खरडफळ्याचे संपादन अधिकार....

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
25 Sep 2008 - 1:48 pm
गाभा: 

राम राम मिपाकर सभ्य स्त्रीपुरुषहो,

आम्हाला कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की मिपा कार्यकारिणी समितीचे सर्व सभासद, आणि

आनंदयात्री
जैनांचं कार्ट,
१_६ विक्षिप्त अदिती

या तिघांना खास करून खरडायच्या फळ्याच्या संपादनाचे सर्व अधिकार बहाल करण्यात येत आहेत. खरडफळ्यावर कुठली खरड रहावी, कुठली राहू नये, माफक टिंगलटवाळी, चेष्टामस्करी ही माफकच राहील, तिची कुस्करी होणार नाही, इत्यादी काळजी वरील तीन सभासदांनी घ्यायची आहे अशी आमची त्यांना जाहीर विनंती आहे....

आम्ही काही एका विश्वासाने या मंडळींवर हे काम सोपवत आहोत आणि ही मंडळी हे काम जबाबदारीने पार पाडतील अशी आम्हाला खात्री आहे! मिपाचा खरडफळा हा एक सर्वांगसुंदर कट्टा होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे...

सांभाळा आता खरडफळा! :)

तूर्तास तरी वरील तीन मंडळींवरच ही जबाबदारी सोपवण्यात येत आहे. गरज वाटल्यास अन्यही काही सभासदांना सदर अधिकार देण्याचा आमचा विचार आहे..

काही कारणांनी वरील तीन मंडळींपैकी कुणाला ही जबाबदारी स्विकारणे मंजूर नसल्यास तसेही अगदी अवश्य कळवावे, ही विनंती...!

गेले दोन दिवस मिपाच्या खरडफळ्यासंबंधी बराच धुराळा उडाला त्या दृष्टीने खरडफळ्याच्या बाबतीत आम्ही हे पुढचे पाऊल टाकत आहोत...

कृपया सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती...

आपलाच,
तात्या.

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Sep 2008 - 2:07 pm | बिपिन कार्यकर्ते

नविन संपादकांचे अभिनंदन.... :)

सखाराम_गटणे™'s picture

25 Sep 2008 - 2:09 pm | सखाराम_गटणे™

तिघांचे अभिनंदन

>>कृपया सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती...
नक्कीच

-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Sep 2008 - 2:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पंचाईतच केलीत, टवाळखोरांनाच सांगितलं लक्ष द्या जरा कोणी मस्करीची कुस्करी बनवत नाही आहे ना!
मी जमेल तेवढी मदत करेनच, धन्यवाद वगैरे फॉरमॅलिटी मला आवडत नाही, त्यामुळे विश्वास दाखवल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद म्हणणार नाही! :-)

अदिती

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Sep 2008 - 2:14 pm | बिपिन कार्यकर्ते

यालाच .....

चोराच्या हाती जामदारखान्याच्या किल्ल्या असे म्हणतात का? ;)

बिपिन.

अवलिया's picture

25 Sep 2008 - 2:31 pm | अवलिया

अगदी बरोबर बोललात बिपीन भौ

चोराच्या हाती जामदारखान्याच्या किल्ल्या असे म्हणतात का?
जुन्या काळी रामोशी मंडळीनाच वाड्याची राखण करण्यासाठी पाचारण केले जायचे.
तात्या तुमची निवड अचूक आहे

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

झकासराव's picture

25 Sep 2008 - 6:48 pm | झकासराव
विसोबा खेचर's picture

25 Sep 2008 - 6:50 pm | विसोबा खेचर

कृपया प्रत्येकच ठिकाणी विषयांतर नको अशी कळकळीची विनंती....

शेखर's picture

25 Sep 2008 - 2:12 pm | शेखर

तिघांचे अभिनंदन.
शेखर

जैनाचं कार्ट's picture

25 Sep 2008 - 2:13 pm | जैनाचं कार्ट (not verified)


खरडफळा संपादक होणात सध्या मला रुची नाही आहे, व्यक्तीगत कारण आहे त्यामुळे माझे नाव त्यातून वगळावे !

समक्ष्व !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

विसोबा खेचर's picture

25 Sep 2008 - 2:24 pm | विसोबा खेचर

माझ्या मते फालतु आयडी धारकांमुळे खफचा चार्म निघून गेला व मी खफवर वावरणे बंद केले !
काही लोकांच्या फालतु वागण्यामुळेच चांगल्या लोकांचा वावर तेथे कमी झाला !

ही आपल्याच काही प्रतिसादातील वाक्य आहेत! संपादक या नात्याने आपण फालतू आयडी धारकांच्या खरडा सरळ उडवून लावू शकता/फालतू लोकांच्या वागणुकीला लगाम घालू शकता म्हणून आपल्याला अधिकार दिले होते!

आता अधिकार दिले आहेत तर आपण व्यक्तिगत कारण सांगून यातनं अंग काढून घेता याला काय म्हणावे?

बोलणं खूप सोप्पं असतं हेच खरं! :)

असो, तरीही आम्ही आपली व्यक्तिगत अडचण लक्षात घेतो व आपल्या इच्छेचा आदर करतो...!

तात्या.

जैनाचं कार्ट's picture

25 Sep 2008 - 2:27 pm | जैनाचं कार्ट (not verified)

व्यक्तिगत कारण सांगून यातनं अंग काढून घेता याला काय म्हणावे?

अगं काढून घेत नाही आहे अभ्यंकर साहेब, उद्या माझ्या काही कार्याने काही गडबड झाली तर ? हा विचार करत होतो पण माझा एक मित्र मला ही जबाबदारी घेच म्हणत आहे म्हणुन मी देखील समर्थ पणे ही जबाबदारी पेलण्यास तयार आहे !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

विसोबा खेचर's picture

25 Sep 2008 - 2:30 pm | विसोबा खेचर

धन्यवाद...!

एका विश्वासाने आपल्यावर ही जबाबदारी सोपवली होती त्याचे सार्थक कराल अशी खात्री आहे! :)

तात्या.

जैनाचं कार्ट's picture

25 Sep 2008 - 2:32 pm | जैनाचं कार्ट (not verified)

जरुर !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2008 - 2:16 pm | प्रभाकर पेठकर

श्री. विसोबा खेचर (मालक)

आणि

आनंदयात्री
जैनांचं कार्ट
१_६ विक्षिप्त अदिती
(मान्यवर संपादक मंडळ)

-: हार्दिक अभिनंदन :-

अवलिया's picture

25 Sep 2008 - 2:33 pm | अवलिया

पुर्णपणे सहमत

आनंदयात्री's picture

25 Sep 2008 - 2:42 pm | आनंदयात्री

खरडफळ्याचा का होईना पण संपादक म्हणुन काम करण्यासाठी मी कितपत मॅच्युअर वागु शकेल याबद्दल विचार करतोय :?
दुरध्वनीवर खुलाशेवार बोलीनच.
दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभारी आहे :)

आपलाच

लिंबुटिंबु संपादक

प्रा. डॉ. आंद्या बिरुटे
(मराठवाडा जोरात आहे राव)

ब्रिटिश टिंग्या's picture

25 Sep 2008 - 2:45 pm | ब्रिटिश टिंग्या

आमच्या तीनही मित्र-मैत्रीणींचे अभिनंदन!
खरडफळा पुर्वीसारखा जोमात सुरु होईल हीच अपेक्षा!

- टिंग्या

इनोबा म्हणे's picture

25 Sep 2008 - 4:42 pm | इनोबा म्हणे

हेच म्हणतो

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

धमाल मुलगा's picture

25 Sep 2008 - 5:12 pm | धमाल मुलगा

असेच म्हणतो.

हाबिणंदण खफ-संपादक मंडळ :)

छोटा डॉन's picture

25 Sep 2008 - 5:17 pm | छोटा डॉन

**** अभिणंदण ***

आता होऊ द्या दणादण !

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ's picture

25 Sep 2008 - 6:40 pm | विजुभाऊ

मी पण असेच म्हणतो.

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Sep 2008 - 6:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरडफळा संपादक मित्राचे अभिनंदन !!!

मराठवाडा जोरात आहे राव
सही रे !!! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मेघना भुस्कुटे's picture

25 Sep 2008 - 2:50 pm | मेघना भुस्कुटे

नव्या संपादकांचं अभिनंदन! ही खाशी युक्ती शोधून काढलीत तात्या... ;)

झकासराव's picture

25 Sep 2008 - 5:01 pm | झकासराव

हुर्रे!!!!!!!!!!!!!!!
आमचा खफ नीट चालणार आता.
तात्या शेठ तुम्हाला अजुन एक जयश्रीची मिसळ माझ्यातर्फे देणार. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

ऋषिकेश's picture

25 Sep 2008 - 5:17 pm | ऋषिकेश

तिघाही 'मॉनिटरांचे ' ;) अभिनंदन

- ऋषिकेश

घाटावरचे भट's picture

25 Sep 2008 - 5:25 pm | घाटावरचे भट

खफसंमं (ख.फ. संपादक मंडळ) आणि तात्या यांचे हार्दिक अभिनंदन!!!!

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

बिन्धास्त बबनी's picture

25 Sep 2008 - 5:29 pm | बिन्धास्त बबनी

ख.फ.संपादकमंडळाचे अभिनंदन !

मुक्तसुनीत's picture

25 Sep 2008 - 5:47 pm | मुक्तसुनीत

या निमित्ताने मिपा च्या "यूथ विंग" मधल्या वासरात शिंगे मोडून जाईन म्हणतो ;-)

मेघना भुस्कुटे's picture

25 Sep 2008 - 5:49 pm | मेघना भुस्कुटे

यावं, यावं, आपलं स्वागत आहे... :)

विसोबा खेचर's picture

25 Sep 2008 - 5:57 pm | विसोबा खेचर

मुक्तराव,

आपल्याला मिपाच्या संपादक मंडळात घ्यायचा आम्ही सिरियसली विचार करतो आहोत...

लिखाळगुरुजींनाही प्रमोशन ड्यू आहे! ३३टक्के स्त्री आरक्षणाअंतर्गत चित्रा आणि प्राजूच्या नावाचाही विचार सुरू आहे... :)

आणि नंदनला "समस्त संपादक मंडळाचा इन्चार्ज" हे पद मासळीच्या तीन जेवणांची लाच घेऊन द्यायचा विचार सुरू आहे. :)

बघुया, या संदर्भात दिवाळीच्या सुमारास काही घोषणा करण्याचा विचार सुरू आहे!

आम्ही स्वत: अवगुणी आणि अत्यंत बेशिस्त असल्यामुळे आम्हाला मिपाकरता एक से एक गुणी माणसांची नितांत आवश्यकता आहे! :)

आपला,
(भर आणिबाणीतही लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणारा!)
आणिबाणीचा शासनकर्ता - तात्या.

रेवती's picture

25 Sep 2008 - 7:20 pm | रेवती

मी एकदाच ख.फळ्यावर गेले व तिथले प्रकार बघून पळून आले. आता बरं वाटतयं.
तात्यांनी उचललेले पाउल स्वागतार्ह!
समस्त नव्या संपादकांचे अभिनंदन!

रेवती

शितल's picture

25 Sep 2008 - 7:25 pm | शितल

आनंदयात्री, राजे आणि आदिती या तिघांचे ही जोरदार स्वागत :)

चतुरंग's picture

25 Sep 2008 - 7:37 pm | चतुरंग

"सुधारणा हव्या आहेत म्हणताय? मग घ्या अधिकार आणि करा सुधारणा!" एकदम बेष्ट धोरण!
नवीन खरडफळा संपादकांचे अभिनंदन!

(खुद के साथ बातां : आता संपादकमंडळीच एकमेकांच्या खरडी खोडून काढणार की काय? :P रंग्या, काड्या केल्याच पाहिजेत का? चूप बस! :B)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

25 Sep 2008 - 10:26 pm | विसोबा खेचर

"सुधारणा हव्या आहेत म्हणताय? मग घ्या अधिकार आणि करा सुधारणा!" एकदम बेष्ट धोरण!

जब्बारच्या सिंहासन चित्रपटातला एक प्रसंग -

मुख्यमंत्री : डिकास्टा, मी तुला एक ऑफर देतो.

डिकास्टा : कोणती?

मुख्यमंत्री : मी तुला कामगारमंत्री करतो. तू बाहेर राहून जे बडबडतोस ते आत येऊन करून दाखव!

डिकास्टा : आणि समजा मी नकार दिला तर?

मुख्यमंत्री : डिकास्टा, मी एक राजकारणी आहे. तुझ्या नकाराचाही मी उपयोग करून घेईनच!

असो..

आपला,
(मुख्यमंत्री) तात्या सरनाईक.

मुक्तसुनीत's picture

25 Sep 2008 - 10:29 pm | मुक्तसुनीत

जबरदस्त डायलॉग ! मार्मिक वापर !

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Sep 2008 - 11:08 pm | बिपिन कार्यकर्ते

.

घाटावरचे भट's picture

25 Sep 2008 - 11:28 pm | घाटावरचे भट

पूर्वपुन्याई जब्बर असल्याबिगर असले डायलॉक सुचत न्हाईत!!!

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद