मला पडलेला प्रश्न ०२

महेश शिपेकर's picture
महेश शिपेकर in जनातलं, मनातलं
3 Sep 2016 - 2:35 pm

शहर कोणतेही असो

१) कोणताही सामाजिक उपक्रम हा त्या भागातील मंडळे सादर करतात
२) कोणतेही जन आंदोलन करताना तिथली जनता करते

खरेच जर हे सामाजिक कार्य असेल तर दरवेळी सरकारला किंवा सरकारी अधिकारी अथवा जन प्रतिनिधीना जबाबदार न धरता जनतेलाच का वेठिस धरले जाते

उदाहरणार्थ :-
१) रस्ता रोको, चक्का जाम, सार्वजनिक वाहतूकिच्या साधनांची मोडतोड
२) (आधी ठराविक ) आता सगळ्याच सण उत्सव, यात्रा, जत्रा यावेळी लावले जाणारे कर्णकर्कश्य त्रासदायक साउंड सीस्टिम

टिप:- नागरिकांना याचा खरेच त्रास होतो तर ते आपल्या मुलांचे या बद्दल प्रबोधन का नाही करत
कारण ते उपक्रम राबवणारे तसेच दगडफेक तोडफोडीत डांबले जाणारे कार्यकर्ते हेच तरुण असतात

समाजप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

3 Sep 2016 - 4:45 pm | संदीप डांगे

सगळी उत्तरं आयती पाहिज्जे?

तुमचे सगळे प्रश्न इथे विचारा नाहीतर एकच नविन धागा काढा.

चाणक्य's picture

3 Sep 2016 - 7:22 pm | चाणक्य

का ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2016 - 8:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

कारण, जनतेला चांगले काम करणार्‍या नेत्यापेक्षा उपद्रवमुल्य असणार्‍या नेत्याचे जास्त कौतूक असते, त्यामुळे.

जनतेने बदलावे, मगच नेते बदलतील.

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 Sep 2016 - 9:25 pm | कैलासवासी सोन्याबापु

फ्रेम करून प्रत्येक "सरकार अन व्यवस्थेला" शिव्या देणाऱ्या नागरिक अन न देणाऱ्याही नागरिकांच्या घरात लावावे असे वाक्य!! कुर्निसात करतो ह्या वाक्यांना मी!

नाय वो काका.. कौतुक करणार्‍यांपेक्षा जास्त लोकांना ते सगळे नाटक पसंत नसते. फक्त पसंत न पडणार्‍यांची एकजुट नसते आणि ते बोलून दाखवत नाहीत. (संख्येने जास्त असूनही कौतुक करणार्‍यांपेक्षा यांचे उपद्रवमूल्य कमी असते)

जनतेने बदलावे, मगच नेते बदलतील. हे सार्वकालीन सत्य आहे.