रायडिंग नॉस्टॅल्जिया

भटकंती अनलिमिटेड's picture
भटकंती अनलिमिटेड in तंत्रजगत
26 Oct 2016 - 11:01 am

रॉयल एनफिल्डच्या धाग्यावर मी एक कमेंट केली होती. त्यातच नवीन धागा असावा असे मला (उगाचच) वाटून गेलं. म्हणून हा प्रपंच. तुमच्या आठवणीच्या जुन्या बाईक्स/स्कूटर्स असतीलच ना. त्यातलं काय आवडलं, काय आता हवं आहे त्यासाठी हा नवीन धागा.

जावा, येझ्दी या बाईक्सचा एक काळ होता. नंतर राजदूतने त्यांचं मार्केट खाल्लं. पण अजूनही त्या गाड्या पाहिल्या की कुठं तरी काळजाचा ठोका चुकतो राव. आजच्या जेन-वायच्या पोट्ट्यांना खरेच या गाड्या किती अपील होतील कुणास ठाऊक. टाईमलेस क्लासिक डिझाईन आणि नवीन तंत्रज्ञान यांचा मेळ साधून महिंद्राला काही जादू करता येईल काय? आजपावेतो तरी त्यांच्या टू व्हीलर डिव्हिजनला हवे तसे रुपडे लाभले नाहीये. कदाचित जावा आणि बीएसए हे दोन ब्रॅंड विकत घेऊन महिंद्रा ते करु शकेल. आनंंद महिंद्रा आणि त्यांच्या थिंकटॅंकने काहीतरी भारी प्लॅन नक्की आखला असावा.

(अवांतर: यासाठी एक नवाच धागा हवाय)

माझ्या आवडत्या गाड्यांपैकी काही म्हणजे रॉयल एनफिल्ड, जावा, येझ्दी आणि सुझुकीच्या सामुराई/शाओलिन. व्हेस्पा/प्रिया स्कूटर. यातील रॉयल एनफिल्डने नव्या तंत्राचा मेळ घालून साधारण तसे डिझाईन्स पुन्हा यशस्वीरीत्या आणले आहेत. व्हेस्पादेखील पिआजिओ स्कूटर्सच्या माध्यमातून यशस्वीरीत्या जुन्या स्कूटर्सचा चार्म आणते आहेच.

महिंद्राने आपल्या Classic Legends Private Limited या कंपनीमार्फत गेल्या दोन दिवसांत BSA आणि Jawa दोन जुने लिजेंड ब्रॅंड्स विकत घेऊन या सेगमेंटमध्ये श्रीगणेशा केला आहे.

BSA

Jawa

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

26 Oct 2016 - 11:32 am | महासंग्राम

महिंद्राने आपल्या Classic Legends Private Limited या कंपनीमार्फत गेल्या दोन दिवसांत BSA आणि Jawa दोन जुने लिजेंड

वाह हि बढिया बातमी सांगितलीत तुम्ही. रच्याकने सुहास शिरवळकरांची बॉबी/यझदी/जावा ( ३ पैकी एक आहे) त्यांच्या घरच्यांनी अजून जपून ठेवलीये. त्या गाडीने जवळपास पूर्ण महाराष्ट्र पालथा घातला होता.

जिन्क्स's picture

26 Oct 2016 - 11:50 am | जिन्क्स

आवडीच्या विषयावरचा धागा...
सुहास शिरवळकरांच्या 'जाता-येता' कादंबरीत जावाच फार मस्त वर्णन आहे

बुलेटच्या धाग्यावरील प्रतिसाद पेस्टवला आहे.
जावा किंवा येझदी या त्या काळात उपलब्ध असलेल्या बऱ्या गाड्या( दणकट) होत्या इतकंच.
दोन्ही गाड्या भरपूर चालवल्या आहेत आणि त्यात असणाऱ्या अगदी मूलभूत कमतरता या त्यांच्या नाशाला कारणीभूत होत्या.
उदा. पेट्रोल कॉक उघड राहिला तर कार्ब्युरेटर फ्लड होणे.
बॅटरी स्वतःहून चार्ज न होणे. त्या साठी एक चार्जरचा स्विच विकत आणून बसवावा लागत असे.
नीट किक मारली नाही तर उलटी किक येऊन आपला पाय दुखावणे.
गियर लिव्हर तीन इंच वर उचलल्यावर गियर पडत असे.
फाँल्स न्यूट्रल पडणे.
ब्रेक करकचून दाबावा लागत असे.
वळण्याचा गोल ( टर्निंग रेडियस) फार मोठा असल्याने छोट्या रस्त्यात पुढे मागे करून वळवावी लागत असे.
आणि एवढे करून ऍव्हरेज २५ मिळत असे.
जपानी गाड्या आल्या तेंव्हा लोकांना समजून आले कि तंत्रज्ञान आपल्याला काय सुखसोयी पुरवू शकते.
नुसती गेंड्यासारखा आकार आणि ताकद असून उपयोगी नाही तर चित्त्यासारखी चपळता आणि पटकन वळण्याची, थांबण्याची क्षमता या वाहतुकीत जास्त उपयुक्त गोष्टी आहेत.
बऱ्याच लोकांना केवळ रम्य आठवणी पायी त्या गाड्या आज आठवत आहेत. परंतु इंड सुझुकी आणि हिरो होंडा आल्यावर त्यांच्यातील कमतरता फार प्रकर्षाने पुढे आल्या.
असो.

हेच लिहायला आलो होतो. रम्य आठवणी वगैरे म्हणून ठीक आहे. पण या गाड्या मुळातच मार्केट मधून हद्दपार का झाल्या हेही विचारात घ्यायला हवे.

भटकंती अनलिमिटेड's picture

26 Oct 2016 - 12:16 pm | भटकंती अनलिमिटेड

म्हणूनच टाईमलेस क्लासिक डिझाईन आणि नवीन तंत्रज्ञान यांचा मेळ साधून काहीतरी करतील अशी अटकळ आहे. स्पेशली कम्युटर बाईक्सच्या वरचा आणि सुपरबाईक्सच्या खालचा २०० ते ५०० सीसीचा जो सेगमेंट आहे त्यात काहीतरी येत्या काही वर्षात बघायला मिळेल अशी आशा आहे.
यामाहा आरएक्स-१००/१३५, सामुराई, शाओलिन या बाईक्स केवळ कम्प्लायन्समध्ये २-स्ट्रोक इंजिन्स बसत नव्हते म्हणून कालौघात लोप पावल्या. रॉयल एन्फिल्डने योग्य वेळी CI इंजिन बदलून UCE इंजिन आणून नव्या युगात जम बसवला.

संदीप डांगे's picture

26 Oct 2016 - 12:21 pm | संदीप डांगे

+1

अभ्या..'s picture

26 Oct 2016 - 12:22 pm | अभ्या..

यामाहा आरएक्स-१००/१३५, सामुराई, शाओलिन

ह्यात सुझुकी शोगन राह्यली. सामुराई शावलीन ह्या सिटी बाईक होत्या,
शोगन ती खरी अस्सल टॉर्क बाईक. चक्क १४ बीएचपी १०८ सीसीला. बेक्कार उचलत होती.

भटकंती अनलिमिटेड's picture

26 Oct 2016 - 12:24 pm | भटकंती अनलिमिटेड

आणि वर ५-स्पीड गियरबॉक्स

अभ्या..'s picture

26 Oct 2016 - 12:28 pm | अभ्या..

५ स्पीड फक्त शाओलीन आणी आरेक्स १३५ ओव्हरड्राईव्हला. बाकी सगळे ४ स्पीड.
आरेक्स १३५ मी वापरलीय कॉलेजात. ;)

आर्बि२३९९'s picture

28 Oct 2016 - 10:49 am | आर्बि२३९९

माझ्याकडे १९९५ ची shogun हाय :D . एकदम काटा गाडी .... २ स्ट्रोक ती २ स्ट्रोक....

वेल्लाभट's picture

26 Oct 2016 - 12:26 pm | वेल्लाभट

टोट्टल अ‍ॅग्री.

महिंद्राची स्ट्रॅटेजी योग्य जातेय असं वाटतंय. गाड्या हद्दपार का झाल्या ते बघायला हवं इतपत ठीक पण ते सुधारून जर त्या पुन्हा आणता आल्या तर त्याहून भारी काहीच नसेल. न्यूनेस ऑल्सो एन्काउंटर्स स्टॅग्नन्सी. रिवायवल इज द मेडिसिन देन.

महिंद्रा काहीही करणार नाही. आहे त्यावर स्टीकर, नांवे आणि कलर बदलुन कॉस्मेटिक चेंजेसवर गाड्या विकणार.
त्यांना करायचे असते तर कायनेटीक घेतल्यावर एवढी वर्षे काहीतरी केले असते. कायनेटीकचीच जुनी मॉडेल्स नावे बदलुन विकली फक्त महिंद्राने.

भटकंती अनलिमिटेड's picture

26 Oct 2016 - 12:40 pm | भटकंती अनलिमिटेड

मला तरी असे वाटत नाही. कायनेटिक फिरोदिया ग्रुपकडून घेतली तो काळ वेगळा होता. महिंद्राने गेल्या काही वर्षांत खरेदी केलेल्या काही कंपन्या आणि त्यांचे सध्याच्या गाड्यांमधले योगदान.

रेवा - खप कमी असला तरी मूळ रेवापेक्षा e2o अधिक खपत आहेत. बेअर बेसिक डिझाईनवरुन कंफर्ट एनहान्समेंट्स केले आहेत.
पिलफ्रिनिया डिझाईन - ही डिझाईन फर्म विकत घेऊन त्या कौशल्याचा आपल्या चारचाकी बिझनेसमध्ये खुबीने वापर करुन घेतला आणि ओव्हरॉल गाड्यांची इंजिनियरिंग डिझाईन्स सुधारली.
सम्यांग - आजारी कंपनी विकत घेऊन एक दोन नवीन मॉडेल्स लॉंच केली. उदा. रेक्स्टन
इलेक्ट्रिक स्कूटर - genZ आपल्याकडे विकली जात नसली तरी युरोपात अशा स्कूटर्सचा बरा खप आहे.

टीप: अजूनही महिंद्राला दुचाकीच्या धंद्यात स्वतःला जम बसवता आलेला नाही. मोजो चांगली असून पण यथातथाच खपते. अधिक वजन आणि एबीएसचा अभाव हे एक मुख्य कारण. म्हणूनच बदलत्या तंत्राची सांगड घालावी लागेल असे सुरुवातीलाच म्हणालो.

सरजी तुम्ही लै भारी आवडीचा विषय काढलाय. लिहायची लै सुरसुरी आलीय पण क्या करे. :(
धंद्याचा टाइम आहे. दिवाळी करतो आणि मग येतो चर्चेला. तेंव्हा परत काढू धागा वर.

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 Oct 2016 - 12:57 pm | अनिरुद्ध.वैद्य

घेणार नाई लोकं. हुषार झालीत. त्यांना चांगलं चांगलंच पाहिजे. बुलेट टिकली कारण रडत रखडत का होइना, त्या गाड्यांच प्रॉडक्शन सुरु होत.

ह्या गाड्या ८० मध्येच गायब झाल्यात अन त्यामुळे नव्या मंडळींना जास्त माहितीच नाही. सो नुस्त्या लूक्सवर न जाता नवे बदल घ्यावेच लागतील. अन्यथा टिकाव धरणार नाहीत.

संदीप डांगे's picture

26 Oct 2016 - 12:27 pm | संदीप डांगे

अवांतर: नोस्टलजिया वरून आठवलं, आजकाल चुलीवरच्या भाकरी पीठल्याची जाम फ्याशन आहे, फक्त त्याची हॉटेलं निघाली आहेत, चुलीवरच्या भाकरीसाठी लोक असं काही कळवळतात जणू सरकारने बंदी घालून चुली बंद केल्यात!

तशीच फ्याशन आता बाईक्स मध्ये येत आहे, नवीन तंत्र पण लुक रेट्रो, ओल्डस्कुल, विंतेज, बेस्ट ऑफ बोद द वर्ल्डस!

90 च्या दशकात गरज म्हणून जपानी बाईक्स आहेत तशा खपल्या, आजकाल स्टाईल, ट्रेंड, युनिकनेस ह्याची चलती आहे, गरज पूर्ण झाली कि त्यापुढे नखरे सुरु होतात...

वेल्लाभट's picture

26 Oct 2016 - 12:34 pm | वेल्लाभट

जगाचा नियम आहे डांगे साहेब,
व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड..
इट्स अ सर्कल ऑफ लाइफ

एकेकाळी क्लीन शेव ची फॅशन आली होती, आता फिरून पुन्हा दाढीची क्रेझ आली. आधी क्लीन म्हणजे जंटलमन म्हणून फ्येमस झालं आता स्टबल म्हणजे माचो म्हणून फ्येमस आहे.. चालायचंच

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 Oct 2016 - 12:53 pm | अनिरुद्ध.वैद्य

गर्दीतुन हटके दिसण्यासाठी कायपण करु शकतात लोक्स!

मराठी_माणूस's picture

26 Oct 2016 - 12:54 pm | मराठी_माणूस

आता स्टबल म्हणजे माचो म्हणून फ्येमस आहे..

हे कदाचीत त्याना स्वतःला वाटत असेल , बघणार्‍याला ते कळकटच दिसते.

अभ्या..'s picture

26 Oct 2016 - 12:57 pm | अभ्या..

बघणारे सोडा, बघणारी/र्‍या असेल तर वेगळे असते हो ममा.

वेल्लाभट's picture

26 Oct 2016 - 1:07 pm | वेल्लाभट

बापरे तुम्ही कशाला स्टबल बघायला जाताय?

गुंड्या's picture

26 Oct 2016 - 1:36 pm | गुंड्या

सध्या बाजारात जे कल्ट ब्रॅन्ड्स आहेत(रॉयल एन्फील्ड, वेस्पा) ते पूर्ण बंद झाले न्हवते आणि त्यामुळं त्यांचं रीलाँच करता आलं. जावा किंवा बीएसए हे काहीसे विसरले गेलेले ब्रॅन्ड्स आहेत. ह्यांचं रीलाँच थोडं कठीण आहे...

भटकंती अनलिमिटेड's picture

28 Oct 2016 - 8:11 am | भटकंती अनलिमिटेड

हे फोटो कुठ्ल्याही मोटरसायकल चाहत्याचे हृदय पिळवटून टाकतील.

https://www.facebook.com/mysticarcher/media_set?set=a.1126831640672346.1...

सत्याचे प्रयोग's picture

28 Oct 2016 - 12:07 pm | सत्याचे प्रयोग

फोटो पाहिले खरंच हृदय पिळवटून टाकनारे आहेत.
हे असे का घडले कळल काय ??

सौन्दर्य's picture

28 Oct 2016 - 8:30 am | सौन्दर्य

मी मोटरसायकल शिकलो ते येझदीवर. छान रस्त्याला धरून जाणारी बाईक होती ती. स्पीड देखील चांगला आणि हळूहळू वाढत जाणारा. पण काही कमतरता होत्याच, माईलेज, बाईकचे वजन, टर्निंग रेडीयस वगैरे. १९८९मध्ये हिरो होंडा घेतली, एकदम आवडली. जवळ जवळ १५ वर्षे वापरली, मुंबई सारख्या शहरात देखील ७०चा अॅव्हरेज मिळत होता. ज्यावेळी हिरो होंडा, कावासाकी बजाज, इंड सुझुकी आणि यामाहा (सगळ्या १०० सीसी) जोरात चालत होत्या त्यावेळी मला वाटते रॉयल एन्फिल्डच्या बुलेटची जाहिरात अशी असायची "लेट द बॉ्य्ज प्ले विथ द टॉईज".

भटकंती अनलिमिटेड's picture

28 Oct 2016 - 11:18 am | भटकंती अनलिमिटेड

एखादी पडीक येझ्दी घेऊन रिस्टोअर करता येईल काय? अंदाजे काय खर्च येतो? फार दिवसांपासूनचं स्वप्न आहे.

अभ्या..'s picture

28 Oct 2016 - 11:25 am | अभ्या..

इंजिन ब्लॉकचं आणि इलेक्ट्रिकल्सचे सोडून २५ ते ३० हजारात होईल. कॉस्मेटिक, टायर, पेंट आणि क्रोम ग्लीडिंग. बाकी सटरफटर लागेल तसे.

गणामास्तर's picture

28 Oct 2016 - 11:34 am | गणामास्तर

होती माझ्याकडे. खर्च म्हणाल तर वीसेक हजारात होईल पण हवे ते पार्टस मिळायला फार त्रास होतो.
गेल्या वर्षी मला हेडलाईट आणि क्लच, ब्रेक केबल मिळवता मिळवता टाके ढिले झाले होते. अक्खी नाना पेठ
पालथी घालून सुद्धा काही उपयोग झाला नाही, शेवटी एका दुकानदाराने आगाऊ पैसे घेऊन कुठून तरी 4 दिवसात पैदा
करून दिले पार्टस.