गाभा:
१ ते ७ ऑगस्ट हा आठवडा जगभरात World Breastfeeding week म्हणुन साजरा केला जातो. शासकीय पातळीवर देखिल खुपसारे कार्यक्रम राबवले जातात. मराठीत उल्लेख करताना बहुतेक ठिकाणी 'जागतिक स्तनपान सप्ताह' असा उल्लेख होतो. अभिप्रेत शब्द स्तन नसुन स्तन्य (स्तनावाटे जे स्त्रवते ते स्तन्य) असा असल्याने यात सुधारणा करुन 'जागतिक स्तन्यपान सप्ताह' असा असावा. चेहरापुस्तकावर सदर सुचना वैद्य. ज्योत्स्ना पेठकर यांनी नोंदवली आहे.
प्रतिक्रिया
4 Aug 2016 - 8:12 pm | प्रसाद गोडबोले
हायला हे मिपावर असले तीनोळी धागे यायला लागले की एक्स्ट्रा टवाळ/ आगाऊ/काडीसारु प्रतिसाद द्यायला हात लय शिवशिवतात, पण आम्ही जरा चेष्ठा मस्करी केली की किसनदेवांची अवकृपा होते , अन 'कधी तरी गांभीर्याने घेत चला' असा सल्ला मिळतो.
आता तो सल्ला किती वेळ शिरोधार्य धरायचा?
खरेतरे मिपाच्या संपादकीय धोरणानुसार चारोळींपेक्षा छोटे धागे उडवल्या जातील असे म्हणले आहे , शिवाय मिपावर स्वलिखित लेखनच प्रकाशित करावे असेही म्हणले आहे !
हे असे उडवणेबल धागे उडवले जाई पर्यंत टवाळक्या करायची अधिकृत परवानगी काढावी काय ?
4 Aug 2016 - 9:23 pm | टवाळ कार्टा
काय घेत चला
5 Aug 2016 - 9:01 am | नाखु
कालावधीचे पास आहेत काय (पीएम्पील्च्या पासासारखे मासीक, त्रैमासीक वगैरे).तुला तीन चार महीने सारखी परवानगी काढायला लागून नये म्हणून ही विचारणा.
अता राहिला प्र्श्न सल्ला शिरोधार्य धरायचा तर त्यातील जेष्ठ आणि माजी संपादक वल्ली आणि रा रा बिरूटे सर सांगू शकतील.
त्यांनी इथेच (सल्ल+ऊपाय) दिला तर भावी-माजी-आजी-राजी-हाजी-पाजी-बाजी-खाजी-लाजी-फौजी-मौजी मिपाकरांना एक उपयुक्त सल्ला मिळेल आणि त्यांची मिपा वाटचाल सुखकर होईल.
आप्लाच विनम्र नाखु
4 Aug 2016 - 8:25 pm | उडन खटोला
vcdatrange कसं उच्चारावं ते आधि सांगा.
व्ही सी डी अतरंगे ?
की
व्ही सी दातरंगे?
नंतर ते काय ते बघू म्हणजे ठरवू.
(काय ही व्यक्तीगत टिप्पणि आहे शक्तीमान? असल्यास सॉरी शक्तीमान!)
4 Aug 2016 - 11:20 pm | किसन शिंदे
'वाचायचं कसं? 'हा प्रश्न मलाही बर्याचदा पडतो.
4 Aug 2016 - 8:45 pm | आनंदी गोपाळ
माझ्या अल्पमतीनुसार, दूध या अर्थी "स्तन्य" बरोबर असले, तरी बाळाला ते डायरेक्ट आईच्या स्तनातून प्यायला द्यायचे आहे. वाटी, कप, बोंडलं, बाटली यातून वा गायीम्हशीगाढवबकरीवाघिणीचेही नव्हे. यामुळेच 'ब्रेस्ट-फीडींग' हा इंग्रजी शब्दप्रयोग आहे. मिल्क-फिडींग नव्हे.
वैद्या सौ. पेटकरांना हे जरूर कळवा. :)
बाकी फेसबुकावरील बहुमोल माहिती इथे पुरवल्याबद्दल धन्यवाद!
4 Aug 2016 - 9:02 pm | आदूबाळ
पॉईंट आहे.
कपातून चहा पिण्याला कपपान म्हणत नाहीत. ग्लासातून दारू पिण्याला ग्लासपान म्हणत नाहीत.
अर्थात ही सुधारणा करून नेमकं काय साध्य होणार आहे ते समजलं नाहीये.
4 Aug 2016 - 9:07 pm | अत्रुप्त आत्मा
३००!
4 Aug 2016 - 9:08 pm | आनंदी गोपाळ
कपातून चहा पिण्याला कपपान म्हणत नाहीत. ग्लासातून दारू पिण्याला ग्लासपान म्हणत नाहीत.
<<
"अधरपान" बद्दल काय म्हणता?
4 Aug 2016 - 9:14 pm | आदूबाळ
नया है यह!
पण तरीही: अधरपानात जे प्यायलं (!) जात आहे ते अधराच्या आतलं नसून प्रत्यक्ष अधरच आहे. त्यामुळे [ज्या गोष्टीचं सेवन करायचं आहे ती गोष्ट]+पान हा फॉर्म्युला बरोबर वाटतोय.
4 Aug 2016 - 9:57 pm | आनंदी गोपाळ
ब्रेस्टफीडींग सप्ताह बेसिकली, आपल्या स्तनांचा आकार स्तनपान दिल्याने बिघडेल, अशी भीती बाळगणार्या/व इतरही सर्वच मातांनी, बाळांना डायरेक्ट स्तनांतून दूध पाजावे, यासाठी पाळला जातो.
Feed the child directly from the breasts.
बाळ स्तनाग्रे चोखून दूध पिते, तेव्हा एक 'लेट डाऊन रिफ्लेक्स' नावाचा प्रकार स्तनांत अधिक दूध उत्पन्न करतो. आईच्या दुधातून बाळाला अत्यावश्यक असणारी इम्युनिटी, व पचायला अतिसुलभ असे सर्व पोषक घटक मिळत असतात. बाळ आईच्या कुशीत राहून दूध पिते, तेव्हा जे सायकॉलॉजिकल बाँडिंग व सेक्युअर फीलिंग येते, तेही बाळाच्या निरामय वाढीसाठी प्रचण्ड प्रमाणात पूरक असते.
या सर्व वैद्यकीय तथ्यातून अधिकाधिक मातांनी आपापल्या बाळांना आपल्या स्तनांतून सरळ दूध पाजावे यासाठी हा सप्ताह 'साजरा' केला जातो.
आता यावर भाषेचा किती कीस पाडायचा, (कीस. अधरपानवाला किस नव्हे.) ते आपण आपलं पाहून घ्यावं. नुसतं स्तन्य पाजायचं, तर ब्रेस्ट पंप वापरून बोंडल्याने दूध पाजता येईल. ते इथे अभिप्रेत नाहिये, हे कृपया समजून घ्याल तर बरें.
4 Aug 2016 - 10:09 pm | आदूबाळ
लोल! ह घ्या.
मूळ धाग्याला शोभेलसा आचरटपणा करत होतो. तुम्ही शिरियस होऊ नका.
4 Aug 2016 - 11:02 pm | आनंदी गोपाळ
उगंच भाषेचा पिसारा फुलवल्यावर, पाठीमागं वैद्यकीय ज्ञान 'उघडं'' पडतंय, ह्याची जाणीव वैद्यांना पोहोचवा इतकंच पहिल्या प्रतिसादात लिहिलं होतं, पण इस्कटून सांगताना जरा चिडचिड झाली. माफी असावी.
4 Aug 2016 - 10:01 pm | आनंदी गोपाळ
लेट डाऊन रिफ्लेक्सबद्दल हे वाचाच. → https://www.breastfeeding.asn.au/bf-info/early-days/let-down-reflex
4 Aug 2016 - 10:02 pm | आनंदी गोपाळ
You need to actually feed the BREAST, not only the breast-milk. Capish?
4 Aug 2016 - 9:44 pm | माम्लेदारचा पन्खा
आणि झालंच तर .....चहापान,अपेयपान,जपान यांचे काय करावे ?
4 Aug 2016 - 10:01 pm | Nitin Palkar
स्तनपान हा शब्द चुकीचा आहे हे खरे परन्तु मन्त्रालय हा चुकिचा शब्द अनेक वर्षे वापरात असल्याने तो चुकीचा आहे हे ही कुणाच्या लक्शातही येत नाही (अचूक शब्द 'मन्त्र्यालय' असा आहे). ज्य वेळेस मन्त्रालय हा शब्द वापरात नविन होत तेव्हा, सर्वसामान्यान्म्च्या सोयिसाठी अशी त्याची कारणमिमान्सा सान्गितली गेली होती.
5 Aug 2016 - 3:32 am | कंजूस
शब्द सापडत नसतील मराठीत तर गुजराती/कानडीतून/ घ्या.
5 Aug 2016 - 4:54 am | नावातकायआहे
मसाला पानातून होणाऱ्या रसपानास पानपान म्हणावे काय?
5 Aug 2016 - 3:08 pm | प्रसाद गोडबोले
धागा उडालेला दिसत नाही , प्रतिसादही उडालेले दिसत नाहीत !
वाह वाह ! हा मिपातील बदल अत्यंत सुखावह आहे :)
चीयर्स !!
5 Aug 2016 - 4:23 pm | तिमा
काही वर्षांपूर्वी, दूरदर्शनच्या बातम्यांत, शेवटी जे 'तपमान' सांगायचे ते तापमान म्हणून सांगायला लागले. त्यावेळीही शब्दाचा कीस पाडण्यात आला होता.
5 Aug 2016 - 9:42 pm | इडली डोसा
आनंदी गोपाळ यांनी पुरवलेली माहिती जास्त उपयुक्त आहे.