... पालक आणि मुलांमध्ये सुसंवाद असणं अत्यावश्यक आहे. पण अनेकदा पालकच हि गरज समजून घेत नाहीत, आणि नंतरचे प्रश्न निर्माण होतात.

विशुमित's picture

3 Aug 2017 - 11:16 am | विशुमित

धाग्याच्या पहिल्या भागासाठी हा प्रतिसाद तंतोतंत उपयुक्त आहे.

असे फोटो मुलं मुलींना का काढावेसे वाटतात ह्याचे उत्तर मिळाले.

उपयोजक's picture

2 Aug 2017 - 10:01 pm | उपयोजक

धाग्यातल्या एकाच मुद्द्यावर तेही काही तरी चुकीचे तर्क लावून काहीजणांकडून प्रतिसाद दिले गेले आहेत.अनेकदा मुद्दा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला तरीही चालूच आहे.त्यामुळे थोडं अधिक सुगम,स्पष्ट लिहितो.

१] ज्या मुलाला मारहाण झाली ती मी केलेली नाही.माझा त्यात सहभाग नव्हता.त्यात मी होतो असा शोध कृपया लावू नये.ती ग्रुपमधील दुसर्‍या सदस्यांच्या गावी झालेली आहे.या मारहाणीला मी जबाबदार असल्याचं किंवा ती मी केल्याचं कुठेही लिहिलेलं नाही.

२] मारहाण करणं अयोग्यच आहे.त्याचं कुठेच समर्थन होऊ शकत नाही.आधी त्या मुलाला समजावलं गेलंही असेल.लोक एवढेपण निष्ठूर नसतात.पण मारहाण कोणत्या परिस्थितीत झाली असावी याचाही अंदाज करता येऊ शकतो.गावातील वजनदार व्यक्तीच्या मुलीचं कोणावर तरी प्रेम बसतं हे कदाचित त्या मातब्बराला सहन झालं नसावं.कितीही राग आला किंवा आपली मुलं कितीही चुकीची वागली तरी तिच्या किंवा प्रियकराच्या अंगाला हातही लावायचा नाही इतका विवेक त्या गावात राहणार्‍या,या प्रसंगामुळे,मुलीच्या हटवादीपणामुळे,रागात असणार्‍या आणि रागातून काहीही करण्याएवढी आणि ते पचवण्याची हिंमत आणि आर्थिक सामर्थ्य असणार्‍या माणसाला सांगायला जाईल कोण?
जसं इथं तुम्हाला काय करायचंय जातीय मुलगी तर जाऊदे तुम्ही कोण मधे बोलणारे असं म्हटलं जातंय तसंच माझी मुलगी आहे तू कोण सांगणारा असं म्हणून गावातल्या मध्यस्थी करणार्‍यांनाच मारहाण होईल अशी भिती वाटल्याने कदाचित कोणी मध्यस्थी केली नसेल, आणि कोणी समजुतीनं मध्यस्थी न केल्यामुळे,विवेकवादी मार्ग न दाखवल्यामुळेदेखील त्या मुलाला ही मारहाण झाली असावी.

३] अजून एक चर्चिला गेलेला मुद्दा तो म्हणजे तो मुलगा आर्थिकदृष्ट्या गरीब होता.गरीब असणं हा दोष आहे का?
तो मुलगा फक्त गरीब असता तर काही मध्यममार्ग निघालाही असता.पण वर सुरुवातीला विवेचनात दिल्याप्रमाणे या मुलीचे बाकीचे कुटूंबीय दुसर्‍या गावी रहायचे.पण गावात त्यांना फार मान होता.या मुलीच्या आजीकडे या मुलीला शिक्षणासाठी ठेवलं होतं.हा मुलगा बहिणीकडे शिकायला होता.याच गावात.हा त्या मुलीला रात्री १२ च्या दरम्यान भेटायला यायचा.सोबत मित्रालाही पाळत ठेवण्यासाठी घेऊन यायचा.घरात फक्त आजी.आता अशा परिस्थितीत कोणताही गैरप्रकार या मुलीबाबत घडू शकला असता.
हा मुलगा कोणत्याही ठिकाणी कामावर टिकत नसे.घरची गरीबी असूनही हा धरसोडपणा काय दाखवतो?

शिवाय एवढा विरोध होऊनही लग्न झालयं,आपल्यावर संसाराची थोडीफार जबाबदारी आहे म्हटल्यावर एखाद्याने वर्षभरात स्वभावात बदल करुन परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले असते.पण इथे तेही दिसलं नाही.
अजूनही हा मुलगा स्वभावाने,आर्थिक स्थितीने गरीब पण गुणांची खाण असलेला,समजुतदार मुलगा वाटतो का?
ती मुलगी या मारहाण करणार्‍या या मित्राला भेटून रडत काय सांगायची तर नवर्‍याला चांगल्या ठिकाणी नोकरीला लावा हे सांगायची.सासुबरोबर शेतात कामाला जायची. याचा अर्थ ती त्या परिस्थितीत खुश होती का?
लग्नाचा हा निर्णय तिचा स्वत:चा होता तर ती गावातल्या लोकांना त्या मुलाला सुधारण्यासाठी मध्यस्थी का बरं करायला सांगायची?

४] सर्वात महत्वाचं: धाग्याचा विषय मुली अशा का वागतात? त्या ठामपणे अयोग्य मागणीला नकार का देत नाहीत? किंवा सज्ञान असूनही दिखाव्याला बळी का पडतात असा आहे.त्यावर चर्चा अपेक्षित आहे.
मारहाण करणे हा गुन्हा आहे,असंस्कृतपणाचं,रानटीपणाचं
लक्षण आहे याची कृपया आम्हाला जाणीव करुन द्या.आम्ही त्याबद्दल अनभिज्ञ आहोत.अशी मागणी धाग्यातून केलेली नाही.धाग्याचा तो विषय नाही.धाग्याचा विषय समजून घ्या.

५] चांगल्या स्वभावाच्या एखाद्या साध्या मुलाला 'तुला मी चांगला समजत होते.तू असं काही विचारशील असं वाटलं नव्हतं' असं म्हणून त्याला वाटेला लावण्याची अक्कल या मुलींकडे असते.पण कामधंदा न करता उनाडक्या करणारा मुलगा स्टायलिश वागण्यासाठी पैसा कुठून आणतो? तो जे काही सांगतोय ते खरंच आहे का? अशी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता त्याच्याबरोबर वाहवत जाताना ही अक्कल कुठे जाते?
हे वयच तसं असतं म्हणता.म्हणजे या वयात पाय घसरु शकतो,चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो हे मान्य ही करता आणि वर कोणी समजावून सावरायला गेलं किंवा शेवटचा पर्याय म्हणून मारहाण झाली तर मुलगी सज्ञान आहे असं ही म्हणता.
सज्ञान असेल तर या मुली असे चुकीचे निर्णय कसे घेतात? आणि सज्ञान असेल तर हे वयंच तसं असतं असं म्हणून तिची बाजू घेणं,भलामण करणं योग्य आहे?

६] या सगळ्या प्रकारामुळे या कुटूंबातल्या इतर सदस्यांच्या विवाहाचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.आम्ही त्या भंपक मुलाशी लग्न कर असं सांगितलं नव्हतं.ती सज्ञान आहे.तुम्ही आम्हाला का दोष देता?
हे असं सांगितल्यावर घरातल्या बाकीच्या अविवाहित सदस्यांची लग्न होतील? सहजपणे?
या कुटूंबातल्या मोठ्या माणसांचं पाल्यांकडे लक्ष नाही,आमची मुलगी आम्ही असल्या घरात का द्यावी? असं म्हणून नकार मिळायला लागला तर(खेडेगावात असं होऊ शकतं)आपली एक मुलगी तिच्या आवडत्या मुलाबरोबर संसार करते आहे यात आनंद मानून उरलेल्या भावंडांच्या विवाहाच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करावं का?

७] या अशा फसलेल्या मुलींपैकी काहीजणी सहन न होऊन माहेरी परत येतात.
सज्ञान या गटात बसत असतील तर घेतलेल्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी त्या मुली का घेत नाहीत? यावेळी त्यांची अक्कलहुशारी,लग्न करतानाचं धाडस कुठे जातं?का परत येतात त्या?

८] अशा आवडत्या पण नाकर्त्या मुलाशी लग्न करुन मुलीनं सगळ्या कुटूंबाला हाल भोगायला लावावेत आणि त्याच कुटूंबानं त्या मुलीची वाताहत झाल्यावर तिला मायेनं जवळ करावं,नवीन आयुष्य जगायला मदत करावी ही अपेक्षा का? सज्ञान आहे ना मुलगी?

आता इतकं स्पष्ट लिहिल्यावरही अजूनही मारहाण या एकाच खुंटीला पकडून कोणाला लोंबकाळत बसायचं असेल तर खुशाल बसावं!

आम्ही त्या भंपक मुलाशी लग्न कर असं सांगितलं नव्हतं.ती सज्ञान आहे.तुम्ही आम्हाला का दोष देता?
हे असं सांगितल्यावर घरातल्या बाकीच्या अविवाहित सदस्यांची लग्न होतील? सहजपणे?

ही भीती का असावी कोणाला? आणि कोणी अशा फालतू कारणासाठी नातेवाईकांशी लग्न करणार नसेल तर मी म्हणेन अशा लोकांशी नाते न जमणेच उत्तम! किंबहुना अषा अनेक फालतू कारणांमुळे आजकाल बऱ्याच लोकांची लग्ने होत नाहीत.

अत्रे's picture

3 Aug 2017 - 10:07 am | अत्रे

किंबहुना अषा अनेक फालतू कारणांमुळे आजकाल बऱ्याच लोकांची लग्ने होत नाहीत.

माझा रोख जे लोक अशा कारणांमुळे एखादे स्थळ नाकारतात त्यांच्यावर होता.

हतोळकरांचा प्रसाद's picture

3 Aug 2017 - 4:00 pm | हतोळकरांचा प्रसाद

परिस्थिती काय आहे यापेक्षा काय असावी यावर आधारित प्रतिसाद! हि शहरी (एकमेकांशी फार नसलेले संबंध) वातावरणातील आदर्श अपेक्षा आहे. ग्रामीण भागात दहा पैकी नऊ लोक नातेवाईकांच्या माहितीवर आधारित लग्न करतात. आदर्श अपेक्षा ठेऊन नऊ लोकांना दूर ढकलणे इतके सहज शक्य असते असे नाही. शहरात हे प्रमाण कदाचित दहात चार असेल पण सहा लोकांचा पर्याय उपलब्ध असल्याने ग्राह्य आहे.

थोडक्यात ज्याचे जळते त्यालाच कळते - हेच खरे!

अमेरिकन त्रिशंकू's picture

3 Aug 2017 - 12:01 am | अमेरिकन त्रिशंकू

Plural of anecdote is not data.

कपिलमुनी's picture

3 Aug 2017 - 2:25 am | कपिलमुनी

मारहाण करण्यापेक्षा जुन्या पिक्चर सारखा ब्लॅंक चेक देऊन बघायचे

सौन्दर्य's picture

3 Aug 2017 - 9:06 am | सौन्दर्य

वरील सर्व चर्चा वाचताना अचानक पुलंच्या 'बटाट्याची चाळ' मधील 'काही वासर्या' हे प्रकरण आठवले. त्यातील अण्णा पावशेंच्या वासरीतील काही वाक्ये लिहायचा मोह अनावर झाला.

"३ जुलै - संध्याकाळी ऑफिसमधून परतताना जिन्याखाली आमची दुसरी कार्टी आणि चौबळाचा दिवटा बोलताना पुन्हा आढळली. दोघांनाही बदडले. कार्ट्याना शक्य तितके लवकर उजवले पाहिजे"

"९ नोव्हेंबर - पोंबुर्प्याची हाडे मोडली. पुन्हा माझ्या पोरीच्या वाटेला जाणार नाही ...."

व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या न्यायाने वरील धाग्यावर विविध प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या, त्यातील कोणत्या बरोबर कोणत्या चूक हे शेवटी काळच ठरवेल. शेवटी 'ज्याचं जळते त्यालाच कळते' हेच खरे.

"३ जुलै - संध्याकाळी ऑफिसमधून परतताना जिन्याखाली आमची दुसरी कार्टी आणि चौबळाचा दिवटा बोलताना पुन्हा आढळली. दोघांनाही बदडले. कार्ट्याना शक्य तितके लवकर उजवले पाहिजे"

"९ नोव्हेंबर - पोंबुर्प्याची हाडे मोडली. पुन्हा माझ्या पोरीच्या वाटेला जाणार नाही ...."

ई------ कसले रानटी लोक त्याकाळी होते नाही? आधी मुलांचे बौध्दिक घ्यायचे, त्यांचे काउन्सलिंग करायचे. काहीच नाही जमले तर पाडगावकरी कविता आहेच. आधी स्वताची कार्टी आणि चौबळाचा दिवटा याचा खरच काही दोष नाही याची खात्री स्वताला पटवून घ्यावी असे नाही वाटले यांना. "सो क्रुएल यु नो". चक्क मारहाण करताहेत?
आणि पोंबुर्प्याची हाडे मोड्ली मोडली म्हणजे काय? त्याने उद्या केस केली म्हणजे? त्याचे काउन्सलिंग कराता येत नव्हते काय? तुमच्या पोरीचा यात दोष नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? त्या बिचार्‍या मुलाचाच तुम्हाला दोष दिसतो काय?
आणि पु.ल. ना तरी विनोद म्हणुन असले लिहावेसे वाटते तरी कसे?

शेवटी 'ज्याचं जळते त्यालाच कळते' हेच खरे.
हे वाक्य भिडून गेले. त्यासाठी तुम्हाला ___________________/\__________________________

प्रभा पावशे आणि मधू (?) चौबळ शेवटी सगळ्यांना फाट्यावर मारून 'इलोप'* होतात हा तपशील विसरू नका.

*त्रिलोकेकरांच्या भाषेत

अनुप ढेरे's picture

3 Aug 2017 - 2:03 pm | अनुप ढेरे

अगदी हेच्च आलं होतं डोक्यात.

रामपुरी's picture

4 Aug 2017 - 12:10 am | रामपुरी

तपशिल चुकला मालक...
मार खाल्लेल्या प्रभा पावशेचं लग्न होतं. मार न खाल्लेली रतेन समेळ इलोप होते. :-)

आदूबाळ's picture

4 Aug 2017 - 9:33 am | आदूबाळ

अर्रर्रर्र .... चुकलंच!

प्रभा पावशेचं कोणाबरोबर लग्न होतं? अण्णा पावशे तिला भलत्याबरोबर 'उजवण्यात' यशस्वी होतात ना?

रामपुरी's picture

4 Aug 2017 - 6:59 pm | रामपुरी

सगळा तपशिल आठवत नाहीये पण पोंबुर्प्याची हाडे मोकळी करताना त्याला अण्णा सांगतात " उद्या तिचं लग्न ठरवतोय. मुलगा इंजिनियर (?) आहे. तुझ्यासारखा उडाणटप्पू नाही. चांगला ५००० हुंडा मोजतोय" वगैरे... :-)

हतोळकरांचा प्रसाद's picture

4 Aug 2017 - 9:30 pm | हतोळकरांचा प्रसाद

विंजिनिअर नाही कै, पोष्टात हो! आणि 3000 हुंडा! आण्णांची परिस्थिती हलाखीची आहे आणि मुलींच्या लग्नाच्या चिंतेने खंगलेले आहेत असं काहीतरी पोंबुरप्याने लिहिल्यामुळे पेटलेले आण्णा हात मोकळा करतात बहुतेक!

अप्पा जोगळेकर's picture

3 Aug 2017 - 10:38 am | अप्पा जोगळेकर

आधीचा धागा 'हा प्रश्न कसा सोडवावा?'
नंतरचा धागा 'अशा का वागतात काही मुली'.
एकूण वाटचाल पाहून साहेब काट्यावर आले आहेत असे वाटते.

ताज्या घडामोडी हा तद्दन फालतू विषय. घरसंसार कामाचा. पण तुम्ही लोकांना तिकडे डायव्हर्ट करताय. पण असो.

अकिलिज's picture

3 Aug 2017 - 4:37 pm | अकिलिज

मुलींनी निवडलेला मुलगा भंपक निपजला, म्हणून मुलींची अक्कल काढण्यापर्यंत ठीक आहे. पालकांनी ठरवून दिलेली स्थळंही खूप सुस्वभावी निघतील आणि संसार सुखाचे होतील याचीही शाश्वती कोणी देऊ शकत नाही.

उदाहरणा दाखल,आजकाल शेतकर्‍यांच्या मुलांना सहजासहजी मुली देत नाहीत. मग मुलांना शहरात पाठवून तो नोकरीला आहे असे सांगतात. लग्न करेपर्यंत पोरं उंडारतात. लग्न झाल्यावर नोकरी सुटली हे कारण देऊन गावी परतण्याचा निर्णय घेतात.
तसं बघायला गेलं तर हि सुद्धा एक प्रकराची शुद्ध फसवणूकच आहे. मुलीचंही स्वतःचं करियर करायचं स्वप्न वगैरे असल्या गोष्टी झाकल्या जातात.

दोन्ही प्रकारात पाहीलं तर मुलींनी स्वतः ज्याच्यावर प्रेम केलंय त्याच्याबरोबरचा संसार ती बर्‍यापैकी सावरेल तरी. अर्थात् जर त्यासाठी ती इतरांची मदत मागत असेल तर धागाकर्त्याला प्रतिसादातले शेवटचे चार मुद्दे टंकायला आयती संधी मिळेल. इतकेच.

arunjoshi123's picture

4 Aug 2017 - 11:11 am | arunjoshi123

मुलींनी निवडलेला मुलगा भंपक निपजला, म्हणून मुलींची अक्कल काढण्यापर्यंत ठीक आहे. पालकांनी ठरवून दिलेली स्थळंही खूप सुस्वभावी निघतील आणि संसार सुखाचे होतील याचीही शाश्वती कोणी देऊ शकत नाही.

उदारमतवाद्यांच्या तर्करत्नांच्या खाणीतील अजून एक रत्न.
अहो, मायबाप "आजघडीला काय दिसतंय" हेच फार तर फार पाहू शकतात ना? भविष्यात काय होईल, किंवा विवाहपूर्व ड्यू डिलिजन्सने बाहेर न आलेल्या गोष्टी किती खतरनाक निघतील हे "आज" मायबापांना माहीत झालं तर ते स्थळ मोडतीलच कि. डोळ्यासमोर दिसत असलेले भविष्य मुली दुर्लक्षितात, पालक नाही, असा विस्।अय आहे.
================
(तसे काही पालक आपल्या मुलिची बरेचदा दुर्लक्ष करून वाट लावतात, आणि पालक असे का वागतात असा धागा निघू शकतो, पण असो.)

एखादा/दि प्रेमात पड्ला कि त्या व्यक्तिचे जगच नुसते प्रेम बनुन जाते(काहीतरी हार्मोन लोचा असावा). मुलांना स्वतःचे घर सोड्ताना स्वतःच्या बापाकडुन मिळ्नार्या संप्पतीवर पाणी सोडावे लागु शकते त्यामुळे मुलाच्या घरच्यांकडुन विरोध झाला तर मुले व्यावहारिक निर्णय घेत असावेत. मुलींना मात्र स्वतःचे घर सोडावेच लागणार असते, मनाप्रमाणे लग्न करा अथवा मनाविरुध्द. शिवाय मुली मानसिक जास्त गुंतलेल्या असतात. मुलांची मात्र शारीरिक ओढ जास्त असते(बहुतेक केस मध्ये). मुलींना पहिल्यापासुनच व्यावहारीक निर्णायात सामावुन घेतले जात नाही. त्यांना व्यावहारीक निर्णय न शिकवल्यामुळे (घरातल्यांची चुक) त्यांना व्यावहारीक निर्णय घेता येत नाहीत. म्हणुन त्या अशावेळी व्यावहारीक निर्णय न घेता मनाला आवडेल तोच निर्णय घेतात.. आणि ....

अत्रे's picture

4 Aug 2017 - 6:41 am | अत्रे

मुलींना पहिल्यापासुनच व्यावहारीक निर्णायात सामावुन घेतले जात नाही. त्यांना व्यावहारीक निर्णय न शिकवल्यामुळे (घरातल्यांची चुक) त्यांना व्यावहारीक निर्णय घेता येत नाहीत. म्हणुन त्या अशावेळी व्यावहारीक निर्णय न घेता मनाला आवडेल तोच निर्णय घेतात..

+10

उपयोजक's picture

4 Aug 2017 - 8:26 am | उपयोजक

मुलींना पहिल्यापासुनच व्यावहारीक निर्णायात सामावुन घेतले जात नाही. त्यांना व्यावहारीक निर्णय न शिकवल्यामुळे (घरातल्यांची चुक) त्यांना व्यावहारीक निर्णय घेता येत नाहीत. म्हणुन त्या अशावेळी व्यावहारीक निर्णय न घेता मनाला आवडेल तोच निर्णय घेतात..

+१००

हीच कारणमिमांसा अपेक्षित आहे धाग्यातून!

हीच कारणमिमांसा अपेक्षित आहे धाग्यातून!

तुम्ही आमचा क्लास घेत आहेत का, "धाग्याचा अपेक्षित विषय ओळखा" म्हणून?

(हलके घेणे! :))

arunjoshi123's picture

4 Aug 2017 - 10:46 am | arunjoshi123

मुलींना पहिल्यापासुनच व्यावहारीक निर्णायात सामावुन घेतले जात नाही.

व्यावहारिक निर्णयात सामावून घेणे म्हणजे नक्की काय? मुलांना तरी कोणत्या व्यावहारिक निर्णयात सामिल करतात? त्यांची खेळणी, कपडे, पुस्तके कोणती , कुठून घ्यायचे इतकेच समाविष्ट केले जाते. शेत विकायचं का, पिक कोणतं घ्यायचं, जनावर कोणतं विकायचं, नोकरी बदलायची का, दुकानात कोणतं सामान कितीला यात मुलांचा नि मुलिंचा सहभाग समान असतो.
============================================
आणि वयामानानुसार हवं तेवढं मुलींना सहभागी करून घेतात. वास्तविक नोकरदार लोकांमधे संसार चालवण्याचे काम स्त्रीयाच करतात. जास्तीत जास्त पुरुष बघ्याचे काम करतात. ऑफिसला जायचं आणि यायचं. घर चालवायचं इतकं कठीण ज्ञान आभाळातून टपकतं कि काय?
=======================================
धाग्याचा विषय "काही" मुली असे का वागतात असा आहे. बाकी सगळ्या मुली (९९%) शहाण्यासारख्याच वागत असतात. इथे चर्चा अपवाद असणार्‍या मुलींच्या मनोवृत्तींची आहे.
===========================
प्रेम होणे हे अंततः कोणत्याही अन्य घटकांनी ठरत नसते. प्रेमपात्र ठरण्यासाठि जे काही नैसर्गिक कारण ते अयोग्य म्हणता येत नाही. मग सिविलायझेशन्स घातलेले संकेत कुचकामी ठरतात. आणि अशा का वागतात असा प्रश्न पडतो.

>>>यांची खेळणी, कपडे, पुस्तके कोणती , कुठून घ्यायचे इतकेच समाविष्ट केले जाते. शेत विकायचं का, पिक कोणतं घ्यायचं, जनावर कोणतं विकायचं, नोकरी बदलायची का, दुकानात कोणतं सामान कितीला यात मुलांचा नि मुलिंचा सहभाग समान असतो.<<<

तुमच्याकडे असेल, ग्रामीण भागात मुलींना फक्त शाळाआणि घर एवढेच माहीत असते.

>>>शेत विकायचं का, पिक कोणतं घ्यायचं, जनावर कोणतं विकायचं, नोकरी बदलायची का<<< ह्या गोष्टीत मुलांना सामावुन घेतले जाते... मुलींना अजिबात नाही...

>>>वास्तविक नोकरदार लोकांमधे संसार चालवण्याचे काम स्त्रीयाच करतात. <<<
नुसता किराणामाल आणि भाजी घेणे म्हणजे व्यावहारीक निर्णय नव्हेत...

हतोळकरांचा प्रसाद's picture

4 Aug 2017 - 3:53 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुमच्यामते मुलांना सहभागी करून घेतले जाणारे व्यावहारिक निर्णय जरा सांगाल का?

माझ्या लांबच्या नातेवाईकाच्या एकुलत्या एका मुलीची सत्यकथा
मुलीच्या वर्गात( क्लास मध्ये) असलेला परधर्मीय मुलगा आणि या मुलीचे पुण्यात "प्रेम" जमले. मुलगा १२ ला तीन वेळा नापास आणि आता शिक्षण सोडून दिलेले.मुलगा सध्या काहीच करत नाही.अम्बरनाथला असतो. मुलगी बी कॉम च्या शेवटच्या वर्षाला पुण्यातच आहे २० वर्षाची .
बी कॉमच्या दुसऱ्या वर्षाला असताना त्यांचे प्रेम प्रकरण मुलीच्या वडिलांना लक्षात आले. त्यांनी मुलीला हर तर्हेने समजावण्याचा प्रयत्न केला पण मुलगी आडमुठी आहे. वडिलांनी सांगितले कि मुलगा काही तरी करू दे मग तुमचे लग्न लावीन. मुलीला समजावण्यात प्रयत्न चालू आहे कि तुला १००० रुपये स्कुटरच्या पेट्रोलला लागतात मोबाईल, बाहेर खाणे थोडीशी मौजमजा इत्यादी इतर खर्च मिळून सध्या महिना खर्च ५ हजार रुपये. लग्न झाल्यावर तूच मुलाला पोसायचे आहे तेंव्हा कमीत कमी १५ हजाराची नोकरी मिळवणे आवश्यक आहे.
मुलालापण बोलावून समजावले कि तू काहीच करणार नसशील तर मुलीचे तुझ्याशी लग्न कसे आणि का करून द्यायचे?
मुलाचे वडील नाहीत आईच्या निवृत्तिवेतनावर जेमतेम चालू आहे.
मुलगा दोन वर्षांपासून काहीच करत नाही. पॉकेट मनी मधून फक्त मुलीला फोन करतो.
बाप कराटेचा ब्लॅक बेल्ट असूनही सज्जन पणे वागला/ वागतो आहे. माझ्याशी मन मोकळे करु शकतो म्हणून बोलणे होते. परधर्मिय असल्याबद्दल हि त्याचा आक्षेप नाही पण मुलगा अगदीच टिनपाट आहे. मुलाच्या नादाला लागून मुलीच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख खाली येत चालला आहे.निदान मुलीचे दोन वेळेस व्यवस्थित पोट भरेल एवढा तरी पैसे मिळवावा अशी अपेक्षा ठेवणे चूक आहे का?
तिचे आयुष्य तीला पाहिजे तसे जगावे इथपर्यंत ठीक आहे
उघड्या डोळ्याने प्राण जात नाही त्यामुळे काळीज तुटतं अशी बापाची अवस्था. मुलीचे डोळे कधीतरी उघडतील या आशेवर आहे.

ह्यावर मुलगा टिनपाट आहे हे कसे ठरवले अशा प्रतिक्रियांची वाट बघत आहे.. ;)

उपयोजक's picture

4 Aug 2017 - 8:31 am | उपयोजक

स्पष्ट लिहिलं तरी सिध्द करुन द्यावं लागतंय.

त वरुन ताकभात काहीजणांना अोळखता येत नाही कि ते मुद्दाम करतात ते काही समजत नाही.

हतोळकरांचा प्रसाद's picture

4 Aug 2017 - 10:51 am | हतोळकरांचा प्रसाद

विरोधासाठी विरोध होतो बऱ्याच वेळेस. क्ष=३ तर क्ष चा वर्ग ९ सिद्ध करा म्हणून सांगितलं कि आधी क्ष=३ कसे काय सिद्ध करा असे विचारण्याला काही अर्थ असतो का? क्ष चा वर्ग ९ आहे किंवा नाही यावर मते मांडावीत!

arunjoshi123's picture

4 Aug 2017 - 10:54 am | arunjoshi123

काय तरी अपेक्षांचा दर्जा राव!!!
अहो, "सज्ञान मुलीला समजावलंच कसं म्हणून एकेकाच्या मुस्काडीत ठेऊन दिली असती" अशी काहीतरी उच्च दर्जाची अपेक्षा करा ना.*
===============================
तारूण्यसुलभ शेण खाल्ल्यानंतर समाजाकडून रित मोडली म्हणून शारिरीक शिक्षा होणे हा गुन्हा असून मात्र असा गुन्हा करू इच्छिणारांस शारिरिक दंड करणे मात्र गुन्हा नाही इ इ तर्करत्नांचा आनंद घ्या.

अकिलिज's picture

4 Aug 2017 - 3:23 pm | अकिलिज

धागाकर्ता म्हणतोय, एकदा तिच्या नवऱ्या बरोबर नाश्ता करताना हॉटेल मध्ये भेटली... अक्षरशः रडली, वडील अाणि भाऊ बोलत नाहीत घरात येऊ देत नाहीत...मला मध्यस्ती कर म्हणून सांगत होती... विचारलं तिलाच शिव्या देताना थोडा का विचार केला नाहीस..??? तो पोरगा काहीच बोलला नाही.. बडवलेला म्हणून!

यात ती मुलाबद्दल काहीच तक्रार करताना दिसत नाहीये. आता धागाकर्त्याला आधीपासूनच मुलाची बाजू ठेचायचीय तर मुलगा टिनपाट आहे म्हणून जाहीर करणं आलंच.

खरेंच्या स्टोरीतही मुलीला मुलाबद्दल काही वावगं वाटत नाहीये. पालक लोकांनाच अपेक्षाभंग होण्याची काळजी लागलेली दिसतेय.

सुबोध खरे's picture

4 Aug 2017 - 9:28 pm | सुबोध खरे

पालक लोकांनाच अपेक्षाभंग होण्याची काळजी लागलेली दिसतेय.
उघड्या डोळ्याने प्राण जात नाही त्यामुळे काळीज तुटतं अशी बापाची अवस्था
मुलीचे दोन वेळेस पोट भरू शकेल एवढे तरी त्या मुलाने कमवावे हि अपेक्षा पण चूक आहे?
म्हणजे मुलाला शाळेत घातलं तर त्याने किमान पास व्हावे (९० टक्के नाही) इतकीही अपेक्षा पालकांची असू नये?
बढिया है!!!!!!!!!!!!!

अभिजित - १'s picture

4 Aug 2017 - 9:57 pm | अभिजित - १

स्वतः ची बहीण असल्या टिनपाट पोरा बरोबर फिरू लागली तरी हे लोक अशीच उच्च विचारसरणी बाळगतील का ? रिक्षा चालवत असला तरी काय झाले , मेहनती आहे. इ इ ..
मजुरी करत असला तरी काय झाले ? हुशार आहे तो .. इ इ ..

+१००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००० टक्के सहमत.
उगाच आम्ही कसे विद्वान आणि वेगळ्या दृष्टीकोणातुन विचार करू शकतो हे दाखविण्याच्या प्रयत्नात काही अतिअशहाणे आय.डी. अश्या प्रतिक्रिया देताना दिसतात. याना आपल्या मुली किंवा बहीणी यांच्यावर हा प्रसंगा आल्यावर हेच विचार सुचतील का हा प्रश्न पडलाय.
शिवाय मोराल पोलिसिंगच्या नावाने गळे काढणार्‍या आय,डी. ना एकच विचारायचे आहे. उद्या दुबई किंवा ईतर अरेबियन देशातून चांगल्या पॅकेजच्या नोकरीची ऑफर आली तर केवळ तिथे मोराल पोलिसींग चालते म्हणून हे महाभाग नोकरी नाकारणार आहेत कि बॅगा भरायला पळणार आहेत?

स्वतः ची बहीण असल्या टिनपाट पोरा बरोबर फिरू लागली

बहीण फिरायला जाणे फार मोठि गोष्ट झाली. ती कचरा जमा करून जाणारी बाई असते तिला सोफ्यावर बसू दे आणि डायनिंग टेबलवर काही स्पून फोर्कने खाऊ दे म्हणावं. किंवा हापिसात सेक्यूरीटि गार्डला एक स्मित द्या आणि इतरांना जसे हाय मंता तसे त्यांना पण रोज हाय म्हणा, एवढं केलं तरी पावलो.

ईथे बरेच काउन्सलिंग एक्स्पर्ट आहेत डॉक. त्यांची अपाँईटमेंट घ्या आणि आणा त्यांच्याकडे. बघुया काय उजेड पाडतात. ;-)
नाहीच जमले तरी चिंता नाही, पाडगावकरांची कविता वडीलाना वाचायला देवु. त्यांची चुक त्याना लगेच कळेल.
ते ही सहन होत नसेल तर वडीलांना मुलीच्या मुलीच्या भानगडीत पडू नये म्हणून सांगा. त्यांना काय अधिकार मुलीने काय करायचे हे ठरवायचा. शिवाय मुलगा वाईटच हे ठरविणे एकांगी नाही का? कशावरून तो उद्या पंतप्रधान होणार नाही? मोदी चहावाले असताना झालेच ना?
शिवाय मुलीच्या आयुष्याचे नुकसान होत असेल तर होउ देत, तीला नवीन जिवनानुभव मिळतील. भले तीचे धिंडवडे निघु देत पण त्याला जिवनानुभव म्हणायचे बर का. न जाणो या अनुभवावरुन ती उद्या पुस्तक लिहील आणि त्याला बुकर पारितोषिक मिळेल.
आपण आशा करत रहायची.

अरे व्वा, काय सुंदर समरी केली आहे उदारमतवादी विचारांची. तुम्हाला जबर्‍या कौशल्य आहे हो, (आम्ही दुर्बोध, रटाळ, कंटाळवाणे, इ इ होऊन जातो याच गोष्टी मांडताना.)
=========================
पण एक वाक्य राहिलं. "रामाच्या मंदिरात संडास का नाही करायची? राम त्याच्या काळात संडास करत नव्हता का? संडास करणं अपवित्र कसं? ती एक मूलभूत अंतःप्रेरित शारीरिक प्रक्रीया आहे. " हे मांडायचं विसरलात.

शब्दबम्बाळ's picture

4 Aug 2017 - 11:17 am | शब्दबम्बाळ

संडास उघड्यावर करणे योग्य नाही म्हणून! आणि त्यामुळे आजार देखील पसरू शकतात!
रामाच्या मंदिराच्या जवळ देखील त्यासाठी शौचालय असत बर का!! कारण ती नैसर्गिक क्रिया आहे. भक्तांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जाते...

अहो गावांमध्ये कोणी आता उघडयावर देखील बसू नये म्हणून सरकार लोकशिक्षण करतंय! हागणदारीमुक्त गाव करायला... पण काही लोक असतातच तरीही आडमुठ... ते सगळीकडेच असतात म्हणा!
तिथे पण इथे पण!

दुर्गविहारिंनी असं उपरोधानं लिहायचं असं मला अभिप्रेत होतं. तुम्ही वास्तविकच लिहून टाकलंत. एकच पडतं म्हणा.

शब्दबम्बाळ's picture

4 Aug 2017 - 11:13 am | शब्दबम्बाळ

जिथे तिथे पाडगावकर आणि इतरांना आणण्यापेक्षा वरती मी तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे देता का? फार अवघड वाटत असेल तर राहू द्यात, काही जबरदस्ती नाहीये... पण बघा शक्य झालं तर!
तुमचे गडावर वागण्यासाठीचे "२१ अपेक्षित" वगैरे काही असेल तर तेही तिथे प्रसिद्ध करू शकाल!

फालतु प्रतिसादाना मी फाट्यावर मारणार हे मी आधीच सांगितले आहे. तेव्हा जे मुध्दे मला पटत नाहीत त्यावर मुळ धाग्याचा विषय सोडून किती चर्चा करायची याला काही मर्यादा आहेत म्हणून थांबलोय. योग्य धाग्यात मी उत्तरे देईनच.
बाकी मी काहीही लिहीले तरी त्याला तुम्ही फाटे फोडणारच हे दिसतच आहे. पण चिंता नको, धागा तुम्ही काढा तिथे उत्तरे देतो.
यानंतर तुम्हाला हवे ते समजायला तुम्ही रिकामे आहात.

शब्दबम्बाळ's picture

4 Aug 2017 - 3:01 pm | शब्दबम्बाळ

बरोबर! तुमचा वरचा प्रतिसाद अगदी विषयाला धरून आणि अत्यंत माहितीपूर्ण आहे नाही का?! :)
बुकर पारितोषिक वगैरे! फालतू फाटे कोण फोडतोय ते तरी बघायचं होत ते लिहिताना!
असो मला पटत नाही ते फालतू/कचरा इतकाच तुमचा विचार दिसतोय... चालायचं...

"चर्चा" करायचीच असेल तर वेगळ्या धाग्याची काही गरज नाहीये, जर करायचाच असेल तर तुमच्या प्रतिसाद खाली जे लिहिलंय तिथे प्रतिवाद करा नाहीतर सोडून द्या! योग्य वेळ योग्य धागा वगैरे कशाला पाहिजे!
चालू दे तुमची "विषयाला धरून" चर्चा!

प्रतिसाद देण्यापुर्वी जरा विचार करीत जा. एकूणच या धाग्यावर मुदा काय आहे हे न समजुन घेताच प्रतिसाद द्यायची स्पर्धाच लागली आहे.
वरच्या प्रतिसादाबध्दल म्हणाल तर त्यासाठी धागा पुन्हा एकदा वाचुन पहा म्हणजे ज्या महाभागानी ज्या मुलीनी केवळ चुकीचे निर्णय घेतल्यामुळे वाइट जीवन जगावे लागते त्यांना "गोडबोल्या पोरांच्या नादी लागून दु:ख मिळाले तर मिळू द्यावे. तो त्यांचा जीवनानुभव आहे. " ह्या छापाच्या प्रतिक्रिया दिल्यात त्यांना मारलेला तो टोला आहे. इथे धाग्याचा मुळ विषय सोडून मी कशी काय प्रतिक्रीया दिली.
तुमचा दुसरा मुध्दा, गडाची पवित्रता वगैरे. मि.पा.वर जेव्हा आपण एका धाग्यावर प्रतिसाद देत असतो तेव्हा शक्यतो ते धाग्याशी संबधीत असावेत असा संकेत आहे. यामुळेच तुमच्या शंकाना उत्तरे देण्यासाठी दुसरा धागा काढा असे मी सांगतोय. यामुळे विषयाशी संबधी नसलेली चर्चा या धाग्यावर होणार नाही आणि गडकोटाच्या काढलेल्या धाग्यावर ईतर ईंटरेस्ट असलेले आय.डी. चर्चा करु शकतील ईतकाच माझा उद्देश आहे.
अंवातर चर्चा खुप झालेली आहे , त्यामुळे मी याप्रकारच्या प्रतिसादावर निदान या धाग्यावर तरी उपप्रतिसाद देणार नाही.

मराठी कथालेखक's picture

4 Aug 2017 - 9:15 pm | मराठी कथालेखक

मुलगा टिनपाट आहे हे मान्यच.. पण तरी मुलीला तोच मुलगा का आवडतो याचा एकदा विचार व्हायला हवा ? निदान कुतुहल म्हणून तरी...
शारिरिक आकर्षण म्हणाल तर तो जगातला सर्वात देखणा तरूण आहे असं तर नक्कीच नसेल ?
मग नेमकं काय ? काहीतरी कारण असेलच ना ? जर ते कारण शोधून त्यातला फोलपणा मुलीला दाखवता आला तर कदाचित प्रश्न सुटू शकेल...

विटेकर's picture

4 Aug 2017 - 9:28 am | विटेकर

याला फार मोठया प्रमाणात चित्रपट, नाट्य , दूरदर्शन जबाबदार आहे !
कलेच्या नावाखाली केवळ विकारांचे उदात्तीकरण केले जात आहे , लोक अभिरूचीहीन पण वासना चेतवणाऱ्या किळसवाण्या मनोरंजनाला चटावलेले आहेत.

पुढीची १००० वर्षे पुरी पडतील इतके चित्रपट निर्माण झालेत गेल्या १०० वर्षात ! आता तातडीने आणि चळवळ करून हा उद्योग बंद पडला पाहिजे , अतोनात नुकसान केले आहे या लोकांनी समाजाचे !

एका जर्मन कलीगबरोबर प्रवासात असताना तेलगु चित्रपट पाहण्याचा प्रसंग आला, तसा नाईलाज होता .. त्याची कॉमेंट फार बोलकी होती, तो म्हणाला, Suhas , this is not just vulgar but worst than porn ! आणि हा सिनेमा, मंडळी सहकुटुंब मिटक्या मारत पहात होती ! कसली डोंबळाची महान भारतीय संस्कृती सांगणार त्याला?

आणखी एक प्रसंग परवा हाफ़ीसात घडलेला! माझ्या नवऱ्याची बायको नावाची मराठी मालिका सध्या जोरात आहे ... त्या संदर्भातील चर्चा ! मुली पण या चर्चेत सामील !
एक लग्न झालेला तरुण म्हणाला ... "च्यायला त्या गुरुनाथ ची मजा आहे, शिकायला पाहिजे त्याच्याकडून , बायको आणि भानगड मस्त म्यानेज करतोय !'

सगळी मंडळी फिदीफिदी हसली, त्यात मुलीपण सामील !
त्या हरामखोर गुरुनाथला वास्तविक जोड्याने मारला पाहिजे ! घरात बायको असताना बाहेर शेण खातोय !

ही समाजाची मानसिकता असेल तर यातून सुदृढ सक्षम समाज कसा निर्माण होईल?

चित्रपट उद्योग बंद करता येत नसेल तर त्यांना CSR लागू करा. प्रत्येक बाजारू चित्रपटामागे एक संस्कारक्षम चित्रपट निर्माण करणे कायद्याने बंधनकारक करा.

विकार ग्रस्त ययाती कसा लयाला गेला ह ेपण दाखवा !

अस्म कसं ? अस कसं? ह्यातून त्याना जिवनानुभव मिळत नाही का? आणि सिरीयल आणि चित्रपट अनेकांना रोजगार देतात, त्यांचा पोटावर तुम्ही पाय आणताय? असहिष्णुपणा झाला हा. ;-)
ह. घ्या.

रानरेडा's picture

7 Aug 2017 - 4:17 pm | रानरेडा

जर्मनी त पॉर्न बनत नाही ??
बाप रे
https://en.wikipedia.org/wiki/Pornography_in_युरोप

नवीन विषय घ्या आता चर्चेला..

सत्या सुर्वे's picture

5 Aug 2017 - 4:46 am | सत्या सुर्वे

बेदम मारून का प्रश्न सुटणार होता ?

आधी बेदम मारले वगैरे तिथेच सगळे गणित वाया गेले. तरुण मुले ती, ती प्रेम नाही करणार तर आणखीन कुणी ?

उलट आई वडील आणि मुलांचे संबंध ठीक होते तर व्यवस्थित बोलून वगैरे मामला रफा दफा केला जाऊ शकता. मूर्ख आईवडील मुलीकडून साऱ्या चांगलंय मित्रांना राख्या बांधवून घेता आणि नंतर पोर गुंडा बरोबर पळून गेली म्हणून छाती बडवतात.

आजुबाजुच्या पाच {वाजतगाजत झालेल्या } गेल्या वर्षभरातील लग्न झालेल्या मुली घर सोडून परत माहेरी गेल्या आहेत. काहींची धुसफूस चालू आहे.
नवरा दारू पिऊन मारतो हे कारण कोणत्याही प्रकरणात नसून "हवी तशी मजा करायला {इथे} मिळत नाही" हे आहे. चार प्रेमविवाह आहेत.

थोडक्यात ज्यांचे संसार हसतखेळत चालू आहेत ती जोडपी नशिबवान आहेत.

गपचिप संसार कर हे अशा प्रकरणात सांगणारे आपण कोण?
लोकल ट्रेनच्या एका टोकाला मोटरमन आणि दुसय्रा टोकाला गार्ड असतो पण एकाला टोकाला मोटरमन अन दुसरीकडे मोटरवुमन आहेत!

babubobade's picture

6 Aug 2017 - 2:49 pm | babubobade

छान

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Aug 2017 - 5:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व प्रतिसाद वाचले आता शेवटी सारांश सांगून धाग्याला निरोप द्यावा असे वाटते.
बाकी, काही प्रतिसाद नेहमीप्रमाणेच भन्नाट होते. शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

विश्वजीत कदम's picture

10 Aug 2017 - 4:07 pm | विश्वजीत कदम

माझ्या ओळखीच्या ऑफीसमधील एक मुलगी त्र ३-४ जणाबरोब्र फिरुन आता एका ब्रोब्र प्रेमात आहे आणि हिच मुलगी ऑफीसमधील इत्र मुलीच्या चारित्र्याबद्द्ल वाईट बोलायची. ख्रत्र एकही मुलगी वाईट नव्हती हि आणि हिचि सख्खी मैत्रिण सोडुन.

arunjoshi123's picture

12 Aug 2017 - 12:31 pm | arunjoshi123

http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-newdelhi/cops-analys...
काश अपर्णाताई की सलाह ये लोग लेते.

चौथा कोनाडा's picture

15 Jun 2020 - 11:02 am | चौथा कोनाडा


बरं हे असे लबाड लांडगेच या मुलींना आवडतात. त्यांचं स्टायलिश वागणं,कपडे,गाडी हेही जोडीला असतं.


बरोबर आहे, असल्या स्वभाववैशिष्ट्याला खरं म्हणजे आचरटपणाला काय म्हणणार ?
दुसर्‍या मुलीची कहाणी दु;खद आहे, मी देखिल असे युगुल क्लेशात जगताना पाहिले आहे !

लेख आवडला !