The Place of Peace

विनायकपाटील८९'s picture
विनायकपाटील८९ in भटकंती
20 Oct 2016 - 2:44 am

जसा पाण्याने वाहण्याचा आपला धर्म कधी सोडला नाही तसाच आम्हीही निरंतर रस्त्याने प्रवास करण्याचा आमचा छंद गोडी लागल्यापासून आजवर सोडलेला नाही. असाच या निरंतर रस्त्यांचा वर्षाचा शेवटचा प्रवास आम्ही मावळ्यांनी ५ dec २०१५ रोजी करण्याचा योजिला. पण नेहमी प्रमाणे जागा ठरत नव्हती, आणि नेहमीप्रमाणेच टांगू came up with an idea of हरिश्चंद्रगड…!! माळशेज घाटात पसरलेला त्याचा अवाढव्य विस्तार… ट्रेकर्सची पंढरी म्हणून त्याचा असलेला लौकिक … या गोष्टींनी मनावर गारुड केलेलं … आमच्या गावातून वाहणाऱ्या आणि बारमाही पाणी असणाऱ्या काळू नदीचा उगम याच गडावर होतो ही नवीनच माहिती कळली आणि गड आणखीच जवळचा सोबती झाला … या वेळ चा trek इतर trek पेक्षा वेगळा ठरणार होता कारण या वेळी आम्ही K2 ने घेतलेल्या secondhand नवीन कार ने मोहिमेला अंजाम देणार होतो, त्यामुळे सगळे उत्साही होते.
घाट वाट

५ dec सकाळी ९ वाजता निघायचं ठरलं, आदल्यादिवशी कोण –कोण काय घेणार हे सगळ ठरलं होत. पण आयत्यावेळेस K2 महाशयांनी मोहिमेवर पाणी फिरेल असे दिवसस्वप्न दाखवले. घोड्यांनी मोहीम फत्ते करायचीय आणि आयत्या वेळेला घोडेच नाही म्हटल्यावर कसली आली मोहीम. शेवटच्या क्षणाला सावंत मामांच्या कृपेने K2 ची कार वाचली व मोहिमेस पावली. ९-१० करत –करत निघायला ११ वाजले. k2’s bro राहुल–the great driver, मी, टांगू, योगेश आणि K2 असे आम्ही वेडात मराठी ५ वीर मोहिमेस दौडले. गप्पा करत-करत, कधी कल्याणच्या बाहेर पडून मुरबाड रोडला लागलो कळलच नाही. खिडकीबाहेर वेडीवाकडी वळणं, दुतर्फा झाडे, उल्हास नदीचे पात्र पाहताना गाण्यांचे स्वर कानात गुंजू लागले.. हे घेतलंय का, ते घेतलंय का, गप्पा, गाणी करत-करत आम्ही मुरबाड ला पोहचलो. मुरबाडच्या जरा आधी chicken shop दिसताच गाडी सायडिंग ला घेऊन मस्त 2 kg फ्रेश chicken घेतलं. मुरबाडला पोहचताच प्रत्येकाने आपापल्या टाक्या खाली केल्या. काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या, last time मुरबाडला कधी आलो होतो, master च्या फोनपायी सुटता-सुटता भेटलेली शेवटची बस, गोरखगड-सिद्धगड च्या आठवणी क्षणात ताज्या झाल्या. आठवणी तश्याच ताज्या असताना सगळ्यांनी गरमागरम वडापाव व भजीवर ताव मारला. रस्त्यालगत कार, ५ जिवलग मित्र, गरमागरम वडापाव, जुन्या आठवणी.....वाह आणखीन काय पाहिजे !

स्वयंपाकासाठी लागणारे कांदा, मिरची, टमाटे, हिरवा मसाला वगैरे मुरबाडहून घेऊन आमची गाडी निघाली. पुढे रस्त्याच्या उजवीकडे, दक्षिणेला दिसणाऱ्या गोरखगड-सिद्धगड भाऊनां टाटा-बायबाय करत आमची गाडी माळशेज घाटात शिरली. वेडी-वाकडी वळणं पार करत, तीव्र चढ चढत, घनदाट झाडांच्या भव्य सावल्यांना चिरत आम्ही एका view point ला येऊन थबकलो. तसे माळशेज मध्ये अनेक view points आहेत, प्रत्येक पाहत पुढे जायचं म्हटलं तर दिवस जायचा सगळा. पण सुंदर आणि मोठे view point तीनच, त्यातला हा पहिला ‘’शिवतीर्थ’’. कठीण अश्या अग्निजन्य खडकांनी बनलेल्या या view point वरून माळशेज चे अजस्त्र रूप दिसते. पावसाळ्यात हाच घाट स्वर्गापेक्षा कमी नसतो, फक्त इथे नर्तकी नसतात एवढंच. शिवतीर्थावर पोटभर फोटोग्राफी करून आम्ही माळशेजच्या tunnel point ला गाडी बाजूला घेतली. तिथे महादेवाचे दर्शन घेऊन, माळशेजचे थंडगार पाणी पिऊन तृप्त झालो. या तृप्तीत भर घातली ती तिथली मक्याची कणसं आणि थंडगार लिबू सरबताने. शिवतीर्थ व tunnel point च्या timepas मध्ये कधी ४.३० वाजले कळलंच नाही. पश्चिमेकडे झुकलेल्या भास्कराच्या हलक्या प्रकाशाने उजळलेल्या माळशेजच्या पाठीवरून आम्ही tunnel पार करून आता त्याच्या खांद्या वर आलो होतो. त्यात प्रत्येक point ला थांबायचा मोह आवरत नव्हता. tunnel पार करतो ना तोच त्याच्या लगतच एक मोठा view point होता. लगेचच प्रत्येकाने गाडीच्या बाहेर पटापट उड्या घेतल्या. रस्त्यावर पडलेल्या लालबुंद उंबरांचा सडा पार करत point च्या टोकाकडे धावलो. टांगू ने घेतलेल्या coolpad मध्ये जबराट फोटो येत होते, edit करायची गरजच नाही. It was like real smart phone आणि नंतर-नंतर तर आम्ही आम्हाला फोटोतलेच जास्त आवडायला लागलो. एकीकडे पश्चिमेचा सूर्य निरोप देत होता तर दुसरीकडे दरीपलीकडील MTDC चे resorts साद घालत होते. त्यात कुणीतरी चला-चला उशीर होतोय, हरीश्चन्द्राच्या पायथ्याशी पोहचायला अंधार होईन- असे म्हटले. लगेच निघालो......

mtdc resorts

MTDC येई पर्यंत ५.३० वाजले होते, जरा MTDC resorts पाहून येण्याच सर्वमताने ठरलं. मी आणि टांगू ऑफिस मध्ये चौकशी करून, resorts चे रूम, सभोवतालचे परिसर न्ह्याळून कार कडे वळलो. तोपर्यंत K2, योगेश आणि राहुल बाहेर timepass व आपला फोटोग्राफी छंद जोपासत होते. जर कुणाला निसर्गमय romantic evening किंवा night हवी असेन तर MTDC ला नक्की भेट द्यावी थोड खर्चिक आहे पण worthy आहे. पूर्वेकडे पिंपळगाव धरणाचा विस्तीर्ण जलाशय, पश्चिमकडे दिसणारा कोकण, उत्तरेकडे रतनगड, अलंग-मलंग चे सुळके, सांधण दरी अश्या एकूण विविध प्रदेशांनी वेढलेली हि जागा म्हणजे-.. अप्रतिम.

dharnachi vat

हि सगळी दृश्य डोळ्यात साठवून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. आता घाट उतरून बऱ्यापैकी सपाट रस्त्याला लागलो होतो. खिरेश्वर गावची वाट शोधत-शोधत गाडी highway पासून कधीच विलग झाली होती, पिंपळगाव जोग धरणाच्या कडे-कडे ने खिरेश्वर गावाकडे हळू-हळू जाऊ लागली होती. कच्चा खडबडीत उंच रस्ता, दोन्हीबाजूला खोलगट भाग, एकीकडे धरणाच पाणी आणि दुसरीकडे हिरवं उजाड रान, २-३ पडकी घरं, एक प्राचीन शिवमंदिर. मोजून एक km चा खडबडीत रस्ता अर्ध्या तासात पार करून खिरेश्वर गावात पोहचलो. गावात पोहचल्यावर आम्ही विसरलेलो स्वयंपाकासाठी लागणार गोडतेल, जळणासाठी लाकूड कुठे मिळतंय का शोधलं. गोडतेल आम्हाला किराणा दुकानातून मिळालं पण लाकूड कुठे मिळेना, एक दोघांना पैसे देऊन विकत घेतो म्हटले तरी देईनात. त्यात गावतले लोक परग्रही आल्यासारखे लूक देत होते. आता रात्र कुठे काढायची हा प्रश्न तसाच होता. अजून प्रकाशही बऱ्यापैकी होता. आलो त्याच रस्त्याने धरणाच्या कडे-कडे ने पुढे जायचं ठरलं. २-३ km पुढे आल्यावर आम्हाला साजेशी अशी जागा आम्हाला मिळाली. आजची रात्र धरणाकाठी काढून सकाळी लवकर उठून trek चालू करायचा असा प्लान सगळे धरून होते. जागा मिळताच सगळे पुढच्या कामाला लागले.गाडी कडेला पार्क करून एक-एक सामान बाहेर काढू लागलो. हलक्या मतभेदानंतर tent ची जागा धरणाच्या पाण्याच्या अगदी जवळ ठरवण्यात आली. टांगू आणि योगेश tent उभारायच्या कामाला लागले, मी आणि राहुल आजूबाजूला कुठे लाकडं मिळतात का शोधू लागलो, K2 lights व इतर कामं करू लागला. सगळे एकदम busy, हलका अंधार कधीच पडला होता. अर्ध्या तासात काळोख होणार नक्की होत ते पाहून प्रत्येक जण आपलं काम चपळाईने करू लागले. तिकडे त्या तीघांच काम बऱ्यापैकी झालं होत पण आम्हाला एक काडीही कुठे मिळत नव्हती, सगळी कडे कोरडं गवत किंवा हिरवी झाडं. १५-२० मिनिटे शोधून झाल्यावर दूर एक घर दिसलं तिथे काही मिळत का हे पहायचं ठरलं. सुरुवातीला आवाज दिल्यावर कोणीच होकार देईना, शेवटी २६ जानेवारी ला परेड म्हणतात तशी हाक दिल्यावर एक ८-९ वर्षाचा लहान मुलगा बाहेर आला, आम्ही एक बोलायचो आणि तो दुसरच. थोड्या वेळाने त्याचे वडील बाहेर आले आम्ही त्यांना आमची परिस्थिती सांगितली, हवं तर पैसे घ्या म्हटलं. ते लगेच तैयार झाले. आम्ही ३० रु देऊन आम्हाला हवी तेवढी लाकडं घेतली. खर तर आम्ही अश्या परिस्थितीत होतो की १०० रु ही दिले असते. तरी त्या माणसाला मी २० च्या ऐवजी ३० रु दिल्यावर राहुने माझ्या कडे एक नजर टाकली. आम्ही सरपण आणीपर्यंत इकडे सगळं ready झालेलं होत. लगेच योगेश भाऊ कांदा, मिरच्या कापायला बसले, मी आणि टांगू chicken धुवायला लागलो. पातेल्याला मस्त मातीचा लेप देऊन चुल्यावर ठेवला. त्यानंतर सगळ्यात जिकरीच काम होत ते चुल्हा पेटवण, आमच्या कृपेने हवा हलकीच होती तरी चुल्हा काही पेटेना. होते नव्हते सगळे याच कामाला लागले. घरून आणलेल्या राँकेल चा ही फारसा उपयोग होत नव्हता. शेवटी चूल कशी-बशी पेटली. आता काय करायचं! असा प्रश्न उदभवू नये म्हणून मी आधीच घरून chicken बिर्याणी ची recepie लिहून आणली होती पण त्याची फारशी गरज पडली नाही, योगेश भाऊ उत्साद होते. मसाला, कांदे मस्त लाल झाल्यावर chicken कडे वळलो तेव्हा दिसलं की उडणाऱ्या २००-३०० मुंग्या chicken वर येऊन चिपकून मेलेल्या होत्या. आता काय करायचं पातेलं एकंच होत आणि already oocupied होत. मी म्हटलं टाका तसच नाहीतरी bear grylls खातोच की काहीही आपणही खाऊ प्रोटीन युक्त बिर्याणी. १५-२० मिनिटांनी chicken बऱ्यापैकी fry झाल्यावर त्यात तांदूळ आणि पाणी टाकण्यात आलं. chicken fry होतानाच मस्त वास सुटलेला. आता पुढचा अर्धा तास गप्पांबरोबर आग पेटवण चालू होत. अर्ध्या तासांनी बिर्याणी उकळायला लागली आणि आधी पेक्षाही खमंग वास दरवळायला लागला. सगळ्यांना कडाडून भुका लागलेल्या, मध्ये मध्ये प्रत्येक जण gravy ची चव घेऊन पाहत होता. अजून थोडी वाट पाह्ण्याच ठरलं, ok द्या शिजू अजून. तेवढ्यात K2 च्या अंगात बाबा शिरले, मी chicken खाणार नाही म्हटला- चला एक member कमी झाला....मी मनात म्हटलं. बाकीच्यानीही म्हटलं असणार फक्त कोणी बोलून नाही दाखवलं .
biryani

dining table
शेवटी बिर्याणी तैयार झाली आणि आम्ही पाण्याच्या मंद संगीतात आमचा dining table लावला आणि गरमागरम chicken कम प्रोटीन बिर्याणी वर ताव मारला. खातांना बिर्याणीच्या चविशिवाय विषयच नव्हता. आम्ही ४ जणांनी 2 kg बिर्याणी almost फस्त केलेली होती. उरलेली सकाळी नाश्त्याला खायचं असं कुणीतरी म्हटलं. तिथेच आडव व्हावं असा प्रत्येकाला वाटत होत. पण walk ला जाऊन यायचं ठरलं. फार काही वेळ नव्हता झालेला ८.३०-९ वाजले असतील तरी रस्त्यावर घट्ट काळोख, चांदण्यांचा हलका प्रकाश, आणि रातकिड्यांच्या कीर-कीर आवाजात आम्ही लवकर walk आटोपटा घेऊन base वर परत आलो आणि शेकोटी भोवती गप्पा करत बसलो. काळोखाबरोबर आमच्या गप्पा ही रंगत गेल्या. खूप खाल्यामुळे आणि दिवसभरच्या प्रवासामुळे सगळ्यांना १० वाजताच झोपा येत होत्या. मी, टांगू आणि K2 tent मध्ये झोपायचं ठरलं आणि राहुल आणि योगेश कार मध्ये, कार आणि tent मध्ये अंदाजे १००-१५० मी. अंतर होते. योगेश व राहुल झोपायला निघून गेल्यावर आता आम्हाला काळोख आणि शांतता जाणवू लागली होती, नको नको त्या गोष्टींची भीती वाटायला लागली होती. पटकन आम्ही तिघेही tent मध्ये शिरलो व tent secure करून झोपी गेलो. अर्ध्या तासाने पाण्याच्या डुबुक-डुबुक आवजाने डोळे अचानक उघडले. पाण्यातून कुणीतरी बाहेर चालत येतेय असा आवाज व वेळेबरोबर आवाज वाढतही होता. टांगू ही कधीच त्या आवाजाने जागा झालेला होता. सुरुवातीला पाणकोंबडी किंवा बदक रात्री काठावर जमा होत असतील असा अंदाज काढून तसेच पडून राहिलो. पण आम्हा दोघानांही आता झोप लागत नव्हती, थोडा वेळ झोपायचा प्रयत्न झाल्यावर आवाज अचानक अजूनच वाढला. आता पाणी वाढून tent च्या अगदी जवळ आल्याचा भास होत होता, कारण आधीच आमचा tent पाण्याच्या फक्त 2 ft अंतरावर होता. न राहवून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. रात्रीचे ११.३०-१२ वाजले असतील. मी एका हातात battery व एका हातात चाकू घेऊन बाहेर पडलो, बाहेर पडताच दुसऱ्या क्षणी खरं काय ते कळलं. रात्री जोराचा वारा सुटल्यामुळे पाण्याच्या लाटा किनाऱ्यावर जोरजोरात आपटत होत्या, डुबुक-डुबुक. बाहेर आल्यावर आकाशात डोळ्यांचे पारणं फेडणार दृश दिसलं, असे दृश लहानपणी आजोळी light गेल्यावर बाहेर झोपताना दिसायचं. ताऱ्यांनी आकाश गच्च भरलं होत, चंद्र अजून यायचा बाकी होता. टांगू ला हे सांगताच तो ही बाहेर आला. K2 आतमध्ये निवांत झोपला होता त्याला कशाचाही काही गंध नव्हता. टांगू आणि मी डिसेंबर च्या थंड हवेत, शेकोटी भोवती, ताऱ्यांच निरीक्षण करत, बोलत बसलो. तासाभरात K2 पण उठून बाहेर आला.

kinara

५ डिसेंबर ती रात्र न विसरणारी होती. तीन जिवलग मित्र, घरापासून कोस्सो दूर, अतिशय नवख्या ठिकाणी, chicken बिर्याणी फस्त करून, नको-नको त्या रिस्क घेऊन, थोडी भीती मनात धरून, चंदेरी प्रकाशात, शेकोटी भोवती बोलत बसले होते. त्या रात्री प्रत्येक जण गप्पांमधून आपआपलं मन हलक करत होत. K2 ला एवढ्या मनमोकळे पणाने बोलताना कधी पाहिलं नव्हत, टांगू कधीही कुणाला काही न सांगणारा त्या दिवशी बोलत होता. प्रत्येकाने आपआपलं गुपित उघडं केल होत. मित्र का असावेत याची जाणीव परत एकदा झाली. प्रवासाच्या प्रत्येक वळणावर आम्ही आमचा परम प्रिय मित्र बबन ला याद करत होतो, या क्षणी खूप जास्त. थोड्या वेळाने तिघांनी बाहेरच पाठ टेकली व आकाशाकडे पाहत गप्पा चालूच राहिल्या. मध्ये-मध्ये टांगू ताऱ्यांची ग्रीक नावं व त्यामागील गोष्ट सांगून गप्पांमधील गोडी वाढवत होता. हे सगळ चालू असतांना कारच्या दिशेने प्रखर battery चा प्रकाश देत दोन जण आमच्याकडे येतांना दिसली. पोलीस, गावातील लोक, चोर अश्या साऱ्या शंका आमच्या मनात येऊन गेल्या. आमच्याच वयाची जवळच्या एका गावातील ती मुलं धरणावर लक्ष ठेवणारी होती. आल्या-आल्या त्यांनी चौकशी चालू केली कोण, कुठले, वगैरे आणि आमच्या tent मध्ये डोकावून पाहिलं, पाण्यात battery चमकवून सारखं-सारखं पाहिलं, त्याचं समाधान झाल्यावर मग ते शेकोटी भोवती येऊन बसले. त्यांना आम्ही धरणातील कोळंबी पकडणारे वाटलो पण त्यांचा विश्वास बसल्यावर त्यांनी आम्हाला कोळंबी कशी पकडतात, कोळंबी पकडण्यावरून गावात आधी झालेला प्रकार, परिसराची माहिती हे सगळं सांगितलं. मध्येच त्यातल्या एकाने आमच्याकडे तंबाखू मागितली.., तंबाखू मागणाऱ्या भुताच्या गोष्टी मी फार ऐकल्या होत्या त्यामुळे लगेच माझे डोळे चमकले. त्यानंतर त्यांनी पार नौकरी ही मागितली आणि बऱ्याच गप्पानंतर निघून गेले. पण जातांना गडावर जायला ४-५ तास लागतात व वर पाणी ही नाही असं सांगितलं. लगेच आमची replanning चालू झाली आणि फेरविचार करून आम्ही हरिश्चंद्रगड skip करून पुढे लेण्याद्री, शिवनेरी, ओझर कडे नजर फिरवली. बघता-बघता ४ कधी वाजले कळलंच नाही, रात्र संपूच नये असं वाटत होत. पण सकाळी उशीर नको म्हणून tent मध्ये शिरलो. मला जर आयुष्यातले अप्रतिम क्षण निवडायला सांगितले तर त्यातला ही रात्र एक असेन हे नक्की. सकाळी न व्हायचं तेच झालं सगळ्यांना उठायला उशीर झाला आणि हरिश्चन्द्रगड skip प्लान वर शिक्का पडला. ७ पर्यंत सगळ्या प्रातः विधी आटपून तैयार सगळे गडी. तोच पूर्वेकडून भास्कर उगवला व सकाळची कोवळी किरण आकाशात पसरली. थंडगार सकाळ, सुंदर परिसर, अप्रतिम, दुर्मिळ, देखना सूर्योदय पाहून हात आपोआपच जोडले गेले व नकळत शब्द बाहेर पडले......
आदिदेव नमस्तुभ्यम, प्रसिद मम भास्करः |
दिवाकर नमस्तुभ्यम, प्रभाकरः नाम्स्तुते ||
सुर्वोदय

गाडीपाशी पोहताच कळलं की गाडीत बिर्याणी च्या वासाने उंदीर शिरलाय मग काय सकाळी सकाळी त्याला बाहेर काढण्याची कवायत चालू झाली, त्यांनतर अर्ध्या तासाने आम्हाला गणपती बाप्पा प्रसन्न झाले. गणपती बाप्पा म्हणून लगेच पुढचा प्रवास चालू केला, highway पर्यंत पोहचायला एक तास गेला. मध्ये एका point ला थांबून न चूकता photoshoot केला. रात्री त्या मुलांकडून कळलं होत की इथे खूप मराठी व bollywood movies ची शूटिंग होते. का नाही होणार, कुणाच्याही सहज डोळ्यात भरेल अशी ही जागा आहे. नुसती नजर पडताच जग विसरायला होत. ताजी हवा, खळखळत पाणी, रम्य परिसर मन शांत करतो.

पिंपळगाव जोग धरणाला निरोप देऊन आम्ही ९ वाजता जुन्नर गाठलं, तिथून सरळ महाराजांचं जन्मस्थान, त्या पवित्र जागेवर माथा टेकण्याचा मोह कुणाला आवरेल. १० वर्षापूर्वीचा शिवनेरी आणि आताचा बराच फरक पडलाय. शिवनेरी नेहमी शाळा, कॉलेज च्या मुलांनी गजबजलेला असतो. आम्ही किल्ला explore करून १२ वाजे पर्यंत खाली आलो आणि शिवनेरी ला मुजरा करून आम्ही पुढचा टप्पा लेण्याद्री कडे वळलो. शिवनेरी उन्हात explore करून सगळे दमले होते त्यात लेण्याद्रीच्या उन्हात तळपत्या पायऱ्या पाहून वर जाण्याची कुणाची इच्छा नव्हती. शेवटी मी आणि योगेश भाऊ सर्वांकडून एक तास मागून वर दर्शनास गेलो. आम्ही फक्त अर्ध्या तासात वर जाऊन, दर्शन घेऊन, परत खाली आलो होतो. आमचाही ही यावर विश्वास बसेना. उतरल्यावर सॉलिड भूक लागली होती, बाकीचे गडी कुठे दिसेनात त्यात संस्थानाच्या भोजनगृहाची पाटी दिसली. ११.३०-१.३० प्रसादाचा वेळ होता आणि वाजले होते १.४५. योगेश आणि मी ticket मिळतात कि नाही प्रयत्न केला आणि चक्क मिळालीही लगेच वेळ ना दवडता प्रसादालायाकडे धूम ठोकली. प्रसाद घेऊन आम्ही अष्टविनायकच्या दुसऱ्या बाप्पाच्या दर्शनास ओझरकडे कूच केली. दुसऱ्या बाप्पा चेही दर्शन पटकन झाले. त्या दिवशी लग्नतारीख असावी, लेण्याद्री आणि ओझर दोन्ही ठिकाणी लग्नाची, वऱ्हाडांची गर्दी होती. ओझर वरून नारायणगाव जायचं ठरलं. K2 आणि योगेश तेथूनच पुण्याकडे रवाना होणार होते. ४.३० वाजे पर्यंत नारायण गावात पोहचलो. त्या दोघांना नारायणगाव बसडेपो ला सोडून व सभ्य निरोप देऊन आम्हीही आलो त्याच मार्गाने परतीच्या प्रवासाला निघालो. आम्हाला रस्त्यात रात्र होणार हे नक्की होत त्यात मध्ये मी कार चालवण्याचा प्रयत्न फसला होता त्यामुळे सगळी driving राहुलाच करावी लागत होती. आम्ही भर-भर रस्ता कपात ६-६.३० पर्यंत गणेशखिंड पर्यंत पोहचलो तिथे 2-३ सेल्फी काढून, जुन्नरहून घेतलेल्या खत्री कंदी पेढ्यांची चव चाखून गाडीत बसलो. कंदी पेढ्यांची चव तोंडात विरघळत आमचा पुढचा प्रवास चालू झाला. राहुल सुसाट गाडी हाकीत होता. माळशेज मधली रात्रीची थंड-गरम हवा मनाला ताज ठेवत होती. घात उतरे पर्यंत सगळेच म्हणजे मी आणि टांगू बसून आणि राहुल गाडी चालवून पार दमलो होतो म्हणून घाट संपताच एका हॉटेल ला गाडी पार्क करून मस्त गरम चहा बिस्कीट संपवले. आता घरची ओढ लागली होती मध्ये मध्ये प्रत्येकाच्या घरून फोन येत होते त्यामुळे तोंडावर पाणी मारून लगेच गाडीत बसलो. मुरबाड-गोवेली-टिटवाळा-अम्बीवली असा प्रवास करून १०.३०-११ वाजता घरी पोहचलो. शनिवार-रविवार कसा गेला कळलंच नाही, आयुष्यभर पुरेल एवढी ताकद या दोन दिवसात होती. थकलेल्या शरीराला बेड वर आडवं करत दोन दिवसांच्या आठवणींना गोंजारत कधी डोळे लागले कळलंच नाही.

आणि आम्ही ....

https://drive.google.com/open?id=0Byvs99KhJT5aS2xQUzJFRzNBTnc

पिंपळगाव जोग धरण

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

20 Oct 2016 - 9:34 am | टवाळ कार्टा

भारी

प्रभास's picture

20 Oct 2016 - 2:25 pm | प्रभास

एकदम झकास...

विनायकपाटील८९'s picture

20 Oct 2016 - 9:37 pm | विनायकपाटील८९

धन्यवाद मित्रानो....

तेव्हढे फोटो टाकले असते तर बर झाल असत.

विनायकपाटील८९'s picture

22 Oct 2016 - 7:08 am | विनायकपाटील८९

आपल्यासाठी फोटो ची लिंक share केलीय....

विनायकपाटील८९'s picture

22 Oct 2016 - 7:04 am | विनायकपाटील८९

कृपया जाणकारांनी फोटो प्रकाशित करण्यासंबंधी मार्गदर्शन करावे ....वर माझा प्रयोग साफ फसलाय ...तरी लिंक share केलीय....

कंजूस's picture

22 Oct 2016 - 12:16 pm | कंजूस

त्या लिंकमधले thumbnail type आहेत. एकेका फोटो वर क्लिक करून मोठा दिसल्यावर शेअरिंग लिंक कॅापी करा.
तोपर्यंत

विनायकपाटील८९'s picture

23 Oct 2016 - 4:55 am | विनायकपाटील८९

खूप आभारी आहे.. धन्यवाद...

विवेकपटाईत's picture

23 Oct 2016 - 7:37 am | विवेकपटाईत

प्रवास वर्णन आवडले.

विनायकपाटील८९'s picture

26 Oct 2016 - 5:54 am | विनायकपाटील८९

धन्यवाद विवेक..