कसे करावे?

अभ्या..'s picture
अभ्या.. in काथ्याकूट
26 Jul 2016 - 1:41 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,
थोडी मदत हवी आहे.
...............
म्हणजे कसं आहे की गेले ५ रात्री मला एकाच स्वरुपाचे स्वप्न रोज रात्री पडत आहे. त्या स्वप्नात मी ऑफीसला निघालेलो असतो नेहमेप्रमाणे बाईकवरुन. विजापूर रोडवरुन मला जावे लागते. अचानक एका स्पीडब्रेकरपाशी एक मोठी कंटेनर ट्रक मागच्या बाजुने माझ्या गाडीला उडवते. मी बाजूला उडून पडतो. आणि अचानक सारे शांत झालेले असते. लोक चर्चा करत असतात पण मला काहीही एकू येत नाही. कुणीतरी मला उचलते, मी टोटली डॅमेज झालेला असतो. हात पाय वगैरे निर्जीव दिसतात (हे मला दिसत असते थर्ड पार्टीसारखे) नंतरही काही कळत नाही. लोक बडबड करत असतातच पण आवाज काहीच नाही. नंतर माझी डेड बॉडी अ‍ॅम्ब्युलन्सटाइप गाडीतून कुठेतरी नेतात. दोनदा मी इथेच स्वप्नातून जागा झालो. तीन वेळा मला हेच दिसते पण त्यानंतर घरही (माझे नाही, आई वडीलांचे) दिसते. तिथे सगळे व्यवहार नियमित चालू असतात. रस्ता पण अगदी सुरळीत वाहात असतो. मात्र जिथे अ‍ॅक्सीडेंट झाला तो स्पॉट मात्र घराजवळ दिसतो. अ‍ॅक्चुअली ते अंतर लांब आहे. तो एरीयापण अगदी काहीच न घडल्याप्रमाणे चालू असतो. ह्यानंतर मात्र मला जाग येते. आणि जवळपास सगळे आठवते.
ह्यावर विचार करता काहीच संगती लागली नाही पण नियमितपणे हे स्वप्न पडतेय एवढे मात्र खरे.
................
आता एक विचार मात्र डोक्यात घोळतोय. मी तर एकटा राहतोय सध्या. म्हणजे आईवडील त्यांच्या घरी राहतात पण मी बिझी असतो म्हणून ते सारखे फोन करायचे टाळतात आणि मी तर संपर्काच्या बाबतीत दिवाच आहे. त्यांची माझी महिनामहिना भेट होत नाही. उद्या समजा माझ्याबाबतीत बरेवाईट काही घडलेच तर मी काय पूर्वतयारी करुन ठेवावी? म्हणजे माझ्या पॉलिस्या, गुंतवणूकी ह्याबाबत नॉमिनी सध्या आईच आहे पण त्यांना जास्त माहीती नाहीये ह्याबद्दल. माझी बँक खाती, लहान कर्जे, कस्टमरांकडून राहिलेल्या उधार्‍या ह्याबद्दल मला एकट्यालाच माहीती आहे. त्याचे कसे होईल? माझी स्वतःच्या व्यवसायातील काही आर्थिक गोष्टी असतील त्या सांभाळायची माझ्या घरच्यांची बिल्कुल शक्यता नाही तेंव्हा ह्याबाबतीत कसे करावे? मुख्य म्हणजे मी नसताना ह्या गोष्टींचा विचार कशाला करायचा असेही डोक्यात येते पण आपणांमुळे आपल्या घरच्यांना आपल्यानंतर काही त्रास होऊ नये आणि झाला तर फायदाच व्हावा तोही विनात्रास अशी भावना आहे.
तर अशा पध्दतीचा इन्फरेमेशन बॅकप कसा ठेवावा? माझे व्यवहार काही फार मोठे नसले तरी एखाद्या सीए अथवा व्यवसायबंधूची मदत कशा पध्दतीने घ्यावी? बँकेचे आकाउंटस, त्यांचे पासवर्डस वगैरे डिट्टेल्स अगदी विश्वासातल्या म्हणजे वडीलांकडे अथवा आईकडे द्यावेत काय? मी ते बर्‍याचदा चेंज करत राहतो. त्याचे कसे व्हावे?
काही आर्टीस्टिक प्रॉपर्टी म्हणजे चित्रे, पेन्टींग अशांची व्हॅल्युएशन माझ्यानंतर कुणी करेल त्याला आधीच लीगली राईटस देता येतील काय? विल म्हणजे म्हातारपणातच करता येते का? त्याची काही टर्म्स वगैरे असतात काय?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझी काही ऑनलाइन अकाउंटस असतात उदा.: गुगलचे पर्सनल, हपिसचे, मिपाचे अशा अकाउंंटवरची वैय्क्तिक माहीती माझ्याबरोबरच संपून जावी असे काही सेटिंग असते काय? कितीही प्रायव्हसी ठेवली तरी ते अ‍ॅक्सेसिबल असतात असे ऐकलेय पण माझ्या माहीतीची माहीती मला माहीत असणार्‍या व्यक्तींना व्हावी असे वाटत नाही तेंव्हा कसे करावे?
.
काही उपयुक्त सल्ला मिळाल्यास मी आपला आभारी राहीन.
आगाऊ धन्यवाद.

प्रतिक्रिया

कानडा's picture

26 Jul 2016 - 1:56 pm | कानडा

महत्त्वाचा प्रश्न आहे.

मला एक HDFC Life चे "Little book of legacy" म्हणुन डॉक्युमेंट असते ते माहित आहे. PDF फाईल असते. त्यात आपली माहिती जमा करून ठेऊ शकतो. प्रिंट घेऊ शकतो.

अगदी तिच फाईल नाही पण त्यासारखी माहिती तयार करुन ठेऊ शकतो.

http://www.hdfclife.com/campaigns/HDFCLife-Little-Book-of-Legacy.pdf

---
कानडा

ओह्ह्ह. धन्यवाद कानडासाहेब.

राजाभाउ's picture

26 Jul 2016 - 2:08 pm | राजाभाउ

हे खरच चांगल आहे. धन्यवाद.

रंगासेठ's picture

26 Jul 2016 - 3:57 pm | रंगासेठ

कानडा भाउ, अगदी सहमत. HDFC Life चे "Little book of legacy"अतिशय उपयुक्त आहे.
मी त्याच धर्तीवर माहिती एकत्र केली आहे आणि त्यात थोडेफार बदल केलेत.

१) मृत्यूपत्र कधीही करता येते. उलट मी सुचवेन आत्ता केलेस तरी चालेल. त्यावर दोन साक्षीदारांच्या सह्या आणि शक्यतो एका डॉक्टरची (तुझी तपासणी केली आहे आणि सगळे नीट आहे अशा उल्लेखासह) सही आणि शिक्का.

२) तुझा एक वेगळा मेल आयडी काढून ठेव त्या मेलवर शक्य ते सगळे डिटेल्स सुटसुटीतपणे पाठव / साठवून ठेव.

३) व्यावसायीक व्यवहार शक्य असेल तर गुगल शीटवर नेता येतात का बघ आणि तुझ्या अत्यंत विश्वासातल्या व्यक्तीला कधीही आवश्यकता भासल्यास या शीटचा अ‍ॅक्सेस मिळेल असे बघ. म्हणजे तुझे नेहमीचे मेल अकाऊंट आणि वरती उल्लेखलेला वेगळा मेल आयडी यांमध्ये ही शीट अ‍ॅक्सेसेबल असेल आणि गरज भासल्यास वरचा मेल आयडी अ‍ॅक्सेसणारी व्यक्ती ती शीट मिळवू शकेल.

बाकी प्रश्नांबददल पास.

ओक्के मोदक. हे करण्यासारखे आहे आणी सुरक्षित वाटतेय.
थॅन्क्स

२. आणि ३. बद्दल. कितीही विश्वासू वाटणार्या आणि मोठ्या का होईना, पण ऑनलाईन थर्ड पार्टी कंपनीकडे अशी माहिती पाठवून तिथे सेव्ह करण्याबद्दल तीव्र शंका आहे.

अशा गोष्टी दोनतीन बॅकपसहित विश्वासू व्यक्तीच्या ताब्यात पेनड्राईव्ह, हार्डकॉपी, मेमरीकार्ड वगैरे फिजिकल रुपात दिली तर जास्त बरं नाही का?

मोदक's picture

26 Jul 2016 - 2:09 pm | मोदक

२. आणि ३. बद्दल. कितीही विश्वासू वाटणार्या आणि मोठ्या का होईना, पण ऑनलाईन थर्ड पार्टी कंपनीकडे अशी माहिती पाठवून तिथे सेव्ह करण्याबद्दल तीव्र शंका आहे.

मुद्दा बरोबर आहे पण बिलीयन्स मध्ये उलाढाल करणार्‍या कंपन्यांचा डेटा गुगलकडे पडला असताना जास्तीतजास्त दोन पाच कोटींमध्ये व्यवहार* जावू शकणार्‍या आपल्यासारख्यांच्या नादाला गुगल कशाला लागेल असा विचार आहे.

अशा गोष्टी दोनतीन बॅकपसहित विश्वासू व्यक्तीच्या ताब्यात पेनड्राईव्ह, हार्डकॉपी, मेमरीकार्ड वगैरे फिजिकल रुपात दिली तर जास्त बरं नाही का?

पॉलिसी बदलली, देणेकर्‍यांची रक्कम बदलली अशा प्रत्येकवेळी बॅकप अपडेट करणे त्रासदायक आहे असे वाटते.

*************************

*हा दोन पाच कोटींचा हिशेब "पुण्यामुंबईतील एक घर + टर्म इन्शुअरन्स" असा काढला आहे. अभ्याकडे किती पैसे पडून आहेत मला माहिती नाही. :p

हम्म. हार्ड ड्राइव्हवर अपडेट करीत राहणे जरा अवघडच आहे. नोकरीत नियमितता तर असते. व्यवसायात तेही नाही.
.
आणि मला हाणू नकात मोदकराव. कोटी सोडा, आकडा लाखात गेला तरी लै झाले. तोही पडून नसतो कधीच.

मोदक's picture

26 Jul 2016 - 2:15 pm | मोदक

हा हा :))

बिलीयन्स मध्ये उलाढाल करणार्‍या कंपन्यांचा डेटा गुगलकडे पडला असताना जास्तीतजास्त दोन पाच कोटींमध्ये व्यवहार* जावू शकणार्‍या आपल्यासारख्यांच्या नादाला गुगल कशाला लागेल असा विचार आहे.

गूगल नाहीच चोरणार. फक्त डेटालीक्स होतात तेव्हा घाऊकच होतात. असे चोरटे मोठ्या संख्येने पण प्रत्येकाची तुलनेत किरकोळ माहिती अशासाठीही चोरतात. आणि अशावेळी गूगल फुकट वापरकर्त्यांना "अर्र सॉरी"खेरीज काही देणं लागत नाही.

मोदक's picture

26 Jul 2016 - 2:30 pm | मोदक

सहमत आहे.

५ रात्री तसंच स्वप्न पडतंय असं आपल्याला अनेकदा वाटतं पण खरंतर एकाच लेटेस्ट रात्री पडलेली काही स्वप्नं बॅकवर्ड मेमरीतून रिपीट होऊन आल्यासारखी भासतात.

जनरली तेच स्वप्न खरोखर पुन्हा परत पडण्याची शक्यता कमी असते.

जर एके रात्री पडलं आणि त्या सकाळी उठून तपशील लिहून ठेवला आणि मग परत पुढच्या एखाद्या रात्री रिपीट झालं तर खात्री करता येते.

अर्थात हे अवांतर असलं तरी रोचक वाटतं म्हणून लिहीलं. अविश्वसनीय वाटतं पण बर्याचदा तसंच असतं.

अभ्या..'s picture

26 Jul 2016 - 2:06 pm | अभ्या..

गविराज, अ‍ॅक्चुअली स्वप्नांच्या बाबतीत मी दुर्दैवीच. माझी झोप मुडद्यासारखी. वर्षातून एखाद दोन वेळी काहीतरी पाहिल्यासारखे वाटते. बाकी नाहीच. मात्र कोण जाणे ह्या स्वरुपाचे (जवळपास) स्वप्न दोन महिन्यापूर्वी पडलेले आणि मलाही पूर्ण आठवत होते. नंतर मात्र नाही.
आता सलग हे होतंय. मला लिहुन ठेवावसं वाटलं नाही पण सलग स्वप्नातले साम्य आणी क्रम हा अगदी सेम होता आणि इव्हन त्याचा पडायचा कालावधीसुध्दा. कारण प्रत्येक वेळी मी जागा झालो त्यावेळेस साधारण ६ ते ६.३० वाजलेले आहेत.

च्यायला काय वाट्टेल ते विचार करायलयस अभ्या. अस काय होत नसतय रे आणि हेल्मेट घालतोस की तु तर काळजी करु नये. (अजुन बरीच वर्षे तुला इथ बॅनर, सजावटी वगैरे करायच्या आहेत).

पुढचा विषय मात्र महत्वाचा आहे म्हणजे त्यासाठी अपघाती म्रुत्यु होण्याची गरज नाही. आपले आर्थीक व्यवहार, पॉलिस्या, गुंतवणूकी या बाबत आपल्या शिवय घरातील एका तरी माणसाला माहीत आसणे आवश्यक आहे. म्हणजे आत्ता लगेच सांगुन नाही ठेवले तरी सगळे एकत्र लिहुन फाइल वगैरे बनवून ठेवली पाहीजे. (अशी फाइल बनवावी असे अनेक वर्षे मी ठरवत आहे).

जाणकार लोकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.

करायचे तर भरपूर आहे राजाभाऊ,
पण.....
असो.. फाईल करायची आणी घरी वडीलांकडे द्यायची आयडीया सध्या करणेबल आहे.

पद्मावति's picture

26 Jul 2016 - 2:12 pm | पद्मावति

विल करायला वयाचं काही बंधन नाही. विल खरंतर करूनच ठेवावं. एखाद्या चांगल्या वकीलाकडे सल्ला मागता येईल. ट्रस्टी म्हणून एखाद्या विश्वासू मित्र/ नातेवाईकाचे नाव देता येते.

लोक बॅकअप बद्दल उपाय सुचवत आहेतच, स्वप्नाचं म्हणशील तर एखादवेळेस रुपकात्मक असेल. तुला जरी तिथे तू दिसत असलास तरी दुसर्‍या कोण्या व्यक्तीच्या बाबतीत होणार असलेली गोष्ट तुला दिसत असेल. फार विचार नको करु!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jul 2016 - 2:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे तर... अभ्यासेठ, विल बिल काय करायचं ते करून ठेवा.

पण, स्वप्नाचं काही खरं नसतं. आमच्या काळात माझ्या स्वप्नात माधुरी दिक्षीत रोज यायची पण प्रत्यक्षात आयुष्यात त्याचा काही उपयोग झाला नाही.

बाकी, चर्चा विषय आणि प्रतिसाद माहितीपूर्ण होत आहेत. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

चौकटराजा's picture

26 Jul 2016 - 2:52 pm | चौकटराजा

प्राडा ,माझ्याही स्वप्नात माधुरी दीक्षित यायची. ती मला म्हणायची मी तुझ्याशी लग्न करायचे वचन देते. तिने ते काहीसे पाळले राव ! एका दिक्षित आडनावाच्या मुलीशी माझे लग्न झाले. तेवढंच ...... काय ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Jul 2016 - 3:46 pm | ज्ञानोबाचे पैजार

माझ्या आत्ता लक्षात येतय की माधुरीने आपल्या सगळ्यांनाच गंडवलय.

तिने मला पण लग्नाचे वचन दिले होते.

जाउदे.... ह्या जन्मी नाही जमले.... पण मी काही अजून आशा सोडली नाही.... पुढच्या जन्मी परत प्रयत्न करेनच.

पैजारबुवा,

अभ्या..'s picture

26 Jul 2016 - 3:52 pm | अभ्या..

तुम्ही आशा सोडली नाहीतर माधुरी कशी येईल?
सोडा विंटेजांचा नाद, आलिया, श्रद्धा, सोनम पहा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Jul 2016 - 4:00 pm | ज्ञानोबाचे पैजार

अबे हट, जुने ते सोनेच असते.
आपला पहिला क्रश मधुबाला, नंतर नुतन, आणि मग माधुरी दिक्षीत.
माधुरी नंतर कोणतीच हिरविन आवडली नाही.

पैजारबुवा,

अस्वस्थामा's picture

26 Jul 2016 - 8:37 pm | अस्वस्थामा

माधुरी नंतर कोणतीच हिरविन आवडली नाही.

म्हंजे तुमचं वय झालं म्हणायचं त्यानंतर.. ;)

उडन खटोला's picture

26 Jul 2016 - 9:05 pm | उडन खटोला

>>>>नुतन

चंदन सा बदन की छोड दो आंचल? वा वा!
तेव्हा निरागस होतात बहुतेक ;)

एस's picture

26 Jul 2016 - 9:41 pm | एस

आजपासून पैजारबुवांना 'जानी दुष्मन' हा किताब देण्यात येत आहे.

नाखु's picture

27 Jul 2016 - 8:32 am | नाखु

तर दोस्त म्हणणार बाबा , नूतन साठी तरी रांगेत घेतलं त्यांनी हे काय कमी बाकी दोन्हींबद्दल नाही पण साधना (नैनोंमे) आणि नंदा (लिखा है तेरी) खास आहेत आणि राहतील्ही.

पैजारबुवांचे धन्यवाद

नूसानं नाखु

वपाडाव's picture

27 Jul 2016 - 4:43 pm | वपाडाव

पहिली, दुसरी अन आखरी... माधुरीच...!

राही's picture

26 Jul 2016 - 2:29 pm | राही

असे मानतात की स्वप्नात एखादी घटना ज्या व्यक्तीच्या संदर्भात घडलेली दिसते ती सोडून अन्य व्यक्तीच्या बाबतीत ती घडू शकते. स्वप्नात पाहिलेल्या व्यक्तीस धोका नसतो.
अर्थात धोका असो वा नसो, आर्थिक बाबतीत पूर्वनियोजन हे कधीही महत्त्वाचेच.

एकूणच् असा विचार आपण सर्वांनी करून ठेवणे हिताचे आहेच..स्वप्ने पडोत किंवा न पडोत.
सर्व तयारी करून मग कांहीच होणार नाही या आत्मविश्वासाने रहावे.
बाकी आपण मिळवलेली माणसे हीच कमाई. किती सांभाळू म्हणले तरी पैशाची कांही खात्री नसते. ( हे आपलं माझं मत.)

या स्वप्नाचे मूळ या लेखात म्हटल्याप्रमाणे तुला पूर्वी झालेल्या अपघातामधे असू शकेल. तज्ञ सांगू शकतील, आणि समुपदेशनाने/ औषधाने त्याची चिंता/ भीती (असेलच तर) काढून टाकता येईल.
वर सांगितलेल्या कुठल्यातरी प्रकारे डेटा साठवून दोन जवळच्या व्यक्तिन्ना त्याबद्दल सांगून ठेवणे पुरेसे आहे.

..आणि हो, तुला शंभर वर्षांहून जास्त आयुष्य मिळण्यासाठी शुभेच्छा!

या स्वप्नाचे मूळ या लेखात म्हटल्याप्रमाणे तुला पूर्वी झालेल्या अपघातामधे असू शकेल.

हे बरोबर वाटतेय. पण तो अपघात वॉल्व्होचा होता. बाईकवर आजअखेर मला बरेच छोटेमोठे अपघात झालेले आहेत. पण मोठ्या अपघातानंतर माझे ड्रायव्हिंग टोटलच बदलले. बाईक चालवायचा अ‍ॅटिट्युडच बदलला. भीती किंवा धसका म्हणून नाही तर स्वतः प्रयत्नपूर्वक बदलले.
शुभेच्छांबद्दल धन्यवाद आहेतच सार्‍यांना.

कपिलमुनी's picture

26 Jul 2016 - 2:43 pm | कपिलमुनी

सर्व आर्थिक माहिती डायरी मधे नोंदवावी , ती डायरी अपडेट करत रहावी.
घरी आर्थिक पारदर्शकता असावी. म्हणजे देण्या- घेण्याचे व्यवहार , कर्जे , गुंतवणूक, पॉलिसीज याची माहिती पत्नी , आई - वडील यांना असावी. अचानक गचकल्यास काय करावे हे एका जवळच्या मित्रास , भावास माहिती असावे.
नॉमिनेशन : सर्व प्रॉपर्टी , बँक , पॉलिसी यांना नॉमिनेशन असावे.
नॉमिनेशन असतील तर बँकचे पासवर्डस ची गरज नाही , मॅन्युअली डिटेल्स बघता येतात.

याची फाईल बनवून घरी किंवा बँक लॉकर मधे ठेवावी.
सर्व कागदपत्रे स्कॅन करून एका ठिकाणी अपलोड करावीत . म्हणजे गहाळ होण्याचा प्रश्न येत नाही.

देण्या- घेण्याचे व्यवहार याबद्दल लोक १००% फसवतात याचा वडिलांच्या निधनानंतर अनुभव आहे.एकाही महाभागाने उधार घेतलेले पैसे स्वतःहून आणून दिले नव्हते . डायरी आणि चेकने व्यवहार या सवयीमुळे ते रीकव्हर करता आले==============================================================

स्वप्ने रीपीट का होतात? त्याचे काही अर्थ असतात का ? याबद्दल डॉक्टर अधिक सांगू शकतील.

फारच स्वप्ने पडली तर म्हातार्‍या संन्यासाला सोबतीला बोलाव :)

ते स्वप्ना ही एक साउथ इन्डीयन नटी आहे पण..... जाउ दे राव ...आपण ड्रीम्स विषयी बोलू. मी स्वप्नांच्या बाबतीत एकदम
भाग्यवान माणूस आहे. प्रत्यक्षातील काश्मीर पेक्षा रम्य काश्मीर मी स्वप्नात पाहिले आहे. स्वप्नात सचिन तेंडूलकर , राज ठाकरे, मोहन जोशी यांच्या शी गप्पा ठोकल्या आहेत. मदनमोहनची गीते स्वप्नात ऐकताना बॅक्ड्रोप होता कसबा पेठेतील एक जुन्या वाड्याचा, ओपी नय्यर ची एकसे एक गाणी अ‍ॅग्रीकल्चर कॉलेजच्च्या शेतात ऐकली स्वप्नात. आमच्या फॅक्टरीतील मार्केटिंग जी एम व सर्व्हीस जी एम चे कडाक्याचे भांडण पाहिले स्वप्नात. धोमचे चे धरण फुटले पण पाणी माझ्या पायाला लागताच ओसरू लागले हे सारे स्वप्नात. मला ८० टक्के रात्रीत स्वप्न पडते. पुन्हा नवी पटकथा घेऊन तीच तीच थीम स्वप्नात येते. हे माझ्या बाबतीत अनेक वेळा घडले आहे. उदा धोम धरणाच्या पाण्याच्या लोंढ्याची ती कथा सारोळा पूल पुणे सातारा रोड व अमृतांजन पाटी खण्डाळा इथेही घडली आहे.

यावरून एक दिसते ते असे की मनी वसे ते स्वप्नी दिसे हे खरेच आहे. मला पोहायला येत नाही. प्रवासाची जबरा आवड आहे. गप्पा छाटण्याचा नाद आहे. स्वभाव संघर्ष करणारा आहे. वाई शिरवळ मावळ या परिसरात मी वाढलो आहे. या गोष्टी वरील
उदाहरणात दिसून येतील. आता अशी काही संगति तुझ्या बाबतीत लागते का ते पहा मित्रा.

रोजचे तेच लाइफ आणि तोच विचार याने असे होत असेल असे माझ्या मित्राचे मत आहे.
अशी संगती लावायला हरकत नाही चौराकाका.

उडन खटोला's picture

26 Jul 2016 - 3:12 pm | उडन खटोला

मेलास की कळव. मी पण भटकतोय, कट्टा करु.

अभ्या..'s picture

26 Jul 2016 - 4:00 pm | अभ्या..

हे भारीय. टाकेन व्यनि.

स्पा's picture

26 Jul 2016 - 3:14 pm | स्पा

रोचक वाटतंय

मलाही नवीन घरी शिफ्ट झाल्यापासून अलार्म लावल्यासारखी रात्री २ ते २:३० च्या दरम्यान जाग येतेच येते, आधीच्या घरी असे कधीच व्हायचे नाही

कंजूस's picture

26 Jul 2016 - 3:27 pm | कंजूस

आनंदोल्हासाने ब्राम्हमुहुर्तावर जाग येत असावी.

रात्री २ ते २:३० च्या दरम्यान जाग येतेच येते,

काही स्वप्न वैगरे पडलेलं असतं का त्याआधी?

ते पंच पंच उषःकाले म्हणजे घड्याळात अ‍ॅक्चुअली कधी?
स्पावड्याला स्वप्ने लेअरमध्ये पडतात. ;) बाकी धसका स्वप्ने हा इंटरेस्टिंग सबजेक्ट आहे सूडक्या. मला दोन तीनदा आहे आण्भव. एकदम भिंतीच्या कडेवरुन पडतोय किंवा टोटल बॅलन्स्च गेलाय असे धसक्याने जागे होणे.

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2016 - 8:09 pm | टवाळ कार्टा

टोटल बॅलन्स्च गेलाय असे धसक्याने जागे होणे

हे बर्याचदा अनुभवले आहे...पण आपोआप थांबले काही वर्षांनी

इन्शाला/माशाल्ला स्वप्नाने (रात्री अथवा झोपेतली) तुला जागे केलंय.धागा काढून पुचकण्याअगोदर सर्व विचारी मिपाकरांना कामाला लावलं आहेस याबद्दल तुला आणि स्वप्नाला धन्यवाद.तुझं काहीही होवो पण इतरांचे भले खचितच करतो आहेस.धन्यवाद.
तुला लवकरच भेटेन.

राजाभाउ's picture

26 Jul 2016 - 4:08 pm | राजाभाउ

+१
सगळ्यांना जागे केले असेच म्हणतो.

अभ्या तुला उदंड आयुष्य लाभो.

माझ्या बाबतीत मी माझ्या बायकोला आणि आई वडिलांना माझ्या गुंतवणुकी बद्दल, येणे आणि देण्याबद्दल सर्वकाही सांगितलेले आहे. त्यात काही बदल झाला तर तो मी लगेच तिघांना अपडेट करतो.

पण वर सांगितलेली लिहून ठेवण्याची कल्पना पण चांगली आहे. म्हणजे समजा माझ्या पश्र्चात आई वडिल आणि बायको यांच्यात काही गैरसमज झाले तर ते दुर होण्यास त्या मुळे मदत होईल.

तसाही प्रत्येक ठिकाणी नॉमिनी नेमलाच आहे शिवाय घर देखिल दोघांच्या नावावर आहे.

पैजारबुवा,

राजाभाउ's picture

26 Jul 2016 - 4:11 pm | राजाभाउ

माझ्या मते हे भारी आहे. ह्याचा उपयोग होउ शकतो.

सिरुसेरि's picture

26 Jul 2016 - 4:46 pm | सिरुसेरि

एखादा विश्वासु / खात्रीचा / माहितीतला / भरवशाचा फायनानशिअल कंस्ल्टंट / अ‍ॅडवायसर नेमा . आणी तुमची सगळी आर्थिक गुंतवणुक त्याच्याकडच्या फोलिओमध्ये हस्तांतरीत करा . व तुमच्या कुटुंबियांना त्याची माहिती द्या .

फायनानशिअल कंस्ल्टंट / अ‍ॅडवायसर - उदाहरणार्थ - रिलायन्स मनी , मोतीलाल ओस्वाल

कैलासवासी's picture

26 Jul 2016 - 4:52 pm | कैलासवासी

सरल कैलसात या.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

26 Jul 2016 - 4:59 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

प्रकरण गंभीर हाय!!
सतत एकच स्वप्न पडतयं म्हटल्यावं कायतरी काळंबेरं हाय रे!!!
एक काम कर म्हसोबाला कोंबडं काप,सगळं ठीक होईल बघ!!!

भोळा भाबडा's picture

26 Jul 2016 - 7:14 pm | भोळा भाबडा

सहमत आहे,
पण कोंबडं अमावस्येला कापायचं असतं!!
तरच स्वप्नबाधा कमी होईल

सुबोध खरे's picture

26 Jul 2016 - 7:55 pm | सुबोध खरे

स्वप्नाला काहीही अर्थ नसतो. उगाच त्यामुळे आपण मनात सुप्त भीती बाळगणे सोडून द्या.
१९८२ साली गणित सोडलं तरीही आजतागायत मला गणिताची परीक्षा दोन दिवसांनी आहे आणि मला पोर्शनहि माहित नाही अशी स्वप्ने पडतात. आणि हेच स्वप्न मला गेली दोन दशके मधून मधून पडत आली आहेत. याचे काय कारण आहे?
तसे पाहायला गेलो तर बारावी पर्यंत मला गणितात विशेष योग्यतेने प्रथम श्रेणी(distinction) मिळते आले आहे. टि म वि च्या चार परीक्षाहि विशेष योग्यतेने प्रथम श्रेणी(distinction)मध्येच पास झालो होतो. तेव्हा गणिताबद्दलची सुप्त भीती मनात असेल हाही तर्क फोल ठरतो.
बाकी आपले इच्छापत्र(will) करून ठेवणे आवश्यक आहे. आपले सर्व व्यवहार पारदर्शक असावेत. लग्नापूर्वी माझ्या सर्व गुंतवणुकीत वडिलांना वारसदार ठेवले होते लग्नानंतर बायको आणि आता बायको ५० % आणि दोन्ही मुले २५ % प्रत्येकी. बँकेतील सर्वच्या सर्व खाती, घरे बायकोबरोबर एकत्र नावाने आहेत. त्यांची पूर्ण माहिती बायको आणि दोन्ही मुलांना आहे.

सुबोध खरे's picture

26 Jul 2016 - 7:57 pm | सुबोध खरे

फक्त आयुर्विमा माझ्या "एकट्याचा" काढलेला आहे. ( त्यात वारसदार म्हणून बायको ५०% आणि मुले २५ % प्रत्येकी)

चौकटराजा's picture

27 Jul 2016 - 9:00 am | चौकटराजा

खरे साहेब एवढ्या मोकळेपणामुळे मला आता वाटायला लागलंय की डायबेटीस ची ट्रीटमेम्ट व तपासणी तुमच्याकडूनच घ्यावी.
ते बाकीचे एम्डी नुसते मुके असतात. ( कदाचित डिसपेन्सरी मधले खरे ही तसेच असू शकतील मजबूरी हाय... एका तासात किमान १५ पेशंट तरी आटपायला हवे. )

सुबोध खरे's picture

27 Jul 2016 - 9:40 am | सुबोध खरे

चौरा साहेब
मी एक तासातच काय दिवसभरातही १५ पेशंट पाहत नाही.
मला भरपूर वेळ रिकामा असतो.

मला गणिताची परीक्षा दोन दिवसांनी आहे आणि मला पोर्शनहि माहित नाही अशी स्वप्ने पडतात. आणि हेच स्वप्न मला गेली दोन दशके मधून मधून पडत आली आहेत. याचे काय कारण आहे?

सेम पिंच. :)

२००३ ला इंजिनीअरींग पासआऊट होवूनसुद्धा मलापण अशीच स्वप्नं पडतात. मजेशीर गोष्ट म्हणजे विषयपण सारखे बदलत असतात.

टॅक्स सेविंगसाठी म्हणून खुप साऱ्या इन्व्हटमेंट्स केल्या आहेत त्या मुळे हा प्रश्न खूप दिवसापासून भेडसावत आहे.
एका जवळच्या नातेवाईकांच्या अकस्मात मृत्यू मळे त्यांच्या कमी शिक्षण असणाऱ्या बायकोला किती समस्यांना त्यांना सामोरी जावा लागला हे खूप जवळून पहिले, वारसदार मानून बायकोचेच नाव होते पण सर्व कागतपत्रे वेळीच न मिळाल्याने एवढी इन्व्हेस्टमेंट करूनही मिळवा तसा परतावा त्यांना मिळाला नाही.(आणि जो मिळाला तो बाकीच्या नातेवाईकांनी वाटून खाल्ला.)

घोर कलयुग आहे त्या मुळे आताच आपल्या वारसदारांना प्रत्येक इन्व्हटमेंट्सची कल्पना आणि जमेल तेवढे कागत पात्रांच्या प्रति देऊन ठेवण्यातच आपले भले आहे.

प्रसाद गोडबोले's picture

26 Jul 2016 - 6:27 pm | प्रसाद गोडबोले

होतं असं कधीकधी अभ्या , जास्त लक्ष द्यायचे नाही . काळाच्यापटलावर आपण एक ठिपका आहोत ठिपका ! आपल्या असण्याने किंव्वा नसण्याने काही अडुन रहाणार नाहीये !

असो.

बाकी मी काय म्हणतो अभ्या - एकदा सातार्‍यात ये , आपण गडावर जाऊन येवु !

आहे तितुकें देवाचें । ऐसें वर्तणें निश्चयाचें ।
मूळ तुटें उद्वेगाचें । येणें रीतीं ॥ २८ ॥

उपयुक्त प्रतिसाद येताहेत. अजून माहितीच्या प्रतीक्षेत.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

26 Jul 2016 - 6:58 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

अभ्यासेठ ,बिल्कुल घाबरु नका ,अशी स्वप्न वगैरे प्रत्यक्षात येत नसतात.स्वप्न हा आपल्याच मनात दडलेल्या गोष्टीचा अविष्कार आहे.बाकी आईवडीलांना आपले अकाउंटची माहीती ,पासवर्डस सांगण्यात गैर काही नाही.मृत्युपत्रही कधीही करता येते.त्याबाबतीत मात्र वकीलांचा सल्ला घ्या.

अभ्या..'s picture

26 Jul 2016 - 9:29 pm | अभ्या..

येस बॉस.
तुम्ही एवढे विश्वासानं सांगताहात, मैं नई डरनेवाला.

मृत्युन्जय's picture

26 Jul 2016 - 7:33 pm | मृत्युन्जय

खालील गोष्टी करु शकता:

१. दर ३ महिन्यांनी सगळ्या गुंतवणुकींचा आणि पासवर्ड्स चा तपशील असणारा कागद, तारीख घालुन, बंद लिफाफ्यात घरच्यांना द्यायचा. त्यात काय आहे याची माहिती द्यायची. दुसरा लिफाफा दिल्यानंतर पहिला फाडुन नाही टाकायचा फक्त तो वेगळ्या ठिकाणी ठेउन द्यायचा. याचे कारण तुमचे बदलते पासवर्डस. असे ३ -४ लिफाफे जमल्यावर तुमच्या घरच्यांकडे तुमचे आलटुन पालटुन वापरायचे सगळे पासवर्ड आपोआप मिळतील.

तळटीपः लग्न झालेले असल्यास आधी पासवर्ड्स बदला. असेही जुने पासवर्डस एव्हाना कडेवर १ - २ बबडु - छबडु बाळगायला लागले असतील. कधी भेटलात तर बबडु - छबडु " मामा " म्हणुन तुमच्या गळ्यातही पडतील. त्यामुळे ते पासवर्ड्स बायकोच्या ताब्यात देण्याची चुक नका करु. बायको का प्राणी प्रचंड हुषार असतो तस्मात कोडवर्ड मध्ये लिहिलेले तुमचे जुने पासवरड्स " त " वरुन "ताकभात" करुन ओळखले जातील.

२. सर्व बँक अकाउंट आणि विमा पॉलिसीज मध्य नॉमिनी लावुन घ्या.

३. सर्व बँकांमध्ये / इतर आस्थापनांमध्ये तुम्ही तुमच्या नॉमिनेशन बद्दल काय तरतुदी केल्या आहेत आणि तुमच्यानंतर ते पैसे तुमच्या वारसांना / नातेवाईकांना मिळण्यासाठी त्यांना काय करावे लागेल हे लिहुन काढा. शक्यतो ते सर्व फोर्म घरी आणुन ठेवा.

४. मृत्युपत्र कधीही करता येते. तो फार किचकट प्रकारही नसतो. एखादा वकील मित्र गाठा आणी एक साक्षीदार घ्या. मृत्युपत्रात खाजगी माहिती / पासवर्ड देउन नयेत.

५. कर्जे घेतली / दिली असतील तर जी परस्पर सेट ऑफ होतील अशी काही असतील तर लिहुन ठेवा.

६. सर्व कागदपत्रे (गाडी, घर, खाजगी इत्यादी) डिजीटल स्वरुपात घेउन एका पेन ड्राइव्ह वर घरच्यांकडे ठेउन द्या.

७. सर्व किल्ल्यांचा एक जुडगा घरच्यांकडे देउन ठेवा. लॉकर असेल तर त्याचाही यात समावेश असु द्यात.

८. सर्व महत्वाचे फोन नंबर्स एका ठिकाणी लिहुन तो कागद घरच्यांकडे देउन ठेवा.

९. टर्म इन्स्युरन्स काढुन ठेवा. लग्न झालेले नसल्यास स्वतःच्या वार्षिक प्राप्तीच्या किमान ५ पट आणि झालेले असल्यास १० पट असणे उत्तम.

आणी सर्वात महत्वाचे म्हणजे:

१०. मानसोपचारतज्ञांकडे जाउन औषधे घ्या. मी हे उपरोधाने, कुत्स्तितपणे अथवा चेष्टेने म्हणत नसुन गंभीरपणे म्हणतो आहे. एकच स्वप्न सलग पाच दिवस पडणे, त्यातही ते दु:खद असणे आणी त्याची वेळ ठरलेली असणे हे कुठेतारी तुमच्या मानसिक तणावाचे लक्षण आहे. याच्यावर वेळेवर औषधोपचार होणे फार गरजेचे आहे. स्पष्ट बोलतो पण तुम्ही तुमच्या घरच्यांची फायनान्शियली सोय लावालही पण जर खरोखर या मानसिक तणावामुळे तुमचे काही बरे वाईट झाले (मी स्पष्ट बोलतो आहे त्याबद्दल आधीच माफी मागतो) तर त्याचा मानसिक धक्का तुमच्या घरच्यांना जो बसेल त्यामुळे तुम्ही त्यांचे आयुष्य ५ -१० वर्षांनी कमी कराल. अकस्मात मृत्युने मयत सुटतो पण घरचे कायमस्वरुपी मानसिक द्रूष्ट्या खचतात त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे हे टाळा.

आदूबाळ's picture

26 Jul 2016 - 7:48 pm | आदूबाळ

+१ भारी प्रतिसाद.

आणखी एक शेपूटः

स्वतःचा आणि कुटुंबियांचा मेडिक्लेम इन्शुरन्सही काढून ठेवा.

अतिशय सुंदर आणि लॉजिकल प्रतिसाद.... पुर्णपणे पटेश....

चांदणे संदीप's picture

26 Jul 2016 - 7:56 pm | चांदणे संदीप

बरेच चांगले माहितीपूर्ण, उपयुक्त प्रतिसाद येत आहेत हे पाहून बरे वाटले. ते यासाठी की धाग्याचे शिर्षक आणि अभ्यादादाचे नाव बघून माझी पाच सहा उत्तरे ठरलेली जी मी नंतर गिळली! ;)
तरी सहज गंमत म्हणून सांगतो, १) करूच नये, हे उत्तम! २) जमेल तसे करावे! ३) मागचा पुढचा विचार न करता, बिनधास्त करावे! ४) व्यनितून सांगतो! ५) प्रतिप्रश्न - पण काय कसे करावे?

बाकी अभ्यादादा, स्वप्नाच म्हणाल तर ते "स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत....." किंवा गेलाबाजार, "सपने उन्ही के पूरे होते है...." हे घोकायच की स्वप्न पडायची बंद होतात.

मला तर अजूनही कधी स्वप्न पडलच तर त्यात, 'मी कुठेतरी पायी किंवा सायकलवर चाललोय आणि अचानक, एक रूपयाचा ठोकळा सापडतो, अजून जरा पुढे दोन रू. चा, पुढे पाचचा, मग पुन्हा रॅण्डमली कुठलाही सापडत जातो. पुढे कुठेतरी एकदम दोन-तीन सापडतात. आणि ही सापडलेली चिल्लर कुठे ठेवावी म्हणून मी स्वप्नातून बाहेर पडतो व अर्धवट झोपेत इकडे तिकडे जागा शोधू लागतो. lol =))

चिल माडी!
Sandy

तुमचा तर पोकेमॉनच झाला की राव

प्रतिसाद खूप आवडला मृत्युंजया,
राग मानायचे कारणच नाही, तू म्हणा कि आदूबाळा. हे जे काही सांगतील ते अनुभवाचेच. फटकळ पणा त्यात काय मानायचा. उलट मोठमोठे डॉक सीए सीएस फुकटात सल्ला देताहेत तो फायदा पाहायचा.
एनी वे, मृत्युन्जयाने दिलेले वरचे सर्व पर्याय जवळपास केलेत, मानसोपचाराची काहीतरी सोय करायलाच हवी. म्हणजे खरच तसं काही असलं तर वेळेवर निपटून जाईल.
धन्यवाद सुबोध सर, मृत्यो आणि आदूबाळ.

पिलीयन रायडर's picture

26 Jul 2016 - 9:48 pm | पिलीयन रायडर

उत्तम प्रतिसाद!

इच्छापत्र (काहींना मृत्युपत्र हा शब्द आवडत नाही) कधीही करता येते. त्यात आपल्या नावावर असलेल्या सर्व मालमत्तेचा उल्लेख हवा.

मला घरासंदर्भात एक प्रश्न आहे.

घर आपल्या नावावर असताना आणि सोसायटी फॉर्म झालेली असताना कायदेशीर कटकटी होऊ नयेत म्हणुन काय काय करणे आवश्यक असते? म्हणजे मी आणि नवरा गचकल्यावर उद्या माझ्या मुलाला डायरेक्ट घर मिळणार की त्यासाठी काही तरतुदी आहेत?

दुसरे असे की माझी क्ष मालमत्ता मला केवळ माझ्या मुलाच्या नावे करायची आहे आणि त्यावर दुसर्‍या कुणीही हक्क दाखवु नये अशी माझी इच्छा आहे. तर केवळ त्याला नॉमिनी करुन हे काम होईल का? की आणखी काही डिक्लेरेशन आवश्यक आहे?

सुबोध खरे's picture

27 Jul 2016 - 9:49 am | सुबोध खरे

हिंदू वारसा कायद्याप्रमाणे मुले-- मूल एक असेल तर ते एकटे, दोन किंवा अधिक असतील तर विभागून आई बापाच्या संपत्तीचे कायदेशीर वारसदार ठरतात. नॉमिनी हे केवळ विश्वस्त असतात आणि मूल सज्ञान होईपर्यंत ती संपत्ती नॉमिनीकडे विश्वस्त म्हणून असते. परंतु आपण "सुदृढ मनस्थितीत" (sound mind) (यासाठी एखादा डॉक्टर जो वरील वैद्यकीय प्रमाणपत्र देईल त्याला साक्षीदारही करा) असताना आपले इच्छापत्र करून जर ते रजिस्टर करून ठेवलेत तर तो सर्वात सबळ असा पुरावा मानला जातो. त्यातून या इच्छापत्रात आपली मुले हीच वारसदार (natural heir) असतील तर त्यात सहसा कोणत्याही कटकटी येत नाहीत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2016 - 11:39 am | डॉ सुहास म्हात्रे

थोडेफार धन / गुंतवणुक गाठीला असलेल्या लोकांसाठी इच्छापत्र (लिव्हिंग विल) ही आवश्यक गोष्ट आहे यात वाद नाही.

मात्र ते खाली दिलेल्या इतर सोप्या पर्यायांना भक्कम कायदेशीर सोबत म्हणून असावे, एकुलता एक पर्याय म्हणुन नव्हे.

++++++

"संस्थांच्या कार्यामध्ये" आणि "हाऊसिंग सोसायटी, बँक, शेअर्स, म्युचुअल फंड्स, इ मधिल गुंतवणूकीच्या वारसहक्कांसाठी" "नॉमिनी" या शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे.

संस्थांच्या कार्यासंबंधी नॉमिनेशन :

१. नॉमिनी म्हणजे एकाद्या गैरहजर असणार्‍या व्यक्तीच्या जागी त्याच्या पदाचे अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी नेमलेली दुसरी व्यक्ती (A person or entity who is requested or named to act for another, such as an agent or trustee).

२. त्या दोन्ही व्यक्तींपेक्षा वरिष्ठ पदावर असलेली व त्या दोघांनाही जबाबदार असलेल्या पदावरची व्यक्तीच (relevant authority) अशी नेमणूक करू / रद्द करू शकते. ही प्रक्रिया संस्थेच्या मान्यप्राप्त लेखी व्यवहाराने होते व सर्व संबंधिताना त्याची प्रत जाते.

गुंतवणूकीसंदर्भातले नॉमिनेशन :

१. हा नॉमिनी म्हणजे मूळ मालकीहक्क असलेल्या व्यक्तीच्या (खातेदाराच्या) मृत्युनंतर त्याच्या गुंतवणूकीची विल्हेवाट लावण्याचा हक्क असणारी / वारसदार व्यक्ती असते (A potential successor to another's rights under a contract). अश्या नॉमिनीचे नाव केवळ वारस म्हणून दफ्तरदाखल राहते. मूळ मालक जिवंत असताना गुंतवणूकीसंबंधी काहीही कृती करण्याचे हक्क या नॉमिनीला नसतात. पण मूळ मालकाच्या मृत्युनंतर, त्याचे मृत्युपत्र सादर केल्यावर, इतर कोणतेही पुरावे न लागता, नॉमिनीकडे हक्कांचे सुलभ व पूर्ण हस्तांतरण होते, हा फार मोठा फायदा होतो.

२. अश्या नॉमिनीची नेमणूक केवळ गुंतवणूकीचा मूळ मालकच (उदा : "हाऊसिंग सोसायटीच्या शेअर सर्टीफिकेटवर", "शेअर अथवा म्युचुअल फंड अकाऊंटवर" अथवा "बँक अकाउंटवर" नाव असणारी/र्‍या व्यक्ती) करू शकतो. एकाच मालमत्तेवर एकापेक्षा जास्त व्यक्तींचे नाव असल्यास त्या सर्व व्यक्तींची यासाठी संमती लागते.

३. अश्या नॉमिनी प्रक्रियेसाठी हाऊसिंग सोसायटी कडे एक "मॉडेल बाय लॉ" प्रमाणित अर्ज भरून दिला की काम होते. बँक, शेअर/म्युचुअल फंड कंपन्या यांच्या अकाउंट उघडण्याच्या अर्जात एक भाग (सेक्शन) असतो व तेथे संबंधीत (मूळ व नॉमिनी) व्यक्तींच्या सह्या (काही ठिकाणी फोटोसह) केले की नॉमिनीची नोंद होते. सुरुवातीस ही नोंद केली नसल्यास ती नॉमिनी अर्ज स्वतंत्रपणे भरून नंतर केव्हाही करता येते.

मूळ मालक जिवंत असताना गुंतवणूकीत फेरफार करण्याच्या हक्कांसंबंधी नॉमिनेशन :

१. हाऊसिंग सोसायटीच्यासंदर्भात अश्या हक्कांचा स्पष्ट उल्लेख असलेली रजिस्टर्ड पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी लागते.

२. सर्व बँकांमध्ये आणि बहुतेक इतर आर्थिक गुंतवणूंसाठी मूळ खाते उघडणार्‍या अर्जात "लेटर ऑफ ऑथॉरिटी" व /किंवा "पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी" असे दोन सेक्शन्स असतात. तेथे सह्या व जरूर असल्यास फोटोची नोंद करून मूळ मालक हे हक्क इतर व्यक्तीला देऊ शकतो. ही कृती खाते उघडताना अथवा नंतर केव्हाही करता येते. हे हक्क नंतर केव्हाही परत घेता येतात.

३. "लेटर ऑफ ऑथॉरिटी" व "पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी" हक्क असलेल्या व्यक्तीला, मूळ मालक जिवंत असताना, सर्वसाधारणपणे, अकाउंट बंद करण्याचा हक्क सोडून इतर सर्व हक्क (चेकवर सह्या करणे, पैसे जमा करणे/काढणे, फिक्स्ड डिपॉझिट्स ठेवणे/कॅश करणे, इ) असतात. या हक्कांत गुंतवणूकीच्या संस्थेप्रमाणे थोडेफार फरक असू शकतात.

मूळ गुंतवणूकदारच्या मृत्युनंतर गुंतवणूकीचे हक्क हस्तांतरीत होण्याचा क्रम

१. संयुक्त खाते असल्यास --> दुसरी जिवंत खातेदार व्यक्ती

२. संयुक्त खाते नसल्यास अथवा सर्व खातेदारांचा एकत्र मृत्यु झाल्यास (उदा : अपघात) --> नॉमिनी

३. खातेदाराचा (किंवा सर्व संयुक्त खातेदारांचा एकत्र) मृत्यु व नॉमिनी नाही अश्या परिस्थितीत --> जो कोणी एक वा अनेक जण कायदेशीर वारस असल्याचे सिद्ध करू शकतील ते सर्व.

मृत्युपत्र असणे केव्हाही फायदेशीरच असते. मात्र, वारसांमध्ये झगडे झाल्यास मृत्युपत्रही कोर्टाकडून मान्यताप्राप्त (प्रोबेट) करून घेणे भाग पडते. ही व वरचा मुद्दा ३ मधली प्रक्रिया फार किचकट, वेळखाऊ व दु:खदायक असते... ती संयुक्त खाते व नॉमिनी या सहजसाध्य (केवळ सह्या व फोटोने होणार्‍या) सोयी वापरून टाळता येते.

वरच्या विवरणांत सर्वसामान्य व्यवस्था दिलेली आहे. दर गुंतवणूक कंपनीच्या नियमाप्रमाणे त्यात फरक असू शकतात. आपल्या कंपनीच्या अधिकार्‍यांशी संवाद करून मगच स्वतःला मान्य तो पर्याय निवडणे योग्य होईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2016 - 11:53 am | डॉ सुहास म्हात्रे

मृत्युपत्रातील / इच्छापत्रातील मालमत्तेच्या वाटणीसंबंधी काही सर्वसाधारण धोपट नियम...

१. मृत्युपत्र करणार्‍याला पूर्वजांकडून वारसाने मिळालेली मालमत्ता : हीची सर्व वारसांमधे समान विभागणी करावी लागते. यात मृत्युपत्र करणार्‍याला ढवळाढवळ करता येत नाही.

२. मृत्युपत्र करणार्‍याने स्वकष्टाने कमावलेली मालमत्ता : हीची विभागणी कशी करावी हा सर्वस्वी मृत्युपत्र करणार्‍याचा हक्क असतो. (यातही बहुदा पत्नीच्या निर्वाहाची व्यवस्था नाकारण्याची मुभा नसावी असा माझा अंदाज आहे.)

या आणि माझ्या वरच्या प्रतिसादात मिपावरचे कायदातज्ञ सुधारणा आणि/अथवा भर घालतीलच.

चौकटराजा's picture

27 Jul 2016 - 2:59 pm | चौकटराजा

शंका-
ज्या ठिकाणी फेज वन फेज टू अशा पद्धतीने काम होते तेथे गृहनिर्माण संस्था निर्माण होण्यास ५ ते ६ वर्षाचा कालावधी मधे जाउ शकतो. अशा वेळी नॉमिनेशन कसे करायचे ?
माहिती-
मृत्यू पत्रात जेंव्हा केंव्हा आपण एखादा हक्क प्रदान करीत असतो. त्या संबधी निसंदिग्ध स्वरूपात लिहिले पाहिजे. उदा. मुदत पावती असेल तर तिचा क्र. वा एखाद्या गाळा असेल तर त्याचा सर्वे क्रमांक वगैरे. अर्थात माझ्या मृत्यूचे वेळी माझे नावावर कायद्याने असलेली सर्व स्थावर जंगम असा उल्लेख कमीतकमी हवाच !

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jul 2016 - 3:13 am | डॉ सुहास म्हात्रे

१. निर्वेधपणे आपल्या नावावर असल्याशिवाय (उदा : सोसायतीतील सदनिकेचे शेअर सर्टीफिकेट ताब्यात असल्याशिवाय) कोणत्याही मालमत्तेचे नॉमिनेशन करता येत नाही. ज्या गोष्टीचे आपण निर्वेध मालक नाही, ती गोष्ट दुसर्‍याला कशी देवू शकू ?

२. मृत्युपत्रात मालमत्तेचा जितका मोघम संदर्भ तितकी नंतर समस्या उभी राहण्याची सहाजिकच जास्त शक्यता असते.

(अ) जेथे जरूर आहे तेथे पक्के असलेले आकडे जरूर लिहावेत (उदा : अमुक अमुकला माझ्या अमुक बँकेतल्या अमुक खातेक्रमांकातील पैश्यांपैकी / अमुक एफडी पैकी रु १० लाख देण्यात यावे).

(आ) मात्र जेथे मालमत्तेची किंमत कालमानाप्रमाणे बदलत असणार आहे तेथे प्रत्येक वारसाच्या नावाबरोबर त्याला दिलेल्या मालमत्तेचे फक्त योग्य वर्णन पुरेसे आहे (उदा : अकाउंट क्रमांक; मुदत पावतीचा क्रमांक; सोसायटीचे नाव, पत्ता व फ्लॅट क्रमांक; जमिनीच्या सातबार्‍यावरील सर्वे क्रमांक-हिस्सा क्रमांक, इ वर्णन; वगैरे). थोडक्यात म्हणजे मालमत्तेचा प्रत्येक भाग (आयटेम) त्या वर्णनावरून खात्रीने ठरवता आला तर नंतरचे वादविवाद टळतील. एकच आयटेम अनेक वारसदारांना विभागून द्यायचा असला तर चल किंमत असलेल्या आयटमची विभागणी टक्केवारीने आणि/किंवा इतर कोणत्याही पद्धतीने पण सुस्पष्टपणे करावी (उदा : 'अ' ला ३० टक्के व 'ब' ला ७० टक्के; किंवा 'अ', 'ब' व 'क' यांना समान विभागणी करून; किंवा 'अ' ला ३ लाख रुपये व उरलेले सर्व 'ब' ला; इ)

नीलमोहर's picture

26 Jul 2016 - 7:51 pm | नीलमोहर

मिसळपाव को आपकी जरूरत हाय,
आता तुम्हाला शंभर वर्षांचे आयुष्य तसेही मिळालेय, ते कसे जगायचे याचं प्लॅनिंग करा :)

ते आर्थिक आणि इतरही गोष्टींचे नियोजन करावेच, जाणकार लोक माहिती देत आहेतच,
पण असे विचार जास्त करू नयेत, म्हणजे घाबरवायचं वगैरे नाही, पण एखाद्या गोष्टीचा सारखा विचार केल्यास ती
प्रत्यक्षात उतरण्याचे चान्सेस असतात याचा अनुभव घेतलाय, त्यामुळे अस नकारात्मक विचार शक्यतो करू नये.

स्वप्नावरून मीही गेल्याच आठवड्यात पडलेलं स्वप्न सांगेन,
मी आणि माझी लाडकी भाची माझ्या आजोळच्या वाड्यात, बाहेरच्या खोलीत झोपलोय ( ह्या वाड्यात आम्ही अगदी
वर्षातून एकदा वगैरे गेलो तर जातो, एरवी नाही, मात्र बरंचसं बालपण तिथे गेलंय, खूप कडू गोड आठवणी आहेत)
तर मी मध्येच पाणी प्यायला आतल्या खोलीत येते, तिथे जिना आहे, वर गेले की स्वयंपाकघर. वर जातंच होते
तेवढ्यात पिल्लूचा बोलण्याचा आवाज आला,
आत गेले तर ती नाहीच तिथे... खाली मीच झोपलेय... उशीवर माझेच केस वगैरे पसरलेत,
त्या झोपलेल्या माझ्याकडे पाहतांना पोटात पडलेला खड्डा आणि हृदयाचा चुकलेला ठोका तेव्हा 'जाणवला' ही होता,
तसे स्वतःकडे पाहतांनाच, काय होतंय ते समजून घेत असतांनाच जाग आली. विचित्र होतं ते फार.

अशी भारी भारी स्वप्नं पहिल्यापासूनच पडतात, एक तर आगीत वगैरे अडकलेले असते, नाहीतर समोर वाघ-बीघ
असतात, अगदी गोळीबार ही अनुभवलाय :)
त्यात बहुतेकदा कुणी जवळची व्यक्ति आणि मी संकटात असते, प्रत्यक्षातील भीती स्वप्नात खरी होऊन येत असावी
बहुधा, सब-कॉन्शिअस माईंड फार अ‍ॅक्टिव्ह असेल तर होत असावं असं.

स्वतः स्वतःकडे पाहणे हा अनुभव डेंजर असतो, स्वप्नातच शक्य आहे ते.
एकदा तरी प्रत्यक्षात तसे घडावे अशी फार इच्छा आहे.

नीलमोहर's picture

26 Jul 2016 - 10:42 pm | नीलमोहर

हादरवून टाकणारा अनुभव होता ना तो, वाईट..

मला सगळ्यात जास्त प्रश्न पडतो, तो म्हणजे आपण गेल्यानंतर काय होईल.. म्हणजे पुढे काय ?
पण असा विचार आला की आजूबाजूचं जग असं डोळ्यांसमोर गोल गोल फिरायला लागतं, मग तो विचार डोक्यातून
काढावाच लागतो, मात्र याचं उत्तर जाणून घ्यायची उत्सुकता फार आहे.

खटपट्या's picture

26 Jul 2016 - 8:14 pm | खटपट्या

गप लग्न करा आणि आपले जे काही आहे ते तीच्या स्वधीन करा. हा.का.ना.का.

मुक्त विहारि's picture

26 Jul 2016 - 9:33 pm | मुक्त विहारि

हेच लिहायला आलो होतो....

मी सगळे पैसे बायकोच्या हातात देतो.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

26 Jul 2016 - 10:55 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

मी सगळे पैसे बायकोच्या हातात देतो.

आयडीनाम सार्थक केलत:'(

मुक्त विहारि's picture

26 Jul 2016 - 11:30 pm | मुक्त विहारि

पत्नी ही घरातील लक्ष्मी...

http://misalpav.com/node/24546

रातराणी's picture

27 Jul 2016 - 12:06 am | रातराणी

लग्न करा! स्वप्न पडणे बंद होईल कायमचे =))

नपा's picture

1 Aug 2016 - 12:38 pm | नपा

लग्न करा म्हणजे स्वप्न पडणे बंद होईल...किंवा पडला तरी नंतर आठवणार नाही...

बाकी स्वप्न म्हणजे आपण अनुभवलेल्या, पाहिलेल्या, ऐकलेल्या गोष्टींचा अंतर्मनाने केलेला remix
शांत झोपेचा अभाव असला कि साधारणपणे स्वप्न पडतात...डोक्याला मस्त तेल मालिश करून झोपा

या धाग्यामुळे अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळाली...धन्यवाद

मुक्त विहारि's picture

26 Jul 2016 - 9:36 pm | मुक्त विहारि

ही अशी स्वप्ने पडल्याने, काही होत नाही.

बर्‍याचदा स्वप्नात माझा कडेलोट झाला आहे किंवा आकाशातून कोसळलो आहे.

तेंव्हा बिंधास्त रहा.

मस्त खानेका, थोडा पिने का और भरपूर चित्र बनाने का.

_मनश्री_'s picture

26 Jul 2016 - 9:43 pm | _मनश्री_

कायदेशीर बाबींंची माहीती जाणकारांंनी दिलेली आहेच एक सुचवू का ? सगळी कामबिमंं बाजूला सारा आणि ४-५ दिवस आई वडीलांंच्या घरी रहायला जा मस्त आईच्या हातचंं गरमागरम जेवा आईच्या मांंडीवर डोक ठेवून झोपा ,वडीलांंशी गप्पा मारा घरच्यांच्या सहवासात मन प्रसन्न होईल .मनावरचा ताण कमी होईल

अभ्या..'s picture

26 Jul 2016 - 10:00 pm | अभ्या..

ये तो अब रोनेकी बात हो गयी मॅडमजी.
जाना तो है...
पण आई सारखी विश्रांती जगात कुठे नाही हे अगदी खरे.
तिचा माझया डोक्यावरून हात फिरला तरी कदाचित मला मानसोपचाराची गरज भासणार नाहीये.

_मनश्री_'s picture

26 Jul 2016 - 10:07 pm | _मनश्री_

खरच जा ,माँँ की एक जादू की झप्पी और सब टेंंशन गायब

उडन खटोला's picture

26 Jul 2016 - 10:31 pm | उडन खटोला

>>> ये तो अब रोनेकी बात हो गयी मॅडमजी.

त्याला का लाजावं मग??? बिन्धास्त रडावं माण्सानं.
येक पर्सनल विचारु का???? कस्लं काय भंग बिंग झाला नाहि ना?

अभ्या..'s picture

26 Jul 2016 - 10:35 pm | अभ्या..

ह्याह्या,
तसलं काय न्हाय लेटेस्टमधी. ;)

नाखु's picture

27 Jul 2016 - 8:39 am | नाखु

आलं

न्हाय लेटेस्टमधी. ;)

अति अवांतर : मृत्युंजयचा सल्ला जबरदस्त आहेच पण त्यात "लवकर लग्न कर" असा नसल्याची किंचित ऊणीव भासते..

अता पुर्ण झाला..

गारसल्ला नाखु

चित्रगुप्त's picture

26 Jul 2016 - 9:48 pm | चित्रगुप्त

मूळ लेख आणी सर्व प्रतिसाद वाचून निशब्द झालेलो आहे.
अनेक प्रतिसादातून आवश्यक ती व्यावहारिक माहिती उत्तम प्रकारे दिलेलीच आहे, ती सर्वांसाठीच मननीय आणि करणीय आहे. आई-वडिलांना कमित कमी त्रास होईल, अशी सोय करून ठेवणे केंव्हाही चांगलेच.
मी स्वतः पासष्ठाव्या वर्षी सुद्धा अद्याप असली काहीही व्यवस्था केलेली नाही ... आळस. आणि का कुणास ठाऊक, आपण ८५ वर्षे जगणार आहोत असे उगीचच वाटत असते, त्यामुळे "काय घाई आहे, करू कधितरी" हा विचार.
भविष्याविषयी स्वप्ने मला तरी कधी पडलेली नाहीत, पण त्या त्या काळी असलेल्या परिस्थितीची अतिशय सांकेतिक अशी स्वप्ने बरेचदा पडलेली आहेत, आणि त्यातून स्वतःपुरते मार्गदर्शनही मिळालेले आहे.
तुझ्या स्वप्नातही " तिथे सगळे व्यवहार नियमित चालू असतात." हा एक महत्वाचा संकेत आहे, त्यामुळे आवश्यक ती व्यावहारिक व्यवस्था करून निश्चिंत रहावे. अद्याप केला नसल्यास एकदा 'विपश्यना' चा दहा दिवसाचा कोर्स करून घ्यावा.

मार्कस ओरेलियस यांनी म्हट्ल्याप्रमाणे "काळाच्या पटलावर आपण एक ठिपका आहोत ठिपका ! आपल्या असण्याने किंवा नसण्याने काही अडुन रहाणार नाहीये !"

वेदांत's picture

27 Jul 2016 - 10:13 am | वेदांत

मार्कस ओरेलियस यांनी म्हट्ल्याप्रमाणे "काळाच्या पटलावर आपण एक ठिपका आहोत ठिपका ! आपल्या असण्याने किंवा नसण्याने काही अडुन रहाणार नाहीये !"
-------------------
क्या बात है....

सुबोध खरे's picture

27 Jul 2016 - 10:25 am | सुबोध खरे

अहो,
त्यांनी आपला प्रश्न विचारला आहे त्यावर त्यांना उपाय सांगायच्या ऐवजी काळाच्या पटलावर आपण एक ठिपका कसलं सांगताय?
आपल्या डॉक्टरकडे एखादा रुग्ण ( किंवा आपणच) पोटात गोळा आहे किंवा हाड मोडले म्हणून गेलात आणि त्यानि आपल्याला "काळाच्या पटलावर आपण एक ठिपका आहोत ठिपका" असा सल्ला दिला तर काय वाटेल.
अनुचित प्रतिसाद देण्यापूर्वी दोन वेळेस विचार करा. जिथे तिथे "अध्यात्म" आणू नका.
धाग्याचा विषय काय आणि त्यावर असा प्रतिसाद देणे हा औचित्यभंगाचा प्रकार आहे.

उडन खटोला's picture

27 Jul 2016 - 10:38 am | उडन खटोला

संपादित

कृपया व्यक्तिगत टीकाटिपणी टाळावी.

- संपादक

प्रसाद गोडबोले's picture

27 Jul 2016 - 1:33 pm | प्रसाद गोडबोले

अनुचित प्रतिसाद देण्यापूर्वी दोन वेळेस विचार करा. जिथे तिथे "अध्यात्म" आणू नका.
धाग्याचा विषय काय आणि त्यावर असा प्रतिसाद देणे हा औचित्यभंगाचा प्रकार आहे.

परत एकदा अतिषय विनम्रपणे सांगतोय डॉक्टर , तुम्हाला माझी मते पटतात की पटत नाहीत हा माझ्यालेखी महत्वाचा मुद्दा नाही. पण मी काय प्रतिसाद द्यायचा अन काय द्यायचा नाही हे आपण मला शिकवु नये. कोणालाच शिकवु नये.
इथे प्रत्येक जण आपापले विचार बाळगायला आणि अभिव्यक्त करायला स्वतंत्र आहे. मी तुम्हाला किंव्वा अभ्याला माझा प्रतिसाद वाचा अन त्यावर आपले मत नोंदवा अशी सक्ती केलीली नाही. आपण माझे सर्वच्या सर्व लेखन फाट्यावर मारायला रिकामे आहात. रादर तसे करावे अशी नम्र विनंती आहे. जर आपण खाजवुन खरुज काढणार असाल तर प्रत्युत्तर देणे ही माझी आगतिकता असेल! भले मग आयडी उडाला तरी बेहत्तर ! तसेही आजकाल प्रवोक करणार्‍याचा आय्डी उडवायचे सोडुन प्रत्युत्तर देणार्‍याचा आयडी उडवायची फॅशन आहे !

अभ्या, अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व !

बाकी काल ह्याच विषयावर जरा अजुन चिंतन करत होतो तेव्हा मार्कस ऑरेलियस ची आठवण आली , तो तर रोमन साम्राज्याचा सम्राट होता , तेही अत्यंत भरभाटीच्या काळातला . पण तसे असुनही नॉर्दन फ्रंटीयर्स वर जर्मॅनिक ट्राईब्स विरोधात चाललेल्या युद्धात स्वतः जातीने सामील होता. मृत्युची तलवार तर त्याच्याही डोक्यावर लटकत होती ! शिवाय आपल्या पाठीमागे हे येवढे विशाल महान रोमन साम्राज्य कमोडस सारख्या नालायक माणासाच्या हातात जाणार हेही स्पष्ट दिसत होते ! पण तरीही तो माणुस , जो की एक अत्यंत प्रजाहितदक्ष राजा आहे तो , आता काय करु अन माझ्यामागे काय होईल अन राज्य कोणाला देवु अन ह्या चिंतनात गढुन गेलेला दिसत नाही, आपण मेल्यानंतर दुनियेचे काय होइल ह्याची आपल्याला पर्वा नाही , नकोच , रादर जिवंत आहोत तोवर कसे मस्त आनंदात समाधानात जगु शकु ह्याचा विचार करु , तो काय म्हणतो पहा:
Be content with what you are and wish not change ; nor dread your last day, nor long for it !

marcus

चित्रगुप्त's picture

26 Jul 2016 - 9:51 pm | चित्रगुप्त

सगळी कामबिमंं बाजूला सारा आणि ४-५ दिवस आई वडीलांंच्या घरी रहायला जा मस्त आईच्या हातचंं गरमागरम जेवा आईच्या मांंडीवर डोक ठेवून झोपा ,वडीलांंशी गप्पा मारा घरच्यांच्या सहवासात मन प्रसन्न होईल .मनावरचा ताण कमी होईल

अगदी अगदी. हे कराच अभ्यासेठ. यातून नक्कीच उभारी मिळेल, आणि विशेषतः त्यांना खूपच चांगले वाटेल.

प्रचेतस's picture

26 Jul 2016 - 10:02 pm | प्रचेतस

उत्तम विषय आणि एकापेक्षा एक सरस प्रतिसाद.
वाखु साठवली आहेच.

लालगरूड's picture

26 Jul 2016 - 10:04 pm | लालगरूड

रिअल लाईफ मध्ये जगताना कधी कधी असं वाटतं या क्षणाचं आपण आधी स्वप्न पाहिले आहे आणि सर्व त्याप्रमाने होत आहे. कुणाला असा अनुभव आहे का? मला खूप आहे.

विटेकर's picture

28 Jul 2016 - 2:59 pm | विटेकर

मला हा अनुभव अनेकदा आला आहे

मोदक's picture

28 Jul 2016 - 6:56 pm | मोदक

देजा वु म्हणत आहात का?

https://en.wikipedia.org/wiki/D%C3%A9j%C3%A0_vu

गंगाधर मुटे's picture

26 Jul 2016 - 10:54 pm | गंगाधर मुटे

स्वत:चे मरण स्वप्नात दिसणे लाभदायक असते, असे मी ऐकून आहे. खरे खोटे देव जाणे. पण खरे असेल तर फ़ायदाच होईल नुकसान होणार नाही. त्यामुळे तनावमुक्त व्हावे, असे माझे मत.

अवांतर :
माझ्याकवितावर द्यावयाचे प्रतिसाद मला मेल करून ठेवा. तुमच्या पश्चातही मी तुमचे प्रतिसाद माझ्या कवितांवर प्रकाशित करत राहीन, ये वादा रहा. ;)

कंजूस's picture

27 Jul 2016 - 8:58 am | कंजूस

"पिलीयन रायडर - Tue, 26/07/2016 - 21:48
नवीन
उत्तम प्रतिसाद!
इच्छापत्र (काहींना मृत्युपत्र हा शब्द आवडत नाही) कधीही करता येते. त्यात आपल्या नावावर असलेल्या सर्व मालमत्तेचा उल्लेख हवा.
मला घरासंदर्भात एक प्रश्न आहे- - -"

// नॅामिनी हा फक्त तात्पुरता मालमत्ता मालक होतो आणि ही सोय ब्यान्क आणि घरसह संस्थेसाठी केलेली आहे.खरा वारसदार आल्यावर नॅामिनीने सर्व हक्क त्याच्याकडे द्यायचे असतात.

आणखी उत्तर बाकी आहे.मला वाटतं यासाठी वेगळा धागा काढून ठेवलात तर बरं होईल.

चौकटराजा's picture

27 Jul 2016 - 9:10 am | चौकटराजा

नुकतेच्च वाटसॉपवर एक पोस्ट वाचली. पोस्ट फॅब्रिकेटेड वाटली पण त्यातून मिळालेला संदेश डोळे उघडणारा होता. टेकी नवरा
व सी ए बायको. सुखी संसार पण मूल नाही असा. एके दिवशी ३३ व्या वर्षी अपघातात तो मोटारसायकलवरून मरतो. लॅपटोप
मोबाईल मधे सारे पासव्रर्ड ई असतात त्यातला एकही बायकोला माहीत नसतो. लॅपटोप चा पासवर्ड महिन्यातून एकदा बदलण्याचा नियम . त्यामुळे ती महा कटकटीच्या फेर्‍यात सापडते. ऑफिसात अत्यंत शिस्त बद्ध असलेली ती घरी मात्र उद्या बघू वृतीची असते. अशात नॉमिनेशन करायला त्याना वेळच मिळालेला नसतो. घर घेताना मधे कोणी गचकेल असा विचार झालेला नसतो. त्याचे हप्ते वगैरे...... असा सर्व मामला.

घर घेताना मधे कोणी गचकेल असा विचार झालेला नसतो. त्याचे हप्ते वगैरे

यासाठी आपले काही झाल्यास मागच्यांना त्रास होउ नये म्हणून लायबीलीटी कव्हर करणारी गुंतवणूक करुन ठेवावी...

कवितानागेश's picture

27 Jul 2016 - 10:09 am | कवितानागेश

अभ्या, हेल्मेट घालतोस ना? आता एक चिलखत पण घे!
ते स्वप्न खरे होईल असे मानून तयारी करण्यापेक्षा दुसरे चांगले स्वप्न बघायला सुरुवात कर.
चांगला १०० वर्षांचा म्हातारा झालायस, तरी दात मजबूत आहेत. भोवती मुले, बाळे, नातवंडे, पतवंडे आहेत, मोठ्ठा उद्योग धंदा होता, तो मुलांमध्ये वाटून देऊन तू निवांतपणे मिसळपाव वर टवाळक्या करतोयस!.......
अजून रंगव स्वप्न तुला हवे तेवढे....
आणि रोज तेच बघ. :)

स्मिता_१३'s picture

27 Jul 2016 - 10:19 am | स्मिता_१३

आमेन !!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2016 - 12:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

अभ्या..., तरण्याताठ्या गब्रू जवानाने मन मजबूत ठेवून दु:स्वप्नांना टेंपोत बसवून फाट्यावर सोडावे आणि जग जिंकायला निघावे असे वाटते.

मात्र, त्याचबरोबर संपत्तीच्याबाबतीत जे उपयोगी सल्ले मिपाकरांनी दिले आहेत त्यावरही विचार करणे जरूरीचे आहे. ती घाबरट्पणाने नाही तर व्यावहारीक चातुर्य म्हणून करायची गोष्ट आहे.

ते उपाय विम्यासारखे असतात. मरण्यासाठी कोणी विमा काढत नाही, तर आपल्या मागे राहणार्‍यांचा विचार त्यामागे असतो. तोच विचार संपत्तीचा लेखाजोखा लिखित स्वरूपात ठेवणे, मृत्युपत्र करणे, नॉमिनी नेमणे, इ पर्यायांमागे असतो. या उपायांमुळे आपल्यामागे आपली संपत्ती बेवारस न राहता अथवा चुकीच्या हाती न पडता, ती आपल्याला हवे असलेल्या योग्य व्यक्तींच्या हाती "विनासायास" जाते.

सर्वांना दीर्घ आयुरारोग्य लाभावे हीच सदिच्छा आहे. पण इथून केव्हा जाणार हे कोणालाच माहीत नसते. त्यामुळे अशी व्यवस्था (अगोदर केली नसल्यास) करायला सर्वोत्तम वेळ "आत्ता" हीच असते.

येस एक्काकाका, चिंता नाहीच, त्यात अडकतो आहे असेही नाही पण विनासायास त्यांना मिळावे काहीतरी हि प्रामाणिक भावना. बस्स.
माझ्यामुळे कदाचित त्यांनी त्रास भोगलाय. मला जाणीव आहे. माझे चुकून काही बरेवाईट झाले तर त्यांना अधिक त्रास होईल ह्याची कल्पना आहे पण आयुष्याच्या वजाबाकीत त्यांच्यासाठी मी मायनस राहीलो असे नको व्हायला.

किंचित पैसा खर्च करायची तयारी असेल तर ही एक वेबसाइट पण नजरेखालून घालावी. चार्जेस तिथेच खाली दिलेले आहेत.

महाराष्ट्र एक्झिक्युटर एन्ड ट्रस्टी कं. लि.

असंका's picture

27 Jul 2016 - 12:34 pm | असंका

ही बँक ऑफ महाराष्ट्रचीच सबसिडियरी असल्याने त्यांच्या वेबसाइटमध्येच माहिती दिसेल....

आदूबाळ's picture

27 Jul 2016 - 12:54 pm | आदूबाळ

हेच लिहायला आलो होतो. माझा वैयक्तिक अनुभव फार चांगला आहे. संभाव्य कौटुंबिक कटकटी / वादावादी झाल्या नाहीत कारण महा० एक्झि० ट्रस्टींची पारदर्शकता.

गंम्बा's picture

27 Jul 2016 - 6:40 pm | गंम्बा

आदुबाळ - शक्य झाल्यास वैयक्तीक माहीती सोडुन जास्तीची माहीती द्या.
मला स्वताला असे काहीतरी करुन ठेवण्यात रस आहे.

ट्रस्ट हा प्रकार नक्की कसा चालतो काहीच माहीती नाही. पाश्चिमात्य देशात हा खुपच कॉमन प्रकार असावा असे गोष्टी सिनेमातुन दिसते. भारतात पहाण्यात नाही.

ओके, वैयक्तिक माहिती टाळायचा प्रयत्न करतो. आणि पूर्ण स्टोरी लिहितो.

----

सन ९६-९७ सालची गोष्ट असेल. जवळच्या नात्यातली एक वृद्ध व्यक्ती. एका दुर्धर आजाराचं नुकतंच निदान झालं होतं. जिवाला इमिजिएट धोका नसला तरी हळूहळू प्रकृती बिघडत जाणार हे निश्चित होतं.

जवळच्या एका हितचिंतकाने लगेच मृत्युपत्र करायला सुचवलं. (कारण मृत्युपत्र करताना व्यक्ती कायद्याच्या नजरेत "ऑफ अ सेन माईंड" लागते, आणि त्या आजारामुळे सॅनिटी कमीकमी होत जाणार हे स्पष्ट होतं.)

त्या वृद्ध व्यक्तीकडे फारशी प्रॉपर्टी नव्हती. भाड्याचं घर रीडिव्हेलप होऊन झालेला फ्लॅट, पेन्शनच्या उरलेल्या पैशाच्या केलेल्या एफड्या, कुठचेतरी लटकलेले अ‍ॅरियर्स वगैरे. सामान्यतः अशा वेळी काही वाद व्हायला नको, पण त्या वृद्ध व्यक्तीचे वारसदार लैच कटकटे, दुराभिमानी, इगोइस्टिक वगैरे होते. हे माहीत असल्याने त्या वृद्ध व्यक्तीने काही जबाबदार नातेवाईकांना मृत्युपत्राचा एक्झिक्युटर व्हायची गळ घातली. (एक्झिक्युटर म्हणजे मृत्युपत्रात लिहिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात घडवण्याची जबाबदारी दिलेला माणूस.)

पण झालं असं - वृद्ध व्यक्तीच्या हिशोबात ते जबाबदार नातेवाईक तरूण असले, तरी प्रत्यक्षात ते पंचेचाळिशीच्या आसपासचे होते. काहीतरी होऊन ते वृद्ध व्यक्तीच्या आधीच टपकले तर काय घ्या? बरं, नाही टपकले, तरी एक्झिक्युटर होणं - विशेषतः नात्यातल्या व्यक्तीचा - हे वैतागाचं, मानसिक श्रमाचं काम असतं. त्यातून वारसदार म्हणजे...

तर एकाने महाराष्ट्र एक्झिक्युटर ट्रस्टीजचा पर्याय सुचवला. वाटलं की एवढी छोटी इस्टेट असल्याने ते ही जबाबदारी घेतील का? चौकशी करता ते हो म्हणाले, त्यांच्या सर्व्हिस अ‍ॅग्रीमेंटवर सह्या झाल्या. मग त्यांच्याकडून एक माणूस येऊन मृत्युपत्रात कोणाला काय, कसं, किती द्यायचं आहे ते वृद्ध व्यक्तीला विचारून त्याच्या नोट्स काढून घेऊन गेला. मग प्रत्यक्ष मृत्युपत्र ड्राफ्ट केलं, ते त्या वारसदारांना दाखवलं. (हे करणं खरं तर आवश्यक नसतं, पण या केसमध्ये वृद्ध व्यक्तीनेच ही सूचना केली होती.) एक मूळप्रत त्यांनी ठेवून घेतली.

सन २०१५ मध्ये वृद्ध व्यक्तीचं निधन झालं. हे एक्झिक्युटर ट्रस्टींना कळवताच त्यांनी बँक अकाऊंट, एफड्या, सोनं वगैरे ताब्यात घेतलं. फ्लॅटवरचं नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू केली. वारसदारांची एक मीटिंग घेऊन मृत्युपत्र मोठ्याने वाचून दाखवलं. त्यात घडायच्या त्या नाट्यमय घटना घडल्याच - एका वारसदाराचं म्हणणं होतं की वृद्ध व्यक्तीने मला क्ष द्यायचं ठरवलं होतं आणि तुम्ही य म्हणताय. दुसर्‍या वारसदाराला त्या काळी निरीच्छतेचा टेंपररी झटका आल्याने त्यांनी सर्व हक्क सोडून दिले होते. नंतरच्या वीस वर्षांत (१९९६-२०१५) झटका ओसरला होता, आणि आपल्याला काही मिळावं ही इच्छा जागृत झाली होती. तिसर्‍या वारसदाराकडे वृद्ध व्यक्तीचे बरेच अ‍ॅसेट होते आणि तो बराच काळ शहराबाहेर असे.

एक्झिक्युटर ट्रस्टींनी सगळं अत्यंत थंडपणे हाताळलं. वारसदार एक आणि दोनला त्यांना ड्राफ्ट विल वाचायला दिलं तेव्हा अ‍ॅकनॉलेजमेंट घेतली होती ती दाखवली. त्यावेळी त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नव्हता हे पटवून त्यांचं तोंड बंद केलं. तिसर्‍या वारसदाराच्या गावी जाऊन अ‍ॅसेट ताब्यात घेतले. वारसदार एकला पैसे नको होते, पण वृद्ध व्यक्तीची आठवण म्हणून विशिष्ट वस्तू हवी होती. या सगळ्या खाचाखळग्यांतून त्यांनी योग्य प्रकारे त्यांचं काम केलं.

तात्पर्य असं, की जिथे मृत्युपत्रामुळे डोक्याला शॉट लागायची शक्यता असते, तेव्हा एक्झिक्युटर ट्रस्टींकडे नक्की जावं.

हि माहिती पूर्ण वाचली. खूप चांगली सेवा आहे हि. ह्याबद्दल बिलकुल माहिती नव्हती. अशी सेवा कुणी फर्म अथवा संस्था प्रॉपरली रेट वगैरे ओपन करून देत असेल असेही वाटले नव्हते. मला ते विल वगैरे गोष्टी बडे लोग बडी बाते वाटायचे. हे मात्र आपल्या महाराष्ट्र बँकेकडून आहे म्हणजे भारीच. कारण रिलेशन मेन्टेन केले तर महाबँकेसारखे लोक जगात भारी बँकर सारखी सेवा देतात याचा अनुभव आहे.
हि माहिती बर्याच जणांना पुरवली जाईल.

+१..
आदुबाळ यांना धन्यवाद!

गंम्बा's picture

28 Jul 2016 - 6:50 pm | गंम्बा

मनापासुन धन्यवाद आदुबाळ.

हे सर्व करायला ते फक्त २-३ % घेतात म्हणजे काहीच नाही.

झकास's picture

30 Jul 2016 - 10:30 pm | झकास

खूपच चांगली माहिती मिळाली एकाच प्रश्न. ह्या व्यक्तीने बर्याच लोकांना मृत्युपत्राबद्दल सांगितले होते. पण सहसा असे होत नसावे. म्हणजे जर मी आणि नवरा मृत्युपत्र केल्यानंतर गचकलो आणि कुणाला कल्पनाच नसेल कि मृत्युपत्र केलेले आहे तर? किंवा माहीत असलेल्या लोकांनी वेळेत एक्झिक्युटर ला कळवले नाही तर काय होण्याची शक्यता आहे?

एक नक्की की ही एक्झिक्युटर ची माहिती खूप उपयुक्त आहे. सहा महिन्यांपूर्वी स्वर्गवास झालेल्या माझया नातेवाईकांच्या फॅमिली ला किती त्रास सहन करावा लागतो आहे ते पाहून मी सुद्धा हा विचार सुरू केलाच होता.

आम्ही पुढल्या दहा वर्षात वर पोचलो तरी आमची मुले अज्ञान असणार. अश्या वेळी काही वेगळी व्यवस्था करून ठेवता येईल का? मुलांचे शिक्षण नीट होऊन नंतर आमच्या इच्छे प्रमाणे त्यांना संपत्ती मिळेल असे काहीतरी हवे आहे.

पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला ठाऊक नाही. सदर वृद्ध व्यक्तीचं पेन्शन महाबँकेतच येत असे, आणि पेन्शन खातं दर वर्षी एकदा माणूस हयात असल्याची खातरजमा करतातच. त्यामुळे एक्झि० ट्रस्टींनी वेगळी भानगड ठेवली नव्हती. (ही फ्लेग्झीबीलिटी मला आवडली. नाहीतर नियमावर बोट ठेवून आणखी एक कागदी घोडा बनवणं त्यांना सहज शक्य होतं.)

वारसदार अज्ञान असेल तर तो सज्ञान होईपर्यंत ते ट्रस्टी राहतात.

गंम्बा's picture

27 Jul 2016 - 6:36 pm | गंम्बा

धन्यवाद असंका. मी ह्याच गोष्टीच्या शोधात ह्या धाग्यावर सारखा येत होतो.

इच्छापत्र करा, माहीती देऊन ठेवा हे सर्व ठीक आहे. पण असे ट्रस्टी आणि एक्झीक्युटर असणे गरजेचे आहे.

अश्या प्रकारची ठराविक वेळेला पडणारी स्वप्ने म्हणजे ब्लॅडर फुल्ल झाल्याची निशाणि असु शकते.
मेंदु अश्याप्र्कारचे धक्का दायक स्वप्न पाडुन उठवण्याचा प्रयत्न करु शकतो.
तु ३ किंवा ४वाजता उठुन मोकळा होउन ये. मग बघ स्वप्न पडतय का ते?

अभ्या..'s picture

27 Jul 2016 - 12:39 pm | अभ्या..

हेचि फळ काय मम चिंतनाला.
असो, डोन्ट माईंड आनंद पण माझा मेंदू ब्लॅडर फुल्ल चा मेसेज असा क्रिप्टिक कधी देत नाही. सरळ मेसेज येतो आणि मी उठून रिकामा होऊन परत झोपतो.
(च्यामारी वाघाचा मेसेज आठवला) ;)

नाखु's picture

27 Jul 2016 - 4:43 pm | नाखु

श्री अभ्याशेठ यांना एक मोठ्ठा आरसा ( ते दिसू शकतील असा व्यायाम्शाळे सारखा),रात्री झोपताना वाचण्यासाठी चांदोबाचे जुने अंक व काही सिंड्रेला समान परिकथा पुस्तके,एक नवरत्न तेलाचा बाटली आणि आगामी कट्ट्याला पुर्णवेळ हजर राहण्याचे आवतान देऊन करण्यात येत आहे.

अध्य्क्ष : मनाचा थांग पेश्शल आदरणीय गावडे मास्तर
प्रमुख पाहुणे : विश्वात भाव ओतणारे जग्नमित्र कवी लोकप्रिय साहित्यीक श्री रा रा आत्मुदा चारोळीवाले.
इतर मान्यवर : या वयातही गुलाबी बाणा जपणारे बिरुटे सर,भटकंतीवाले वल्ली महोदय्,आद्य पोपाचार्य गिरिजा,जाग्यावर टांगा पलटीफेम वप्याडाव

आपले नम्र.

नाखु,चौरा पिंपरीचिंचवडकर
यशोमैया संचालित अभ्या फॅन क्लब
किसनदेव स्म्चालीत अभ्या चाहता संघ ठाणे डोंबवलीसह
अद्या यांचा बेळगाव निपाणी चिकोडी,अथनी हुबळी सह सत्कार संघ

बाळ सप्रे's picture

27 Jul 2016 - 5:22 pm | बाळ सप्रे

स्वप्नांना काहिही अर्थ नसतो. इतके गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
बाकी आर्थिक व्यवहार घरच्यांना माहिती करुन देणे वगैरे कायम करत रहावे (स्वप्नाच्या ट्रीगरची गरज नाही)जेव्हा जेव्हा काही नवी गुंतवणूक कराल तेव्हा. खरतर त्यांच्याशी सल्लामसलतीनेच करावे व्यवहार म्हणजे वेगळी माहिती करून देण्याचीही गरज नाही.

बाकी स्वप्नातील घटना वगैरे वापरून आणि वर तुमचा मालमसाला घालून मस्तपैकी लेख लिहा इथे.. :-)

झोपेतली स्वप्ने झोपेतली " च " असतात अभ्या ,

हो , जागेपणी पडलेली / बघितलेली स्वप्ने पूर्ण होत नसतील तर मात्र काही तरी केलं पाहिजे .
बाकी नको एवढा विचार करू .

Enjoy the work you do.. make sure you earn enough for it. give your parents and wife/ would be wife enough to be happy. and leave everything else to the monk ;)

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2016 - 6:24 pm | टवाळ कार्टा

कं लिव्लय अद्द्या"सर"

गामा पैलवान's picture

27 Jul 2016 - 6:26 pm | गामा पैलवान

अवांतर :

अभ्या..,

स्वप्नात स्वत:चा मृत्यू म्हणजे आरोग्याची सुचिन्हे. मज्जाय बाबा तुमची. संदर्भ : http://www.astrogyan.com/dream_prediction_result/did-1437/indian_astrolo...

आ.न.,
-गा.पै.

अमेरिकन त्रिशंकू's picture

27 Jul 2016 - 7:40 pm | अमेरिकन त्रिशंकू

भारतात हा विषय कितपत चर्चिला जातो की नाही हे माहिती नाही पण medical directive and medical power of attorney हाही एक महत्वाचा विषय आहे.

डॉक्टर मंडळी यावर पण लिहा किंवा एक वेगळा धागा काढा.

अतुल गावंडेचं "Being Mortal" हे पुस्तक वाचण्यासारखं आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jul 2016 - 9:12 pm | कैलासवासी सोन्याबापु

मला अंधश्रद्धाळू समजाल, पण भावा माझ्या नोकरीत अश्या अश्या गोष्टी पाहिल्यात का माझा भरोसा बसला, कधीही पहाडावर चढाईच्या अगोदर आम्ही पर्वतराज नगारु (स्थानिक भाषेत)ची पूजा केल्याशिवाय म्हणूनच चढत नाही, तर....

कसे करावे?

शनिवारी मस्त अंघोळ कर, जुन्या चपला पायात घाल, नव्या पिशवीत घे, एक नारळ घे, फुलं उगाअसल्यास घे, तेल अन अख्खे उडीद न विसरता घे,अन तडक आपला गरिबांचा वाली हनुमान पकड, करायचे काहीच खास नाही मनापासून भीमरूपी महारुद्रा किंवा चालीसा म्हण एकदाच, दंडवत घाल नारळ वाढव, खाऊ नकोस सोबत घे, तेल उडीद देवास वहा, बाहेर पडलास का जुन्या चपला तिथेच सोड अन बदली म्हणून आणलेल्या चपला घाल, दोन बाजूला दोन भकले फेकून दे नारळाची, अन जा कामाला बिनधास्त!

किंवा बेस्ट,

आईकडून मीठमिरची ओवाळून घे गड्या! त्यासारखे कवचच नाही :)

अभ्या..'s picture

27 Jul 2016 - 9:24 pm | अभ्या..

बापू,
मनातला धसका हा प्रकार मानासिकच आहे, ह्या उपायाने मनोबल वाढत असेल तर हे पण करीन. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे असे उपाय माझी आई ज्या काळजीपोटी करते त्याच काळजीने तू सांगितलं म्हणून अवश्य करिन.
जय बजरंगबली.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jul 2016 - 10:09 pm | कैलासवासी सोन्याबापु

सगळा खेळच मानसिक असतोय गड्या, आम्ही पर्वताची पूजा करतो खरे पण वेळेला जर avalanch आलेच तर काय उपडणार आम्ही? (हिमालयातले उगा बारके avalanch सुद्धा काहीशे टन बर्फ आणते खाली) बारक्यातल्या बारक्या avalanch मध्येही सापडलो तर पावणे सहा फुट (१७५ सेमी) चा बाप्या क्षणात जीबुलानी फुटबॉलच्या आकाराचा होऊ शकतो, पण तरीही पूजा होतेच रे, अन मिळते ते मनोबलच,माझी पोरे भोळी असतात रे ग्रामीण भागातली भारताच्या कानाकोपऱ्यातली, त्यांना आसरा वाटतो त्या फडफडत्या दिव्याचा, अन खोटे कश्याला बोलू लगा मी साहेब असलो तरी मी बी गावठीच! मला पण आसरा वाटतोच, ह्यात वरतीच लिहायचे राहिले खरे पण ह्याला उगा पूजा नजर वगैरे नको पाहू तर एक मानसिक समाधान म्हणून पाहा हे अध्याहृत आहेच :)

उडन खटोला's picture

27 Jul 2016 - 10:46 pm | उडन खटोला

हे वेग्ळेच आहेत साहेब. मस्त.

मुक्त विहारि's picture

27 Jul 2016 - 9:43 pm | मुक्त विहारि

एक नंबर.

कुणी ह्याला अंधश्रद्धा म्हणु शकते, पण.....

मलातरी तेल आणि उडीदाचा जबरदस्त फायदा झाला आहे.

आजी कडून मीठमिरची ओवाळून घेतलेस तर फार उत्तम.

बजरंगबली की जय.

ह्याचा फायदा झाला तर व्यनि केलस तरी चालेल.

खटपट्या's picture

27 Jul 2016 - 10:13 pm | खटपट्या

तेल घरुन घेउन जा. नाहीतर मंदीरातून बाहेर पडणारे तेल बाटल्यात भरून तीथेच विकायला बसलेले असतात. :)
रुइच्या पानांच्या हाराचेही तेच.
आमचा क्लास मंदीरासमोर असल्यामुळे ही गंमत बघायला मिळायची. कोणा गरीबाचे पोट भरत असेल मारुती रायामुळे...

मुक्त विहारि's picture

28 Jul 2016 - 6:29 am | मुक्त विहारि

+ १

प्रसाद गोडबोले's picture

28 Jul 2016 - 2:12 pm | प्रसाद गोडबोले

कुणी ह्याला अंधश्रद्धा म्हणु शकते, पण.

हो ना , पाहुया आता खरे डॉक्टर काय म्हणतात ते .. औचित्यभौचित्यभंग वगैरे वगैरे... आता कळेल की त्यांचे स्कोरसेटलिंग केवळ आमच्यापुरतेच मर्यादित आहे की सार्वत्रिक सार्वजनीन आहे ते !!

स्पा's picture

28 Jul 2016 - 3:15 pm | स्पा

=))

बाळ सप्रे's picture

28 Jul 2016 - 6:48 pm | बाळ सप्रे

मग डुआयडीच्या त्रासावरदेखिल वापरून पहा तेल, उडीद, नायतर आजीकडून दृष्ट

सगळं मानसिकच असतं .. :-)

मुक्त विहारि's picture

28 Jul 2016 - 7:12 pm | मुक्त विहारि

डू.आय.डी. हा जर मानसिक विभ्रम असता, आणि त्यांचा प्रश्र्न जर फक्त माझ्यापुरताच मर्यादित असता, तर गोष्ट वेगळी होती आणि आहे आणि असेल.

डू.आय.डी. ही मिपाला लागलेली कीड आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.

बादवे,

तुम्हाला डूआयडींच्या बद्दल काळजी वाटते, हे वाचून कौतूक वाटले....

असो,

आपल्या सारख्या डू.आय.डींच्या पाठीराख्याला उप-प्रतिसादांचा खेळ खेळण्या इतका आम्हाला वेळ नाही....

हा ह्या धाग्यावर आमचा, आपल्याला शेवटचा प्रतिसाद.

बाळ सप्रे's picture

28 Jul 2016 - 7:36 pm | बाळ सप्रे

डु आयडी मानसिक विभ्रम नव्हे हो.. करुन घेतलेला त्रास मानसिक असतो.. सगळे करून घेतात का?? म्हणून मानसिक म्हटलं.
एवढ्यावरून तुम्ही तर डु आयडींचा पाठीराखा वगैरे ठरवून स्वर्ग सुतावरून गाठलात.. असो _/\_

अभ्या..मस्त खा, प्या आणि मज्जा करा. मज्जानू लाईफ. जास्त विचार नका करू.

बाकी, हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद. बरीच उपयुक्त व नविन माहीती मिळाली.

वाचनखूण साठवली आहे.

संदीप डांगे's picture

29 Jul 2016 - 10:36 pm | संदीप डांगे

बरेच दिवस हा धागा पाहतोय, वाचतोय, तुला नक्की काय प्रतिसाद द्यावा हेच सुचत नव्हतं. शेवटी दोन ओळी मनात आल्या त्या देतोय खाली

तुझसे बिछडने के ख्वाब आते है, नींद से भरी गहरी रात में,
सुना है तू सोच रहा है, जाते जाते क्या दे जाऊं मेरे हात में |
जिंदा है तू, सांस ले रहा है, दुनिया है मेरी तेरी मुलाकात में,
सचमें बता, क्या रख्खा है, जेवर, मकान, पैसे और कागजात में |

अभ्या, लगा... ठणठणीत तंदुरुस्त र्‍हा. हे स्वप्न पडण्याचं कारण शोध. कोणत्या तरी भयंकर प्रेशरखाली अशी स्वप्नं पडणं कॉमन आहे. ते टेन्शन समोर दिसत नाही, बॅक ऑफ द माइन्ड तयार होतं. बीन देअर, डन दॅट!!

चंपाबाई's picture

31 Jul 2016 - 12:41 am | चंपाबाई

स्वप्न वाइट असले की प्रतक्षात चांगल्रे होते व वाइस वर्सा.

असे ऐकले आहे.

चंपाबाई's picture

31 Jul 2016 - 12:45 am | चंपाबाई

वर गामा पैलवानानेही असेच मत लिहिले आहे.

गामाचे व माझे एकमत झाले.

हे स्वप्न आहे की सत्य?

गामा पैलवान's picture

31 Jul 2016 - 2:49 am | गामा पैलवान

चंपाबाई,

माझं मत संदर्भ देऊन व्यक्त केलं आहे, तर तुमचं मत असांदर्भिक आहे. यावरून आपली सहमती स्वप्नातली नसून सत्यातली आहे.

आ.न.,
-गा.पै.

जेमतेम ४० वर्षांचा माणूस हार्टअ‍ॅटॅकने गेला आणि मला हा धागा आठवला!! :(
आयुष्यातली क्षणभंगुरता आपण टाळू शकत नाहीच परंतु मागे राहू शकणार्‍यांची तजवीज करणे अत्यंतिक गरजेचे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आणि सगळा दिवस एका विचित्र अस्वस्थतेतच गेला....