विंगेत गलबला - निपुण अविनाश धर्माधिकारी काऊच वर येतायेत!!! -

Primary tabs

महासंग्राम's picture
महासंग्राम in लेखमाला
21 Jan 2017 - 10:48 am

पहिल्यांदा पिरा ने जेव्हा निपुणची मुलाखत घ्यायची आहे असं सांगितलं तेव्हा थोडं टेन्शन आलं होतं आणि एवढ्या मोठ्या कलाकाराची मुलाखत घेता येईल याचा आनंद होता. टेन्शन याच्यासाठी की या आधी मास कॉम करताना प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या होत्या, पण अशी व्हिडिओ मुलाखत घेण्याचा काहीच अनुभव नव्हता.

शेवटी मुलाखतीचा दिवस उजाडला, (त्याच्या आधीचे किस्से म्हणजे एक स्वतंत्र लेखाचाच विषय आहेत ते परत कधीतरी ). मुलाखतीची तयारी करताना निपुण बद्दल भरपूर वाचल्या गेलं, कास्टिंग काऊचचे एपिसोड पुन्हा पुन्हा पाहिले. त्यामुळे मुलाखतीसाठी भरपूर मदतच झाली.

संगीत नाटक करतो म्हणजे हा माणूस अगदी गंभीर वगैरे असेल असं मला वाटलं, पण निपुण गप्पा मारायला मस्तच आहे. कट्ट्यावरच्या मित्राशी बोलताना आपण जेवढ्या सहजतेने बोलतो तेवढ्या सहजपणे तो बोलतो. आपण मोठे दिग्दर्शक-नट आहोत हा बडेजावपण बिलकुल नाही. नाटक म्हणजे त्याचा अगदी जीव की प्राण. डेबिट- क्रेडिट कडून नाटकाकडे झालेला प्रवास सांगताना तो भावुक होतो पण तसं जाणवू देत नाही.

कॅमेरा : गौरव

मुलाखतकार : मंदार भालेराव

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

21 Jan 2017 - 12:26 pm | यशोधरा

मुलाखत आवडली.

सामान्य वाचक's picture

21 Jan 2017 - 1:45 pm | सामान्य वाचक

कुठेही बडेजाव नाही

चांगली झाली आहे मुलाखत,

पद्मावति's picture

21 Jan 2017 - 2:23 pm | पद्मावति

मस्त झालीय मुलाखत. अगदी मनमोकळी. आवडली.

अकिरा's picture

21 Jan 2017 - 3:36 pm | अकिरा

खुप छान मुलाखत. कलाकार कसा घडतो याची छान माहिती मिळाली.

रेवती's picture

21 Jan 2017 - 6:26 pm | रेवती

मुलाखत आवडली.

ज्योति अळवणी's picture

21 Jan 2017 - 10:10 pm | ज्योति अळवणी

मस्तच

संजय क्षीरसागर's picture

21 Jan 2017 - 10:58 pm | संजय क्षीरसागर

मुलाखत दडपणाखाली घेतल्यामुळे फारच पांचट झालीये. निपुण आणि अमेयला जे ओळखतात ते त्यांचा सेंस ऑफ ह्युमर, टायमिंग, एकमेकात जमवलेली भट्टी, नवे विषय हाताळण्याची कपॅसिटी या खुबी जाणतात आणि त्या विषयांवर दिलखुलास चर्चा होऊ शकली असती. मुळात निपुणचा सेंस ऑफ हुमर संपूर्ण मुलाखतीत व्यक्तच होऊ शकलेला नाही.

सदस्यांना कल्पना यावी यासाठी त्यांचा नागनाथ मंजुळे बरोबरचा सैराट टीमचा हा कास्टींग काऊच विडीओ.

http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-sairat-team-in-casting-couch...

संजय क्षीरसागर's picture

21 Jan 2017 - 11:32 pm | संजय क्षीरसागर

किंवा नुसती माहितीपूर्ण होण्याऐवजी ती अजून रंगतदार होऊ शकली असती या अर्थानं.

महासंग्राम's picture

22 Jan 2017 - 10:53 am | महासंग्राम

काका, सर्वप्रथम तुमच्या प्रतिसादासाठी धन्यवाद. तुम्ही म्हणता तसं सेन्स ऑफ ह्यूमर व्यक्त होवू शकला नाही, कारण एवढ्या छोट्या भेटीत तो रॅपो जुळण थोडं कठीण आहे असं मला वाटते. आणि सैराट किंवा इतर कास्टिंग काऊच च्या बद्दल म्हणाल तर ते सगळं ठरवून केलेले असतात. स्क्रिप्तेड आणि विना स्क्रिप्ट यात थोडा फरक होईलच ना. बाकी तुमच्या मताचा पूर्ण आदर आहे.

संजय क्षीरसागर's picture

22 Jan 2017 - 1:36 pm | संजय क्षीरसागर

काऊच स्क्रिपटेड असलं तरी ऐनवेळी दोघं धमाल करतात. उदा. अनुराग कश्यपला बोलावलं होतं तेव्हा त्याच्या शूजविषयीच्या आकर्षणावर मस्त संवाद झाला :

अमेय : तुम्हाला शूज आणि व्हिस्कीचा खूप शौक आहे असं म्हणतात... तसा मला ही शूजचा शौक आहे.
अनुराग : हे बघा माझे शूज. हँडमेड आहेत. इटॅलीयन !
अमेय : हे बघा माझे पण हँडमेडच आहेत....म्हणजे कुणी तरी ते हातानंच केले असणार ना ? मी हे कोथरुडमधून घेतलेत !
अनुराग : कोथरुड ? कुठे आहे ते ?
निपुण : तुम्हाला कोथरुड माहिती नाही ? एशियातलं ते सगळ्यात मोठं सबर्ब आहे.
अमेय : हो आणि त्यांचा स्वतःचा झेंडा सुद्धा आहे !!

सिरुसेरि's picture

23 Jan 2017 - 7:50 pm | सिरुसेरि

+छान मुलाखत .

रातराणी's picture

24 Jan 2017 - 12:03 pm | रातराणी

छान झालीये मुलाखत!

खटपट्या's picture

24 Jan 2017 - 4:35 pm | खटपट्या

आयएएस ऑफीसर अविनाश धर्माधिकारी आहेत ते निपूण यांचे वडील आहेत का?