सायकल कट्टा - पुणे - २७ ऑगस्ट २०१६

मोदक's picture
मोदक in भटकंती
27 Aug 2016 - 7:51 pm

बर्‍याच महिन्यांपासून ठरत असलेला सायकल कट्टा आज पुण्यात पार पडला. प्रत्येक वीकांताला कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या राईडमध्ये बिझी असल्याने एकत्र भेटीचा योग येत नव्हता. घमासान चर्चा आणि फोनाफोनी होवून शेवटी पुण्याचा कट्टा शनिवारी सकाळी ठरलाच..

ग्रूपवर ठरल्याप्रमाणे ज्यांना जमणार आहे ते सायकलवीर सायकल चालवत चांदणी चौकात जमणार.. आनंदराव बुलेट आणि कपिलमुनी कारमधून येणार असेही ठरले. पुपेंसाठी (पुण्याचे पेशवे) ठिकाण जवळच असल्याने ते डायरेक्ट मल्टीस्पाईसला भेटणार होते.

मी सकाळी सकाळी स्वच्छ उजेडात बाहेर पडलो आणि अर्धा पाऊण तासात चांदणी चौकात पोहोचलो. तेथे सागर, अभिजीत आणि प्रशांत मालक भेटले. (विशेष म्हणजे सगळेजण अगदी वेळेवर पोहोचले. माझ्यासह..!!)

चांदणी चौक नेहमीप्रमाणे वाहनांनी ओसंडून वाहत होता.

.

चांदणी चौकातच जाज्वल्य अभिमानाचा एक ठसठशीत लिखीत पुरावा दिसला.

.

एकत्र भेटून आरामात गप्पा मारत मारत सगळेजण कर्वेनगरकडे सायकल हाणू लागले.

प्रशांत चिंचवडहून, मी आणि अभिजीत सिंहगड रोड वरून तर सागर सकाळी कोंढव्यातून निघून प्रभात रोडला १ तास पोहणे आवरून आंम्हाला भेटायला चांदणी चौकात आला होता.

कर्वेनगरात सायकलवर सागर.. मागे प्रशांत आणि अभिजीत.

.

वरच्या फोटोत अस्पष्ट दिसणारे प्रशांत आणि अभिजीत..

.

मल्टीस्पाईसला पोहोचलो.. तेथे सायकली कुठे पार्क करायच्या यावर तिथले वेटर साहेब आणि आमच्यात चर्चेच्या फेर्‍या पार पडू लागल्या. आंम्हाला सायकली आमच्या समोरच हव्या होत्या.. आणि वेटर साहेब नकार देत होते. शेवटी आंम्ही सुचवलेली बरीच ठिकाणे हाणून पाडून त्यांनी आंम्हाला टू व्हीलर एरीयामध्येच सायकल पार्क करायला लावली. मग आम्हीच सायकल नजरेआड होणार नाहीत अशी टेबले बघितली.

.

बसल्या बसल्या सहज सागरची खेचण्यासाठी मी त्याला सांगितले की "आंम्ही, सायकली आणि तू येशील असा सेल्फी काढ" सागरने खरंच सेल्फी काढला..

.

"इतक्या उंच माणसाला काय सेल्फी स्टिकची गरज नाही" असा शेरा जाता जाता प्रशांतने मारला यावर सागरने त्याच्या साईजची सायकल शोधायला किती त्रास झाला ते वर्णन करून सांगितले.

आंम्ही एकंदर मेन्यू पाहून खादाडी सुरू केली..

.

टोंमॅटो आम्लेट, त्यावर पराठा, वाटीत व्हेज खिमा, ब्रेड कटलेट, पालक चीज चिली टोस्ट, पपई, चहा आणि फोटोत न आलेले मँगो मूस असा जंगी बेत होता.

तितक्यात पुपेंचे आगमन झाले. त्यांचा रणगाडा आणि त्याला येणार्‍या समस्या यावर त्यांनी माहिती द्यायला सुरूवात केली.

.

आसपासच्या केलेल्या राईड्स, औरंगाबादचे उत्साही सायकलवीर मिपाकर, लातूरहून एकटेच खिंड लढवणारे मानस चंद्रात्रे असे वेगवेगळे विषय सुरू होते. मध्येच मी मानस साहेबांना फोन लावला.. त्यांच्याशी गप्पा झाल्या.

कपिलमुनी रस्ता चुकून डेक्कनच्या मार्गाला लागले होते. त्यांना योग्य रस्त्यावर आणण्यात थोडा वेळ गेला.

कपिलमुनी एकदाचे पोहोचले. त्याच दरम्यान आनंदरावही येवून पोहोचले. नकुल आला होताच. कोरम पूर्ण झाला.

मग खादाडी आणि चर्चांना ऊत आला.. एकाच वेळी वेगवेगळे विषय, एकच विषय, दोघा चौघांमध्ये सुरू असलेले असे चर्चांचे अनेक प्रकार सुरू होते.

सायकल, बुलेट, लेह लदाख, कपिलमुनींची जुनी थंडरबर्ड, कोकणयात्रा, आगामी कोकणयात्रा असे अनेक विषय सुरू होते.

अधून मधून फोटोग्राफी सुरू होतीच..


ओळखपरेड डावीकडून :
प्रशांत, अभिजीत, पुपे, आनंदराव, कपिलमुनी, नकुल, मोदक आणि सागर.

.

.

१० च्या दरम्यान वेटर साहेब आता शेवटची ऑर्डर आहे असे सांगून गेले. पालक चीजचिली टोस्टवर विशेष उड्या पडत होत्या. गप्पा रंगल्या आहेत हे बघून आणखी एक एक कप चहा ऑर्डर न देता मिळाला...

पुन्हा गप्पांचा फड रंगला.

काम असल्याने नकुल थोडा लवकर निघाला. त्यानंतर बराच वेळ आणखी गप्पा हाणून सायकलच्या माहीतीची देवाणघेवाण करण्यासाठी आंम्ही टेबले सोडली व पार्किंग लॉटकडे मोर्चा वळवला. येथे प्रशांतने ग्रूप फोटो काढण्यासाठी गार्डला तयार केले तोच त्याच्या कामाची गाडी आल्याने तो पसार झाला मग एक काका बराच वेळ फोनवर बोलत होते त्यांचे झाल्यावर फोटो घेण्यासाठी आंम्ही त्यांना विनंती केल्यावर "एक का.. दोन फोटो घेतो की" असे सौजन्याने सांगून काकांनी सुखद धक्का दिला.

.

शेवटी उभ्याउभ्याच बरेच वेगवेगळे विषय चघळून आणि पुढील राईडचे प्लॅनींग करून १२ वाजता नाईलाजाने कट्टा आवरता घेतला.

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Aug 2016 - 8:01 pm | llपुण्याचे पेशवेll

प्रशांत खूप दिवसांनी भेटला. बरं वाटलं. बाकी सगळ्या नवीन ओळखी आनंददायी होता. मजा आली.

वाह! फोटोंखाली जरा ओळखपरेड होऊन जाऊद्या की.

मोदक's picture

27 Aug 2016 - 11:28 pm | मोदक

एका फोटो वर दिली आहे की ओळखपरेड..!

अरिंजय's picture

27 Aug 2016 - 8:28 pm | अरिंजय

फार छान वर्णन. वाचुन मजा आली. संधी हुकल्यासारखं वाटतंय. सर्वांना समक्ष भेटण्याची ईच्छा होत आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Aug 2016 - 8:34 pm | llपुण्याचे पेशवेll

प्रशांत खूप दिवसांनी भेटला. बरं वाटलं. बाकी सगळ्या नवीन ओळखी आनंददायी होता. मजा आली.

माम्लेदारचा पन्खा's picture

27 Aug 2016 - 8:57 pm | माम्लेदारचा पन्खा

प्रत्येकाने हव्या असलेल्या ठिकाणची रिक्षा पकडून दाखवायची !

बाकी ऐड्या भारी आहे राव सायकल कट्ट्याची...मोदकशेट इथंही करा काहीतरी..

त्रिवेणी's picture

27 Aug 2016 - 9:01 pm | त्रिवेणी

मला वाटल सायकली घेऊन लांब गेला असाल? पण खतरुडातच थांबलात.
बाकी बे फा बघून परत भूक लागली.

सुबोध खरे's picture

27 Aug 2016 - 9:31 pm | सुबोध खरे

करा लेको मजा
खा मटाराची उसळ आणि शिकरण
जळजळ झाली आहे.

चौकटराजा's picture

29 Aug 2016 - 8:27 pm | चौकटराजा

ओ साहेब कंजुस काका स्पा , अजया याना घेऊन तुम्ही पण एक सायकल ट्रीप करा की ! मग खा काजुची उसळ खा फ्रूट सालाड असे आम्हीही म्हणू !

स्थितप्रज्ञ's picture

28 Aug 2016 - 12:31 am | स्थितप्रज्ञ

या ग्रुप चे मेम्बर भारी, त्यांच्या सायकली भारी....च्या मायला हा ग्रुपच लै भारी!!!

शलभ's picture

28 Aug 2016 - 12:44 am | शलभ

झकास कट्टा.. आणि मस्त वृत्तांत..

बाबा योगिराज's picture

28 Aug 2016 - 12:05 pm | बाबा योगिराज

मोदक भौ, वृत्तांत आवडल्या गेला आहे.
आणि मानस भौच्या दुकानातून (पोटात होणारी) जळजळ यावर औषध मागविण्यात आलेले आहे.
आता एखादा कट्टा आमच्या मराठवाड्यात घ्यावाच लागणार.

बाबा योगीराज.

अरिंजय's picture

28 Aug 2016 - 10:14 pm | अरिंजय

आणि बाहेरुन पाठींबा

आनंदराव's picture

28 Aug 2016 - 10:42 pm | आनंदराव

चला औरंगाबाद चा कट्टा ठरवा

आनंदराव's picture

28 Aug 2016 - 10:43 pm | आनंदराव

चला औरंगाबाद चा कट्टा ठरवा

आनंदराव's picture

28 Aug 2016 - 10:44 pm | आनंदराव

चला औरंगाबाद चा कट्टा ठरवा

वा! बर्‍याच लोकांची तोंडोळख जाहली...

नाखु's picture

29 Aug 2016 - 10:02 am | नाखु

मानवलेले दिसतेय.

एक वेगळा कट्टा. प्रशांत सायकल प्रेमी(ही) आहेत हे प्रथमच कळले.

पुपे नवीन मिपाकरांना भेटण्यास आवरजून आले हे मस्तच.

वृत्तांत आणी चायाचित्रे उत्तम

जव्हेरगंज's picture

29 Aug 2016 - 10:31 am | जव्हेरगंज

मस्त!

असंका's picture

29 Aug 2016 - 10:43 am | असंका

आनंदराव....एकदम टकाटक!!

मस्त मजा केलेली दिसतीये भावा....!!

Nitin Palkar's picture

29 Aug 2016 - 11:29 am | Nitin Palkar

लै मजा करता राव तुमी, आमास्नी वाचाया जर यवढी मजा येत आसल तर... तुमच काय.... असच कायबाय करत र्‍हावा आनी आमास्नि वाचाया द्या...

अनुप ढेरे's picture

29 Aug 2016 - 11:47 am | अनुप ढेरे

हा बुफे ब्रेकफास्ट होता काय? तिथे छान असतो ब्रेकफास्ट असं ऐकलं आहे.

इरसाल's picture

29 Aug 2016 - 5:18 pm | इरसाल

दुष्ट मनुष्य आहेस. श्रावण चालु आहे उपवासाला असलं काही काही दाखवुन जीव का बरे जाळत आहेस?????

कपिलमुनी's picture

29 Aug 2016 - 5:57 pm | कपिलमुनी

सायकलींगचा हुरुप आला

अवांतर : जुनी थंडरबर्ड नाही "अँटीक" थंडरबर्ड आहे ती !
चलाओ तो जानो

अभ्या..'s picture

30 Aug 2016 - 5:06 pm | अभ्या..

ह्यायला कप्या, गाडीइतकाच वजनदार व्यक्तीमत्व हैस की.
प्रशांतमालक दिसले. बरे वाटले.

पद्मावति's picture

30 Aug 2016 - 3:54 pm | पद्मावति

मस्तं वृत्तांत!

मुक्त विहारि's picture

30 Aug 2016 - 5:04 pm | मुक्त विहारि

आवडला...

शैलेन्द्र's picture

31 Aug 2016 - 11:33 am | शैलेन्द्र