मराठी भाषा दिन २०१७: आठोन (वर्‍हाडी)

Primary tabs

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in लेखमाला
25 Feb 2017 - 6:27 am

1
.
जवा जवा मायी आठोन यीन तुले
तवा या अक्शराईत पायजो मले
उलसाक आठोलो तं भूलजो मले

मायासंगचे दिवस कंदीमंदी
येतीन भरुन तुया डोयामंदी
तवा त्या आसवाईत पायजो मले
उलसाक आठोलो तं भूलजो मले

काई नाई मायाजोळ ठूलं म्या
सूक-दुक, चेन-भूक, बांधून तुले देलं म्या
गाठोड्यात त्या सांभाळून ठूजो मले
उलसाक आठोलो तं भूलजो मले

मायी नाई झाली, कोणाची तं होशीन
मले नाई ठिक, त्याले तं खुश ठूशीन
काम पळलं काई तं सांगजो मले
उलसाक आठोलो तं भूलजो मले

जवा जवा मायी आठोन यीन तुले
तवा या अक्शराईत पायजो मले
उलसाक आठोलो तं भूलजो मले
उलसाक आठोलो तं भूलजो मले
.
1

प्रतिक्रिया

पैसा's picture

25 Feb 2017 - 6:46 am | पैसा

खूपच छान! कविता खूप ओळखीची अशी वाटतेय. छान जमलीय.

रुपी's picture

25 Feb 2017 - 7:07 am | रुपी

मस्त.. आवडली.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Feb 2017 - 7:59 am | कैलासवासी सोन्याबापु

साधी सोपी थेट....आवडली :)

प्रचेतस's picture

25 Feb 2017 - 8:22 am | प्रचेतस

मस्त

शलभ's picture

25 Feb 2017 - 8:42 am | शलभ

मस्तच..

प्राची अश्विनी's picture

25 Feb 2017 - 9:28 am | प्राची अश्विनी

आवडली.

पिलीयन रायडर's picture

25 Feb 2017 - 10:30 am | पिलीयन रायडर

वर्‍हाडीतली गझल वाचल्यासारखं वाटलं. आवडलीच! :)

सस्नेह's picture

25 Feb 2017 - 11:07 am | सस्नेह

तलत महमूदचे 'मेरी यादमे तुम ना आसू बहाना' आठवलं !

बबन ताम्बे's picture

25 Feb 2017 - 11:25 am | बबन ताम्बे

आवडली कविता.

मितान's picture

25 Feb 2017 - 11:50 am | मितान

मस्त कविता !

पद्मावति's picture

25 Feb 2017 - 2:40 pm | पद्मावति

मस्तच.

मित्रहो's picture

25 Feb 2017 - 9:31 pm | मित्रहो

मस्त कविता
थेट विचार

चिनार's picture

26 Feb 2017 - 10:58 am | चिनार

मस्त लिहिली आहे!!

चिनार's picture

26 Feb 2017 - 10:58 am | चिनार

मस्त लिहिली आहे!!

इडली डोसा's picture

26 Feb 2017 - 12:26 pm | इडली डोसा

सुंदर कविता

अॅस्ट्रोनाट विनय's picture

27 Feb 2017 - 1:22 pm | अॅस्ट्रोनाट विनय

भारी लिहली आहे. आवडली

चांदणे संदीप's picture

27 Feb 2017 - 3:27 pm | चांदणे संदीप

सुरेख!

Sandy

संदीप डांगे's picture

27 Feb 2017 - 5:50 pm | संदीप डांगे

काळजाच्या जखमाईले कोनी कविता म्हणूदे, गम नाई..
पन बुर्राट तरास तवा होते जवा कोनी वा वाई करते

- शारुक देव्दास वाला...

--------------

सर्व वाचकांचे खूप आभार! मायवर्हाडीवर अशीच मया राउद्या बाप्पा!

सविता००१'s picture

27 Feb 2017 - 6:07 pm | सविता००१

मस्तच

नूतन सावंत's picture

27 Feb 2017 - 6:09 pm | नूतन सावंत

सुरेख कविता.

स्मिता_१३'s picture

27 Feb 2017 - 7:31 pm | स्मिता_१३

छान

अभिजीत अवलिया's picture

28 Feb 2017 - 9:00 am | अभिजीत अवलिया

आवडली ...

अभ्या..'s picture

28 Feb 2017 - 12:17 pm | अभ्या..

कसलं डेंजर लिहू लागला बे न्हेऊनशानी.
आवाडलं.

स्वीट टॉकर's picture

28 Feb 2017 - 3:23 pm | स्वीट टॉकर

'वर्‍हाडीतली गझल वाचल्यासारखं वाटलं. आवडलीच! ' +१

सानझरी's picture

28 Feb 2017 - 4:25 pm | सानझरी

झकास!!

फेदरवेट साहेब's picture

28 Feb 2017 - 4:41 pm | फेदरवेट साहेब

भाषा अजिबात कळली नाही, पण एक जोडले गेल्याची भावना आली. ही कदाचित तुमच्या लेखनाची अन भाषेची महती म्हणता येईल. शुभेच्छा, राजकारणासारख्या रुक्ष विषयावर तर्काचे टाके उसवणारा माणूस हे लिहू शकतो हे नवीनच कळले :)

एरवी तुमच्यांनावाने कंठशोष करून तुम्हाला झोडपणाऱ्या एकाचीही कॉमेंट इथे दिसली नाही, बाकी काही नाही तर दानत दिसते हो माणसाची, असो.

आषाढ_दर्द_गाणे's picture

1 Mar 2017 - 2:45 am | आषाढ_दर्द_गाणे

भाषा अजिबात कळली नाही, पण एक जोडले गेल्याची भावना आली. ही कदाचित तुमच्या लेखनाची अन भाषेची महती म्हणता येईल.

+ १

स्रुजा's picture

1 Mar 2017 - 3:14 am | स्रुजा

वाह वाह ! छान च आहे की हे प्रकरण..

एमी's picture

22 Mar 2017 - 4:07 pm | एमी

छान आहे. आवडली.