'रफाल'

पराग १२२६३'s picture
पराग १२२६३ in तंत्रजगत
1 Oct 2016 - 11:04 pm

भारत आणि फ्रान्स यांच्यात ३६ रफाल लढाऊ विमाने खरेदी करण्यासंबंधीचा तब्बल ५९,००० कोटी रुपयांचा करार झाला आहे. गेल्या २० वर्षांमध्ये भारतीय हवाईदलाला लढाऊ विमाने पुरवण्यासाठी झालेला हा सर्वांत मोठा करार. लढाऊ विमानांचा अतिशय तुटवडा भासत असलेल्या भारतीय हवाईदलाला या करारामुळे किंचित आधार मिळणार आहे.

रफाल डेल्टा विंग बहुपयोगी मध्यम पल्ल्याचे ४++ श्रेणीतील लढाऊ विमान आहे. हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत हल्ले करण्यासाठी, टेहळणीसाठी, आकाशात वर्चस्व निर्माम करण्यासाठी, जमिनीवरील आपल्या सैन्याला हवाई छत्र पुरवण्यासाठी, जहाजविरोधी, शत्रुच्या प्रदेशात दूरवर हल्ला करण्यासाठी आणि अण्वस्त्रवाहक म्हणूनही भूमिका रफाल बजावू शकते. त्यामुळे या विमानावर मोहिमेच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्रे तैनात केली जाऊ शकतात. या विमानात डायरेक्ट व्हॉईस इनपुट बसवण्यात आलेला आहे. त्याच्या मदतीने वैमानिकाला विमानाच्या यंत्रणांना (शस्त्रास्त्रे डागण्याची सोडून) तोंडी सुचना देता येतात. त्यामुळे वैमानिकावरचा भार हलका होतो. त्याचबरोबर रफालमध्ये एईएसए रडार बसवलेला असणार आहे. त्यामुळे रफाल एकावेळी आकाशातील शत्रुच्या अनेक लक्ष्यांचा वेध घेऊन त्यांच्यावर हल्ला करू शकते. ही यंत्रणा भारतीय हवाईदलाच्या विमानांमध्ये पहिल्यांदाच बसवलेली असेल.

रफालमध्ये ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा बसवलेली आहे. भारतीय हवाईदलातील इतर लढाऊ विमानांमध्ये ती सध्या बसवण्यात येत आहे. रफालबरोबर आपल्याला ती इन-बिल्ट मिळणार आहे. या यंत्रणेमुळे रफालच्या कॉकपीटमध्ये ऑक्सिजन सिलिंडर बसवण्याची आवश्यकता नाही. परिणामी रफालचा उड्डाणाचा कालावधी जास्त झालेला आहे.

रफालवर मॅजिक-२, मायका, मेटिओर ही हवेतून हवेतली लक्ष्ये भेदणारी क्षेपणास्त्रे रफालवर बसवलेली आहेत. यापैकी मेटिओर मानवी दृष्टीपलीकडचे लक्ष्य भेदू शकणारे क्षेपणास्त्र असून त्याचा पल्ला १५० कि.मी. आहे. भारत रफालबरोबर ही क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे.

प्रतिक्रिया

चांगली माहिती. पण अजून सविस्तर वाचायला आवडले असते. उदा. बीव्हीआर (बियॉण्ड व्हिज्युअल रेंज) म्हणजे काय? फोर्थ जेन फायटिंग एअरक्राफ्ट म्हणजे काय, हवेतल्या हवेत इंधन भरू शकण्याची क्षमता म्हणजे काय, विंगस्पॅन कसा आहे, बाकी अजून काय काय क्षमता, वैशिष्ट्ये आहेत, सुखोई एमके ३० पेक्षा का चांगले आहे? एफ ३५ व युरोफायटर सारख्या विमानांपेक्षा का निवडले गेले? इ. इ.

साहना's picture

2 Oct 2016 - 9:04 am | साहना

सर्व महिति इथे आहे https://en.wikipedia.org/wiki/Dassault_Rafale#Design

पराग १२२६३'s picture

2 Oct 2016 - 11:56 am | पराग १२२६३

रफालच्याच निवडीमागे दोन प्रमुख कारणे - एक - हे विमान व्यूहात्मक मोहिमांसाठी (आण्विक) वापरले जाऊ शकते. आणि दोन - भारत-फ्रान्स संबंधांचा इतिहास.
सुखोी-30 एमकेआयपेक्षा रफाल थोडे वरचढ ठरत आहे, कारण सुखोईचे आधुनिकीकरण रखडलेले आहे.

लॉर्ड व्हॉल्डमॉर्ट's picture

2 Oct 2016 - 4:58 pm | लॉर्ड व्हॉल्डमॉर्ट

अजून माहिती द्यावी हि विनंती

टर्मीनेटर's picture

3 Oct 2016 - 5:07 pm | टर्मीनेटर

छान माहिती...

विअर्ड विक्स's picture

3 Oct 2016 - 11:15 pm | विअर्ड विक्स

छान माहिती...
अजून तपशील आवडतील !

सचु कुळकर्णी's picture

4 Oct 2016 - 2:04 am | सचु कुळकर्णी

Reliance, which has virtually no experience of defence manufacturing, hopes to turn into a major defence firm over the coming years. The agreement with Dassault is a bet that Reliance can build manufacturing facilities at Nagpur to feed into Dassault's supply chain, or for future government orders of the Rafale jet.

पराग १२२६३'s picture

4 Oct 2016 - 9:38 pm | पराग १२२६३

<>
अशी स्थिती गेल्या वर्षी मोदी यांच्या रशिया दौऱ्याच्यावेळीही निर्माण होती. इकडे शिखर बैठक संपली. त्यामध्ये रशियाने भारतात हेलिकॉप्टरच्या उत्पादनाचा संयुक्त प्रकल्प उभारण्यास सहमती दर्शवली. आणि आपल्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन तातडीने जाहीर करून टाकले की, भारतात का-२२८ हेलिकॉप्टरचे उत्पादन रशिया रिलायन्सबरोबर संयुक्तपणे करणार आहे. त्या दौऱ्याच्या काहीच काळ आधी रिलायन्स-डिफेन्स ही नवी कंपनी स्थान करण्यात आली होती.त्याचे प्रतिनिधी त्या दौऱ्यात सहभागी होते हे विशेष.
मात्र पुढे रशियाने जाहीर केले की, आम्ही रिलायन्सबरोबर संयुक्त उत्पादनाला होकार दिलेला नाही, तर हिंदुस्थान एअरोनॉटिक्सबरोबरच्या सहनिर्मितीला होकार दिलेला आहे. कारण रिलायन्स-डिफेन्सला संरक्षण क्षेत्रातील काहीही अनुभव नाही आणि आम्ही आमचे दर्जेदार उत्पादन अशा नवख्या कंपनीला देऊन आमच्या उत्पादनाची विश्वासार्हता गमावणार नाही. पण रिलायन्सला जास्तीतजास्त कंत्राटे मिळवून देणे हा सध्या आपल्याकडे महत्त्वाचा उद्योग झालेला आहे.