सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

विंगेत गलबला - सतीश राजवाडे येत आहेत हो!!!

Primary tabs

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in लेखमाला
22 Jan 2017 - 8:54 am

नमस्कार.
आपल्या मिपाच्या 'गोष्ट तशी छोटी'साठी सतीश राजवाडे यांची मुलाखत तुम्हा सर्वांपुढे ठेवताना मला खूप आनंद होतो आहे.

पंधरा जानेवारीला, म्हणजे गेल्या रविवारीच 'ती सध्या काय करते'च्या टीमची मुलाखत live ऐकण्याचा आणि बघण्याचा योग आला. मी दुसऱ्याच दिवशी सतीशजींना आपल्या मिपा संकेतस्थळाची माहिती दिली आणि या सिनेमाबद्दलचा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचायची विनंती केली. त्याच वेळी 'गोष्ट तशी छोटी'मध्ये सतिशजींची मुलाखत upload करावी असं मनात आलं. त्याबद्दल शोधून बघितलं, पण विशेष उपक्रमासाठीअसं थेट प्रकाशित करता येत नाही, हे लक्षात आलं. मग एस यांना व्यनि केला. त्याला लगेच उत्तर आलं स्रुजा आणि पिलीयन रायडर यांच्याकडून. मंगळवारच्या एकाच दिवसाच्या व्यनिद्वारे चर्चेनंतर मुलाखत घेणं आणि त्यातील प्रश्न असं सगळं final झालं.

मुख्य म्हणजे सतीशजी मुलाखत द्यायला लगेच तयार झाले आणि बुधवारी सकाळी मुलाखत घेतलीसुद्धा. अर्थात यात मी काहीच केलेलं नाही. कारण कॅमेरा adjust करण्यापासून ते lights adjust करण्यापर्यंत त्यांनीच सगळं केलं. मी एकूणच थोडी नर्व्हस होते, तर "आपण रिहर्सल करू या" असं म्हणून त्यांनी माझ्याकडून प्रश्नदेखील वाचून घेतले. "मला घाई अजिबात नाही, तुम्ही तुमचा वेळ घ्या" असं ते म्हणाले आणि शूटिंग सुरू झालं.

माझ्या काही चुका झाल्या, तर "काही हरकत नाही, आपण परत करू" असं म्हणून त्यांनी शेवटचा भाग परत शूट केला. माझे काही प्रश्न वेळेअभावी विचारायचे राहुन गेले तर त्यांनी स्वतःचे शूट करुन ते ही पाठवले. त्यानंतरही "जर काही गडबड झाली, तर मी परत येईन" असं त्यांनी म्हटलं आहे, हीच मोठी गोष्ट आहे. (मनात येतं - काहीतरी गडबड व्हावी आणि परत एकदा मुलाखतीसाठी त्यांनी यावं!) पण त्यामुळे मुलाखतीचा पहिला भाग हा वेगळ्या ठिकाणी तर दुसरा भाग हा वेगळ्या ठिकाणी शूट झाला आहे. बघताना प्रेक्षकांना थोडे अडखळल्यासारखे वाटेल. पण तरीही आम्ही तो भाग "पुरवणी" म्हणुन जोडत आहोत. मला खातरी आहे की 'गोष्ट तशी छोटी'ची टीम टेक्निकली इतकी चांगली आहे की मी पाठवलेले व्हिडिओज् नीट एडिट करून मिपाकरांसमोर सादर करतील.

ज्योति अळवणी

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

23 Jan 2017 - 10:27 am | यशोधरा

भारीच की राव! एकदमच पाय जमिनीवर असलेला माणूस आहे, म्हणायला हवं.
घरुन ऐकीन मुलाखत. खूपच उत्सुकता आहे.

तर "आपण रिहर्सल करू या" असं म्हणून त्यांनी माझ्याकडून प्रश्नदेखील वाचून घेतले. >> =)) हे सगळ्यात भारीय. कधीतरी त्यांच्या एखाद्या सिनेमात हे एक प्रसंग म्हणून पण वापरु शकतील!

संजय क्षीरसागर's picture

23 Jan 2017 - 11:33 am | संजय क्षीरसागर

एका कमालीच्या साध्या आणि पारदर्शक व्यक्तीशी व्यक्तिगत भेट झाल्यासारखा आनंद !

मिपा टीमला मनःपूर्वक धन्यवाद !

भारीच, घरी जाऊन बघतो हा भाग.

पद्मावति's picture

23 Jan 2017 - 12:41 pm | पद्मावति

वाह, क्या बात है! सतीश राजवाडे वाचल्याबरोबरच OMG...अस झालंय. सहीच.
आता निवांत मुलाखत पाहीन.

जव्हेरगंज's picture

23 Jan 2017 - 1:43 pm | जव्हेरगंज

+१

इशा१२३'s picture

23 Jan 2017 - 8:02 pm | इशा१२३

अगदी! अत्यंत आवडता कलाकार.सुंदर झालिये मुलाखत.
धन्यवाद !

सही रे सई's picture

23 Jan 2017 - 8:07 pm | सही रे सई

अगदी अगदी... माझा अत्यंत लाडका दिग्दर्शक आणि कलाकार..

रातराणी's picture

24 Jan 2017 - 12:21 am | रातराणी

+१!

संजय क्षीरसागर's picture

23 Jan 2017 - 1:46 pm | संजय क्षीरसागर

मी दुसऱ्याच दिवशी सतीशजींना आपल्या मिपा संकेतस्थळाची माहिती दिली आणि या सिनेमाबद्दलचा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचायची विनंती केली.

काय म्हणाले ते ?

खूप सुरेख झालीय मुलाखत. आवडली. अतिशय छान बोलले आहेत राजवाडे. प्रश्नसुद्धा उत्तम विचारले आहेत. रॅपिड फायर प्रश्नांची आयडिया पण मस्तं.

प्रचेतस's picture

23 Jan 2017 - 6:39 pm | प्रचेतस

मुलाखत खूपच उत्कृष्ट झालीये.

बाद वे राजवाड्यांची दुसरी पुरवणी मुलाखत पण पाहा बरं का. जर पहिल्या थँक्यु ने असं वाटत असेल की एवढीच मुलाखत आहे तर तो भाग मी कट करुन तिसर्‍या व्हिडीओत आणते.

पुरवणी मुलाखत पण आता पाहिली. छान झालीय ती पण.

ह्या दिग्गज कलाकारांना मिपावर बघून खूपच छान वाटतंय.

सही रे सई's picture

23 Jan 2017 - 8:48 pm | सही रे सई

खूप सुंदर मुलाखत झाली. आणि खरच नुसता कलाकार आणि दिग्दर्शक या बरोबरच आता हि मुलाखत बघितल्यानंतर माणूस म्हणून पण सतीश राजवाडे आवडला.
ज्योती खूप छान मुलाखत झाली आहे. तू सुरुवातीला थोडी संकोचून गेलेली वाटते आहेस कारण प्रश्न थोडे पाठ केल्यासारखे आले आहेत. पण नंतर मुलाखतीचे प्रश्न छान सहज विचारावे तसे विचारले आहेस.
तसच सुरुवातीला मिसळ पाव बद्दल आपण त्या कलाकाराला सांगत असतानाची वाक्ये खूप एकसुरी किंवा बराच वेळ चालणारी आहेत (आणि हे प्रत्येक मुलाखती मध्ये तोच तोच पणा आल्यासारखे झाले आहे) त्यामुळे सुरुवात थोडी संथ कंटाळवाणी वाटते. त्या ऐवजी वाक्य बदलली पुढच्या मुलाखतीला किंवा ती गप्पांच्या ओघाने आली तर अजून छान वाटेल.

जव्हेरगंज's picture

23 Jan 2017 - 9:14 pm | जव्हेरगंज

वा! मस्त !

आता पाहिली!

नेमके प्रश्न विचारलेत!!

मुलाखत सुरु होताना थोडं पाठ केल्यासारखं वाटलं, नंतर अगदी नैसर्गिक होत गेलं. प्रस्तावना किंचित कमी केली तर चाललं असतं.

भाते's picture

24 Jan 2017 - 12:24 pm | भाते

ज्योति अलवनि, 'गोष्ट तशी छोटी' मधल्या सगळया मिपाकरांचे आणि मिपा व्यवस्थापनाचे मनापासुन अभिनंदन.
अप्रतिम मुलाखत. दोन्ही भाग पाहिले आणि ते आवडले सुध्दा.
मालिका किंवा चित्रपट क्षेत्रापध्दल कायम उत्सुकता होतीच पण सतीश राजवाडे यांनी 'चित्रपट कसा बनतो' हे फार सहज, सुटसुटीत आणि सोप्या शब्दात समजावुन सांगितले.
एडिट करताना या मुलाखतीमधला काही भाग कापला गेला असेल तर तो सुध्दा पहायला आवडेल.

मिपा तांत्रिक मंडळ,
हा धागा वाखु म्हणुन साठवता येत नाही आहे. काय झालं?

छान झालीये मुलाखत! पुरवणी तर एकदम रिलॅक्स मूड मध्ये शूट केलीये :)

आज पाहिली मुलाखत. २ दिवस घरचे नेट मेले होते. मस्तच झाली आहे!

तुमचा व्यनि आला तेव्हा मला क्षणभर वाटलं तुम्ही थट्टा करताय की काय. पण नंतर लगेच पटापट व्यनि झडले, पिराताई व स्रुजाताई यांनी कमालीची तत्परता दाखवली, तुम्ही मुलाखत घेतली, ती त्यांनी एडिट केली, अपलोड केली आणि आपल्यासमोर दस्तुरखुद्द सतीश राजवाडे यांची मुलाखत दिसत आहे. हे सगळं फार कमी वेळात तुम्ही लोकांनी साध्य करून दाखवलं त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि मिपासाठी तुम्ही ही मुलाखत मिळवलीत त्याबद्दल आभार व कौतुक. सतीश राजवाडे यांनाही मिपाकरांतर्फे धन्यवाद सांगा.

ज्योति अळवणी's picture

24 Jan 2017 - 9:40 pm | ज्योति अळवणी

एस् जी, मला सहज सुचलं की सतिशजींची मुलाखत देखील मिपा वर upload करावी. पण तुम्हा सर्वांचा इतका मस्त आणि प्रॉम्प्ट प्रतिसाद मिळाला की हे वाटण एकदम खरच झालं. त्याबद्दल मनापासून धन्यवाद!

आपणा सर्वांचे प्रतिसाद सतीशजींना वाचण्याची विनंती मी केली आहे. सध्या ते थोडे busy आहेत. पण नक्की वाचीन असे म्हणाले आहेत.

सही रे सई's picture

25 Jan 2017 - 2:06 am | सही रे सई

ज्योती, एक कुतुहल आहे. तुम्ही सतीशजींना कसे काय ओळखता?

ज्योति अळवणी's picture

25 Jan 2017 - 9:13 am | ज्योति अळवणी

सतिशजी आणि मी दोघेही पार्लेकर... अधून मधून भेट होत असते काही ना काही निमित्ताने. त्यातून चांगली ओळख झाली.

राघवेंद्र's picture

24 Jan 2017 - 11:43 pm | राघवेंद्र

दोन्ही भाग आवडले!!! ज्योती, मिपा टीम आणि महत्वाचे सतीश राजवाडे सर यांचे आभार !!!

विशाखा राऊत's picture

25 Jan 2017 - 8:49 pm | विशाखा राऊत

ह्या मुलाखतीसाठी गोष्ट टिमचे खासम खास आभार ;)