व्हेज कुर्मा

Primary tabs

सविता००१'s picture
सविता००१ in पाककृती
21 Mar 2017 - 1:16 pm

बरेच दिवस हॉटेल मध्ये मिळतो तसा व्हेज कुर्मा करून पहायचा असं चाललं होतं. काल लागला मुहूर्त. तुम्हीही पहा कसा वाटतोय ते.

साहित्यः

१. प्रत्येकी एक वाटी फ्रेंच बीन्स - तिरके शंकरपाळ्याच्या आकारात कापून, गाजर आणि बटाटे सालं काढून, १ सेंमी च्या चौकोनी आकारात चिरून, फ्लॉवर- मध्यम आकाराचे तुरे काढून, मटार.- हे सारं गरम पाण्यात ४ मिनिटे ब्लांच करून लगेच थंड पाण्यात घालून चाळणीवर उपसून ठेवले.
२. पाककृती करायच्या आधी तासभर एक कप गरम पाण्यात ६-६ काजू, बदाम आणि १ चमचा खसखस भिजत घातली होती.
३. मध्यम आकाराचे दोन कांदे पातळ चिरून फ्राय पॅन मध्ये चमचाभर तेल घालून कुरकुरीत होईतो परतून घेतले.
४. मध्यम आकाराचे २ टोमॅटो- प्युरी करून घेतले.
५. तेल, प्रत्येकी एक चमचा जिरं, आलं लसूण पेस्ट, तिखट, गरम मसाला, धने-जिरे पावडर, १/२ चमचा हळद, मीठ चवीनुसार.
६.१ तमालपत्र, १ दालचिनीची छोटी काडी (१/२ इंच), १ मसाला वेलची, ५-५ लवंगा, मिरीचे दाणे
७. २ चमचे दही आणि मूठभर पुदिना पाने धुवून, बारीक चिरून. सजावटीला चिरलेली कोथिंबिर.

कृती:

काजू, बदाम, खसखस बारीक वाटून घेतले. त्यातच परतलेला कांदा घालून परत एकदा अगदी गंधासारखं मऊ वाटून घेतले.
एका भांड्यात तेल गरम करून त्यात सगळा खडा मसाला आणि जिरे घातले. आलं लसूण पेस्ट आणि हा वाटलेला मसाला घालून छान परतले. मग त्यात टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेतो परतून घेतले. त्यात तिखट, धने-जिरे पावडर, गरम मसाला घालून थोडंसं परतून त्यात दही घातले. बाजूने तेल सुटू लागल्यावर त्यात सगळ्या भाज्या, पुदिना पाने घालून थोडंसं पाणी घातलं. झाकण लावून ५ मिनिटे शिजवलं आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम पोळी बरोवर वाढलं.

.

प्रतिक्रिया

केडी's picture

21 Mar 2017 - 1:38 pm | केडी

एक नंबर!

अभ्या..'s picture

21 Mar 2017 - 1:41 pm | अभ्या..

अरे बेस्टच सौताताई.
.
सांगलीला खाल्लेला नौरतन कोर्मा आठवला.

सविता००१'s picture

21 Mar 2017 - 1:42 pm | सविता००१

सौता नाय रे
स वि ता असं वेगवेगळं म्हणायचं आणि लिहायच रे. :)

पैसा's picture

21 Mar 2017 - 4:39 pm | पैसा

पार्सल कर ग!

पद्मावति's picture

21 Mar 2017 - 5:47 pm | पद्मावति

मस्त!

किसन शिंदे's picture

21 Mar 2017 - 6:14 pm | किसन शिंदे

बेस्ट! ती लाल कलरची अक्षरही पोटात गेली का भाजीसोबत ? =))

मदनबाण's picture

22 Mar 2017 - 5:26 am | मदनबाण

मस्त !

ती लाल कलरची अक्षरही पोटात गेली का भाजीसोबत ? =))
=)) =)) =))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 3 पेग :- Kannada Rapper Chandan Shetty

पाककृती झकास, करुन पहायला हवा.

कौशी's picture

21 Mar 2017 - 9:01 pm | कौशी

व्हेज कुर्मा करून बघायला हवा...

कौशी's picture

21 Mar 2017 - 9:01 pm | कौशी

व्हेज कुर्मा करून बघायला हवा...

रेवती's picture

22 Mar 2017 - 12:21 am | रेवती

झकास पाकृ व फोटू.

खादाड's picture

22 Mar 2017 - 7:28 am | खादाड
जागु's picture

22 Mar 2017 - 2:58 pm | जागु

मस्तच.

खादाड's picture

22 Mar 2017 - 5:23 pm | खादाड
अरुण मनोहर's picture

6 Apr 2017 - 10:29 am | अरुण मनोहर

मी करून पाहिली. करायला आणि खायला खूप मजा आली.
धन्यवाद.
फोटो --

tayaree

kurmaa

सविता००१'s picture

6 Apr 2017 - 5:08 pm | सविता००१

तुम्हाला आवडला ना... मग बास.
आप खूष तो हम भी.
पण फोटो मला दिसत नाहीयेत. बघायला आवडतील.

अरुण मनोहर's picture

7 Apr 2017 - 11:57 am | अरुण मनोहर

फोटो काल दिसत होते.
बघतो काय करता येईल ते

मस्त! नक्की करुन पाहणार.

काजू, बदाम, खसखस यांची मी पूडच करुन ठेवत असते, त्यामुळे घाईच्या वेळी वापरता येते.

सविता००१'s picture

8 Apr 2017 - 3:14 pm | सविता००१

मस्तच हो. छान आलेत फोटो.

अरुण मनोहर's picture

21 Apr 2017 - 4:09 pm | अरुण मनोहर

tayaree

अरुण मनोहर's picture

21 Apr 2017 - 4:09 pm | अरुण मनोहर

फ्लिकर वरून फोटो टाकता येत नाहीये.

विनिता००२'s picture

22 Apr 2017 - 12:26 pm | विनिता००२

करते मग सांगते :)