मी पा सदस्यांची मदत अथवा मत हवे आहे....

भम्पक's picture
भम्पक in तंत्रजगत
26 Aug 2016 - 4:38 pm

नमस्कार मंडळी...
खरे तर खूप कंटाळा आला आहे या नेहेमीच्या रुटीनचा. अस्मादिक स्थापत्य अभियंता असल्याने तरी बरे आहे दरवेळी नवीन आव्हाने येतात अन स्वानंद भेटतो. परंतु आता मात्र वैताग आला आहे . असो.
सध्या अँप ची चलती आहे. आमच्याही मनात असाच एक विचार आहे . सर्व बांधकाम संबंधित सेवा ( छोट्या स्केल वर.,म्हणजे जशी घर टू घर डिलिव्हरी ) एका छत्राखाली आणण्याचा मानस आहे.
मग त्यात प्लम्बिंग, इलेक्टरीफिकेशन, फ्लोरिंग, सुतारकाम , रंगकाम , वॉटर प्रूफिंग , फर्निचर , किरकोळ बांधकाम , छोटे बदल , तोडफोड इ . तसेच इतर सेवा जसे व्हाल्यू एशन, प्लॅनिंग , देखरेख इ . समाविष्ट असेल . अश्या प्रकारचे अँप आहे किंवा नाही माहित नाही परंतु काही गोष्टींसाठी जस्ट डायल वगैरे आहे. पण त्यात सेवा देणाऱ्याचा पत्ता देतात. या अँप मध्ये या सर्व सेवा आम्ही स्वतः देणार . त्या नुसार आमची प्रशिक्षित माणसे ऑर्डर नुसार त्या ठिकाणी जाऊन सेवा देतील.
सध्या तरी पुण्यातच हे अँप चालणार आहे.
तत्पूर्वी आपल्या मी पा सदस्यांची या बाबत मते तसेच सूचना जाणण्यास उत्सुक आहे.

प्रतिक्रिया

चंपाबाई's picture

26 Aug 2016 - 4:40 pm | चंपाबाई

मुम्बैतही करा

मोदक's picture

26 Aug 2016 - 4:44 pm | मोदक

चांगली कल्पना आहे.

प्लॅन A, प्लॅन B, प्लॅन C असे त्या त्या कारागिरांचे भरपूर बॅकप ठेवा. ही मंडळी छोट्या कामाला टांग मारणारी असतात त्यांनी कामावर न गेल्यास किंवा काम चांगल्या गुणवत्तेचे न केल्यास तुमचे नांव खराब होण्याशी त्यांचा संबंध नसतो.

तसेच "दिवस पार पडला की झाले" अशी मनोवृत्ती असल्याने या कारागिरांवर तुम्ही फारसा वचक ठेवू शकत नाही.

भरपूर सरसकटीकरण केले आहे याची कल्पना आहे. पण फॉलोअप न करवणारा कारागिर माहिती असेल तर इथेच त्याची माहिती द्या. पुढचे जे असेल ते काम त्याच्याकडूनच करून घेईन.

महासंग्राम's picture

26 Aug 2016 - 4:45 pm | महासंग्राम

ऑलरेडी अश्या सुविधा देणारे असे ऍप आहेत प्ले स्टोर वर तुमचं वेगळेपण ते काय असणार आहे.

मन्दार जि , जरा लिन्क द्याल का

महासंग्राम's picture

26 Aug 2016 - 4:59 pm | महासंग्राम

हि घ्या लिंक

http://gadgets.ndtv.com/apps/features/roundup-9-indian-apps-to-get-your-...

उद्देश तुम्हाला डिस्करेज करण्याचा नाही तर वेगळेपण जाणून घेण्याचा आहे, कारण वेगळेपणा असेल तर प्रॉडक्ट जास्त खपेल हे सांगायलाच नको, तस्मात गैरसमज नसावा. नवीन आयडियाच्या कल्पनेला शुभेच्छा

भम्पक's picture

26 Aug 2016 - 5:09 pm | भम्पक

कस्ला गैर समज मन्दार जि......

अमितदादा's picture

26 Aug 2016 - 4:58 pm | अमितदादा

अतिशय सुंदर कल्पना, जरी जुनी अँप असतील तरी तुम्ही त्यातल्या शॉर्टकॉमिंग चा अभ्यास करून नवीन अँप सुरु करू शकता. काही कल्पना आहेत व्यनि करेन.

चिनार's picture

26 Aug 2016 - 5:10 pm | चिनार

उपक्रमासाठी शुभेच्छा !!

आणि आमच्या धाग्याची जाहिरात!
http://www.misalpav.com/node/36068

बहुगुणी's picture

26 Aug 2016 - 5:41 pm | बहुगुणी

तुम्हाला केवळ अ‍ॅप तयार करून देण्यापेक्षा प्रत्यक्ष सुविधा पुरविण्यात स्वारस्य आहे असं गृहीत धरूनः अँजी़ज लिस्ट मध्ये काय काय पुरवलं जातं ते पहा. त्यांचं अ‍ॅप देखील आहेच.

भंपकजी - मुळात अ‍ॅप कशासाठी असते तर त्या अ‍ॅप च्या मार्फत काही ट्रँझक्शन होत असेल तर. फक्त पैश्याचे नाही तर कसलेही, पण २ पक्षांमधली देवाणघेवाण. उदाहरण म्हणजे ग्राहक ऑर्डर करेल, पैसे भरेल, काहीतरी डाऊनलोड करेल, किंवा अगदी फॉल्ट रेझ करणे वगैरे वगैरे वगैरे.

तुम्ही काम करणार आहात ते प्रत्यक्ष काम. तिथे अ‍ॅपचा उपयोग फार होणार नाही. ही काही टॅक्सी सेवा नाही की त्याचे कमॉडीटझायशेन होइल. ह्यात बरेच वेरीअबल आहेत.

त्यापेक्षा जास्तीतजास्त ग्राहकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा. माझ्यामते ह्या प्रकारची कामे नेट, अ‍ॅप वर चालणारी नाहीत. जालाचा उपयोग तुम्ही जहीरातीसाठी करा पाहिजे तर.

ही बघा काही अ‍ॅप

https://www.housejoy.in/#servicesSection
https://www.easyfix.in/

अमेरिकन त्रिशंकू's picture

26 Aug 2016 - 11:27 pm | अमेरिकन त्रिशंकू
हेमन्त वाघे's picture

27 Aug 2016 - 4:29 am | हेमन्त वाघे

https://zimmber.com/
https://www.taskbob.com/
http://hammerandmop.com/
https://www.timesaverz.com/

हा विभाग , किंवा हि युक्ती बरीच वापरली गेलेली आहे

तुम्ही त्या कामगारांना हुडकून साईटवर आणण्यासाठी अ‍ॅप तयार करा, bring_plumber
किंवा त्यांच्या बहाण्यांना परफेक्ट उत्तरे द्यायचे अ‍ॅप तयार करा thats_not_like_that
किंवा त्यांचे रेट फिक्स करायचे अ‍ॅप तयार करा bargain_again
.
ही चालतील कदाचित.

संदीप डांगे's picture

27 Aug 2016 - 6:22 pm | संदीप डांगे

मी सदर कल्पनेवर अशाच प्रकारच्या सेवेचा विचार केला होता, फक्त ते ओला टाईप अग्रिगेटर होता, म्हणजे रेट्स फिक्स करून देर्जेदार सेवा देणाऱ्यांना एप वर लिस्टिंग मिळेल, ग्राहकांच्या रेटिंग वर सेवेदार यांचे लिस्ट मध्ये असणे अवलंबून असेल,

हा सगळा व्याप स्वतः संभाळण्यापेक्ष एग्रीगेटर बरे पडते, juggernaut हि कंपनी अशा सेवेसाठी लागणारे सॉफ्ट वेअर एप्स तयार करून देते, त्यांचे कडे बेसिक रेडी आहे फक्त कास्टमायझेशन करून घ्यायचे,

बाकी सगळे ओला कॅब सारखे, आपण ट्रान्सक्शन वर कमिशन घ्यायचे,
सविस्तर लॅपटॉप वर बसलो कि लिहितो, मोबाईल वरून जास्त टंकू शकत नाही