BS3 ते टेस्ला

Primary tabs

लॉरी टांगटूंगकर's picture
लॉरी टांगटूंगकर in तंत्रजगत
14 Apr 2017 - 7:00 pm

आजचे प्रेरणास्थानः हा धागा. चर्चा बी एस थ्री मधून सुरु होत ईलेट्रीक गाड्यांवर गेलेली आणि त्यावरून प्रदूषणावर घसरलेली. त्या संदर्भाने अजून काही.
l1
हा फोटो गेल्या वर्षीच्या ब्लूमबर्ग बिझनेस मधला आहे. फोटो मधील व्यक्ती लक्षात आल्या असतीलच, नसल्यास ते दोघं म्हणजे बफेट आणि इलॉन मस्क आहेत. लेखाचं नाव होतं "हू ओन्स द सन", सूर्यावर मालकी कोणाची? आजच्या लेखाचा विषय बफेट किंवा इलॉन मस्क नाहीये. दोघांच्याही कंपन्या सोलार एनर्जीवर काम करत आहेत आणि एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभ्या आहेत. त्यांच्यातील स्पर्धा हा एक वेगळा विषय म्हणून आत्ता बाजूला सोडू. पण एकंदर या पाठीमागील दिसणारे विदाबिंदू आणि त्यांचे भविष्यकालात दिसू शकणारे परिणाम याच्याकडे बघण्याचा हा प्रयत्न आहे. पाठीमागील विदाबिंदू आणि निरिक्षणे यांच्यावर आक्षेप असण्याचे कारण नसावे. भविष्यकाळाबद्दल आपण वेगवेगळी मते- मतांतरे ठेऊ शकतो आणी एकमेकांची मते मान्य नसली तरी हरकत नाही. मी इथे बंदूक चालवतांना टोनी सेबा या हार्वर्ड प्रोफेसरच्या खांद्यावर ठेउन चालवणार आहे.

विषयाला हात घालण्याआधी भूतकाळातील काही ढोबळ पॅटर्नकडे नजर टाकू..
आपण आज गाणी कशी ऐकतो?
गाना.कॉम, यु ट्युब किंवा फारच आवडलं तर मोबाईलची इंटरनल मेमरी.

पंचवीस-तीस वर्षापुर्वी आलेल्या ७८ आरपीएम च्या रेकॉर्ड्स, नंतर कॅसेट्स , सीडी आणि आता थेट ऑनलाईन स्ट्रीमिंग असा हा प्रवास आहे. प्रत्येक बदला बरोबर गुणवत्ता सुधारली आहे, किंमत कमी झालेली आहे. आणि वापर अर्थातच वाढला आहे.
l2
उजवीकडच्या फोटो मधे दिसणारी प्रत्येक गोष्ट आज खिशात आहे. पाठीमागे वळून बघतांना हे सर्व स्पष्ट आणि उघड वाटतं आहे ना?
कदाचित हे तितकसं उघड नसावं. किमान इतिहास तसं दाखवत नाही.कोणत्याही प्रकारचे बदल "तज्ञ" आणि इन्डस्ट्री इन्सायडर्सनी सहज स्वीकारले नाहीयेत.
उदाहरणा दाखल बघा.
l3
आता जिथून सुरुवात झालेली तो मुख्य विषय गाड्या आणि एनर्जी.

टेस्लाच्या ईलेक्ट्रीक गाड्या तुफान लोकप्रिय आहेत. ईलेक्ट्रीक कार ही कल्पना म्हणून नवी अजिबात नाहीये. पण टेस्लासाठी काही गोष्टींनी फार भरभक्कम पाया तयार केला आहे. आणि त्यांनी खेळाचे नियमच ब‌द‌ल‌ले आहेत.
या गाड्यांना टेस्ला अमर्याद किलोमीटर्स ची वॉरंटी देत आहे. याचं कारण कारमध्ये असलेले कमीत कमी भाग. टेस्ला मॉडेल एस मध्ये फक्त १८ हलणारे भाग आहेत. तुलनेसाठी म्हणून बघितलं तर सामान्य गाडी मध्ये ही संख्या दोन हजाराच्यावर असते.
l4
गाडीची ताकद आणि परफॉर्मन्स. फेरारी वगैरे सुपरकार्सच्या वर जाणारे स्पेक्स टेस्ला कडे आहेत. उदा. या टेस्लाच्या टॉर्क कर्व्ह ची स्टॅबिलिटी निव्वळ पप्पी घेण्यासारखी आहे.
l5
इथे पण निर्विवाद विजेतेपद.
वायरलेस चार्जिंग- दुकानात खरेदी चालू आहे आणि गाडी स्वतःच चार्ज होते आहे. पंप वगैरेवर जाण्याचीच गरज नाही. एक चार्ज ; सलग तीनशे वीस किमी. पुणे-मुंबई-पुणे न थांबता न चार्ज करता शक्य आहे.
गाडीत पेट्रोल जळणार नाही तर वीज प्रकल्पावर कोळसा जाळला जाईल. प्रदूषणाची पातळी तिथेच, असं वाटतं आहे काय? इथे मुख्य खेळ बदलतो आहे.
गेल्यावर्षी सोलर एनर्जी संदर्भाने काही अशक्य वाटणारे आकडे दिसण्यास सुरुवात झालेली. २,८५ ते ३ रुपये या युनिट या दराने वीज निर्मिती शक्य झालेली आहे. (घरगुती वापरासाठीचे दर साडे सात- आठ रेंज मध्ये आहेत). गुगल स्वत:ची वीज स्वत: बनवते आहे. इंफोसिस मोठ्या प्रमाणात वीज स्वत: बनवते आहे. या दादा कंपन्या म्हणून सोडल्या तर दुबई आणि ओमान सारखे देश सोलार एनर्जी कडे वळलेले आहे. तेल उपशाला वापरली जाणारी वीज सोलार एनर्जी मधून आलेली आहे.
वीजेची ग्राहकाला द्यावी लागणारे किम्मत निर्मितीमुल्याच्या जवळ असण्याचे कारण म्हणजे गळती नाही. सोलर सेल्स मधून वीज निर्मीतीची किंम्मत कमी आहे आणि अजून कमी होते आहे. स्टोरेजच्या बाबत लिथिअम आयॉन बॅटरीची किंम्मत उतरत चालली आहे आणि गुणवत्ता वाढत आहे. (*टेकीज नी तळटीपा पहाव्यात.) या दोन्हीचा परिणाम म्हणजे वीज अत्यंत स्वस्तात बनवता येते आहे आणि साठवता सुद्धा येते आहे. काही देशांत रुफ टॉप ची किंम्मत ही वीज वाहतुकीच्या खर्चापेक्षा कमी झालेली आहे. जर बाकी कंपन्यांनी पारंपारिक पद्धतीने हा खेळ खेळला तर पैसा गमावण्याची स्पर्धा लागेल.
असाच एक खेळ पारंपारिक पद्धतीने कोडॅकने खेळला होता. स्कोरकार्ड आपल्या समोर आहेत..
l6
आता हे सगळं आम्रिकेत ठीके, पर कॅपिटा करकचून प्रदूषण करा; दाबून पैशे खिशात ठेवा आणि जगाला ग्रीन पीस छाप धडे द्या. आपल्याला इमर्जिंग इकनॉमीज मध्ये राहून हे कसं जमणार? आपण आत्ता कुठे आहोत?
आपल्या देशातील सोलार कपॅसिटी ३०-४०% रेट ने वाढत आहे (तळटीप पहाणे). टोनी सेबाच्या म्हणण्यानुसार २०३० मध्ये संपूर्ण जग सोलार पावरवाले होईल. भारतीय सरकारच्या अंदाजानुसार आपण किमान ४०% वर असू.
परत पहील्या चित्राकडे जाऊ. बफेट विरुद्ध ईलॉन मस्क. बफेटबुवांची सतरा बिलियन्सची गुंतवणूक रिन्युएबल एनर्जी मध्ये आहे. त्याच्या कंपन्या सरासरी वीज किंमतीच्या अर्ध्या किंमतीत वीज बनवून विकता आहेत आणि प्रॉफिटेबल आहेत. ईलॉन मस्क प्रॉफिट्स दाखवत नाहीये. पण सोलार सिटी ही त्याची ग्रुप कंपनी सोलार रुफ टॉप्स बनवते. घरावर येणार्‍या प्रकाशापासून थेट वीज निर्मीती. दोघंही वेगवेगळ्या गाड्यांमध्ये आहेत पण ही रेस एकाच रस्त्यावर आहे.

आणि मॉडेल एस घेतांना अप्रत्यक्ष प्रदूषण केले जाईल असं वाटतं असेल तर तसं तितकं वाटून घ्यायची गरज नाही. :)

तळटीपा.
लिथिअम आयॉन बॅटरीची किंम्मत ( 16% दरवर्षी घट )आणि गुणवत्ता वाढ (सध्या ५% दरवर्षी; याहून जास्त अपेक्षा आहेत.). दुसर्‍या चित्रात सोलार सेल्स उतरणार्‍या किंमती.
l7
सोलार पीव्ही कपॅसिटी जागतिक :
l8
Ref- Tony seba , clean disruption
l9
Solar installations in India.
l10

ref-live mint official

टोनी सेबा सोडल्यास वर्तमानपत्रे, ब्लूमबर्ग वगैरे मधून संदर्भ घेतले आहेत. उत्साही लोक्स हवं असल्यास या पुस्तकाकडे नजर टाकू शकतात.

प्रतिक्रिया

वरुण मोहिते's picture

14 Apr 2017 - 7:24 pm | वरुण मोहिते

माहिती .

मंदार कात्रे's picture

14 Apr 2017 - 7:42 pm | मंदार कात्रे

अभ्यासपूर्ण लेख

आभार्स

लॉरी टांगटूंगकर's picture

14 Apr 2017 - 7:47 pm | लॉरी टांगटूंगकर

@दोस्तलोग- फोटोज वर स्क्रू ड्याव्हर मारायची गरज नाहीये ना?

सतिश गावडे's picture

14 Apr 2017 - 9:35 pm | सतिश गावडे

फोटो दिसत नाहीत. मात्र फोटोविनाही लेख पोचला. :)
गुगल आणि इंफी कोणत्या प्रकारची वीज बनवतात?

खेडूत's picture

14 Apr 2017 - 11:28 pm | खेडूत

+१
फोटू दिसत नाहीत, पण लेख आवडला.

अभिजीत अवलिया's picture

15 Apr 2017 - 11:26 am | अभिजीत अवलिया

इन्फोसिस पुणे फेज२ मध्ये एका बिल्डिंगच्या वर एक पवनचक्की सारखे काहीतरी होते. आता आहे का माहीत नाही. ते थोडीशी वीज निर्माण करत असावे.

लॉरी टांगटूंगकर's picture

15 Apr 2017 - 12:10 pm | लॉरी टांगटूंगकर

सोलार सगासर, मी इन्फीच्या बाबतीत या बातम्यांच्या संदर्भाने बोललेलो. अबक पर्यंन्त संपूर्ण सोलारवाले होउ असं टारगेट पण डीक्लिअर केल्याचं आठवतं आहे. ते शोधत बसलो नाही.

फोटो दिसत नाहीत, पण लेख छान आहे.

टांगटुंग सर, फोटो दिसत नाहीत

लॉरी टांगटूंगकर's picture

15 Apr 2017 - 12:28 am | लॉरी टांगटूंगकर

सं.म. मदत करा.
फोल्डर लोकेशन- https://goo.gl/photos/qF76ZSW1QSSbTwD37

क्र. १- 1

क्र २ 2

क्र ३ 3

क्र ४ 4

5

6

7

8

९\\

9

१०

10

अर्धवटराव's picture

15 Apr 2017 - 6:00 am | अर्धवटराव

उत्तम विवेचन.
दिवसेंदीवस स्वस्त होणारी सोलर एनर्जी, अचाट कर्तुत्वाचे यंत्रमानव, प्रचंड वेगाने विकसीत होणारी कृत्रीम बुद्धीमत्ता... या काँबेनेशनच्या हवाली एकदा का जगाचा पसारा दिला कि मी मरायला मोकळा :ड

आता गरज आहे अर्थव्यवस्थेच्या मानसीकतेत अमूलाग्र बदल घडवण्याची. सिरोर्सेसच्या साठवणीवर आधारीत अर्थव्यव्यवस्था आता बदलायला हवी. भविष्यात कदाचीत साठवणीची गरजच पडणार नाहि. २४ तास अन्न, पाणि, निवारा, आरोग्यसुवीधा, वाहतुक... या सर्व सोयी मुबलक आणि स्वस्तात (कदाचीत फुकट) उपलब्ध असतील. एक रिप्रॉडक्शन कंट्रोल केलं माणसाने तर स्वर्ग केवळ दोन हात दूर आहे आपल्यापासुन :)

नगरीनिरंजन's picture

15 Apr 2017 - 7:21 am | नगरीनिरंजन

Really?

सतिश गावडे's picture

15 Apr 2017 - 10:00 am | सतिश गावडे

हा माणूस दोन शब्द बोलत आहे. चित्रावर एक शब्द दिला आहे.

नगरीनिरंजन's picture

15 Apr 2017 - 1:19 pm | नगरीनिरंजन

आपले निरीक्षण चुकले आहे. दिलेल्या शब्दाच्या शेवटाकडून पुन: सुरुवातीला आवर्त होतानाच्या ओठांच्या हालचालीला आपण दुसरा शब्द समजत आहात असे वाटते. पुनरावर्ती हालचालींमुळे असा भास होऊ शकतो. मनुष्याच्या निरीक्षणशक्तीत व तर्कबुद्धीत अशा काही त्रुटी राहून गेल्या आहेत.

अर्धवटराव's picture

16 Apr 2017 - 3:43 am | अर्धवटराव

व्हॉट अदरवाईज ?

नगरीनिरंजन's picture

18 Apr 2017 - 3:45 pm | नगरीनिरंजन

टेक्नॉलॉजी इज नॉट अ सबस्टिट्यूट फॉर रिसोर्सेस.
कृत्रिम बुद्धिमत्तेची यंत्रे आली म्हणून अन्न, पाणी, ऊर्जा व खनिजे अमर्याद होणार नाहीत आपोआप.

अर्धवटराव's picture

18 Apr 2017 - 11:26 pm | अर्धवटराव

कृत्तीम बुद्धीमत्ता रिसोर्सेसला अमर्याद करु शकत नाहिच. पण आजवर अनटच्ड असलेले अमर्याद रिसोर्सेस वापरण्याजोगे नक्की बनु शकतील. मुख्य म्हणजे, संपत्तीची व्याख्या बदलण्याची शक्यता टेक्नोलॉजीमुळे निर्माण झाली आहे.

बाय द वे, 'मूलभूत गरजांची फुकटात पूर्तता' हे स्वप्नील चित्र म्हणुनच रंगवलय. तसं नेमकं होण्याची शक्यता कमिच आहे.

नगरीनिरंजन's picture

18 Apr 2017 - 11:40 pm | नगरीनिरंजन

मान्य. पण "आजवर अनटच्ड असलेले अमर्याद रिसोर्सेस" कोणते हे कोणीच सांगत नाही किंवा सांगू शकत नाही.

अर्धवटराव's picture

19 Apr 2017 - 5:22 am | अर्धवटराव

पृथ्वीवर सूर्य निर्माण करण्याच्या प्रयत्नात सध्या बिलियन्स ऑफ डॉलर्स खर्च केल्या जात आहेत. सोलर एनर्जी अनट्च्ड नसली तरी आजघडीला तिचं पोटेन्शीअल अत्यल्पच वापरण्यात आलं आहे. भविष्यकाळात ते एक्स्पोनेन्शीअली वाढेल यात शंका नाहि. तोच प्रकार बायो फ्युएलचा, जेनेटीकली मॉडीफाईड फूडचा.

नगरीनिरंजन's picture

19 Apr 2017 - 6:42 am | नगरीनिरंजन

फ्युजन अमर्याद ऊर्जा देऊ शकत असले तरी त्यात यश यायला अजून बराच अवकाश आहे. बाकी बायो फ्युएल, सौरऊर्जा वगैरे अमर्याद नाहीत. विशेषत: सौरऊर्जेसाठी व पवनऊर्जेसाठी दुर्मिळ खनिजे लागतात. ती खूपच मर्यादित आहेत.

अर्धवटराव's picture

19 Apr 2017 - 8:02 am | अर्धवटराव

पण भविष्यात मूलभूत गरजेपुरती ऊर्जा आरामात उपलब्ध असेल हे नक्की. कदाचीत त्याकरता एकटं बायोफुएलच पुरेसं असेल, कदाचीत एकटं सौर/फ्युजन. भविष्यातल्या ऊर्जा हडपणार्‍या गरजा आजच्यासारख्या ट्रान्स्पोर्ट, किचन, कारखाने इतक्या सोप्या नसतील. जमीन, समुद्र, वायुमंडल हे सगळं पादाक्रांत केलेला मनुष्य आता अवकाशाचा आणि समुद्रतळांचा वेध घेत आहे. मेजर एनर्जी कंझप्शन असच सध्याच्या परिघाबाहेरचं असेल.

पिलीयन रायडर's picture

15 Apr 2017 - 6:24 am | पिलीयन रायडर

या टेस्लाच्या टॉर्क कर्व्ह ची स्टॅबिलिटी निव्वळ पप्पी घेण्यासारखी आहे.

हो रे हो!! दृष्ट काढा!
लेख आवडलाच!

डॉ श्रीहास's picture

15 Apr 2017 - 8:54 am | डॉ श्रीहास

+१११११

ह्यॅ फिल्डचा नसूनही मला लेख कळला आणि आवडला

इरसाल कार्टं's picture

15 Apr 2017 - 8:55 am | इरसाल कार्टं

अत्यंत माहितीपूर्ण लेखन आहे. धन्यवाद.

जबरदस्त लेख आहे लॉरीभाऊ! यर बात!

लॉरी टांगटूंगकर's picture

17 Apr 2017 - 10:21 am | लॉरी टांगटूंगकर

सर्व वाचक प्रतिसादकांना धन्स.

पिंगू's picture

17 Apr 2017 - 10:27 am | पिंगू

जबरी माहिती दिली आहे.

शलभ's picture

17 Apr 2017 - 7:27 pm | शलभ

मस्त माहिती..

प्रसाद भागवत's picture

18 Apr 2017 - 10:07 am | प्रसाद भागवत

सर, आपला 'BSIII ते टेस्ला' हा अत्यंत माहितीप्रद लेख वाचला. धन्यवाद.

मी आणि तांत्रिक जगत यांच्यात श्रीमान दावुदजी आणि आपली तपास यंत्रणा यांच्याएवढेच अंतर असल्याने,(म्हणजे उभयतांची उरभेट होणे खुप आवश्यक आहे हे कळुनही तसे होण्याची शक्यता नसल्याने) आपणासारख्यांचे असे लेखच आमचे काय ते प्रबोधन करतात त्यामुळे आपणास त्रास द्यावा लागतो आहे.

आपण लेखांत लिहिल्याप्रमाणे सोलर अथवा रिन्युएबल एनर्जी, लिथिअम आयॉन बॅटरी अशा मुद्द्यांचा उहापोह अनेक ठिकाणी तपशीलाने होताना दिसतो, येत्या काही वर्षांतील हे गेम चेंजर असणार आहेत हे निश्चित.

आता एक गुंतवणुकदार म्हणुन माझा संकुचित दृष्टिकोण असा की या क्षेत्रांत होणाऱ्या या क्रांतीकारी बदलांच्या पार्श्वभुमीवर या क्षेत्रांत उत्तम काम करणाऱ्या वा या बदलांचा व्यावसायिक फायदा होवु शकणाऱ्या कोणी भारतीय कंपन्यां (उदा सुझलॉन) आपल्या दृष्टिक्षेपात आहेत का??

लॉरी टांगटूंगकर's picture

18 Apr 2017 - 12:00 pm | लॉरी टांगटूंगकर

आणि सध्या कोणी दृष्टिक्षेपात नाही. सुझलॉनच्या तुलसी तांतीबद्दल माझी मतं चांगली नाहीत. बाप गाड्या भंपक ड्रायव्हरच्या हातात असल्या म्हणजे अ‍ॅक्सिडेंटचीच शक्यता जास्त.
सप्लाय चेन मधल्या कॉस्ट् कमी करण्यासाठी बॅटरी सप्लायर भौगोलिक दृष्ट्या जवळचे पकडले जाता आहेत. त्याचा इथे काही फायदा दिसत नाही. भारतात अजून ईले. गाड्या काहीच नाहीत. जन्ता अजून डूग्डूग बुलेटवर फिदा आहे. बदल होण्यास वेळ लागतील पण गोष्टी उलगडतांना त्यातले चांगले ड्रायव्हर होपफुली दिसतील...

सिरियस अ‍ॅलोकेशन करायचं झालं तर मी ईलॉन मस्कवर करेन. बदलांवर नजर ठेवून आहे, पण मी गेम मध्ये नाहीये. सरते शेवटी opinions have value if they are backed by serious money.
असो.

अनुप ढेरे's picture

18 Apr 2017 - 12:22 pm | अनुप ढेरे

प्राज

इष्टुर फाकडा's picture

20 Apr 2017 - 2:23 am | इष्टुर फाकडा

भारतातील आणि पाश्चिमात्य देशांमधील सौरऊर्जेबाबतचा दृष्टिकोन आणि प्रयत्न विशद करणारा हा उत्तम हिडयू आहे. डेव्हिड लेटरमन चा. या उत्तम लेखाच्या अनुषंगाने ज्ञानात भर.
https://www.youtube.com/watch?v=273oHnoR4NI
त.टी.: वामांगी लोकांनी पाहू नये, डोळे येण्याचा संभव आहे ;)

लई भारी's picture

6 Jun 2017 - 3:36 pm | लई भारी

व्हिडिओ ची माहिती सांगाल का? नॅशनल जिओ च्या कॉपीराईट मुळे काढून टाकलाय.

मदनबाण's picture

20 Apr 2017 - 8:32 am | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ya Tabtab... [ نانسي عجرم - فيديو كليب يا طبطب ] :- Nancy Ajram

अर्धवटराव's picture

22 Apr 2017 - 1:28 pm | अर्धवटराव

सकाळमधे एक छान लेख वाचला आज.

पैसा's picture

28 Apr 2017 - 9:55 pm | पैसा

माहितीपूर्ण उत्तम लेख

छान माहितीपूर्ण लेख! आवडला.

इडली डोसा's picture

2 May 2017 - 10:50 pm | इडली डोसा

काल हा टेड टॉक पाहिला

या माणसा समोर नतमस्तक आहे, एक एक कल्पना कुठुन सुचतात याला काय माहित. अंडरग्राऊंड टनेल्स, सोलर सिटी ,मंगळावर मानव वसाहती आणि बरचं काही. नक्की बघा हा लेटेस्ट टेड टॉक


राघवेंद्र's picture

6 May 2017 - 1:49 am | राघवेंद्र

परवाच हा talk ऐकला. रिऍलिस्टिक नाही वाटला. उड्डाण पूल आणि भुयारी मार्ग या मागील तर्क आवडले.

शाली's picture

5 May 2017 - 11:58 am | शाली

माहीतीपुर्ण लेख.

कवितानागेश's picture

6 May 2017 - 1:39 am | कवितानागेश

मस्त लेख.

दीपक११७७'s picture

30 May 2017 - 12:59 pm | दीपक११७७

भ्रमणध्वनीतील लिथिअम आयॉन बॅटरी चा स्पोट होतो हे आपण एकले-पाहीले आहे.
मग ह्या वाहनात ते किती सुरक्षीत असेल.

दीपक११७७'s picture

3 Jun 2017 - 5:15 pm | दीपक११७७

वरिल प्रतीसादाचे उत्तर काय आहे?

शब्दबम्बाळ's picture

3 Jun 2017 - 5:19 pm | शब्दबम्बाळ

अहो आपल्या नेहमीच्या इंजिनमध्ये तर छोटे छोटे स्फोट घडवूनच गाडी चालवली जाते!! :)
आणि डिझेल पेट्रोल किती ज्वालाग्राही आहे ते आपण जाणतोच. पण ऊर्जा निर्मितीसाठी तेच लागतात.
आता यातून अपघात होऊ नये यासाठी सुरक्षा नियम असतात ते पाळावे लागतात हे बॅटरी वर चालणाऱ्या गाडीला सुद्धा लागू होत.

दीपक११७७'s picture

6 Jun 2017 - 4:25 pm | दीपक११७७

पन बॅटरीची घातकता जास्तच घातक असते. कारण मोबाईल सारख्या वस्तुमध्ये ती सोट घडवुन आणु शकते मग गरमं होणा-या गाडिच कायं, करण इतर गाडीला आग लागणे वेगळं आणि हा स्पोट वेगळा. आपण उष्ण कटीबंध प्रदेशात आहोत, शिवाय इथला उन्हाळा, बॅटरी किती तग धरेल सांगता नाही येतं.

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2017 - 4:01 pm | धर्मराजमुटके

एका नव्याच जगाची ओळख

स्वराजित's picture

27 Jun 2017 - 4:52 pm | स्वराजित

खुप छान महितीपुर्ण लेख.