मंडळी, लगा हितं लय कट्टे, महाकट्टे चाल्लेले बगून पोरं म्हनली, दादा आपन का भरवत नाय एक कट्टा वो. आता मी पन विचार केला, असा पन एवडा मोट्टा कट्टा गावात आमच्या तात्यानी बांदून ठिवलाय, तित म्हातारी कोतारी तंबाकू मळत बसत्यात, तर जरा सांस्क्रुतिक आसं काम पन हुइल.
मग कार्येकर्त्यांच्या आग्रेवाला मान देवून आता आमी पन आमच्या गावात महाकट्टा करायचं ठरवलेलं हाये. आनि जरी पोरं सगळी यवस्था बगत आसली तरी आपले माननीय मित्र आनि मिपाकर आवरजून यावेत म्हनून आपुन स्वता (स्वत्ता बरका) आमंत्रन देन्यासाटी आलेलो आहे. तरी ज्यान्ला ज्यान्ला जमत असेल त्यानी येन्याचे आनि ज्याना जमत नसेल त्यानी जमवन्याचे करावे ही "विनंती".
(आदीच सांगतो. सोलापूराच्या आसपासच्या सगळ्या मिपाकरान्ला कट्टा करायचा "प्रेमाचा" आग्रेव आहे. बोलेरो गाडी घरी यिल, कार्यकर्ते प्रेमळ हायेतच तवा त्यान्ला "विनंती" करावी लागू नये यवडं बगावे. पुन्या-मुंबईलापन मोट्ट्या एसी वोल्व्हो गाड्या सोडूच तशा.)
तर बिरुटे मास्तर आनि आपल्या अभ्या.. हे दोस्त पयलेच रेडी हायेत. तसंच नावात प्रा आनि डॉ हे दोन्ही आसल्यामुळं कट्ट्याला मानाची खुर्ची बिरुटे मास्तराना देन्यात येनारे. ऐन वेळी कुनी गोन्दळ, रुसा-रुसी करु नये. मिपाचे मालक आले तरी त्याना वाळूत जागा असनारे (आपल्याला हित अध्यक्ष करत असला तर तित करु बगा तुमाला अध्यक्ष!).
खरं तर लोकान्ला प्ल्यान म्हाईत नसला म्हन्जे काय होतय ते तुमी इतर कट्ट्यान्ला बगताय न्हेमी. हित तुमाला म्हायतीय आपला बड्डे पन जंगी आसतोय ते. तवा ह्यो महाकट्टा पन जोरात प्ल्यानिंगनं असनारे हे फिक्संच बगा. तवा बिनधास्त यायचं.
तर खानं पिनं जे पायजे ते असनारे. सोत्रि काकटेलचं बगनारेत पन ज्यान्ला गावटी पायजे त्यांनी तसं सांगावं, आजिबात लाजायच काम नाय. आनि हो खास एक बोकड लावू तितच मग. फकस्त रस्ता चुकला तर शेजारी उघडं गटार हाय ते लक्षात ठिवून रस्ता चुकावा.
बाके ह्ये खानं पिनं, गानी-लावनी/ डिज्जे हे हायच हो, पन आजून म्हन्जे खास म्हन्जे खास लोकांसाटी आमी केलेलं नाटक पन हे. नाटकाबद्दल डिट्टेलमध्ये आभ्याने लिव्हलेलंच हाय तवा ते तितेच वाचा. तशी ही आयड्या आपल्या काही "लाडक्या" उत्साही मिपादोस्तांचीच पन आपल्याला त्यामधला उद्देश लगीच दिसल्याव आपन काम हातात घेतलेलंय.
पोस्टरे अभ्या बनवत आसून, बिरुटे मास्तर कथा लिव्हत हायती. तवा सग्ळं एकदम फ्रेश हे.
तसा पोरांचा आग्रेव म्हनून आपन विलनचं काम करतोय तर हिरोईन आनि बँड खास बेळगाववरनं येनारे. तेवडा एक कॉमेडियन पायजे कुनी इच्चुक असला तर सांगाच.
आनि हो, हिरोचं काम आपला कुनी पन मिपा-दोस्त करील तर लय भारी, कारन गावातली पोरं तयार हुईनात. त्याचं काये आपन एकदम खरी अॅक्टींग करतो बगा, म्हंजे कानफाडीत तर खरी कानफाडीत! पार अगदी खंग्री आवाज गेला पायजे बगा. तरीपन कुनाला कोन्चा रोल पायजे आसंल तर हितच सांगा म्हन्जे तशी यवस्था करु.
तर आस्सा सगळा जंगी बेत हाये. महाकट्टा जोरदार झाला पायजे म्हनून सगळ्यानी येनेचे करावे आनि आजून काय डिमांड, कल्पना, सूचना आसन तर हितंच सांगावी, नक्की इचार केला जाईल.
प्रतिक्रिया
11 Jul 2016 - 1:53 am | साती
खुर्चित बसलेल्या गॉगलवाल्या प्रिन्सदादाचं फ्लेक्स लागत न्हाई तोवर काय मजा न्हाई लगा!
आणि क्रिकेटची एक भव्य अंडराम म्याच पण इसरला का लगा?
ती तर आसलीच पायजे.
नाटक गिटक आसंल तर म्या शकुना माव्शीच्या रोलसाटी येनार.
11 Jul 2016 - 9:50 pm | मितभाषी
साती ताई ते सगुणा आहे.
प्लिज नोटच.
12 Jul 2016 - 1:40 am | प्रिन्सदादा
ओ ताई, ते फ्लेक्सचं काम दिलेलं हाय आपल्याच हितल्या दोस्ताला. येतंय येतंय, फ्लेक्स पन येतंय.
ठरलं बगा. एक्दम ठरलं. शकुना मावशीचा रोल नसला तर बिरुटे मास्तरांना ल्ह्यायला सांगू आन एक शकुनीमामा पन टाकू की त्यात. त्याला काय हे वो.
11 Jul 2016 - 11:41 am | पैसा
कट्टे सोडा. तुमची आर्ची कुठं आहे हुडका आधी.
12 Jul 2016 - 1:42 am | प्रिन्सदादा
आर्ची कुटंय ते तात्यास्नी माह्यती. नायतर तुमाला माह्यती आसलं तर सांगा.
आपुन आपली बुलेट तिला दिऊ की फिरवायला.
11 Jul 2016 - 11:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी अन अभ्या कट्ट्याला येणार. मला नुसतं मटनाचं उकडलेलं सूप मसाला नको हं त्यात, नरम पीस आन सोबत ओढायला नळ्याबी चालतील. व्हिस्की आसन तर आईस पाहिजेल, ग्लास मोठे. उडदाचे तळेल पापड पण पाहिजेन. मी आणले असते पर इतक्या लांब आणायचे म्हणजे ब्यागेत चुरा होईन...म्हणून मी काय आनणार नाय. अध्यक्ष मी असल्या मुळे माझ्याकडून कॉन्ट्री मागू नये प्लिज. प्रिन्स भाऊ, ष्ट्यांडला उतरल्या बरोबर तेवढी बलेरो घ्यायला पाठवा. नाय तर मी कट्ट्याला येणार नाय सांगून ठेवतो.
बाकी, कट्टा कथन लिहायची वेळ आली आहेच.
-दिलीप बिरुटे
11 Jul 2016 - 12:51 pm | गणामास्तर
सर आता तुम्ही थेट औरंगाबाद वरून येतंच आहात तर उडदा सोबत नागलीचे पण पापड आणा ना प्लिज :)
11 Jul 2016 - 12:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नागिलीचे पण आणतो, मस्त लागतात. सोबत तेल मिठाची
तळलेली हिरवी मिर्ची ! :)
-दिलीप बिरुटे
12 Jul 2016 - 1:55 am | प्रिन्सदादा
त्ये पापडाचं सोडा गनामास्तर आनि कट्ट्याला यायचं बगा तेवडं. पायजे तेवडं पापड मिळत्याल तुमाला.
12 Jul 2016 - 1:48 am | प्रिन्सदादा
बिरुटे मास्तर, राम राम. तुमी सत्कारमूर्ती हाय बगा तवा तुमच्या दारात येनारे बोलेरो. तेन्शन घ्यायचं नाय. तेवडा नाटकाचा काम तेवडा जरा मनावर घ्या लगा.
सगळं आसनारे वो तुमी काळजीच नका करु बगा. न्हाय काय मिळालं तर पोरं सोलापुरास्नं आनत्याल.
आनि हो, कोनालाही काँट्रीचा प्रश्न येनार नाय हो. प्रिन्सदादाचा महाकट्टा असनार तवा त्यो काय काँट्री काडून होनार व्हय.
11 Jul 2016 - 2:17 pm | धनंजय माने
प्रिन्स भैताड़, पोरायले का मारलं ते सांग आधी.
कट्टे करतोय *%$#%@^#$$
11 Jul 2016 - 3:07 pm | सूड
आर्ची खंय गेला मरे?
11 Jul 2016 - 3:28 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
कटट्याला येतो म्हणून जर कोणी आले नाही,तर गाठ म्झ्याशी हाय,
मी तिथं तमाशाचा फड सोडून कट्टयाला येणार हाय,
.
...
लागले लगेच कट्टे कराय,आधी धागे काढून सगळ्यांच्या वळख्या वाढवा म्हणाव,हं,कुणाच्या बुडाखाली किती अंधार हाये ते समद्या मिपाकरांना माहित्ये.
11 Jul 2016 - 4:26 pm | वडाप
ह्ये बिटरगाव म्हंजं कुरडुची वाडी का? मागल्या वर्साला हुतं तिथं.कारल्याची बिरयानी हुती बघा.अमच्या श्टोय्रा लिनारं पाचुळावालं यिनार हैत का?
11 Jul 2016 - 11:26 pm | बोका-ए-आझम
आमच्या कट्ट्याला येऊन नाय राहिले तुम्ही, येपीयमशी मारकेट बंद असतंय म्हणून! आता इकडं कसं काय जाता?
12 Jul 2016 - 7:00 am | वडाप
आलं हुतो वाशीच्या कट्ट्याला दुधाच्या गाडीत्न. तिथ्नच खरड बी टाकल्याली तुमच्या खरडफल्ल्यावर.दाग्यावरबी लिलं. तुम्मी फोटु काहाढाच्याच मागं हुता. आमचं दमामी नाइ आलतं.पारंबीला लटकनाय्राना कोन इचारतु ?
11 Jul 2016 - 8:15 pm | जावई
सयाजीराजे पार्कवर..लय मजा येईल बघा.मंडळी.
11 Jul 2016 - 9:55 pm | मितभाषी
माज करायचा फक्त पाटलांनी. बाकी काय. ......
आ....
11 Jul 2016 - 10:32 pm | बाबा योगिराज
वो प्रा डॉ, तूमच्या संग मले बी यु द्या.
.
.
वो पिरिन्स दादा, म्या काय बोलोरुत बसत नाय. आपल्याला बुलेठच पायज्येल. तुमच्या मंग्याच्या हिरीला पाणी आलं आसन तर कै पवाची शेटींग मारा.
खायाले आमाले काळ्या वाटनाचा रस्सा लागतुय.
आजून तुमाले जस जमान तसलं करा.
पाच्ची वडणारा
बाबा योगीराज.
12 Jul 2016 - 2:00 am | प्रिन्सदादा
बाबा, बोलेरो काय टोचती व्हय वो. बुलेट आपली कुनाला देत नसतोय बगा, नायतर टॅक्टर आनि ट्रॉली यिल दारात मग. ;)
रस्सा तुमाला पायजे तसा आन सोबत काय गावटी, व्हिस्की काय पायजे ते मिळंल, मग काय वड पाच्ची खुशाल. :)
12 Jul 2016 - 10:15 pm | भीमराव
नायतर टॅक्टर "आनि" ट्रॉली यिल दारात मग. ;)
आनि न्यायला येनार आसल त मी एका पायाव तयार आहे, बाकी कट्ट्याला सातार्यावन काय आनायचय?
11 Jul 2016 - 10:36 pm | मितभाषी
वढ पाच्ची....
13 Jul 2016 - 1:33 am | अभिदेश
बिरुटे मास्तर तमाशाच्या फडाला ना जाता तिकडे येणार आहेत म्हणे ...
14 Jul 2016 - 12:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पिंजरा करता का भो ? :)
-दिलीप बिरुटे
14 Jul 2016 - 12:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अकलूजच्या लावणी महोत्सवात अगदी पहिल्या नंबरची सर्वात पुढे असलेली खुर्ची मिळाली तर नुसतं पाण्यावर राहीन मी दोन तीन दिवस.
फक्त, फडाची लावणी, बैठकीची लावणी, सवाल जवाब, छकडा, चौकाची लावणी, प्रतिकात्म लावणी अशी फर्माईश राहील, होईल का फर्माईश पुरी ?
-दिलीप बिरुटे
(शाहीर ) :)
14 Jul 2016 - 10:56 pm | अभिदेश
तुम्हाला बहुदा संदर्भ काळाला नाही.
15 Jul 2016 - 5:41 am | धनंजय माने
माई मोड ऑन
अरे अभिदेश, तो दिलीप असाच करतो लहानपणापासून. मुलखाचा उतावळा. समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचंय हे न समजून घेता उत्तरं देतो. अगदी त्या आर्चीच्या भावासारखा च बघ. ह्यांचं मत विचारतोयस? नको विचारुस,जाऊ दे. आता प्रा डॉ झालाय म्हणून गप्प असतात हे सुद्धा. असो!
माई मोड ऑफ.
15 Jul 2016 - 6:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> तुम्हाला बहुदा संदर्भ काळाला नाही
ब्वारं !
-दिलीप बिरुटे
14 Jul 2016 - 2:41 pm | शिद
प्रिन्सदादा, कट्ट्याला येताना तलवार घेवून येणार का?
त्यावरून ठरवता येईल की कट्ट्याला यायचं की नाही. ;)