शोभिवंत होळी

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in जे न देखे रवी...
23 Jul 2016 - 5:35 pm

शोभिवंत होळी

निरव शांततेच्या मिट्ट रात्र वेळी,
आली झोपडीत माझ्या 'लाघवी' लुटारुंची टोळी

वदले नकोत चिंता आता तुझ्या कपाळी,
खाऊन भाजलेली माझीच गोड पोळी

पाहुन तारका ते भलतेच तृप्त झाले,
श्रीमंत पामराची झोपडी चंद्रमोळी

करुनी दानधर्म ते पुण्यवंत झाले,
परी पापसमुच्चयाने फाटली दीन झोळी

जखमा करुन ताज्या ते दाविती जगाला,
चितेचीही माझ्या केली शोभिवंत होळी

विझले जसे 'निखारे' झाले पसार सारे,
तीच तीच दुःखे कोणी कशा ऊगाळी

भोगले जे ही होते लिहीले माझ्याच भाळी,
सावध असा गड्यांनो येता आपुली पाळी...

आशिष

कविता

प्रतिक्रिया

एस's picture

23 Jul 2016 - 6:51 pm | एस

काव्य आवडले.

शब्दबम्बाळ's picture

24 Jul 2016 - 11:45 am | शब्दबम्बाळ

धन्यवाद!!

ज्योति अळवणी's picture

23 Jul 2016 - 8:11 pm | ज्योति अळवणी

नाही समजले

शब्दबम्बाळ's picture

24 Jul 2016 - 11:46 am | शब्दबम्बाळ

परिस्थितीने पिचलेल्या गरीबाच्या दुःखाचे आपल्या स्वार्थासाठी भांडवल करणार्या राजकारणी, वार्ताहर ई. लोकांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

जव्हेरगंज's picture

24 Jul 2016 - 2:43 pm | जव्हेरगंज

कडक!!

शब्दबम्बाळ's picture

25 Jul 2016 - 12:53 pm | शब्दबम्बाळ

मोठ्या लोकांकडून तारीफ!! धन्यवाद! :)