अंतरंग

अमिता राउत's picture
अमिता राउत in जे न देखे रवी...
26 Dec 2016 - 11:04 pm

मी न माझे राहिले
शब्द कंठी दाटले,
सुक्या पापण्यांचे पाते
ओले भासले.

काय सांगु मनाला या
बुद्धीची अगतिकता.

स्वच्छंदी अंतरंग रंगले
नकळत हसु उमटले ,
जुन्या आठवणींचे मनी
गीत गुंजले .

अंतरंगाची वेडी माया
स्वप्नांची पाठ सोडेना,
बिलगुनी तू मज येता
अंगी रोमांच उठले.

बेधुंद मुक्त मनाने
वेध घेत करी आसमंती विहार.

आसवांना चुकवत करी
धाव जीवलागाचा.

ऊन सावलीचा खेळ आयुष्याचा,
गोडासाठी साथ खार्याची …

कविता माझीवावर

प्रतिक्रिया

पैसा's picture

27 Dec 2016 - 6:57 pm | पैसा

कविता चांगली आहे. फक्त जरा यमक-वृत्त याकडे लक्ष दिले तर अधिक चांगली झाली असती. किंवा मग सरळ मुक्त छंदातच लिहावे.

(वैधानिक इशारा: विडंबन झाल्यास चिडू नका! )

अमिता राउत's picture

28 Dec 2016 - 2:24 am | अमिता राउत

तुमच्या सल्ल्याचा मी लिहितांना नक्की विचार करेन,धन्यवाद .