नवी पा.कृ.: ब्रह्माण्डाचे ऑम्लेट

Primary tabs

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in पाककृती
7 Jun 2017 - 2:12 pm

नका डोळयांसी वटारू | नका काना॑सी टवकारू
शीर्षक योग्यची "पा.कृ."| वाटे जरी अस्थानी

प्रथम ब्रह्माण्ड फेटावे | स्थल-काल कुपीत ठेवावे
चांदण-चुऱ्याचे लवण घालावे |चवी पुरतेच फेटणी

अणु-गर्भाचे सोलीव कांदे | (बारीक चिरायचे वांदे)
फोडुनी तयांची पुष्ट दोंदे |ढकलावे फेटणी

आदि-स्फोटाचा अग्नी पेटवा |आकाश-गंगेचा चढवा तवा
तेजोमेघांचे तेल उडवा |दोन थेंबुटे त्यावरी

फेटण त्यावरी हळू ओता | गुरुत्व-कालथ्याने अरता-परता
ऑम्लेट होईल बोलता बोलता |कल्पांता पर्यंत

या पा.कृ. चे प्रकाश-चित्र | देखू न शकती चर्म-नेत्र
म्हणोनी तिचे रेखा-चित्र | सत्वर टाकावे कुणीतरी

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

7 Jun 2017 - 6:00 pm | गामा पैलवान

आम्लेटाची गंधलक्षणे | की म्याक्सवेलची इक्वेशणे
पसरतील अवखळपणे | प्रकाशवेगे
इलेक्ट्रिक पूर्वपक्ष | त्यावर म्याग्नेटिकाचा कटाक्ष
दुष्काळजन्य बुभुक्ष | आम्लेटावरी दोहोंचा

खो

-गा.पै.

छान. आणि हे कशाशी खातात बरें?

कवितानागेश's picture

8 Jun 2017 - 1:01 am | कवितानागेश

पूर्ण( ब्रह्म)पोळीशी!

अनन्त्_यात्री's picture

8 Jun 2017 - 1:46 pm | अनन्त्_यात्री

..हा प्रश्न खर॑च निरुत्तर करणारा आहे :)

अनन्त्_यात्री's picture

8 Jun 2017 - 8:57 am | अनन्त्_यात्री

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

vikrammadhav's picture

8 Jun 2017 - 10:24 am | vikrammadhav

पाककृती आणि त्यावरची पहिली प्रतिक्रिया !!! मस्तच

चांदणे संदीप's picture

8 Jun 2017 - 11:12 am | चांदणे संदीप

कविता/पाकृ आवडली!

हे घ्या आमच्या नेत्राने पाहिलेले रेखाचित्र....

1

अनन्त्_यात्री's picture

8 Jun 2017 - 11:33 am | अनन्त्_यात्री

पाकृ अगदी "उलगडून" दखविलीत!!
(भागीदारीत "कॉस्मिक किचन" काढूया का?) :)

आअम्च्याकडे या पाककृतीत धुमकेतू ठेचून टाकतात. तुमच्याकडे टाकत नैत का?
चला, आता इथे ब्रह्मांड शोधणे आले..
:))

अनन्त्_यात्री's picture

8 Jun 2017 - 1:58 pm | अनन्त्_यात्री

धूमकेतू येईल, तेव्हा तोच ठेचून पाकृ मध्ये वापरण्याचा विचार आहे. :)

पद्मावति's picture

8 Jun 2017 - 1:30 pm | पद्मावति

कविता खूप आवडली. एकदम हटके, अफलातून कल्पनाशक्ती आहे :)

इरसाल कार्टं's picture

8 Jun 2017 - 1:57 pm | इरसाल कार्टं

+1

सुखीमाणूस's picture

8 Jun 2017 - 3:02 pm | सुखीमाणूस

अचाट कल्पनाशक्ति

गामा पैलवान's picture

8 Jun 2017 - 6:38 pm | गामा पैलवान

अनन्त्_यात्री,

तुमचे अणुगर्भाचे सोलीव कांदे फार म्हणजे फारंच आवडले! अणुमधले एसपीडीएफ वगैरे इलेक्ट्रॉन कवचे कांद्याच्या बाह्य सालींप्रमाणे सोलून काढण्याचा भास झाला. या कवचांसमोर अणुगर्भ अतिशय चिमुकला असल्याने तो चिरायचे वांधे सुद्धा झटकन डोळ्यासमोर तरळून गेले. :-)

आ.न.,
-गा.पै.

...नाद केला होता (इतर अभ्यास बुडवून) ते दिवस आठवले -जेव्हा तुम्ही एस्,पी, डी, एफ ऑर्बिट्सचा उल्लेख केलात! अगदी तेव्हापासून ही सोलीव का॑द्याची उपमा डोक्यात ठसठसत होती, ती या ऑम्लेट्च्या मिषाने लिहिली गेली. आपल्या मार्मिक प्रतिसादा॑बद्दल धन्यवाद!!

गामा पैलवान's picture

16 Jun 2017 - 10:15 pm | गामा पैलवान

अरे वा, अनन्त्_यात्री! रसिक दिसताय या विषयांचे. :-) मलाही यांत आस्वादक म्हणून थोडीफार माहिती आहे. बाकी, तेलवाल्या तेजोमेघांचे दोन थेंबुटे म्हणजे मेगालनचे ढग की काय?

आ.न.,
-गा.पै.

अनन्त्_यात्री's picture

17 Jun 2017 - 7:42 pm | अनन्त्_यात्री

It was "Butterfly" nebula which I had in mind.
An "omelette" does need "Butter", isn't it?
Thanks for your guess!

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jun 2017 - 6:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या अचाट कल्पनाशक्तीच्या विराट स्फोटातून तयार झालेल्या ऑम्लेटचा हा घ्या फोटो. त्यात तुमच्या धसमुसळेपणाने बाजूला उडालेल्या मिक्स्चरचा थेबही दिसत आहे :D ...

2 नंबरच्या भगव्या लाटेच्या अगदी बाहेर एका टोकाला आमची ग्रह मालिका आहे त्यात एक टोकावर आमची पुथ्वी आहे त्यात एका कणावर, इत्यादी इत्यादी मी हा प्रतिसाद पाहत आहे, भेटून आंनद वाटला साहेब ;)

.....मगर उस्की फोटू काय्कू लायी?
कबूल आहे जन्मजात धसमुसळेपणाने मिक्स्चरचा एक थे॑ब उडाला बाजूला. पण असे फोटो टाकून माझा नवशिकेपणा चव्हाट्यावर आणलात तर मी सुगरण कधी होणार अन माझी ऑम्लेट-पावाची टपरी चालणार कशी? :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2017 - 9:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

माणूस म्हटले की कधी ना कधी चूक होणारच*. आपली चूक जाणून ती मान्य करणे ही सुधारण्याची आणि (ब्रम्हांडाचे ऑम्लेट बनवणारा) तज्ञ (पाककलाविषारद) बनण्याची पहिली पायरी आहे !

"मी कधीच्च चूक करतच्च नाहीच्च" ही प्रवृत्ती माणसाला आत्मकेंद्रित दांभिक बनवते ;) :)

===============

* : "टू अर इज ह्युमन (To err is human)" हे जो विसरतो त्या ह्युमनची लोक सहाजिकपणे टर उडवतात. :-X

ओम ब्रह्मर्पनम ब्रम्ह हविह ब्रह्मग्नो ब्र्ह्मनहुतम.......य श्लोकवरून स्फूर्ति मिललेलि दिस्ते!!

..भेटली. सौस्क्रूत भाशा आपुन्ला तशी पन थोडी हार्ड पडते. हा, पन ऑम्लेट-पावची गाडीवाल्या चिमनला ऑम्लेट करताना एक डाव पाह्यल॑ त्याच टायमाला कायतरी लिवायसारख॑ वाटल॑.

रुपी's picture

9 Jun 2017 - 12:01 am | रुपी

जबरी कविता!
गा.पै. यांची प्रतिक्रियापण भारीच आहे. :)

इडली डोसा's picture

9 Jun 2017 - 10:37 am | इडली डोसा

कविता आणि गा.पै. यांचा प्रतिसाद दोन्ही आवडले

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक _____/\_____

गामा पैलवान's picture

9 Jun 2017 - 6:07 pm | गामा पैलवान

रुपी, इडली डोसा आणि विक्रममाधव यांचे प्रशंसेबद्दल आभार.
-गा.पै.

स्नेहांकिता's picture

13 Jun 2017 - 11:21 am | स्नेहांकिता

अफलातून पाकृ , आणि ग्रेट आयडिया !!

अनन्त्_यात्री's picture

13 Jun 2017 - 9:58 pm | अनन्त्_यात्री

...आवडल्याचे कळविल्याबद्दल धन्यवाद!

एकविरा's picture

15 Jun 2017 - 12:43 pm | एकविरा

परत मोगरा फुलला वचतेय .त्याची . आठवण झाली. तेजोमेघ थेंबूटे काय . चांदण - चुरा लवण काय मस्तच .

अनन्त्_यात्री's picture

15 Jun 2017 - 2:47 pm | अनन्त्_यात्री

...आठवण झाली हे वाचून भरून पावलो!
___/\___

सुरन्गी's picture

15 Jun 2017 - 3:14 pm | सुरन्गी

आधी वाटलं की ब्राम्हणी मसल्याचे मटणसारखी पाककृती आहे की काय!पण वाचून मजा आली.कोणाला काय पाहून काय सुचेल आणि चांगल्या पद्धतीने शिजवून सादर करता येईलच असे नव्हे ,पण अनंतयात्री जमलंय बरं का आम्लेट आणि तो गा.पै.यांचा प्रतिसाद म्हणजे वरून शोभेसाठी भुरभुरलेले चीज आणि कोथिंबीर म्हणता येईल.

..म्हणजे केवळ ब्रह्माण्डी ऑम्लेटवर शोभेसाठी भुरभुरलेले चीज आणि कोथिंबीर नसून चीज (वीज) आणि कोथि॑बीर ( चु॑बकत्व) या॑ची मॅक्सवेल सायबाने केलेली चटणी प्रकाशवेगाने पसरून त्या॑नी अण्ड्याच्या फण्ड्यालाच हात घातलाय.

सत्यजित...'s picture

22 Jun 2017 - 6:17 pm | सत्यजित...

कवितेचा (की पा.कृ.चा) बाज जरा खट्याळ-मिश्किल स्वरुपाचा असला तरीही,मानवी मनाच्या ठायी असलेली सूक्ष्मातीसूक्ष्मता तसेच भव्यातीभव्यता,व आपल्या भवतालाठायी असलेल्या याच गुणांशी,सम-विशेषाांच्या अनन्त शोधातच,संगत जोडू पाहणारी ही 'रचना','अनन्त_यात्री'चे अभिनंदनास समर्पक कारण आहे!

अवांतर—मला आवडलेल्या कवितांमध्ये,पाडगांवकरांची 'आम्लेट' कविताही अत्यंत मार्मिक आहे!सहज आठवली अत्ता!