नाडी ग्रंथ पुरावा आणि ताडपत्रलेखनावरील अभ्यास कार्य

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
6 Oct 2008 - 12:49 am

नाडी भविष्य आणि ताडपत्रलेखनावरील अभ्यास कार्य
'नाडी भविष्यावर आता ओक साहेब काय म्हणतात ते ऐकण्याची उत्सुकता आहे.'
पुन्हा पुन्हा: नुस्तं "जाऊन पहा" असं म्हणण्यापेक्षा काही पटेलसं लिहिलंत तर "जाऊन पहा आणि मग बोला" असं म्हणण्याची वेळच येणार नाही. लोकं जातील, बघतील आणि स्वतःच प्रतिसाद देतील की "हो, या गोष्टींवर माझा अमुक-तमुक कारणांमुळे विश्वास बसला." पण मुळात ओळख करुन देणारं लिखाणच एवढं त्रोटक किंवा अविश्वसनीय वाटलं तर त्या लिखाणाचं, कदाचित विषयाचंही वर्णन तसंच होणार, आणि लोकांचं मतही!
वरील प्राथमिक प्रतिक्रियांच्यानंतर वरील चर्चेतील माझ्या या लिखाणानंतर वाट पाहूनही काहीही प्रतिक्रिया आल्या नाहीत यामुळे जरा चुकल्यासारखे वाटले. कदाचित या विषयातील सहभागी लेखनाचा बाज साशंकतेकडे वळणारा होता त्यामुळे कदाचित ह्या लेखनाकडे संपादक मंडळाचा पहाण्याचा दृष्टीकोन तसा असेल. असो.
ते काहीही असो, मी नाडी 'भविष्य' कथनाकडे 'पुढील कालातील गोष्टींचा कानोसा' असे पाहतो. त्यामुळे 'भविष्य कथन' या अंगाने या ताडपट्टयांकडे प्रथम पाहिल्यानंतर काही काळाने नाडी कथनाच्या ताडपट्ट्यात लिहिले आहे असे सांगितले गेलेले व टेप करुन दिलेले, ४० पानी वहीत श्लोकबद्ध केलेले केलेले लेखन खरोखरचे असते का? असेल तर काय असते? जे असते तेच वहीत लिहिलेले असते का? या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे.
त्या अभ्यासकार्यात असे दिसून आले की परदेशातून येऊन नाडी पट्ट्यांचे नमुने तेथील प्रयोगशाळेत नेऊन कार्बन १४ कसोटी घेऊन त्या विवक्षित नाडी पट्टीचे आयुष्य कमित कमी ३५० ते ४०० वर्षे असावे, तसेच त्यातील मजकुरची शहानिशा त्या देशातील तमिळ भाषातज्ञांकडून करवून घेऊन ते लिखाण ज्या व्यक्तिला उद्देशून केले गेलेले आहे ते त्याचेच असावे असा निर्वाळा, निष्कर्ष काढला जातो. पण त्या संदर्भात भारतीय नुसतेच तात्विक व तार्कीक चर्चा करून ते सर्व 'थोतांड' आहे. असे परस्पर आधीच ठरवून नाडीच्या ताडपत्राना शोधकार्याच्या कक्षेतून बाहेर का काढतो आहोत? भविष्य पहावे किंवा नाही या गोष्टीला तुर्तास कमी महत्व देऊन आपण या पट्ट्यातील अक्षर धनाकडे पाहू शकतो का? शेवटी ते अर्थहीन आहे असा निष्कर्ष निघेपर्यंत त्याचा पाठपुरावा करायला काहींनी कंबर कसायला नको का?
आपणापैकी किती तरी परदेशात विविध प्रयोगशाळांशी वा विद्यापीठांच्या पुस्तकालयाशी, भाषातज्ञांशी कारणपरत्वे जोडलेले असाल किंवा आपल्या मित्रपरिवारात, माहितीत अनेक असतील. त्यातील अनेक तमिळभाषी असतील त्यांच्याशी संपर्क करुन त्यांचे सहकार्य मिळवता येणे शक्य आहे काय? भारतातील लोक आणि विशेषतः मला भेटलेले तमिळ इतके दुरुत्साही आहेत की ज्यांना ते काम ऑफिशियली करायला हवे ते देखील हे काम करायला तयार नाहीत. नाडी केंद्रवाल्यांशी चर्चाकरून ते शोधकामाला तयार करायला ही सामान्यतः वेळ लागतो कारण त्यांची पारंपारिक मान्यता, एकूण भविष्यप्रकाराला प्रसिद्धी माध्यमातून दिली जाणारी प्रतिकूल प्रसिद्धी त्यामुळे निर्माण होणारी अनामिक भिती, अशामुळे त्यांचे सहकार्य मिळवताना कष्ट पडतात. तरीही आता ही परिस्थिती बदलते आहे. काही नाडीकेंद्रात शोधकार्य करायला ते ही तयार होत आहेत. अशा परिस्थितीत या अभ्यासकार्यात कोणी मदत करु इच्छित असेल तर मला ती हवी आहे.
खालील प्रतिक्रियेला प्रतिसाद न आल्यामुळे पुन्हा चिकटवत आहे. तरी रोष नसावा.

राहिला प्रश्न पुराव्याचा –
माझ्या पुस्तकात गेल्या कित्येक वर्षांपासून खालील रंगीत फोटो दिलेला आहे. त्यात प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्तीचे नाव कसे कोरून लिहिलेले असते याचा पुरावा पहायला मिळतो. त्या दोन वेगवेगळ्या महर्षींच्या पट्या असून, काही वर्षांच्या अंतराने, वेगळ्या व्यक्तीच्या संदर्भात शोधल्या गेल्या होत्या.
गैरतमिळांना ती अक्षरे वाचायला सोपा जावीत यासाठी सोबतची चौकट येथे पहावी. त्यातून लिपीचा आणखी खुलासा होईल.या शिवाय त्या फोटोतील उरलेला मजकूर काय आहे याचा वेगळा खुलासा इंग्रजी पुस्तकातून व नाडीवरील वेब साईटवरून होईल.

मग मित्र हो ऐका,
आत्ता पर्यंत आपण नाडी ग्रंथ भविष्याच्या विरोधातील एका बाजूचे विचार वाचलेत वा ऐकलेत असतील. मात्र त्याविरोधी विचारांच्या संदर्भात समर्पक उत्त्तरे मी आणि प्राचार्य गळतगे व अन्य लोकांनी कित्येक वर्षापूर्वी लेखातून व पुस्तकातून सडेतोडपणे दिलेली आहेत. त्यामुळे त्याच त्याच पोकळ आक्षेपांना उत्तरे देण्यात आम्हाला काही स्वारस्य उरलेले नाही. म्हणून मी त्याविषयी लिहायचे टाळतो. त्याचा अर्थ नाडीवर पुरावे देऊन लिहिण्यासारखे काही राहिले नाही वा नसेल म्हणून ओकबुवांची (एकांनी मला दिलेले नाव) दातखीळ बसली असावी व आता तरी त्यांच्या भूलथापांना खंड पडेल असे वाटले असावे. त्यांचा असा ग्रह होणे अत्यंत स्वाभाविक आहे. त्यांना तसे वाटले तर मला काही वाटणार नाही. कारण आत्ता पर्यंतच्या लिखाणामुळे या मंडळीची मानसिकता नाडी ग्रंथ भविष्याकडे कुत्सितपणे पहाण्याची व मानण्याची असल्याने त्यांना कितीही तर्कपूर्ण पुराव्यांनिशी दाखवून दिले तरी मीच काय कोणीही त्यांना पटवून - समजाऊन सांगून मान्य करायला लावणे शक्य नाही. हे वेगळे सांगायला नाडी पट्टया पहायची गरज नाही. अशा बुद्धिवादी लोकांनी मी, विंग कमांडर ओक, सांगतो म्हणून नाडी भविष्य मानावे असा माझाही मुळीच आग्रह नाही. पण काही गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो त्यापैकी ही एक बाब आहे.
काहींचा असा दावा आहे की मी अनुभव घेणार नाही. आम्ही नाडी भविष्याचा अनुभव घेतला आहे असे जे दावा येथे करतात त्यांनीही प्रत्यक्ष त्यांच्या संदर्भात नाडीपट्ट्या पाहिलेल्या नाहीत. तुम्ही सादर केलेले पुरावे ही पहाणार नाही. तुमच्या पुराव्याचे खंडनही करणार नाही. तरीही नाडी भविष्याला मान्यताही देणार नाही. कारण आमची विचारधारा अशा प्रकारांना मान्यता देत नाही. मग ते डॉ.जयंत नारळीकर असोत किंवा नागपूरचे प्रकांड पंडीत डॉ. नी. र. वऱ्हाडपांडे असोत किंवा स्वर्गीय महान डॉ. अब्राहम कोऊर असोत वा पालघाटच्या भागातील श्री. बी.प्रेमानंद असोत. या सर्व लोकांच्या नाडी भविष्यावरील विचारांना अत्यंत तर्कपूर्ण आणि पुराव्यानिशी उत्तरे गेलेली आहेत. तरीही ‘अजून माझे वैयक्तिकरित्या जोवर समाधान होत नाही तोवर मी कसे मानू’ असा प्रत्येकाचा प्रश्न असल्याने मी कोणा कोणाचे समाधान करत फिरणार? शिवाय, ‘ओक, हे पुरावे ठीक आहेत हो. पण आणखी पुरावा आणा. मग मानायचे की नाही ते पाहू. असे प्रत्येक वेळी हुलकावणी देणारे व आपली वैचारिक हार मान्य न करणाऱ्यांची भूक भागवणे कोणाला तरी शक्य आहे काय? असो.
असे जरी असले तरीही मी असा प्रस्ताव मांडू इच्छितो की जर मिसळपावचे आणि उपक्रमींचे संपादकमंडळ माझ्या विचारांची गळचेपी करणार नसतील तर मी त्यांना अशी विनंती करू इच्छितो की माझ्या आत्ता पर्यंतच्या लिखाणाला त्यांच्या त्यांनी माध्यामातून समाविष्ट करायला मान्यता द्यावी. तसे असेल तर मी त्यांना ‘बोध अंधश्रद्धेचा’ या पुस्तकाची एक प्रत सप्रेम भेट पाठवू इच्छितो. त्यावरून त्यांनी ते पुस्तक आपल्या माध्यामातून जगाच्या पाठीवरील कोणाही मराठी वाचकाला वाचायला मिळण्याची आयती सोय होईल. सध्या माझ्य़ाजवळ अशी यंत्रणा वा तांत्रिक ज्ञान उपलब्ध नाही की मी आपल्या बळावर हे काम करू शकेन. अर्थात ही मी घर बसल्या नाडी भविष्याची फुकटात जाहिरातबाजी करायला मागत आहे, असे वाटत असेत तर माझा काही आग्रह नाही.
माझा असा पुर्व अनुभव आहे की नाडी भविष्याविरुद्ध जरा खुट्ट झाले की पुरोगामी विचारांचा मुखवटा चढवलेल्या प्रसिद्धी माध्यमातून मोठ्या अक्षरात छापून येते पण त्याचा प्रत्यावाद केलेल्या लिखाणाची साधी दखलही घेतली जात नाही. सध्या त्य़ांची ती गरज असल्याने मी त्यांची कुचंबणा समजू शकतो. असो.

ज्योतिषअनुभव

प्रतिक्रिया

धनंजय's picture

6 Oct 2008 - 7:09 am | धनंजय

या लिपीचा आणि साहित्याचा अभ्यास तुमच्याकडून व्हावा, आणि प्रकाशन व्हावे, याबाबत शुभेच्छा.

प्राचीन तमिळचे माझे भांडवल एकदोन तिरुक्कुरळ आणि शिलप्पाधिकारम् चे इंग्रजी-अनुवादित पाठ्य इतपतच आहे (म्हणजे काहीच नाही.) तमिळच्या अभ्यासासाठी कधी वेळ मिळाल्यास ते त्रोटक वाचन पुढे चालवायचा मनसुबा प्रतीक्षा यादीत पडले आहे :-(

तमिळ-मराठी द्वैभाषिक विद्वान सापडल्यास त्याची तुम्हाला मदत व्हावी. पट्ट्या ३५०-४०० वर्षांपूर्वीच्या आहेत, म्हणजे तंजावर येथील मराठेशाहीच्या काळातल्या. त्या काळाबद्दल ऐतिहासिक संशोधन करणारे तमिळ-मराठी दुहेरी विद्वान शोधून सापडल्यास बहुधा तुमच्या कार्याबद्दल त्यांना सांगता येईल.

शशिकांत ओक's picture

8 Oct 2008 - 12:40 am | शशिकांत ओक

घनंजय यांना,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
किंबहुना आपल्या अनेक विषयावरील शोधपुर्ण लिखाणामुळे मी या साईटवर पुरावा देण्याच्यासाठी उद्युक्त झालो.

विजुभाऊ's picture

6 Oct 2008 - 10:25 am | विजुभाऊ

वरील प्राथमिक प्रतिक्रियांच्यानंतर वरील चर्चेतील माझ्या या लिखाणानंतर वाट पाहूनही काहीही प्रतिक्रिया आल्या नाहीत यामुळे जरा चुकल्यासारखे वाटले
शहाण्या मिपाकरानी सरळ सरळ तुमच्याकडे दुर्लक्ष्य केले. यातच काय ते समजुन घ्यावे.

खालील प्रतिक्रियेला प्रतिसाद न आल्यामुळे पुन्हा चिकटवत आहे. तरी रोष नसावा

रोष नाहीच पण आता कीव करावीशी वाटते.

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Oct 2008 - 10:30 am | llपुण्याचे पेशवेll

यावर अधिक कार्य, संशोधन व्हावे अशी अपेक्षा आहे.
(मॅटर अँटीमॅटर अशा वैज्ञानिक अंधश्रध्दा न मानणारा)
पुण्याचे पेशवे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2008 - 10:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

(मॅटर अँटीमॅटर अशा वैज्ञानिक अंधश्रध्दा न मानणारा)

पेशवे, अंधश्रद्धा आणि प्रयोगातून सिद्ध होणारं विज्ञान या दोन भिन्न गोष्टी आहेत.

"मॅटर"तर आपण पहातोच किंवा आपण बनलेलो आहोत ते मॅटर आहे. "पॉझिट्रॉन्स" हे इलेक्ट्रॉनचं "अँटीमॅटर" आहे. पॉझिट्रॉन्सचं अस्तित्व, त्याचे गुणधर्म या सर्व गोष्टी प्रयोगातून सिद्ध झालेल्या आहेत आणि त्याला अंधश्रद्धा म्हणणे हे शुद्ध अज्ञान आहे. अर्थात, कोणालाही अज्ञानातच आनंद मानायचा असेल तर मी काय बोलणार, रहा आनंदात. पण मॅटर अँटीमॅटर याचं अस्तित्त्व हे वैज्ञानिक प्रयोगांचे निष्कर्ष आहेत, त्याला सबळ सिद्धांतांचा पाठींबा आहे, त्याला अंधश्रद्धा म्हणल्यावर राहवलं नाही म्हणून हा प्रतिसाद-प्रपंच!

बाकी चालू द्या!

अदिती

विसोबा खेचर's picture

6 Oct 2008 - 11:10 am | विसोबा खेचर

ओकांचे कौतुक वाटते....!

शुभेच्छा..!

तात्या.

--

वातीचा कापूस ऐन वेळेस नाही मिळाला तर आम्ही लेंग्याची नाडी थोडीशी कापून, तिची वात करतो व दिवा लावतो.

अभिरत भिरभि-या's picture

6 Oct 2008 - 12:06 pm | अभिरत भिरभि-या

तमिळी लिपिच्या माझ्या (अल्प) ज्ञानानुसार एकाच अक्षराचे एकाधिक उच्चार होऊ शकतात. देवनागरीप्रमाणे हे १:१ ( एकास एक) representation ( मराठी शब्द ?) नाही. दिलेल्या अक्षराचा उच्चार संदर्भाप्रमाणे केला जातो.
बोलायचेच झाले तर दिलेल्या तमिळ "क" चा उच्चार ग ही असु शकतो. या शिवाय इतर ही ३ उच्चार होऊ शकतात.
आता हे मद्रासी वाचतात नक्की कसे हे तो मुरुगनच जाणे ! पण मुळातचशशिकांत "तदिहांड " ही नसु शकतो काय ?
( आधिच इतका गोंधळ असताना दिलेल्या पट्ट्या किती सुवाच्य आहेत हे तर दिसतेच आहे) बाकी या विषयावर कोणी भाषातज्ड्न्यांनी जास्त प्रकाश टाकावा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2008 - 12:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

देवनागरीप्रमाणे हे १:१ ( एकास एक) representation ( मराठी शब्द ?) नाही.
बर्‍याच अंशी हे खरं आहे, पण सगळ्या वेळेलाच नाही, त्यामुळे असहमत! काही मोजकी उदाहरणं आहेत जी हे वाक्य खोडून काढू शकतात. उदा:
१. मोठं दिव्याला सामोरी जाऊन मी दिव्याला गाडीतून उतरले (दिवा हे मध्य रेल्वेवरचं एक स्थानक आहे).
२. जहाज आणि जेते या दोन शब्दांतल्या "ज"चा उच्चार वेगवेगळा होतो.
३. चमच्यातल्या "च" चा आणि उच्चारातल्या "च" ची अशीच गंमत आहे.
४. "झेंडूचं झाड" यातले "झ"पण वेगवेगळे उच्चारले जातात.

मला तमिळ येत नाही, आणि तुम्हाला येते असा समज करून घेऊन बाकी तुमच्या मूळ मुद्द्याशी सहमती दर्शवते. :-)

(खुस्पटप्रिय) अदिती

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Oct 2008 - 12:53 pm | llपुण्याचे पेशवेll

पूर्वी ज, च, झ याचे उच्चार अनुक्रमे जहाज, चमक, झाड याप्रमाणं असतील तर त्याखाली उच्चार स्पष्टपणे कळण्यासाठी त्याखाली नुक्ता देण्याची पद्धत होती. विनोबांच्या गीताई मधे ती प्रकर्षाने पाळली गेली असल्याचे दिसते.
'आंडमन सोलरा अरुणाचलम् मुडिकेला'- रजनीअण्णाचे अजून एक वाक्य :)
(मॅटर अँटीमॅटर अशा वैज्ञानिक अंधश्रध्दा न मानणारा)
पुण्याचे पेशवे

अभिरत भिरभि-या's picture

6 Oct 2008 - 12:41 pm | अभिरत भिरभि-या

उदा १ सोडुन इतरांशी सहमत .. दिवा शब्दाचे दोन अर्थ हे भाषा-अवलंबी आहे .. येथे लिपीचा संबध नाही .
उद २ - ४
हे बरोबर आहे"च,ज,झ"चे एकाधिक उच्चार हा नियमाला अपवादासारखे आहे.

बाकी मला तमिळ तेरियादे ( येत नाय)
रजनी अण्णाचे एक वाक्य सोडुन "नान ओरु तडवई सोन्ना, नुरु वाटी सोन्ना मादरि" ( मी एकदा सांगितले म्हणजे शंभरदा सांगितले समज)

घाटावरचे भट's picture

6 Oct 2008 - 1:32 pm | घाटावरचे भट

'कण्णा, पण्णिदान कूटम लवरम...सिंघम सिंगल दान' - इति रजनीअण्णा (चित्रपट - शिवाजी : द बॉस)

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

अभिरत भिरभि-या's picture

6 Oct 2008 - 1:58 pm | अभिरत भिरभि-या

'कण्णा, पण्णिदान कूटम लवरम...सिंघम सिंगल दान' - इति रजनीअण्णा (चित्रपट - शिवाजी : द बॉस)

गड्या, डुकरे (शिकारीला) गटाने येतात .. सिंह एकट्यानेच करतो

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2008 - 2:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपणास खूप तामिळ येते असा निष्कर्ष काढला आहे तेव्हा आता त्या कूट तामिळचं काय ते सांगा लवकर. ;-)

नाहीतर आपणांस कुटण्यात येईल ह. घ्या. हे सां. न ल.

अभिरत भिरभि-या's picture

6 Oct 2008 - 2:50 pm | अभिरत भिरभि-या

"नान ओरु तडवई सोन्ना - तमिळू तेरियादे , नुरु वाटी सोन्ना मादरि" ( मी एकदा सांगितले तमिळ येत नाय म्हणजे शंभरदा सांगितले समज)
अण्णा वरु रजनीकांत वाळगे !!

धमाल मुलगा's picture

6 Oct 2008 - 4:06 pm | धमाल मुलगा

पण अभिरत भौ,
तुम्ही हे सगळं तामिळमधून का सांगताय?

वाचुन कळेना झालंय आणि मोठ्यानं वाचलं तर जिभेच्या जिलब्या होतायत...
मी हे मोठ्यानं वाचल्यावर माझ्या क्युबिकलमधलं येडं माझ्या तोंडाकडं बघायलाच लागलं ना राव.

भारीये पण...चालु द्या..तामिळही शिकता येईल असं हळुहळु.. (तेव्हढंच एखाद्याला पकवायला बरं पडेल ;) )

-(ना उन्नी कादलीकरे (की असंच कायसं) ह्यापलिकडे तामिळ न कळणारा) धमिळ

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2008 - 4:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> "नान ओरु तडवई सोन्ना - तमिळू तेरियादे , नुरु वाटी सोन्ना मादरि" ( मी एकदा सांगितले तमिळ येत नाय म्हणजे शंभरदा सांगितले समज)
अहो आन्ना वरू (का वळू), तुम्ही एकदा सांगा नाहीतर हजारदा, एकदा मन्लं तुमाले तमिळ येता तर येता! उगाच वाद नका घालू, नायतर एलियनच्या गोष्टीत तुम्हाला व्हीलन बनवेन!

अधिथी (टान्याची)

ऋषिकेश's picture

6 Oct 2008 - 1:49 pm | ऋषिकेश

उदा १ सोडुन इतरांशी सहमत .. दिवा शब्दाचे दोन अर्थ हे भाषा-अवलंबी आहे .. येथे लिपीचा संबध नाही .

माझ्यामते संबंध आहे. दिव्य आणि दिवा हे दोन वेगळे शब्द त्यांना विभक्ती-प्रत्यय लावल्यानंतर होणारे उच्चारही वेगळे तरीही लिहिताना सारखे लिहिले जाते.. "दिव्या"
दिव्याखाली अंधार आणि एखाद्या दिव्यातून जणे

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

विजुभाऊ's picture

6 Oct 2008 - 12:38 pm | विजुभाऊ

तरीही "नाडी" या शब्दाचे कसेही करायचे म्हंतले तरी दोन उचार होत नाहीत.
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

शशिकांत हे नाव दिसले यात चमत्कार तो काय व पुरावा कसला काही समजले नाही. :-(

उरलेला मजकूर काय आहे याचा वेगळा खुलासा इंग्रजी पुस्तकातून व नाडीवरील वेब साईटवरून होईल.
जमल्यास इथे सांगावा.

तसेच त्या पट्टीचे वय ३०० ते ४०० वर्षे असेल पण मग ४०० वर्षापुर्वी ही थोतांड, फसवेगिरी नव्हती कशावरुन?

बाकी ही लिपी, मजकुर काय असेल हे शोधकार्याला शुभेच्छा. यातुन नक्की साध्य काय होईल याबाबत साशंक.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2008 - 1:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहजरावांचं खरं नाव सहज नसावं, तर नाडीपट्टीवर काय नाव सापडेल?

अदिती
हे माझं खोटं नाव आहे, पण कोणीतरी (से*रायटर?) म्हटलंच आहे "नावात काय आहे?"

या लेखांवरच्या प्रतिक्रियांवरून विदा काढल्यास असे लक्षात यावे की आमच्या आजी... ओक साहेबांचे लेख खुद्द ओकांपेक्षा जास्त वेळा ऍक्सेस करत्यात ... आणि सर्वांत जास परतिकिरया बी त्यांच्याच .. त्यामुळं आमी त्यांना वाढदिवसाच्या बेंबीच्या देठापासून बोंब-बोंब-बोंबलून शुभेच्छा देतो .. (.....अरे.. कोणी आहे का रे ? मी इथे पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात .. येउन द्या कौलं पटापट)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2008 - 3:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> त्यामुळं आमी त्यांना वाढदिवसाच्या बेंबीच्या देठापासून बोंब-बोंब-बोंबलून शुभेच्छा देतो ..
ठेंकू! पण त्या जरा जुन्या तमिळमधे दे की!

ऋषिकेश's picture

6 Oct 2008 - 3:49 pm | ऋषिकेश

बोंब भाषेनुसार बदलेल का?

-() ऋषिकेश

मृगनयनी's picture

6 Oct 2008 - 5:29 pm | मृगनयनी

"नाडी जोतिष" हे एक शास्त्र आहे. जपान, जर्मनि, स्वित्झर्लँड... इ अनेक देशांतुन ही लोकं नाडी-पट्टी बघण्यासाठी चेन्नईला येतात. याचे फोटो आणि स्वाक्षरीसहित पुरावे आहेत. या विश्वात प्रत्येकाच्या अंगठ्याचे ठसे वेगवेगळे असतात. चुकुनही कोणत्याही मनुष्याचे अंगठ्याचे ठसे जगातल्या इतर कोणत्याही ठश्याशी मिळते-जुळते नसतात.

विशेष म्हणजे मध्यंतरी, बाणेर-रोड वरील नाडी-जोतिष केन्द्रात १ तृतीयपंथी माणुस आपली पट्टी बघण्यासाठी आला होता. त्याची पट्टी देखील सापडली. पट्टीनुसार या माणसाच्या पूर्व-जन्मीच्या एका भयंकर दुष्कृत्यामुळे या जन्मी तो "हिजडा" म्हणुन जन्माला आलेला होता. पुर्वजन्मी तो एक पुरुष होता. आणि आपल्या उतरत्या वयात असताना, त्याने एका मुलीवर पाशवी बलात्कार केला होता. त्यामुळे या जन्मी तो जन्मतः "हिजडा" म्हणुन जन्माला आला.
त्याच्या पट्टीमध्ये असे स्पष्ट पणे लिहिलेले होते. की त्याच्या वयाचा आणि इतर गोष्टींचा विचार करता, मागच्या जन्मी त्याला इतके कठोर फळ मिळणे केवळ अशक्य होते. त्यामुळे या जन्मी त्याला 'असा' जन्म मिळाला.
आपणास पुरावा हवा असल्यास," बाणेर रोड- डांगे चौक, थेरगाव." येथील नाडी-जोतिष केन्द्रात जाऊन खात्री करुन घ्यावी.

" नाडि-जोतिष " हे एक दैवी शास्त्र आहे. आपल्या पूर्व-कर्मानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळतो. आणि भोगही मिळतात. या 'भोगां' मध्ये चांगले आणि वाईट या दोन्ही गोष्टींचा समावेश असतो. परन्तु, या जन्मीचे कर्म मात्र आपल्या हातात असल्यामुळे, शक्य तितके चांगले कर्म करुन नशीबाच्या वाईट 'भोगां' ची धार आपण निश्चितच कमी करु शकतो.

हरि ओम!

टारझन's picture

6 Oct 2008 - 5:54 pm | टारझन

मी फक्त नैनी आहे म्हणऊन (गटणे ष्टाइल ने) सहमत आहे असे म्हणतो ..
बाकी नैनीची अंधश्रद्धा असली पाहिजे भरपूर .. नैने .. प्रतिक्रिया वाचुन अंमळ करमणूक झाली ... बाकी यापुढच्या पिढी मधे हिजड्यांची संख्या वाढली पाहीजे ...

मागच्या जन्मी मी फार पळकुटा असला पाहिजे .. आणि नेक्स्ट जमी मी मुका होणार कारण लहाणपणी मी लै लै सरडे आणि बेडकं मारलित

नास्तिक आज्जींचा नातु
-- (टारुबाळ)
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

सखाराम_गटणे™'s picture

7 Oct 2008 - 11:16 pm | सखाराम_गटणे™

>>मी फक्त नैनी आहे म्हणऊन (गटणे ष्टाइल ने) सहमत आहे असे म्हणतो ..
सहमत

>>आणि नेक्स्ट जमी मी मुका होणार कारण लहाणपणी मी लै लै सरडे आणि बेडकं मारलि
अरे, मुके प्राणीवर दया करत जा.

-----
आम्ही पुजेला सुपार्‍या, दुर्वा सगळे ठेवतो, त्यामुळे, दिव्यात तुप नसले तरी चालते.
:)

सहज's picture

6 Oct 2008 - 6:25 pm | सहज

त्या पट्टीवर अंगठ्याचे ठसे देखील असतात? ३०० ते ४०० वर्ष टिकलेले?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2008 - 6:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इथे आत्तापर्यंत नाडीवरुन बरेच विनोदही झाले, पण नाडी म्हणजे नक्की काय? मला चित्रात पट्टी आणि कूटलिपी दिसली, अत्री ऋषी होते ते समजलं, नाडी म्हणजे काय हे नाही कळलं! कोणी सांगणार का?

जपान, जर्मनि, स्वित्झर्लँड... इ अनेक देशांतुन ही लोकं नाडी-पट्टी बघण्यासाठी चेन्नईला येतात.
असे परदेशी लोक नसते आले तर हे सगळं थोतांड आहे असं आपण मान्य केलं असतं का?
या प्रश्नाचं उत्तर नाही असेल तर मग परदेशी लोकांनी कौतुक केलंय म्हणून आम्ही विश्वास ठेवावा अशा प्रकारचं विधान नका करु. आम्हाला आमचा विचार करु द्यात.

की त्याच्या वयाचा आणि इतर गोष्टींचा विचार करता, मागच्या जन्मी त्याला इतके कठोर फळ मिळणे केवळ अशक्य होते.
त्या माणसाला "अमर" बनवलं असतं तरी चाललं असतं, नाही का?
आणि याजन्मीच्या हिजड्यानी बालपणापासून सगळ्यांवर उपकार केले असते तर तो पुन्हा पुरूष किंवा स्त्री झाला असता का, या जन्माततर भरपूर वेळ होता/आहे ना?
आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे "तृतीयपंथी असणं ही शिक्षा आहे" असं त्या माणसाला किंवा इतर कोणालाही वाटणं ही गोष्ट आपल्या संपूर्ण समाजासाठी लाजिरवाणी आहे.

आपणास पुरावा हवा असल्यास," बाणेर रोड- डांगे चौक, थेरगाव." येथील नाडी-जोतिष केन्द्रात जाऊन खात्री करुन घ्यावी.
अतिअवांतरः बाणेर रस्त्यावर डांगे चौक कुठे आहे ते मला आपण कृपया गुगल मॅप्सच्या लिंकने दाखवू शकाल काय?

आपल्या पूर्व-कर्मानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळतो. आणि भोगही मिळतात. या 'भोगां' मध्ये चांगले आणि वाईट या दोन्ही गोष्टींचा समावेश असतो. परन्तु, या जन्मीचे कर्म मात्र आपल्या हातात असल्यामुळे, शक्य तितके चांगले कर्म करुन नशीबाच्या वाईट 'भोगां' ची धार आपण निश्चितच कमी करु शकतो.
या गोष्टीबद्दल नाडीवाल्यांची मोनॉपोली नसणार, नाही का? पुराणं इत्यादींचा अभ्यास करणारे याबद्दल जास्त बोलू शकतील, मी नाही.
यावर आधारित प्रश्न: आपलं शंकासमाधान होईपर्यंत प्रश्न विचारणं हे दुष्कर्म का सुकर्म?
आणि तुम्ही म्हणत असाल अमूक गोष्ट जी मला उपभोगायला मिळत आहे ती चांगली आहे (उदा: या नाडीबद्दल माहिती), मला ती वाईट वाटत असेल (किंवा उपयोगशून्य वाटत असेल) तर... किंवा तुम्ही जसं म्हणता तृतीयपंथी म्हणून जन्माला येणं ही शिक्षा आहे, पाश्चिमात्य देशात त्यांचं जीवन एवढं वाईट नाही. आपल्याकडेही काही भाग्यवान बॉलिवूडमधे चमकले आहेत, आता ते चांगलं का वाईट, हे कोण ठरवतं? माझ्या माहितीत महर्षीतर कधीच निवर्तले, मग कोणाला अधिकार आहे हे ठरवण्याचा?

माझ्या आयुष्यात काही दु:खद घटना घडल्या त्यामुळे मला तत्कालिक दु:ख झालं; पण नंतर त्यामुळे मी फारच खंबीर झाले, ज्या गोष्टी येतील त्यांच्याशी गरज पडली तर लढायला शिकले तर ती दु:खद घटना चांगली का वाईट?
मृगनयनीबाई, आपण फार काही म्हातार्‍या नसणार, कदाचित वयानी लहानच असाल माझ्यापेक्षा! तेव्हा एकच सल्ला देते न मागता, समोर आलेल्या गोष्टीला चांगलं म्हणायचं का वाईट हा प्रश्न महत्त्वाचा नसतो; महत्त्वाचं असतं ते आपण एखाद्या गोष्टीकडे काय म्हणून बघतो, कोणत्या दृष्टीकोनातून बघतो. कूट तामिळ लिपीत काहीही लिहिलेलं असेल, पण तुम्ही मेहेनत आणि प्रयत्न केलेत, आशावादी दृष्टीकोन ठेवलात तर तुम्हाला कोणीही पराजित करु शकत नाही.

(आपली हितचिंतक) अदिती

महेश हतोळकर's picture

7 Oct 2008 - 5:55 pm | महेश हतोळकर

"नाडी जोतिष" हे एक शास्त्र आहे. जपान, जर्मनि, स्वित्झर्लँड... इ अनेक देशांतुन ही लोकं नाडी-पट्टी बघण्यासाठी चेन्नईला येतात.
या दोन वाक्यांचा परस्परसंबंध कळला नाही. दुसरे म्हणजे, नाडी जोतिष हे जर एक शास्त्र असेल तर याचे नियम कुठे मिळतील? म्हणजे
पदार्थ विज्ञान हे एक शास्त्र आहे. ते पदार्थाच्या स्थीती, गती आणि इतर भौतिक गुणधर्मांचा अभ्यास करते. या शास्त्राचे मुलभूत नियम कधीही बदलत नाहीत. उदा. "पदार्थाच्या सद्यस्थीती मध्ये बाह्य बल लावल्या शिवाय बदल होत नाही" हा नियम न्युटन म्हणाला म्हणून नव्हे तर त्याचा पडताळा आला म्हणून जग्नमान्य आहे. नाडी जोतीष जर एक शास्त्र असेल तर त्याचे नियम आणि ते पडताळून पाहण्याच्या पद्धती कुठे मिळतील?

या विश्वात प्रत्येकाच्या अंगठ्याचे ठसे वेगवेगळे असतात. चुकुनही कोणत्याही मनुष्याचे अंगठ्याचे ठसे जगातल्या इतर कोणत्याही ठश्याशी मिळते-जुळते नसतात.
या विधानावर सतत आक्षेप घेतला गेलेला आहे. जर वेगवेगळे असतील तर जातकाला इतर प्रश्न का विचारले जातात. मी जर फक्त माझा ठसा देऊन गप्प बसलो तर मला माझे भविष्य कळेल काय?

विशेष म्हणजे मध्यंतरी, बाणेर-रोड वरील नाडी-जोतिष केन्द्रात १ तृतीयपंथी माणुस आपली पट्टी बघण्यासाठी आला होता. त्याची पट्टी देखील सापडली. पट्टीनुसार या माणसाच्या पूर्व-जन्मीच्या एका भयंकर दुष्कृत्यामुळे या जन्मी तो "हिजडा" म्हणुन जन्माला आलेला होता. पुर्वजन्मी तो एक पुरुष होता. आणि आपल्या उतरत्या वयात असताना, त्याने एका मुलीवर पाशवी बलात्कार केला होता. त्यामुळे या जन्मी तो जन्मतः "हिजडा" म्हणुन जन्माला आला.
त्याच्या पट्टीमध्ये असे स्पष्ट पणे लिहिलेले होते. की त्याच्या वयाचा आणि इतर गोष्टींचा विचार करता, मागच्या जन्मी त्याला इतके कठोर फळ मिळणे केवळ अशक्य होते. त्यामुळे या जन्मी त्याला 'असा' जन्म मिळाला.
आपणास पुरावा हवा असल्यास," बाणेर रोड- डांगे चौक, थेरगाव." येथील नाडी-जोतिष केन्द्रात जाऊन खात्री करुन घ्यावी.

येथे अदितीशी सहमत. तृतीयपंथी असणे पाप अथवा गुन्हा नक्कीच नाही. ते एक जन्मजात शारीरिक व्यंग आहे (जन्मजात अंधत्वा सारखे). आधिच कुष्ठरोगाला पाप समजल्यामुळे समाजाचे फार नुकसान झाले आहे. आता हे आणि नको.

" नाडि-जोतिष " हे एक दैवी शास्त्र आहे. आपल्या पूर्व-कर्मानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळतो. आणि भोगही मिळतात. या 'भोगां' मध्ये चांगले आणि वाईट या दोन्ही गोष्टींचा समावेश असतो. परन्तु, या जन्मीचे कर्म मात्र आपल्या हातात असल्यामुळे, शक्य तितके चांगले कर्म करुन नशीबाच्या वाईट 'भोगां' ची धार आपण निश्चितच कमी करु शकतो.

पुन्हा तेच. शास्त्रा ची व्याख्या काय?

मृगनयनी यांना,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
किंबहुना आपल्या अनेक विषयावरील शोधपुर्ण लिखाणामुळे मी या साईटवर पुरावा देण्याच्यासाठी उद्युक्त झालो. अन्यथा तेच तेच लिहून मला कंटाळा आला आहे. म्हणून मी सुचवले की माझी पुस्तके वाचा. वेबसाईट पहा.

विजुभाऊ's picture

6 Oct 2008 - 6:00 pm | विजुभाऊ

मागच्या जन्मीच्या कर्मामुळे मी या जन्मी काय करणार आहे ते ठरणार असेल तर या जन्मात मी केलेल्या पापाना माझ्या मागच्या जन्मातली कर्मे जबाबदार ठरतात
या जन्मात झालेल्या ( माझ्या कडुन घडलेल्या) ज्यात माझा स्वतःचा निर्णय काहीच नाही त्या कर्माच्या फलाला मी जबाबदार नसताना ती फले मला पुढच्या जन्मात भोगावी लागतील
उदा : मी या जन्मी मुंगी चिरडुन मारली. तर ती मुन्गी कोणत्यातरी जन्मात मला चिरडुन मारेल.
मग त्या मुन्गीला पुढच्या कोणत्यातरी जन्मात मी चिरडुन मारेन ( व्हिशस सर्कल होतेय हे.) :SS
भाज्यानाही जीव असतो. याचा अर्थ पुढचचे अनेक जन्म मला चिरुन मृत्यु येणार असा होतो.

अवांतर : सर्व प्राण्याना आत्मे असतात. मग फक्त मनुश्यांचीच फक्त भूते होतात. कोम्बडीचे झुरळाचे अथवा मेथीच्या भाजीचे भूत का होत नाही ( कल्पना करा तंगडी तोडताना कोम्बडीचे भूत त्या तंगडीवर उभे आहे

अभिरत भिरभि-या's picture

6 Oct 2008 - 6:24 pm | अभिरत भिरभि-या

शेम प्रश्न आपुनलाबी पडला होता..

संस्कॄतात मटणाला मांस का म्हणतात याचे म्हणे हेच कारण आहे ..
मांस म्हणजे मांम् सह् | (माझेही तसेच होऊ दे) .. मी मटण खातो पुढच्या जन्मात मलाही असेच कोणितरी खाणार

आंबोळी's picture

7 Oct 2008 - 11:08 pm | आंबोळी

संस्कॄतात मटणाला मांस का म्हणतात याचे म्हणे हेच कारण आहे ..

अरे हे काय चाललय? मटण काय .. मांस काय... (केश्या झोपलास काय? प्रेतं प्रेतं म्हणून कोण ओरडणार?)... काय चाललय काय?
किती भरकटवताय विषय?
सगळ्यांनी प्लिज नाडीवर काँसंट्रेट करा...

आंबोळी

विसोबा खेचर's picture

6 Oct 2008 - 7:06 pm | विसोबा खेचर

आपल्या नाड्या सैल असोत वा कितीही आवळलेल्या असोत, जे व्हायचं ते होणारच आहे!

नियतीला कुणीच जिंकू शकत नाही, मग साला का चिंता करा..?

आपला,
(बिनधास्त) तात्या.

विजुभाऊ's picture

7 Oct 2008 - 10:24 am | विजुभाऊ

संस्कॄतात मटणाला मांस का म्हणतात याचे म्हणे हेच कारण आहे ..
मांस म्हणजे मांम् सह् | (माझेही तसेच होऊ दे) ..

हे केवळ खाण्याच्या पदार्थाचे नाही.
पैगम्बरानी अन्न शाकाहारी/ माम्साहारी या बद्दल म्हंटलय
तुम्ही काहिही खा हत्या ही होणारच. वनस्पती किंवा प्राणी यांचे जीव घेतल्या शिवाय तुम्ही जगु शकणार नाही.
तुमचे शरीर हे तुम्ही खाता त्या अन्नामुळे बनलेले आहे. तुमच्या शरीराचा एखादा हिस्सा हा कधीतरी कोणतातरी जीव होताच. तो जीव तुमच्या रुपात अंशतः वावरत आहे.

गौरी .'s picture

7 Oct 2008 - 1:20 pm | गौरी .

kuthlyahi goshtiwar tika karnya aadhi tymagche shastra kay aahe te samjun nako ka ghyla?
Itkya junya kalatil shsta aahe te tar tyat kahi tari point aselch na?

Sorry 4 marathi... navinch aahe ajun marathit nit type karta yet nahi.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Oct 2008 - 2:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

गौरी ताई/माई/आक्का,

पहिले मिसळपाववर आपलं स्वागत.

>> kuthlyahi goshtiwar tika karnya aadhi tymagche shastra kay aahe te samjun nako ka ghyla?
आम्ही कधीपासून तेचतर म्हणतोय! नुसतं "चमत्कार, चमत्कार" म्हणू नका, शास्त्र समजावून सांगा. आता इथे काही लिहित नाहीत ना समजावून सांगत, इच्छा असेल समजून घेण्याची तरी समजणार कसं?

>> Itkya junya kalatil shsta aahe te tar tyat kahi tari point aselch na?
अहो, पूर्वी पृथ्वी सपाट आहे म्हणायचे, आता विश्वास ठेवणार का त्यावर तुम्ही? पूर्वी म्हणायचे नवर्‍यापाठी बायकोनी सती जावं, म्हणून बायकांनी स्वतःला जिवंत जाळून घेण्याचं समर्थन करणार का तुम्ही? पूर्वी अनेक निराधार, आगा पिछा नसलेल्या, गोष्टी खर्‍या म्हणून सांगायचे त्या तुम्ही जुन्या आहेत या एकमेव भांडवलावर खर्‍या मानणार का?

>> Sorry 4 marathi... navinch aahe ajun marathit nit type karta yet nahi.
जमेल थोड्या प्रयत्नांनी! इंग्लीश टंकलेखनपण कधीतरी एकेक अक्षर शोधत-शोधत शिकला असालच ना, आता मराठी शिका, अगदी सोप्पं आहे हे पण!

अदिती

योगी९००'s picture

7 Oct 2008 - 2:02 pm | योगी९००

चुकुनही कोणत्याही मनुष्याचे अंगठ्याचे ठसे जगातल्या इतर कोणत्याही ठश्याशी मिळते-जुळते नसतात.
अगदी खरे..पोलिसखात्यातील बर्याच ठसे जुळवण्यार्यांनी आता नाडी केंन्द्रात नोकरी पत्करली आहे.

खादाडमाऊ
(तुम्ही काहीही खा...पण माझे डोके नका खाऊ)

यशोधरा's picture

7 Oct 2008 - 3:02 pm | यशोधरा

नैनी, पार्ल्याच्या हरी ओम् केंद्राचा नाडी पट्टीशी काय संबंध आहे का?? बाकी दोन्ही बर्‍यापैकी थोतांडे, हे माझे मत.

राघव's picture

8 Oct 2008 - 12:49 am | राघव

माझ्या मते तर भविष्य ( @) ) जाणुन घेण्याची मुळात गरजच नाही. ते कोणत्याही मार्गाने का असेना.
हे म्हणजे एखाद्या क्रिकेटच्या मॅचचा निकाल अगोदरच समजुन मग मॅच बघायला जाण्यासारखे नाही का? :SS
जे आयुष्य आपणांस मिळालेले आहे ते चांगल्या प्रकारे व्यतीत करण्याचा प्रयत्न करणं हेच जास्त श्रेयस्कर नाही का?
(आता चांगल्या प्रकारे म्हणजे नक्की कसे यावरही चर्चा घडतील कदाचीत! पण म्हणण्याचा मुद्दा बहुदा ध्यानी आला असावा.)
राहिले याविषयीचे खरे-खोटे करणे तर.. आता ज्याची मुळात गरजच नाही त्याबद्द्ल उगाच कीस पाडण्यात काय हशील? :B

अगदीच राहवले नाही म्हणुन हा प्रतिक्रिया प्रपंच..! बाकी तुमचे चालु देत.
(सरळमार्गी) मुमुक्षु

शशिकांत ओक's picture

8 Oct 2008 - 1:30 am | शशिकांत ओक

धनंजय यांना,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
किंबहुना आपल्या अनेक विषयावरील शोधपुर्ण लिखाणामुळे मी या साईटवर पुरावा देण्याच्यासाठी उद्युक्त झालो. अन्यथा तेच तेच लिहून मला कंटाळा आला आहे. म्हणून मी सुचवले की माझी पुस्तके वाचा. वेबसाईट पहा.
आपल्या शिवाय अन्य वाचकांची अशी एकही प्रतिक्रिया दिसली नाही की कोणी म्हणतोय, मी माझ्या तमिळ जाणकार मित्रांना हे फोटो दाखवले वा दाखवतो व त्यांच्या कडून या लेखनाची खात्री करून ते खरे का खोटे आहे याची शहानिशा करतो. मला या साईटवर येणाऱ्या अशा अनेक अभ्यासू विचारकांकडून काही भरीव सूचना वा मदतीची अपेक्षा आहे. नाडी भविष्याची थट्टा करणे सोपे आहे. आत्तापर्यंत ते झाले ही असे मी मानतो.
धनंजय, आपण म्हणता त्याप्रमाणे तंजाऊरच्या संदर्भात काम करणारे कोणी तज्ञ आपल्याला मिळाले तर त्यांची मदत नक्कीच होईल. बाय द वे - तंजाऊरच्या राजेसाहेबांचा पाहुणचार व सरस्वती महलातील काम यावर उपक्रम दिवाळी अंकासाठी लेखात उल्लेख टाकला आहे.
नाडी ग्रंथ भविष्य हा एक अजब प्रकार म्हणावा लागेल. फोटोत दाखवल्याप्रमाणे ताडपत्राच्या पट्ट्या सदृष्य पानांवर काही कूट तमिळ भाषेतील लिखाण असून त्यात व्यक्तीविषयीची सर्व माहिती त्यात कोरुन लिहिलेली असते. उदा - व्यक्तीचे त्याच्या आई-वडिलांचे विवाहित असेल तर त्याच्या जोडीदाराचे, त्याची तमिळ पंचांगाप्रमाणे जन्मदिनांक, शिक्षण, सध्याचे नोकरी- धंद्याचे स्वरुप, जीवित भाऊबहिणी, मुले यांची संख्या, त्या शिवाय जन्मवेळची आकाशातील ग्रहगोलांची स्थिती, आदि. आणि हे सर्व सांगण्यासाठी व्यक्तीच्या हाताच्या अंगठ्य़ाच्या ठशांचा वापर अनुक्रमणिकेसारखा केला जातो. अशा ५०-६० ताडपट्ट्यांचे एकत्र एक पॅकेट वा 'बंडल' (सध्याच्या मराठीतील थापा य़ा अर्थामुळे टिंगल करण्यासाठी या शब्दाचा वापर नकारात्मक विचारसरणीचे लोक थट्टेने करताना आढळतात) करून त्याला दोरीने करकचून बाधलेले असते. यासर्व पट्ट्यांना मधोमध २ भोके असून त्यातून एक दोरी ओवलेली असते. त्यामुळे पट्टया माळेसारख्या एकमेकांशी जोडलेल्या असतात.
नाडी ग्रंथ पहाण्याची एक पारंपारिक प्रथा आहे. त्याप्रमाणे नाडी वाचक एका बंडलातील पट्यांची दोरी सोडून त्यातील एक एक ताडपट्टी समोर धरुन त्यातील काही विवक्षित मजकून मनात वाचून तो त्या व्यक्तीला लागू पडतो का याचा शोध घेतला जातो. हे काम किचकट व वेळ काढू असल्याने तासंतास जातात. कधी कधी त्या केंद्रात उपलब्ध ताडपट्यांचा साठा संपला तर त्या व्यक्तीला परत काही अंतराने या असे सुचवले जाते. त्या काळात नाडी केंद्रातील आधीचा पट्ट्यांचा स्टॉक परत करून नवा मागवला जातो. त्या नंतर पुन्हा व्यक्तीच्या पट्टीचा शोध घ्यायला गेले तर पट्टी सापडते. तर काही वेळा पुन्हा निराश व्हावे लागते.
या सर्व प्रकाराने माणसाला नाही नाही त्या भयंकर शंका येऊ लागतात. माझ्या संदर्भात ही तसेच झाले. मात्र मी चिकाटीने त्यावर प्रयत्नपुर्वक अभ्यास करत राहिलो. मला नाडी भविष्य खरे का खोटे असे काही शर्तीने विवक्षित वेळात सिद्ध करायचे नव्हते किंवा धार्मिक ग्रंथात उल्लेखलेले कोणे एका काळातील महर्षी मला प्यारे नव्हते. मी मात्र हे काय गौड बंगाल आहे. याचा तटस्थ वृत्तीने शोध घेत होतो. त्या मुळे एका बाजुला वेगवेगळ्या अनोळखी नाडी केंद्रातील काम करणाऱ्या व्यक्तींना मी नाडीभविष्यावरील अविश्वासक, निरीश्वरवादी, विज्ञानवादी वाटायला लागलो होतो. तर दुसऱ्या बाजूला काही नाडी भविष्य तात्विक अर्थाने मान्य नसलेल्यांकडून काही काळानंतर नाडी भविष्यकथन करणाऱ्यांचा मी प्रवक्ता वा त्यांचा पित्या आहे असा प्रचार मुद्दाम केला जाऊ लागला. असो.
मी मात्र रोज नवनव्या शंकांचे समाधान करण्यासाठी अनेकांना घेऊन खेटे मारून नाडी केंद्रांना सतावून सोडू लागलो. नाडी पट्टीचे पहिले पान काढल्यापासून ते पट्टी सापडेपर्यंतचे सर्व संभाषण रेकॉर्ड करणे त्या टेप वारंवार वाजवून , वा विविध युक्त्या करून आपणाकडून माहिती काढून पुन्हा तीच आपल्याला कशी सांगतात, आपला नंबर येण्याची बाहेर वाट पहात बसलेल्यात आपली केंद्राची माणसे बसवून, पेरून त्यांची माहिती अलगदपणे काढून कशी घेतात, काही तरी कारणाच्या मिशाने एखाद्याचे नाडी वाचन चालू असताना खोलीत येऊन त्या व्यक्तीची ताजीताजी माहिती पटकन लिहून तयार केलेली ताडपट्टी कशी हातोहात सरकवतात. काहींना नाडी केंद्रात नव्या ब्लँक ताडपट्यावर लिहायला बसवलेले असते का आदि आक्षेपांची अत्यंत बारकाईने व कसून छाननी केली गेली. असे व या सारखे अनेक स्वैर आरोप नकारात्मक विचारसरणीच्या महान लोकांकडून झालेले असल्याने अशा आरोपांची तेथल्या तेथे पुराव्यांनिशी खात्री करणे हा माझा त्याकाळातला रोजचा चाळाच झाला होता. मात्र असे आरोप सिद्ध होऊ शकत नाहीत पण करायला सोपे असल्याने व भडकपणे मांडता येत असल्याने ते लगेच मान्य होतात. असे सामान्यपणे दिसून येते.
थोडे विषयांतर करून सांगतो, एकदा आठवते की मी त्या वेळी श्रीनगरला पोस्टींगवर होतो. एका सरावाच्या एक्सर्साईझसाठी मी व माझ्या हाताखालील अन्य साथिदार एका रात्री १२ नंतर काम संपल्यावर बोलत होतो. माझ्या सेक्शन मधे काम करणारा एक सीनियर वॉरंट ऑफिसर मला म्हणाला, 'सर आपण स्ट्रिक्ट असल्याने कामाच्या वेळात एरव्ही आम्ही आपल्याशी कधी नाडी भविष्यावर भेटून बोलू शकत नाही. लेकिन ये क्या बला है? क्या आप हमें समझाएंगे? त्यावेळी मूड होता. म्हणून मी त्यांना म्हटले क्यों नही? जरूर बताऊंगा. पर मेरी एक शर्त है. हम अब ग्राऊंड डिफेंन्सका एक्सर्साईझ करनेके लिए आए है. क्यों न हम एक अलगसा एक्सर्साईज करें?
त्या सुमारास ओंकार पाटील नामक एका व्यक्तीने तांबरमच्या नाडी भविष्य केंद्राला भेट देऊन नाडी भविष्याचा भांडाफोड केला असा दावा करणारा लेख लिहून खळबळ माजवून दिली होती. त्यांचा लेख मला कोणीतरी आवर्जून पाठवल्यामुळे मी त्या लेखातील मजकूर तेथे जमलेल्यांना हिंदीतून वाचून दाखवत होतो. जमलेल्यांपैकी काहींना त्या प्रश्नांची उत्तरे लिहून तर काहींना नुसतेच लक्षात ठेवायला सांगून असा पडताळा घेतला की असा जो दावा केला जातो त्याची खरच सत्यता काय आहे त्यावेळी सर्वानुमते असे लक्षात आले की असा सतत पाठपुरावा करूनही १०० टक्के माहितीचा शोध घेणे अशक्य आहे. असा नाडी भविष्याशी त्रयस्थ असलेल्यांनी काढलेला निष्कर्ष व त्यावेळच्या उपस्थितांच्या लेखी सहीचा कागद मी नंतर किती तरी दिवस बाळगून होतो. या लेखातील प्रत्येक वाक्यनवाक्याची चिरफाडकरून आपल्याकडून माहिती काढून तीच आपल्याला पट्टीतून मिळते आहे असा बहाणा करतात वा सांगतात असे म्हणून लेखकाने वाचकांची कशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता याचे सविस्तर कथन 'बोध अंधश्रद्धेचा' पुस्तकात केले गेले आहे. असो.
नाडी भविष्य कथन मनाला इतके धक्का देणारे आहे की प्रथम दर्शनी कोणाचाच या सर्व प्रकारावर विश्वास बसू शकत नाही. त्यामुळे ते खोटे असावे नव्हे आहेच असा आक्षेप घेतला जातो. मी देखील अशाच विचाराने सामोरा गेलो की कोण हे महर्षी? त्यांना काय पडले म्हणून त्यांनी आपल्यासारख्या कर्तृत्वाने नगण्य लोकांचे भविष्य कथन करावे? आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आम्ही का म्हणून घ्यायचा? मग आपल्या कर्तृत्वाच्या, मनगटाच्या जोराला काहीच अर्थ नाही का?
म्हणून भविष्य कथन हा भाग तूर्तास वगळून या ताडपत्रावरील लेखनकडे शोधकपणे पहायला काय हरकत आहे?
पुण्यात आजच एक परिषद झाली त्यात डॉ. नारळीकरांना फल ज्योतिषावर नेहमीचे आपले विचार व्यक्त केले. मात्र नाडी भविष्यासंदर्भात मी व प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे. पो. भोज. जि. बेळगाव. कर्नाटक. ५९१२६३. फोन ०८३३८-२९३३३९९ यांनी ५-६ सविस्तर पत्रे पाठवूनही त्याच्या मार्गदर्शनाखाली शोधकार्य करावे अशा आशयाच्या आवाहनाला त्यांनी मौनव्रताने का स्वीकारले आहे ते अगम्य आहे. अशा शोधकार्यासाठी डॉ. विजय भटकरांनी नेहमीच तयारी दर्शवली आहे. त्यांचे तसे एक लेखी इमेलचे पत्रही शाम मानवांकडे आहे.
असो. आज इतकेच.

प्रियाली's picture

12 Apr 2011 - 10:11 pm | प्रियाली

काही संदर्भासाठी वरील प्रतिसादाची गरज होती. मूळ प्रतिसादात बदल होऊ नये म्हणून उपप्रतिसाद.

शशिकांत ओक's picture

13 Apr 2011 - 5:44 pm | शशिकांत ओक

प्रियाली,
आपणाकडून नाडीग्रंथांवरील विचारांवर सहसा प्रतिक्रिया येत नाही आज अनेक महिन्यांनी यए धाग्यावर काही संदर्भासाठी त्याची गरज पडली असो.तथापि 'मूळ प्रतिसादात बदल होऊ नये म्हणून हा प्रतिसाद' याचा खुलासा होत नाही...

गवि's picture

13 Apr 2011 - 5:55 pm | गवि

उत्तर दिल्याने मूळ प्रतिक्रिया यापुढे तुम्हाला संपादित करता येणार नाही. म्हणजे ती फिक्स झाली. असा संदर्भ.
असं माझं मत.

लंबूटांग's picture

14 Apr 2011 - 1:32 am | लंबूटांग

तसे आपणाकडूनही बरेच खुलासे (नाडीग्रंथविषयक) अपेक्षित आहेत.

घाटावरचे भट's picture

8 Oct 2008 - 1:16 pm | घाटावरचे भट


१) घनंजय यांना,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
किंबहुना आपल्या अनेक विषयावरील शोधपुर्ण लिखाणामुळे मी या साईटवर पुरावा देण्याच्यासाठी उद्युक्त झालो.

२) मृगनयनी यांना,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
किंबहुना आपल्या अनेक विषयावरील शोधपुर्ण लिखाणामुळे मी या साईटवर पुरावा देण्याच्यासाठी उद्युक्त झालो.

ओकसाहेब, तुमी परतीसाद कापी पेष्ट करुण लिवता काय???? कारन आमच्या म्हाईती परमानं नैनीतै हितं तसं काय लै लिखान करत न्हाईत....म्हून म्ह्टलं...
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

आंबोळी's picture

8 Oct 2008 - 1:20 pm | आंबोळी

ओकसाहेब, तुमी परतीसाद कापी पेष्ट करुण लिवता काय???? कारन आमच्या म्हाईती परमानं नैनीतै हितं तसं काय लै लिखान करत न्हाईत....म्हून म्ह्टलं...
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...

=)) =)) =)) =)) =))

धन्यवाद राव.... मी हेच लिहिणार होतो....
आंबोळी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Oct 2008 - 2:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ओकसाहेब, तुमी परतीसाद कापी पेष्ट करुण लिवता काय???? कारन आमच्या म्हाईती परमानं नैनीतै हितं तसं काय लै लिखान करत न्हाईत....म्हून म्ह्टलं...
=)) बेश्ट!

अन्यथा तेच तेच लिहून मला कंटाळा आला आहे. म्हणून मी सुचवले की माझी पुस्तके वाचा. वेबसाईट पहा.
याबरोबर वेबसाईटचा दुवाही कापी-पेश्ट करायचा ना? बसल्याजागी "मावसा"ला फिरवला असता! पुस्तकांची नावंही वाचल्याचं आठवत नाही आहे, पण मी विसरले असेन ब्वॉ!

पुण्यात आजच एक परिषद झाली त्यात डॉ. नारळीकरांना फल ज्योतिषावर नेहमीचे आपले विचार व्यक्त केले.
त्यांनी आपले विचार स्थल-काल-श्रोतृवर्ग यांप्रमाणे बदलणे अपेक्षित होते का?

मात्र नाडी भविष्यासंदर्भात मी व प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे. पो. भोज. जि. बेळगाव. कर्नाटक. ५९१२६३. फोन ०८३३८-२९३३३९९ यांनी ५-६ सविस्तर पत्रे पाठवूनही त्याच्या मार्गदर्शनाखाली शोधकार्य करावे अशा आशयाच्या आवाहनाला त्यांनी मौनव्रताने का स्वीकारले आहे ते अगम्य आहे.
प्राध्यापक नारळीकर विश्वरचनाशास्त्र सोडून आणखी कोणत्या विषयात सारथ्याच्या जागी बसून संशोधन करतात हे मला माहितच नव्हतं! :-)

पुण्यात काल जी बैठक झाली त्यात म्हणे ज्योतिष हे शास्त्र नाही असं जाहीर केलं गेलं. त्या बातमीचा दुवा.

प्रकाश घाटपांडे's picture

8 Oct 2008 - 2:42 pm | प्रकाश घाटपांडे


पुण्यात काल जी बैठक झाली त्यात म्हणे ज्योतिष हे शास्त्र नाही असं जाहीर केलं गेलं. त्या बातमीचा दुवा.


सदर चाचणी प्रकल्पाचा मी समन्वयक होतो त्यामुळे कालच्या पत्रकार परिषदेत सदर अहवाल मी अधिकृत पणे प्रसृत केला.
प्रकल्प समिती सदस्य
जयंत नारळीकर (आयुक)
प्रो.सुधाकर कुंटे (संख्याशास्त्र विभाग पुणे विद्यापीठ)
डॉ नरेंद्र दाभोलकर (अंनिस)
प्रकाश घाटपांडे ( चाचणी समन्वयक)
काही माहिती साठी आम्हाल इथे टिचकणे इष्ट
प्रकाश घाटपांडे

बैल्र रिकामा's picture

18 Oct 2008 - 12:55 pm | बैल्र रिकामा

आम्ही पण बरेच वर्षांपूर्वी आमची नाडी काढवली होती....परन्तु त्यात भविष्य कथन म्हणावे, असे फारसे काही नव्हते.....आम्हाला मुख्य स्वारस्थ्य यात आहे, की कोणत्याही प्रकारे का होइना, भविष्य कथन करता येते का, आणि ते खरे ठरते का...... पत्रिकेवरुन अगदी अनपेक्षित अश्या भविष्यातल्या घटना सांगितल्या जाऊन त्या नंतर खरोखर घडण्याची प्रचिति मात्र आम्हाला आलेली आहे बुवा...आणखी कोणाचे असे अनुभव?