BS ४ वाहने आणि त्यांचा सतत पेटलेला दिवा

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in तंत्रजगत
29 Jul 2017 - 12:09 pm

१ एप्रिल पासून ज्या नव्या BS ४ दुचाक्या बाजारात आल्या आहेत त्यांना पुढचा दिवा चालू/बंद करण्याचे बटनच नाही. त्यामुळे गाडी चालू केली की दिवसा पण दिवा सतत चालू राहतो. या BS ४ निकषामागचे कारण समजेल का?

मला ही उर्जेची उधळपट्टी वाटते. भर उन्हाळ्यात अशा हजारो वाहनांचे दिवे दिवसा चालू असताना तापमान् वाढही होणार नाही का? जाणकारांनी खुलासा करावा.

मूलभूत वाहन नियमांनुसार दिवसा दिवा लावणे याचा अर्थ " मला खूप घाई आहे, तेव्हा पुढे जाउ द्या" असा असतो.
निदान मोटारींना तरी असे काही केले नसावे ही अपेक्षा.

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

29 Jul 2017 - 12:26 pm | मार्मिक गोडसे

कदाचीत पायलट दिवा चालू होत असावा. सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्यच आहे. मी नेहमीच वापरतो.

महिनोंनमहिने साईड इंडीकेटर चालूच असलेले अन अ‍ॅक्सीलेटर पिळणे म्हणजे ड्रायव्हिंग अशा समजुतीच्या पब्लिकला अप्पर डिप्पर म्हणजे काय, कसा, कशासाठी वापरायचा असतो त्यांना काहीही फरक पडणार नाही.
दिव्याच्या तापमानाबद्दल बोलायचे असेल तर इंजिनच्या टेम्परेचरने जास्त फरक पडतो वातावरणावर. सो....
शक्य तितके कमी अन अगदी आवश्यक तेवढेच पेट्रोल डिझल अन सीसी जाळावे, कौतुकाचा भाग सोडून एसयुव्ही, हेवी क्रुझर अन सुपरबाईका शक्यतो सिटीरायडिंगला टाळाव्या ही नम्र अपेक्षा.

अभिजीत अवलिया's picture

29 Jul 2017 - 12:36 pm | अभिजीत अवलिया

१ एप्रिल पासून नाही केलेले हे. मी फेब्रुवारी २०१७ मध्ये यामाहा फॅसिनो घेतली जिला हेडलाईट नेहमी चालू राहते. हा नियम केंद्र सरकारने BS -४ वाहनांसाठी केला आहे जो खूप उपयुक्त आहे. ह्याचा फायदा विशेषकरून उत्तर भारतात जास्त होईल जिथे हिवाळ्यात प्रचंड धुके, खूप लवकर अंधार पडणे असे प्रकार होतात आणि दृश्यमानता खूप कमी होते. हेडलाईट चालू ठेवल्याने रस्त्यावरच्या लोकांना गाडी येत आहे हे लवकर समजू शकते.

सर्वांचे आभार. पण, उन्हाळ्यात हे अनावश्यक वाटत नाही का? आपल्याकडे उन्हाळाच जास्त काळ असतो.

अभिजीत अवलिया's picture

29 Jul 2017 - 1:00 pm | अभिजीत अवलिया

उन्हाळा आहे का हिवाळा हे पाहून हेडलाईट आपोआप चालू होईल का बंद हे ठरवणारे तंत्रज्ञान अजून विकसित झालेले नाही ना. त्यामुळे सद्य स्थितीत नेहमी हेडलाईट चालू ठेवणे हाच पर्याय आहे.

एका अरुंद गल्लीत सतत हेडलाईट चालू असलेली बाईक समोरून येत असेल तर भयंकर त्रास होतो, विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात. हा एक अपघाताला निमंत्रण देणारा नियम आहे. त्यातही बऱ्याच भारी गाड्यांना झेनॉनचे हेडलाईट्स असतात. या नियमांच्या मागची भूमिका काय आहे ते समजायला मार्ग नाही. या त्रासात अधिक भर म्हणजे मोटारसायकलना काही लोक सात उघडझाप करणारे, तीव्र प्रकाश फेकणारे एलइडी दिवे लावतात. अंधाऱ्या रस्त्यावरून जाताना असा मोटारसायकलवाला आपल्या समोर असणे म्हणजे निव्वळ छळ असतो.

कुमार१'s picture

29 Jul 2017 - 1:10 pm | कुमार१

सर टोबी, सहमत.
बी एस ४ मोटारीचा कोणाचा अनुभव ? दिव्याचे बटण पाहिजेच असे मला वाटते.

माझ्याकडे बजाज डॉमिनार ४०० हि BS ४ मोटार सायकल आहे. त्याचा हेडलाईट एल इ डी चा असून तो फक्त ८ वॉट चा आहे. एल इ डी चे प्रकाश /ऊर्जा गुणोत्तर हे ५०% असल्याने त्याच्यातून उत्सर्जित होणारी उष्णता केवळ ४ वॉट इतकी कमी आहे. त्यामुळे त्याच्या हेडलाईटला हात लावला तरी तो उन्हाळ्यातही थंडच असतो. त्यांच्यामुळे तापमानात होणारी वाढ हि नगण्य आहे.
त्याचा दिवा मागे असणाऱ्या परावर्तकामुळे अतिशय प्रखर आहे आणि रात्री ट्यूबलाईट लावल्यासारखा प्रकाश पडतो. आणि त्याचा वरचा दिवा चालू असेल तर समोरच्याला फार त्रास होतो हि वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्याचा मी नेहेमी डिपर ऑन ठेवतो.
दुर्दैवाने त्याचा हेडलाईट बंद करण्याची सोयच नाही त्यामुळे येणार जाणारा आस्थेने दिवा चालू आहे (आणि बंद करा) म्हणून सांगत असतो (त्याचा फार उच्छाद होतो) पण तुम्ही काहीच करु शकत नाही.
एक गोष्ट नक्की पावसातही एक दीड किमी वरून या मोटार सायकलच दिवा स्पष्ट दिसतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने हे नक्कीच चांगले आहे.

पैलवान's picture

29 Jul 2017 - 2:44 pm | पैलवान

ही गाडी?

Dominar

सुबोध सर मला एक राऊंड द्याल का?

आरटिओचा नियम काय आहे? मला वाटतं १) रात्री मागचा लाल दिवा हवाच हा आहे. सायकललासुद्धा हवाच. २) सर्व वाहने BS4च असली पाहिजेत ?

पुढच्या दिव्याचा काहीच अत्यावश्यक नियम नसला तर सरळ वायर कापून हँड स्विच लावून टाकले तर कोण अडवणार

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

29 Jul 2017 - 4:03 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

नवीन निसमावलीत जर असे असेल तर हा मुर्खपणाचाच नियम आहे असे वाटते. कितीही कमी पाॅॅॅवर कन्सम्पशन व कमी उष्णता उत्सर्जीत होत असलु तरी हजारो - लाखो गाड्यांची मिळुन दखल घेण्याजोगी नासाडी आहेच ना? बरे याने सुरक्षितता कशी वाढते हा प्रश्नच आहे. धुक्यात, पावसात जवळ जवळ सर्वच चालक दिवा चालु करतातच किंवा तसा नियम करा हवा तर. सर्वोच्च्य न्यायालयाने चारचाकि गाड्यांच्या खिडक्यांना असणार्‍या फिल्म बद्दल एक तुघलकी निर्णय दिला आहे, त्याच धर्तीचा हा सुध्धा नियम दिसतोय.

अभ्या..'s picture

29 Jul 2017 - 8:42 pm | अभ्या..

खरं तर ह्यापेक्षा बुलेट, पल्सर किंवा सीबीजी ला असतात तसे कॅटस आय (मेन हेड्लॅम्प वर दोन छोटे दिवे) बसवायची सक्ती करावी. झेनॉन आणि ब्लिकिंग लाईट बसवण्यावरच बंदी घातली पाहिजे.

कुमार१'s picture

29 Jul 2017 - 4:17 pm | कुमार१

योगेश + 1000

दशानन's picture

29 Jul 2017 - 7:45 pm | दशानन

As a part of improving the road safety Supreme court had passed an order to the effect that all Two wheeler’s manufactured and sold from April 2017 on wards should have the feature of “ Always Headlight On”… that means when the vehicle is running the head lights will remain on…

गामा पैलवान's picture

29 Jul 2017 - 9:24 pm | गामा पैलवान

इतर देशांतली परिस्थिती : https://www.reddit.com/r/todayilearned/comments/20wc12/til_that_in_swede...

अधिक माहितीसाठी : https://en.wikipedia.org/wiki/Daytime_running_lamp

-गा.पै.

सुबोध खरे's picture

29 Jul 2017 - 9:32 pm | सुबोध खरे

धन्यवाद
DRL fuel consumption can be reduced to insignificant levels by the use of 8 to 20 W DRL systems based on LEDs or high-efficacy filament bulbs.
माझ्या मोटार सायकल चा ८ वॉट एल इ डी दिव्याने तापमानात आणि इंधन खर्चात "नगण्य" वाढ होते हे वाचून छान वाटले.

कंजूस's picture

31 Jul 2017 - 9:57 am | कंजूस

दशानन !

एकदा कुणीतरी सर्व नियमांचे रिव्ह्यु कराच!

स्थितप्रज्ञ's picture

1 Aug 2017 - 7:47 am | स्थितप्रज्ञ

पाश्चात्य देशांत काही फॅड आले कि लगेच ते आपल्याकडे कॉपी होते. हा निर्णय युरो निकाशांवरून inspired आहे. बहुतेक युरो देश हे अति उत्तरेकडे वसलेले आहेत जिथे सूर्यदर्शन होणे म्हणजे पर्वणीच असते. सतत visibility कमी असलेल्या या प्रांतांत AOL सारखा नियम लागू करणे समजण्याजोगे आहे. आपला भारत देश equator च्या जवळ असल्यामुळे इथे बहुतेक ठिकाणी आणि अगदी रोज व्यवस्थित सूर्यदर्शन होते. फक्त थंडीतले काही महिने ते हि उत्तरेत धुक्यामुळे visibility कमी असते. या ठराविक ठिकाणी ठराविक २ महिन्यांचा काळ सेफ जावा आणि accidents टळावेत म्हणून हा सरसकट घेतलेला निर्णय होय. अर्थात, आपल्याकडे चालकांनी visibility कमी असताना हेडलाईट चालू ठेवण्याचा सुज्ञपणा दाखवला असता तर असा कॉमन सेन्सने वागण्याचा पैलू "नियम" लागू करण्याची वेळच आली नसती. असो!
पण हे मात्र मान्य करायलाच हवे की या नियमामुळे अपायांपेक्षा safety वाढल्याचा होणारा उपायच जास्त आहे.

त.टी.: असे ऐकून आहे कि फक्त २०० सी सी पुढील दुचाक्यांकरिताच हि सक्ती आहे.

असे ऐकून आहे कि फक्त २०० सी सी पुढील दुचाक्यांकरिताच हि सक्ती आहे.

नाही, माझ्या पाहण्यात 125cc च्या tvs मोपेडला देखील हा नियम असलेला दिसत आहे.

स्थितप्रज्ञ's picture

11 Aug 2017 - 10:51 am | स्थितप्रज्ञ

कालच TVS वेगो या स्कूटर गाडीला असा दिवा पहिला....

कुमार१'s picture

1 Aug 2017 - 12:38 pm | कुमार१

माझ्या पाहण्यात 125cc च्या tvs मोपेडला देखील हा नियम असलेला दिसत आहे. >>> बरोबर.
हा धागा लिहिण्यास मी का उद्युक्त झालो त्याची गंमत सांगतो.
आधी हे BS4 येण्यापूर्वीची परिस्थिती सांगतो. आपण जर सकाळच्या वेळेस रस्त्यावर चालत असलो की नेहमीच आपल्याला दिवा चालू असणाऱ्या काही दुचाक्या दिसतात. अशा लोकांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त असते. आदल्या रात्री जेव्हा ते वाहन बंद करतात तेव्हा दिव्याचे बटन काळजीपूर्वक बंद करायला ते विसरतात. ही तारुण्याची बेफिकिरी असते. अशा सर्वांना आपला हात दिव्याच्या आकारात हलवून जाणीव करून द्यायची ही माझी गेल्या तीस वर्षांची सवय आहे.

गेल्या ६-८ महिन्यांत मला सकाळी चक्क ११-१२ पर्यंत अशा ‘दिवेचालू’ गाड्या अचानक खूप मोठ्या प्रमाणात दिसू लागल्या होत्या. त्यामुळे माझे हात दाखवण्याचे काम कैक पटीने वाढले. नंतर तर मी रोज किती वेळा आपण हात दाखवले याची गणती करू लागलो! सुरवातीस मला वाटले की दिवसेंदिवस तरुणांची बेफिकीरी वाढत चाललीय. पण जेव्हा अशा गाड्यांवर मला मध्यमवयीन लोक दिसू लागले तेव्हा मात्र अचंबा वाटू लागला.

एकदा मित्राशी गप्पा मारताना मी हा विषय काढला. मी ‘बेफिकीरी’ वगैरे बोलू लागणार तोच तो हसला आणि त्याने मला ही “BS4” कहाणी सांगितली.
..... असो, तर आता हा “सर्वोच्च” आदेश असल्याने आपण टीका करणे बरे नव्हे. तरीसुद्धा माझ्यापुढे अजून १० वर्षांनंतरचे चित्र तरळून जात आहे, ते असे. एप्रिल महिन्यात आपण नागपूर किंवा तत्सम गरम ठिकाणी आहोत. तापमान आहे ४८ अंश से. आणि त्यात रस्त्यावर हजारो BS4 गाड्या भर दुपारी १ वाजता ‘दीपावली’ साजरी करीत आहेत !!

रावणराज's picture

1 Aug 2017 - 2:28 pm | रावणराज

+१

मार्मिक गोडसे's picture

3 Aug 2017 - 11:59 am | मार्मिक गोडसे

माझ्या मोटार सायकल चा ८ वॉट एल इ डी दिव्याने तापमानात आणि इंधन खर्चात "नगण्य" वाढ होते हे वाचून छान वाटले.

इंधन खर्चात नगण्य वाढ कशी होते हे कळलं नाही. मोटार सायकल स्टार्ट केल्यावर इंजिनच्या गतीने सतत वीजनिर्मिती होत असते. वीजवापर नसल्यास ही वीज रेक्टीफायर रेग्युलेटरने ग्राउंड केली जाते तेव्हा तेथे थोडीफार उष्णता निर्माण होते. ही वाया जाणारी वीज वापरल्याने इंजिनवर अतिरिक्त ताण येण्याचे काही कारण नाही.

सुबोध खरे's picture

9 Aug 2017 - 8:49 pm | सुबोध खरे

पेट्रोलची कॅलॉरी किंमत ८.७६० KWH/L किंवा एक लिटरला ८७६० वॉट तास इतकी आहे.यात विजेमध्ये रूपांतर करण्यासाठी ५०% ऊर्जा फुकट गेली धरले तरी म्हणजे ८ वॉटचा दिवा ५०० तास लावला तर १ लिटर पेट्रोल जळेल. मोटार सायकल ३० किमी ताशी वेगाने चालवली तर ५०० तासात १५००० किमी चालेल एवढ्या काळात दिव्यासाठी एक लिटर पेट्रोल जळेल. १५००० किमी ला एक लिटर पेट्रोल म्हणजे नगण्यच आहे.
हिशेब करून पहा.

मार्मिक गोडसे's picture

10 Aug 2017 - 7:19 pm | मार्मिक गोडसे

यात विजेमध्ये रूपांतर करण्यासाठी ५०% ऊर्जा फुकट गेली धरले तरी
मोटार सायकलचे alernator इंजिनच्या गतीने वीज निर्माण करतो . इंजिनच्या rpm प्रमाणे वीज निर्मिती कमी /जास्त होत असते. त्यामुळे इंजिनाची गती कमी असताना headlight कमी प्रकाश देतो , इंजिनची गती वाढल्यास जास्त प्रकाश देतो. म्हणजे headlight चा दिवा इंजिनची गती वाढवत नाही,त्यामुळे अधिक इंधनही वापरले जात नाही, उलट मोटार सायकलचा दिवा चालू ठेवल्याने वाया जाणारी वीज वापरली जाते.

सुबोध खरे's picture

10 Aug 2017 - 7:43 pm | सुबोध खरे

कोणत्याही ऊर्जेचे दुसऱ्या ऊर्जेत रूपांतरण होताना निर्माण होणाऱ्या उष्णतेच्या मार्गे ऊर्जा फुकट जाते. पेट्रोल जाळतो तेंव्हा इंजिन गरम होते आणि ती उष्णता फुकट जाते म्हणून conversion efficiency ५० % च धरली आहे.

मार्मिक गोडसे's picture

10 Aug 2017 - 7:59 pm | मार्मिक गोडसे

मान्य आहे, परंतू मोटार सायकलाचा एक दिवा चालू ठेवला काय किंवा न ठेवला काय ती ऊर्जा तेवढीच वाया जाणार.

चष्मेबद्दूर's picture

9 Aug 2017 - 8:29 pm | चष्मेबद्दूर

समोरून येणार्या सर्व दुचाक्यांचे दिवे सरळ आपल्या डोळ्यात जातात. चालक लोकं आपला दिवा upper आहे dipper याचा विचार करत नाहीत।.
म्हणजे वरची चर्चा वाचेपर्यंत मला असा वाटत होतं. पण अस दिसतंय कि वाहन बनवताना त्यात काही त्रुटी राहिल्या किंवा ठेवल्या असाव्यात.

ट्रेड मार्क's picture

10 Aug 2017 - 7:57 pm | ट्रेड मार्क

पाश्चात्य देशांमध्ये सर्व गाड्यांना DRL असणे सक्तीचे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दिवे चालू असलेली गाडी लांबूनही दिसते तसेच समोरच्याचे लक्ष नसेल तरी दिव्यामुळे लक्ष वेधले जाते.

पण DRL हे हेडलाईट्स नसतात. हेडलाईट्स पेक्षा कमी पॉवर असलेले पण दिवसाही दिसतील असे असतात. याचा उद्देश समोरून येणारी गाडी पटकन दिसून अपघात कमी व्हावेत हा आहे. खरं तर यात वीज/ इंधन वाया जाणे किंवा तापमान वाढणे याचा काही संबंध नाही. जीव वाचवणे महत्वाचे.

तसेही भारतात रात्री सुद्धा हेडलाईट्स न लावता काही लोक्स गाडी चालवतात. त्यामुळे बंद दिवा बंद न करता येण्याची व्यवस्था चांगली आहे.

मार्मिक गोडसे's picture

10 Aug 2017 - 8:04 pm | मार्मिक गोडसे

खरं तर यात वीज/ इंधन वाया जाणे किंवा तापमान वाढणे याचा काही संबंध नाही.
परंतू येथे तसा संबंध का लावला जातोय हे कळत नाही

ट्रेड मार्क's picture

10 Aug 2017 - 8:30 pm | ट्रेड मार्क

संबंध नाही म्हणजे अपघातामुळे होणाऱ्या हानीपेक्षा दिव्यामुळे (होत असेल तर) होणारी तापमानवाढ किंवा अधिकचे इंधन ही किरकोळ बाब आहे.

तसं म्हणायचं झालं तर सुरक्षेच्या दृष्टीने गाडीत ज्या सुधारणा केल्या जातात त्याने गाडीचं वजन वाढतं आणि त्यामुळे इंधनाचा खप वाढतो. मग असुरक्षित वाहने वापरायची का? अपघात झाल्यावर इजा होऊ म्हणून एवढा प्रयत्न केला जातो तर अपघात होऊ नये (किंवा कमी व्हावेत) म्हणून प्रयत्न करणे आवश्यक नाही का?

वर जसे सांगितलं गेलंय की दिवा प्रखर असल्याने, अप्पर ठेवल्याने, झेनॉन लाइटमुळे डोळ्याला त्रास होतो हे सर्व बरोबरच आहे. पण मुद्दाम नेहमीच अप्पर लावून चालवणारे लोक आधीपासून आहेत. यात सामाजिक जाणिवेचा अभाव यापेक्षा दुसरे काही कारण नसावे.

समोरचा एक गाडीवाला अप्पर लावून चालवतो आणि त्याचाच मागचा पुढच्याच्या दिव्याच्या प्रकाशात दिसत असताना आपल्या गाडीचा दिवा का जाळा म्हणून दिवा बंद करून येत असतो. आधीच अप्पर मुळे आपले डोळे दिपलेले असताना मागची दिवा न लावलेली गाडी न दिसणे सहज शक्य असते.

सगळ्यात योग्य म्हणजे DRL आणि हेडलाईट वेगळे असणे. DRL बंद करायची सोय नसावी आणि अप्पर लावून काही वेळ चालवल्यावर आवाजी इंडिकेटर असावा.