समाजामध्ये कमी माहिती जैन समाजाबद्दल ?

निओ१'s picture
निओ१ in काथ्याकूट
3 Sep 2016 - 10:24 pm
गाभा: 

आपल्या समाजामध्ये जैन समाजाबद्दल खूप कमी माहिती आहे का ?

दिगंबर जैन का आहेत?
त्याची गरज का आहे?
ते दिगंबर का आहेत ?

जर आपल्याला एका धर्माबद्दल माहिती नसेल तर आपण आपले मत व्यक्त करताना थोडी माहिती का शोधू नये?
काही लोकांनी "ते नागडे" इत्यादी प्रकारे उपहास केला आहे. त्याना धर्माची माहिती घेणे गरजेचे आहे असे का वाटत नाही?

जैन धर्म मधील प्रत्येक व्यक्ती हिंदू-जैन असे लिहितो, तुम्हीच जर असे लिहले किंवा विरोध केला तर त्याचा परिणाम काय होइल याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. जैन हे आधी हिंदू आहेत मग ते जैन आहेत पण असे दिसू लागले आहे की हिंदू जैन समाजाला आपले समजत नाही आहे.

खूप वाईट वाटले म्हणून लिहिले.

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

7 Sep 2016 - 9:19 pm | संदीप डांगे

अहो निओ1 साहेब, कुठे आहात?? छान चर्चा झाली असती राव! असो!

जाहीर माफीनामा:
माझ्या वक्तव्याने कळत नकळत जैन बांधवांच्या भावना दुखावल्या असल्यास मनापासून माफी मागतो, संबंधित विधान हे कोणत्याही प्रकारे जैन धर्म, जैन साधू, जैन धर्मीय यांचा थेट वा अपरोक्ष अपमान करावा, खिल्ली उडवावी, उपहास करावा या अर्थी योजले नव्हते, ते कशासाठी होते याबद्दल वरच्या काही प्रतिसादांमध्ये स्पष्ट केले आहे. मी काही शार्ली हेब्दो प्रमाणे विचार करत नाही, त्यामुळे गैरसमज नसावा,

संदीप डांगे's picture

7 Sep 2016 - 9:24 pm | संदीप डांगे

प्रतिसाद पुढे:
असे असले तरी कोणत्याही धर्मियांनी धार्मिक कारणास्तव भावना दुखावल्याची तक्रार करणे चुकीचे आहे ह्या माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे व राहणार!

धन्यवाद!

निओ1 साहेब, माझ्यातर्फे चर्चा अजून खुली आहे, आपले समाधान होईस्तोवर मी बोलेन तुमच्याशी.

काही प्रतिसाद वाचुन माझा यातील रस निघुन गेला आहे. ज्याना आपल्या बान्धवा बाबत माहिति नाहि तेथे मी अजुन काय वेगले सान्गनार आहे ?

असे असले तरी कोणत्याही धर्मियांनी धार्मिक कारणास्तव भावना दुखावल्याची तक्रार करणे चुकीचे आहे ह्या माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे व राहणार! - संदीप डांगे

जग एकाच वजनाने मोजने म्हन्जे हेच का ?
जर माहिति नाहि तर माहिति नेत वर आहे ना?

श्रीगुरुजी's picture

10 Sep 2016 - 12:01 am | श्रीगुरुजी

बाकीचे जाऊ देत. दिगंबर राहिल्याने मोक्ष मिळण्यास व पारमार्थिक प्रगती होण्यास कशी मदत होते या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळाले नाही. तेवढे फक्त सांगा.

संदीप डांगे,

धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करणे चुकीचे नाही. सनदशीर मार्गाने निषेध नोंदवणे चुकीचे नाही. किंबहुना हिंदू (तसेच जैन, बौद्ध,, इत्यादि) लोकं आपल्या धार्मिक भावनांबाबत जागृत होताहेत ही जमेची बाजू आहे.

आ.न.,
-गा.पै.

निओ१'s picture

9 Sep 2016 - 11:42 pm | निओ१

मला वातले होते कि हे मरथि विकि आहे. पन हे तसे नाहि आहे.

मनोजकुमार's picture

10 Sep 2016 - 8:12 pm | मनोजकुमार

One of the main vows of jain is - Aparigraha: Aparigraha means non-possessiveness. This includes non-materialism and non-attachment to objects, places and people. Jain monks and nuns completely renounce property and social relations.

Monks and nuns are obligated to practice the five cardinal principles of nonviolence, truthfulness, not stealing, celibacy, and non-possessiveness very strictly, while laymen are encouraged to observe them within their current practical limitations.

Digambara monks follow 28 vratas (vows): five mahāvratas (Great Vows); five samitis (regulations); the five-fold control of the senses (pañcendriya nirodha); six Şadāvaśyakas (essential duties), and seven niyamas (restrictions), Renouncing clothing is one of them.

In Jainism, two kinds of rules of conduct are prescribed for those who wish to attain moksha (liberations). One for those who wish to become an ascetic and another for the householders.

Moksha :

Right belief, right knowledge and right conduct are called Ratnatraya or the three jewels in Jaina works. In this respect Jainism has clearly laid down that with a view to attaining liberation all the three must be simultaneously pursued. Jainism has based its distinctive ethical code for its followers - both householders and monks.

The Digamber Jain sect believes that women cannot achieve liberation without being reborn as men first. The Swetambar sect disagrees. The reason being a woman's nature is to care for children and other dependents, she will find it much more difficult to break free from these earthly attachments, and unless she does this, she cannot achieve liberation.

https://en.wikipedia.org/wiki/Digambara_monk
https://en.wikipedia.org/wiki/Jain_monasticism
http://www.jainworld.com/jainbooks/ahimsa/mokshamarga.htm
http://www.jainbelief.com/PPOJ/19.htm
https://www.quora.com/Why-do-Digamber-Jains-believe-that-a-woman-cannot-...

श्रीगुरुजी's picture

11 Sep 2016 - 8:16 pm | श्रीगुरुजी

The Digamber Jain sect believes that women cannot achieve liberation without being reborn as men first.

काहीतरीच. अजिबात मान्य नाही.

The reason being a woman's nature is to care for children and other dependents, she will find it much more difficult to break free from these earthly attachments, and unless she does this, she cannot achieve liberation.

पुरूषाला कुटुंबाप्रती, मुलांप्रती व इतरांप्रती जबाबदारी किंवा अ‍ॅटॅचमेंट नसते का? ही जबाबदारी व अ‍ॅटॅचमेंट फक्त स्त्रियांमध्येच असते का? हे लॉजिक पूर्णपणे गंडलेलं आहे.

रुस्तम's picture

12 Sep 2016 - 12:19 am | रुस्तम

सहमत

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2016 - 2:50 pm | श्रीगुरुजी

नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली. लक्ष्मीकांत व मनीषा सम्दारिया या हैद्राबादमधील जैन दांपत्याची १३ वर्षीय मुलगी आराधना तब्बल ६८ दिवसांच्या धार्मिक उपवासामुळे मृत्युमुखी पडली. पोलिसांनी या दांपत्याविरूद्ध मुलीच्या मृत्युला कारणीभूत झाल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला आहे व मुलीचे आईवडील अटक टाळण्यासाठी लपून राहिले आहेत. मुलीच्या व पालकांच्या समर्थनार्थ अनेक जैन मंडळी पुढे आले असून त्यांच्या मते मुक्ती मिळविण्यासाठी ज्या नऊ पायर्‍या सांगितल्या आहेत त्यातील हा उपवास म्हणजे पहिली पायरी होती. आराधनाने गतवर्षी तब्बल ३४ दिवस फक्त पाणी पिऊन उपवास केला होता व त्यातून ती वाचली होती. परंतु या वर्षी तब्बल ६८ दिवसांच्या उपवास तिला झेपला नाही व त्यातच तिचे निधन झाले.

http://www.hindustantimes.com/india-news/focus-on-jain-ritual-tapasya-af...

"आमच्या धार्मिक कृत्यात अजिबात हस्तक्षेप करू नका" असा इशारा काही धार्मिक जैन मुनींनी मुलीच्या मृत्युविरूद्ध आक्षेप घेणार्‍यांना व त्यासाठी तिच्या पालकांना जबाबदार धरणार्‍यांना दिला आहे.

http://www.hindustantimes.com/india-news/don-t-interfere-jain-leaders-te...

भारत बनाना रिपब्लिक आहे. तीनवेळा तोंडाने तलाक म्हणून घटस्फोट देण्याच्या आमच्या धार्मिक कृत्यात हस्तक्षेप करू नका असे मुस्लिम सांगतात तर अन्नपाणी तोडून धार्मिक उपवास करून प्राण गेला तरी आमच्या धार्मिक चालिरितींवर आक्षेप घेऊ नका असे जैन मुनी बजावत आहेत. विवस्त्रावस्थेत समाजात वावरणार्‍या जैन मुनींना आक्षेप घेतला तरी लगेच धार्मिक स्वातंत्र्य व चालिरितींची ढाल पुढे केली जाते. सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतरांना उघड शस्त्र बाळगायला बंदी असली तरी कृपाण घेऊन वावरणार्‍या शिखांना आपला तो धार्मिक हक्क वाटतो.

आणि दुर्दैवाने कोणतेही सरकार याविरूद्ध काहीही करू शकत नाही.

सखेद सहमत.. धार्मीक ठिकाणी चेंगराचेंगरीच्या तसेच मागच्या वर्षी केरळमधील कोल्लममध्ये घडली तसे जळीतकांड आदी घटनांमध्ये हजारो म्रुत्यूमुखी पडल्यावरसुद्धा कसलीही कारवाई होत नाही.. धर्म ही कायद्याच्या वर असणारी गोष्ट आहे हे सर्वमान्य झाले आहे..

बाळ सप्रे's picture

13 Oct 2016 - 3:38 pm | बाळ सप्रे

निर्लज्जपणाचा कहर म्हणजे मृतदेहाची रथातून मिरवणूक काढली गेली.

अरे त्यापेक्षा जब्बरस्त घटना सांगलीत १० वर्षापूर्वी घडली होती. सांगलीत एका व्रतासाठी आलेल्या जैन साध्वी मधील एक रातोरात गायब झाली. ती ज्या मच्छरदाणीत झोपली होती तिथे फक्त एक राखेचा ढिग होता. त्यावर प्रचंड चर्चा झाली. ती तरुण आणि नवीन दिक्षा घेतलेली मुलगी होती, तिला साध्वी, संत घोषित केले गेले. बर्‍याच चर्चानंतर पोलिसांनी त्या राखेची तपासणी, जैन स्थानकाची तपासणी वगैरे केली. बर्‍याच शोधानंतर ती मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली असे निष्पन्न झाले.
हे अल्पवयीन मुलांवर अशा प्रकारची धार्मिक व्यवहारांची/संस्कारांची पालकांकडून, शिक्षणसंस्थाकडून वा धार्मिक प्रतिष्ठितांकडून केली जाणारी सक्ती हा चिंतेचा विषय आहे खरा.

अरे त्यापेक्षा जब्बरस्त घटना सांगलीत १० वर्षापूर्वी घडली होती. सांगलीत एका व्रतासाठी आलेल्या जैन साध्वी मधील एक रातोरात गायब झाली. ती ज्या मच्छरदाणीत झोपली होती तिथे फक्त एक राखेचा ढिग होता. त्यावर प्रचंड चर्चा झाली. ती तरुण आणि नवीन दिक्षा घेतलेली मुलगी होती, तिला साध्वी, संत घोषित केले गेले. बर्‍याच चर्चानंतर पोलिसांनी त्या राखेची तपासणी, जैन स्थानकाची तपासणी वगैरे केली. बर्‍याच शोधानंतर ती मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली असे निष्पन्न झाले.

हैला! याची काही बातमी / कव्हरेज वगैरे आहे का? बेस्ट किस्सा आहे!

अभ्या..'s picture

13 Oct 2016 - 4:29 pm | अभ्या..

Pradip Kumar Maitra, None, Nagpur| Updated: Oct 28, 2006 19:46 IST
The former Jain Sadhvi Riddhishree, who was in the news for her disappearance from a Jain ashram at Amravati last fortnight, has finally tied the nuptial with her boyfriend, Rajnikant Talwar at Sangli.

The 21-year old Jain Sadhvi, who cooked up a story of self-death in connivance with her beau, Rajnikant, who used to work her helper (Sevak) since 2004, was later arrested by the Amravati police at Sangli last week.

According to reports reaching here on Saturday, the Jain Sadhvi, whose real name is Samata Chhabia, entered a marriage life after a simple ceremonial function at one Dutta Mandir in Sangli on Thursday. A few friends and relatives, including Suman Talwar, the mother of Rajnikant and his sister, Rupali were present at the marriage ceremony. His father, Suryakant, an engineer with the Irrigation department, however, did not attend the function.

Riddhishri was originally from Rajastan, became a Sadhvi at tender age of 14. While staying at Jain ashram, she was in close contact with Rajnikant, her helper that later developed a serious love affairs. Both had decided to run away from the ashram and that's why they concocted a story of "miracle."

It all began on October 15, when the Sadhvi's disappearance came to light. It was claimed that she has turned herself into ashes. Both the lover-birds spread the ash on the bed of Sadhvi resembling shape of a human body and ran way to Sangli. Devotees believed that she had burnt herself through occult power. Her sudden disappearance was also described as a miracle by some disciples of Jain community. Thousands of devotees reached the spot. However, the episode raised several doubts and it was suspected that she ran away. It was also suspected that the drama of `miracle' was staged for her love.

When the police brought Sadhvi back to Amravati from Sangli, she candidly admitted that she had an affair with Rajnikant and wanted to lead a normal life, along with her beau.

The district police arrested both, Sadhvi and Rajnikant, and his mother, Suman for conspiracy and playing with religious sentiments of people. They were later released on bail.

Though, Rajnikant and Samata were not available for comments, they have told the police that they would not go anywhere at moment for honeymoon as they have to report the Rajapeth Police station at least twice in a month to help the investigation, a police officer of the district control room informed.

Similar situation was witnessed among the people in the Jain community when a young Sadhvi, Induprabha ran way with a milkman at Indore in Madhya Pradesh, about two decades back.
,...............
aata tya priyakarache naav Rajinikanth mag Kay impossible???

माताय एका पिक्चरची कथा होईल.

आदूबाळ's picture

13 Oct 2016 - 6:58 pm | आदूबाळ

सहमत आहे! जबरदस्त कथा!

अरे त्या काळात मी सांगलीत होतो. दै. पुढारीने तर पार संध्यानंद स्टाइलने कव्हर केलेली न्युज. सुरुवातीला तर साध्वीचे योगाभ्यासाने आत्मदहन करुन प्राणार्पण अशी न्युज होती. मच्छरदाणी आणि राखेचे फोटो पण होते. त्याचा ढिगारा टाइप आकार बघूनच आमच्या डोसक्यातील चिल्लर शेरलॉक जागा झालेला पण वातावरण बरेच गंभीर होते. नंतर एकेक खुलासे येऊ लागले. रजनीआण्णाच्या येन्ट्रीने बातमीचे रंगरुपच बदलले. टोटल ब्लास्टनंतर आम्ही डीटेक्टिव्हाचा व्यवसाय का केला नाही याचा पश्चाताप जाहला.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Oct 2016 - 7:26 pm | कैलासवासी सोन्याबापु

अबे अभ्याव, साध्वी न जळायची ती शक्कल लढवली अमरावतीत, मला आधीच वाटले होते ती हिच केस असावी असे पण तू सांगलीत घडली म्हणालास म्हणून म्हणले वेगळी असेल केस. अमरावतीत पार धुरळा झाला होता केसचा ह्या. बाकी राजापेठ पोलीस स्टेशन (बातमीत उल्लेखलेले) अन आमचे फार फार जुने ऋणानुबंध आहेत, ते नंतर कधीतरी ;)

सांगलीत क्लायम्याक्स घडलेला कहाणीचा. दै. पुढारीने कव्हर केलेली न्युज सुरुवातीपासून पूर्णपणे. सांगलीतील एका मोठ्या बिझ्नेस फॅमिलीचा काही संबंध होता. (त्या कार्यक्रमात अथवा त्या पात्रांशी) एवढे शुअर आठवते.

मास्टरमाईन्ड's picture

12 Dec 2016 - 7:48 pm | मास्टरमाईन्ड

मी पण वाचल्यात त्या बातम्या.

पुंबा's picture

14 Oct 2016 - 11:45 am | पुंबा

The district police arrested both, Sadhvi and Rajnikant, and his mother, Suman for conspiracy and playing with religious sentiments of people.

काय फालतूपणा आहे? काय संबंध?

बातमीतल्या त्याच वाक्याचे मला सर्वात जास्त हसू आले.

नाखु's picture

14 Oct 2016 - 12:33 pm | नाखु

एक सिनेमा होईल भारी आणि हिरवीण (भुतासाठी) लै तय्यार हैत.

आता कुठे गेले ते अंधश्रद्धा निर्मुलन वाले? हिंदूंच्या त्या अंधश्रद्धा मग हे काय आहे? मागे बकर्‍या कापायच्या विरोधातही तसंच बोटचेपं व्याख्यान झालं.

थोडक्यात काय जिथे अंगलट येऊ शकतं तिथे अंधश्रद्धा वैगरे बासनात गुंडाळून ठेवायचं आणि जिथे अरेरावी करता येते तिथे बोंब ठोकायची.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Oct 2016 - 3:59 pm | कैलासवासी सोन्याबापु

असल्या बाबीत व्हॉटअबाऊटरीने काही खास साधेल असे वाटत नाही, उलट तथाकथित लिबरल लोकांना ही व्हॉटअबाऊटरी कोलीत म्हणून वापरता येईल अशीच भीती वाटते. असो.

विशुमित's picture

13 Oct 2016 - 4:18 pm | विशुमित

दुर्दैवी घटना...
विचारांशी सहमत..!!

बरोबर, चूक ही चूकच असते. धर्माम्द फक्त जैन धर्मात आहेत का?
येथे लिस्ट द्यावी असे झाले तर १० पेज कमी पडतील. मागे म्हणालो तसे की एकच विचार डोक्यात घेऊन ढ्ग पाहिले तर हत्ती पण दिसतो, मोर पण आणी घोडा पण.

गामा पैलवान's picture

13 Oct 2016 - 8:28 pm | गामा पैलवान

च्यायला, हे बरंय. मालमत्तेसाठी बाई जाळायची आणि सती गेली म्हणून हिंदू धर्माविरोधात बोंब ठोकायची. पैसा मिळावा म्हणून पोरीला उपास करायला लावायचे आणि भुकेने तडफडून (वा न तडफडता) मेली की झोकात अंत्ययात्रा काढायची. आराधनेच्या आईबापांना धर्म हा आत्मोन्नतीसाठी आहे याचा विसर पडलेला दिसतो.

-गा.पै.

chitraa's picture

16 Oct 2016 - 10:20 pm | chitraa

आ. न. लिहायचे राहिले.

नम्र नसला की माणूस आपला वाटत नाही. म्हणून आ. न.

माझीही शॅम्पेन's picture

14 Oct 2016 - 2:14 pm | माझीही शॅम्पेन

अतिशय वाईट बातमी .. ही बातमी वाचून प्रचंड संताप आणि डोक्याला शॉट लागला होता , कसले स्वार्थी असतात लोक , आणि त्यांची धर्माच्या आड भलामण करणारे तर अट्टल गुन्हेगार !!