मराठी भाषा दिन २०१७: आठोन (वर्‍हाडी)

संदीप डांगे लेखमाला
1 . जवा जवा मायी आठोन यीन तुले तवा या अक्शराईत पायजो मले उलसाक आठोलो तं भूलजो मले मायासंगचे दिवस कंदीमंदी येतीन भरुन तुया डोयामंदी तवा त्या आसवाईत पायजो मले उलसाक आठोलो तं भूलजो मले काई नाई मायाजोळ ठूलं म्या सूक-दुक, चेन-भूक, बांधून तुले देलं म्या गाठोड्यात त्या सांभाळून ठूजो मले उलसाक आठोलो तं भूलजो मले मायी नाई झाली, कोणाची तं होशीन मले नाई ठिक, त्याले तं खुश ठूशीन काम पळलं काई तं सांगजो मले उलसाक आठोलो तं भूलजो मले जवा जवा मायी आठोन यीन तुले तवा या अक्शराईत पायजो मले उलसाक आठोलो तं भूलजो मले उलसाक आठोलो तं भूलजो मले . 1

29 टिप्पण्या 21,125 दृश्ये

Comments

पैसा नवीन

खूपच छान! कविता खूप ओळखीची अशी वाटतेय. छान जमलीय.

सस्नेह नवीन

तलत महमूदचे 'मेरी यादमे तुम ना आसू बहाना' आठवलं !

संदीप डांगे नवीन

काळजाच्या जखमाईले कोनी कविता म्हणूदे, गम नाई.. पन बुर्राट तरास तवा होते जवा कोनी वा वाई करते - शारुक देव्दास वाला... -------------- सर्व वाचकांचे खूप आभार! मायवर्हाडीवर अशीच मया राउद्या बाप्पा!

फेदरवेट साहेब नवीन

भाषा अजिबात कळली नाही, पण एक जोडले गेल्याची भावना आली. ही कदाचित तुमच्या लेखनाची अन भाषेची महती म्हणता येईल. शुभेच्छा, राजकारणासारख्या रुक्ष विषयावर तर्काचे टाके उसवणारा माणूस हे लिहू शकतो हे नवीनच कळले :) एरवी तुमच्यांनावाने कंठशोष करून तुम्हाला झोडपणाऱ्या एकाचीही कॉमेंट इथे दिसली नाही, बाकी काही नाही तर दानत दिसते हो माणसाची, असो.

आषाढ_दर्द_गाणे नवीन

In reply to by फेदरवेट साहेब

भाषा अजिबात कळली नाही, पण एक जोडले गेल्याची भावना आली. ही कदाचित तुमच्या लेखनाची अन भाषेची महती म्हणता येईल.
+ १