सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. तसेच समाजात धार्मिक वा जातीय तेढ निर्माण करणारं लिखाण आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

ग्लोब थिएटर

Primary tabs

पद्मावति's picture
पद्मावति in लेखमाला
20 Jan 2017 - 8:45 am

Cowards die many times before their deaths…
All the world's a stage, and all the men & women merely players...
To be, or not to be : that is the question…
What’s done is done...
you too Brutus??.....

जगभरातल्या अगणीत नाट्यगृहात, शंभरेक निरनिराळ्या भाषांमधून आणि अनेक दिग्गज अभिनेत्यांनी रंगमंचावर साकारलेल्या या ओळी….
जागतिक नाट्स्ृष्टीमधले एक जबरदस्त नाव - विलियम शेक्सपीयर! शेक्स्पीयरच्या नाटकांमधली ही अजरामर वाक्ये चारशे, साडे चारशे वर्षांपूर्वी लंडन शहरातल्या एका नाट्यगृहात सर्वप्रथम उच्चारल्या गेली. ही महानाट्ये त्या रंगमंचावर पहिल्यांदा जनतेसमोर सादर करण्यात आली. या नाट्यगृहाचे नाव होते ' ग्लोब थियेटर'.
गोष्ट तशी छोटी...या उपक्रमाची दोन तीन महिन्यांपुर्वी घोषणा करण्यात आली होती. दृक श्राव्य माध्यामाला समर्पित असलेल्या लेखमालीकेत शेकस्पीयरच्या या कर्मभूमीवर, त्याच्या लाडक्या ग्लोब थियेटर वर माहीतीपट असावाच अशी कल्पना 'गोष्ट तशी छोटी'च्या टीमने मान्डली.

अनेक चढ उतार बघितलेले, बान्धणी- पुनर्बांधणी मधून तावुन, सुलाखुन निघालेले आणि साडे चारशे वर्षांचा इतिहास सांगणारे ग्लोब थियेटर लंडनमधे मोठ्या दिमाखात उभे आहे.

आज ग्लोब थियेटर हे नाटकांसाठी तसेच वॉकिंग टूर्स साठी जनतेसाठी खुले असते. तिथे असलेले गाइड्स थियेटरची आणि त्याच्या इतिहासाची अगदी उत्तम माहीती देतात.
याच माहीतीच्या आधाराने आणि टूर घेतांना काढलेल्या काही फोटोंच्या सहाय्याने हा माहीतीपट बनवला आहे.
विलियम शेक्सपीयर या महानायकाला आणि त्याच्या लाडक्या ग्लोब थियेटरला मानवंदना देण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न.....

प्रतिक्रिया

सामान्य वाचक's picture

20 Jan 2017 - 11:39 am | सामान्य वाचक

काही व्हिडीओ पहिले आहेत
प्रत्यक्ष बघायचा योग्य कधी येईल माहित नाही

तुमच्या मुळे virtual walking टूर झाली

संदीप डांगे's picture

20 Jan 2017 - 11:45 am | संदीप डांगे

अतिशय सुंदर माहितीपट.... उपलब्ध साधनांचा चांगला वापर. ह्या माहितीपटाला एवढा सुंदर वॉइसओवर कुणाचा आहे ते कळत नाही.

-एक नम्र सुचवणी. माहितीपट किंवा ऑडियो-विजुअल तयार करण्यास ज्याही लोकांची मदत झाली त्या सगळ्यांची नावे निर्देशित करावीत.

स्रुजा's picture

20 Jan 2017 - 11:48 am | स्रुजा

पद्मावतिचा आहे. http://www.misalpav.com/node/38329 इथे सर्व लेखकांचा ऋणनिर्देश आहे. तीच आपली अनुक्रमणिका आहे. तिथुन ही प्रत्येक धागे ओपन होतात.

संदीप डांगे's picture

20 Jan 2017 - 11:56 am | संदीप डांगे

हो. लेखक-सादरकर्त्या व्यक्तीचं नाव दिसत आहेच..

मला म्हणायचं होतं की अगदी छोटा विडिओ असला तरी चलचित्रणाच्या अनेक तांत्रिक बाजू असतात, ती सांभाळणार्‍यांची नावे दिली जावीत. संपूर्ण विडियो एका व्यक्तिने केला असेल तरी, संकल्पना, लेखन, संकलन, वॉइसओवर, वगैरे अशा कामांपुढे त्या व्यक्तीचे नाव लिहिले तरी चालेल. (सबकुछ पु.ल. टाईप) .

याद्वारे एखादा विडिओ बनवण्यात किती काम असते व ते त्या व्यक्तीने एकट्याने पार पाडलं ह्याबद्दल कौतुकच होईल व इतरांनाही प्रेरणा मिळेल.

पैसा's picture

20 Jan 2017 - 12:03 pm | पैसा

जसा हा व्हिडिओ धागा पद्मावतिच्या आयडीने आला आहे, आणि ते बरोबर आहे; त्याच लॉजिकने कांचन कराईचा धागा तिच्या आयडीने यायला हवा होता. धाग्याला प्रस्तावना साहित्य संपादक किंवा संपादकानी लिहिणे काही नवीन गोष्ट नाही. तेवढ्यासाठी धागा त्या संपादकाच्या नावावर जात नाही.

टेक्निकल बाजू सांभाळणार्‍या सर्वाना श्रेय द्यायला हवे याला अनुमोदन. जर संपूर्ण शूटिंग पद्मावतीने केले असेल (आणि ती ते करू शकतेच!) तर तिचे प्रचंड कौतुक!!

बोका-ए-आझम's picture

20 Jan 2017 - 11:57 am | बोका-ए-आझम

ज्जे ब्बात पद्माक्का! Documentary सुंदर आणि तुमचं निवेदनही फार छान! व्यावसायिक voice overs करायला काहीच हरकत नाही!

पद्मावति's picture

20 Jan 2017 - 12:15 pm | पद्मावति

धन्यवाद सर्वांचे.
ग्लोब वर लेख हवाच अशी सृजाकडून सुचवणी आल्यावर लगेचच मी ग्लोब च्या वॉकिंग टूर चे बुकिंग करून टाकले. हा टूर घेतांना टूर गाइड कडून माहिती ऐकता ऐकता जमेल तसे फोटो घेत गेले.
मग त्यावर लेख लिहिला. फोन वर त्या लेखाचे वाचन रेकॉर्ड केले. आणि मग माझ्या मुलीच्या मदतीने आय मूवी वर फोटो आणि वाचनाचे रेकॉर्डिंग टाकून हा मूवी तयार केला. आय मूवी वर सोपे गेले. अर्थात इशा, माझ्या मुलीने त्यावर बरेच काम केले. पण एकूण प्रोसेस मी फार एन्जॉय केली :)

पैसा's picture

20 Jan 2017 - 1:14 pm | पैसा

इशाला एक जादू की झप्पी!

संदीप डांगे's picture

20 Jan 2017 - 1:16 pm | संदीप डांगे

खूप जबरदस्त काम केलंय पद्माक्का तुम्ही. अगदी व्यावसायिक दर्जाचे लेखन व सादरीकरण वाटते आहे, साधारण दूरदर्शनवर यायच्या त्यापद्धतीचे माहितीपट. खूप मस्त!

पद्मावती फारच सुंदर लेख आणि माहितीपट, तुझा आवाज सगळच आवडल!

यशोधरा's picture

20 Jan 2017 - 1:57 pm | यशोधरा

पद्मावती, सुरेख धागा आणि क्लिप. तू अणि तुझ्या लेकीने हे शूट केले हे वाचून अगदीच थक्क झाले! क्या बात है! खूप आवडली.

आणि संयोजक, उपक्रम इतका सुरेख आहे, प्रत्येक धागा उत्तम आहे आणि त्याला काजळाचीही तीट हवी की नको, तीही लागत आहे! अभिनंदन! उपक्रम दणकून यशस्वी झाल्याची पावती समजा!

विशाखा राऊत's picture

20 Jan 2017 - 3:02 pm | विशाखा राऊत

खुप उत्तम सादरीकरण. खुपच आवड्ले

पद्मावति's picture

21 Jan 2017 - 11:05 pm | पद्मावति

धन्यवाद सर्वांचे.

खटपट्या's picture

24 Jan 2017 - 3:53 pm | खटपट्या

खूप छान माहीतीपट आणि आवाज.
मला वाटते पद्मावती, स्रुजा, पिरा या सार्‍याजणी प्रोफेशनल उद्गोषक आहात.

रातराणी's picture

25 Jan 2017 - 11:39 pm | रातराणी

सुंदर माहितीपट! १९९७ मध्ये शेक्सपियर इन लव्ह या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हे थिएटर सेट म्हणून उभारले होते, तेच पुढे शेक्सपियर्स ग्लोब या संस्थेने जतन केले. सात ऑस्कर अवॉर्डस जिंकलेला हा अतिशय सुंदर चित्रपट आहे, शेक्सपियर प्रेमींनी पाहावा असा :)

पूर्वाविवेक's picture

28 Jan 2017 - 5:49 pm | पूर्वाविवेक

फार सुंदर लिहिलं आहेस ग.

पिलीयन रायडर's picture

30 Jan 2017 - 11:08 pm | पिलीयन रायडर

ही चित्रफीत पहाताना दरवेळेस "काय आवाज आहे हिचा!!" ह्या विचारात अर्धा वेळ जातो! अपेक्षेपेक्षा काहीच्या काही भन्नाट झाली आहे फिल्म! आणि ह्यात तुझ्या लेकीचा हातभार आहे हे कळल्यावर तर मावशीच्या भुमिकेतुन अजुनच कौतुक वाटतंय! फार गुणी आहे लेकरु..

ग्लोब बद्दल मला खरंच काही माहिती नव्हती. प्रामाणिकपणे सांगते की लेख लिहीला असतास ह्यावर तरी इतकं अदाचित वाटलं नसतं. पण हेच फिल्ममध्ये असल्याने की काय, पण जास्त आवडलं.

कधी ह्या जागेला भेट देणं झालं तर एका लेखापेक्षा पटकन ही फिल्म पहाणं सोपं वाटेल मला. आणि मग नक्की कुठे काय पहायचंय हे ही कळेल. तुझ्या नजरेतुन लंडनही पहायला आवडेल ह्याच पद्धतीने.

खरं तर "व व व्हिडिओचा" ह्या धाग्यात आय-मुव्ही बद्दलही लिहायचं होतं. पण उपक्रमाच्या नादात राहुन गेलं. मी तर म्हणते तू का करत नाहीस हे काम?!! प्लिझ शिकवशील का की आयमुव्ही कसं वापरायचं? त्यानिमित्ताने अशा अ‍ॅप्स बद्दलही चर्चा होऊ शकेल. तुला मदत हवी असेल तर मी करेन. :)

उल्का's picture

31 Jan 2017 - 2:39 pm | उल्का

खूप छान माहिती सांगितली आहेस.
व्हिडीओ खूप सुंदर!

अभ्या..'s picture

31 Jan 2017 - 5:23 pm | अभ्या..

व्हॉईसोव्हर छान आहे.
थोड्याश्या टेक्निकल गोष्टी सांभाळल्या तर एकदम प्रोफेशनल नॅरेशन.

अभिजीत अवलिया's picture

5 Feb 2017 - 6:16 pm | अभिजीत अवलिया

आवाज आणी एकंदर सादरीकरण आवडले.