बीट - चीज बॉल्स

Primary tabs

रुपी's picture
रुपी in पाककृती
13 Jul 2017 - 5:18 am

b

तेच तेच खाऊन कंटाळा येतो म्हणून नवीन पदार्थ मी शोधत असते आणि कमी मेहनत लागेल पण जास्त भाज्या, प्रथिने आहारात जातील असे फेरफार करुन बनवते. मागच्या भारतवारीत आप्पे पात्र घेतले, आणि इतकी वर्षे माझ्याकडे नव्हते म्हणून आता ते वापरण्याचा सपाटा लावलाय! म्हणून मी हे बॉल्स आप्पेपात्रात बनवलेत, तुम्ही तळून घेऊ शकता.

साहित्यः

 • १ वाटी हरभरा डाळ,
 • १ बीट सोलून, किसून,
 • १ कांदा बारीक चिरुन,
 • ८-१० पुदिन्याची पाने बारीक चिरुन (ऐच्छिक),
 • १/२ वाटी बारीक चिरलेली पालकाची पाने (ऐच्छिक),
 • २-३ हि. मिरच्या बारेक चिरुन/ पेस्ट करुन,
 • ३-४ लसूण पाकळ्या किसून,
 • अर्धा इंच आले किसून,
 • १ चमचा जीरेपूड,
 • २-३ चमचे तांदळाचे पीठ (गरज वाटल्यास),
 • १/२ टीस्पून चाट मसाला,
 • मीठ,
 • लाल तिखट (ऐच्छिक),
 • चीज क्युब्स - १ से.मी. चे तुकडे करुन,
 • तेल

कृती:
१. डाळ धुवून पाण्यात भिजत घाला. २-३ तासांनी पाणी न वापरता मिक्सरला बारीक करुन घ्या. गरज लागली तरी अगदी थोडेसेच पाणी घाला. डाळ शक्यतो जरा भरडसर वाटायची आहे.
२. एका भांड्यात वाटलेली डाळ, बारीक चिरलेला कांदा, किसलेले बीट, आले, लसूण, हि. मिरची, चाट मसाला, चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र करा. माझ्याकडे होती म्हणून पालक, पुदिन्याची पानेही घातली. बारीक चिरलेली कोथिंबीरही घालू शकता. आणखी तिखट आवडत असल्यास लाल तिखट घाला.
३. आप्पेपात्रात बनवायचे असतील आणि मिश्रण पातळ असेल तर थोडेसे तांदळाचे पीठ घाला. वड्यांसारखे तळायचे असतील तर गरज नाही. म्हणून डाळ वाटतानाच तशी काळजी घ्या. लिंबाएवढा गोळा हातावर घेऊन त्याला वाटीसारखा आकार द्या, त्यात चीजचा एक क्युब ठेवून वरुन बंद करा. सर्व मिश्रणाचे बॉल्स बनवून घ्या.
४. आप्पेपात्र गरम करण्यास ठेवा. थोडे थोडे तेल घाला. तेल गरम झाले की हे बॉल्स त्यात ठेवा. ४-५ मिनिटांनी उलटवा, २-३ मिनिटांनी दुसर्‍या बाजूने भाजले गेले की काढून घ्या. किंवा कढईत तेल गरम करुन त्यात तळून घ्या. गरम गरम खमंग बॉल्स केचपबरोबर खायला द्या.

हे बॉल्स चवीला बर्‍यापैकी फलाफलसारखे वाटले. हे बनवले आणि इतर साहित्य असले तर 'पिटा पॉकेट्स'ही बनवता येतील.
या वेळी घाई होती म्हणून मी जरा मोठ्या आकाराचे बॉल्स बनवले, त्यामुळे चीज जरा कमी वितळले. तुम्हाला वितळलेले चीज आवडत असेल तर आकार जरा लहान घेऊन बघा, किंवा किसलेले चीजही घालून चांगले लागत असावेत. बीटऐवजी किसलेले गाजरही घालता येईल, पण बीट घातल्याने छान रंग येतो.

प्रतिक्रिया

वेगळीच पाकृ आहे. आधी न ऐकलेली.
फलाफल एकदाच खूप पूर्वी खाल्ल्याने चव आता आठवत नाहीये.
आजच एका मैत्रिणीने मसाला वडे पाठवले होते त्याची चव आठवली.
बहुतेक तशी चव लागत असावी.

जुइ's picture

13 Jul 2017 - 6:39 am | जुइ

अगदी वेगळी पाकृ आहे. नक्कीच करून बघेन.

पियुशा's picture

13 Jul 2017 - 1:17 pm | पियुशा

यम्मी दिसतंय :)

यशोधरा's picture

13 Jul 2017 - 1:26 pm | यशोधरा

यम्मी!

सानझरी's picture

13 Jul 2017 - 2:10 pm | सानझरी

तोंपासु!!!!

पद्मावति's picture

13 Jul 2017 - 2:10 pm | पद्मावति

वाह!

II श्रीमंत पेशवे II's picture

13 Jul 2017 - 5:23 pm | II श्रीमंत पेशवे II

वा दिसतायत तर छान . तळले तर अजून छान लागू शकतील .पण त्या चीज च काय होईल तळल्यावर ????

पण खायचे काश्याशी , एखादी चटणी ची रेसिपी द्याकी बरोबर
या चीज बॉल्स बरोबर , तिखट+गोड अशी चटणी मजेदार ठरेल

आप्पे पत्रात गोल आकार करता येतो .....हे आजच कल्ल ....

बाकी नवीन डिश मस्तच

रुपी's picture

14 Jul 2017 - 4:50 am | रुपी

धन्यवाद :)
कमी मेहनत घेतली ना, म्हणून केचपबरोबरच दिले :) तिखटगोड चटणीबरोबर नक्कीच छान लागतील.
तळल्यावर चीज मस्त वितळेल, खाताना छान लागेल. ते मध्यभागी घातलंय त्यामुळे तळताना फुटून बाहेर वगैरे येणार नाही. फार तेलकट नको, म्हणून मी आप्पेपात्रात केले.

जेनी...'s picture

13 Jul 2017 - 5:34 pm | जेनी...

वॉव ... करुन बघेन ..

हि सानिकास्वप्निल कुठे गेलिय .. दिसली नाहि अजिबातच !

रुपी's picture

14 Jul 2017 - 4:50 am | रुपी

धन्यवाद सर्वांना :)

मंजूताई's picture

15 Jul 2017 - 4:24 pm | मंजूताई

उचलून तोंडात टाकावेसे वाटताहेत अश्या पावसाळी हवेत ...

स्वाती दिनेश's picture

16 Jul 2017 - 12:39 pm | स्वाती दिनेश

मस्त दिसत आहेत, ए फ्रा मध्ये करता येतील का बघते.
स्वाती

इशा१२३'s picture

18 Jul 2017 - 12:46 pm | इशा१२३

मस्त!