एक गरजू शाळा.

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in जनातलं, मनातलं
8 Dec 2016 - 11:27 pm

नमस्कार मिपाकरहो!
आज एका वेगळ्या विषयावर लिहितोय, तुमच्या सहकार्याची अपेक्षा करूनच.
हि गोष्ट आहे एका शाळेची, तिचे नाव आहे प्रकट विघ्नेश माध्यमिक विद्यालय. ही शाळा १५ जून २००६ पासून कार्यरत आहे पालघर या आदिवासी जिल्यातील वाडा तालुक्यातील कोंढले गावाजवळील रावतेपाडा या छोट्याश्या पाड्यात. पाचवी ते दहावी या वर्गांमध्ये मिळून एकूण २२६ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. सगळेच्या सगळे आदिवासी पाड्यांमधून पायी येणारे. १० शिक्षक यांना शिकवण्याचे काम करत आहेत तेही कोणतेही वेतन अथवा मानधन न घेता. तसेच ३ शिक्षकेतर कर्मचारीही इथे कुठल्याही मानधनाव्यातिरिक्त काम करत आहेत. शाळेची इमारत म्हणजे केवळ ३ खोल्या आहेत, बाकीचे वर्ग हे इमारतीसमोरील प्रकट विघ्नेश मंदिराच्या दालनांमध्ये भरतात.
हा सगळा प्रपंच इथे मांडण्याचे कारण असेकी हि शाळा विना अनुदानित असून सर्व खर्च प्रकट विघ्नेश मंदिराला मिळणाऱ्या तुटपुंज्या देणग्यान्मधून केला जातो. जो अत्यंत अपुरा आहे.
या शाळेला अनेक भौतिक सुविधांची गरज आहे. जर आपल्यापैकी कोणाची इच्छा असल्यास या सामाजिक उपक्रमाला मदत केल्यास या २२६ मुलांच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडू शकतो.
या दिवाळीमध्ये मी आणि काही मित्रांनी मिळून या शाळेतील मुलांना वह्या, पेन आणि पेन्सिल वाटप केले होते तेव्हा आम्हाला या शाळेच्या गरजा किती प्राथमिक आहेत हे लक्षात आले. हि संस्था आजही मदतीसाठी हाक देत आहे परंतु मदतीचा ओघ हवा तसा येत नाहीये. मी स्वतः या शाळेत असणाऱ्या एकुलत्या एक संगणकाच्या मेंटेनन्सची जबाबदारी उचलणार आहे(अर्थात मी आयटी वाला आहे आणि हि शाळा माझ्या घरापासून ७-८ किमी वर आहे त्यामुळे मला हे सहज शक्य आहे).
तरी, आपणापैकी कोणाची मदत करण्याची इच्छा असल्यास मला ९२२५८४९०३२ या क्रमांकावर किंवा संस्थेतील शिक्षक श्री. अविनाश पवार(९६८९४६६६७४) अथवा संतोष आमले(९१६८७७३१०२) वर संपर्क साधावा (हे तीनही क्रमांक WhatsApp वर कार्यरत आहेत). आपणास आपण केलेल्या मदतीबद्दल रीतसर पावती प्रत्यक्ष अथवा पोस्टाने दिली जाईल याची मी स्वतः ग्वाही देतो.
आपल्या मदतीने या आदिवासी मुलांच्या आयुष्यात एक नवा प्रकाश पडेल एवढे नक्की.

समाजसद्भावना

प्रतिक्रिया

काश्याप्रकारची मदत अपेक्षित आहे?

इरसाल कार्टं's picture

9 Dec 2016 - 10:29 am | इरसाल कार्टं

आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
शाळेला पुढील प्रमाणे भौतिक मदतीची अपेक्षा आहे:
टेबल: ६
कपाटे
पंखे: ७
संगणक: १० (तुमच्याकडे अगदी जुने पण चालू असलेले संगणक असतील तरी ते आम्ही स्वीकारू.)
प्रिंटर & स्कॅनर
UPS: १
संगणक टेबल: १०
वर्गखोल्या: ६
स्वच्छ पाण्यासाठी फिल्टर/प्युरिफायर.

आपणाला जमेल तेवढी मदत आपण करू शकता.
जुने संगणक, प्रिंटर आणि स्कॅनर हि स्वीकारले जातील.
तुमची आर्थिक मदत करण्याची इच्छा असल्यासंही तुम्हाला बँक खात्याचा तपशील एस. एम. एस. करू. त्यासाठी कृपया मी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.
तुम्ही दिलेल्या सकारात्मक प्रतिसदा बद्दल धन्यवाद.

माझ्याकडे एक संगणक (D-core), एक प्रिंटर व प्रिंटर+स्कॅनर आहे. तसेच काही इतर गोष्टी आहेत. पण त्या पाठवाव्यात कश्या? त्या भागात कोणी ट्रान्सपोर्टर कोणी आहे का? जसे की गती, व्हीआरएल किंवा इतर कोणी?

इरसाल कार्टं's picture

9 Dec 2016 - 10:06 pm | इरसाल कार्टं

आपण पुणेकर असाल तर कृपया मोदक किंवा प्रशांतशीसंपर्क साधा,

नक्कीच. कशा प्रकारची मदत अपेक्षित आहे? त्यात तातडीची मदत, मध्यम मुदतीची गरज, दीर्घ मुदतीची मदत असे वर्गीकरण केल्यास सोपे जाईल. तसेच आर्थिक मदतीसाठी बँक अकाउंट डिटेल्स दिल्यास बरे पडेल.

मिपा संपादकांनी या धाग्यात नेहमी टाकतो तसा डिस्क्लेमर टाकावा अशी विनंती.

संदीप डांगे's picture

10 Dec 2016 - 2:16 pm | संदीप डांगे

अरे हां. हा प्रतिसाद बघितलाच नाही. एसभौंनी आधीच सुचवलंय की..

इ का भौ, जरा या पद्धतीने सांगाल तर बरं होइल.

इरसाल कार्टं's picture

9 Dec 2016 - 10:28 am | इरसाल कार्टं

आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
शाळेला पुढील प्रमाणे भौतिक मदतीची अपेक्षा आहे:
टेबल: ६
कपाटे
पंखे: ७
संगणक: १० (तुमच्याकडे अगदी जुने पण चालू असलेले संगणक असतील तरी ते आम्ही स्वीकारू.)
प्रिंटर & स्कॅनर
UPS: १
संगणक टेबल: १०
वर्गखोल्या: ६
स्वच्छ पाण्यासाठी फिल्टर/प्युरिफायर.

आपणाला जमेल तेवढी मदत आपण करू शकता.
जुने संगणक, प्रिंटर आणि स्कॅनर हि स्वीकारले जातील.
तुमची आर्थिक मदत करण्याची इच्छा असल्यासंही तुम्हाला बँक खात्याचा तपशील एस. एम. एस. करू. त्यासाठी कृपया मी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.
तुम्ही दिलेल्या सकारात्मक प्रतिकाराबद्दल धन्यवाद.

आणि हो, खरंतर या प्रकारचे धागे मिपावर टाकावेत कि नाही याची कल्पना नसतानाच मी हा धागा टाकला. जर असे करणे चूक असेल तर मी संपादकांची माफी मागतो. हे जर नियमाविरुद्ध असेल तर त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा मी विनातक्रार स्वीकार करेन.

कपिलमुनी's picture

9 Dec 2016 - 12:04 pm | कपिलमुनी

डिस्क्लेमर टाका किंवा संमं टाकेलच!

वेल्लाभट's picture

9 Dec 2016 - 4:46 pm | वेल्लाभट

तुम्हाला आज उद्याकडे संपर्क करतो. मदत करायला नक्कीच आवडेल.

यशोधरा's picture

9 Dec 2016 - 4:58 pm | यशोधरा

व्यनी बघा प्लीज.

इरसाल कार्टं's picture

9 Dec 2016 - 7:26 pm | इरसाल कार्टं

एक वॉटर प्युरिफायरची सोय झाली आहे. पुण्यातील इतरही जर कोणी काही देत असेल तर सगळे एकत्र करून आणायची मोदकची तयारी आहे.

पुण्यातून वस्तू पाठवायच्या असतील तर मोदक किंवा प्रशांतशी १५ तारखेपर्यंत संपर्क साधावा.⁠⁠⁠⁠

आपला,
कल्पेश.

संदीप डांगे's picture

10 Dec 2016 - 1:50 pm | संदीप डांगे

ह्या २२६ मुलांकडे दप्तर-स्कुलबॅग्स आहेत काय?

२२६ मिपाकरांनी फक्त १०० रुपये गोळा केले तर मला वाटतं सर्व मुलांसाठी मुंबईच्या मस्जिद मार्केटमधून होल्सेल भावात चांगल्या स्कूलबॅग्स मिळतील. पैसे पेटीएम किंवा ऑन्लाईन ट्रान्सफर करु शकतो आपण... कोणी मुंबईकर-ठाणेकर बॅग्स विकत आणायला जाऊ शकेल. मुंबईहून त्या रावतेपाड्याला पाठवण्याची व्यवस्थाही होईल.

पूर्णपणे सहमत. किमान रु. १००/- कमाल हवी तेवढी मदत करावी.

इरसाल कार्टं's picture

10 Dec 2016 - 1:55 pm | इरसाल कार्टं

काहींकडे आहेत तर काहींकडे नाहीत.

संदीप डांगे's picture

10 Dec 2016 - 1:56 pm | संदीप डांगे

नेमका आकडा सांगा किती लागतील... किंवा सर्वांनाच नवीन मिळालीत तर भेदभाव वाटणार नाही..

इरसाल कार्टं's picture

10 Dec 2016 - 2:05 pm | इरसाल कार्टं

दप्तरांऐवजी जर प्रयोग शाळा साहित्य अथवा ग्रंथालयासाठी पुस्तके मिळाली तर जास्त बरे होईल.
बहुसंख्य मुलांकडे दप्तरे आहेत असे मुख्याद्यापक म्हणाले.
ग्रंथालयाला पुस्तकांची खास गरज आहे.

संदीप डांगे's picture

10 Dec 2016 - 2:14 pm | संदीप डांगे

कोणती पुस्तके लागतील? साहित्य कोणते?

मला एक सुचवावं वाटतंयः शाळेला नेमक्या कोणत्या साहित्यांची किती गरज आहे, तातडीची व उशीरा आली तरी चालतील अशी वर्गीकरण करुन एक यादी टाका. लक्ष्य निर्धारित करायला सोपं पडेल, त्यासाठी मग कृती आराखडा ठरवता येईल. इथे मदत करणार्‍या लोकांना दृश्य जरा स्पष्ट होईल. जबाबदारी वाटून घेतली व ध्येय निश्चित झाले तर काम व्यवस्थित होईल असे वाटते.

इरसाल कार्टं's picture

10 Dec 2016 - 2:17 pm | इरसाल कार्टं

आज संध्याकाळ पर्यंत पाठवतो यादी.
इथेच देईन प्रतिसादामध्ये.

अमर विश्वास's picture

10 Dec 2016 - 3:22 pm | अमर विश्वास

इरसालजी ...
उत्तम उपक्रम ..
पुस्तांकांची यादी द्यावी. व्यवस्था करतो.

इरसाल कार्टं's picture

10 Dec 2016 - 3:28 pm | इरसाल कार्टं

संध्याकाळी ७ पर्यंत मी अपेक्षित असलेल्या साहित्याची यादी चिकटवतो इथे.

निओ१'s picture

10 Dec 2016 - 3:41 pm | निओ१

यादीची वाट पाहतोय.

वरुण मोहिते's picture

10 Dec 2016 - 3:52 pm | वरुण मोहिते

त्यामुळे यथाशक्ती मदत होईलच पण पुस्तकं कुठली लागणार याची पण यादी द्या .
अवांतर - मिपा दशकपूर्ती उपक्रम अंतर्गत हा हि उपक्रम घेतलात तर छान होईल. अनेक वंचित संस्था आहेत महराष्ट्रात आणि १००-२०० रुपये देणे कोणालाही जड नाही . अशीच एक सूचना . पण मिपा वरून व्यवहार नको असं संपादकांचं धोरण आहे त्यामुळे डिसक्लेमर टाकून हा उपक्रम राबवता येईल . दशकपूर्तीच्या निमित्ताने .

इरसाल कार्टं's picture

10 Dec 2016 - 10:47 pm | इरसाल कार्टं

यादी टाकायला उशीर केल्याबद्दल क्षमस्व.

पुस्तके:

०१) ययाती = वि. स. खांडेकर 
०२) वळीव = शंकर पाटील
०३) एक होता कार्वर = वीणा गवाणकर
०४) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती
०५) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात
०६) शिवाजी कोण होता- गोविंद पानसरे
०७) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर
०८) तीन मुले = साने गुरुजी
०९) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.
१०) आय डेअर = किरण बेदी
११) तिमिरातुन तेजाकड़े- डॉ. नरेंद्र दाभोलकर
१२) मृत्युंजय = शिवाजी सावंत
१३) फकिरा = अण्णाभाऊ साठे
१४) जागर - 
१५) अल्बर्ट एलिस - अंजली जोशी
१६) प्रश्न मनाचे - डॉ. हमीद आणि नरेंद्र दाभोलकर
१७) समता संगर- डॉ. नरेंद्र दाभोलकर
१८) -
१९) ठरलं डोळस व्हायचं- डॉ. नरेंद्र दाभोलकर
२०) मी जेव्हा जात चोरली - बाबुराव बागुल
२१) गोपाळ गणेश आगरकर = ग. प्र. प्रधान
२२) कुमारांचे कर्मवीर - डॉ. द. ता. भोसले
२३) खरे खुरे आयडॉल- यूनिक फीचर्स
२४) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी
२५) प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
२६) अग्निपंख- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
२७) लज्जा - तसलीमा नसरीन
२८) दैनंदिन पर्यावरण - दिलीप कुलकर्णी
२९) रणांगण = विश्राम बेडेकर
३०) बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे
३१) श्यामची आई = साने गुरुजी
३२) माझे विद्यापीठ ( कविता ) = नारायण सुर्वे
३३) बि-हाड - अशोक पवार
३४) व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे
३५) माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर
३६) उचल्या = लक्ष्मण गायकवाड
३७) अमृतवेल = वि.स.खांडेकर
३८) नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर
३९) हिरवा चाफा = वि.स.खांडेकर
४०) क्रोंचवध = वि.स.खांडेकर
४१) झोंबी = आनंद यादव
४२) इल्लम = शंकर पाटील
४३) ऊन = शंकर पाटील
४४) झाडाझडती = विश्वास पाटील
४५) नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर
४६) बाबा आमटे = ग.भ.बापट
४७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात
४८) इस्त्राइलची शेती- 
४९) बहाद्दुर थापा - संतोष पवार
५०) -
५१) आई = मोकझिम गार्की
५२) स्वभाव , विभाव = आनंद नाडकर्णी
५३) बलुत = दया पवार
५४) कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर
५५) स्वामी = रणजीत देसाई
५६) वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे
५७) पांगिरा = विश्वास पाटील
५८) पानिपत = विश्वास पाटील
५९) युंगंधर = शिवाजी सावंत
६०) छावा = शिवाजी सावंत
६१) श्रीमान योगी = रणजीत देसाई
६२) जागर खंड – १ = प्रा. शिवाजीराव भोसले
६३) जागर खंड – २ = प्रा. शिवाजीराव भोसले
६४) वावटळ- व्यंकटेश माडगुळकर
६५) ग्रेटभेट - निखिल वागळे
६६) भारताचा शोध = पंडित जवाहरलाल नेहरू
६७) गोष्टी माणसांच्या = सुधा मूर्ती
६८) वाईज अंड आदर वाईज
६९) उपेक्षितांचे अंतरंग = श्रीपाद महादेव माटे
७०) माणुसकीचा गहिवर = श्रीपाद महादेव माटे
७१) यश तुमच्या हातात = शिव खेरा
७२) आमचा बाप अन आम्ही = डॉ. नरेंद्र जाधव
७३) कोसला = भालचंद्र नेमाडे
७४) गांधीनंतरचा भारत- रामचंद्र गुहा
७५) आधुनिक भारताचे निर्माते- रामचंद्र गुहा
७६) नापास मुलांची गोष्ट = अरुण शेवते
७७) एका कोळियाने = अन्रेस्ट हेमींग्वे
७८) महानायक = विश्वास पाटील
७९) आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर
८० ) चकवा चांदण – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली
८१) मिरासदार- द. मा. मिरासदार
८२) सुरेश भट यांचे सर्व कविता संग्रह
८३) ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
८४) स्पर्धा काळाशी- अरुण टिकेकर, अभय टिळक
८५) बदलता भारत- भानु काळे
८६) कोल्हाटयाचं पोरं- किशोर काळॆ
८७) साता उत्तराची कहानी- ग. प्र. प्रधान
८८) मध्ययुगिन भारताचा इतिहास- मा. म. देशमुख
८९) तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी
९०) शिक्षक असावा तर …? = गिजुभाई
९१) समग्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर- चांगदेव खैरमोडे
९२) समग्र महात्मा फुले- राज्य सरकार
९३) झोत- रावसाहेब कसबे
९४) ओबामा - संजय आवटे
९५) एकेक पान गळावया- गौरी देशपाडे
९६) आई समजुन घेताना- उत्तम कांबळे
९७) छत्रपति शाहू महाराज - जयसिंगराव पवार
९८) अमृतवेल- वि. स. खांडेकर
९९) महात्म्याची अखेर-जगन फडणीस
१००) बुद्ध आणि त्याचा धम्म- डॉ. बाबासाहेब आंबेडकर|  

प्रयोग शाळा साहित्य:
मानवाची अंतररचनेचे fiber मॉडेल -
डोळा, कान, मेंदू, जठर, वृक्क, श्वसन नलिका
सूक्ष्मदर्शकाच्या slide-अमिबा,पँरामेशिअम, कवक, फ्लुनेरिया, वनस्पती व प्राणी पेशी,
संयुक्त सूक्ष्मदर्शक,
कान डोळा प्रयोग, सर्व scientistचे तक्ते,
सर्व प्रयोगांचे संक्षिप्त स्वरूपातील तक्ते

जीवशास्त्र,रसायन व भौतिकशास्त्र कपाट
स्पिरीट दिवे, ओहमचा नियम, लँक्टोमीटर, स्फिग्नोमीटर, गणितीय कंपास, विविध शोधांची पुस्तके
1. Eksar jodani
2. Samantar jodani
3. Prism
4. Kachechi chip
5. Bhing
6. Litmus paper
7. Urdhwapatan upkaran
8.ph mapan paper 
9.magnets
10.ohms rule upkaran
11. Different slides
12.microscope
14.test tubes
14.beaker
15.chemicals
16. Dhatunche namune.   

1.voltmeter
2.Ameter
3.electrode  
4.aavartsarani
5. Prani vanaspatiche नमुने.

हि यादी खूप लांबी आहे याची कल्पना आहे आम्हाला, म्हणून हे मनापासून सांगावेसे वाटते कि आपणाकडून जेवढे शक्य होईल तेवढेच द्या. जुनी पुस्तकेहीआम्हीआनंदाने स्वीकारू. आणि या यादीव्यतिरिक्तही, तुमच्या परिचयातील ५वी ते १०वीतल्या मुलांसाठी साजेशी पुस्तकेही आम्ही स्वीकारू.

आपण केलेली कुठल्याही प्रकारची मदत कितीही छोट्या स्वरूपात असली तरी तिचे स्वागत आहे.

आणि हो, उद्या आणि परवा (११ आणि १२ डिसेंबर) मी हरीश्चंद्रगडला ट्रेक ला जाणार आहे (त्यानिमित्ताने मिपा फिटनेस वीकांतही साजरा करता येईल). त्यामुळे मी ऑफलाईन असेन. कुठल्याही प्रकारचा संपर्क साधता येणार नाही.

सोमवारी संध्याकाळी अथवा मंगळवारी तुम्हा सर्वांशी आवर्जून संपर्क साधेन.

सर्वांना मिपा फिटनेस वीकांतसाठी शुभेच्छा.

संदीप डांगे's picture

10 Dec 2016 - 10:52 pm | संदीप डांगे

वरील यादीतल्या वस्तूंच्या किमतीचा व कुठे मिळतील याचा अंदाज कोणी देऊ शकेल काय?

इरसाल कार्टं's picture

10 Dec 2016 - 10:56 pm | इरसाल कार्टं

हे मात्र मलाही माहित नाही.

इरसाल कार्टं's picture

12 Dec 2016 - 10:46 pm | इरसाल कार्टं

मिळतायत का विक्रेते प्रयोगशाळा साहित्यासाठी?
मला इंडिया मार्ट वर भरपूर पर्याय मिळाले होते पण मी दोन दिवस ऑफलाईन असणार होतो म्हणून त्यांना माझा नंबर नाही दिला नाहीतर ते दोन दिवस फोन लावत बसले असते मला.
तुमच्यापैकी कोणी प्रयत्न केला होता का?

प्रयोगशाळा साहित्य मिळाले का? वर दिलेली यादी तशीच्या तशी अजूनही लागू आहे की काही साहित्य जमले आहे आता?
पुस्तके/ प्रशा - दोन्हींचे विचारत आहे.

इरसाल कार्टं's picture

23 Jan 2017 - 6:24 pm | इरसाल कार्टं

तसेच काही मिपाकरांनी पुस्तके देण्याचे आश्वासन दिले आहे.
कालच पुण्याहून एक कम्प्युटर, प्रिंटर आणि एक वॉटर प्युरिफायर आणले आम्ही.

सुबोध खरे's picture

9 Feb 2017 - 12:32 pm | सुबोध खरे

लोकांच्या नजरेसमोर राहावा यासाठी धागा वर आणत आहे.

इरसाल कार्टं's picture

9 Feb 2017 - 1:50 pm | इरसाल कार्टं

धन्यवाद!

इरसाल कार्टं's picture

10 Feb 2017 - 10:08 am | इरसाल कार्टं

या संदर्भात संपर्क करणारे सगळे मला सर म्हणतात.
माझं खरं नाव कल्पेश गावळे आहे, मित्र सगळे कल्प्या म्हणून हाक मारतात. हवं तर घरचे म्हणतात तसे पिंट्या म्हणा पण सर म्हणू नका.