नमस्कार. आपल्या मिपाच्या 'गोष्ट तशी छोटी'साठी सतीश राजवाडे यांची मुलाखत तुम्हा सर्वांपुढे ठेवताना मला खूप आनंद होतो आहे. पंधरा जानेवारीला, म्हणजे गेल्या रविवारीच 'ती सध्या काय करते'च्या टीमची मुलाखत live ऐकण्याचा आणि बघण्याचा योग आला. मी दुसऱ्याच दिवशी सतीशजींना आपल्या मिपा संकेतस्थळाची माहिती दिली आणि या सिनेमाबद्दलचा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचायची विनंती केली. त्याच वेळी 'गोष्ट तशी छोटी'मध्ये सतिशजींची मुलाखत upload करावी असं मनात आलं. त्याबद्दल शोधून बघितलं, पण विशेष उपक्रमासाठीअसं थेट प्रकाशित करता येत नाही, हे लक्षात आलं. मग एस यांना व्यनि केला. त्याला लगेच उत्तर आलं स्रुजा आणि पिलीयन रायडर यांच्याकडून. मंगळवारच्या एकाच दिवसाच्या व्यनिद्वारे चर्चेनंतर मुलाखत घेणं आणि त्यातील प्रश्न असं सगळं final झालं. मुख्य म्हणजे सतीशजी मुलाखत द्यायला लगेच तयार झाले आणि बुधवारी सकाळी मुलाखत घेतलीसुद्धा. अर्थात यात मी काहीच केलेलं नाही. कारण कॅमेरा adjust करण्यापासून ते lights adjust करण्यापर्यंत त्यांनीच सगळं केलं. मी एकूणच थोडी नर्व्हस होते, तर "आपण रिहर्सल करू या" असं म्हणून त्यांनी माझ्याकडून प्रश्नदेखील वाचून घेतले. "मला घाई अजिबात नाही, तुम्ही तुमचा वेळ घ्या" असं ते म्हणाले आणि शूटिंग सुरू झालं. माझ्या काही चुका झाल्या, तर "काही हरकत नाही, आपण परत करू" असं म्हणून त्यांनी शेवटचा भाग परत शूट केला. माझे काही प्रश्न वेळेअभावी विचारायचे राहुन गेले तर त्यांनी स्वतःचे शूट करुन ते ही पाठवले. त्यानंतरही "जर काही गडबड झाली, तर मी परत येईन" असं त्यांनी म्हटलं आहे, हीच मोठी गोष्ट आहे. (मनात येतं - काहीतरी गडबड व्हावी आणि परत एकदा मुलाखतीसाठी त्यांनी यावं!) पण त्यामुळे मुलाखतीचा पहिला भाग हा वेगळ्या ठिकाणी तर दुसरा भाग हा वेगळ्या ठिकाणी शूट झाला आहे. बघताना प्रेक्षकांना थोडे अडखळल्यासारखे वाटेल. पण तरीही आम्ही तो भाग "पुरवणी" म्हणुन जोडत आहोत. मला खातरी आहे की 'गोष्ट तशी छोटी'ची टीम टेक्निकली इतकी चांगली आहे की मी पाठवलेले व्हिडिओज् नीट एडिट करून मिपाकरांसमोर सादर करतील. ज्योति अळवणी
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारीच की राव! एकदमच पाय
अत्यंत दिलखुलास मुलाखत आणि
भारीच, घरी जाऊन बघतो हा भाग.
वाह, क्या बात है! सतीश
+१
In reply to वाह, क्या बात है! सतीश by पद्मावति
अगदी! अत्यंत आवडता कलाकार
In reply to वाह, क्या बात है! सतीश by पद्मावति
अगदी अगदी... माझा अत्यंत
In reply to वाह, क्या बात है! सतीश by पद्मावति
+१!
In reply to वाह, क्या बात है! सतीश by पद्मावति
एक उत्सुकता होती
मी दुसऱ्याच दिवशी सतीशजींना आपल्या मिपा संकेतस्थळाची माहिती दिली आणि या सिनेमाबद्दलचा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचायची विनंती केली.काय म्हणाले ते ?खूप सुरेख झालीय मुलाखत. आवडली
+१
In reply to खूप सुरेख झालीय मुलाखत. आवडली by पद्मावति
बाद वे राजवाड्यांची दुसरी
पुरवणी मुलाखत पण आता पाहिली.
In reply to बाद वे राजवाड्यांची दुसरी by स्रुजा
खूप सुंदर मुलाखत झाली. आणि
वा! मस्त !
मुलाखत सुरु होताना थोडं पाठ
कडकडीत सलाम!
छान झालीये मुलाखत! पुरवणी तर
आज पाहिली मुलाखत. २ दिवस घरचे
तुमचा व्यनि आला तेव्हा मला
एस् जी, मला सहज सुचलं की
ज्योती, एक कुतुहल आहे. तुम्ही
In reply to एस् जी, मला सहज सुचलं की by ज्योति अळवणी
सतिशजी आणि मी दोघेही पार्लेकर
In reply to ज्योती, एक कुतुहल आहे. तुम्ही by सही रे सई
दोन्ही भाग आवडले!!!
ह्या मुलाखतीसाठी गोष्ट टिमचे