थंडीसाठी झटपट आणि पौष्टीक लाडू

रुपी's picture
रुपी in पाककृती
6 Jan 2017 - 3:33 am

l

साहित्यः
१ वाटी गूळ
१/४ वाटी डिंक पावडर
१/२ वाटी खारीक पावडर
१/२ वाटी सुकलेले खोबरे - बारीक किसून
१/२ वाटी बदाम पावडर
१/४ वाटी अक्रोड पावडर
१ टे.स्पून सुंठ पावडर
१ टे.स्पून खसखस पावडर
तूप - साधारण अर्धी वाटी

कृती:
१. कढईमध्ये ३ टे.स्पून तूप घेऊन गरम करा.
२. त्यात डिंक पावडर घालून फुलवून घ्या आणि एका भांड्यात काढून ठेवा.
३. त्याच कढईत आणखी २ चमचे तुपात बारीक केलेला गूळ वितळवून घ्या. गूळ वितळवून घ्यायचा आहे, त्यामुळे अगदी बारीक किसून घ्यायची गरज नाही.
४. गूळ वितळला की कढई आचेवरुन उतरवा.
५. फुलवून घेतलेला डिंक आणि उरलेले तूप आणि बाकीचे साहित्य गुळात घालून एकत्र करा.
६. या मिश्रणाचे लगेच लाडू वळा. मिश्रण कोरडे वाटत असल्यास थोडे आणखी तूप घाला.

थंडीसाठी पौष्टीक लाडू तयार आहेत.

टीपः मी यातले सर्व साहित्य पावडर करुनच ठेवलेले होते. त्यामुळे लाडू फार झटकन झाले.
पहिल्यांदा केले तेव्हा लाडू जास्त गोड वाटले, म्हणून पुढच्या वेळी गुळाचे प्रमाण कमी आणि तूप थोडे जास्त घेतले. तुम्ही आवडीप्रमाणे कमी-जास्त करु शकता.
शिवाय, हवे असेल तसे काजू, जवस पावडर, तीळ आवडीप्रमाणे घालून बनवू शकता.

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

6 Jan 2017 - 3:37 am | पद्मावति

आहा, क्लास दिसताहेत लाडू.

अजया's picture

6 Jan 2017 - 9:12 am | अजया

मस्त आणि सोपी पाकृ.

मनिमौ's picture

11 Jan 2017 - 11:04 am | मनिमौ

डिंक सोडला तर बाकी सगळे सामान आहे.

पल्लवी०८'s picture

27 Feb 2017 - 12:34 pm | पल्लवी०८

थंडीच्या दिवसात खाण्यासाठी खरच उत्तम पर्याय आहेत हे लाडू!

सस्नेह's picture

27 Feb 2017 - 1:20 pm | सस्नेह

खूप मस्त लागतात !
मी दोन बदल केले.
१. बदाम पूड न करता तुकडे केले आणि मावेमध्ये रोस्ट करून मग घातले.
२. गूळ गॅसवर गरम न करता किसून मिसळला आणि मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून, तूप पातळ करून घातले, मग केले लाडू. मस्त खुसखुशीत झाले :)

प्रीत-मोहर's picture

27 Feb 2017 - 5:08 pm | प्रीत-मोहर

यम्म लाडू