कोणता कोर्स निवडावा?

Primary tabs

केअशु's picture
केअशु in तंत्रजगत
18 May 2017 - 2:32 pm

जून महिना येतोय.अॅडमिशनचा महिना.माझ्या एक मित्राला जो १२ वी झालाय,त्याला कोर्स निवडण्यासाठी थोडी मदत करा.

इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंशी त्याची खटपट चालू असते.कधी दुरुस्त होतात तर कधी ज्ञान कमी पडतं.घरची परिस्थिती तशी बेताची असल्यानं एखादा अल्पमुदतीचा(३/६ महिने)तांत्रिक कोर्स करुन अर्थार्जन करण्याचं ठरवलंय.
थोडी शोधाशोध करुन तीन कोर्स निवडले आहेत.
१ होम वायरींग
२ मोटर आर्मेचर वायंडींग
३ नेटवर्कींग(CCNA)

यापैकी कोणत्या कोर्सला चांगली मागणी आहे?नोकरी कुठे उपलब्ध होऊ शकते?

ज्याला सखोल ज्ञान आहे.त्या व्यक्तीला मागणी असणार हे उघडच आहे,तरीही बाजारभाव हा सुध्दा बघितलाच पाहिजे.घेतलेल्या ज्ञानावर किती काळ तग धरता येईल याचाही अंदाज घेणं गरजेचं ठरतं.

तरी या संदर्भात मिपाकरांकडून मार्गदर्शन मिळावं.शिवाय याच्याशी संबंधित अन्य काही अल्प मुदतीचे कोर्सेस माहित असतील तर त्याचीही माहिती मिळावी.

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

18 May 2017 - 3:12 pm | सिरुसेरि

अल्प मुदतीचे कोर्सेस - यामधे बरेचदा फसवणुक होण्याची शक्यता असते . YCMOU मधे असे अल्प मुदतीचे कोर्सेस पुर्वी होते . ITI हा एक दिर्घ मुदतीचा पर्याय आहे .

सतिश गावडे's picture

18 May 2017 - 3:29 pm | सतिश गावडे

भारत सरकारचे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय आपल्या तंत्रज्ञान विकास केंद्रातर्फे स्थानिक संस्थाशी संलग्न कमी मुदतीचे कमी उत्पन्न गटातील मुलांसाठी तांत्रिक अभ्यासक्रम चालवते.

या संस्थामध्ये इलेक्ट्रिशियन, सोलर एनर्जी सारखे अभ्यासक्रम उपलब्ध असतात.

पुण्यात चिंचवड एमआयडीसी मध्ये "इंजिनियरिंग क्लस्टर पुणे" ही संस्था त्यापैकी एक आहे.

मी इथे नुकताच एक दोन दिवसांचा कोर्स केला. आयटी विषयक कोर्स असल्याने कालावधी फक्त दोन दिवसांचा होता. मात्र प्रशिक्षणाची गुणवत्ता चांगली होती. शिवाय केंद्र सरकारचे प्रमाणपत्र मिळणार आहे.

तुम्ही या संस्थेत चौकशी करु शकता.

चिकित्सक's picture

22 May 2017 - 9:42 pm | चिकित्सक

पिंपरी चिंचवड चे इंजिनियरिंग क्लस्टर माझ्या मते अत्यंत बंडल संस्था आहे आणि हे मी स्वनुभाव वरुन सांगतोय , नुकताच मी तिथ बिग डेटा चा कोर्स केला , कोर्स कॉंटेंट अपुर , लॅब मध्ये फेसिलिटीस सुद्धा अपुरी , क्षमते पेक्षा जास्त अटेंडी ना बोलावणे व कोलमडलेले इनफ्रास्ट्रक्चर त्याशिवाय शिकवणार्याचे बेताचेच ज्ञान अश्या ह्या प्रकारा मुळे माझी पार निराशा झाली , बिग डेटा तसा विषय मोठा व दोन दिवसात कवर करणे कुणाला ही शक्य नाही परंतु ह्या अश्या क्लासरूम ट्रेनिंग मध्ये काही नवे टेक्निक शिकण्याच्यी इच्छे चा विरस झाला , इंजिनियरिंग क्लस्टर किंवा एमएस एमी च्या ह्या ट्रेनिंग पेक्षा युट्युब चे ट्युटोरियल जास्त चांगले आहेत | ह्या केन्द्र सरकार च्या सर्टिफिकेट ला आईटी मार्केट मध्ये काडी इतकी ही किंमत नाही , इंटरव्यू मधे सिनॅरियो आणि उसे केस विचारतात , ह्या कोर्स ला नेमक तेच शिकवल नाही | असो , इंजिनियरिंग क्लस्टर मध्ये सगळेच कोर्सस किंवा शिक्षक वाईट आहेत असे मुळीच नाही , परंतु लॉंगटर्म प्रोफेशनल कोर्सस करणे कधीही चांगले |

कपिलमुनी's picture

25 May 2017 - 1:24 pm | कपिलमुनी

उसे केस

आवडल्या गेल्या आहे

चिकित्सक's picture

21 Jun 2017 - 12:33 pm | चिकित्सक

यूज़ केस चा लिप्यांतर उसे केस असा झाला

केअशु's picture

18 May 2017 - 3:39 pm | केअशु

कोकणे यांच्या कोहिनुर टेक्निकल इन्स्टीट्युटच्या अल्पमुदतीच्या कोर्सेसना शासनाचं प्रमाणपत्र मिळतं.तिथे करावेत का?

टवाळ कार्टा's picture

18 May 2017 - 3:44 pm | टवाळ कार्टा

कार मेकॅनीक हा पर्याय विचारात घेतलाय का? सुरवातीला पैसे कमी मिळतात पण हात बसून नाव झाले तर चांगले पैसे मिळतात....सोबत ओला/उबरसाठी ड्राईव्हिंगसुद्धा करता येईल

कपिलमुनी's picture

18 May 2017 - 3:44 pm | कपिलमुनी

इलेक्ट्रिशियन चा कोर्स चांगला आहे , आयटीआय करावा म्हणजे शासकीय कामे मिळवण्यास मदत होते

इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंशी त्याची खटपट चालू असते.कधी दुरुस्त होतात तर कधी ज्ञान कमी पडतं.घरची परिस्थिती तशी बेताची

ITI electrical करू शकतो तो.. दीर्घ मुदतीचा असला तरी नंतर फायदा आहे नोकरी मिळवायला .. थोडा पैसे आला तरी स्वतःच्या जोरावर डिप्लोमा वगैरे हि करता येईल ..
कुठल्या ओळखीच्या इलेक्ट्रिशियन सोबत कामाला गेला तरी बेसिक नेटवर्कच्या / फोन वायर घालणे वैगेरे आरामात शिकेल महिन्याभरात ..

बाकी .. वायरिंग नंतर डायरेक ccna वर कसा पोचलात ते ऐकायला आवडेल

सतिश गावडे's picture

18 May 2017 - 4:38 pm | सतिश गावडे

बाकी .. वायरिंग नंतर डायरेक ccna वर कसा पोचलात ते ऐकायला आवडेल

त्यात काय म्हॉटा. वायरींगमदी लायटीच्या वायरी आनि शिशियेनेमदी कॅम्पुटरच्या वायरी.

केअशु's picture

18 May 2017 - 5:28 pm | केअशु

CCNA बारावीनंतर उपलब्ध आहे. फार अवघड नसावा.

सतिश गावडे's picture

18 May 2017 - 5:39 pm | सतिश गावडे

इथे सिस्कोच्या स्वतःच्या वेबसाईटवर सिलॅबस आहे. वाचून तुम्हीच ठरवा. :)

केअशु's picture

18 May 2017 - 6:43 pm | केअशु

वाचतो.

स्वच्छंदी_मनोज's picture

18 May 2017 - 5:43 pm | स्वच्छंदी_मनोज

CCNA हा जरी उत्तम कोर्स असला तरी पुरेसा नाही. त्यामधील पुढच्या अ‍ॅडवान्स कोर्सेस करणाची तयारी, चिकाटी असेल तरच CCNA करण्याला अर्थ आहे.

(CCNA क्षेत्रातला जुना माहीतगार)

केअशु's picture

18 May 2017 - 6:40 pm | केअशु

स्वच्छंदी_मनोज खरंच आभार! जमण्यासारखं नसेलही.पण १२ पुरेसं दिलंय म्हणून तसं वाटलं. पुनर्विचार करतो.

ते कोर्स फी मिळावी म्हणुन , उद्या १० पुरेसं पण देतील.
झालच तर १७ नंबर पण तेच भरतील.

अद्द्या's picture

19 May 2017 - 11:33 am | अद्द्या

साहेब.. हा एका नेटवर्किंग कंपनीचा सर्टिफिकेशन कोर्स आहे ( जसे microsoft , VMWare वगैरे चे असतात ) त्यात बारावी , डिग्री , मास्टर्स चा काही एक संबंध नाही . .
आठवीच्या मुलगा हि हा कोर्स करू शकतो .. प्रश्न आहे कि सध्याच्या स्टेज ला फक्त ccna ला घंटा कोणी विचारात नाही .. पण तरी डोकं खराब करणारे कॉन्सेप्ट्स आहेत त्यात .. आणि पुढे np , ie करण्याची तयारी.. किंवा त्यात वेगळ्या stream मध्ये घुसण्याची आणि ते सगळं महिन्याभरात कोळून पिण्याची क्षमता असेल तर बिनधास्त करा .. एखादी कंपनी आपलं पूर्ण नेटवर्क ( १००-२०० कम्प्युटर आणि इतर छोटे मोठे डिव्हाइसेस ) त्या मुलाच्या हातात देईल .. एवढी समज आणि इतर हि गोष्टींचं ज्ञान .. मगच याच्या मागे लागा.. त्यावर तुम्ही त्याची आर्थिक परिस्थिती हि बेताची आहे असं म्हणालाय .. त्यामुळे.. सध्या नकोच .. ITI करू दे.. पुढे डिप्लोमा करू दे आधी स्वतःच्या जोरावर. बाकी गोष्टी आपोआप होतील

८५% ला पासिंग असतं :)

टवाळ कार्टा's picture

19 May 2017 - 11:38 am | टवाळ कार्टा

८5%???
BC

केअशु's picture

19 May 2017 - 5:33 pm | केअशु

विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार अद्द्या!

केअशु's picture

18 May 2017 - 5:37 pm | केअशु

मोटर हा जवळपास सर्वच उद्योगांमधे लागणारा घटक आहे.शिवाय फिरणारा घटक असल्याने दुरुस्ती किंवा देखभालीची सतत गरज पडत असावी.एखाद्या छोट्या शहरातही यासंबंधीचं काम मिळू शकतं.हा पर्याय विचारात घ्यावासा वाटतोय.

पण मुळात हे आर्मेचर वायडींग काय असतं?फक्त वायंडींग शिकून भागेल का? आणखी काही याच्या जोडीला शिकावं लागेल का?

अलबेला सजन's picture

19 May 2017 - 9:02 am | अलबेला सजन

परिस्थिती बेताची असेल तर होम वायरींग चांगला पर्याय राहिल. कोर्स पुर्ण झाल्यावर कुठल्या ओळखीच्या इलेक्ट्रिशियन सोबत कामाला गेला तरी चांगले पैसे मिळतील. नंतर जम बसल्यावर स्वत: कामे घेता येतील.
आणी नुसत्या ccna चा नोकरी साठी काय उपयोग नाही सोबत hardware पाहिजे.

ईतरानी काही सुचविण्यापुर्वी प्रथम त्या व्यक्तीला नेमकी कशाची आवड आहे? सध्या कुठे रहाते आणि बाहेर जायची तयारी आहे का? या महत्वाचा बाबी आहेत. वर मिपाकरानी खुपच चांगले सल्ले दिलेले आहेत, ते त्या व्यक्तिला दाखवा आणि काय श्क्य आहे ते त्यांना ठरवू द्या. आपण काहीही सांगितले तरी त्याच्या आयुष्याच्या कल्पना वेगळ्या असु शकतात.
माझ्या मते मोटार वायंडिंगचा कोर्स केला तर उत्तम होईल. आजुबाजूला एम.आय.डि.सी. मधे पाहणी करून असे काही जॉब आहेत याची खात्री असेल तर हे करणे चांगले. एकदा नोकरी मिळाली कि, घरगुती उपकरणे दुरुस्ती शिकता येईल. याचा फायदा मोकळ्या वेळात कामे घेउन अर्थार्जन करता येईल. दिवाळी, गणपती, लग्नाचे सिझन या काळात या कामाला मागणी असते. या शिवाय पुढे फ्रिज , ए.सी. रिपेअरी ही शिकता येईल. आगामी काळात उन्हाचा तडाखा विचारात घेता याला फार मागणी असेल. या मार्गाने रहात्या गावातही चांगली कमाई करता येईल.
CCNA सारखे कोर्सेस करायचे म्हणजे त्याच्या संधी मोठ्या शहरातच असणार, शिवाय पुढे शिकत रहायला हवे आणि त्यासाठी पैसेही लागतील, ती तयारी आहे का ? याचा विचार करा. शिवाय पुण्या- मुंबईसारख्या ठिकाणी रहायची व्यवस्था होउ शकेल का? हा प्रश्न आहेच.
मोटार हि वाहने, शेतीला लागणारे पंप, फॅन अश्या अनेक ठिकाणी लागतात, त्यामुळे नेव्हर डाईंग फिल्ड आहे. आणि तुमच्या धाग्यावरून तरी तिच आवड दिसते आहे. असो. सल्ला देणे हे ईतरांचे काम, काय योग्य हे ते व्यक्ति ठरवेलच. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

अभ्या..'s picture

19 May 2017 - 12:21 pm | अभ्या..

हा,
नुसता वायरमनाचा कोर्स करून व्यवस्थित काम केले, संपर्क चांगले ठेवले तरि खुप पैसा मिळतो. माज्या समोर एकजन असाच कोर्स करून वायरिंगची काम करायचा. आज बीएसएनएल चे एक्सचेंज इलेक्ट्रिकल मेंटेनेंस कॉन्ट्रेक्ट असतात त्याकडे. 70-80 जनाचा स्टाफ आहे आता त्याचा.

केअशु's picture

19 May 2017 - 5:41 pm | केअशु

दुर्गविहारीजी परिस्थिती बेताची असल्याने त्याला कुटूंबाला आर्थिक मदत शक्य तितक्या लवकर करायचीच आहे.तो कोल्हापुरात राहतो आहे.सध्या इथेच काम मिळाल्यास अधिक चांगले!

mayu4u's picture

20 May 2017 - 10:43 am | mayu4u

येथील आय सी आय सी आय अकादमी फॉर स्किल्स ची चौकशी करा. ३ महिने नि:शुल्क निवासी व्यावसायिक कोर्स आणि नोकरीची हमी.

आणि लौकर अर्थार्जन ही गरज असेल तर हे ही बघा.

कुंदन's picture

19 May 2017 - 3:52 pm | कुंदन

हा बेस्ट , १२ वी वाल्याला
माझ्या ओळखीत काही लोक पुर्वी नोकरे साम्भाळुन फावल्या वेळात ही मोटर आर्मेचर वायंडींग कामे करत आणि नेहेमी डिमांड मध्ये असत.

लहान गावात मोटर वायंडिंग वाला हा मोस्ट वॉन्टेड इसम असतो. सततच्या लोडमधल्या फरकाने मोटरी जळतात. दिझेल पंप आता कमीच झालेत. सबमर्सिबल आणि पाणबुडे पंप जास्त आहेत. मोटरी चालू ठेवण्यासाठी लोक अगदी गयावया करतात. मिक्सर, फॅनच्या मोटरी पण असतात. जरा कलाकारी काम आहे पण पैसे हमखास मिळतात.

कोणताही कोर्स करूदे.. पण चिकाटीने ग्रॅज्युएशन पूर्ण करायला सांगा. आर्ट्स किंवा कॉमर्स कोणतेही.

सध्याच्या घडीला किमान ग्रॅज्युएशन नसेल तर (मग ते कोणत्याही विषयातले का असेना) कंपन्यांमध्ये प्रवेश करणे अवघड जाते.

केअशु's picture

19 May 2017 - 7:40 pm | केअशु

हो तेही करणार आहेच.

अभ्या..'s picture

19 May 2017 - 7:43 pm | अभ्या..

राव्ह दे ना, एकजण तरी धंद्याकडे वळतोय. वळू दे ना. सुरुवातीला करेल नोकरी अनुभवासाठी पण त्यात पदवीची गरज नसेल. व्यावसायीक आनुभव आला की राहील उभा पायावर. कशाला उगा तसल्या ग्राज्येशनची खेंगटी.

दाद्या.. प्लॅन बी असुदे की.

टवाळ कार्टा's picture

20 May 2017 - 8:38 am | टवाळ कार्टा

+११११
graduation नसेल तर बढती अडवतात

केअशु's picture

19 May 2017 - 7:53 pm | केअशु

थोडीशी अवांतर माहिती विचारतो.

विहिरीवर पाण्याचा पंप चालू किंवा बंद करताना विजेचा धक्का बसून जबरी अपघात किंवा मृत्यु अोढवल्याच्या घटना बर्‍याचदा घडतात.याची कारणं कोणती?

याचप्रकारे १२ वी करून मुलींसाठी काय कोर्स करता येईल. वरीलप्रमाणेच बेताची आर्थिक परिस्थिती.

सिरुसेरि's picture

24 May 2017 - 7:46 pm | सिरुसेरि

MITCON courses , CDAC short term courses , web designing , tally ERP , DTP असे कोर्स करता येईल .

ओके बघतो..वरील icici ची लिंक पण चांगली आहे.

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

11 Jul 2017 - 3:54 pm | सिद्धेश्वर विला...

माझ्यामते हे कोर्स फक्त पैसे कमावण्याचं माध्यम आहे .. आपल्या मित्राला जर खरंच काही शिकायचं असेल आणि तेही आवडीच्या क्षेत्रात तर त्याने त्या क्षेत्रात पहिले सहा महिने फुकट काम करायची संधी शोधली पाहिजे ... जो खर्च तो कोर्स करताना शिकण्यासाठी करणार होता .. तो खर्च त्याने काम करून करावा .. नंतर त्याला त्या अनुभवावर नोकरी मिळवण्यासाठी धडपड करावी लागणार नाही .. पुढे कोर्सच्या निवडीसाठी देखील मार्गदर्शनाची गरज लागणार नाही ..