मला पडलेला प्रश्न

महेश शिपेकर's picture
महेश शिपेकर in जनातलं, मनातलं
2 Sep 2016 - 10:55 am

रोजच्या जीवनात मला पडणारे प्रश्न

शहर कोणतेही असो
निवडणुका आल्यावर प्रत्येक रस्त्याच्या सुरूवातीला व शेवटी सदरचा रस्ता कोणत्या आमदार / खासदार वा नगरसेवकाच्या कुठल्या निधीतून झाला किती खर्च झाला
ठेकेदार कोण होते
असे भपकेदार पोस्टर / बँनर झळकत असतात

पण जेव्हा

त्याच रस्त्यावर खड्ड्याचां भुलभुल्लैया होतो
नागरिकांच्या मनक्यांचा शाँक अबझाँरव्हर होतो
वाहनांचा खुळखुळा आणि शरीराचा भुगा होतो

तेव्हा हे
आमदार खासदार ठेकेदार इतकेच काय त्या रस्त्याच्या कामाची जबाबदारी असणाऱ्या कर्मचारी/अधिकारी व ठेकेदाराचे पेमेंट करणारे आँडिटरची नावे कधीच कुणालाच कळत नाहीत

टिप:- नागरिक ही ती शोधत नाहीत

असं का????

समाजप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

2 Sep 2016 - 8:25 pm | ज्योति अळवणी

या बॅनरबाजी मुळे किती फरक पडतो मतदारांना? आपापल्या विभागातील मतदान आपण आपल्या फुटपट्टीने मोजूनच करतो न? मुळात आपण कितीजण खरच प्रत्येकवेळी मतदान करतो? असे का???

खटपट्या's picture

2 Sep 2016 - 8:37 pm | खटपट्या

रोजच्या जीवनात मला पडणारे प्रश्न

पण एकच प्रश्न आला. बरेच आहेत की. सगळे येउद्या...

टाइम खराब आलाय हो. बाकी काही नाही.
आता काय सांगायचे तुम्हाला. गेल्या वर्षी अशेच २० बॅनर करुन दिले. निम्मे अ‍ॅडव्हान्स दिले. निम्मे अजून येताहेत. रस्ता उखडून आता नवीन रस्त्याच्या निविदा निघाल्या. अजून बॅनराचे बिल देत नाहीत हे भोसडीचे, आता वरुनच आले नाही म्हणतेत. पक्षनिधी बिधी उरकून राह्यलेल्यात ठेकेदाराला काय देणारेत? त्यो तरी काय करणार हो बिचारा. पार्ट्या बिर्ट्या चारुन, चार बाटल्या सारुन मिळालेल्या पैशाइतके डांबर ओतणार. निम्म्या मजुरीचे लेबर तरी काय काय करणार? पाट्याच टाकणार किनै? कशाला राहतोय रस्ता वर्षभर?
मी पन यंदा तशेच केले. दहा बॅनरचे फोटो पाठवले. लावले सहाच. हाय कनाय मज्जा. द्या टाळी.

पिलीयन रायडर's picture

3 Sep 2016 - 12:11 am | पिलीयन रायडर

मी पन यंदा तशेच केले. दहा बॅनरचे फोटो पाठवले. लावले सहाच. हाय कनाय मज्जा. द्या टाळी

=))

घ्या टाळी!

एक नंबर प्रतिसाद. टाळी घ्या आमच्याकडूनही.