नविन हायब्रिड सायकल

Primary tabs

केदार बर्वे's picture
केदार बर्वे in तंत्रजगत
28 Jun 2017 - 4:02 pm

नविन हायब्रिड सायकल घ्यायचि आहे.

पर्याय सुचवा

जास्तित जास्त १५००० खर्च करु शकातो.

मोन्त्रा डाउन टाउन काशि आहे ?

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

28 Jun 2017 - 4:43 pm | कपिलमुनी

सायकलचा वापर किती आणी कोणत्या रस्त्यावर आहे .यावर बरेच अवलंबूक आहे

तोवर मोदकने लिहिलेला सायकलींग... (भाग १)

व माबोवर असलेली सायकलविषयी सर्व काही....१

या दोन सीरीज वाचून घ्या.
livestrong.com वर एक
उपयुक्त आर्टिकल आहे.

प्रशांत's picture

4 Jul 2017 - 9:32 am | प्रशांत

सायकलचा वापर किती आणी कोणत्या रस्त्यावर आहे .यावर बरेच अवलंबूक आहे

सायकलींगची आवड असेल तर चांगली सायकल घ्या म्हणजे अपग्रेड करायचा खर्च वाचेल, मोन्ट्रा मधे MONTRA BLUES 1.2 बघा.
२० हजार पर्यंत बजेट वाढवता आला तर खुप पर्याय मिळतील.

पंधरा हजारात हायब्रीड सायकल येईल का कुठली? मला वाटत नाही. माऊंटन बाईक येऊ शकेल.

sagarpdy's picture

3 Jul 2017 - 7:13 pm | sagarpdy

montra ची मिळते.

स्वच्छंदी_मनोज's picture

3 Jul 2017 - 7:33 pm | स्वच्छंदी_मनोज

+१

अप्पा जोगळेकर's picture

4 Jul 2017 - 5:42 pm | अप्पा जोगळेकर

१०,००० त सुद्धा मिळते.

हिरोची अ‍ॅल्युमिनियम फ्रेमची रोड बाईक येईल.

मोदक's picture

3 Jul 2017 - 7:56 pm | मोदक

हो येईल.. पण ही घेऊ नका.

माँट्रा किंवा अगदीच पर्याय नसेल तर फँटम. पण शक्यतो माँट्राच घ्या.

मोंट्राचा रिव्ह्यू टाका की कोणीतरी.

मोदक's picture

3 Jul 2017 - 11:19 pm | मोदक

प्रशांत मालक,
इरसाल कार्टे
अंजनेय
अशी मोठी मोठी मिपाकरं माँट्रा वापरतात / वापरत होती. (मी पण थोडे दिवस वापरली आहे.)

१२ ते १८ हजारच्या किंमतीमध्ये ब्येष्ट सायकल आहे, काय डिटेल्स पाहिजेत सांगा..!

नाही, माझ्यासाठी नाही. पण कुणी विचारलं तर मिपावरील ह्या धाग्याचा रेफरन्स देता येईल. इन फॅक्ट इथे सर्वच जण वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या सायकली वापरतात। प्रत्येकाने आपापल्या सायकलीची बेसिक माहिती इथे दिली तर बऱ्याच जणांना त्याचा उपयोग होईल असे वाटते.

प्रसाद_१९८२'s picture

4 Jul 2017 - 9:55 am | प्रसाद_१९८२

मी पाहिलेय ह्या हायब्रिड साईकल, मांऊटन बाईक, रोड बाईक यांना सहसा मडगार्ड लावलेले दिसत नाही.
ह्या बाईक्सना मडगार्ड न लावण्यापाठी काहि शास्त्रीय कारण आहे का ?

अप्पा जोगळेकर's picture

4 Jul 2017 - 5:44 pm | अप्पा जोगळेकर

वजन वाढते. बाकी काही नाही.

अप्पा जोगळेकर's picture

4 Jul 2017 - 5:40 pm | अप्पा जोगळेकर

तुम्ही नव्यानेच सायकल चालवायला सुरुवात केली आहे असे वाटते. एक ५ हजार वाली एक नॉन गिअर्ड सायकल घ्या आणि २ वर्ष चालवा.
दरम्यान सायकल संबंधी विविध फोरम, स्ट्रावा वरचे ग्रुप, व्हॉट्स अप ग्रुप्स जॉइण करा. अनुभव येईल, माहिती मिळेल. मग २ वर्षांनी मोठी सायकल घ्या.
आणि जर तुम्ही अनुभवी सायकल पटू आहात तर तुम्ही जाणकार आहातच. मग हा धागा निव्वळ जाहिरात करण्यासाठी काढला आहे असे म्हणावे लागेल.

सानझरी's picture

4 Jul 2017 - 6:23 pm | सानझरी

तुम्ही नव्यानेच सायकल चालवायला सुरुवात केली आहे असे वाटते. एक ५ हजार वाली एक नॉन गिअर्ड सायकल घ्या आणि २ वर्ष चालवा.
दरम्यान सायकल संबंधी विविध फोरम, स्ट्रावा वरचे ग्रुप, व्हॉट्स अप ग्रुप्स जॉइण करा. अनुभव येईल, माहिती मिळेल. मग २ वर्षांनी मोठी सायकल घ्या.

उपयुक्त सल्ला..

अरिंजय's picture

5 Jul 2017 - 10:22 am | अरिंजय

अतिशय उपयुक्त सल्ला. आधी सायकल चालवायचा सराव होऊ द्या. नॉनगिअर सायकलने स्टॅमिना व पायातली ताकद वाढते. मग महागाची गिअर्ड सायकल घेतली तरी चालते. नाही नव्याचे नऊ दिवस होऊन नंतर सायकल पडुन राहते. आधी सायकलींगची सवय लावुन घ्या.

एक ५ हजार वाली एक नॉन गिअर्ड सायकल घ्या

चांगली सायकल घ्या .
नॉन गिअर्ड सायकल ने लौकर दमता आणि कधी कधी गुडघ्यावर ताण येतो. त्यापेक्षा चांगली सायकल घ्या , विकत नाही तर रेंट ने घ्या .
पण चांगल्या प्रतीची गिअर्ड सायकल वापरा

हो. किमान मागील गिअर असणारी सायकल घ्या.

पंतश्री's picture

5 Jul 2017 - 12:56 pm | पंतश्री

अतिशय उपयुक्त धागा....

चांगली सायकल घ्या .
नॉन गिअर्ड सायकल ने लौकर दमता आणि कधी कधी गुडघ्यावर ताण येतो. त्यापेक्षा चांगली सायकल घ्या , विकत नाही तर रेंट ने घ्या .
पण चांगल्या प्रतीची गिअर्ड सायकल वापरा

पण उद्देश व्यायाम होणे आणि स्टॅमिना व पायातली ताकद वाढवणे असेल तर ५००० चि सायकलच जास्त उपयुक्त होइल ना??

कपिलमुनी's picture

9 Jul 2017 - 3:42 pm | कपिलमुनी

व्यायामासाठी MTB सायकल घ्या