शामभट्टाची "युरोप" वारी .. इटली, स्वीस, फ्रान्स लेखांक २

Primary tabs

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
16 May 2017 - 11:01 am

दिवस दुसरा---
पहाता पहाता अबुधाबी कधी आले कळलेच नाही. प्रवासी बाहेर पडले .

मुम्बई वरून आम्हाला अबुधाबीला घेऊन आलेले विमान

मुम्बईवरून आम्हाला अबुधावीला घेउन आलेले विमान.
रात्री दोन वाजून पस्तीस मिनिटे स्थानिक वेळेनुसार अबुधाबी -रोम फ्लाईट होती. मधे जरासा वेळ रिकामा होता. विमानतळावर घड्याळे , सेंट्स ई ची दुकाने आहेत. एक सुसज्ज असे उपाहार गृह ही आहे. तिथे सुखरूप पोहोचलो आहोत असा वाय फाय वापरून मेसेज द्यावा तर विमानतळाचे वाय फाय काम देत नव्हते. इथे एक पी सी होता. सर्वाना वापरण्यासाठी खुला. त्यावरून " अबुधाबी " ला आलो असा ईमेल मेहुण्याला पाठवून दिला. आजूबाजूला माणसे निराखित वेळ घालवू लागलो. रोमला फ्लाईट जाणार असल्याने साहजिकच इटालियन माणसे ( जराशा मोठ्या आकाराचे नाक असलेली) जास्त होती.
सब दुनिया अपनीच हय
येश ष्टी स्ट्यांड काय वा एअरपोर्ट काय सब दुनिया गोपालकी .
एक आपल्याकडचा म्हन्जे भारतीय उपखंडातला माणूस चक्क एस टी स्टॅन्डवर लोक जसे आपल्याकडे पाय पसरून ताणून देतात तसा झोपला होता. योग्य वेळेस बोर्डिंग ची अक्षरे बोर्डावर दिसू लागली. अबुधाबी येथे विमाने विमानतळाच्या वेटिंग लाउंजपासून लांबवर बस प्रमाणे रांगेत उभी करतात. बहुदा विमानतळाचे काम अजून चालू आहे. बसने आपल्याला विमानापर्यंत नेउन मग शिडी चढून विमानात शिरावे लागते. आताचे हे विमान अलितालिया या कंपनीचे होते. विमानात शिरल्यावर एक सुखद तर एक दुख: द धक्का बसला, आम्हाला मिलालेली सीटस अशा जागी होती की त्या जागी बिझ्नेस क्लासलाही मिळणार नाही अशी लेगरूम मिळाली. पण विमानात एंटरटेनमेंट ची सोय नव्हती. अर्थात रोम येस्तोवर झोपच काढण्याचे काम असल्याने काही फरक पड्णार नव्हता. ठरलेल्या वेळेस विमानाने हवेत उड्डाण केले. अबुधाबी हून दुबईकडे जाणार्‍या हमरस्त्याची रेघ दिसू लागली. पुढे एक तास भर खालची नजारा सुरेख होता. मध्यपूर्वेत काही नव्हते १९५७ पर्यंत तिथे तेलाने मिळणारा पैसा अरबानी पाण्यासारखा खर्च करून इरेक्शन्स केलीयत. त्या सार्‍या दिपोत्सवाची आखीव रेखीव रांगोळी ३०००० फुटावरून ही स्पष्ट दिसावी इतके आभाळ निरभ्र होते. मग माझा डोळा कधी लागला ते कळले नाही.
Cayırlı City in Erzincan Province, Turkey
यावेळी आमचे विमान " एर्झिन्कान इलाखा टर्की " वर
दोनेक तासाने जाग आली तेंव्हा विमान बुडापेस्ट व सोफिया यांचे मधून जात असल्याचे डिसप्ले सांगत होता. काही वेळाने खाली बर्फाच्छादित असा भाग दिसू लागला. पण हा नक्की कोणता प्रांत वा देश आहे याचा काही तर्क करता येईना. वर ते स्थान कोणते हे जी पी इस वरून नंतर समजले. एर्झिन्कान , तुर्कस्तान.

विमानात लोक काहीसे झोपेतून जागो होत होते. आमच्या शेजारीच एका जोडप्याचे गोड बाळ पाळण्यात खेळत होते. ( विमानातील पुढचे मधले सीट पुढे लहानसा पाळणा ठेवला होता. ).परिचय नसल्याने ते बाळ आपल्या मांडीवर घेऊन त्याच्याशी मौजमस्ती करायचा मोह मी टाळत होतो. खाली ३०००० फूटावर काही प्रमाणात बर्फाने झाकलेले पर्वत दिसतच होते. मग समुद्र दिसू लागला. बहुदा हा इटालीच्या पूर्वेचा एड्रायाटिक समुद्र असावा असा तर्क केला तो खराच निघाला. कारण निम्मा सागर पार केल्यावर एका नजरेत इटालीचा लंबूऴका भूभाग दिसू लागला. पूर्वे कडे सूर्य उगवल्याने विमानाचे पंखाचा मागचा भाग उजळून निघाला. ९०० कि मी वेगाने उडणार्‍या विमानाला तो चिंचोळा जलभाग ओलांडायला फारसा वेळ लागला नाही.इटली देशाचे पहिले वहिले दर्शन घडू लागले. इटली हा देश बर्‍यापैकी पर्वतमय आहे. ही पर्वतमयता मिलान या शहराच्या उत्तरेस तर अधिक जास्त आहे. पण पूर्व इटलीतही पर्वतमय भाग दिसत होता. दर्‍यातून रेखीव महामार्ग व रेल्वे मार्ग दिसत होते. एखादेच दुसरे वाहन जाताना मुंगी प्रमाणे दिसत होते. मधूनच पवनचक्य्या दिसू लागल्या. युरोपात भटकताना विशाल शेते दिसणार हे गुगल नकाशावरून माहीत होतेच ती आता प्रत्यक्ष दिसत होती. काही शेतात मोठी कारंजी उडवून तुषार सिंचन पद्धतीचा प्रयोग चालला होता.आपण आता फ्युमिन्शिनो एअर्पोर्ट वर उतरणार आहोत अशी चालकाने घोषणा केली. अपोक्षित चुळबूळ विमानात चालू झाली होतीच. साधारण स्थनिक वेळेनुसार सकाळचे सातचे सुमारास लिओनार्दो दा विन्ची हवाई अड्डा रोम येथे विमानाने जमीनीचे चुंबन घेतले व त्याचा आवेग वाढायच्या ऐवजी कमी झाला. ( माणूस व विमानातील फरक ) .यथावकाश आ॑म्ही उभयता उतरलो. एका दोघाना विचारल्यावर एका सरकत्या जिन्याने रोम गावात घेऊन जाणारी रेलेवे येणार होती त्या स्स्थानका पाशी आलो.जवळची पहिली ५० युरोची नोट मोडून प्रत्येकी ८ युरोची दोन तिकिटे काढली. रोम येथे टर्मिनी ( सी एस टी) व टिबुर्त्टिना ( मुम्बई सेंट्रल) अशी दोन महत्वाची स्थानके आहेत. त्या खेरीज ओस्टेन्स असे ही एक स्थानक आहे .या पैकी ओस्टीन्स सोडता इतर दोन्ही स्थानकावरून मेट्रोत सिस्टीम मधे शिरता येते. याचे दोन्ही ठिकाणावरून उत्तरेस अगदी मिलान च्या दिशेला तर दक्शिणेस नेपल्सच्या दिशेला गाड्या जातात. मला ऑस्टेन्स येथे उतरायचे होते . तेथून चालत १ किमी वर असलेल्या विया रोक्कोको या रस्त्याला पोहोचायचे होते. युरोपमधे खूप चालावे लागते याचे मुख्य कारण इथे " रिक्षा- टांगा " संस्कृति अजिबात नाही. हा युरोपवरचा मोठा डाग असून त्यामुळेच युरोपीय शहर सुटसुटीत दिसते हे ही खरे.
लिओनार्दो एक्सप्रेस
लिओनार्दो एक्प्रेस " नॉन स्टॉप - रोम हवाईअड्डा ते तर्मिनी स्थानक

मी जिथे उभा होतो त्या पलिकडे जरा वेल टू डू लोकांची 'लिओनार्दो एक्स्प्रेस " उभी होती ही गाडी ३५ मिनिटात टर्मिनी या मुख्य व मध्यवर्ती रेलवे स्थानकावर आपल्याला घेऊन जाते. ती माझी गाडी नव्हतीच. मी आमच्या शामभटाच्या गाडीची वाट पाहू लागलो ती ही पाचेक मिनिटात अवतरली. आत बसलो तर आपल्या डेक्कन क्वीन पेक्षाही भारी. मला ४५ मिनिटे लागणार होती व काही युरो वाचणार होते. छोटी छोटी स्थानके पार करीत गाडी ऑस्टीन्स च्या दिशेत जाउ लागली. आता मूळ कुंद वातावरण जाउन काहीसे उन अवतरू लागले. माझ्या गन्तव्या पर्यंत मी अखेर पोहोचलो त्यावेळी दहा वाजले असतील.

" हे बघ आता आपल्याला पुष्कळ चालायचे आहे पंधरा दिवस ... त्याची आता सुरूवात आहे ! " असे पत्नीला सांगून मी अगोदरच 'गूगल स्ट्रीट' मधे पाहिल्यानुसार माझी डफल बॅग ओढत ओढत रस्त्याने चालू लागलो. मस्त स्वच्छ रस्ते , आल्हाददायक सकाळ व तुरळक रहदारी हे मला आवडणारे सारेच समोर
वाढून ठेवल्यासारखे दिसत होते. आमचा पार्टनर मात्र पाचच मिनीटात पुढच्या पंधरा दिवसात काय वाढून ठेवले आहे याची झलक दाखवू लागला. " अजून किती चालायचे आहे चा नारा दर तीन मिनिटानी ऐकून मी मनातल्या मनात पक्का धास्तावून गेलो. " आता हे जवळ आलो आहोत.. असे जसे आपण लहान मुलाला आता हा घास काउचा , हा चिउ चा असे समजावतो असे समजावत ती तीन पायांची विषम शर्यत चालू लागलो.

त्या जागेच्या होस्टने मला ईमेल निरोपातून काही माहिती कळविली होती त्यानुसार कार्यवाही केली की रूमधे प्रवेश घेता येणार होता. या इथे एक गोष्ट सांगितली पाहिजे.युरोपमधे दोन तीन शतके एकाच विशिष्ट साच्यात घरे बांधली गेली आहेत..( अपवाद स्वीस- तिथे सहनिवास ही संकल्पना फारशी नाही . छोटे का होईना स्वतंत्र घर हे प्रकरण तिथे असते ) . युरोपमधील घराचा साचा -असा, यात रस्त्याच्या बाजूने अंगण नसते तर ते मध्यभागी असते. रस्त्याच्या बाजूने एकाच आकाराच्या आठ आठ फुटी उंच खिडक्या असतात .खिडकी भोवती निरनिराळ्या प्रकारे चौकट व वर काही तरी नक्षीदार असा खिडकीचा थाट असतो. रस्त्याच्या बाजूने व मध्यभागी असणार्‍या अंगणातून आत प्रकाश येण्याची सोय असते पण अशा मर्यादित आखणीमुळे काही खोल्या अंधारलेल्या रहातात हे वास्तव आहे.एका घराला एक भलामोठा - वीसेक फूट उंचीचाही काही वेळेस - असा मजबूत दरवाजा असतो. दरवाज्यावर पितळी पत्रे ठोकून ते सुशोभित करायचा प्रयत्न असतो. वॉचमन ही संस्था इथे नाही. कुलुप हे कोड वापरून उघडता येते. आतून कडी उघडायची असल्यास एक " रिलीज बटण" असते ते दाबले की दरवाजा आतून उघडतो.पार्किंग थेट रस्त्यावर . मला ई मेल वरून पाठवलेले कोड वापरून मी दरवाजा उघडला. पण अलिबाबाच्या गुहेत शिरायचे असल्याने आणख्वी एक अडथळा होता तो व्लॉकच्या किल्लीचा .तिथे एक पत्र्याची पेटी होती. तिचाही कोड ई मेल वरून मिळालेला होता . ती पेटी उघडली की ती मधे रूमची किल्ली मिळणार होती. आपण " पारसमणि " या शिणुमात तर हिरोचे काम करीत नाही ना ? असा प्रश्न मनांत येऊन गेला. कोड वापरून पेटी उघडली अन माझ्या पोटात पहिला गोळा आला. पेटीत किल्ली नव्हती.

प्रवासाच्या सुरूवातीचा मुहूर्त काही चांगला झालेला नव्हता. आधीच १ किमी चालवल्याने बायको माझ्यावर वैतागलेली होतीच त्यात हा सस्पेन्स. दोन तीन शेजारी येऊन गेले . एकाशी बोलण्याच्या प्रयत्न केला पण आमची अडचण॑ समजून काही त्या होस्ट माणसाशी संपर्क करून आमची मदत करावी ही भावना काही त्याच्यात दिसेना. वकत बाका आलेला होता. अशा काळजीत असताना बाहेर एक कार थांबली तीमधून एक माणूस आमच्या दरवाज्याकडे येताना दिसला. " हाच होस्ट असेल तर सोन्याहून पिवळे " अशा अर्थाचा विचार मनात आला तोच त्याने हसत माझ्याशी हस्तांदोलन केले. व आपली ओळख करून दिली. झाले असे होते की जी बाई त्याची रूम साफ करून गेली होती तिने किल्ली पेटीत न ठेवता त्याच्व्याकडे थेट नेऊन दिली होती.
.
डॅनियलचे प्रवासी दालन
.
सुसज्ज स्वैपाक घर

मी त्याचाशी हस्तांदोलन करतानाच उदगारलो " अ‍ॅट लास्ट कोलंबस हॅज फाउण्ड अमोरिका !!! " पण त्याला या वाक्याचा संदर्भ लक्षांत आल्याचे दिसले नाही.आम्ही आत गेलो त्याने संपूर्ण जागा दाखविली. आतली व्यवस्था त्याने उत्तम ठेवली होतील .किचन बाथरूम . दुसर्‍या एका गेस्ट साठी आणखी एक रूम . लांबड्या हॉलमधे आपोआप लागणारे विझणारे दिवे. एका भिन्तीवर अगोदर येऊन गेलेल्या लोकांचे अभिप्राय, टेबलावर शिस्तीत मांडून ठेवलेली विविध माहितीपत्रके. जामानिमा तर बहारदार होता.

या होस्टचे नाव होते डॉनियल. "इटली म्हणजे गारिबाल्डी, मॅझीनी, विन्स्सी, एंजेलो , सोफिया लॉरेन, लिझा मिनेली, जिना लोलोब्रिगिडा ,फियाट , स्कूटर्स ओ आ अ‍ॅम सॉरी टू फरगेट पिझ्झा पास्ता " असे मी त्याला म्हणताच तो प्रतिसादार्थ जोराने हसला. त्याला बर्‍यापैकी इन्ग्लीश येत होते. मी त्याला इटलीनेच भारतात मोटर , स्कूटर व रिक्षा प्रामुख्यानी आणल्या हे ध्यानात आणून दिले. तो काही काम करीत राहिला दरम्यान आम्ही स्नान उरकून घेतले. बरोबर आणलेले डाळवडे व भोपळ्याचे घारगे खाउन घेतले.होस्ट बाहेर निघून गेल्यावर आम्ही दोघेच राहिलो. दुपारी कोठे भटकायचे असा विचार करतानाच " ट्रास्तवेर " या भागात जुन्या रोमचे दर्शन होते असे वाचले होते त्याची आठवण आली .सबब " आजकी शाम" हा विभाग पहाण्यात घालवायची असे ठरले. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दार किंचितसे उघडून पाहिले तर बाहेर साउथ इंडियन शोभावे असे नवरा बायकोचे जोडपे उभे होते. बरोबर लगेज असल्याने ते आपल्या सारखेच प्रवासी गेस्ट असावेत असा मी तर्क केला पण कशाच्या जोरावर त्याला आत घ्यावे हे काही कळेना. त्याने एक कागद मला दाखविला त्यात त्याला याच दिवशी दुसरा ब्लॉक भाड्याने दिल्याचे दिसत होते. माझ्या लक्षांत सगळा प्रकार आला मी त्याला आत घेऊन त्याची रूम दाखविली.

हा गृहस्थ फिलिप्स कंपनीत कामाला होता व युरोपला त्याच्या चार पाच वार्‍या झाल्या होत्या. आपल्या दोन मुलाना भारतात ठेवून यावेळी त्याने ऑफिस कामाबरोबर पत्नीलाही युरोप दाखवायचा प्लान केला होता. तो दोन दिवस आमच्या सोबत होता. त्या बाईने तर आपल्याबरोबर भातम सारम हा बेत करण्यासाठी लहानसा कुकरही आणला होता.

आम्ही दुपारी साडेतीन च्या सुमारास बाहेर पडलो तर पावसाला काहिशी सुरूवात झाली होती व जाम थंडगार बोचरे वारे वाहू लागले होते.
जवळचा परिसर खराच देखणा होता. एका मोठ्या चर्चची इमारत पहात आम्ही टायबर नदीवरचा एक पूल ओलांडून विचारत विचारत " ट्रास्तवेर" शोधू लागलो पण इथे इन्ग्लीश कोणालाही समजत नाही. ज्येष्ट नागरिक तर इन्ग्लीश म्हटल्यावर अंगावर पाल पडल्याप्रमाणे हावभाव करतात.बहुदा महायुद्धाच्या झळा बसून त्यांचे बालपण करपून गेल्याचा ब्रिटनवरचा राग त्यांच्या अजून गेलेला नसावा. असो. रस्त्याच्या आजूबाजूची शोरूमस पहात एका बरेच चालल्यावर अपेक्षित ठिकाण येताना दिसत नव्हते. इटली, फ्रान्स ई देशात रेवेल्चे पासेस तिकिटे ई बाहेर देखील विकत मिळतात. या विक्रेत्याना टोबिकोनिस्ट म्हणतात. अशा एका ठेल्यावर दोन दिवसांचे एका दिवसाचे प्रत्येकी ७ युरोचे अशी चार तिकिटे विकत घेतली. ही कोणत्याटी ट्राम, बस व मेट्रो वर चालतात. दिवसभरात अगणित वेळी त्यावर प्रवास करता येतो.
.
दिसायला नळ ओबड धोबड पण पाणी बहारदार अगदी गडावरच्या टाक्यातल्या पाण्याची आठवण .
जवळच एक सार्वजनिक नळ दिसला. त्यातून सतत पाणी वहात होते. तो दिसायला जुनाट असला तरी पाणी मात्र चविष्ट व आम्हाला आवडणारे असे थंडगार होते. मनसोक्त पाणी प्यालो व बाटलीत भरून घेतले. दिवस संपून गेला तरी रोममधे हाती काहीच लागले नव्हते.
आता परत ओस्टेन्स स्थानक गाठून तिथून रूमकडे परतावे अशा विचाराने परत फिरलो.
.
फळे का बहरली ही दारी ..कोणी कशी ना करी चोरी ?
वाटेत एका जागी फुटपाथवर लावलेले एक झाड अगदी फळानी बहरून गेलेले दिसले. खूप पायपीट झाल्यावर थकून भागून परतलो . रात्री त्या साउथ इन्डियन आण्णाच्या बायकोने सांबार दिले. आम्ही भात शिजविला त्या बरोबर ते साम्बार घेत जेवण आटपले व गाढ झोपी गेलो.

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

16 May 2017 - 11:11 am | अनुप ढेरे

मस्तं!

संजय क्षीरसागर's picture

16 May 2017 - 11:25 am | संजय क्षीरसागर

टोटल फ्रिक आऊट सहल आहे ! :)

आदूबाळ's picture

16 May 2017 - 11:32 am | आदूबाळ

वाचतोय! पुभाप्र!

पद्मावति's picture

16 May 2017 - 11:43 am | पद्मावति

खुप मस्त.

चित्रगुप्त's picture

16 May 2017 - 12:29 pm | चित्रगुप्त

वा छान. पहिल्या दिवशी काही बघायला मिळाले नाही याचे जरा आश्चर्य वाटले, कारण तुम्ही एकेका दिवसाची योजनापूर्वक आखणी केलेली होती ना ? 'त्रास्तेवेरे' म्हणजे टायबर नदीच्या पल्याडचा भाग.. तिकडे व्हिला फार्नेजिया आणि अन्य दिमाखदार व्हिलाज आहेत. तुमची परवानगी असेल तर तिकडले काही फोटो टाकेन.
गंमत म्हणजे रोममधे इतके बांगलादेशी आणि यूपी बिहारादिचे लोक आहेत की चक्क हिंदीत चवकशी करत रोममधे फिरता येते.

टवाळ कार्टा's picture

16 May 2017 - 1:33 pm | टवाळ कार्टा

व्हेनिसचे अख्खे मार्केट बांग्लादेशीयांनी काबीज केलेय

चौकटराजा's picture

16 May 2017 - 3:29 pm | चौकटराजा

मिनिट तू मिनिट प्लॅनिंग केले नव्हते. पहिल्या दिवशी वाहन व्यवस्थेची नीट ओळख नसल्याने दिवस फसला. दुसरे असे की पॅरीसचा जसा बारकाईने विचार पर्यटन स्थळ म्हणून झालेला आहे तसा रोम चा दिसत नाही. उत्तम उदाहरण म्हणजे व्हृटिकन ने मांडलेला सवता सुभा. ते जर स्थान रोम पास मधे असते तर काही अधिक सोय प्रवाशाला मिळाली असती. रोमन माणूस फ्रेंच माणूस व या दोघांपेक्षा अधिक उन्नत असलेला स्वीस नागरिक यात मोठा फरक आहे.दुसरे असे की पॅरिसचे व स्वीसचे जसे सर्व सर्वसमावेशक प्लान जे अ‍ॅप उपलब्ध आहे तसे रोमचे नाही.

त्या विलाजचे फोटो आता तुम्हीच टाका . आमच्या फोटू ची कथा व व्यथा पुढील कोणत्या तरी भागात योग्य जागी मांडणार आहेच. प्रांजळ कथन हा या सहलीचा गाभा आहे.

वरुण मोहिते's picture

16 May 2017 - 12:53 pm | वरुण मोहिते

लिहिताय . वाचायला मजा येते .

बेधडक कार्यक्रम दिसतोय. मजा आहे. फोटो नळाचा आवडला हो!

रोमातली ती नारिंगी फळं खाण्यायोग्य नसतात म्हणून चोरीला जात नाहीत इतकं सांगून खाली बसतो.

वर्णन मस्त. येऊदे आणखी.

चौकटराजा's picture

16 May 2017 - 3:19 pm | चौकटराजा

त्या झाडाखालून जाताना ती एडीबल नसावीत अशी शंका आली होतीच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 May 2017 - 2:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

अपेक्षेप्रमाणेच भन्नाट चौरा इस्टाईलमधले "चाले तैसा बोले" वर्णन आवडले. फोटोही साजेशे. अजून जास्त फोटो आवडतील. नळाजवळचा फोटो मस्तं.

पुभाप्र.

चौथा कोनाडा's picture

19 May 2017 - 9:23 pm | चौथा कोनाडा

:-)

नळा जवळचा फुटू टाकल्यामुळं चौकट राजा नळराजा झालेत. बघू आता वॉकिंग क्वीन दमयंतीचा फुटू कधी टाकतात !

कृ ह घे :-)

अरे वा . . मस्तच झालेली दिसते ट्रीप !

वाचतोय, येऊद्या पटापट पुढचे भाग !

निरंजन._.'s picture

16 May 2017 - 3:41 pm | निरंजन._.
प्रचेतस's picture

16 May 2017 - 4:27 pm | प्रचेतस

खास चौरास्टाईल नर्मविनोदी शैलीतलं वर्णन. मधोमध चौरांचे काही चौकार आहेतच.

येऊ द्यात पुढचा भाग.

शामभट्टांचे फोटु दिसत नाहीयेत.

पैसा's picture

16 May 2017 - 5:03 pm | पैसा

वाचत आहे

सकाळ होती, आवेग कसा काय वाढेल?

भारी सहल. यूरप-यूएसचा मला कंटाळा येतो. पण तुमची शैली भन्नाट असल्याने वाचत आहे. पुभाप्र.

दुर्गविहारी's picture

16 May 2017 - 7:37 pm | दुर्गविहारी

मस्तच!! पु.भा.प्र.

अत्रुप्त आत्मा's picture

17 May 2017 - 12:40 am | अत्रुप्त आत्मा

वाचिंग...

चार चार नव्वद's picture

17 May 2017 - 5:32 pm | चार चार नव्वद

फारच छान. पु.भा.प्र.

चार चार नव्वद's picture

17 May 2017 - 5:34 pm | चार चार नव्वद

फारच छान. पु.भा.प्र.

छान लिहिताय काका. पुभाप्र.

हा हा हा हा हा

चौथा कोनाडा's picture

19 May 2017 - 9:19 pm | चौथा कोनाडा

भन्नाट वृत्तांत आहे. मजा येतय वाचायला.
बारीक सारीक वर्णनामूळे रसरशीत जिवंतपणा आलाय कथनाला.
परेडिक्टेबिलिटीला फाटा दिल्यामुळं उत्सुकता ताणली जातेय.

चौरा, एक नंबर !

यशोधरा's picture

19 May 2017 - 9:51 pm | यशोधरा

वाचतेय..

यसवायजी's picture

11 Jun 2017 - 11:26 am | यसवायजी

वाव्वा. आवडला भाग.
बाकी, म्युनिकमधे रिक्शासारखे काहीतरी पाहिल्याचे आथवते आहे.