स्मरणातल्या बाप्पा

वृंदा१'s picture
वृंदा१ in जे न देखे रवी...
31 Dec 2016 - 2:14 pm

बाप्पाला आणायचात तुम्ही
भक्तीनं अन् हौसेनं
तुम्ही देखणे आणि बाप्पाही
आम्ही पळायचो मस्तीनं
आताच्यासारखी तेंव्हा
सजावट नसायची खूप
जुन्याच मोत्याच्या माळेने
बाप्पांचं खुलायचं रूप
एक रंगीत लाईटचा दिवा
तुम्ही सांभाळून लावलेला
बाप्पांपुरताच कोनाडा
डिस्टेम्परने सजलेला
मोठमोठ्यानं म्हणायची
तुमच्यासोबत आरती
शब्द विसरायचा एखादा
नजर जायची खालती
भूलवायचा आम्हाला
मोदकांचा ढीग
घरोघरच्या प्रसादाची
लावायची रीघ
जुनाच कागदाचा पंखा
आणि टिकल्यांचे तोरण
त्या रत्नांच्या क्षणांचे
सतत होते स्मरण
दहा दिवस जायचे
कसे भुर्रकन उडून
विसर्जनाच्या दिवशी
घ्यायचे गुपचूप रडून
बाप्पांचा निरोप घ्यायला
मुद्दाम लावायचा वेळ
कळायचा नाही ना तेंव्हा
सुखदुःखाचा अजब खेळ
तुमच्या गोऱ्यापान कांतीवर
मुकटा तेजानं शोभायचा
बाप्पासुद्धा हसतमुखानं
फक्त तुम्हाला न्याहाळायचा
स्मरणातल्या बाप्पा
आता एकच मागणं
आमच्या दादांना
सतत सुखी ठेवणं ......

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

31 Dec 2016 - 3:12 pm | पद्मावति

वाह!