सोनी टीव्ही: पेशवा बाजीराव मालिका

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
24 Jan 2017 - 3:41 pm
गाभा: 

सोनी TV वर हिंदीतून २३ जानेवारी २०१७ पासून रोज (सोम-शुक्र) संध्याकाळी ७:३० वाजता भव्य दिव्य "पेशवा बाजीराव" मालिका सुरु झाली आहे. पहिला एपिसोड मी बघितला. एका तासाचा होता. मला खूप आवडला. एखादा भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपट बघतोय असेच वाटत होते.

उत्तम आणि श्रीमंत निर्मितीमूल्ये आहेत. कलाकारांचा अभिनय छान वाटला. एडिटिंग टाईट आहे. कथा रेंगाळत नाही! यात घटना खूप नाटकीय पद्धतीने पेश केल्या आहेत तरीही त्यामुळेच बघायला इंटरेस्ट वाटतो नाहीतर मग अशा ऐतिहासिक कथा डॉक्युमेंटरी वाटण्याची भीती असते.

ज्यांनी पहिला एपिसोड बघितला आणी जे पुढेही सिरीयल बघणार असतील ते या लेखाला पतिसाद देऊ शकतात, चर्चा करू शकतात. त्यानिमित्ताने ऐतिहासिक ज्ञानात भर पडेल. एक उत्तुंग मराठी ऐतिहासिक व्यक्तिरेखा एका आघाडीच्या राष्ट्रीय वाहिनीवर दाखवण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ आहे आणि ही एक चांगलीच गोष्ट आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी वर "बाजीराव मस्तानी" मालिका आली होती. ती सुद्धा छान होती.

प्रतिक्रिया

पहिला एपिसोड पाहिला नाहि. पण ऐतिहासिक मालिका पहायला आवडतात. त्यामुळे बघेनहि कदाचित.

फक्त दिड तास उरलाय! (IST)

पद्मावति's picture

24 Jan 2017 - 5:02 pm | पद्मावति

+1
मीही पाहणार. बरेच दिवसांपासून ट्रेलर पाहत होते. चांगलं वाटलं होतं. पण नेमकी काल बघायचे राहून गेले. या धाग्यामुळे आठवण झाली. धागाकर्त्यान्चे आभार.

फेदरवेट साहेब's picture

24 Jan 2017 - 5:12 pm | फेदरवेट साहेब

कोणीतरी आपली मराठी संस्कृती रुपेरी छोट्या पडद्यावर मांडायचा यत्न करतोय ह्याचे खुल्या दिलाने कौतुक करणारा धागा आवडला. सहसा मराठीजनात हा गुण विरळ असतो.

पंजाबी लोकांत हा गुण भरपूर असतो. त्यांना पंजाबी संस्कृती थोडी भडक दाखवलेली का असेना तिला समर्थन द्यायचा एक पिंड असतो. मराठी माणसे आपल्या संस्कृतीवर प्रेम खूप कारतात पण त्या प्रेमात पोथीनिष्ठा प्रचंड असते. अमुक पात्राचे कपडे असेच का दाखवले मुरड त्या प्रयोगाला नाक, तमुक पात्राची भाषाच अशी का दाखवली म्हणुन तो चित्रपट/नाटकच संस्कृतिनिष्ठ नाही म्हणून नाके मुरडा. बरं इतकं असूनही चित्रपट/इतर माध्यमात पंजाबी आक्रमण वाढले आहे म्हणत हीच पोथीनिष्ठ मंडळी हाकाटी काढणार. त्याने सगळेच त्रांगडे होते. त्यामुळे त्यांच्या ओळीत न बसता खुल्या मनाने ह्या मालिकेचे कौतुक केल्याबद्दल तुमचे खास कौतुक मी करतो.

निमिष सोनार's picture

24 Jan 2017 - 6:00 pm | निमिष सोनार

आणि कौतुकाबद्दल धन्यवाद !!

खेडूत's picture

24 Jan 2017 - 5:19 pm | खेडूत

पहिला भाग पाहिला.. आवडला. काहीसा फिल्मी वाटला.
श्रेयनामावली दिली असतीत तर बरे झाले असते, पात्रे कोण आहेत माहीत नाहीत - पल्लवी जोशी फक्त ओळखली.

हेमंत लाटकर's picture

24 Jan 2017 - 7:05 pm | हेमंत लाटकर

पहिला भाग पाहिला. छान आहे. थोरले बाजीराव पेशवेंचा इतिहास लोकांना कळेल. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज नंतरचा इतिहास लोकांना शक्यतो माहित नाही.

पद्मावति's picture

25 Jan 2017 - 4:17 am | पद्मावति

आता दोन भाग बघितले. छानच ग्रिप घेतलीय मालीकेने. पल्लवी जोशी ( ताराबाई) , अनुजा साठे( राधाबाई) आणि मनिष वाधवा( बाळाजी विश्वनाथ) यांची कामे हाय क्लास!!! सेट्स, कॉस्ट्यूम्स खूप छान authentic आहेत. हिंदीमधे किंचित मराठी लहेजा आणि अधून मधून मराठी शब्द अगदी नैसर्गिक वाटतात.
फक्त आवाजाची क्वालिटी जरा त्यानी सुधारायला हवी असे वाटून गेले. पात्रांचे आवाज बॅकग्राउंड नॉइस मधे थोडे दबल्यासारखे वाटले.

हेमंत लाटकर's picture

25 Jan 2017 - 8:01 am | हेमंत लाटकर

शाहु महाराजांची सुटका करायला बाळाजी विश्वनाथ गेले नव्हते. औरंगजेबाच्या मृत्यू नंतर आजम ने मराठ्यांमध्ये छत्रपती पदासाठी कलह व्हावे म्हणून शाहु महाराजांची सुटका केली पण येसूबाईंना कैदेत ठेवले. ऐतिहासिक मालिका, पिक्चर बनवताना पुस्तकाचे वाचन न करता अतिशवोक्ती दाखविली जाते.

त्रिवेणी's picture

25 Jan 2017 - 8:46 am | त्रिवेणी

दोन्ही भाग बघितले आणि आवडले ही. फक्त कथेत जास्त पाणी नाही मिसळले तर बर. सध्यातरी रोजच बघेन.

यशोधरा's picture

25 Jan 2017 - 8:49 am | यशोधरा

मी ह्या मालिकेचे प्रोमो पाहिलेत १-२. अजून मालिका पाहिली नाही. पहावी का? की इतिहासाची मोडतोड केलीय? तसे खूप असेल तर मग नको वाटते पहायला.

फेदरवेट साहेब's picture

25 Jan 2017 - 10:35 am | फेदरवेट साहेब

मला वाटते अश्या मालिकांत इतिहास न शोधलेला बरा. एकतर तो काही इतिहासाचा क्लास नाही, दुसरे म्हणजे तो फुल फ्लेज व्यवसाय आहे. त्याला कमाई करायची आहे त्यामुळे तो दिग्दर्शक/निर्माता त्याच्या व्यावसायिक समीकरणात नफा करवून देईल असेच सगळे दाखवणार. दोन एपिसोड नीट असले तरी पुढे तसेच राहील अशी काही शक्यता तूर्तास दिसत नाही. इतिहासाला प्रामाणिक अश्या आजवर भारतीय दूरचित्रवाणी परिघात दोनच प्रयोग पाहिले एक म्हणजे विनय आपटे ह्यांचे राजा शिवछत्रपती अन बिहारच्या जगदीशपुरच्या लढाऊ राजपूत उर्फ बाबू कुंवरसिंह ह्यांच्यावर तयार केलेली 'कुंवरसिंह' मालिका (दोन्ही दूरदर्शनवर लागत)

रच्याकने, इतिहासाची मोडतोड व्हायला आधी भारतीय समाजात इतिहासावर एकमत झालंय का हे पाहणे रोचक ठरेल =))

कालचा भाग पहिला. चांगला वाटला. रोज बघेन बहुतेक. पण सोनी वरच्याच कर्ण मालिके सारखं न होवो ह्या मालिकेचं. कर्ण च्या बाबतीत "मृत्युंजय" चा एवढा पगडा होता मनावर कि त्या व्यतिरिक्त काहीही दाखवून मालिका भरकटली आणि डोक्यात जायला लागली होती.

चिकित्सक's picture

26 Jan 2017 - 9:54 pm | चिकित्सक

आजकाल ऐतिहासिक मालिका दाखवण्याचा चॅनेल वाल्यांचा कल जास्त आहे त्यात परत त्या पात्राचे लहानपण वर्ष भर दाखवतील काही प्रसंग बळे-बळेच घुसवणार आणि मग तोंडघशि पडणार , अशोका मालिकेच असच झाल , असो |

प्रस्तुत मालिकेचे २-३ एपिसोड बघितलेत , मनीष वाध्वा गेल्याच कळल्यावर अनुजा साठे हिचे केस भादरण्याचे प्रसंग हे अगदी फेक वाटते , मुळात त्या काळी कुणी कुण्याच्या घरात संस्कृती अश्या प्रकारे जपायला चक्क घुसायचे का ? वर कुणा बाई चे केस भादारायला कुणी खास न्हाव्या ला सुपारी देत होते का ? मालिकेचा डायरेक्टर आणि स्क्रिप्ट राइटर नक्कीच पिऊन असावा |पुढचे भाग बघितल्यावर बहुधा कल्पना येईल कि पुढे काय वाढून ठेवल आहे

निमिष सोनार's picture

27 Jan 2017 - 11:53 am | निमिष सोनार

मात्र मनीष वाधवाचा त्या प्रसंगानंतरचा खालील संवाद छान लिहिलाय:
"संस्कृती ही साचलेलं डबकं किंवा विहिर नसून ती एक प्रवाही नदी असते जी सतत आपले रूप बदलत असते!" वगैरे वगैरे!

निमिष सोनार's picture

27 Jan 2017 - 2:19 pm | निमिष सोनार

एखाद्या गोष्टीची अगदी बारीकसारीक "चिकित्सा" केली तर पावलो पावली दोष दिसतीलच.

निमिष सोनार's picture

27 Jan 2017 - 11:50 am | निमिष सोनार

कालच्या २६ जानेवारीच्या एपिसोड मधील तिन्ही बालकलाकारांचा (बाजीराव, त्याचा भाऊ चिमणाजी आणि बहिण) सहज सुंदर आणि उत्स्फूर्त अभिनय खूप आवडला. मनीष वाधवा (बालाजी भट) हा कलाकार मराठी नाही तरीही त्याचा अधून मधून येणारा "हो" आणि "सरकार" या शब्दांचा मस्त मराठमोळा उच्चार एकदम दाद देण्याजोगा!

चिकित्सक's picture

27 Jan 2017 - 7:26 pm | चिकित्सक

साहजिक आहे त्याचा जन्म मुंबईचा आणि वाढला सुद्धा महाराष्ट्रातच , मनीष वाध्वा चांगला नट आहे ह्या पुर्वी ही त्याच्या अनेक ऐतिहासिक मालिका येऊन गेल्या

चिकित्सक's picture

27 Jan 2017 - 7:21 pm | चिकित्सक

चिमा जी अप्पा चा हे सोनी वाले विलेन बनवणार , आतापासून लिहून देतो वर्षभर लहान बाजीरावांचे प्रकरण त्या पुढे १०-१५ एपिसोड मोठेपणीचा बाजीराव दाखवणार आणि लगेचच मस्तानी प्रकरण| बाजीरवांच्या ४० लढाया ४ एपिसोड मधे आटोपतील ही लोक | त्या पेक्षा दूरदर्शन ची ग्रेट मराठा सिरीयल नक्कीच सरस होती , नाही म्हणजे संजय खान नी सिनिमॅटिक लिबर्टी घेतली पण पानिपत ची लढाई ज्या प्रकारे दाखवली त्यास तोड नाही उम्दे सेट्स आणि वेशभूषा होती, संगीत सुद्धा ख्य्याम सारख्या दिग्गज संगीतकारानी दिले | इरफान खान नजीब खान रोहिल्याच्या भूमिकेत होता तर शहबाज खान महादजी शिंदे , पंकज धीर आणि मुकेश खन्ना अनुक्रमे सदाशिव राव भाऊ आणि इब्राहीम खान गार्दी बनले होते त्या पुढे पेशवा बाजीराव ही मालिका अगदीच किरकोळ वाटते |

हो आठवतेय दि ग्रेट मराठा!छानच होती.
बाजीराव पेशव्यांची हि नवी सिरियल पाहिली.अतिशयोक्ती केली नाहि म्हणजे मिळवले.बाकी कलाकार, संवाद चांगले वाटले. कथानक अजून ठिक चालु दिसतयं. पुढच बघु.

पद्मावति's picture

27 Jan 2017 - 9:07 pm | पद्मावति

चिमा जी अप्पा चा हे सोनी वाले विलेन बनवणार , मला नाही वाटत अस करतील. कालच्या एपिसोड मधे तो आपल्या भावाची कॉम्प्लेन्ट गुरुजींकडे करणार्‍या एका मुलाला धडा शिकवतो असा सीन आहे. त्यावरून तरी मोठेपणी चिमाजींचं कॅरक्टर या सीनशी सुसंगत ठेवतील अशी आशा आहे.
बाकी मला सेट्स, सिनेमेटॉग्राफी खूप आवडली. अनुजा साठे फारच छान आहे. अतिशय बोलका चेहरा आणि सहज अभिनय. बच्चाकंपनी पण मस्तं आहे.

सिरीयल दिवसेंदिवस रंगतदार होते आहे आणि मूळ विषयाला धरून आहे असे वाटते. आणि अजूनपर्यंत तरी इतिहासाशी प्रामाणिक वाटते आहे.
पण एक विचारावेसे वाटते: पेशवा बाजीराव यांनी खरेच इतक्या लहान असतांना घोडा जिंकला होता का?

निमिष सोनार's picture

5 Feb 2017 - 7:40 pm | निमिष सोनार

बच्चे कंपनी खरेच उत्स्फूर्त आणि नैसर्गिक अभिनय करत आहेत

निमिष सोनार's picture

16 Feb 2017 - 10:26 am | निमिष सोनार

सिरीयल अधिकाधिक कल्पक आणि रंगतदार होत आहे. आपण बघताय ना?

तुम्ही चॅनलवाल्यांपैकी कोणी आहेत का?

अत्रुप्त आत्मा's picture

17 Feb 2017 - 2:48 pm | अत्रुप्त आत्मा

=))

निमिष सोनार's picture

28 Feb 2017 - 11:40 am | निमिष सोनार

कळले का?

अत्रुप्त आत्मा's picture

17 Feb 2017 - 2:59 pm | अत्रुप्त आत्मा

तांब्या धरून-बसणार मी
जिल्ब्या खा...,वा खाऊ नका
पण आठवड्यातून येकदा तरी
माझा हा धागा बघा! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif

आपलाच- तांबिष होनार!

निमिष सोनार's picture

28 Feb 2017 - 11:41 am | निमिष सोनार

तुमच्या!!

त्याचा आत्मबंध दुखून येत नाही का वाकोल्या दाखवून दाखवून?