गाभा:
NDTV च्या साईट वरील २ ऑक्टोबर निमित्त घेतलेल्या मतचाचणी हे निष्कर्ष पहा, फक्त 'लोकशाही' आणि 'आंतरराष्ट्रीय नीती (पॉलिसी?)' या दोनच आघाड्यांवर देश सध्या समाधानकारक स्थितीत आहे असं बहुतांश लोकांना वाटतं असं दिसतंय, आणि तुम्हाला ते निष्कर्ष कितपत पटतात ते सांगा.
(मला स्वतःला या प्रश्नांत 'शास्त्र आणि तंत्रज्ञान' यांचाही समावेश आवश्यक वाटला असता, आणि त्या क्षेत्रातील प्रगतीविषयी सामान्यांची मतं जाणून घ्यायला आवडलं असतं, इथल्या तज्ञांचीही मतं जाणून घ्यायला आवडेल.)
प्रतिक्रिया
2 Oct 2008 - 9:56 pm | सखाराम_गटणे™
सदर मत चाचणी, ही भारतातील समाज जीवनाबाबत आहे असे वाटते,
'शास्त्र आणि तंत्रज्ञान' या विषयाशी लोकांचा जास्त संबध येत नाही, जितका मतचाचणी तील बाकी विषयाशी येतो.
'शास्त्र आणि तंत्रज्ञान' विषयावर सामान्य माणसांना मत देणे तितके सोपे नसते.
बाकी चित्र निराशाजनक आहे, यांचा यानी भारतातील बॉम्ब्स्फोटांचा जवळचा संबध आहे.
माहीतीबद्दल आभार.
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)
2 Oct 2008 - 11:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
किती प्रातिनिधिक आहे हा एक मुद्दा आहे; शिवाय या लोकांचं त्या-त्या विषयातलं ज्ञान किती हा दुसरा मुद्दा, तिसरं म्हणजे बहुतांश लोकं म्हणजे ५०%च्या वर का त्याहीपेक्षा जास्त? इंटरनेटवर घेतली असेल तर मग ती चाचणी प्रातिनिधिक समजावी का?
मला स्वतःला या प्रश्नांत 'शास्त्र आणि तंत्रज्ञान' यांचाही समावेश आवश्यक वाटला असता, आणि त्या क्षेत्रातील प्रगतीविषयी सामान्यांची मतं जाणून घ्यायला आवडलं असतं, इथल्या तज्ञांचीही मतं जाणून घ्यायला आवडेल.
मागे नानांनी दुसर्या एका धाग्यात एक मुद्दा उपस्थित केला होता की किती भारतीय संशोधक सामान्य लोकांपर्यंत पोहोचतात. सामान्यतः आपल्याकडे लोकांना इस्त्रो, बीएआरसी (तिथे पण फक्त अणूशक्तीच!) सोडून बाकी ठिकाणी, अनेक विषयांमधे संशोधन होतं हे माहित असतं का?