रिमिक्स ओ.एस.

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in तंत्रजगत
30 Nov 2016 - 5:54 pm

नमस्कार मिपाकाराहो!
तुम्ही तुमच्या डेस्कटॉप वर अँड्रॉईड वापरून बघितलाय?
ज्यांना वापरायची इच्छा असेल त्यांच्यासाठी एक छान पर्याय उपलब्ध आहे जालावर.

नाही, मी ब्लू स्टॅक्स बद्दल बोलत नाहीये.

हे प्रकरण थोडं वेगळं आहे...
रिमिक्स ओ.एस.

अँड्रॉईड मार्शमेलो वर आधारित हि ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही तुमच्या विंडोज वर किंवा अगदी पेन ड्राईव्ह वर इंस्टॉल करू शकता आणि एक स्वतंत्र ओ.एस. प्रमाणे वापरू शकता.

तर हि ओ.एस. इंस्टॉल करण्यासाठी पुढील प्रमाणे सुविधा असलेला कॉम्पुटर असायला हवा.
1. 2 GHz dual core processor or better
2. 2 GB system memory
3. Minimum 8 GB of free hard drive space

आता वरील गोष्टी उपलब्ध असल्यास तुम्ही या लिंक http://www.jide.com/remixos-for-pc
वर जाऊन हि ओ.एस. डाऊनलोड करू शकता. या लिंक वर डाऊनलोड करण्यासाठी टोरेंट तसेच मिरर हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत(मी टोरेंटचा पर्याय निवडला).

1. डाऊनलोड झालेल्या झिप फाईल चे नाव release_Remix_OS_for_PC_Android_M_64bit_B2016112101 असे दिसेल. त्यामधील Remix_OS_for_PC_Installation_Tool-B2016080802 हि .exe फाईल उघडा.
2. आता समोर येणाऱ्या विंडो मध्ये ISO फिले साठी Browse या बटनावर क्लिक करून डाऊनलोड केलेल्या फोल्डर मधील Remix_OS_for_PC_Android_M_64bit_B2016112101 नावाची ISO फाईल निवडा.
3. त्यानंतर तुम्हाला हि ओ.एस. कुठे(USB/HDD) इंस्टॉल करायची आहे तो पर्याय निवडा( इथे मी HDD हा पर्याय निवडला).
4. आता तुमच्या कॉम्पुटर वरील तो ड्राईव्ह निवडा जिथे तुम्हाला हि ओ.एस. इंस्टॉल करायची आहे.
5. त्यानंतर तुम्हाला हवी असलेली रॉम क्षमता निवडा(32 GB Recomended).
6. आता पुढील ५ ते 10 मिनिटे एक मस्त कॉफी घेत इंस्टॉलेशन पूर्ण व्हायची वाट बघा. :)
7. तुमचा कॉम्पुटर रीस्टार्ट झाला कि तुम्हाला विंडोज अनो रिमिक्स ओ.एस हे दोन पर्याय दिसतील, त्यातील रिमिक्स ओ.एस हा पर्याय निवडा.
8. आता पुढील सर्व प्रक्रिया नवीन घेतलेल्या अँड्रॉईड स्मार्टफोन सारखीच असेल.
तुम्ही स्मार्ट फोन वर वापरत असलेली सर्व अॅप्स आरामात वापरू शकता.
नक्की ट्राय करून बघा.

प्रतिक्रिया

इंटरेस्टींग. ओएस किती जीबी खाते? एकाच लॅपटॉपवर खिडक्यांसकट हे इन्स्टॉल केलं तर संथ होईल का जरा लॅपटॉप?

बोका's picture

30 Nov 2016 - 7:13 pm | बोका

रिमिक्स ओएस हार्डडिस्क च्या सी किंवा डि ड्राईव्ह मध्ये एक फोल्डर बनवते. त्यात आपण निवडू त्याप्रमाणे ८/१६/३२ जीबी ची सिस्टिम फाईल बनते.
त्यामुळे विंडोज संथ चालेल असे वाटत नाही.
मी रिमिक्स ओएस माझ्या लिनक्स मशीनवर वापरून बघीतली. छान आहे. लिनक्स मशीनवर इन्स्टाल करतान थोडा त्रास झाला. ग्रुब मधे फेरफार करावे लागले.

इरसाल कार्टं's picture

1 Dec 2016 - 5:44 pm | इरसाल कार्टं

खिडकीवर काहीही परिणाम होणार नाही. ti पाहिल्यासारखीच फटाफट उघडेल.

पाटीलभाऊ's picture

30 Nov 2016 - 6:27 pm | पाटीलभाऊ

पण...आम्ही विंडोजप्रेमी...!
असंच अँड्रॉइड ओ.एस. विंडोज भ्रमणध्वनीवर चालवता येईल का ?

खिडकी (भ्रमणध्वनी आणि संगणक)वाला,
पाटीलभाऊ.

पैसा's picture

30 Nov 2016 - 6:30 pm | पैसा

आपोआप dual बूट option येतोय का? मग चांगले आहे. पण अँड्रॉइड पेक्षा मला दुसऱ्या लिनक्स प्रणाली जास्त आवडतात.

मराठी कथालेखक's picture

30 Nov 2016 - 7:13 pm | मराठी कथालेखक

ड्राईव्ह (HDD ) निवडल्यास ड्राईववरील फॉमॅट होतो का ? म्हणजे संपुर्ण ड्राईव या ओ एस ला लागतो का ? काही फोटोज टाकाल काय ?

पण उबंटूसारखा लिनक्स ओएस फुकट उपलब्ध असताना हा उद्योग का करायचा?

गामा पैलवान's picture

30 Nov 2016 - 8:17 pm | गामा पैलवान

अरे वा, इरसाल कार्टा! तुम्ही सुंदर पर्याय मिळवून दिलात. मी कृतकयंत्रावर (=व्हर्च्युअल मशीन) चढवून पाहेन.
आ.न.,
-गा.पै.

आनंदयात्री's picture

30 Nov 2016 - 8:23 pm | आनंदयात्री

__/\__ आणि आभार 'कृतकयंत्र' या शब्दासाठी :-)

इरसाल कार्टं's picture

2 Dec 2016 - 4:08 pm | इरसाल कार्टं

मी सहमत आहे!!!

mayu4u's picture

2 Dec 2016 - 4:31 pm | mayu4u

असेच म्हणतो!

आनंदयात्री's picture

30 Nov 2016 - 8:22 pm | आनंदयात्री

हे वापरून हायपर व्ही वर अँड्रॉइड वर्चुअल मशीन बनवता आले तर टेस्टिंगसाठी उपयोग होऊ शकेल. अर्थात प्रत्येक मोबाईल डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्मवर हरतऱ्हेचे इम्युलेटर उपलब्ध असतांना असे करून टेस्टिंग करायची गरज पडेल काय असाही प्रश्न आहेच.

इरसाल कार्टं's picture

14 Dec 2016 - 10:12 am | इरसाल कार्टं

खरेतर आपण टोरेंट हि संकल्पना खूप वेगळ्या बाजूने बघतो.
टोरेंट वापरणे हे बेकायदेशीर नसून टोरेंट वरून पायरेटेड चित्रपट, गेम्स, गाणी आणि सॉफ्टवेअर सारख्या गोष्टी डाउनलोड करणे बेकायदेशीर आहे.
बर्याचश्या वेबसाईट्स वर मुद्दाम टोरेंट फाईल दिलेली असते वापरकर्त्यांच्या सोयीसाठी. मंद इंटरनेट वापरणाऱ्यांची हे तर खूपच सोयीस्कर आहे.
तुम्ही यू टोरेंट डाउनलोड काररून घ्या, आणि बिनधास्त रिमिक्स व एस डाउनलोड करा.

सतिश गावडे's picture

24 Jan 2017 - 9:42 am | सतिश गावडे

हा उपद्व्याप करुन पाहीला. ओएस इन्स्टॉल होते. मात्र बुट होत नाही.

find --set-root --ignore-floppies /menu.lst

error 15:File Not Found

Press any key to continue . . .

असा एरर येतो. दुरुस्त करण्यासाठी नेटवरील उपाय करुन पाहीले. काही फायदा झाला नाही. एकाने ड्राईव्ह फोल्डरचा टाईप NTFS चा FAT32 करा असे सुचवले आहे. मात्र माझ्या ६४ बीट मशिनवर तो पर्याय येत नाही.

इरसाल कार्टं's picture

29 Jan 2017 - 2:53 pm | इरसाल कार्टं

बघतो ऊद्या हापिसात जाऊन.

गामा पैलवान's picture

20 Feb 2018 - 6:59 pm | गामा पैलवान

स.गा.,

माझ्याकडे बूटेबल vhd आहे ४ जीबीची. हवीये? सगळे प्यारामीटर्स एकदम तैय्यार आहेत. तुमच्या विंडोज १० मध्ये कृतकयंत्र प्रस्थापित करावं लागेल.

आ.न.,
-गा.पै.

मला सुद्धा हीच अडचण येत आहे...

कुशल द. जयकर's picture

20 Feb 2018 - 5:18 pm | कुशल द. जयकर

रीमिक्स os ही जबरदस्त os आहे यात गेम्स आणी app इनस्टॉल करण्यास app extractor हे app playstore मधून इनस्टॉल केल्यास app व गेम्स pc मध्ये छान चालतात
Pc इंटेल i5 1st जनरेशन 4gb ram इंटेल dh55tcबोर्ड याची ram,smps,प्रोसेसेर,hdd,सी मॉन्बॅस बॅटरी ok आहे pc चे फॅन 5सेकंदात चालू बंद होतात कधी pc थोड्याच वेळात beep आवाज 4/5 वेळ येऊन चालू होतो तर कधी चालू होत नाही. काही दीवस आधी अचानक चालू pc बंद होऊन स्क्रीन वर फक्त कलर दीसायचे व बीप आवाज येत रहायचा मी pc तील धूळ ब्लोअर ने साफ करत असे

गामा पैलवान's picture

20 Feb 2018 - 6:52 pm | गामा पैलवान

कुशल द. जयकर,

हे जरा विस्ताराने सांगावे ही विनंती. app extractor च्या सहाय्याने एखादा गेमचं विंडोज पीसी वर चालणाऱ्या exe फायलीत रुपांतर करता येतं का?

आ.न.,
-गा.पै.

बीप आवाज हा पिसी मध्ये असलेला बिघाड दर्शवतो:
१ बीप - व्हिडीओ कार्ड मध्ये बिघाड किंवा व्यवस्थित लावलेले नसणे
२ ते ३ बीप - रॅम मध्ये बिघाड किंवा व्यवस्थित लावलेली नसणे
सतत बीप - प्रोसेसर मध्ये बिघाड किंवा व्यवस्थित लावलेला नसणे

कुशल द. जयकर's picture

20 Feb 2018 - 5:31 pm | कुशल द. जयकर

Pc चे दोष व उपाय या बद्दल मराठीत कुठे माहीती मीळते. अशी कोणती साईट आहे का ?कींवा मी सांगीतलेल्या दोषांवर काही उपाय आहे का ?
माझा email eshajaikar@gmail.com आहे
काही माहीती असल्यास क्रुपया कळवा.

कंजूस's picture

20 Feb 2018 - 7:11 pm | कंजूस

**Pc चे दोष व उपाय या बद्दल मराठीत कुठे~~~**

मराठीत!!!

बाकी यासाठी पुर्वी इंग्रजित डिजिट मॅगझिन फेमस होते. ( आइसी चिप आणखी एक)

कुशल द. जयकर's picture

21 Feb 2018 - 10:39 am | कुशल द. जयकर

app extractor मोबाइल मधे टाकून पाहीजे ते appव गेम्स बाजुस दीलेल्या पॉईंट वर क्लीक करून e s file explorer मधे save करून ती save केलेली file रीमिक्स वर इनस्टॉल केली की गेम्स व app चालतात

गामा पैलवान's picture

21 Feb 2018 - 6:33 pm | गामा पैलवान

कुशल द जयकर,

हा खटाटोप कशासाठी करायचा? रीमिक्स फिरस्त्यावर असो वा संगणकावर, प्ले-स्टोअर दोन्हीकडे उपलब्ध असतं ना? माझं अँड्रॉईडचं ज्ञान यथातथाच आहे म्हणून विचारतोय.

आ.न.,
-गा.पै.

कुशल द. जयकर's picture

21 Feb 2018 - 11:09 am | कुशल द. जयकर

मी pcब्लोअर ने साफ करत असे त्याने काही प्रॉब्लेम होऊ शकतो का आणी बीप कधीकधी सतत वाजते बाकी पार्ट मी दुसऱ्या pc मधे लाऊन चेक केले बॅटरी शॉर्ट करून बोर्ड रिसेट ही केला फक्त बोर्ड चेक नाही केला यात काही प्रॉब्लेम असू शकतो तो कसा शोधावा

हतोळकरांचा प्रसाद's picture

21 Feb 2018 - 12:23 pm | हतोळकरांचा प्रसाद

माझ्याकडे विंडोज सर्फेस आहे. माझी खूप इच्छा आहे त्यावर हे ट्राय करायची, करता येईल का? विंडोजमुळे सर्फेसमध्ये पैसे फुकट गेल्याची भावना आहे.

कुशल द. जयकर's picture

22 Feb 2018 - 11:01 am | कुशल द. जयकर

हतोळकरांचा प्रसाद- विंडोज सर्फेस ही टच स्क्रीन साठी आहे त्यामुळे चालली पाहीजे त्मीयावर प्रयोग केला नाही मी 7प्रोफेशनल वर वापरत आहे त्यामुळे जाणकारांनी माहीती द्यावी
गामा पैलवान- मी ब्लुस्टक ट्राय केल. पण रीमिक्स छान वाटली काय वेगळेपण आहे हे पाहण्यासाठी व मोबाइल चे गेम्स मुलांना pc वर खेळण्यासाठी ही os उत्तम पर्याय आहे

कळविण्यास अत्यंत आनंद होतो की यूएसबी ड्राईव्ह वर स्थापलेली रीमिक्स वापरून कृतकयंत्र सुरू झाले. युईएफाय दशेत बरंका. इंग्रजीत लिवायचं झालं तर : I successfully booted Remix on a virtual machine from usb key in UEFI mode.

अधिकृत संकेतस्थळावर पेन ड्राईव्हवर स्थापण्यासाठी युईएफाय दशा उपलब्ध नाही. त्यामुळे ती दशा उत्पन्न करण्यासाठी बराच सव्यापसव्य करावा लागला, पण काम झालं. कोणाला स्वाध्यायमाला (=ट्युटोरियल) हवी असल्यास मिळू शकेल.

आता मूर्तयंत्रावर (= फिजिकल मशीन) चालतेय का ते बघतो.

-गा.पै.

प्रचेतस's picture

1 Mar 2018 - 8:54 am | प्रचेतस

रफस वापरुन सहजगत्या होतं.

गामा पैलवान's picture

1 Mar 2018 - 7:16 pm | गामा पैलवान

प्रचेतस,

बघतो जमतंय का. युईएफाय दशेत चालतं?

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

5 Apr 2018 - 1:55 am | गामा पैलवान

रीमिक्स मूर्तयंत्रावर सुरू (= boot) झाली बरें!

https://ibb.co/eOr8Ex

-गा.पै.

गामा पैलवान's picture

3 Mar 2018 - 4:26 pm | गामा पैलवान

आयशप्पत, हे आधीच माहित व्हायला हवं होतं. जाईडवाल्यांनी रीमिक्सचं विकसन (=डेव्हलपमेंट) बंद केलं आहे. स्रोत : https://forum.xda-developers.com/remix/remix-os/choice-remix-os-t3652752

फिनिक्स पकडावी काय? सध्या कृतकयंत्रावर अॅण्ड्रॉईड-एक्स८६ चालवून बघतोय. ती जमली तर फिनिक्स स्थापून बघेन.

गा.पै.

पैसा's picture

3 Mar 2018 - 7:48 pm | पैसा

लिनक्स प्रणालीला वाहिलेले https://distrowatch.com/ हे संस्थळ आहे. कदाचित तुम्हाला माहित असेल. इथे सगळ्या प्रणाली, त्यांच्या कुंडल्या, भूत-वर्तमान-भविष्य याबद्दल माहिती आहे. उदा. https://distrowatch.com/table.php?distribution=remixos

गामा पैलवान's picture

3 Mar 2018 - 8:26 pm | गामा पैलवान

दुव्याबद्दल धन्यवाद पैसाताई. तिथे फिनिक्स सापडली नाही. लिनक्सला वाहिलेलं संकेतस्थळ दिसतंय. बहुधा फिनिक्स ही अँड्रॉईड प्रणाली असल्याने ती तिथे सापडायला नको. पण रीमिक्स कशीकाय आढळते ते कळंत नाही.

आ.न.,
-गा.पै.

पैसा's picture

3 Mar 2018 - 10:14 pm | पैसा

https://distrowatch.com/table.php?distribution=phoenix या प्रणालीचा अजून रिव्ह्यु झालेला नाही. वेटिंग लिस्ट मधे फिनिक्स संस्थळ आहे. तिथे विंडोज वगळता इतर सर्व प्रणाली (अँड्रॉइड आधारित, स्वतंत्र वगैरे) निदान नोंद झालेल्या तरी आहेत.

गामा पैलवान's picture

4 Mar 2018 - 12:58 am | गामा पैलवान

पैसाताई,

सापडली हो सापडली. फिनिक्स प्रतीक्षायादीत सापडली. माहितीबद्दल धन्यवाद. पण हिचा आढावा केंव्हा घेतला जाईल ते माहित नाही. कृतकयंत्रावर सरळ प्रस्थापित करून बघेन म्हणतो.

आ.न.,
-गा.पै.

भाते's picture

5 Apr 2018 - 4:23 pm | भाते

यापध्दल आणखी माहिती इथे मिळेल.
याची आयएसओ फाईल ८३० एमबीची आहे. दोन तीन वेळा डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केला पण ते भयानक संथ आहे. इंस्टॉलर ६१४ एमबी आहे.

गामा पैलवान's picture

5 Apr 2018 - 6:24 pm | गामा पैलवान

भाते,

वर्णक्रम Phoenix असला तरी उच्चार फिनिक्स आहे. असाच Phoebe चा फीबी उच्चार होतो.

आ.न.,
-गा.पै.