कॉर्न कटलेट

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
22 Sep 2008 - 5:36 pm

साहित्य- ५ मध्यम आकाराचे बटाटे, १ वाटी मक्याचे दाणे-अमेरिकन पिवळे मके असतील तर उत्तमच, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, साधारण २ पेराएवढा आल्याचा तुकडा,४ ते ५ लसूण पाकळ्या,४ ते ५ ब्रेड स्लाईस,मीठ, तेल, ४ते ५ चमचे रवा
कृती- बटाटे उकडून घ्या. मके जर कॅन्ड नसतील तर तेही बटाट्यांबरोबर उकडा.कॅन्ड मके उकडण्याची गरज नाही.चाळणीवर टाकून मक्यातले पाणी काढून टाका.कॅन्ड मके असतील तरी चाळणीवर टाकून नळाखाली धरा म्हणजे प्रिझर्वेटिवचा वास जाईल.बटाटेही चाळणीवर टाकून कोरडे होऊ द्या. साले काढून कुस्करा. वाटीने किवा पावभाजीच्या चेपणीने चेपून घ्या. नसल्यास किसून घ्या.
पावाचे स्लाइस पाण्यातून काढा व पिळून घ्या. हा गोळा किसलेल्या बटाट्यांत मिसळा.मके मिसळा.
आले,लसूण ,मिरची वाटून त्याची पेस्ट करा व ही पेस्ट वरील गोळ्यात मिसळा. मीठ चवीनुसार घाला. हे मिश्रण मळून सगळीकडे तिखट मीठ लागेल असे पहा.
एका ताटलीत रवा घ्या.गोल, लांबट हव्या त्या आकाराचे कटलेट वळा व हे कटलेट रव्यात घोळवा आणि पॅनमध्ये मध्यम आचेवर शॅलोफ्राय करा.
गरम गरम कटलेट टोमॅटो सॉस किवा स्प्रिंगरोलबरोबरच्या आंबटगोड चिली सॉस बरोबर खा किवा जोडीला भेळेची चिंचगूळ खजुराची चटणी असेल तर क्या केहेने!!
टीप- १. ह्या साहित्यात साधारण २० कटलेट्स होतात.
२. कॉर्नऐवजी किवा कॉर्न+ मटार घालूनही हे कटलेट्स छान लागतात.कॉर्न आणि मटार घ्यायचे असतील तर दोन्ही प्रकार अर्धी अर्धी वाटी घ्या.
३. (गणामास्तर व त्यांच्या सारख्या अनेकांसाठी) बटाटे उकडलेले असतील आणि कॅन्ड मके असतील तर हे कटलेट्स ३५ ते ४० मिनिटात होतात.

प्रतिक्रिया

किट्टु's picture

22 Sep 2008 - 5:46 pm | किट्टु

छान रेसिपि आहे....

एकदम सायंकाल साठी... आजच करेल!!!

थोडी खादाड,
किट्टु... :)

स्वाती राजेश's picture

22 Sep 2008 - 6:06 pm | स्वाती राजेश

मी कालच केले होते...
पण रव्यात न घोळता ब्रेडक्रम्स्मधे घोळले कारण तळताना रवा तेलात पसरतो,करपतो आणि तेल लवकर खराब होते.

आणि कटलेटचे छोटे छोटे गोळे करून टुथपिक मधे घालुन तळावेत मुलांना लॉलीपॉप सारखे खायला आवडते....

लिखाळ's picture

22 Sep 2008 - 6:46 pm | लिखाळ

मस्तच आहे पाकृ. आणि चित्र सुद्धा मस्त ! :)
काल आम्ही बटाटवडे करत असताना मक्याच्या पॅटिसची आठवण निघाली होती आणि स्वातीताईला पा़कृ विचारु असे ठरले.. आज पाकृ समोर पाहुन आनंद झाला. आता लगेच करुन पाहु..
--लिखाळ.

लिखाळ's picture

22 Sep 2008 - 11:38 pm | लिखाळ

स्वातीताई,
आज लगेच कटलेट करुन पाहिले. मस्त झाले..

पाकृ साठी आभार.
--लिखाळ.

विसोबा खेचर's picture

22 Sep 2008 - 11:46 pm | विसोबा खेचर

धन्यवाद लिखाळगुरुजी,

आपलीही पाकृ केव्हातरी एखाददा मिपाच्या मुखपृष्ठावर चढवण्यास आम्हाला आवडेल! :)

तात्या.

लिखाळ's picture

22 Sep 2008 - 11:50 pm | लिखाळ

वा वा.. आम्हालासुद्धा ते पहायला आवडेल :)

केशवसुमार's picture

23 Sep 2008 - 2:38 am | केशवसुमार

दिनेश म्हणतहोता.. लिखाळांचा 'प्रेमालाप' कटलेटच्या आकारातऊन सुध्दा चालू आहे..
रिबिट्..रिबिट..डराव डराव..
बाकी चालू द्या..
स्वगतः सगळी लोकं.. नुसती पा.कृ. वाचून आणि फोटो बघूनच वा वा करतात.. तुझ बरयकेश्या .. प्रतक्श पिराक्टिल ..

लिखाळ's picture

23 Sep 2008 - 2:45 am | लिखाळ

मस्त !!

चकली's picture

22 Sep 2008 - 6:56 pm | चकली

छान पाकृ.
"कटलेटचे छोटे छोटे गोळे करून टुथपिक मधे घालुन तळावेत मुलांना लॉलीपॉप सारखे खायला आवडते" - हे बेस्ट!

चकली
http://chakali.blogspot.com

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2008 - 7:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वातीताई, मस्त पाकृ! आमच्या कँटीनमधे दिली तर चालेल ना? ते लोक फारच **** कॉर्न कटलेट्स बनवतात म्हणून!

जैनाचं कार्ट's picture

22 Sep 2008 - 7:02 pm | जैनाचं कार्ट (not verified)

खाद्य पदार्थाचे फोटो दाखवणे मिपावर बंद केले पाहीजे बॉ !!!!!!!!

आम्हाला तर तोंड दाबुन पोटावर मार पडत आहे असे वाट आहे !

रेसेपी आवडली... !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

रेवती's picture

22 Sep 2008 - 7:09 pm | रेवती

स्वातीताई,
छान रेसिपी! फोटूही झकास!

रेवती

विसोबा खेचर's picture

22 Sep 2008 - 7:23 pm | विसोबा खेचर

स्वाती,

पाकृ नेहमीप्रमाणेच उत्तम. मी आता एकदा ठरवून जर्मनीत तुझ्या घरी चांगला ८ दिवस मुक्काम ठोकणार आहे आणि तुझ्या हातची यथेच्छ खादाडी करणार आहे! :)

बाय द वे,

आज कॉर्न कटलेटला मिपाच्या मुखपृष्ठावर स्थान देऊन समस्त मिपाकरांना कॉर्न कटलेट खाऊ घालण्याचं परस्पर श्रेय मी लाटत आहे! :)

तुझा,
(शाळूसोबती) तात्या.
पी ई सोसायटीची प्राथमिक शाळा,
प्रधान बिल्डिंग, स्टेशन समोर,
ठाणे (पश्चिम)

स्वाती दिनेश's picture

22 Sep 2008 - 7:55 pm | स्वाती दिनेश

कधी येतोस बोल? लवकर ठरव.. केसु आणि डॉन पण आहेत इथे. लिखाळही फ्राफुला नक्की येईल..मस्त खादाडी आणि गप्पा गाणी इ. इ... करू..:)
स्वाती

प्राजु's picture

22 Sep 2008 - 7:51 pm | प्राजु

एकदम खतरनाक... आजच करणार..
धन्स.. धन्स.. धन्स..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्राजु's picture

23 Sep 2008 - 5:41 am | प्राजु

एकदम भारी झाले होते..
धन्यवाद स्वातीताई..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रियाली's picture

22 Sep 2008 - 7:54 pm | प्रियाली

माझ्या आवडीची पाककृती परंतु मक्याचे पांढरे दाणे अधिक आवडतात. स्वीट कॉर्नने एक गोडुस चव येते. अर्थात, अमेरिकेत सहसा पर्याय नसतो पण कधीतरी व्हाईट कॉर्नही मिळून जातो.

मनस्वी's picture

22 Sep 2008 - 8:01 pm | मनस्वी

मस्त पाकृ!
फोटू तर लईच भारी!

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

प्रभाकर पेठकर's picture

22 Sep 2008 - 11:47 pm | प्रभाकर पेठकर

टेस्टी कॉर्न कटलेटची पाककृती सोपी आणि साधी आहे. करून पाहिले पाहीजे.

अभिनंदन.

विसोबा खेचर's picture

22 Sep 2008 - 11:51 pm | विसोबा खेचर

ही कटलेटं दारूसोबतही छान लागतील! :)

आपला,
(जे ऍन्ड बी प्रेमी) तात्या.

शितल's picture

23 Sep 2008 - 1:09 am | शितल

स्वाती ताई,
कटलेट चा फोटो आणि रेसिपी दोन्ही मस्त,
लिखाळ यांचे ही हार्ट शेप मधले कटलेट मस्तच दिसत आहेत.
आता सर्व सामान आहे घरी करून पहातेच.
मग बोलते.
:)

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2008 - 9:08 am | पिवळा डांबिस

आम्ही म्हटलेलं खरं झालं.....
http://www.misalpav.com/node/2377

"स्वातीबाई कटलेट तळते....
कोंबडी सोडून, हाडकाचं
मिपावर लिहिणं धोक्याचं ग, मिपावर लिहिणं धोक्याचं..."
:)

चतुरंग's picture

23 Sep 2008 - 9:13 am | चतुरंग

जर्मनीवासीयांची मज्जा चालू आहे सध्या! :)

(खुद के साथ बातां : हा केसू हल्ली कविता, गजल काहीही लिहीत नाहीये, अंमळ हादडून झोपत असेल ढाराढूर! ;) )

चतुरंग

ईश्वरी's picture

24 Sep 2008 - 8:09 am | ईश्वरी

मस्तच आहे पाकृ, स्वाती . आणि फोटो ही छान आलाय!
ईश्वरी

परीसा's picture

24 Sep 2008 - 12:12 pm | परीसा

मी कालच केले. इतके मस्त झाले होते! करता करतानाच सगळ्यांच्या पोटात जात होते.

परीसा

स्वाती दिनेश's picture

24 Sep 2008 - 6:23 pm | स्वाती दिनेश

बर्‍याच जणांनी लगेचच प्रात्यक्षिक केलेले वाचून आनंद झाला.
लिखाळ,फोटो लय भारी!
स्वाती(राजेश),डीपफ्राय करताना रवा जळतो,तेल खराब होते.बरोबर!पण मी शॅलो फ्राय करते,पॅन किवा तव्यावर. त्याला हा प्रॉब्लेम येत नाही.
यमे, तुझ्या क्यांटिनवाल्याला जरुर पाकृ दे.
प्रियाली, पिवळ्या मक्यांनी गोडुस चव येते,ती आवडते म्हणून पिवळे मके प्रेफर करते.
तात्या,कधीही ये,स्वागत आहे.
सर्वांना धन्यवाद.
स्वाती

मिंटी's picture

25 Sep 2008 - 12:27 pm | मिंटी

स्वाती ताई फारच मस्त आणि सोपी पाककॄती...
धन्यवाद....

आता लगेच करुन बघेन आणि तुला कळवेन मला जमलं का नाही करायला ते....