बेडसे लेणी....कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार.

वन्दना सपकाल's picture
वन्दना सपकाल in भटकंती
27 Dec 2016 - 4:07 pm

बेडसे लेणी म्हणजे खरच कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार. अतिशय सुंदर आणि रेखीव लेणी बघुन मनाला खुप छान वाटत।

पुणे- मुंबई महामार्गावरील कामशेतहून पवना धरणाकडे बेडसे हे छोटे गाव लागते. नेहमीच्या सहलींच्या वर्दळीपासून दूर एकांतात पहूडलेलं हे बौध्दकालीन लेणं कामशेतपासून जवळच ८-१० कि.मी. अंतरावर आहे. कामशेत रेल्वे स्टेशनपासून पुणे-मुंबई रस्त्यावर आल्यावर एस.टी. किंवा खाजगी वाहनाने पवनानगर(काळे कॉलनी) येथे जाणार्‍या रस्त्याने राऊतवाडी येथे उतरावे.
डोंगराच्या मध्यावर असलेली बेडसे लेणी लक्ष वेधून घेतात. अत्यंत शांत सुरम्य निवांत असं हे ठिकाण. येथुन मावळ खोर्‍याचे विस्तीर्ण दर्शन होते. आकाशात घुसलेली तुंग, तिकोना किल्ल्यांची शिखरे साद घालतात.
कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार इथं पहायला मिळतो. इ.स. पूर्व २०० ते ५०० च्या काळातील हे शिल्प सौंदर्य आहे.

गतवर्षी आम्ही आमच्या ऑफिस ट्रीप ला पवना धरण बघायला गेलो होतो आणि अचानक तेथुनच बेडसे लेणी ला जायचा प्लान ठरला। खरच अप्रतिम अशी लेणी आहेत।

पवना धरण : इथूनच पुट्ठे बेडसे लेण्याकडे जाता येते।

.

पावसाळा असल्यामुळे निसर्ग खुलला होता। सगळे डोंगर कसे हिरवा शालू नेसून बसले होते.

.

लेन्या जवळ असणारी छोटी घरे

.

एक आजीबाई एवढ्या पावसात आणि जोरदार वाऱ्यात छत्री संभाळायची कसरत करत होत्या. :)

.

लेन्या च्या बाजूचा परिसर। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे हिरवल पसरली होती.

.
लेण्याजवळून दिसणारी आजुबाजूची शेती आणि परिसर।

.
लेण्याचा एक अविष्कार :

.

.
प्रवेशद्वार ;-

.

घोडयावर स्वार स्त्री -पुरुष यांचे कोरीव मूर्ती काम :-

.

लेणी :
सुमारे १५० मीटर लांबीच्या दगडात लेण्यांचा गट खोदला गेला आहे. येथे एक चैत्यगृह काही विहार, खोदीव स्तूप, आणि पाण्याची कुंडे आहेत. हे आद्य कोरीव काम इसवीसन पूर्व पहिल्या शतकातील आहे असे मानले जाते. या लेण्यांना मारकूड असे नाव प्राचीनकाळी होते असे येथील शिलालेखात कोरलेले दिसते. भारत सरकारने या लेणीला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे (विकिपीडिया वरुन साभार )

.

येथील चैत्यगृह भव्य आहे. याची उंची सुमारे २८ फूट आहे. समोरील भागात चार खांबांवर आधारित व्हरांडा आहे. बाजूच्या भिंतींमध्ये खोल्या आहेत. यांच्यामागे खोलवर कोरलेले चैत्यगृह आहे.

.

चैत्यगृहा समोर मध्यभागी चार खांब आहेत. यातील दोन पूर्ण आणि बाजूला दोन अर्धव्यक्त आहेत. यांची रचना अशी अहे की त्यामुळे या खांबांनी हा तीस फूट लांब आणि १२ फूट रूंदीचा व्हरांडा तोलून धरला आहे असे दिसते. हे खांब लेण्यांच्या पायापासून थेट छतापर्यंत जातात. चैत्यगृहात हर्मिकेचा चौथरा आहे. त्यावर ते मोठे घट कोरलेले आहेत. या घटातून अष्टकोनी खांब बाहेर पडलेले दिसतात. याच खांबांच्या शिरोभागी जमिनीच्या दिशेने उमललेल्या कमळाची रचना केलेली आहे. त्यावर एक चौरंग कोरलेला आहे. छताकडे एकदा हर्मिकेच्या चौथऱ्यावर हत्ती, घोडा, बैल या पशूंवर स्वार स्त्री-पुरुषांच्या जोड्या दिसून येतात. अतिशय रेखीव, प्रमाणबद्ध आणि सुंदर असे हे शिल्पकाम केले दिसते. त्यांचे सौष्ठव, डोळ्यातील सौंदर्य, अंगावरील मोजकेच पण उठावदार दागिने, आगळी वेशभूषा हे बेडसे येथील वैशिष्ट्यच आहे. या खांबांच्या शीर्षभागावर उमलत्या कमळाचे कोरीवकाम आहे. यातील प्रत्येक दल हे स्वतंत्र अगदी त्याच्या त्या मधल्या फुगीर शिरेसह दाखवलेले दिसते. येथे कोरलेल्या हत्तींना सुळे दिसत नाहीत. त्याजागी खोबणी केलेल्या दिसून येतात. त्यावरून तिथे खरे हस्तीदंत बसविले जात असावेत असा अंदाज करता येतो. व्हरांड्याच्या अन्य भागावर चैत्यकमानी, वेदिकापट्टींचे नक्षीकाम केलेले आहे. (विकिपीडिया वरुन साभार )

खुप पावुस असल्यामुळे फोटो क्लियर आले नाहीत।
.

.

बेडसे लेण्याजवळ पवना धरण , पवना हूट्स (कृषि पर्यटन ), तुंग, तिकोना किल्ल्ला बघायला आहे।
बराच वेळ तिथे घालवल्यावर अंधार होण्या अगोदर पुण्याला परत येणे गरजेचे होते म्हणून मनाला मुरड़ घालून तिथल्या निसर्गाला निरोप दिला।

मनात मात्र परत एकदा अशाच ट्रिप चे नियोजन चालू होते. परत एकदा निसर्ग जवळ जायला।

प्रतिक्रिया

पैसा's picture

27 Dec 2016 - 5:17 pm | पैसा

छान लिहिताय. फोटोचा आकार जरा लहान ठेवा फक्त जास्तीत जास्त ६४० रुंदी.

वन्दना सपकाल's picture

27 Dec 2016 - 9:26 pm | वन्दना सपकाल

पुढील लेखाच्या वेळी तशी काळजी घेईन। मिसळपाव वर माझा हा पहिला लेख आहे.

प्रचेतस's picture

27 Dec 2016 - 5:56 pm | प्रचेतस

छान लिहिलंय.

बेडसे लेणी खूप आवडती आहेत. इथे पूर्वी खूपच निरव शांतता असायची, अगदी अलीकडे जराशी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.

इ.स. पूर्व २०० ते ५०० च्या काळातील हे शिल्प सौंदर्य आहे.

इस.पू १५० ते इस. १ ल्या शतकाच्या दरम्यानच्या ह्या लेणी आहेत.

या लेण्यांना मारकूड असे नाव प्राचीनकाळी होते असे येथील शिलालेखात कोरलेले दिसते

हा लेख चैत्यगृहाच्या डावीकडे असलेल्या स्तूपाच्या मागील भिंतीवर कोरलेला आहे.

....य गोभूतिनं आरणकान पैण्डपातिकानं मारकूडवासीनं थुपो
...वासिना भतासाळमितेन कारित

मारकूडचा रहिवासी, आरण्यक आणि पैण्ड्पतिक असलेल्या गोभूतीचा हा स्तूप ...चा रहिवासी भट्टासाळमित्राने कोरलेला आहे. मारकूड हे नाव बेडसे लेणीचेच असेल असे वाटत नाही, कदाचित त्या डोंगराचे नाव मारकूड-मारकूत हे असावे.

वन्दना सपकाल's picture

27 Dec 2016 - 9:29 pm | वन्दना सपकाल

हो आम्ही गेलो होतो त्यावेळी खुप पावुस होता , तरीपण बऱ्यापैकी गर्दी होती. तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल आभारी आहे.

वामन देशमुख's picture

27 Dec 2016 - 6:22 pm | वामन देशमुख

मस्त लिहिलंय तुम्ही, वन्दना सपकाल.

तुमचा हा लेख वाचून लोकसत्तामधील अनवट बेडसे हा लेख आठवला.

वन्दना सपकाल's picture

27 Dec 2016 - 9:31 pm | वन्दना सपकाल

अनवट बेडसे हा लेख खुप विस्तृत लिहला आहे. छान माहिती.

रिकामटेकडा's picture

27 Dec 2016 - 7:04 pm | रिकामटेकडा

या लेण्याचा photo sphere पद्धतीने काढलेला फोटो. माउस फिरवुन लेण्याच्या बाहेरील भाग पहाता येईल.
https://photos.google.com/photo/AF1QipPJpcZVw265XXQOOsL4y_dzEIX72LCnnEPT...

वन्दना सपकाल's picture

27 Dec 2016 - 9:33 pm | वन्दना सपकाल

तुम्ही दिलेली लिंक ओपन होत नाही। Error दाखवतोय.

रिकामटेकडा's picture

27 Dec 2016 - 11:30 pm | रिकामटेकडा
कंजूस's picture

27 Dec 2016 - 7:50 pm | कंजूस

फार छान!

वन्दना सपकाल's picture

27 Dec 2016 - 9:33 pm | वन्दना सपकाल

धन्यवाद।

सत्याचे प्रयोग's picture

27 Dec 2016 - 8:57 pm | सत्याचे प्रयोग

1
५ वर्षांपूर्वीचा बेडसे लेणीच्या टोकावरून भ्रमण ध्वनी वरून घेतलेला फोटो

वन्दना सपकाल's picture

27 Dec 2016 - 9:35 pm | वन्दना सपकाल

छान आहे फोटो।

सत्याचे प्रयोग फोटो दिसत नाही गुगलच्या लिंकचेफोटो दिसत नाहीत हल्ली.

कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार.

बेडसे लेण्याला बघून जर हे वाक्य सुचत असेल तर एकदा यवतच्या भुलेश्वराचं मंदिर बघाच!! कदाचित शब्द कमी पडतील. :)

वन्दना सपकाल's picture

28 Dec 2016 - 9:38 pm | वन्दना सपकाल

हो नक्कीच। लगेच गूगल चेक केले....... ४५ किमी पुण्यापासून। पुढची ट्रीप तिकडेच प्लान करेन। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.