मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बिटरगाव - जंगी महाकट्टा आवतान

प्रिन्सदादा · · काथ्याकूट
मंडळी, लगा हितं लय कट्टे, महाकट्टे चाल्लेले बगून पोरं म्हनली, दादा आपन का भरवत नाय एक कट्टा वो. आता मी पन विचार केला, असा पन एवडा मोट्टा कट्टा गावात आमच्या तात्यानी बांदून ठिवलाय, तित म्हातारी कोतारी तंबाकू मळत बसत्यात, तर जरा सांस्क्रुतिक आसं काम पन हुइल. मग कार्येकर्त्यांच्या आग्रेवाला मान देवून आता आमी पन आमच्या गावात महाकट्टा करायचं ठरवलेलं हाये. आनि जरी पोरं सगळी यवस्था बगत आसली तरी आपले माननीय मित्र आनि मिपाकर आवरजून यावेत म्हनून आपुन स्वता (स्वत्ता बरका) आमंत्रन देन्यासाटी आलेलो आहे. तरी ज्यान्ला ज्यान्ला जमत असेल त्यानी येन्याचे आनि ज्याना जमत नसेल त्यानी जमवन्याचे करावे ही "विनंती". (आदीच सांगतो. सोलापूराच्या आसपासच्या सगळ्या मिपाकरान्ला कट्टा करायचा "प्रेमाचा" आग्रेव आहे. बोलेरो गाडी घरी यिल, कार्यकर्ते प्रेमळ हायेतच तवा त्यान्ला "विनंती" करावी लागू नये यवडं बगावे. पुन्या-मुंबईलापन मोट्ट्या एसी वोल्व्हो गाड्या सोडूच तशा.) तर बिरुटे मास्तर आनि आपल्या अभ्या.. हे दोस्त पयलेच रेडी हायेत. तसंच नावात प्रा आनि डॉ हे दोन्ही आसल्यामुळं कट्ट्याला मानाची खुर्ची बिरुटे मास्तराना देन्यात येनारे. ऐन वेळी कुनी गोन्दळ, रुसा-रुसी करु नये. मिपाचे मालक आले तरी त्याना वाळूत जागा असनारे (आपल्याला हित अध्यक्ष करत असला तर तित करु बगा तुमाला अध्यक्ष!). खरं तर लोकान्ला प्ल्यान म्हाईत नसला म्हन्जे काय होतय ते तुमी इतर कट्ट्यान्ला बगताय न्हेमी. हित तुमाला म्हायतीय आपला बड्डे पन जंगी आसतोय ते. तवा ह्यो महाकट्टा पन जोरात प्ल्यानिंगनं असनारे हे फिक्संच बगा. तवा बिनधास्त यायचं. तर खानं पिनं जे पायजे ते असनारे. सोत्रि काकटेलचं बगनारेत पन ज्यान्ला गावटी पायजे त्यांनी तसं सांगावं, आजिबात लाजायच काम नाय. आनि हो खास एक बोकड लावू तितच मग. फकस्त रस्ता चुकला तर शेजारी उघडं गटार हाय ते लक्षात ठिवून रस्ता चुकावा. बाके ह्ये खानं पिनं, गानी-लावनी/ डिज्जे हे हायच हो, पन आजून म्हन्जे खास म्हन्जे खास लोकांसाटी आमी केलेलं नाटक पन हे. नाटकाबद्दल डिट्टेलमध्ये आभ्याने लिव्हलेलंच हाय तवा ते तितेच वाचा. तशी ही आयड्या आपल्या काही "लाडक्या" उत्साही मिपादोस्तांचीच पन आपल्याला त्यामधला उद्देश लगीच दिसल्याव आपन काम हातात घेतलेलंय. पोस्टरे अभ्या बनवत आसून, बिरुटे मास्तर कथा लिव्हत हायती. तवा सग्ळं एकदम फ्रेश हे. तसा पोरांचा आग्रेव म्हनून आपन विलनचं काम करतोय तर हिरोईन आनि बँड खास बेळगाववरनं येनारे. तेवडा एक कॉमेडियन पायजे कुनी इच्चुक असला तर सांगाच. आनि हो, हिरोचं काम आपला कुनी पन मिपा-दोस्त करील तर लय भारी, कारन गावातली पोरं तयार हुईनात. त्याचं काये आपन एकदम खरी अ‍ॅक्टींग करतो बगा, म्हंजे कानफाडीत तर खरी कानफाडीत! पार अगदी खंग्री आवाज गेला पायजे बगा. तरीपन कुनाला कोन्चा रोल पायजे आसंल तर हितच सांगा म्हन्जे तशी यवस्था करु. तर आस्सा सगळा जंगी बेत हाये. महाकट्टा जोरदार झाला पायजे म्हनून सगळ्यानी येनेचे करावे आनि आजून काय डिमांड, कल्पना, सूचना आसन तर हितंच सांगावी, नक्की इचार केला जाईल.

वाचने 10419 वाचनखूण प्रतिक्रिया 29

साती 11/07/2016 - 01:53
खुर्चित बसलेल्या गॉगलवाल्या प्रिन्सदादाचं फ्लेक्स लागत न्हाई तोवर काय मजा न्हाई लगा! आणि क्रिकेटची एक भव्य अंडराम म्याच पण इसरला का लगा? ती तर आसलीच पायजे. नाटक गिटक आसंल तर म्या शकुना माव्शीच्या रोलसाटी येनार.

In reply to by साती

खुर्चित बसलेल्या गॉगलवाल्या प्रिन्सदादाचं फ्लेक्स लागत न्हाई तोवर काय मजा न्हाई लगा!
ओ ताई, ते फ्लेक्सचं काम दिलेलं हाय आपल्याच हितल्या दोस्ताला. येतंय येतंय, फ्लेक्स पन येतंय.
नाटक गिटक आसंल तर म्या शकुना माव्शीच्या रोलसाटी येनार.
ठरलं बगा. एक्दम ठरलं. शकुना मावशीचा रोल नसला तर बिरुटे मास्तरांना ल्ह्यायला सांगू आन एक शकुनीमामा पन टाकू की त्यात. त्याला काय हे वो.

In reply to by पैसा

आर्ची कुटंय ते तात्यास्नी माह्यती. नायतर तुमाला माह्यती आसलं तर सांगा. आपुन आपली बुलेट तिला दिऊ की फिरवायला.

मी अन अभ्या कट्ट्याला येणार. मला नुसतं मटनाचं उकडलेलं सूप मसाला नको हं त्यात, नरम पीस आन सोबत ओढायला नळ्याबी चालतील. व्हिस्की आसन तर आईस पाहिजेल, ग्लास मोठे. उडदाचे तळेल पापड पण पाहिजेन. मी आणले असते पर इतक्या लांब आणायचे म्हणजे ब्यागेत चुरा होईन...म्हणून मी काय आनणार नाय. अध्यक्ष मी असल्या मुळे माझ्याकडून कॉन्ट्री मागू नये प्लिज. प्रिन्स भाऊ, ष्ट्यांडला उतरल्या बरोबर तेवढी बलेरो घ्यायला पाठवा. नाय तर मी कट्ट्याला येणार नाय सांगून ठेवतो. बाकी, कट्टा कथन लिहायची वेळ आली आहेच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे मास्तर, राम राम. तुमी सत्कारमूर्ती हाय बगा तवा तुमच्या दारात येनारे बोलेरो. तेन्शन घ्यायचं नाय. तेवडा नाटकाचा काम तेवडा जरा मनावर घ्या लगा.
मी अन अभ्या कट्ट्याला येणार. मला नुसतं मटनाचं उकडलेलं सूप मसाला नको हं त्यात, नरम पीस आन सोबत ओढायला नळ्याबी चालतील. व्हिस्की आसन तर आईस पाहिजेल, ग्लास मोठे.
सगळं आसनारे वो तुमी काळजीच नका करु बगा. न्हाय काय मिळालं तर पोरं सोलापुरास्नं आनत्याल. आनि हो, कोनालाही काँट्रीचा प्रश्न येनार नाय हो. प्रिन्सदादाचा महाकट्टा असनार तवा त्यो काय काँट्री काडून होनार व्हय.

कटट्याला येतो म्हणून जर कोणी आले नाही,तर गाठ म्झ्याशी हाय, मी तिथं तमाशाचा फड सोडून कट्टयाला येणार हाय, . ... लागले लगेच कट्टे कराय,आधी धागे काढून सगळ्यांच्या वळख्या वाढवा म्हणाव,हं,कुणाच्या बुडाखाली किती अंधार हाये ते समद्या मिपाकरांना माहित्ये.

वडाप 11/07/2016 - 16:26
ह्ये बिटरगाव म्हंजं कुरडुची वाडी का? मागल्या वर्साला हुतं तिथं.कारल्याची बिरयानी हुती बघा.अमच्या श्टोय्रा लिनारं पाचुळावालं यिनार हैत का?

In reply to by बोका-ए-आझम

वडाप 12/07/2016 - 07:00
आलं हुतो वाशीच्या कट्ट्याला दुधाच्या गाडीत्न. तिथ्नच खरड बी टाकल्याली तुमच्या खरडफल्ल्यावर.दाग्यावरबी लिलं. तुम्मी फोटु काहाढाच्याच मागं हुता. आमचं दमामी नाइ आलतं.पारंबीला लटकनाय्राना कोन इचारतु ?

वो प्रा डॉ, तूमच्या संग मले बी यु द्या. . . वो पिरिन्स दादा, म्या काय बोलोरुत बसत नाय. आपल्याला बुलेठच पायज्येल. तुमच्या मंग्याच्या हिरीला पाणी आलं आसन तर कै पवाची शेटींग मारा. खायाले आमाले काळ्या वाटनाचा रस्सा लागतुय. आजून तुमाले जस जमान तसलं करा. पाच्ची वडणारा बाबा योगीराज.

In reply to by बाबा योगिराज

बाबा, बोलेरो काय टोचती व्हय वो. बुलेट आपली कुनाला देत नसतोय बगा, नायतर टॅक्टर आनि ट्रॉली यिल दारात मग. ;) रस्सा तुमाला पायजे तसा आन सोबत काय गावटी, व्हिस्की काय पायजे ते मिळंल, मग काय वड पाच्ची खुशाल. :)

In reply to by प्रिन्सदादा

भीमराव 12/07/2016 - 22:15
नायतर टॅक्टर "आनि" ट्रॉली यिल दारात मग. ;) आनि न्यायला येनार आसल त मी एका पायाव तयार आहे, बाकी कट्ट्याला सातार्यावन काय आनायचय?

In reply to by अभिदेश

अकलूजच्या लावणी महोत्सवात अगदी पहिल्या नंबरची सर्वात पुढे असलेली खुर्ची मिळाली तर नुसतं पाण्यावर राहीन मी दोन तीन दिवस. फक्त, फडाची लावणी, बैठकीची लावणी, सवाल जवाब, छकडा, चौकाची लावणी, प्रतिकात्म लावणी अशी फर्माईश राहील, होईल का फर्माईश पुरी ? -दिलीप बिरुटे (शाहीर ) :)

In reply to by अभिदेश

धनंजय माने 15/07/2016 - 05:41
माई मोड ऑन अरे अभिदेश, तो दिलीप असाच करतो लहानपणापासून. मुलखाचा उतावळा. समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचंय हे न समजून घेता उत्तरं देतो. अगदी त्या आर्चीच्या भावासारखा च बघ. ह्यांचं मत विचारतोयस? नको विचारुस,जाऊ दे. आता प्रा डॉ झालाय म्हणून गप्प असतात हे सुद्धा. असो! माई मोड ऑफ.