इ-नामकरण विधीनंतर माझा मिपा शिशुशाळा प्रवेश

लीना कनाटा's picture
लीना कनाटा in जनातलं, मनातलं
8 Jan 2017 - 7:50 am

इ-नामकरण विधीनंतर माझा मिपा शिशुशाळा प्रवेश

बरेच वर्ष मिपावर वाचन मात्र राहिल्यानंतर विचार केला नुसतेच निष्क्रिय मनोरंजन (पॅसिव्ह एंटरटेनमेंट) काय कामाचे, थोडेसे सक्रिय मनोरंजन (ऍक्टिव्ह एंटरटेनमेंट) करूयात. मग मिपाचे सदस्यत्व घेतले. तत्पूर्वी आंतर जालीय स्व नव नामकरणासंबंधी चिंतन मनन चालू होते. पूर्वी शिक्षण घेताना ऍपल शास्त्रींनी प्रत्येक कृतीला इक्वल अँड अपोझिट वि-कृती असते (म्हणजे विरुद्ध-कृती बर्रर्र का) असे काहीसे सांगितल्याचे आठवत होते. तसेच या विश्वा सारखे प्रति विश्व कि काय असते, मटेरियल आणि अँटी मटेरियल ( अँटी, अँटी मटेरियल, आंटी-मटेरियल कोण म्हणतोय तो? हो, हो, प्रत्येक मटेरीअलला आंटी-मटेरियल असतेच परंतु आंटी-मटेरियल तयार व्हायला काही वर्षे लागू शकतात !) असते असे कुठेसे वाचले होते. मिपा वर वाचताना आयडी ला डू-आयडी असतो, प्रतिसादाला प्रति-प्रतिसाद असतो, स्कोअर सेटलिंगला प्रति स्कोअर सेटलिंग असते हे कळले होते. तदनुसार अस्मादिकांच्या वि-नावाचा शोध चालू होता. जेंडर न्यूट्रॅलिटीवर विश्वास असल्याने जेंडर स्पेसिफिक नावाचा आग्रह नव्हता. एकेदिवशी आंजा वर विहार करताना तो युरेका प्रसववेदनेचा क्षण आला आणि वि-नावाचा शोध संपला. स्व नामकरणविधी साठी मोठ्या उत्साहाने पहिली जिल्बी पडायला घेतली ती म्हणजे माझ्या आंतर जालीय इ-नामकरण विधीचे इमंत्रण. http://www.misalpav.com/node/३६८८५ या धाग्यावर प्रथितयश मिपाकरांनी हजेरी लावून मिपा वरच्या नवजात बालकांस शुभाशीर्वाद दिले परंतु "नवीन आयडी दिसला की रॅगिंगसाठी हल्लाबोल करीत धावणारे सिझन्ड सिनियर्स" पैकी काहीनी छुपा डू-आयडी, योग भ्रष्ट जीव, पूर्वसंचित, नव्या बाटलीतले जुने पेय्य, बालकाचे पाय पाळणा तोडून बाहेर आलेत, असे व इतर दोषारोप केले तर काहींना घोर कलयुग अवतरले याचा आणि मोहिनी अवताराचा साक्षात्कार झाला. एका आयडीने असंख्य प्रश्न विचारले आणि आपण किती जेंडर कंडिशन्ड असतो याची प्रचिती आली. एका मिपा सदस्याने डू-आयडी नाही याचा पुरावा मागितला. आणखी एका महाशयांनी तर चक्क वाड्यावर येण्याचे आमंत्रण दिले, जणूकाही बारा भानगडीतल्या सरपंच पाटलाचा नरपुंगव पुनरावतारच. "नवीन आयडी आला की त्याची जालीय कुंडली मांडून खफ वरून इ मेल आयडी गाठणारे कुडमुडे मिपाकर" देखील आले आणि त्यांनी बादरायण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. हं, नाही म्हणायला "पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि नवीन आयडी शोधनम" या उक्ती वर विश्वास असलेल्या काही आयडीजनी पुच्छगुच्छ देऊन स्वागत केले खरे (आयडी नाही) परंतु पुच्छगुच्छ देऊन पुढचा आयडी मानवाच्या पूर्वजांचा घ्यायचा आहे असे संकेत तर नाही दिले? या सगळ्या गदारोळात दुर्दैवाने त्या धाग्याचा चेतन चौहान झाला - हा कसोटी मध्ये नेहेमी नर्व्हस नाईंटी चा बळी ठरला आहे. चुभूदेघे - क्रिकेतज्ञ् मिपाकर पिंकतीलच.

त्यानंतर रॅगिंगला न घाबरता एक पद्य विडंबन, एक गद्य विडंबन, एक मिपा प्रतिज्ञा, एक - दोन काकू, तीन हवा हवाई पाकृ आणि काही प्रतिक्रिया दिल्या तेव्हा आता पुढच्या पायरीची म्हणजे मिपा शिशुशाळा प्रवेशाची तयारी झाली आहे याची खात्री पटली. मिपा नवजात बालकाच्या इ-नामकरण विधीस डेंटिस्ट ताईंनी हजेरी लावली होती परंतु तेव्हा बालकाच्या तोंडाचे बोळके असल्याने केवळ तोंडभरून आशीर्वाद दिला होता. मात्र मिपा वरच्या प्रसिद्ध डॉक्टर त्रयींनी हजेरी न लावल्याने बालकास टीका (म्हणजे हिंदीतला टीका, मराठीतील टिका भरपूर झाली होती) लावला नव्हता त्यामुळे बालकाच्या लसीकरणाचे रेकॉर्ड उपलब्ध नाही या कारणास्तव शिशु शाळेतला प्रवेश नाकारण्याची भीती होती परंतु बालकाचे योग्य ते लसीकरण करण्यात येईल याची शाळेच्या व्यवस्थापनाची खात्री पटवल्यावर आणि बालकाचा सगळा अभ्यास घरी घेण्यात येईल अशी खात्री ट्यार्पी व जलेबीबाई या मिपीय पालकांनी दिल्यावर बालकाचा शाळेतला प्रवास सुकर झाला.

प्रवेश तर मिळाला परंतु प्रिस्कुल ऍन्गझायटी बद्दल साशंकता होती. प्रतिसाद फोबिया, कम्पल्सिव्ह रिअक्शन, ट्रोलिंग, कंपुगिरी, स्कोअर सेटलिंग, पॅनिक आणि मानसिक हल्ल्याची भीती या आणि इतर तांत्रिक अडचणी म्हणजे लिंक्स देणे, मिपा वर फोटो डकवणे या सर्वां वर मात करत सुहृद मिपाकऱ्यांच्या (द्विरुक्ती बद्दल क्षमस्व ) मदतीने मिपीय अ ब क ड आणि ग म भ ण हि धुळाक्षरे किंवा कॉन्टेम्पररी कीबोर्डाक्षरे गिरवण्याचे शिक्शान चालू झाले आहे. सध्या शिशु शाळा असल्याने गणवेशाची सक्ती नाहीय्ये परंतु पुढे मिपा शाळेत प्रेवेश घेताना मात्र मिपा मध्ये असलेल्या वेगवेगळया कंपूंपैकी एखाद्या कंपूचा गणवेश धारण करावा लागेल कि इकला चालो बॉ मार्गक्रमण होईल हे येणारा काळच ठरवेल.

मुक्तक

प्रतिक्रिया

एस's picture

8 Jan 2017 - 10:30 am | एस

:-)

संजय पाटिल's picture

8 Jan 2017 - 10:48 am | संजय पाटिल

छान!

टवाळ कार्टा's picture

8 Jan 2017 - 1:26 pm | टवाळ कार्टा

खी खी खी लय भारी

अजया's picture

8 Jan 2017 - 9:13 pm | अजया

: )

लीना कनाटा's picture

9 Jan 2017 - 2:56 am | लीना कनाटा

वरती दिलेली पहिल्या धाग्याची लिंक जरा गंडली आहे असे निदर्शनास आले आहे. अजून मिपा शिशुशाळेत आहे ना मी !

परत एकदा खाली ती लिंक देत आहे.

http://www.misalpav.com/node/36885

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jan 2017 - 7:18 am | अत्रुप्त आत्मा

पांडु मोड अॉन -
असा झाला तर तो सगळा प्रकार! ;)
पांडु मोड अॉफ -

सूड's picture

9 Jan 2017 - 3:06 pm | सूड

ऑके

स्वीट टॉकर's picture

11 Jan 2017 - 3:29 pm | स्वीट टॉकर

एकदम हलकंफुलकं आणि मस्त लिहिलं आहेत!

अँटी, अँटी मटेरियल, आंटी-मटेरियल कोण म्हणतोय तो? हो, हो, प्रत्येक मटेरीअलला आंटी-मटेरियल असतेच परंतु आंटी-मटेरियल तयार व्हायला काही वर्षे लागू शकतात ! :)

सही रे सई's picture

11 Jan 2017 - 8:09 pm | सही रे सई

मस्तच जमलंय कि हो तुम्हाला.. डायरेक्ट १० वीतच उडी मारणार बघा तुम्ही.

लीना कनाटा's picture

13 Jan 2017 - 8:36 am | लीना कनाटा

माझ्या मिपा शिशु शाळेतील प्रवेशा बद्दल शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार्स.

त्याचप्रमाणे

"निंदकाचे ट्रोल असावे धाग्याला" या आधुनिक उक्ति प्रमाणे not so +ve प्रतिसाद देणाऱ्यांना देखील ठंग्यू.