विंगेत गलबला - कास्टिंग काउचचे रिंगमास्टर सारंग साठे येत आहेत हो! खट्ट्याक!

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in लेखमाला
25 Jan 2017 - 7:39 am

*/

नमस्कार!

'गोष्ट तशी छोटी'चा आज समारोपाचा दिवस. विंगेत गलबलामध्ये लागलेला हा शेवटचा खेळ!

आजची मुलाखत ही अनेक गोष्टींसाठी खास आहे. हा उपक्रम करायचं ठरवलं, तेव्हा अगदी चित्रकथीसारख्या पारंपरिक सुरुवातीपासून ते वेबसिरीजसारख्या आधुनिक कथाकथनापर्यंत सगळं काही ह्यात यायला हवं, हा आम्हा दोघींचाही आग्रह होता. मराठीत वेबसिरीज म्हटलं की एकच नाव ठळकपणे समोर येतं.. 'भारतीय डिजिटल पार्टी!' आणि भाडिपा = कास्टींग काउच = अमेय आणि निपुण हेही पक्कं डोक्यात होतं. त्यात निपुणच्या नाटक कंपनीबद्दलही बरंच ऐकलेलं असल्याने त्याला मेसेज करून ठेवला. तो आमचा एखाद्या सेलेब्रेटीला केलेला पहिला मेसेज! आणि निपुणचं त्यावर आलेलं उत्तर ही विंगेत गलबलाची सुरुवात..

निपुणने नाटक कंपनीबद्दल बोलायला होकार दिलाच, त्याचबरोबर भाडिपाबद्दल बोलायचं असेल तर सारंगला भेटा हेही कळवलं. सारंग साठे.. नाव तर ओळखीचं होतं. पण कुठे पाहिलंय हे समजेना. गुगल करून पाहिलं, तर अरेच्चा!!! हा तर मार्को पोलो!!

ट्रिपलिंग ह्या गाजलेल्या वेबसिरिजमध्ये आलेल्या ह्या 'मार्को पोलो'ने तो एपिसोड गाजवला होता!! तो नेमका कसा, ह्यासाठी टिपलिंगचा चौथा भाग नक्की बघा. हा माणूस दिग्दर्शक आहे?? कास्टिंग काउचचा?? खरंच वाटेना.. मग माहिती काढायला लागल्यावर लक्षात आलं की हे प्रकरण दिसतं तितकं साधं नाही. वरकरणी अगदी साधा दिसणारा हा माणूस, खरं तर 'शांतीत क्रांती' आहे! तसा फारसा न बोलणारा, शाब्दिक फुलबाज्या न उडवणारा आणि मुलाखतीच्या शेवटी "माझी कुणी फार मुलाखत घेत नाही ना, म्हणून मी खूप बोललो!" असंही प्रांजळपणे सांगणारा हा एकदम सज्जन मनुष्य आहे. "मी काही विशेष केलेलं नाही हो.." म्हणत आपल्याला थक्क करणारा चतुरस्र कलावंत!

ही मुलाखत व्हिडिओवरच व्हायला पाहिजे हे तर नक्की झालं होतं. पण सारंग मुंबईमध्ये. पुण्यात असता तर दहा जण शोधले असते. नेमकं मुंबईत कुणी मिळेना. पण अचानक लक्षात आलं, मुलाखत घ्यायला समोर कुणी हवंच हा नियम कुठंय?! मारू या की व्हिडिओ गप्पा. त्यातूनच तयार झाली ही ८००० मैलांवरून झालेली स्काईप मुलाखत!

भौगोलिक सीमारेषा ओलांडून, आपल्याला जे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे ते मांडण्यासाठी आंतरजालाचा प्रभावी वापर करून घेणार्‍या सारंगची मुलाखतही अशी व्हावी, हा कोणता योग म्हणावा?!

ह्या गुणी आणि अत्यंत प्रांजळ माणसाची मुलाखत घ्यायला मिळणं हा ह्या उपक्रमातला सर्वात आनंददायी अनुभव होता. सारंगने ह्या मुलाखतीसाठी मिसळपावला वेळ दिला, ह्यासाठी त्याचे अनेक आभार!

(तळटीपः- मायबाप रसिक प्रेक्षकांनी व्हिडिओची क्वालिटी समजून घ्यावी. कितीही म्हटलं तरी मोबाइलचा फ्रंट कॅमेरा आहे. आणि डेटा प्लानवाल्यांसाठी कमी साइझमध्ये फाइल्स बसवल्या आहेत.)

प्रतिक्रिया

सूड's picture

25 Jan 2017 - 1:10 pm | सूड

आयला, मार्को पोलो?

मिपाकरांसाठी ही लिंक... चौथ्या एपिसोडला ज्या सहजतेने, "इथे पुण्याचा आहे रे मी" येतं ....फुटलोच होतो राव!!

https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=&cad=rja...

पिलीयन रायडर's picture

25 Jan 2017 - 1:26 pm | पिलीयन रायडर

आणि ते त्याने स्वतः लिहीलं आहे!!

भारीच!! घरी जाऊन बघतो मुलाखत.

संजय क्षीरसागर's picture

25 Jan 2017 - 3:48 pm | संजय क्षीरसागर

थँक्स पिरा ! आणि

स्काईप मुलाखतीची आयडीया एकदमच भारी !

खटपट्या's picture

25 Jan 2017 - 8:06 pm | खटपट्या

ही मुलाखतही छान झाली. मुलाखतकार चित्रफीतीत दीसतायत हे चांगलंय.
दुसर्‍या एका मुलाखतीत भालेराव साहेब दीसले...

भडकमकर मास्तर's picture

26 Jan 2017 - 6:01 am | भडकमकर मास्तर

झकास!!!

आनंदयात्री's picture

26 Jan 2017 - 7:18 am | आनंदयात्री

मराठीत इतकी चांगली वेब सिरीज आहे हे माहिती नव्हते. बैठकीत चार भाग बघून काढले.
मागे ते AIB चे काहीतरी पहिले होते आणि वेब सिरीज प्रकरणाच्या वाट्याला जायचे नाही असे ठरवले होते. हे प्रकरण खत्तर्नाक आहे. आवडले.
आता ते व्हिडीओ बघून हा आणि निपुण धर्माधिकाऱ्यांचा व्हिडीओ बघणार. धन्यवाद.

भडकमकर मास्तर's picture

27 Jan 2017 - 2:03 pm | भडकमकर मास्तर

टीव्हीएफ च्या वेब सीरीज बघा. माझी आवडती "पिचर्स-" पूर्ण पाच भाग बघा.
ट्रिपलिन्ग ही छान आहे. "ह्यूमरसली युअर्स " बघाच.

माझी आवडती "पिचर्स-" पूर्ण पाच भाग बघा.

अगदी!! वेड लागतं त्या सिरीजचं!!

"ह्यूमरसली युअर्स " बघाच.

ही बघतोय, पण जरा संथगती वाटली.

पिलीयन रायडर's picture

27 Jan 2017 - 7:35 pm | पिलीयन रायडर

भडकमकर मास्तर!! आमच्या धाग्यावर!!! बाब्ब्बो!!

तुम्ही सांगितलेल्या सिरिज लगेच पहाणार. पर्मनंट रुममेट्सच आत्तापर्यंत सर्वात जास्त आवडलेली आहे.

बादवे.. टिव्हीएफ व्यतिरिक्त अजुन कुठे चांगल्या वेबसिरिज पहायला मिळतील?

रातराणी's picture

1 Feb 2017 - 10:08 pm | रातराणी

पिचर्स भन्नाट आहे! आता ट्रिपलिंग आणि ह्युमरसली युवर्स लिस्टवर आहेत. एकूणच या वेब सिरीज प्रकाराबद्दल फारशी माहिती नव्हती. टीवीवरच्या रटाळ कधीही न संपणाऱ्या मालिका पाहण्यापेक्षा हे इंटरेस्टिंग वाटतंय. मुलाखत आवडली.

आनंदयात्री's picture

28 Jan 2017 - 12:09 am | आनंदयात्री

>>टीव्हीएफ च्या वेब सीरीज बघा. माझी आवडती "पिचर्स-" पूर्ण पाच भाग बघा.

ओके मास्तर. बघतो अन सांगतो.

पद्मावति's picture

26 Jan 2017 - 12:41 pm | पद्मावति

खूप छान मुलाखत. आवडली.

नूतन सावंत's picture

26 Jan 2017 - 4:29 pm | नूतन सावंत

वेगळ्या पद्धतीने घेतलेली रोचक मुलाखत.बऱ्याच गोष्टी समजल्या.फक्त आवाज कमी वाटला,कान देऊन ऐकावे लागले.

ज्योति अळवणी's picture

26 Jan 2017 - 4:46 pm | ज्योति अळवणी

खूपच छान. मुलाखत मस्त झाली आहे

राघवेंद्र's picture

26 Jan 2017 - 7:53 pm | राघवेंद्र

मुलाखत छान झाली. बऱ्याच नव्या गोष्टी माहिती झाल्या !!!

रेवती's picture

27 Jan 2017 - 6:02 am | रेवती

मुलाखत आवडली.

पुंबा's picture

27 Jan 2017 - 12:31 pm | पुंबा

चांगली आहे मुलाखत. माणूस धडपडा वाटला.

पिलीयन रायडर's picture

27 Jan 2017 - 8:01 pm | पिलीयन रायडर

मला हे लेखात लिहावं की नाही हे कळत नव्हतं. पण आता तुम्ही मुलाखत पाहिली आहे तर लिहीते.

माणूस फारच धडपड्या आहे. प्रचंड कष्टातुन वर आलेला.. रादर येत असलेला.. (आणि माझ्यामते, लायकी असुनही थोडी कमी प्रसिद्धी मिळालेला..)

मला सर्वात जास्त हे आवडलं की त्याने स्वतःला आहे तसं अगदी मजेत स्वीकारलं आहे. म्हणजे मला अमुक एक गोष्ट येत नाही पण तमुक मात्र मी उत्तम करतो. किंवा मला शाळेत बसुन शिकता येत नाही, पण मी ऑन फिल्ड उत्तम शिकु शकतो. मी सीए मध्ये नापास झालो.. माझ्या कडे पैसे नव्हते.. माझा कुणीही कधी इंटरव्ह्यु घेत नाही फारसा.. असं अगदी सहज सांगु शकणारा. अगदी निवांत गप्पा मारलेल्या आहेत. कुठेही आव नाही किंवा स्वतःला महान समजणं नाही.. नापास झालो तर झालो.. पैसे नव्हते तर नव्हते. सिंपल...

एक मात्र आहे.. आजकालच्या ह्या स्टार लोकांशी बोलताना दडपण येत नाही. निपुणचंही तसंच झालं. पुष्करचंही. त्यांनी अगदी मित्रासारख्या गप्पा मारल्या. मधुगंधाही फारच साधी आहे. वेळ मिळवणं थोडं अवघड जातं. पण एकदा बोलायला लागले की मनापासुन बोलतात...

पुंबा's picture

30 Jan 2017 - 11:31 am | पुंबा

तेच ना. स्टारडमचं ओझं बाळगलेलं नाही कुणीच. अर्थात तुम्ही सर्व मुलाखतकारांनीदेखील अगदी सहज गप्पा मारत त्यांना बोलतं केलयंत.
अवांतरः मला वाटतं सोशल मिडीयामुळे पुर्वीइतकं आपल्या आवडत्या कलाकारांना भेटणं अप्राप्य राहीलं नाही, स्टार्सनादेखील रोज विविध माध्यमांद्वारे लोकांशी संबंध ठेवावाच लागतो. या साध्या लोकांपेक्षा मी वेगळा स्पेशल आहे ही भावना कमी झाली असावी.

कंजूस's picture

27 Jan 2017 - 8:34 pm | कंजूस

छान;

एनिग्मा's picture

28 Jan 2017 - 3:35 am | एनिग्मा

झकास मुलाखत झाली आहे. त्यांची ही धडाडी पाहून खालील ओळी सुचल्या

रोकके दिखाये हमारी राहें
देखते हे जमानेमे कीर्तन दम हें ।
हमारे इरादे इतने हे बुलंद
इसके आगे आसमा भी कम हें ।

विशाखा पाटील's picture

30 Jan 2017 - 3:31 pm | विशाखा पाटील

मुलाखत छान झाली आहे.