डॉक्युमेंटरी संबंधी माहिती.

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in काथ्याकूट
20 Feb 2017 - 3:25 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,
मिपावर मी मागे टाकलेला एक धागा एक गरजू शाळा ला खूप चांगला प्रदिसाद मिळाला. समस्त मिपाकरांचे त्याबद्दल आभार.
तर, झाले असे कि आपल्या मिपाची एक वाचक(सदस्य नाही) या निमित्ताने माझ्या संपर्कात आली. ती एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. तिच्या कंपनीने CSR अंतर्गत शाळेला काही मदत करायचे आश्वासन आम्हाला दिले आणि शाळेची पाहणी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी येऊनही गेली. त्यात तिला खरोखरच वाटले कि जेवढी मदत ते करणार आहेत तेवढी मदतही खूप थोटकी आहे. म्हणून तिने माझ्यावर एका जबाबदारी टाकलीय, शाळेबद्दल एका डॉक्युमेंटरी फिल्म बनवण्याची. तिच्या म्हणण्यानुसार हि डॉक्युमेंटरी फिल्म ती तिच्या लंडनस्थित मुख्यालयाला पाठवेल आणि जर त्यांना आमची गरज कळाली तर त्यांच्या कंपनीच्या स्वयंसेवी संस्थेकडून शाळेला भरघोस मदत मिळू शकेल. तसेच मलाही ती फिल्म ऑनलाईन कॅम्पेन साठी वापरता येईल. त्यांचे म्हणणे मला खरोखरच पटले. खरंतर मलाही असं काही करायची कल्पना आधीच सुचली होती पण साधनं आणि कौशल्य या गोष्टींपायी अडलोय. त्यांनी त्यांच्या ऑफिसमधल्या व्हिडीओ एडिटर्सचे साहाय्य मला उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे मला खूप मदत होईल पण तरीही या सगळ्या प्रक्रियेत माझी भूमिका महत्वाची असेल. म्हणूनच, कृपा करून मला कोणी खालील शंकांचं निरसन करून देईल का?

डॉक्युमेंटरी फिल्म किती मिनिटांची असावी?
प्रामुख्याने मला शाळेची परिस्थिती मांडायची आहे तर त्यात कुठल्या गोष्टींचा समावेश करू?
त्यात माझं/शिक्षकांचं/विद्यार्थ्यांचं काही सेकंदांचं मनोगत/मुलाखत वगैरे असावं का?
सबटायटल्स साठी काय करू?
तुमच्या बघण्यात असली कुठली डॉक्युमेंटरी फिल्म असेल तर कृपया त्याची एखादी लिंक द्याल का?

या एका प्रकल्पाने एक अख्खी शाळा उभी राहू शकते त्यामुळे मला माझे सर्व प्रयत्न पणाला लावायचे आहेत.
आताशा मी फोटोग्राफी शिकतोय पण मित्र फोटोग्राफी करतो, खासकरून इव्हेंट फोटोग्राफी. एक मित्र एडिटिंगही करतो, पण डॉक्युमेंटरी फिल्म ला अजून त्यांनीही हात घातला नाही कधी. त्यामुळे हे मलाच समजावून सांगावं लागेल तेवढ्यासाठी हा पसारा...

तर मग जाणकारांनो लागा कामाला.

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

20 Feb 2017 - 3:47 pm | संदीप डांगे

डॉक्युमेन्टरी तयार करुन देण्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे.
फक्त खर्चाचं तुम्हाला बघायला लागेल.. बाकी काही काळजी नको. आपण मिळून एक चांगली फिल्म कमी खर्चात बनवू.

मी एक दोघांशी बोलतोय कॅमेरा व इतर साहित्यांबद्दल.. मदत तत्वांवर मिळाले तर उत्तमच होईल.. थोड्या वेळात टंकतो सविस्तर.

संदीप डांगे's picture

20 Feb 2017 - 4:02 pm | संदीप डांगे

शूटींगसाठीचे सर्व साहित्य मदत तत्त्वावर मिळाले तर जास्त खर्च येणार नाही.

अ. स्क्रिप्ट आणि स्टोरीबोर्ड
मी करेन, कुणी मदतीस येणार असेल तरीही आवडेल.

ब. शूट साठी लागणारे साहित्य
१. कॅनन ७०० डी किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाचा कॅमेरा
२. ५० एम एम, ५५-२५० एम एम, १८-५५ एम एम लेन्सेस
३. ट्रायपॉड
४. व्हॉइस रेकॉर्डिंग साठी माइक (मुलाखती-बाईट्स साठी)
५. काही लेन्स फिल्टर्स शक्यतो २-३
६. रिफ्लेक्टर्स
७. लाइट्स (गरज पडल्यास. हे तिथल्या विजिटनंतर ठरेल)

क. डॉक्युमेंटरीस लागणारा व्हॉइसओवर
आपल्याकडे अनेक मिपाकर आता तरबेज झालेत.
इंग्रजी, हिंदी व मराठी तीनही भाषेतून व्हॉइसओवर द्यावा लागेल.

ड. दिग्दर्शन व संकलन (डिरेक्शन व एडिटिंग)
दिग्दर्शन मी करतो, संकलनासाठी मदत लागेल.

इ. प्रोडक्शन- निर्मिती संभाळणारे, विविध असिस्टंट्स-सहाय्यक,

फ. जेवणाची व्यवस्था व वाहतूक.

बाकीचे नंतर लिहितो.

इरसाल कार्टं's picture

20 Feb 2017 - 5:11 pm | इरसाल कार्टं

शूटींगसाठीचे सर्व साहित्य मदत तत्त्वावर मिळाले तर जास्त खर्च येणार नाही.

अ. स्क्रिप्ट आणि स्टोरीबोर्ड
मी करेन, कुणी मदतीस येणार असेल तरीही आवडेल.
कुठल्या प्रकारची मदत?

ब. शूट साठी लागणारे साहित्य
१. कॅनन ७०० डी किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाचा कॅमेरा
२. ५० एम एम, ५५-२५० एम एम, १८-५५ एम एम लेन्सेस
३. ट्रायपॉड
: या सगळ्या गोष्टी आहेत मित्राकडे कंफ्युगरेशन चेक करतो.

४. व्हॉइस रेकॉर्डिंग साठी माइक (मुलाखती-बाईट्स साठी)
होईल उपलब्ध

५. काही लेन्स फिल्टर्स शक्यतो २-३
हेही होतील उपलब्ध बहुदा

६. रिफ्लेक्टर्स
फोटो स्टुडिओ मध्ये असतात तेच ना? आहेत.

७. लाइट्स (गरज पडल्यास. हे तिथल्या विजिटनंतर ठरेल)
आहेत

क. डॉक्युमेंटरीस लागणारा व्हॉइसओवर
आपल्याकडे अनेक मिपाकर आता तरबेज झालेत.
इंग्रजी, हिंदी व मराठी तीनही भाषेतून व्हॉइसओवर द्यावा लागेल.
ड. दिग्दर्शन व संकलन (डिरेक्शन व एडिटिंग)
दिग्दर्शन मी करतो, संकलनासाठी मदत लागेल.
इ. प्रोडक्शन- निर्मिती संभाळणारे, विविध असिस्टंट्स-सहाय्यक,
हे फोनवर बोलू आपण. 9225849032

फ. जेवणाची व्यवस्था व वाहतूक.
झालीच समजा

उद्या तुम्हाला शाळेचे फोटो पाठवू का? थोडी अजून कल्पना येईल.

संदीप डांगे's picture

20 Feb 2017 - 5:20 pm | संदीप डांगे

चांगले आहे की... बरंच साहित्य उपलब्ध होतंय तर...!

वर दिलेला तुमचा नंबर व्हॉट्सपवर आहे काय?

इरसाल कार्टं's picture

20 Feb 2017 - 5:24 pm | इरसाल कार्टं

हो

संदीप डांगे's picture

20 Feb 2017 - 5:43 pm | संदीप डांगे

डॉक्युमेंटरी फिल्म किती मिनिटांची असावी?
>> वेळेचे बंधन नसते. पाच मिनिटे ते ३ तास असा कितीही कालावधी असू शकतो. काय, किती व कसे दाखवायचे आहे त्यावर अवलंबून असते.

प्रामुख्याने मला शाळेची परिस्थिती मांडायची आहे तर त्यात कुठल्या गोष्टींचा समावेश करू?
>> सर्व गोष्टींची यादी करा. त्याबद्दल लिहून काढा. तुम्हाला काय काय मांडायचे आहे ते सर्व येऊद्या.

त्यात माझं/शिक्षकांचं/विद्यार्थ्यांचं काही सेकंदांचं मनोगत/मुलाखत वगैरे असावं का?
>> नक्कीच. तो तर अतिआवश्यक भाग आहे.

सबटायटल्स साठी काय करू?
>> भाषांतरासाठी मिपाकर मदत करतील, एडिटर ते विडियोत टाकून देतील

तुमच्या बघण्यात असली कुठली डॉक्युमेंटरी फिल्म असेल तर कृपया त्याची एखादी लिंक द्याल का?
>> युट्यूबवर खूप मिळतील.

इरसाल कार्टं's picture

20 Feb 2017 - 11:43 pm | इरसाल कार्टं

सर्व गोष्टींची यादी करा. त्याबद्दल लिहून काढा. तुम्हाला काय काय मांडायचे आहे ते सर्व येऊद्या.

करतो सुरुवात.

माझ्या मते तुम्ही तुमच्या प्रोजेक्टच्या किती जवळ जाताय हे दाखवा. मोबाइलचा एचडी व्हिडिओ,फोटो चालतील. कॅाझ्मेटिक डॅाक्युमेंटरीची गरज नसते.
१) तुमचा अगोदरचा हेतू राबवण्याला काय कारण झाले? अगोदरची परिस्थिती दाखवणारे जुने फोटो हवेत.
२) काय अडचणी होत्या त्या तात्पुरत्या कशा निवारल्या ते बदल दाखवणारे फोटो.
३) पालकांची मते सांगणाय्रा क्लिप अर्धा - एक मिनिटाच्या.
४) विद्यार्थ्यांत काय फरक झाला त्याचे फोटो.
हे सर्व मोबाइलने करून विसेक मिनिटांची डॅाक्यु पाठवा.
बय्राच काळातले कलेक्शन हवे.

इरसाल कार्टं's picture

20 Feb 2017 - 11:35 pm | इरसाल कार्टं

धन्यवाद, आपण मनोगतांमध्ये पालकांची भर घातलीत.

चतुरंग's picture

21 Feb 2017 - 1:47 am | चतुरंग

मनोगतांमध्ये शाळेतल्या सेवकवर्गाला विसरू नका. अगदी मूलभूत अडचणींना तेच बर्‍याचदा सामोरे जातात आणि त्यांना ते सांगायला कुठेच संधी मिळत नाही.

इरसाल कार्टं's picture

21 Feb 2017 - 12:23 pm | इरसाल कार्टं

नक्कीच

स्रुजा's picture

21 Feb 2017 - 2:31 am | स्रुजा

तुम्हाला शुभेच्छा !

इरसाल कार्टं's picture

21 Feb 2017 - 12:24 pm | इरसाल कार्टं

धन्यवाद

पिलीयन रायडर's picture

21 Feb 2017 - 2:38 am | पिलीयन रायडर

डांगेअण्णा आहेतच पण समजा वाटलंच तर मिपावर अ‍ॅरि फिल्म्सच्या आयडीलाही संपर्क करु शकता. चित्रकथी ही फिल्म त्यांनीच बनवली आहे.

जेव्हा ही फिल्म बनवाल तेव्हा आपल्या युट्युब चॅनलवर नक्की टाकुया. :)

इरसाल कार्टं's picture

21 Feb 2017 - 12:28 pm | इरसाल कार्टं

या सगळ्यात मिपाचा वाट सिंहाचा आहे, मी फक्त एक माध्यम आहे शाळेसाठी तुमच्यापर्यंत पोचण्याचे.