प्रो कबड्डी - सिझन ४

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
25 Jun 2016 - 11:37 pm
गाभा: 

प्रो कबड्डीचा ४ था मोसम आज २५ जुन २०१६ रोजी सुरु झाला. अती क्रिकेटचा कंटाळा आल्या नंतर मी दुसर्‍या खेळांचा दर्शक होण्याचा प्रयत्न करत होतो. फुटबॉल कडे मन आकर्षित होत होते आणि अचानक प्रो कबड्डीची सुरुवात झाली. साधारण दुसर्‍या सिझनपासून खेळातला रस वाढत गेला. मुंबईकर असल्यामुळे घरची टीम म्हणून 'यु मुंबा' चा नैसर्गीक समर्थक आणि नंतर चाहता बनलो. 'यु मुंबा' ने दुसर्‍या सिझनचे विजेतेपद पटकावल्यानंतर त्यांचा वाट्याला आलेले प्रेम वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आले. ३ र्‍या सिझनच्या अंतिम फेरीतील निसटता पराभव मनाला काही काळापुरता टोचत राहिला.
या सगळ्या पार्शभुमीवर ४ था सिझन फार लवकर घोषीत झाला तेव्हा कबड्डीचे ही क्रिकेट होणार काय ही शंका मनाला चाटून गेली. काय होते ते पुढे कळेलच मात्र प्रो. कबड्डीमुळे कबड्डीला वलय लाभतेय व मातीतल्या रांगड्या खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत हे पाहून मनास आनंद देखील होत आहेत.

अनुप कुमार, राकेश कुमार, रिशांक देवाडिगा, मनजित चिल्लर, नरवाल आडनावबंधु, निलेश शिंदे, फजल अत्रांचली (इराण), जां कुं ली (कोरिया) (नाव लिहिण्यात चुकले असल्यास दुरुस्ती सुचवावी) आणि इतर खेळाडुंनी प्रेक्षकांना भरभरुन आनंद दिलाय.

या सिझनमधे यु मुंबाचे बरेच तगडे खेळाडू इतर संघांनी खरेदी केले आहेत. जवळपास ५०% संघ नवीन आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये. या खेळात मिनिटामिनिटाला रंग बदलत असल्यामुळे शेवटपर्यंत रंगतदार लढती होत आहेत. त्यामुळे यावेळचे विजेते कोण असतील याचा अंदाज लावणे सद्यातरी अवघड आहे. यंदा पहिल्यांदाच महिला संघ देखील खेळत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे केवळ दोनच संघ असून एकच सामना होईल. अधिक माहितीसाठी प्रो कबड्डीची अधिकृत वेबसाईट बघता येईल.

प्रो कबड्डी सिझन्सचे आत्तापर्यंतचे विजेते याप्रमाणे.

सिझन १ : जयपुर पिंक पँथर्स
सिझन २ : यु मुंबा
सिझन ३ : पटना पायरेटस
===================================================

प्रो कबड्डी सिझन ४ चे संघ खालीलप्रमाणे (कंसात माझ्या आवडत्या खेळाडूंची नावे)
१. बंगाल वॉरीयर्स (निलेश शिंदे /जां कुं ली / सुरजित नरवाल / विशाल माने / महेंद राजपूत)
२. बंगळूरु बुल्स ( मोहित चिल्लर / सुरिंदर नाडा)
३. दबंग दिल्ली ( काशिलींग आडके)
४. जयपुर पिंक पँथर्स ( शब्बीर बाप्पू / राजेश नरवाल / रण सिंग)
५. पटना पायरेटस ( फजल अत्रांचली / बाजीराव होडगे / प्रदिप नरवाल)
६. पुणेरी पलटण ( मनजित चिल्लर / अजय ठाकूर / दिपक निवास हुड्डा)
७. तेलुगु टायटन्स (संदिप नरवाल / राहुल Chaudhari)
७. यु मुंबा (अनुप कुमार / राकेश कुमार / रिशांक देवाडीगा / जीवा कुमार)

यंदा एकूण संघांमधला मराठी टक्का देखील लक्षणीय रित्या वाढलेला आहे.

सात संघ आणि जवळ जवळ ३५ दिवस हे सामने रंगणार आहेत.
तर चला, आपल्या मातीत जन्मलेल्या या खेळाचा आनंद घेऊ या आणि चर्चा करत राहूया.

==================================================

प्रतिक्रिया

दिवस १ ला - सामना क्र. १ पुणेरी पलटण वि. तेलुगु टायटन्स

घरी वेळेवर पोहोचू न शकल्याने ह्या सामन्याचे काही अंतिम क्षणच वाट्याला आले. मात्र शेवटच्या काही अटीतटीच्या मिनीटांत पुणेरी पलटणने रोमांचक खेळ करत ४ गुणांनी हा सामना जिंकला.
मागील मोसमात देखील मनजित चिल्लर ने पुण्यास कित्येक एकहाती विजय मिळवून दिले होते. त्याचीच पुनरावृत्ती त्याने आज केली. हा अतिशय तडफेचा खेळाडू आहे पण स्वभावाने अतिशय तापट त्यामुळे खेळादरम्यान चर्चेत असतो.

दिवस १ ला - सामना क्र. २ यु मुंबा वि. जयपुर पिंक पँथर्स
मुंबईच्या घरच्या मैदानावर जयपुर ने मुंबईला एकदा धुळ चारली होती मात्र आज यु मुंबाने आज त्याची पुर्ण भरपाई केली. कॅप्टन कुल अनुप कुमार आणी चढाईतील हिरो रिशांक देवाडीगा आज हवे तेवढे चमकले नाही मात्र राकेश कुमार ने चढाई व पकड या दोन्ही विभागांत उत्तम कामगीरी केली. मागील मोसमांत मुंबई संघाचा भाग असलेल्या पण यावेळी जयपुरकडून खेळणार्‍या शब्बीर बाप्पू ने यु मुंबाच्या तोंडाला शेवटपर्यंत फेस आणला होता. मात्र शेवटच्या काही मिनिटांत सामना फिरला आणी यु मुंबा विजयी झाली.

मुंबईचे पकड करणारे खेळाडू (फजल अत्रांचली आणी मोहित चिल्लर ) इतर संघांत गेल्यामुळे पकड करणारी फळी आज कमकुवत वाटली.

विजयी संघांचे अभिनंदन !

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Jun 2016 - 6:54 am | कैलासवासी सोन्याबापु

अहाहा प्रो कबड्डी सुरु!!!, काही कारणांनी बघू शकत नाहीये, तरी तुमच्याकडून चालू घडामोडी घ्यायला आवडतील पीकेएल संदर्भात. कोरियाचा जंग कुन ली आवडला होता आपल्याला मागल्या मोसमात, इराणी पोरे पण भारी दिसायला गोरीगोमटी पण खेळायला वट्ट एकदम, फझल अत्रंचली, हादी ओहस्रोक, मुहम्मद माकसुदुलु मस्त लोक्स आहेत.

अवांतर - मागच्या गुरुवारी नॅशनल जियोग्राफीक चॅनलवर 'कबड्डी- द स्पोर्ट ऑफ इंडिया' ही डॉक्युमेंटरी दाखवली होती, कबड्डीला इतक्या आकर्षक वेष्टणात कसे गुंडाळले गेले, प्लेयर्स कसे मॅनेज होतात वगैरे रंजक कार्यक्रम होता एक तासभर. बऱ्याच गमती जमती होत्या त्यात, उदाहरणार्थ, पोषणमूल्ये समजवून डाएट शिकवायला आलेल्या nutritionist ला खेळाडूंनी घालवून दिले होते कारण तो तूप खाऊ देत नसे वगैरे किस्से होते.

खटपट्या's picture

26 Jun 2016 - 8:12 am | खटपट्या

खूप छान धागा मित्रा

धर्मराजमुटके's picture

26 Jun 2016 - 10:46 pm | धर्मराजमुटके

सोन्याबापू, खटपट्या, प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
मी देखील त्या डॉक्युमेंटरीचे शेवटचे काही क्षण पाहिले होते.

दिवस २ रा : सामना क्र. ३ : बंगळुरु बुल्स वि. बंगाल वॉरीयर्स
शेवटच्या सत्रात हाती असलेली ६ गुणांची बढत बंगाल वॉरीयर्स वाल्यांनी अतीघाई करुन घालविली व त्याची परिणीती शेवटी हरण्यात झाली. केवळ १ गुणांची आघाडी घेऊन बंगळुरु बुल्स ही लढत जिंकली. मात्र जां कुं ली ने या मोसमातील पहिली सुपर रेड करुन आपले नाणे खणखणीत आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले. बंगाल वाल्यांनी पकड करुन जास्तीत जास्त गुण कमवून पुढे जाव हेच चांगले आहे. (बं.बु. २४ विरुद्ध बं.वॉ. २३)

दिवस २ रा : सामना क्र. ४ : पुणेरी पलटण वि. यु मुंबा
गेल्या ३ मोसमात पुणेरी पलटण एकदाही यु मुंबाला हरवु शकली नव्हती मात्र ती कमाल आजच्या सामन्यात पाहायला मिळाली. पुण्याने सुरुवातीपासूनच दमदार खेळ करत प्रचंड आघाडी घेतली. अजय ठाकूर ने सुपर रेड मधे जबरदस्त कमाल केली. त्याला मनजित चिल्लर ने देखील तशीच साथ दिली. पुण्याचा संघ जो चांगल्या पकडीसाठी ओळखला जात होता त्यांनी चढाई देखील जबरदस्त केली व तब्बल २२ गुणांनी यु मुंबईला धोबीपछाड दिला. अनुप कुमारने शेवटपर्यंत राकेश कुमार जास्त वेळा खेळविले नाही याचे मला राहून राहून आश्चर्य वाटत आहे. एकंदरीत ही फारच अपमानास्पद हार होती. एकंदरीत मुंबईची पकड फळी या वेळेस खुपच कमकुवत असल्यामुळे ते ह्या वेळी सेमी फायनल पर्यंत तरी पोहोचतील की नाही याची शंकाच आहे.
(पु.प. ४१ विरुद्ध यु.मुंबा. १९)

दिग्विजय भोसले's picture

26 Jun 2016 - 11:29 pm | दिग्विजय भोसले

मजा येते बघायला,
आपला कासेगावचा(सांगली) काशी कॅप्टन आहे दिल्ली संघाचा.

अभ्या..'s picture

26 Jun 2016 - 11:49 pm | अभ्या..

ओढ रं मर्दां.
लावलास झेंडा दिल्लीवर.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jun 2016 - 5:23 am | कैलासवासी सोन्याबापु

काशिलिंग अडके!! जबऱ्या रेडर आहे गडी

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2016 - 9:28 am | धर्मराजमुटके

येस. पण चांगला माणूस चुकीच्या संघात आहे. गेल्या तीन मोसमात दिल्लीचा संघ काही प्रभाव दाखवू शकलेला नाहिये. मात्र यावेळी यु मुंबा सोडता बाकीचे संघ चांगलेच संतुलित दिसतायेत.
दिल्ली ने गेल्या तीन मोसमात एकदाही पहिला सामना जिंकलेला नाहिये. बघुया आज काय होतेये ते !

आजचा सामना बंगाल वॉरीयर्स वि. दबंग दिल्ली रात्री ८.०० वाजता.

उल्का's picture

27 Jun 2016 - 5:58 am | उल्का

गेल्या सिझनचे 80% सामने पूर्ण बघितले. ह्या सिझनचे पहिले दोन दिवस चुकले. वाईट वाटत होतं. पण हे वाचल्यावर आनंद झाला.
आजपासून न चुकता (जमेल तसं) नक्की बघणार आहे.
धन्यवाद!

कालचा सामना एकदम बेक्कार होता यु मुंबाचा... आधीच सगळे चांगले प्लेयर्स दुसर्या संघात गेलेत त्यामुळे खुप वाईट वाटतय...

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2016 - 10:16 pm | धर्मराजमुटके

दिवस ३ रा : सामना क्र. ५ : दबंग दिल्ली वि. बंगाल वॉरीयर्स
दिल्ली वि. बंगाल चा सामना चांगलाच रंगला. काशीने दिल्ली ला चांगली सुरुवात करुन दिली. इराणी मिराज शेख ने दिल्ली ला ३ वेळा ऑल ऑऊट होण्यापासून वाचविले मात्र त्याची प्रयत्नांची शर्थ कामी आली नाही. बंगाल ने कालच्या चुका जाणीवपुर्वक टाळल्या. त्यांनी आपल्या उत्तम बचाव / पकड फळीच्या जोरावर हा सामना जिंकला. दिल्लीला पहिल्या सामन्यात हरण्याचा आपल्या भाळी लागलेला डाग पुसता आला नाही. निलेश शिंदेने आज आपला सर्वोत्तम खेळ केला. बंगालतर्फे बदली आलेला खेळाडू रवि दलाल यानेही संघाला एक सुपर रेड मिळवून दिली.

सामना बंगाल ने जिंकला असला तरी मिराज ने आज प्रेक्षकांची मने जिंकली.

बंगाल वॉरीयर्स (३१) - दबंग दिल्ली (२३) - बंगाल ने हा सामना ८ गुणांनी जिंकला.
--------------------------------------------------------------------------------------------------

दिवस ३ रा : सामना क्र. ६ : पुणेरी पलटण वि. पटना पायरेटस पुणेरी पलटण आजपर्यंत पटना पायरेटला हरवू शकली नाही. तोच परिपाठ आज पुढे चालू राहिला.
पटणाने उत्तम प्रदर्शन करीत सामना ६ गुणांनी जिंकला.
पटना पायरेटस (३० गुण) - पुणेरी पलटण (२४)

धर्मराजमुटके's picture

28 Jun 2016 - 10:57 pm | धर्मराजमुटके

दिवस ४ था : सामना क्र. ७ - पुणेरी पलटण वि. दबंग दिल्ली
यु मुंबाला हरवून फॉर्मात असलेल्या पुणेरी पलटण चा अश्वमेध काल पाटण्याने रोखला तर आज दिल्ली सारख्या तुलनेने कनिष्ठ संघाबरोबर सामना बरोबरीत सोडवावा लागला. मात्र मनजित चिल्लरच्या व्यवस्थापन चातुर्याला दाद द्यावीच लागेल. जो सामना जिंकू शकत नाही तो निदान बरोबरीत तरी सोडवावा यासाठी तो आपले सर्वस्व पणाला लावतो.

लेकाला उद्या शाळेत बॅट हवी असल्याकारणाने आणी प्रथमच होणारी अनाहिता कबड्डी सामन्याची मजा घ्यायची असल्यामुळे त्याला पहिला सामना नाही बघीतला तरी चालणार होता. त्यामुळे पहिल्या सामन्याची पुर्ण वेळ मजा घेऊ शकलो नाही.

पुणेरी पलटण (२७) वि. दबंग दिल्ली (२७)

===========================================
दिवस ४ था : महिला कबड्डी सामना क्र. १ - फायर बर्डस वि. आईस दिवाज
अनाहितांचा प्रत्येक क्षेत्रातला यशस्वी वावर ध्यानात घेऊन या मोसमात पहिल्यांदाच महिला संघांचे वेगळे सामने खेळविले जात आहेत. आजच्या सामन्यादरम्यान खास पाहुणी म्हणून भारतीय महिला क्रिकेट संघाची कप्तान मिताली राज उपस्थित होती.

या सामन्याचे वेगळेपण म्हणजे पुरुषांचा खेळ ४० मिनिटांचा तर महिला संघांचा खेळ ३० मिनिटांचा होता. महिलांचे खेळाचे मैदान देखील आकाराने छोटे असते असे वार्तांकनात सांगण्यात आले मात्र प्रो कबड्डीमधे वेगळ्या मैदानाची व्यवस्था नसल्यामुळे काही खेळाडूंची दमछाक झालेली दिसत होती.

एकंदरीत सामना उत्कंठापुर्ण झाला व महिला संघ देखील उत्तमपणे खेळले. फायरबर्ड संघाची कप्तान ममता पुजारी ने व्यक्तीगत खेळ व संघव्यवस्थापन या दोन्ही कसोट्यांवर उत्तम काम केले.

फायर बर्डस (२५) ने आईस दिवाज (१२) या संघाला १३ गुणांनी पराभुत केले.

स्टॉर्म क्वीन नावाचा अजुन एक महिला संघ स्पर्धेत आहे. एकंदरीत ८ सामने आपल्याला बघायला मिळणार आहेत.

अवांतर : महिला कबड्डीचे संघ, त्यांच्या केशभुषा बघून मला 'चक दे इंडीया' चित्रपटाची आठवण झाली तर मैदानाचा छोटा आकार, कमी वेळाचा खेळ या चर्चा बघतांना मिपावरील "महिला वायुदल पायलटस" या धाग्यावरील प्रतिसादांची आठवण आली.

एकंदरीत आजचा दिवस सार्थकी लागला.

विजेत्यांचे अभिनंदन !

नया है वह's picture

29 Jun 2016 - 5:50 pm | नया है वह

+१

धर्मराजमुटके's picture

29 Jun 2016 - 10:47 pm | धर्मराजमुटके

दिवस ५ था : सामना क्र. ८ - जयपुर पिंक पँथर्स वि. तेलुगु टायटन्स जयपुर (२८ गुण) वि. तेलुगु टायटन्स (२४ गुण)

=============================================
दिवस ५ था : सामना क्र. ९ - पटना पायरेट्स वि. वि. यु मुंबा पटणा पायरेटस (३६ गुण) वि. यु मुंबा (३४ गुण)

आज पुन्हा मनात निराशा दाटून आली. आता झोप येण्यासाठी काहीतरी उपाय करावा लागणार. देवा वाचव रे बाबा यु मुंबाला !

आणि हो ! विजेत्यांचे जड मनाने अभिनंदन !!

विअर्ड विक्स's picture

30 Jun 2016 - 9:41 am | विअर्ड विक्स

तरी सामना चुरशीचा झाला म्हणायचा. कारण दुसऱ्या ऑल आऊट नंतर मी टीव्ही निराशेने बंद केला. यंदा यू मुंबा साखळीतच गारद व्हायची चिन्हे आहेत. बचाव पूर्णतः कमकुवत. आक्रमण फळीत विविधता नाही. राकेश कुमार हा मागच्या season ला सुध्दा timepass raid नि बचावासाठी घेतला होता. त्याला आक्रमणाला पाठवले तर बचाव अजून दुबळा पडेल.

प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद !
तुमचे म्हणणे बरोबर आहे पण जेव्हा एखाद्या खेळाडूचा खेळ होत नसेल तेव्हा वेगळा पर्याय निवडणे कधीही श्रेयस्कर आहे. एकंदरीत कोणताही सामना पाहिला तरी प्रत्येक दिवसाच्या सामन्याच्या सामन्याचा एक हिरो नक्की असतो. आणि तो हिरो तुम्हाला पहिल्या काही चढायांमधेच माहिती पडतो. काल अनुपच्या हालचालीत अजिबातच चपळता नव्हती. ४० मिनिटांच्या खेळात तुम्ही निर्णय किती लवकर घेता याला फारच महत्त्व असते. बघुया उद्याच्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात काय होतेय ते !

धर्मराजमुटके's picture

30 Jun 2016 - 11:49 pm | धर्मराजमुटके

दिवस ६ वा : सामना क्र. १० : जयपुर पिंक पँथर्स वि. बंगळुरु बुल्स
बंगळुरु बुल्स ने आजपर्यंतच्या ३ सीझन्समधे जयपुर ला त्यांच्या घरच्या मैदानावर एकदाही हरविलेले नव्हते. तो इतिहास आज बदलणार काय यावर कबड्डीप्रेमींची नजर होती. हा सामना अपेक्षेनुसार अटीतटीचा झाला. जयपुर संघाचे मालक श्री. अभिषेकराव बच्चन यांच्या चेहर्‍यावर संपुर्ण सामना संपेपर्यंत "आता वाजले की बारा" छाप भाव होते. मात्र जेव्हा शेवटच्या मिनिटाला सामना बरोबरीत सुटला तेव्हा त्यांनी आनंद व्यक्त केला. अशाच प्रकारचे भाव श्रीमती जया बच्चन यांच्या चेहर्‍यावर जयपुर वि. मुंबईच्या सामन्यात बघायला मिळाले होते. चेहरा कोरा ठेवण्याच्या बाबतीत त्यांनी घरातच शिकवणी लावायला हवी होती. असो. हे जास्तच वैयक्तीक होतयं बहुतेक !

दुसर्‍या सत्रात जयपुर टीम पिछाडीवर पडली होती व आज इतिहास बदलणार असे वाटत होते. मात्र जयपुरचा संघनायक जसबीर सिंगने आज उत्तम चढाया, उत्तम पकडी करत आपल्या नेतृत्त्वगुणाची छाप सोडली. शेवटच्या मिनिटांमध्ये जबरदस्त खेळ करुन हरु पाहणारा सामना अगदी शेवटच्या चढाईमधे बरोबरीत सोडवला. आज जसबीरने चढाईत ५ तर पकडींमधे ४ अशी एकूण ९ गुणांची कमाई केली आणी सन्मान मिळविला.
बंगळुरु च्या संघात माझे आवडते मोहित चिल्लर आणि सुरींदर नाडा यांनीही चांगला खेळ केला. रोहित कुमार या खेळाडूनेही चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.
जयपुर पिंक पँथर्स २८ वि. बंगळुरु बुल्स २८ ( सामना बरोबरीत सुटला)

====================================================

दिवस ६ वा : महिला कबड्डी सामना क्र. २ : आईस दिवाज वि. स्टॉर्म क्वीन आईस दिवाज (२८ गुण) वि. स्टॉर्म क्वीन (१५ गुण).
आईस दिवाज १३ गुणांनी विजयी
तुर्तास विजेत्यांचे अभिनंदन ! आणि उद्या यु मुंबा काय करते ह्याकडे लक्ष. उद्या परत भेटूया !

शुभरात्री !

विअर्ड विक्स's picture

1 Jul 2016 - 12:38 pm | विअर्ड विक्स

अभिलाषा , ललिताचा खेळ उत्तम होता काल... जसवीर नी मनजीत चिल्लर दोघेही कठीण परिस्थितीत सामना फिरवतात संघासाठी. अश्या एखाद्या खेळाडूची मुंबाला गरज आहे.

avinash kulkarni's picture

1 Jul 2016 - 8:56 am | avinash kulkarni

महिला कब्बडीपटू अंतिम रेषेजवळ ज्या पकडी करत होत्या त्या केवळ लाजबाब .

पाटील हो's picture

1 Jul 2016 - 10:08 am | पाटील हो

आजचा सामना कोण जिंकणार ..

१ ) यु मुंबा X दबंग दिल्ली = ???
२) जयपुर पिंक पँथर्स X बंगाल वॉरीयर्स = ???

धर्मराजमुटके तुमाला काय वाटतय ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Jul 2016 - 11:45 am | कैलासवासी सोन्याबापु

मुंबई जिंकणार पहिल्या सामन्यात अन दुसऱ्या सामन्यात बंगाल!.

सचिन रिटायर झाल्या पासून क्रिकेट बगायचा इच्छा कमी झालाय तशीच अवस्था चिल्लर, नाडा, आणि विशाल माने गेल्या पासून यु मुंबा च्या बद्दल झालाय..

यु मुंबा च्या शरीरातला प्राणच गेलाय राव...

विअर्ड विक्स's picture

1 Jul 2016 - 12:36 pm | विअर्ड विक्स

आहे जीवा तरी खातायत शिव्या अशी मुम्बाच्या बचावाची अवस्था आहे. एकही कॉर्नर खेळाडू चांगला नाहीये सध्या. मोहित , फझल नि सुरेंदर नसल्यामुळे मुंबा दात पडका साप झालाय...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2016 - 2:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाहतोय कबड्डी.

-दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

1 Jul 2016 - 11:17 pm | धर्मराजमुटके

दिवस ७ वा : सामना क्र. ११ : यु मुंबा वि. दबंग दिल्ली
आज मुंबईने लाज राखली. शेवटपर्यंत रोमहर्षक झालेल्या ह्या सामन्यामध्ये मुंबईने दिल्ली ला २ गुणांनी मात दिली. मात्र दिल्लीचा खेळ मागील ३ सीझनपेक्षा कितीतरी पटीने उत्तम होत आहे हे मान्य करावेच लागेल.
दिल्लीकडून सचिन शिंगाडे ने उत्तम पकडी करत ५ गुण मिळविले तर सेल्वामनी आणि काशिलींग अडकेने चांगल्या चढाया केल्या. मात्र आज मुंबईचे नशीब जोरावर असल्यामुळे रिशांक देवाडीगाने १३ गुणांची कमाई केली तर आणी त्याला अनुप व राकेश कुमार ने चांगली साथ दिली. रिशांक ने आज एक सुपर रेड देखील केली.
यु मुंबा २७ गुण वि. दबंग दिल्ली २५ गुण (मुंबई २ गुणांनी विजयी)

=====================================================
दिवस ७ वा : सामना क्र. १२ : जयपुर पिंक पँथर्स वि. बंगाल वॉरीयर्स
जयपुरच्या घरच्या मैदानावर जसबीर सिंगने आज परत आपले नेतॄत्त्वगुण सिद्ध करत बंगाल वॉरीयर्स हा ३ गुणांनी हरवून सोन्याबापूंच्या प्रतिसादात व्यक्त केलेल्या अंदाजाला धक्का दिला. हा सामना देखील शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झाला. जसजसे सामने होत जातील तसतश्या लढती रंगत जातील हे निश्चित ! जयपुर ने आज जास्तीत जास्त वेळ निलेश शिंदेपासून दुर राहणे पसंत केले. आज जसबीर सिंग आणि शब्बीर बाप्पू ने दमदार खेळ करीत डोळ्यांचे पारणे फेडले. जेव्हा जेव्हा मुंबईचे माजी खेळाडू उत्तम खेळ करतात तेव्हा ते जर आज मुंबई संघात असते तर किती बहार आली असती असे स्मरणरंजन करावे लागते.
जयपुर पिंक पँथर्स ३६ गुण वि. बंगाल वॉरीयर्स ३३ गुण ( जयपुर ३ गुणांनी विजयी)

विजेत्यांचे अभिनंदन आणि प्रतिसादकांचे आभार ! उद्या पुन्हा भेटूया, शुभरात्री !

कपिलमुनी's picture

2 Jul 2016 - 12:08 am | कपिलमुनी

या वेळेस पूर्ण फिट आहे, त्याने मॅच काढली

धर्मराजमुटके's picture

3 Jul 2016 - 12:26 am | धर्मराजमुटके

दिवस ८ वा : सामना क्र. १३ : दबंग दिल्ली वि. बंगळुरु बुल्स
जयपुरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आज झालेल्या दबंग दिल्ली वि. बंगळुरु बुल्स या सामन्यात अखेर दिल्लीने या मोसमातील पहिल्यावहिल्या विजयाची नोंद केली. आज चढाईपटूंपेक्षा पकडी करणार्‍यांनीच सामना चांगला रंगविला. दिल्लीच्या सचिन शिंगाडे ने आज पकडीत तब्बल ७ गुणांची कमाई केली तर इराणी मिराज शेखने चढाईमधे ७ गुण मिळविले. सेल्वामनी व काशिलिंग ने देखील त्यांना चांगली साथ दिली.
दबंग दिल्ली ३२ गुण वि. बंगळुरु बुल्स २४ गुण ( दिल्ली ८ गुणांनी विजयी)
================================================
दिवस ८ वा : सामना क्र. १४ : जयपुर पिंक पँथर्स वि. पुणेरी पलटण
या सामन्यात पुण्याचे पारडे अगोदरपासूनच जड वाटत होते. मुंबईवर मिळवलेल्या विजयानंतर नंतरच्या दोन सामन्यात पुण्याला विजयाने हुलकावणी दिली होती. मात्र आज जयपुरला हरवून त्यांनी जोरदार पुनरागमन केले. आजच्या सामन्यात दिपक निवास हुड्डा हा हिरो ठरला. काही कामानिमित्त हा सामना पुर्ण बघता आला नाही. आणि इकडे तिकडे वाचून लिहिणे मनाला पटत नाही त्यामुळे आजचा वॄत्तांत थोडक्यात आटोपता घेतो.

उद्यापासून पुढील काही सामने हैदराबादमधे होतील.

जयपुर पिंक पँथर्स २८ गुण वि. पुणेरी पलटण ३३ गुण ( पुणेरी पलटण ५ गुणांनी विजयी)

विजेत्यांचे अभिनंदन आणी प्रतिसादकांचे, वाचकांचे आभार ! उद्या परत भेटूया, शुभरात्री !

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 Jul 2016 - 7:40 am | कैलासवासी सोन्याबापु

मुटके साहेब, प्रो कबड्डीच्या समग्र घडामोडी आम्हा मेंबरांपुढे मांडायची आपली सदिच्छा, प्रत्येक सामन्याचा वृत्तांत मांडायची चिकाटी अन तत्परतेने ते लिहून पोस्ट करायची शिस्त ह्याची मी दाद देतो अन आपले मनःपूर्वक आभार मानतो.

आपल्या ह्या स्तुत्य प्रयत्नामुळे आपण प्रो कबड्डीचा हा मोसम पाहू शकत नसल्याचे जाणवतच नाही.

आपले पुनश्च आभार

-बाप्या

धर्मराजमुटके's picture

3 Jul 2016 - 10:35 pm | धर्मराजमुटके

प्रतिसादाबद्द्ल आभार बापु ! हा प्रयत्न शेवटपर्यंत तडीस न्यायचा मानस आहे. बघु या कितपत जमते ते !

विअर्ड विक्स's picture

3 Jul 2016 - 10:54 pm | विअर्ड विक्स

यु मुंबा सावरली ......
आजच्या विजयात मागील ३ सिझन ची झळक दिसली.

धर्मराजमुटके's picture

3 Jul 2016 - 11:08 pm | धर्मराजमुटके

यस्सार ! सेम फिलींग हिअर ! आज कोणत्याही खेळाडूने वैयक्तीकरित्या जास्त गुण कमाविले नाही तरी देखील संघभावनेने खेळलेला सामना त्यांच्या पदरात विजयाचे दान टाकून गेला.
मात्र त्याचबरोबर असा खेळ पुणेरी पलटन, पटना पायरेटस किंवा जयपुर समोर फार काळ टिकू शकला नसता हेही तितकेच खरे.

धर्मराजमुटके's picture

3 Jul 2016 - 11:06 pm | धर्मराजमुटके

दिवस ९ वा : सामना क्र. १५ : पटना पायरेटस वि. तेलुगु टायटन्स
हैदराबाद या तेलुगु टायटन्सच्या घरच्या मैदानावर झालेला आजचा सामना अत्यंत चुरशीचा झाला. मागच्या सीजनमधे एकाच संघाकडून खेळणारे प्रदिप नरवाल व संदिप नरवाल आज एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनून उभे होते. संदिप नरवालमधे तोच जोश, तीच तडफ दिसून आली मात्र प्रदिप नरवालने जोश आणि होश दोन्हीं गुणांचा वापर करुन आज पटना पायरेटला विजय मिळवून दिला. सामना अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत एका बाजूकडून दुसर्‍या बाजूस फिरत होता. पटना पायरेटसच्या एकूण ३५ गुणांपैकी ११ गुण एकट्या प्रदिप ने कमावले. तेलगु टायटन्सच्या बाजूने राहूल चोधरी ने देखील ११ गुणांची कमाई केली मात्र त्याची तपश्चर्या आज फळास आली नाही. संदिप नरवाल ने जोशपुर्ण खेळ केला पण शेवटच्या काही मिनिटांत त्याने आतताईपणा आणि अतीआत्मविश्वास दाखविला आणि तो त्यांना भोवला.
ज्या कोणी हा सामना बघीतला नसेल त्यांना ह्या सामन्याची क्षणचित्रे बघण्याची मी शिफारस करतो.

या मोसमात पटना आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत आणि ३ ही वेळा जिंकले आहेत. तर तेलुगु टायटन्स ३ सामने खेळले आहेत आणि ३ ही वेळा पराभूत झाले आहेत.

पटना पायरेटस (३५ गुण) वि. तेलुगु टायटन्स (३३ गुण) - पटना पायरेटस २ गुणांनी विजयी

=================================================================
दिवस ९ वा : सामना क्र. १६ : यु मुंबा वि. बंगाल वॉरीयर्स
पहिल्या सामन्याच्या तुलनेत हा दुसरा सामना जवळपास एकतर्फी व बराचसा संथ झाला. मात्र अपेक्षेनुसार यु मुंबाने त्यांच्या तुलनेत कमजोर असलेल्या बंगाल वॉरीयर्सवर ८ गुणांनी विजय मिळविला.
सुरुवातीपासूनच चांगला खेळ खेळत यु मुंबाने बंगालवर चांगली बढत घेतली व ती शेवटपर्यंत टिकवत नेली. आज रिशांक देवाडीगाने चांगल्या पकडी करत ५ गुणांची कमाई केली तर त्याला सुरजित व बदली खेळाडू सुरेशु ने देखील चांगली साथ दिली. आज बंगालची बचाव / पकडफळी अजिबातच प्रभाव टाकू शकली नाही. मात्र मुंबईच्या चढाई आणि बचाव / पकडफळीने अतिशय अचूक खेळ केला. एखाद दुसरी खेळी सोडता त्यांनी मागील सर्व चुका टाळल्या. राकेशकुमार ने देखील आज उत्तम पकडी करत ४ गुण मिळविले. राकेशकुमार आज पुर्ण ४० मिनिटे मैदानावर पाय रोवून उभा होता. जीवाकुमार ला आज जास्त वाव मिळाला नाही. मात्र त्याची जागा आज सुरजित ने घेतली. चढाई आणि पकड या दोन्ही आघाड्यांवर त्याने उत्तम कामगिरी केली. अनुप आज वैयक्तीकरित्या उत्तम खेळ करु शकला नाही मात्र एकंदरीत सांघिक कामगिरी उत्तम झाली.
आजच्या लढतीत बंगाल ८ गुणांनी हारल्यामुळे त्यांना एकही नवीन गुण प्राप्त झाला नाही. तसेच आजपर्यंत झालेल्या एकाही सामन्यामधे यु मुंबाला ते हरवू शकले नाहीत. हा विक्रमदेखील आजपर्यंत कायम राहिला.
यु मुंबा (२६ गुण) वि. बंगाल वॉरीयर्स (१८ गुण) - यु मुंबा ८ गुणांनी विजयी.

धर्मराजमुटके's picture

4 Jul 2016 - 10:55 pm | धर्मराजमुटके

दिवस १० वा : सामना क्र. १७ : पुणेरी पलटण वि. बंगळुरु बुल्स
आजचा हा सामना देखील कालच्या पटणा वि. तेलुगु टायटन्सच्या सामन्या प्रमाणेच अतिशय रोमहर्षक झाला. आज बंगळुरु च्या रोहित कुमार ने चढाईत ८ गुण तर मोहित चिल्लर ने पकडी करतांना ६ गुण मिळविले. सामना शेवटच्या क्षणापर्यंत पुण्याचा पदरात पडेल असे वाटत होते मात्र शेवटच्या काही मिनिटांत बंगळुरु ने उत्तम खेळ करत पुण्याला २ गुणांनी मात दिली.
पुण्याच्या दिपक निवास हुड्डा ने सामन्याच्या ३ र्‍या मिनिटालाच सुपर रेड करीत करुन पुण्याला आघाडी मिळवून दिली. महत्त्वाचे म्हणजे पुण्याचा सुपरस्टार मनजित चिल्लर चे नाणे आज वाजलेच नाही. बुल्सने आज त्याला बराच वेळ मैदानाबाहेर बसविले.
पुणेरी पलटण (२६ गुण) वि. बंगळुरु बुल्स (२८ गुण) - बंगळुरु बुल्स २ गुणांनी विजयी.
================================================================
दिवस १० वा : सामना क्र. १८ : तेलुगु टायटन्स वि. बंगाल वॉरीयर्स
कालचा आणि आजचा दिवस बंगाल वॉरीयर्स साठी जवळपास सारखाच होता. तेलुगु टायटन्सने कालच्या हरण्यापासून बोध घेत चुका टाळल्या मात्र बंगालने कालच्या पराभवाने खचून जाऊन की काय पण कालच्या पेक्षा जास्त अपमानास्पद हार आज स्वीकारली. आज शेवटच्या मिनिटाची चढाई करण्यासाठी बंगालचा कर्णधार निलेश शिंदे केवळ एकटा मैदानावर उभा होता.
आजच्या लढतीचे हिरो होते राहुल चौधरी आणि संदिप धुल. संदिप धुल ने तर आज बंगालच्या सगळ्याच चढाईपटूंना धुळ चारली असे म्हटल्यास वावगे ठरु नये. राहुल चौधरी आजचा सुपर टेन ठरला तर संदिप धुल ने पकडी करत ८ गुणांची कमाई केली.
बंगाल ने आज उल्लेख करावा अशी कोणतीही कामगिरी केली नाही. काल यु मुंबाने ८ गुणांनी हरविले तर आज तेलुगु टायटन्सने १७ गुणांनी अपमानास्पद पराभव केला.
आजचा सामना बघून मला यु मुंबा वि. पुणेरी पलटणचा सामना आठवला.
बंगाल वॉरीयर्स (१८ गुण) वि. तेलुगु टायटन्स (३५ गुण ) - तेलुगु टायटन्स १७ गुणांनी विजयी.

विजेत्यांचे अभिनंदन !

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jul 2016 - 6:54 am | कैलासवासी सोन्याबापु

धुल कायम आवडत आलाय, चणीने बारीक तरीही विलक्षण जास्त तंत्रशुद्ध खेळ असलेला खेळाडू आहे असे वाटते, शांतीत क्रांती प्रकार एकंदरीत

धर्मराजमुटके's picture

6 Jul 2016 - 12:51 pm | धर्मराजमुटके

काल रात्रीपासुन मिपा बंद असल्यामुळे अपडेटस टाकत आले नाही.

दिवस ११ वा
दिवस ११ वा : सामना क्र. १९ : तेलुगु टायटन्स वि. बंगळुरु बुल्स
उर्वरीत भारतासाठी अण्णा वि. अण्णा हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. राहुल चोधरी आणि रोहित कुमार या दोघांवर आज प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र आज रोहित कुमारची सरशी झाली. रोहित कुमार आज ११ गुणांची कमाई केली तर त्याला विनोद कुमार ने चांगली साथ दिली. तेलुगु टायटन्सने आज पकडी करतांना बर्‍याच चुका केल्या. शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात शेवटी बंगळुरु ने तेलुगु टायटन्सला २ गुणांनी मात दिली.
तेलुगु टायटन्स (२८ गुण) वि. बंगळुरु बुल्स (३० गुण) - बंगळुरु बुल्स २ गुणांनी विजयी.
================================================ =======
दिवस ११ वा : महिला कबड्डी सामना क्र. ३ : फायर बर्डस वि. स्टॉर्म क्वीन्स
आतापर्यंत महिला कबड्डी सामन्यात १) फायर बर्ड्स वि. आईस दिवाज २) आईस दिवाज वि. स्टॉर्म क्वीन्स आणि ३) स्टॉर्म क्वीन्स वि. फायर बर्डस असे एकूण ३ सामने झाले आहेत.
पहिला सामना फायर बर्ड्स ने जिंकला तर दुसरा सामना आईस दिवाज जिंकला. आजचा ३ रा सामना दोन्ही संघांना १४-१४ गुण मिळाल्यामुळे अनिर्णीत राहिला. एकूणातच तिन्ही संघांनी प्रत्येक सामन्यात प्रगतीच केलेली आढळली.
फायर बर्ड्सची कप्तान ममता पुजारीने ६ गुण मिळविले मात्र स्टॉर्म क्वीन्सच्या तेजस्विनी बाई ला फक्त एकच गुणाची कमाई करता आली. तिने आतापर्यंत दोन सामने खेळलेले आहेत मात्र अजून तरी ती तेजाने तळपलेली नाहिये.

============================================================
काही कारणास्तव दोन्ही सामने नीट लक्ष देऊन पाहता आले नाही त्यामुळे आजचा वॄत्तांत संक्षीप्त स्वरुपाचा आहे.

आजचा तेलुगु टायटन्स वि. यु मुंबाचा सामना रक्तदाब वाढविणारा असेल हे निश्चित ! तेलुगु टायटन्स आजच्या पराभवाने पेटून उठतात की दबावाखाली येतात ते कळेल. तोपर्यंत फक्त अंदाज बांधणेच हाती आहे. बघु या काय होते ते !

विजेत्या संघांचे अभिनंदन !

रघुनाथ.केरकर's picture

6 Jul 2016 - 1:38 pm | रघुनाथ.केरकर

यंदाच्या मोसमात आमच्या ठाण्याच्या खेळाडुंचा सहभाग बर्यापैकी आहे.

नीलेश साळुन्खे- तेलुगु - जय शंकर कल्याण
प्रशांत चव्हाण - पुणेरी - ओम कबड्डी कल्याण
गिरीश एर्नाक - बेंगाल - ओम कबड्डी कल्याण
उमेश म्हात्रे - बेंगाल - समर्थ काल्वार भिवंडी
सुशिल भोसले - बेंगाल - ओम कबड्डी कल्याण

मागल्या सिजन चा
जितेश जोशी पुणेरी छत्रपती डोंबीवली
शिवतरकर बेंगाल - ओम कबड्डी कल्याण

कल्याण डोंबीवली ठाणे भिवंडी कडे अजुन किती तरी गुणी खेळाडु आहेत.

धर्मराजमुटके's picture

6 Jul 2016 - 2:27 pm | धर्मराजमुटके

होय ! तसे म्हटले तर बंगालचा संघ हाच खर्‍या अर्थाने महाराष्ट्राचा संघ आहे.

रघुनाथ.केरकर's picture

6 Jul 2016 - 4:45 pm | रघुनाथ.केरकर

निलेश शिन्दे - मुम्बई शहर- बिपिसिएल
विशाल माने -मुम्बई शहर- बिपिसिएल
नितिन मदने -सान्ग्ली-बिपिसिएल
क्रुश्ना मदने -सान्ग्ली
पुर्वीचा बाजीराव होडगे- मुम्बै पोलीस
सुशील भोसले - कल्याण- बैन्क ओफ इन्डीया

अजुन एक नमुद करावस वाटत.
सचीन खाम्बे ने ३ सीजन जसा लेफ्ट कोर्नर लावला होता, तसा एर्नाक ला नाही जमत. अजुन तरी तस दीसत नाही.

रघुनाथ.केरकर's picture

6 Jul 2016 - 1:46 pm | रघुनाथ.केरकर

प्रो कबड्डी च्या काही गोष्टींंचे मात्र कौतुक वाटते, जसे की

बिपिसिएल चे बहुतेक खेळाडु प्रो कबड्डीत असताना, बिपिसिएल चेच
सुहस म्हात्रे (क्याप्ट्न - रायगड), शैलेश सावंत (क्याप्ट्न रत्नागिरी)

तसेच महिंद्रा चे पण कोणी दिसत नाही.

रघुनाथ.केरकर's picture

6 Jul 2016 - 1:54 pm | रघुनाथ.केरकर

निलेश साळुंखे - व्यवसाइक संघ - महींद्रा

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Jul 2016 - 5:13 pm | कैलासवासी सोन्याबापु

केरकरांशी सहमत!,

तसंही समालोचनात (हिंदी किंवा इंग्लिश) कायम सांगतात

"महाराष्ट्र कबड्डीका गढ है, यहां के लोग यहां का बच्चा बच्चा कबड्डी समजता है और पसंद भी करता है"

धर्मराजमुटके's picture

6 Jul 2016 - 11:48 pm | धर्मराजमुटके

हा तर समालोचकांच्या मनाचा मोठेपणा आहे. मात्र आजही मराठी माणूस वर्तमानकाळापेक्षा भुतकाळातच रमतो. यात आमच्या सारख्या सर्वसामान्यांपासून ते उधोजीराजे यापैकी कुणाकुणाचाच अपवाद करता येणार नाही. आजचा कबड्डीचा खरा गढ असेल तर तो हरियाणा च आहे. आणि जाट हाच खरा कबड्डीसम्राट आहे.

अवांतर : 'सामना' तील क्रीडा वार्तांकन पाहिले पाहिजे बुवा एकदा. त्यातील शीर्षके नक्कीच अशी असतील.

१. राजपुतांनी दिल्लीच्या शहेनशहाचा कोथळा बाहेर काढला.
२. मरहट्टे लडे तो रजपुत पडे
३. कन्नडीगांनी झाडली लुंगी तर मद्राशांची वाजली पुंगी
४. पुण्याने मारला बाण आणि आडवा झाला बंगाली वाघ

कल्पनाशक्तीला जास्त ताण देववत नाहिये आज फार. थांबतो.

महत्त्वाची टीप : उपरोक्त प्रतिसादात आलेले जातीय / प्रांतिय उल्लेख कोणाला उच्च नीच लेखण्यासाठी नाहित तर केवळ एक विनोद म्हणून आहेत याची कृपया नोंद घ्यावी. माझ्या मनात सगळ्या जाती / प्रांतांबद्दल आदर आहेच. तरीही कोणाच्या भावना दुखविल्या जात असतील तर अ‍ॅडव्हान्समधे माफी मागतो.

John McClain's picture

6 Jul 2016 - 9:07 pm | John McClain

दबंग दिल्ली ने निराशा केली...
खूपच एकतर्फी सामना झाला (अल्मोस्ट)

- fan of काशी

धर्मराजमुटके's picture

6 Jul 2016 - 11:34 pm | धर्मराजमुटके

दिवस १२ वा : सामना क्र. २० : दबंग दिल्ली वि. जयपुर पिंक पँथर्स
शाळेत असतांना दिल्ली पडली किंवा दिल्लीचे तख्त फोडले असे उल्लेख इतिहासाच्या पुस्तकात वारंवार येत असत. त्याचा शब्दशः अनुभव म्हणजे आजचा दिल्ली वि. जयपुरचा सामना. दबंग दिल्ली चे नाव डरपोक बिल्ली ठेवले तरी काही फरक पडू नये असा अपमानास्पद पराभव आज दिल्लीने पाहिला. तब्बल २५ गुणांनी पराभुत होणारा हा चारही मोसमातला कदाचित पहिलाच संघ असेल.
पहिला सामना हरणे, जास्तीत जास्त गुणांनी सामना हरणे, अमक्या तमक्या संघाविरुद्ध सामना कधीच न जि़ंकू शकणे असे सगळे नकारात्मक विक्रम बहुधा दिल्लीच्याच नावे असावेत. काशिलींग आडके व मिराज शेख आज वैयक्तीकरित्या चांगले खेळले मात्र सांघिक खेळाच्या गुणवत्तेत आज ते फारच कमी पडले. सचिन शिंगाडे ने तर आज फारच चुका करुन प्रतिस्पर्ध्यांना काही मोफत गुण मिळवून दिले.
आज जयपुरच्या राजेश नरवाल आणि कप्तान जसवीर सिंग ने उत्तम खेळी केलया. बाकी संघाने देखील त्यांना चांगली साथ दिली.
आज अभिषेक बच्चन मैदानावर हजर असता तर त्याचा सलमान खान नक्कीच झाला असता.

जयपुर पिंक पँथर्स (५१ गुण) वि. दबंग दिल्ली (२६ गुण) - जयपुर २५ गुणांनी विजयी.
==================================================================

दिवस १२ वा : सामना क्र. २१ : तेलुगु टायटन्स वि. यु मुंबा
कालच लिहिल्याप्रमाणे यु मुंबा ने सामन्याच्या शेवटपर्यंत रक्तदाब वाढवत वाढवत नेला आणि ५ गुणांनी पराभव स्वीकारला. तेलुगु टायटन्सचा राहुल चौधरी ने आणि बदली खेळाडू विक्रम साळुंखे ने उत्तम खेळी करत यु मुंबाला २ वेळा सर्व बाद केले. मुंबईचा बचाव आज अस्तित्त्वातच नव्हता असे म्हटले तरी चालेल. मात्र आज या मोसमात प्रथमच राकेश कुमार ने पुर्ण वेळ चढाया करुन १० गुणांची कमाई केली मात्र त्याची ही पुण्याई मुंबईची नौका तारु शकली नाही. रिशांक देवाडिगा, अनुप कुमार, सुरींदर भोला ने आज फारशी चमक दाखविली नाही. मात्र सुरेशु ने "करा किंवा मरा" चढायांमधे खरोखरीच कमाल केली. त्याच्या पहिल्या चढाईत जवळपास ४ खेळाडू बाद होते मात्र चुकीचा निर्णय दिला गेला आणि त्याला आव्हानही दिले गेले नाही. अनुपने शेवटच्या दोन चढाया लाजवाब केल्या मात्र "देर आये इसलिये दुरुस्ती नही हो पाई भाई" !

महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामन्या दरम्यान एकंदरीत ५ वेळा बदली खेळाडू बोलाविले जाऊ शकतात. शेवटच्या वेळी चुकुन राहूल ला बाहेर पाठविले गेले तेव्हा तो अगदीच नाराज झाला होता. मात्र त्यामुळेच मुंबई अपमानास्पद पराभवापासून वाचली.

मी अगोदरच्या प्रतिसादांमधे म्हटल्याप्रमाणे राकेश कुमार ला सुरुवातीपासूनच चढाई मोहिमेवर पाठवायला पाहिजे होते. त्याने आज आपली लायकी सिद्ध केली आहे. आणि तो लक बाय चान्स खेळणारा खेळाडू नव्हे तर खरोखरीच अष्टपैलू खेळाडू आहे.

असो.
यु मुंबा हारणार च होती हे माहित होते मात्र शेवटी जाता जाता दोन्ही संघांच्या गुणांमधली प्रचंड तफावत भरुन काढली हे ही नसे थोडके ! सामना हरणारा संघ आणि जिंकणारा संघ यांच्या गुणांमधे ७ किंवा कमी गुणांचा फरक असला तर हारणार्‍या संघास देखील १ गुण मिळतो.
तेलुगु टायटन्स (३५ गुण )वि. (यु मुंबा ३० गुण) - तेलुगु टायटन्स ५ गुणांनी विजयी.

विजेत्यांचे अभिनंदन !

भाकीत : यु मुंबा आणी दबंग दिल्ली पुढील होणारा अजून एक एक सामना पराभूत होतील असा अंदाज वाटतो. खोटा ठरला तर आनंदच होईल. लेटस वेट अँड वॉच !

शुभरात्री !

रघुनाथ.केरकर's picture

7 Jul 2016 - 10:45 am | रघुनाथ.केरकर

"बदली खेळाडू विक्रम साळुंखे ने उत्तम खेळी करत यु मुंबाला २ वेळा सर्व बाद केले"

दुरुस्ती नीलेश साळुन्खे.

एक गोष्ट नमुद करावीशी वाटते, पहीला सिजन बरेच सामने एकतर्फी झाले, अचानक दुसरा आणी पुढचे सगळे सीजन शेवटच्या मीनीटा पर्यन्त उत्कन्ठा वाढवणार्या ठरल्या.

कालचाच प्रसन्ग

हैदराबाद मुम्बई शिर्काण करत असताना अचानक राहुल चौधरी "चुकुन" राखीव होतो काय आणी मुम्बई ७ गुणान पेकशा कमी ने हरते काय.

धर्मराजमुटके's picture

7 Jul 2016 - 12:13 pm | धर्मराजमुटके

सहमत ! नावातील दुरुस्तीबद्दल धन्यवाद.

पी. के.'s picture

7 Jul 2016 - 11:06 am | पी. के.

यु मुंबा चा बचाव इतका खराब खळतोय की मी जरी चढाई केली तरी एखादा गुण किंवा कमीतकमी बोनस पॉईंट घेऊ शकतो इतका आत्मविश्वास आलाय मला.

धर्मराजमुटके's picture

7 Jul 2016 - 10:21 pm | धर्मराजमुटके

दिवस १३ वा : सामना क्र. २२ : पटणा पायरेटस वि. बंगळुरु बुल्स
आजपासून पुढील काही सामने पटणा येथे खेळविण्यात येत आहेत. आजच्या सामन्यात पटणा पायरेटस अजिंक्य राहिले. बंगळुरु बुल्सच्या बचावफळी ने आज अक्षम्य चुका केल्या त्याचे फळ म्हणजे आजची हार. दुसर्‍या सत्रापर्यंत सामना दोन्ही बाजूस झुकत होता. मात्र आज पटणा पायरेटसच्या चढाईपटू आणी बचाव / पकडफळी ने उत्तम कामगिरी केली. पाटण्याच्या प्रदिप नरवाल ने सुंदर कामगिरी करत ८ गुणांची कमाई केली तर राजेश मोंडल ने ही त्याला उत्तम साथ दिली. कुलदीप ने नेत्रदिपक पकडी करत ७ गुणांची कमाई केली. आजचा सामना खर्‍या अर्थाने पकड फळीने गाजविला. दुसर्‍या सत्रात पायरेटसने उत्तम सुपर टॅकल्स केल्या.
बंगळुरु बुल्सच्या रोहित कुमार ने त्याच्या दर्जाला साजेसा खेळ केला मात्र संघातील इतर खेळाडूंकडून म्हणावी अशी साथ मिळाली नाही. अपवाद फक्त पवन कुमारचा. त्यानेही आज चांगला खेळ केला.
कबड्डीच्या प्रत्येक दिवशी एक नायक घडत असतो मात्र जो संघ एकजुटीने खेळतो तोच शेवटी विजयी ठरतो.
पटणा पायरेटस (३१ गुण) वि. बंगळुरु बुल्स (२५ गुण) - पटणा पायरेटस ६ गुणांनी विजयी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jul 2016 - 9:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुंबई टीम जिंकली ब्वा. अनूपकुमारच्या राइड्स भारी झाल्या.आता पटना आणि बंगाल वारीयर्सचा सामना पाहतोय.

-दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

8 Jul 2016 - 11:15 pm | धर्मराजमुटके

अभिनंदन ! आज विजय साजरा करण्याची संधी अखेर तुम्हाला मिळाली तर :)

धर्मराजमुटके's picture

8 Jul 2016 - 11:13 pm | धर्मराजमुटके

दिवस १४ वा : सामना क्र. २३ : यु मुंबा वि. बंगळुरु बुल्स
आजचा सामना शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक झाला. आज पुन्हा जुन्या यु मुंबाची झलक पाहायला मिळाली. आज अनुपकुमारचा शिक्का चालला आणि त्याने चढाईमधे ९ गुण केले. टो टच, बोनस अशा सर्व प्रकारात अनुप ने चांगली खेळी केली. शिवाय कर्णधार म्हणून त्याने जे जे डावपेच आखले ते सर्व यशस्वी झाले. राकेश कुमार ने देखील त्याला चांगली साथ मिळाली. राकेश खरोखरीच एक अष्टपैलु खेळाडू आहे. सुनिल कुमार ने आज पकडी करण्यात घाई टाळली आणि त्याचे चांगले फळ त्याचे मिळाले. रिशांक आणि जीवा मात्र आज फॉर्मात नव्हते.
अनुपकुमारचे मागच्या सीजनचे साथी मोहित चिल्लर आणि सुरिंदर नाडा आज प्रतिस्पर्धी बनून उभे ठाकले होते. आज बंगळुरुची पकडफळी पण फुल फॉर्मात होती. बंगळुरुचा सुपरहिरो रोहित कुमार ने देखील नेहमीप्रमाणेच चांगला खेळ केला. शेवटच्या मिनिटाला रोहित ने चढाई केली व त्याला मुंबईच्या सुरजित ने ब्लॉक करुन चितपट केले तो क्षण अवर्णनिय होता.
आजचा हा सामना ह्या मोसमातील एक उत्तम सामना होता यात मुळीच संशय नाही.
यु मुंबा (२४ गुण) वि. बंगळुरु बुल्स (२३ गुण) : यु मुंबा १ गुणाने विजयी.
===================================================
दिवस १४ वा : सामना क्र. २४ : पटणा पायरेटस वि. बंगाल वॉरीयर्स
अपेक्षेप्रमाणे हा सामना एकतर्फीच झाला व तो पटणा ने एकतर्फी जिंकला. पटण्याच्या सुपरहिरो प्रदिप कुमार ने आज अपेक्षेप्रमाणेच उत्तम खेळ करुन तब्बल १४ गुणांची कमाई करुन संघाला या मोसमातला ५ वा विजय मिळवून दिला. पटणा या मोसमात अजुनपर्यंत अजिंक्य राहिले आहेत. पटणाचा कप्तान धर्मराज चेलारथन ने देखील आज पकडीमधे तब्बल ९ गुणांची कमाई केली. त्यांना राजेश मोंडल ने तोलामोलाची साथ दिली.
बंगाल वॉरीयर्स हा संघ त्यांच्या उत्तम पकडीसाठी ओळखला जातो मात्र आज त्याची झलक अजिबातच दिसली नाही. मात्र बंगालच्या नितिन मदने ने आज उत्तम चढाया करुन धावफलक सतत हलता ठेवला. मोनु गोयतची खे़ळी बर्‍यापैकी होती. मात्र बचाव / पकड फळीच्या प्रयत्नांची साथ त्यांना मिळाली नाही.
आजच्या सामन्यात पटणा कमीत कमी ४० गुण करील असे मला वाटले होते मात्र बंगालच्या चढाईपटूंच्या चांगल्या खेळामुळे ते शक्य झाले नाही.
बंगालचा इंपोर्टेड वाघ चान कुंग ली दुखापतीमु़ळे बाहेर आहे त्यामुळे त्याचा खेळ बघायची इच्छा असणार्‍या प्रेक्षकांच्या अपेक्षांवर पाणीच फिरले आहे. बंगालचा कर्णधार निलेश शिंदेची देहबोली सततच्या पराभवामुळे आज बदलून गेलेली वाटली. आज त्याच्या खेळीत जराही जोश दिसला नाही.
पटणा पायरेटस (३५ गुण) वि. बंगाल वॉरीयर्स (२१ गुण) - पटणा पायरेटस १४ गुणांनी विजयी.

===========================================================================
उद्या बंगळुरु बुल्स वि. पुणेरी पलटण आणि पटणा पायरेटस वि. बंगाल वॉरीयर्स असे दोन सामने आहेत. पैकी दुसर्‍या सामन्याचा निकाल शेंबडं पोरगं ही सांगू शकेल. उत्सुकता फक्त पहिल्या सामन्याची.

अवांतर : आमच्या जमान्यात सर्रास आढळणारी शेंबडी पोर, चड्या कमरेखाली गळणारी लहान पोरं आजकाल आढळत नाहित. मात्र विजारी घसरणारे तरुण तरुणी सर्रास आढळतात.
खरोखरीच जमाना बदल गया है वाटतं ! असो.

विजेत्यांचे अभिनंदन ! शुभरात्री !!

खुप धन्यवाद हा धागा चालू केल्याबद्दल. सगळे अपडेट्स देखील वाचायला मिळाले.

हे सामने ऑनलाईन कुठे पाहता येतील? गुगलवर बरीच शोधाशोध केली पण काही मिळाले नाही व स्टार स्पोर्ट्स वरील विडीओ आमच्या येथे दिसत नाहीत ("not available in your region" असा error येतो).

कुणी दुवा दिला तर खुप दुवे मिळतील.

धर्मराजमुटके's picture

9 Jul 2016 - 11:03 pm | धर्मराजमुटके

सध्यातरी स्टार स्पोर्टस व्यतिरिक्त अन्य पर्याय दिसत नाहिये. तुम्ही कोठे राहता ? एकदा hotstar.com वर जाऊन sports विभागात बघा. कदाचित तुम्ही हे सामने पाहू शकाल. मला खात्री नाहिये. पण प्रयत्न करुन पाहा.

शिद's picture

15 Jul 2016 - 4:08 pm | शिद

नाही hotstar.com वर सुद्धा तोच मेसेज येतोय "This content is currently not available in your region. [403]". :(

तुम्ही कोठे राहता ?

स्टॉकहोल्म

असो. तुमचे प्रतिसाद वाचून दुधाची तहान ताकावर भागवावी लागेल. :)

रघुनाथ.केरकर's picture

15 Jul 2016 - 4:32 pm | रघुनाथ.केरकर

हे जुनचं दुखणं आहे शिद साहेब,
फ़ार जुनी परंपरा आहे ही ह्या ख़ेळाची आणी या खेळाच्या पुरस्कर्त्यांची,
कबड्डी सामन्यांची फ़्लेक्स फक्त असोसीएशन च्या ऑफ़ीस च्या १०० मिटर मध्ये लावलेली असतात, त्यामुळे सामने आपल्याच वीभागात असुन सुधा क्रीडाप्रेमीना ते पहाता येत नाही.
दैनंदीन व्रुत्तपत्रात देखी अशा सामन्याना १ ते १.५ इंचापेक्षा जास्त स्थान नाही, ते सुध्दा १०% व्रुत्तपत्रात.
ब-याच वेळी सामने झाल्यावर दुस-या दीवशी २ इंची बातमी असते "अमरहींदची घोडदौड बंड्या मारुतीने १५-१९ अशी रोखली" बस आणी खाली दोन ओळींचा मजकुर.

बर आता इन्टर्नेट चा युग आलयं, म्हटलं आता तरी कबड्डी प्रेमींची तहान भागेल, पण कसलं काय. महाराष्ट्र कबड्डी असोसीएशन च्या वेबसाईट ला भेट देउन बघा, ध्यानात येईल. तीच गत ऑल इन्डीया अमेचर कबड्डी फ़ाउंडेशन ची.
फ़ार दुर जायला नको, प्रो कबड्डी च्या साईट वर सुद्धा खेळाडुन्चे फोटो मीसींग आहेत.

अजुन बरच काही आहे....

मी-सौरभ's picture

21 Jul 2016 - 7:06 pm | मी-सौरभ

पन एकदा तुनळि चेकवा

युट्यूबवर शोधून पाहीलं होतं अगोदरच. सगळे आधीच्या सिजनचे सामने दिसतात पण सिजन ४ चे नाही.

एखादी प्रॉक्झी एक्स्टेंशन क्रोम वर टाकून सामना बघता येईल.
मी hola हे एक्स्टेंशन वापरले आहे. ते वापरून तुम्ही सामना पाहू शकता.

झक्कास्स्स्स....काम फत्ते. hotstar वर विडीओ दिसायला लागले.

खुप धन्यवाद!!!

धर्मराजमुटके's picture

9 Jul 2016 - 10:59 pm | धर्मराजमुटके

दिवस १५ वा : सामना क्र. २५ : पुणेरी पलटण वि. बंगाल वॉरीयर्स
कालच्या वृत्तांतात आजचे सामने चुकीचे लिहिले गेले त्याबद्दल क्षमस्व ! बहुतेक मुंबईच्या विजयामुळे आनंदाच्या भरात ही चुक घडली असावी. आजचा पुणे वि. बंगालचा सामना अपेक्षेप्रमाणे पुण्याने जिंकला. मात्र कालपेक्षा आज बंगालचा खेळ थोडा चांगला वाटला. नितिन मदने हा उत्तम चढाईपटू बंगाल ला लाभला आहे. त्याला संघाकडून योग्य सहकार्य मिळाले तर बंगाल अजून चांगला खेळ करु शकेल.
पुण्याच्या हरहुन्नरी कप्तान मनजित चिल्लर ने आज सर्वगुणसंपन्न खेळ करत ११ गुण कमावले. त्याला सोनु नरवालने ७ गुण मिळवत उत्तम साथ दिली.
बंगालच्या नितिन मदनेने आज सुपर १० रेड केल्या मात्र त्याला पकडफळीची साथ मिळाली नाही. नितिनने कमवावे आणि उर्वरित संघाने उधळावे असाच प्रकार आज चालू होता. मात्र दुसर्‍या सत्रात दिपक निवास हुड्डा आपली चढाई संपवून बेसावध रित्या परत जात असतांना अमित चिल्लर ने त्याला मागुन अचानक येऊन पकडले तो क्षण आज अतिशय बघण्यासारखा होता. बंगालचा जान कुंग ली आज खेळला मात्र पुरेशा फिटनेस अभावी चमक दाखवू शकला नाही.
पुणेरी पलटण (३८ गुण) वि. बंगाल वॉरीयर्स (३१ गुण) - पुणेरी पलटण ७ गुणांनी विजयी.

==============================================================
दिवस क्र. १५ वा : सामना क्र. २६ : पटणा पायरेटस वि. दबंग दिल्ली
आजचा सामना बघून मला राज ठाकरे, उद्दव ठाकरे यांची आठवण झाली.
उद्धव जर दिल्लीच्या संघात असते तर म्हणाले असते : करुन दाखवलं.
राज असते तर म्हणाले असते : एक ही मारा लेकीन सॉल्लीड मारा.

कोणी स्वप्नातही कल्पना केली नसेल ती गोष्ट आज घडली. दिल्ली ने पटणा पायरेटस ला आज चक्क १८ गुणांनी पराभूत केलं. पटणा पायरेटला आज त्यांच्या घरच्या मैदानावर हरवून दिल्ली ने आज त्यांचा विजयी अश्वमेध रोखला. काशिलींग अडकेच्या अनुपस्थित आज इराणी मिराज शेख च्या नेतृत्त्वाखाली एक नवाच दिल्ली संघ पाहायला मिळाला. चढाई म्हणू नका, पकडी म्हणू नका, पटणा आज चारी मुंड्या चीत झाला. महाराष्ट्राचा दिल्लीसाठी खेळणारा सचिन शिंगाडे ने आज कमाल केली. त्याने आज एकसे एक पकडी करत समोरच्या संघाला नामोहरम केले. आज दिल्लीला विकास या नवोदित खेळाडूच्या रुपाने नवीन तारा गवसला आहे. त्याला अजून संधी मिळायला हव्यात.
पटणाचा सुपरस्टार प्रदिप नरवाल ( समालोचक ममताच्या भाषेत परदिप) आज ४० मिनिटांच्या सामन्यात चक्क २४ मिनिटे बाहेर बसला यातच काय ते ओळखा. त्याचबरोबरीने राजेश मोंडल, कुलदीप, धर्मराज यासारख्या मातब्बरांना देखील दिल्ली संघाने सतत बाहेर बसविले. प्रदिप ची जादू आज अजिबातच चालली नाही. तब्बल सहा वेळा त्याची पकड करुन त्याला मैदानाबाहेर पाठविण्यात आले. पटणाचा आजचा स्कोअर हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वात नीचांकी स्कोअर आहे.

या सामन्याचे वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. ज्यांनी हा सामना बघीतला नसेल त्यांनी नक्कीच याची क्षणचित्रे वेळात वेळ काढून बघावीत असे मी सुचवेन.

पटणा पायरेटस (१५ गुण) वि. (दबंग दिल्ली ३३ गुण) : दबंग दिल्ली १८ गुणांनी विजयी.

उद्या परत भेटूया ! शुभरात्री !!

रघुनाथ.केरकर's picture

11 Jul 2016 - 11:30 am | रघुनाथ.केरकर

सचिन शिन्गाडे चा टर्न पण जबर्दस्त लाग्तोय, पण राय्डर काही खास करत नाहीय्त.
खास करुन काशी, अस वाटते की तो त्याचे १०० % देत नाहीय.

मी मातीच्या मैदानावर राज्य अजीन्क्यापद , महापौर स्पर्धा मध्ये पाहीलेला काशी खुप वेगळा होता.
तो काशी प्रो कबड्डी मध्ये मिसिन्ग आहे.

धर्मराजमुटके's picture

10 Jul 2016 - 11:12 pm | धर्मराजमुटके

दिवस १६ वा : सामना क्र. २७ : दबंग दिल्ली वि. तेलुगु टायटन्स
दबंग दिल्ली ने आपल्या किर्तीला जागत आज पुन्हा "करुन दाखविलं ! हरुन दाखविलं !!". कालचे यश हा एक अपवाद होता असे म्हणावे लागेल. कालचा संघ आज एका दिवसात पुन्हा कोठेतरी हरवला. आज मिराज शेख ची जादू चालली नाही. काशिलींग आडके ७ व्या मिनिटाला मैदानावर आला आणी त्याने चढाईत ७ गुण केले. मात्र त्याला आज कालच्यासारखी संघाची साथ मिळाली नाही. विकाश हा नवोदित खेळाडू आज चमत्कार करु शकला नाही. सेल्वामनी ठीक ठाक. पकड फळीत सचिन शिंगाडे ने हाय ५ केले मात्र एकूणच सांघिक कामगिरीच्या अभावामुळे कालचा चमत्कार आज पुन्हा होऊ शकला नाही.
तेलुगु टायटन्सचा भरवशाचा चढाईपटू रोहित चौधरी नेहमीप्रमाणे चांगला खेळला आणी निलेश साळुंखे ने चढाईत ७ गुणांची कमाई करुन संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवले. मैदानाचे उजवे / डावे बुरुज संदिप धुल आणि संदिप नरवाल ने अपेक्षेप्रमाणे उत्तम राखले.
दबंग दिल्ली २३ गुण वि. तेलुगु टायटन्स २८ गुण : तेलुगु टायटन्स ५ गुणांनी विजयी.
============================================================
दिवस १६ वा : सामना क्र. २८ : पटणा पायरेटस वि. जयपुर पिंक पँथर्स
आजचा हा सामना म्हणजे दोन माजी चषक विजेत्या संघामधील सामना होता. प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमाचे विजेते होते जयपुर तर तिसर्‍या मोसमचे विजेते होते पटणा. कबड्डी रसीकांमध्ये या सामन्याची चर्च अपेक्षेप्रमाणेच खुप जास्त होती.

जयपुर ने आपल्या इतिहासाला जागत पटणा पायरेटसला त्यांच्या घरच्या मैदानावर पुन्हा एकदा पराभूत केले. आतापर्यंतच्या चारही मोसमात पटणा येथे खेळल्या गेलेल्या पटणा वि. जयपुर सामन्यात जयपुर ने ४ ही वेळा पटण्याचा पराभव केला आहे. सामन्याचे आजचे वैशिष्ट्य म्हणजे जयपुरचा यशस्वी कर्णधार जसवीर सिंग आज दुखापतीमुळे सामन्यात खेळणार नव्हता. त्यामुळे जयपुरची बाजू आज थोडीशी दुबळी पडणार असे वाटत होते. त्याच्या अनुपस्थितीत आज राजेश नरवाल व शब्बीर बापू या खेळाडूंवर संघाची पुर्ण मदार होती. त्यातही राजेश नरवाल आज सपशेल अयशस्वी ठरला. मात्र एकट्या शब्बीर बापू ने बाकी खेळाडूंना सोबत घेऊन आज संघाची नौका पटणाच्या झंझावातातून तारुन नेली. शब्बीर मुख्यतः चढाईपटू म्हणून ओळखला जात असला तरी आज पकडफळीतच तो जास्त यशस्वी ठरला. १८ चढायांमधे केवळ १ तर पकडींमधे चक्क ६ गुणांची कमाई आज त्याच्या नावावर होती.
कालच्या दिल्ली वि. पटणा सामन्यापासून बोध घेत आज जयपुर ने पटण्याच्या प्रदिप नरवालला जास्तीत जास्त वेळ मैदानाबाहेर बसविण्याची रणनिती यशस्वीपणे राबविली. प्रदिप नरवाल आज तब्बल ३ वेळा सुपर टॅकल झाला. असे असुनही त्याने पटणाकडून सर्वात जास्त म्हणजे ७ गुणांची कमाई केली. मात्र त्याचे डुबकी मारुन पळून जायचे तंत्र कालपासून चालेनासे झाले आहे. पटण्याचा राजेश मोंडल, कुलदीप विशेष प्रभाव पाडू शकले नाहीत. एकंदरीत कालचा सामना दिल्ली सारख्या लिंबू टिंबू संघाकडून हारल्यामुळे पटणा संघाचा आत्मविश्वास थोडासा डळमळीत झाला होता. प्रदिप आज त्याचा नैसर्गीक खेळ खेळू शकला नाही. दिल्ली ने पाडलेल्या तडाख्याने आणि आज जयपुर ने दिलेल्या धक्क्याने पटणाच्या आत्मविश्वासाचे भगदाडात रुपांतर होते की कसे ते येणारे काही सामनेच ठरवू शकतील. मात्र अजूनही पटणा गुणतालिकेत क्रमांक १ वर आहे. मात्र हा संघ सहजासहजी पराभूत होईल असा नव्हे.

दोन्ही संघांच्या गुणफलकात शेवटपर्यंत २-४ गुणांचाच फरक होता. मात्र अनुप कुमारच्या तालमीत तयार झालेल्या शब्बीर ने सामना धीम्या गतीने खेळत, आपली विकेट शेवटपर्यंत फेकली नाही. अगदी शेवटच्या काही मिनिटांत तो बाहेर गेला. आज चढाईपटूंपेक्षा पकडपटूं ने सामना गाजविला. जयपुर ने तब्बल ५ सुपर टॅकल करत जादा गुणांची कमाई केली व त्याच गुणांच्या जोरावर ते आजचा सामना जिंकले.
पटणा पायरेटस (२१ गुण) वि. जयपुर पिंक पँथर्स (२६ गुण) : जयपुर ५ गुणांनी विजयी.

एकंदरीत आजचा दुसरा सामना जास्त आनंद देऊन गेला. ४ थ्या मोसमातील जवळ जवळ निम्मे सामने संपले आहेत आणि आता यावेळच्या चषकावर कोणाचे नाव कोरले जाते याची उत्सुकता आहे.
यावेळी पटणा, जयपुर, पुणे या तीन संघांपैकी कोणीतरी एक विजेता असेल असे आज वाटते आहे मात्र कबड्डी मधे शेवटच्या क्षणापर्यंत चमत्कार होऊ शकतो. त्यामुळे आताच कोणती शक्यता वर्तविणे कठीण आहे.

विजेत्या संघांचे अभिनंदन ! उद्या परत भेटूया. तोपर्यंत शुभरात्री !!

धर्मराजमुटके's picture

12 Jul 2016 - 11:12 pm | धर्मराजमुटके

दिवस १७ वा : सामना क्र. २९ : बंगळुरु बुल्स वि. तेलुगु टायटन्स
कालच्या एका दिवसाच्या विश्रांतीनंतर आजपासूनचे सामने बंगळुरु येथे सुरु झाले. आजचा मनाचा कौल अगोदरपासूनच तेलुगु टायटन्सच्या बाजुने होता आणि झालेही तसेच.
आज बंगळुरु बुल्सच्या चढाईपटू रोहित कुमार ने चढाईत जे कमविले ते बचाव फळीने गमविले. मात्र तेलुगु टायटन्सच्या चढाई आणी पकड फळीने उत्तम खेळ खेळत सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजविले. मध्यंतरानंतर काही काळ बंगळुरुच्या रोहित कुमारच्या खेळामुळे काही काळ सामना पुन्हा बंगळुरुच्या बाजुने होईल असे वाटले मात्र तसे काही झाले नाही.
रोहित कुमार ने आज चढाईमधे ९ गुणांची कमाई केली पण ती व्यर्थ गेली. आशिष कुमारनेही आज चढाई व पकडी मिळून ७ गुणांची कमाई केली. सामन्याचा पहिल्या सत्रातच ७ व्या मिनिटाला बंगळुरुचा संघ सर्वबाद झाला.

तेलुगु टायटन्सच्या राहुल चौधरी ने आज चढाईमधे उत्तम कामगीरी करीत ९ गुणांची कमाई केली . त्याला संदिप नरवाल ने उत्तम पकडी करीत तोलामोलाची साथ दिली. संदिप नरवाल ने आज पकडी करत ५ गुणांची कमाई केली. आजचे विशेष म्हणजे तेलुगु संघाच्या सातच्या सात ही खेळाडूंनी वैयक्तीक गुणांची कमाई केली. संदिप धुल, निलेश साळुंके आपल्या नेहमीच्या फॉर्मात दिसून आले.
तेलुगु टायटन्सने आज दोनवेळा बंगळुरु बुल्स ला सर्वबाद केले. एकंदरीत घरच्या मैदानावर आज बुल्स ला निराश मनाने घरी जावे लागले.

तेलुगु टायटन्स (३२ गुण) वि. बंगळुरु बुल्स (२४ गुण) - तेलुगु टायटन्स ८ गुणांनी विजयी.

=========================================================

दिवस १७ वा : सामना क्र. ३० : पुणेरी पलटण वि. बंगाल वॉरीयर्स
आजचा हा सामना सिंह विरुद्ध वाघ असा होता. त्यात वाघ नुसतेच कागदावरचे वाघ असणार आहेत अशी माझी अटकळ होती मात्र ही झुंज शेवटपर्यंत तगडी झाली. बंगाल वॉरीयर्स त्यांच्या बचाव / पकडींसाठी प्रसिद्ध आहेत आणि तोच खेळ आज त्यांनी करुन दाखविला. मात्र आज इंपोर्टेड वाघ जान कुंग ली च्या २-३ आतातायी खेळ्यांमुळे ते सामना जिंकू शकले नाहीत. चढाई करतांना ३ र्‍या च मिनिटाला त्याने रिव्ह्यु मागीतला आणि तो अयशस्वी ठरला. दुसर्‍या वेळी प्रतिस्पर्ध्याला बाद केले या भ्रमात तो परत आला तर एकदा चढाई करतांना तोल जाऊन पडला. तसेच शेवटच्या काही मिनिटांत अयशस्वी पकड करण्याचा एक प्रयत्न केला. ली च्या ४ चुका आणि गिरिश ने एक पुढे येऊन केलेली अयशस्वी पकड जर आज टाळली असती तर बंगाल सामना जिंकले असते.
मात्र सुरुवातीपासूनच आज बंगाल ने २-३ गुणांची बढत कायम ठेवली होती. मात्र दुसर्‍या सत्रात सामना प्रत्येक मिनिटागणीत दोन्ही बाजूला झुकत होता.
मी शक्यतो सामना संपल्यावर आठवून आठवून वार्तांकन लिहित असतो. आज मी सामना चालू असतांनाच टिपणे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसर्‍या सत्रात सामना इतका गरागर फिरला की शेवटी वही बाजूला ठेऊन दिली.
पुण्याच्या बाजूने आज दिपक निवास हुडडा ने चांगली कामगिरी केली. त्याने आज ८ गुणांची कमाई केली. मात्र कर्णधार मनजित चिल्लर ला मैदानाबाहेर ठेवण्यात आज वाघ यशस्वी ठरले.अजय ठाकूर आणि सोनु नरवाल यांनीही आज अनुक्रमे ६ आणि ४ गुणांची कमाई केली तर जोगींदर ने पकडी करतांना चार गुणांची कमाई केली.
बंगालच्या बाजुने पकडी करतांना विशाल माने ने ६ तर निलेश शिंदे ने ५ गुणांची कमाई केली.
याही सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे बंगालच्या सातही खेळांडूंनी तर पुण्याच्या ६ खेळाडूंनी वैयक्तीक गुणांची कमाई केली.

शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना अखेर बरोबरीत सुटला. असेही मनजित चिल्लर जेथे जिंकू शकत नसेल तेथे बरोबरी करण्यावर भर देतो. मला आठवते त्याप्रमाणे सामने बरोबरीत सोडविण्याचा विक्रम पुण्याच्याच नावावर असावा.

जे कोणी आजचा दुसरा सामना बघू शकले नसतील त्यांनी या सामन्याची क्षणचित्रे आवर्जून बघावीत अशी मी शिफारस करतो.

पुणेरी पलटण (३४गुण्) वि. बंगाल वॉरीयर्स (३४ गुण) - सामना बरोबरीत सुटला.

आजच्या सामन्यातील गुणांमुळे पुणे गुणतालिकेत प्रथम स्थानावर पोहोचले तर बंगाल वॉरीयर्स ने आपली शेवटून पहिली जागा सोडली नाही. मात्र आजच्या सामन्यामुळे बंगालचे मनोधैर्य नक्कीच उंचावले असेल अशी आशा करतो.

विजेत्यांचे अभिनंदन ! उद्या रात्री पुन्हा भेटूया. तोपर्यंत शुभरात्री !!

विअर्ड विक्स's picture

13 Jul 2016 - 12:00 pm | विअर्ड विक्स

काल झालेली पुणे वि . बंगाल अप्रतिम मॅच होती . उंटाने कूस कितीवेळा बदलली या सामन्यात !!!!!!

धर्मराजमुटके's picture

14 Jul 2016 - 12:23 am | धर्मराजमुटके

दिवस १८ वा : सामना क्र. ३१ : बंगळुरु बुल्स वि. जयपुर पिंक पँथर्स
बंगळुरु बुल्स च्या घरच्या मैदानावर झालेल्या आजच्या दुसर्‍या सामन्यात पँथर्स ने बुल्स ची शिकार करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली.
बंगळुरु चा स्टार चढाईपटू रोहित कुमार आज केवळ ५ गुण मिळवू शकला. तर त्याखालोखाल दिपक कुमार दहिया याने पहिल्याच सत्रात अगदी सुरुवातीला सुपर रेड करुन ३ गुणांची कमाई केली.
पकड / बचाव फळीत कर्णधार सुरिंदर नाडा आणि मोहित चिल्लर ने पकडी करत प्रत्येकी ३ गुणांची कमाई केली.
जयपुरच्या बाजूने कप्तान जसवीर सिंग आज खेळत होता तर शब्बीर बापू बाहेर होता. जसवीर आणि राजेश नरवाल यांनी चढाईमधे प्रत्येकी ५ गुणांची कमाई केली तर पकड फळीत अमित हुड्डा ने ४ आणि रण सिंग ने ३ गुणांची कमाई केली.
दोन्ही संघ प्रत्येकी एक एक वेळेस सर्व बाद झाले. जयपुर आज पकड / बचावाच्या जोरावर सामना जिंकू शकले.
एकंदरीत हा सामना देखील प्रेक्षणीय झाला. आज मोहित चिल्लर चा वाढदिवस होता मात्र त्याला वाढदिवसाचे बक्षीस मिळू शकले नाही त्यामुळे तो नक्कीच दु:खी असेल.

बंगळुरु बुल्स (२२ गुण) वि. जयपुर पिंक पँथर्स (२४ गुण) - जयपुर पिंक पँथर्स २ गुणांनी विजयी.

========================================================
दिवस १८ वा : महिला कबड्डी सामना क्र. ४ : आईस दिवाज वि. फायर बर्डस
आजच्या महिलांच्या ४ थ्या सामन्यात ऋतुचक्राप्रमाणे वरुण देवाने अग्नीवर विजय मिळविला असे म्हणता येईल. सुरुवातीपासूनच अभिलाषा म्हात्रेच्या संघाने गुणांचा पाऊस पाडायला सुरुवात केली होती. मिनल जाधव ने पहिल्याच सत्रात एकाच चढाईत ४ गुण वसूल करुन संघाला दमदार सुरुवात करुन दिली. अभिलाषा म्हात्रे ने चढाईत १ गुण तर पकडींमधे ४ गुण असे एकूण ५ गुण घेतले तर मिनल जाधव ने ४ गुण वसूल केले. पकड फळीत डॅशिंग ललिता ने ३ गुण तर खुशबु नरवाल ने ३ गुणांची कमाई केली.
फायर बर्डस ने आज पकड फळीत थोडीतरी चमक दाखविली मात्र चढाईपटू आज निष्प्रभ वाटत होते. ममता पुजारी आज काही कमाल दाखवू शकली नाही.
आईस दिवाज आज चढाई (७ गुण), पकड (१५ गुण), प्रतिस्पर्धी संघाला सर्वबाद करण्याचे २ गुण अशा सर्वच आघाडयांवर उत्तम खेळली.

फायर बर्डस (१४ गुण ) वि. आईस दिवाज (२४ गुण) - आईस दिवाज १० गुणांनी विजयी.

विजेत्यांचे अभिनंदन !

उद्या यु मुंबा वि. जयपुर पिंक पँथर्स हा माझ्यासाठी महत्त्वाचा अतिमहत्वाचा सामना आहे. विजयाच्या आशा नाहीतच पण दुनिया उम्मीद पे कायम है असे म्हणतात. बघुया काय होते ते !

शुभरात्री !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2016 - 9:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्ती उतरवून टाकली मुंबई ने जयपूरची. जयपूर मला मुंबईच्या तुलनेत उजवी वाटत होती. पण वाद आणि अधिकची मस्ती. मुंबईने योग्य वेळी पकडी केल्या. अनुपकुमार भन्नाट राहिला. मुंबईने चांगला आक्रमक खेळ केला. मस्त मजा आली. जिंकली माझी मुंबई. :)

दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

14 Jul 2016 - 11:23 pm | धर्मराजमुटके

ज्जे बात ! अगदी सहमत.
मात्र मुंबईने अगदी शांतचित्ताने त्यांची मस्ती उतरवून टाकली. मुंबईच्या संघाकडून सहसा आततायी प्रतिक्रिया शक्यतो येत नाही. अनुप कुमार कॅप्टन कुल असला तरी यु मुंबा एकंदरीतच 'कुल मुंबा' आहे. प्रो कबड्डीच्या वेबसाईटवर जाऊन पाहिले तर आजही जवळपास २९% वोटर्सची पसंती यु मुंबालाच आहे.
आवडत्या संघाच्या विजयाच्या शुभेच्छा ! एंजॉय माडी !!

कानडी माडी बरकां :)

धर्मराजमुटके's picture

14 Jul 2016 - 11:18 pm | धर्मराजमुटके

दिवस १९ वा : सामना क्र. ३२ : यु मुंबा वि. जयपुर पिंक पँथर्स
फार्फार अपेक्षा लागून राहिलेल्या या सामन्यात अखेर यु मुंबाने बाजी मारली. अनुप ने चढाईत ५ गुण मिळवत कर्णधाराला साजेशी खेळी केली. आजपर्यंत या दोन्ही संघांनी एकाच मोसमात दोन वेळा एकमेकांस हरविले नव्हते तो विक्रम आज मुंबईच्या नावे लागला.

सामन्याच्या सुरुवातीलाच चढाई करुन जयपुरच्या अजय कुमार ने राकेश कुमारचा पहिला बळी घेतला आणि माझ्या हृदयाचा ठोका चुकला. यंदाच्या मोसमात मला राकेश कुमार सर्वात जास्त प्रिय खेळाडू आहे. कारण आतापर्यंत त्याने संयमित व सात्यत्यपुर्ण खेळ केलेला आहे. मात्र पुढच्याच चढाईत सुरेशु कुमार ने जयपुरचा स्टार पकडपटू अमित हुड्डा ला बाहेरचा रस्ता दाखविला व राकेश लगेच आत आला. त्यानंतर राकेश कुमार ने लगेचच पुढच्या चढाई मधे एक बोनस गुण वसूल केला. आज दोन्ही बाजूने सतत चढाई व पकडी यशस्वी होत होत्या व गुणतक्ता सतत बदलत होता. मुंबईच्या जीवा कुमार ने आज नेहमीप्रमाणे घिसाडघाई करुन २-३ गुण प्रतिस्पर्ध्यांना बहाल केले. मात्र अनुप कुमार , राकेश कुमार यांनी संयमी खेळी करत तर सुरेशु कुमार ने थोडासा आक्रमकपणा दाखवत जयपुरला चीतपट केले.

मुंबईच्या रिशांक देवाडिगाच्या खात्यात आज काहीही जमा झाली नाही. प्रत्येक चढाईमधे तो पकडला गेला. जेव्हा एखादा खेळाडू वारंवार चीत होत असेल तर त्याला पहिल्या १०-१५ मिनिटांतच बाहेरचा रस्ता दाखविला पाहिजे असे माझे मत आहे.
पहिल्या सत्राअखेरीस यु मुंबा १ गुणांनी पिछाडीवर होती. (जयपुर १० गुण आणि यु मुंबा ९ गुण)

जयपुरचा कर्णधार जसवीर सिंग आणि आघाडीचा खेळाडू शब्बीर बापू काहिही प्रभाव दाखवू शकले नाहीत. शब्बीर बापू बहुतेक तंदुरुस्त नसल्यामुळे त्याने केवळ एकच चढाई केली. जयपुरच्या बाजूने अजय कुमार ने आज चढाईत चांगली खेळी केली तर राजेश नरवालचा खेळ ही बर्‍यापैकी होता. जयपुर आज जवळ जवळ ३२ व्या मिनिटाला सर्वबाद झाली.

मुंबईच्या खेळाचे वेगळेपण कशात असेल तर ते अतिशय शांतपणे खेळतात. अनुप कुमार, राकेश कुमार इतक्या शांततेत खेळतात की जणू उद्या रविवारची सुट्टी आहे आणि समोर काहीच काम नाहिये. उगाचची धावपळ नाही, गडबड नाही. त्यामुळे मुंबईच्या संघाचा जास्त स्कोअर सहसा बघायला मिळत नाही. मात्र अगदी १-२ गुणांची बढत असली तरी शेवटपर्यंत ती बढत टिकवून ठेवणे त्यांना बर्‍याचदा शक्य होते. मात्र इतर संघांमधे हा गुण दिसत नाही. तेलगु टायटन्स, पुणे, पटना यापैकी कोणताही संघ मैदानात असेल तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला अगदी १० चा गुणांची आघाडी देखील सुरक्षित वाटत नाही.

आज सगळ्यात मोठा धक्का बसला तो जयपुरच्या वर्तनाने. आज ते २-३ वेळा रडीचा डाव खेळले. त्यांचा खेळाडू बाद असतांनाही विनाकारण पंचांशी व प्रतिस्पर्धी संघाशी वाद घालात बसले. जसवीर कडून मला ही अपे़क्षा नव्हती. त्यांच्या अशा वर्तनामुळे कधी नव्हे ते राकेश कुमार व अनुप कुमार सारखे शांत डोक्याचे खेळाडू देखील चिडले होते. अर्थात हा त्यांच्या रणनीतीचा भाग असू शकेल पण जे काही झाले ते चांगले वाटले नाही. मात्र ह्याचा त्यांना फायदा होण्याऐवजी तोटाच झाला आणि पहिल्याच सत्रात ते आपला रिव्हियु घालवून बसले.
असो. मुंबई जिंकल्यामुळे इतर सर्व प्रमाद विसरले गेले आहेत. आज यु मुंबाच्या जुन्या संघाची झलक बघायला मिळाली. आज अनुप, सुरजित यांनी जरी बक्षीसे मिळविली असली तरी खरा हिरो राकेश कुमारच. अतिशय सुंदर खेळी. आय मस्ट सॅल्युट हिम.

यु मुंबा (२९ गुण) वि. जयपुर पिंक पँथर्स (२३ गुण) - यु मुंबा ६ गुणांनी विजयी.

===========================================================
दिवस १९ वा : सामना क्र. ३३ : बंगळुरु बुल्स वि. पटणा पायरेटस
ह्या सामन्याचा निकाल अगोदरपासूनच ओपन सिक्रेट होते. बंगळुरु बुल्स ने आज सलग ३ र्‍या दिवशी घरच्या मैदानावर माती खाल्ली. पहिल्या सत्रात जवळपास बरोबरीने चालणारा बुल्सचा संघ दुसर्‍या सत्रात कोठल्या कोठे फेकला गेला. बुल्स आज ८ व्या मिनिटाला सर्वबाद झाले तर संपुर्ण सामन्यादरम्यान तब्बल तीन वेळा सर्वबाद झाले.

बंगळुरुचा स्टार चढाईपटू रोहित कुमार ची आज पटणाच्या पकडफळीने पुरती कोंडी केली. अवघे ४ गुण मिळवू शकलेला रोहित आज जवळपास तब्बल १८ मिनिटे मैदानाबाहेर होता. एकटा आशिष सांगवान सोडला तर दुसरा कोणताही चढाईपटू त्याला व्यवस्थित साथ देऊ शकला नाही. आशिष ने चढाई आणि पकडी दोन्हीमधे आपले अष्टपैलुत्व सिद्ध केलेले आहे. सुरिंदर नाडा आणि मोहित चिल्लर आणि इतर पकडफळीत कोणताही ताळमेळ दिसून आला नाही. थोडक्यात बंगळुरु ना आज चढाईत चालली ना पकडींमधे.

आजच्या सामन्याचा विशेष म्हणजे पटणाचा ही स्टार चढाईपटू प्रदिप नरवाल आज एकही गुण मिळवू शकला नाही. "खाईन तर तुपाशी नाहितर राहीन उपाशी" ही म्हण आज प्रदिपच्या बाबतीत खरी ठरली. मात्र एवढा मोठा खेळाडू चालत नाही म्हटल्यावर पटणाने त्याला दुसर्‍या सत्रात चक्क बाहेर बसविण्याची धमक दाखविली आणि महेश गौड ला बदली म्हणून आत आणले. मात्र त्याची मात्रा आज चालू शकली नाही. मात्र प्रदिपच्या अनुपस्थितीत राजेश मोंडल, सुरजित ने चांगला खेळ केला.
राजेशने चढाईत ८ गुण तर फजल अत्राचलीने पकडींमधे ६ गुणांची कमाई केली.

कासेची लंगोटी वाचविण्यासाठी बंगळुरु कडे उद्याचा सामना जिंकणे गरजेचे आहे. नाहितर घरच्या मैदानावर सगळे सामने हरण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर लागण्याची शक्यता आहे. अर्थात दिल्ली विरुद्ध सामना असल्यामुळे जिंकण्याची संधी आहेच म्हणा पण चमत्कार ही अशक्य नाहीत.

बंगळुरु बुल्स (२३ गुण ) वि. पटणा पायरेटस (३८ गुण ) - पटणा पायरेटस तब्बल १५ गुणांच्या प्रचंड आघाडीसहित विजयी.

विजेत्यांचे अभिनंदन ! उद्या परत भेटूया, शुभरात्री !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2016 - 6:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्तम विश्लेषन.

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

15 Jul 2016 - 8:44 am | नाखु

शिवाय उपमा पखरण थेट विवि करमरकरांची आठवण करून देते, धागाकर्ता नक्कीच कब्बडी खेळला असावा त्या शिवाय खेळात "उतरून" लिहिले जाणार नाही हे नक्की!!

पी. के.'s picture

15 Jul 2016 - 11:03 am | पी. के.

+१

रघुनाथ.केरकर's picture

15 Jul 2016 - 11:26 am | रघुनाथ.केरकर

+१

शिद's picture

15 Jul 2016 - 4:09 pm | शिद

सहमत.

धर्मराजमुटके's picture

15 Jul 2016 - 11:25 pm | धर्मराजमुटके

दिवस २० वा : सामना क्र. ३४ : पुणेरी पलटण वि. तेलुगु टायटन्स

आजचा हा सामना फास्ट फॉरवर्ड प्रकारातला होता. तेलुगु टायटन्सच्या राहुल चौधरी ने पहिल्याच चढाईत जोगींदर ला बाद केले तर त्यानंतरच्या लगेचच्या दुसर्‍या चढाईत पुण्याच्या अजय ठाकूर ने सुपर रेड करत ३ गुणांची वसूली करीत टायटन्सला पहिला धक्का दिला.
सामन्यादरम्यान धावफलक सतत हलता होता. नॉट अ सिंगल वेटींग मोमेंट.

पुण्याच्या दिपक निवास हुड्डा ने आज पहिल्या सत्रात उत्तम खेळी पेश केली. पहिल्या सत्राच्या सातव्या मिनिटाला तर तेलुगु टायटन्स सर्वबाद झाली. पहिल्या सत्राअखेर पुणे १७ गुणांवर तर तेलुगु टायटन्सकडे १५ गुण होते. पुण्याकडे २ गुणांची आघाडी होती.

मात्र दुसर्‍या सत्रात फासे उलटे पडले आणि साधारण २६ व्या मिनिटाच्या खेळात तेलुगु टायटन्सने जोरदार पुनरागमन करीत पुण्याला सर्वबाद करीत दोन गुणांची आघाडी घेतली.

पुण्याकडून आज दिपक निवास हुड्डा, अजय ठाकूर यांनी चांगला खेळ केला तर तेलुगु टायटन्सच्या बाजूने सुपरस्टार चढाईपटू रोहित चौधरीने आज सुपर १० गुण कमविले. तर त्यांचाच भरवशाचा खेळाडू निलेश साळुंके ने चढाईत ४ गुणांची कमाई केली.

मात्र कर्णधार मनजित चिल्लरच्या अनुपस्थितीत अखेर शनिवारवाड्याचा बचाव ढासळला, गड पडला आणि सामना गमाविला. केवळ एक खेळाडूचा अनुपस्थितीत पुण्याचे हे हाल होणार असतीत तर ती चिंताजनक बाब आहे. मात्र दिपक हुड्डा ला आजच्या सामन्यासाठी पुर्ण गुण दिले पाहिजेत. त्याने एकूण ९ गुण घेतले तर रविंदर पहल ने पकडींमधे ५ गुणांची कमाई केली. अजय ठाकूर ने सुपर रेड मधे ३ गुण घेतले पण त्यानंतर त्याला काही प्रभाव दाखविता आला नाही. एकंदरीत हा एक "लागुभागु टोला" होता असेच म्हणावे लागेल.

तेलुगु टायटन्सच्या राहुल चौधरी ने आज प्रो कबड्डीच्या ४ मोसमात ४०० गुणांचा महत्त्वपुर्ण टप्पा गाठला. या ४०० गुणांत तब्बल २० सुपर १० चा समावेश आहेत. म्हणजे २०० गुण केवळ २० सामन्यांत ! संदिप नरवाल ने आज देखील त्याच्या लौकीकाला जागत पकडी करत ६ गुणांची कमाई केली. मात्र पंचांबरोबर वाद घातल्यामुळे आज त्याला दोन मिनिट मैदानाबाहेर बसण्याची शिक्षा फर्मावण्यात आली. पकड फळीमधे आज टायटन्सच्या विनोद आणी संदिप धुल ने देखील चांगली कामगिरी बजावली. त्यांनी अनुक्रमे ३ व २ गुणांची कमाई केली.

पुणेरी पलटण (२९ गुण ) वि. तेलुगु टायटन्स (३२ गुण) - तेलुगु टायटन्स ३ गुणांनी विजयी.

==================================================================
दिवस २० वा : सामना क्र. ३५ : बंगळुरु बुल्स वि. दबंग दिल्ली
आज दिल्ली ने पुन्हा एकदा धक्कादायक निकालाची नोंद करत बंगळुरु बुल्सचा तब्बल २० गुणांनी पराभव करत त्यांचे पुरते वस्त्रहरण केले. आपल्या घरच्या मैदानावर सर्वच्या सर्व म्हणजे ४ सामने हरण्याचा नीचांकी विक्रम आज बंगळुरु च्या नावावर लागला. या अगोदर हा विक्रम दिल्लीच्या नावे होता. दिल्लीने आपल्या घरच्या मैदानावर ३ सामने हरले होते.

आज दिल्ली सुरवातीपासूनच जोशात होती. आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर काशीला त्याच्या जुना खेळ गवसला आणि "आपला हात भारी, आपला पाय भारी, च्यामायला आपलं सगळचं लै भारी (पण कधी कधीच)" म्हणत आज त्याने चक्क सुपर १० पार करीत आज ११ गुणांची कमाई केली त्याला तितकीच दमदार साथ चढाईपटू सेल्वामणीने दिली. त्याने ६ गुणांची कमाई केली. इराणी दिल्लीकर मिराज शेख ने आपल्या एकमेव यशस्वी चढाईत ५ गुण मिळवत (चढाईचे ३ गुण तर सर्वबाद चे २ गुण) प्रतिस्पर्ध्यांना सर्वबाद करीत खेळाचा नुरच पालटून टाकला. चढाईपटूंनी आज जे कमवून आणले ते आज पकडफळीने राखले आणि त्यात भर देखील घातली. डि सुरेश कुमार (३ गुण), सचिन शिंगाडे (३ गुण) तर प्रशांत चव्हाण (२ गुण) आणि संकेत चव्हाण (१ गुण) अशा ७ च्या ७ ही खेळाडूंनी वाहत्या चंद्रभागेत हात धुवून घेतले.

बंगळुरु बुल्सचा कर्णधार सुरिंदर नाडा आज सामन्यात गैरहजर होता. त्याची कमतरता संघाला आज नक्कीच जाणवली असेल.त्याच्या अनुपस्थित आज प्रतिस्पर्ध्यांनी आरामात बोनस गुणांची कमाई केली. मोहित चिल्लर ची जादू आज चालली नाही. तर स्टार रेडर रोहित कुमार ला आज फक्त १ गुणावर समाधान मानावे लागले. मात्र बदली खेळाडू योगेश हुड्डा (७ चढाई गुण) आणि पवनकुमार सेहरावत (३ चढाई गुण) ने आज चांगला खेळ पेश केला. आशीष सांगवान आणि अन्य खेळाडू जवळपास निष्प्रभच दिसले.

एकंदरीत भारतीय क्रिकेट आणि कबड्डी यांत साम्यस्थळे शोधायची ठरली तर व्यक्तीकेंद्रीत खेळ. जेव्हा जेव्हा सामन्यात सुनिल, सचिन, विराट, धोनी चालला नाही तेव्हा तेव्हा सामना हातातून गेला. मात्र जे संघ व्यक्तीकेंद्रीत नाहित त्यांना कबड्डीत तरी नक्कीच विजयाच्या संधी जास्त आहेत.

आता हेच बघा ना ! बंगळुरुचा रोहित कुमार चढाई गुणांचा तक्त्त्यात अव्वलस्थानी आहे मात्र त्याचा संघ सलग ४ वेळा हरतोय. काशी किंवा मिराज खेळला तर संघ जिंकतोय, मनजित नसेल तर संघाचे व्यवस्थापन कोसळतेय.
याला अपवाद पाटणा, जयपुर चा संघ नक्कीच आहे. निदान आत्तापर्यंतच्या खेळात तरी. प्रदिप नरवाल नाही खेळला तर राजेश मोंडल खेळतोय, जसवीर मैदानात नसेल तर शब्बीर खेळतोय. मुंबई इज स्टील अंडरडॉग.

असो. तर दिल्ली आज चढाई आणि पकडी या दोन्ही आघाड्यांवर उत्तीर्ण झाली आणि या मोसमातल्या आपल्या ३ र्‍या विजयाची नोंद केली.

दबंग दिल्ली (४०गुण) वि. बंगळुरु बुल्स (२० गुण) : दबंग दिल्ली २० गुणांच्या प्रचंड फरकाने विजयी.

उद्या परत रक्तदाब वाढविणारा सामना. पटणा वि. मुंबई !

विजेत्यांचे अभिनंदन ! राहुल चौधरीचे विशेष अभिनंदन !
उद्या परत भेटू या, शुभरात्री !

बंगळुरु बुल्स आज १७ व्या आणि ३६ व्या मिनिटाला असे मोजून दोनदा सर्वबाद झाले.

मस्तच...मॅच पाहता आल्या नाही म्हणून काय झालं? तुमचं अगदी डिटेल विश्लेषण ती कसर भरून काढतेय.

उद्या परत रक्तदाब वाढविणारा सामना. पटणा वि. मुंबई !

वाट पाहतोय. मुंबई जिंकावी हीच सदिच्छा!

धर्मराजमुटके's picture

15 Jul 2016 - 11:32 pm | धर्मराजमुटके

सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे विशेष आभार. आपल्या सहभागामुळेच सलग २० दिवस लिहू शकतोय. सध्या ही तात्पुरती पोहोच समजा. डिट्टेलवारी आभार समारोपाच्या प्रतिसादात करीन म्हणतो ! धन्यवाद !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jul 2016 - 10:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यू मुंबाला सावरता आलं नाही. पटनाची बॉडी लयांग्वेज मुंबापेक्षा कितीतरी पटीने भारी होती. देवाडीगा, अनुपकुमार, रॉकेश यांच्या राईड्स वर पॉईंट्स मिळालेच नाहीत. मुंबाला सामन्यात परतता आलेच नाही.पटना भारी खेळतात आणि जिंकतात. पटनाच या प्रो कबड्डी चे विजेते राहतील असे वाटते. मुंबाला हरतांना पाहून वाईटच वाटत होतं, जिंकतील असं एकदाही वाटलं नाही.

जयपूर बंगळूर सामन्यात बंगळूर सुरेख खेळली.

-दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

16 Jul 2016 - 10:26 pm | धर्मराजमुटके

दिवस २१ वा : सामना क्र. ३६ : बंगॉल वॉरीयर्स वि. जयपुर पिंक पँथर्स
आजचा हा सामना पुन्हा एकदा धक्कादायक निकाल देऊन गेला. बंगाल वॉरीयर्स ने आज पहिल्या स्थानावर असलेल्या जयपुर पिंक पँथर्सला चक्क ७ गुणांनी पराभूत केले. आज पहिल्या सत्रात १४ व्या मिनिटाला जयपुर संघ सर्वबाद झाला.
घरच्या मैदानावर झालेल्या पहिल्याच सामन्यात सुरुवातीपासूनच बढत घेतली. बंगालच्या यान कुं ली ने आज सुपर १० च्या पलीकडे जाऊन या मोसमातला आपला पहिलावहिला चांगला परफॉर्मन्स दाखविला. त्याने आज १३ गुणांची कमाई केली. त्याला सुरजित नरवालने ६ गुण घेऊन चांगली साथ दिली. आज निलेश शिंदे ने देखील चांगला खेळ दाखवित पकडी करुन ४ गुणांची कमाई केली. आज बंगालच्या ७ पैकी ६ खेळाडूंनी गुणाची कमाई केली.
जयपुरचा कप्तान जसवीर सिंग आणि राजेश नरवाल आज अजिबातच प्रभाव टाकू शकले नाही. मात्र त्यांचा बदली खेळाडू अजय कुमार ने देखील सुपर १० करत ११ गुणांची कमाई केली. जयपुरची पकड फळी आज अजिबात प्रभाव टाकू शकली नाही.
जयपुर (२५ गुण) वि. बंगाल वॉरीयर्स (३२ गुण) : बंगाल ७ गुणांनी विजयी.

=====================================================================
दिवस २१ वा : सामना क्र. ३७ : पटणा पायरेटस वि. यु मुंबा
आजच्या सामन्याचा निकाल अपेक्षीत असा लागला. मात्र यु मुंबाने लाजीरवाणा पराभव स्वीकारत मनाला फार वेदना दिल्या. सुरुवातीच्या पहिल्या १० मिनिटांमधे दोन्ही संघ तुल्यबळ वाटत होते मात्र त्यानंतर पटणाने जी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत टिकवून ठेवली.
पटणाचा स्टार चढाईपटू प्रदिप नरवाल आज चालू शकला नाही. मात्र राजेश मोंडल ने नेहमीप्रमाणेच चांगला खेळ केला. त्याने आज ८ गुणांची कमाई केली तर धर्मराज शेलराथन ने आज पकडींमधे ७ गुणांची कमाई केली. एकंदरीतच आज पटणाची चढाई व बचाव अभेद्य होता. आज पटणाच्या सर्वच्या सर्व खेळाडूंनी गुणांची कमाई केली.
मुंबईच्या बचाव / पकड फळीने आज बर्‍याच चुका केल्या. पकड फळीने या मोसमात एखाद दुसरा सामना वगळता चुका करण्यात सातत्य दाखविले आहे. रिशांक देवाडीगा आज पहिल्या सत्रात अजिबातच चालला नाही मात्र दुसर्‍या सत्रात त्याने वेगवान खेळ करुन ७ गुणांची भर घातली. मात्र तो "देर आया, दुरुस्त नही आया". अनुप कुमार आज केवळ २ गुण मिळवू शकला. आज मुंबई दोन्ही सत्रात एक एक वेळा अशी २ वेळा सर्वबाद झाली.

पटणा पायरेटस (३४ गुण) वि. यु मुंबा (२४) गुण : पटणा १० गुणांनी विजयी.

विजयी संघांचे अभिनंदन ! उद्या परत भेटूया !
शुभरात्री.

धर्मराजमुटके's picture

17 Jul 2016 - 11:46 pm | धर्मराजमुटके

दिवस २२ वा : सामना क्र. ३८ : पुणेरी पलटण वि. जयपुर पिंक पँथर्स
पुणेरी पल्टण वि. जयपुर पिंक पँथर्स चा सामना हा दोन तुल्यबळ संघातला सामना असणार होता. आजच्या सामन्यात शेवटपर्यंत चुरस बघायला मिळाली. मात्र जयपुर ने पुण्याला दोनदा सर्वबाद करत आघाडी घेत हा सामना ६ गुणांनी जिंकला.
पुण्याच्या दिपक निवास हुड्डा आणि अजय ठाकूर ने आज चढाईत प्रत्येकी ९ गुणांची कमाई केली. मनजित चिल्लर ला आज पकडीतल्या फक्त २ गुणांवरच समाधान मानावे लागले.
जयपुरच्या संघात राजेश नरवाल व जसवीर सिंग यांनी प्रत्येकी ७ गुणांची कमाई केली तर अजय कुमार ने ५ गुणांची कमाई केली. आज शब्बीर बापूने मैदानात फक्त आपली हजेरी लावली. अमित हुड्डा ने पकडीत ३ गुण तर रण सिंग ने २ गुणांची कमाई केली. चढाईमधे दोन्ही संघ तुल्यबळ होते मात्र पकडींमधे जयपुर ने वर्चस्व गाजविले आणि २ वेळा सर्वबाद झाल्यामुळे पुण्यावर पराभूत होण्याची पाळी आली.
या सामन्यात मनजित चिल्लर ला एक वेळा ग्रीन कार्ड देण्यात आले. (ग्रीन कार्ड म्हणजे खेळाडूस त्याच्या गैरवर्तनाबदद्ल दिलेली तंबी असते).
आजच्या सामन्यात पंचांचा सावळागोंधळही बघायला मिळाला. हा गोंधळ या ४ थ्या मोसमात वारंवार जाणवतोय. बरेचदा पंचांनी दिलेले निर्णय टीव्ही अंपायर ने फिरविलेले आहेत. हा खेळच एवढा वेगवान होतो की पंचांची नजर फारच ती़क्ष्ण हवी. मात्र ३ र्‍या पंचांच्या रुपाने खेळाडूंना एक नवीन आधार मिळाला आहे हे निश्चित. मात्र एकदा एखाद्या संघाने केलेले अपील फेटाळले गेले की त्याला सामन्यादरम्यान परत अपील करता येत नाही. तेव्हा मग मैदानावरच्या पंचाचा निर्णय अंतिम असतो.

जयपुर पिंक पँथर्स (३३ गुण) वि. पुणेरी पलटण (२७) गुण - जयपुर ६ गुणांनी विजयी.

================================================================
दिवस २२ वा : सामना क्र. ३९ : पटणा पायरेटस वि. बंगाल वॉरीयर्स
हा सामना जवळ जवळ एकतर्फी होईल आणि त्यात पाटणा सहज जिंकेल असा माझा होरा होता पण बंगालच्या खेळाडूंनी तो चुकविला. आज सुरुवातीपासूनच बंगाल ने पटणावर आघाडी घेतली. जवळ जवळ ३० मिनिटांच्या खेळात पटणाचा स्टार प्रदिप नरवाल एकही गुण घेऊ शकला नाही. मात्र शेवटच्या १० मिनिटांत प्रदिपची पटणा एक्सप्रेस सुस्साट सुटली आणि त्याने बंगालचा हातातोंडाशी आलेला विजय हिरावून नेला. इतका की शेवटी बंगाल ने नांगी टाकली व हार पत्करली.

पटणाच्या बाजूने प्रदिप नरवाल ९ गुण, सुरजित सिंह ६ गुण, राजेश मोंडल ३ गुण अशी चढायांमधील आकडेवारी होती तर पकडफळीत फजल अत्राचलीने ७ गुण तर धर्मराज शेलरथन ने ३ गुणांची कमाई केली.

बंगालच्या बाजूने आज नितिन मदने दुखापतीमुळे गैरहजर होता. मात्र त्याच्या अनुपस्थितीत मोनु गोयत ने चढाईत ९ गुण तर सुरजित नरवालने ३ गुणांची कमाई केली. यांग कुंग ली ने देखील ७ गुणांची कमाई केली. तर पकडफळीत अमित चिल्लर ने ४ आणि विशाल माने ने २ गुणांची कमाई केली. कर्णधार निलेश शिंदे आज प्रभाव दाखवू शकला नाही.
पटणा आज पकडींमधे किंचीत सरस ठरल्यामुळे सामना जिंकून गेले.

मराठी माणूस युद्धात जिंकतो तर तहात हारतो ह्या म्हणीचा प्रत्यय बंगालचा खेळ पाहताना येतो. बंगालच्या संघात मराठी खेळाडूंचा भरणा सर्वाधिक आहे. बंगाल बर्‍याचदा पहिल्या सत्रात उत्तम कामगिरी करतो मात्र ती दुसर्‍या सत्रात टिकवून ठेवत नाही. इथे त्यांचे डावपेच कमी पडतांना दिसतात.

पटणा पायरेटस (३३ गुण) वि. बंगाल वॉरीयर्स (२७) गुण - पटणा ६ गुणांनी विजयी.

आजच्या दोन्ही सामन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे जिंकणार्‍या दोन्ही संघांनी ३३ गुण केले तर पराभूत होणार्‍या दोन्ही संघांनी २७ गुण मिळविले.

विजेत्यांचे अभिनंदन ! उद्या पुन्हा भेटूया, शुभरात्री !!

विअर्ड विक्स's picture

18 Jul 2016 - 10:40 pm | विअर्ड विक्स

महिला संघांची सुद्धा आज मॅच होती. अधिकतर महिलांचे सामने एकतर्फी होत असल्याने थोडा रसभंग होतो.

बाकी बंगालचा आततायी पण त्यांना नडला. अशावेळी अनुप कुमार सारखा " कॅप्टन कूल " हवा.

धर्मराजमुटके's picture

18 Jul 2016 - 10:50 pm | धर्मराजमुटके

आतापर्यंतच्या सर्व सामन्यांत हेच दिसत आलेले आहे. स्वतःकडे असलेली आघाडी त्यांना शेवटपर्यंत राखता येत नाही हेच खरे दुखणे आहे. अगोदरच्या काही सामन्यांमधे त्यांच्या संघात चढाईपटूंची कमतरता होती. मात्र नितिन मदने व मोनू गोयत च्या रुपाने यांग कुंग ली ला चांगली साथ लाभली आहे. पण पकडींमधे ते फारच आतातायीपणा करतात. रेडर कमावतात आणि डिफेंडर गमावतात अशीच गत आहे एकूण ! तरी आज गिरिष एर्नाक बाहेर होता ते एक चांगले झाले नाही तर सामना बरोबरीत सुटण्याच्या ऐवजी गमावला असता.

धर्मराजमुटके's picture

18 Jul 2016 - 10:45 pm | धर्मराजमुटके

दिवस २३ वा : सामना क्र. ४० : बंगाल वॉरीयर्स वि. तेलुगु टायटन्स
आजचा सामना देखील धक्कादायक ठरला. बंगालने आज सुरुवातीपासूनच टायटन्सवर बढत घ्यायला सुरुवात केली. मात्र टायटन्सने देखील त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. मात्र बंगाल हा या मोसमातला गुणतालिकेतला शेवटी असणारा संघ आहे. आणि त्याने शेवटपर्यंत दिलेली लढत तेलुगु टायटन्सच्या खेळाडूंना सर्वस्वी अनपेक्षीत होती हे त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट वाचता येत होते.
बंगालतर्फे आज यांग कुंग ली ने चढाईत ११ आणि पकडीमधे १ असे १२ गुण मिळविले. आज त्याचा खेळ खरोखरीच बहारदार झाला. त्याला मोनु गोयत ने ६ गुण तर पकडींमधे विशाल माने ने ५ गुण कमावून चांगली साथ दिली.
मात्र आज यांग कुंग ली ने राहूल चौधरीच्या शेवटच्या चढाईत अनावश्यक पकड करण्याचा प्रयत्न करत जिंकणारा सामना हातचा घालवून तो बरोबरीत सोडविला. त्या अगोदरही बर्‍याच वेळ पकड संघाने अनावश्यक चुका केल्या. मात्र आजच्या चुका वेगळ्या प्रकारच्या होत्या. इतर दिवशी संघ विनाकारण / घाईगडबडीच्या निसटत्या पकडी करत होता तर आज काही खेळाडूंनी उत्तम पकडी केल्या मात्र वेळीच इतर खेळाडूंची साथ न लाभल्यामुळे त्या फोल ठरल्या.
टायटन्सचा यशस्वी खेळाडू रोहित चौधरी आज बर्‍याच वेळा पकडींमधे बाद झाला. तरी त्याने ८ गुंणांची कमाई केली तर निलेश साळूंके ने सुपर १० करीत १० गुणांची कमाई केली. संदिप नरवाल ने पकडींमधे ६ गुणांची कमाई केली.
एकंदरीत हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत हातघाईचा, रोमहर्षक व उत्कंठावर्धक झाला मात्र सामना बरोबरीत सुटल्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू खूपच नाराज झाले. विशेषतः राहूल चौधरी व यांग कुंग ली.
मला देखील बंगालसाठी खुप वाईट वाटले. असो.
बंगाल वॉरीयर्स वि. तेलुगु टायटन्स - दोघांना प्रत्येकी ३४ गुण - सामना बरोबरीत सुटला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------
दिवस २३ वा : महिला कबड्डी सामना क्र. ५ : स्टॉर्म क्वीन्स वि. आईस दिवाज
सामना सुरु झाल्यावर काही वेळातच वीज गेल्यामुळे हा सामना पुर्ण पाहता आला नाही. मात्र आज स्टॉर्म क्वीन्स ने आपला पहिला वहिला विजय नोंदविला.
दोन्ही संघांनी चढाईत केवळ ४-४ गुणांची नोंद केली.
मात्र आज आईस दिवाज ची पकड / बचाव फळी कमजोर ठरली आणि त्यामुळेच ते सामना हरले.
सामना प्रत्यक्ष न बघता आल्यामुळे संक्षिप्त वृत्तांत देत आहे.

स्टॉर्म क्वीन्स (२१ गुण) वि. आईस दिवाज (१५गुण) - स्टॉर्म क्वीन्स ६ गुणांनी विजयी.

विजेत्यांचे अभिनंदन ! उद्या पुन्हा भेटूया, शुभरात्री !!

धर्मराजमुटके's picture

19 Jul 2016 - 10:58 pm | धर्मराजमुटके

दिवस २३ वा : सामना क्र. ४१ : दबंग दिल्ली वि. तेलुगु टायटन्स
अपेक्षेप्रमाणे हा सामना तेलुगु टायटन्स ने मोठ्या फरकाने जिंकला.
दबंग दिल्लीचा हंगामी कर्णधार मिराज शेख ने आज चढाईत ८ गुणांची कमाई केली तर सेल्वामणी ने ५ आणि काशिलिंग आडके ने ३ गुणांची कमाई केली. पकडींमधे सचिन शिंगाडे ३, प्रशांत चव्हाण २ आणि डी. सुरेश आणि संकेत चव्हाण यांनी प्रत्येकी १ गुणांची कमाई केली.
तेलुगु टायटन्सचा स्टार रोहित चौधरी याने आज चढाईत तब्बल १४ गुणांची कमाई केली. त्याने दोनदा सुपर रेड केल्या. त्याला पकडींमधे संदिप नरवाल आणि जसमेर सिंग गुलिया यांनी प्रत्येकी ५ गुण मिळवून तोलामोलाची साथ दिली. आज निलेश साळुंके १ ही गुण कमवू शकला नाही. आजचा सामना रोहित चौधरी ने जवळ जवळ एकट्याच्या बळावर सामना फिरविला असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. आज त्याने शारीरिक चपळतेबरोबर काही वेळेस आपल्या व्यवस्थापन कौशल्याचे देखील प्रदर्शन घडविले.
दोन्ही संघ आज प्रत्येकी एक एक वेळेस सर्वबाद झाले.
तेलुगु टायटन्स (३६ गुण) वि. दबंग दिल्ली (२८ गुण) - तेलुगु टायट्न्स ८ गुणांनी विजयी.
============================================================
दिवस २४ वा : सामना क्र. ४२ : बंगाल वॉरीयर्स वि. बंगळुरु बुल्स
आपल्या आतापर्यंतच्या किर्तीला जागत बंगालने हा ही सामना स्वतःच्या आततायीपणामुळे प्रतिस्पर्धी संघास बहाल केला. थोडक्यात बंगाल बरोबर खेळतांना समोरचा संघ जिंकत नाही तर त्याला विजय बक्षीस म्हणून मिळतो.
नेहमीप्रमाणे सुरुवातीपासून बढत घेतली पण दुसर्‍या सत्रात आततायीपणा करीत पराभव ओढून आणला. बंगालच्या या मानसिकतेचे वर्णन करण्यास मजजवळ शब्द नाहीत. त्यांना पुढील मोसमात कोच बरोबर एका मानसोपचार तज्ञाचीदेखील गरज आहे असे जाणवते.
पहिल्या सत्राअखेर बंगालकडे ७ गुणांची आघाडी होती.
आज निलेश शिंदे रोहित कुमारच्या पहिल्याच चढाईत बाद झाला. बंगालच्या नितिन मदनेने चढाईत ६ गुण, तर यांग कुंग ली ने ४ आणि मोनु गोयत ने ३ गुण मिळविले. तर पकडफळीत विशाल शिंदे ने ४ गुण आणि सी अरुण ने ३ गुणांची कमाई केली.
बंगळुरु बुल्सच्या बाजूने रोहित कुमार ने ८ गुण, आशिष कुमार ७, विनोद कुमार ४, योगेश हुड्डा आणि सुरिंदर नाडा प्रत्येकी ३ तर मोहित चिल्लर ने १ गुणांची कमाई केली.
बंगाल वॉरीयर्स (२५ गुण) वि. बंगळुरु बुल्स (२७ गुण) - बंगळुरु २ गुणांनी विजयी.
==================================================
आजच्या पराभवाने बंगाल्चे या मोसमातील आव्हान संपुष्टात आले आहे.
उद्यापासून चे सामने मुंबईत होणार आहेत.
उद्या पहिला सामना यु मुंबा वि. पुणेरी पलटण - पुण्याने केलेल्या मानहानीकारक पराभवाचा बदला मुंबई घेऊ शकेल ? की उद्या परत एकदा पुण्याचीच सरशी होईल ? बघूया काय होते ते.

धर्मराजमुटके's picture

20 Jul 2016 - 10:41 pm | धर्मराजमुटके

दिवस २५ वा : सामना क्र. ४३ : यु मुंबा वि. पुणेरी पलटण
हुश्श ! जिंकलो एकदाचे !! आजचा सामना संपल्यावर माझ्या तोंडातून प्रथम हेच उद्गार बाहेर पडले. आजचा संपूर्ण सामना श्वास रोखून ठेवायला लावणारा होता. शेवटपर्यंत कोण जिंकेल हे सांगता येणे अशक्य होते.
पुण्याचा कप्तान मनजित चिल्लर आज सामना खेळणार नव्हता हे समजताच मुंबईच्या समर्थकांच्या अपेक्षा नक्की उंचावल्या असणार. मनजित चिल्लर हा एकटा एका संघाच्या तोडीस तोड आहे असे म्हटले तरी वावगे ठरु नये.
पहिल्याच चढाईत मुंबईच्या कॅप्टन कुल अनुप कुमार ने १ गुण वसूल करुन मुंबईचे खाते उघडले. त्यानंतर लगेच पुणेरी पलटणच्या संघाने चढाईवर गेलेल्या रिशांक देवाडीगाची शिकार केली आणि काळजाचा ठोकाच चुकला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गुणवसूलीचा सिलसिला सुरु झाला तो काही थांबायचे नाव घेत नव्हता. पहिल्या सत्रात १७ व्या मिनिटाला पुणेरी पलटण सर्वबाद झाली. त्यावेळी मुंबई १४ गुणांवर होती तर पुणे ९ गुणांवर होती. मात्र दुसर्‍या सत्राच्या सुरुवातीलाच पुण्याच्या अजय ठाकूर ने आणि दिपक निवास हुड्डा ने चांगला खेळ करत मुंबईची आघाडी कमी केली व नंतर मुंबईवर आघाडी घेतली. आज पुणेरी संघ २ वेळा सर्वबाद झाला.

शेवटपर्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात आज दोन्ही संघांनी उत्तम कामगिरी केली मात्र पकड फळीच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर यु मुंबाने हा सामना खिशात घातला. घरच्या मैदानावर आज यु मुंबाचा विजय चाहत्यांना दिलासा घेऊन गेला.

यु मुंबाच्या बाजुने अनुपकुमार ने चढाईत ९ आणि पकडीत २ अशा तब्बल ११ गुणांची कमाई केली तर सुरजित ने आज पकडींमधे ५
गुणांची कमाई केली. सुरजितच्या आजच्या जवळजवळ सर्वच पकडी जबरदस्त ताकदीचे आणि वेळेचे नियोजन दर्शविणार्‍या होत्या.
मागच्या काही सामन्यांत आपला खेळ हरविलेल्या रिशांक देवाडिगाने आज ५ गुण मिळविले. तर राकेश कुमार ने पकड आणि चढाई मिळून ४ गुण घेतले.

पुणेरी च्या अजय ठाकूर आणि दिपक निवास हुड्डा या नेहमीच्या यशस्वी कलाकारांनी अनुक्रमे ९ आणि ७ गुणांची कमाई केली. पकडींमधे सोमवीर शेखर ने ४ तर जोगींदर नरवाल ने ३ गुण घेतले. रविंदर पहल च्या खात्यावर आज काही जमा झाले नाही.

यु मुंबा (३४ गुण ) वि. पुणेरी पलटण (३१ गुण) - यु मुंबा ३ गुणांनी विजयी.

==========================================================
दिवस २५ वा : महिला कबड्डी सामना क्र. ६ वा : स्टॉर्म क्वीन्स वि. फायर बर्डस
सुरुवातीचे सामने चाचपडत खेळणार्‍या स्टॉर्म क्वीन्स ने आजचा सामना मोठया फरकाने जिंकला.

स्टॉर्म क्वीन्सच्या तेजस्विनी बाईने चढाईत ३ गुण तर ज्योती ने २ गुण मिळविले तर पकडफळीत साक्षी कुमारी (४ गुण), मोती चंदन (३ गुण), दिपीका जोसेफ (३ गुण) , क्षितीजा हिरवे (१ गुण) तर सोनाली इंगळे ने चढाईत १ आणी पकडींमधे २ अशा ३ गुणांची कमाई केली.

फायर बर्डस च्या चढाईपटूंना आज उल्लेखनिय कामगिरी करता आली नाही व त्याचा फटका बसून ते पराभूत झाले.
पुर्ण सामन्यात ममता पुजारी, कर्णधार (२ गुण) आणि बदली खेळाडू रिंजू के. (२ गुण) अशी केवळ ४ चढाई गुणांची कमाई झाली तर पकडींमधे किशोरी शिंदेने ५ गुण आणि सुवर्णा बारटक्के ने २ गुणांची कमाई केली. एकट्या किशोरीचे पकडफळीतील गुण संघातील सर्व चढाई गुणांपेक्षा जास्त ठरले.

स्टॉर्म क्वीन्स (२२ गुण) वि. फायर बर्डस (११ गुण) - स्टॉर्म क्वीन्स १० गुणांनी विजयी.
=======================================================
यापुढील महिला कबड्डी सामना फायर बर्डस वि. आईस दिवाज असा असेल व त्यात जिंकणारा संघ आणि स्टॉर्म क्वीन्स यांच्यात अंतिम लढत होईल.

उद्या परत भेटूया ! शुभरात्री !!

पी. के.'s picture

21 Jul 2016 - 11:47 am | पी. के.

काल अनुप चा खेळ लाजवाब होता. त्याची कमीत कमी कॅलरीज खर्च करून जास्तीत जास्त पॉईंट घेण्याची कला आणि नजाकत खरचं वाखान्नय आहे.

वूमन्स कबड्डी लीग अगदीच रटाळ चालू आहे. फक्त तिसर्‍या डू ऑर डाय रेड वरच गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात.. त्यापेक्षा मग महाराष्ट्र कबड्डी लीग झाली होती ती बरीच चांगली होती.. गुणफरक थोडा तरी हालला पाहिजे तो अगदीच कूर्मगतीने पुढे जातो.. डू ऑर डाय रेड आहे म्हणून त्या रेडला तरी गुण मिळवण्याचा प्रयत्न होतो.. नाहीतर तेही घडणार नाही... उगाच आपलं इकडून तिकडे जायचं आणि तिकडून इकडे यायचं एवढाच काय तो खेळ होईल...

पी. के.'s picture

21 Jul 2016 - 4:49 pm | पी. के.

सहमत, रेडर आणी डिफेन्डर यांच्यात तीन फुटाचे अंतर आसात.

मी-सौरभ's picture

21 Jul 2016 - 7:19 pm | मी-सौरभ

आज सगळा धागा वाचला. मी रोजचे सामने बघतो पण आज हा धागा वाचुन आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांची क्षणचित्रे बघितल्यासारखे वाटले.

तुमच्या चिकाटीला सलाम!!

ह्या हंगामात दिल्लि कडुन पण बरेच मराठी खेळाडू (काशी, सन्केत, प्रशांत चव्हाण, सचिन शिंगाडे) आहेत हे बघून बरे वाटले.

विअर्ड विक्स's picture

21 Jul 2016 - 10:54 pm | विअर्ड विक्स

यू मुंबाने घरच्या मैदानावर साखळी सामन्यात अपराजित राहण्याचा विक्रम अबाधित राखला. पहिल्या ३ सीझन पेक्षा फारच वेगळा अनुप दिसत आहे... चढाई बरोबर बचावात पण अग्रेसर !!!! मनजीत नि जसप्रीत प्रमाणे एकटाच raid करतोय !!!!! मान गये उस्ताद ! आजचा सामना अविस्मरणीय होता. शेवटच्या रेडपर्यंत धागधुग होती. बरोबरीत सुटला ... फिंगर्स crossed for यू मुंबा !

धर्मराजमुटके's picture

21 Jul 2016 - 11:42 pm | धर्मराजमुटके

दिवस २६ वा : सामना क्र. ४४ : जयपुर पिंक पँथर्स वि. दबंग दिल्ली
आजचा दिवस बर्‍याच अर्थाने वेगळा ठरला. आज राष्ट्रगीत म्हणण्यासाठी उपस्थित होती सनी लिओनी. तिने बर्‍यापैकी चांगले गायले. आपली पुर्वीची पॉर्नस्टार ची इमेज बदलत हिंदी सिनेतारका म्हणून तिने बर्‍यापैकी बस्तान बसवत आणले आहे. सुरवातीला अतिशय तिरस्कार किंवा ती तसली आहे म्हणून तिच्याबद्दल सैलपणे बोलणार्‍या जिव्हा आता बर्‍यापैकी मंदावल्या आहे. संयम ठेवला तर विरोधाची धार हळूहळू कमी होत जाते याचे उदाहरण म्हणून या केसकडे पाहता यावे. याबदद्ल सनी नक्कीच अभिनंदनास पात्र आहे.
आज सनी लिओनी, सोनु सुद आणि अभिषेक बच्चन, रॉनी स्क्रुवाला अशी खाशी बॉलीवुडी मंडळी सामना बघायास जमली होती.

असो, आता सामन्यांबद्द्ल !

आज दिल्लीच्या संघाने पहिल्याच चढाईत जयपुरच्या कप्तान जसवीर सिंह ला मैदानाबाहेर धाडले. आतापर्यंत मला आठवते त्याप्रमाणे पहिला गुण नेहमी चढाईपटूने वसूल केलेला आहे मात्र या सामन्यात प्रथमच पकडफळीने गुण वसूल केला. त्यानंतर लगेच काशिने अजून एक गुण मिळविला. सुरुवातीला दिल्लीच्या बाजूने झुकलेला सामना हळूहळू एकदा इकडे तर एकदा तिकडे असा फिरत फिरत शेवटी जयपुरच्या बाहुपाशांत जाऊन विसावला. दिल्ली से निकली गाडी जयपुर चले होले होले !
दिल्ली पहिल्या सत्रातल्या ११ वा मिनिटाला सर्वबाद झाली. पहिल्या सत्राच्या अखेरीस जयपुरकडे १४ गुण होते तर दिल्लीकडे ११.

दिल्लीच्या बाजूने कर्णधार मिराज शेख ने आज अप्रतिम खेळी करत चढाईत ८ तर पकडींमधे ३ अशा भरघोस गुणांचा मालक ठरला. काशिलींग ने ४ गुणांची कमाई केली तर सेल्वामणीने फक्त २ गुणांची कमाई केली. पकडींमधे सचिन शिंगाडे आणि प्रशांत चव्हाण यांना प्रत्येकी २ गुण मिळाले.
जयपुरच्या वतीने जसवीर सिंह ने सर्वाधिक ७ गुण, अजय कुमार ५ गुण, राजेश नरवाल २ गुणांची कमाई केली तर पकडींमधे अमित हुडा आणि रण सिंह यांनी प्रत्येकी ३ तर रोहित राणा ने १ गुणांची कमाई केली. शब्बीर बापू ला आजही खाते उघडता आले नाही.

जयपुर पिंक पँथर्स (२४ गुण) वि. दबंग दिल्ली (२२ गुण) - जयपुर २ गुणांनी विजयी.

=========================================================
दिवस २६ वा : सामना क्र. ४५ : यु मुंबा पँथर्स वि. तेलुगु टायटन्स
आजच्या दिवसाच्या मोस्ट अवेटेड सामना म्हणून या सामन्याची नोंद झाली. मन म्हणत होते की मुंबई जिंकावी तर मेंदू सांगत होता की टायटन्सचे आव्हान कडवे आहे. त्यांचा संघ कितीतरी पटीने उजवा आहे. मात्र या दिल और दिमागच्या खेळात दोन्हींची बरोबरी होऊन सामना बरोबरीत जिंकला.
यु मुंबाने पहिल्या सत्राअखेर मिळविलेली ७ गुणांची आघाडी दुसर्‍या सत्रात पकडफळीच्या चुकांमुळे गमाविली तर काही वेळाने तेलुगु टायटन्स जवळपास ५-६ गुणांच्या फरकाने मुंबईच्या पुढे निघून गेले.

तेलुगु टायटन्सच्या स्टार राहूल चौधरी ला आज मुंबईने पहिल्या सत्रात सतत बाहेर बसविले. मात्र दुसर्‍या सत्रात त्याने त्याची पुर्ण भरपाई केली. त्याने आज ८ गुणांची कमाई केली तर निलेश साळूंकेची आजची कामगिरी सरस झाली नाही. त्याला केवळ २ गुणांवर समाधान मानावे लागले. आज टायटन्सच्या पकडफळीतील खेळाडूंनी त्यांचा नेहमीचाच उत्कॄष्ट खेळ केला. संदिप नरवाल (६ गुण), जसमेर सिंह व संदिप धुल प्रत्येकी २ गुण तर विनोद ने एक गुण ची कमाई केली.

मुंबईच्या वतीने अनुप कुमार (६ गुण), राकेश कुमार (चढाई व पकडीत प्रत्येकी ३ असे ६ गुण), सुरेशु कुमार (३ गुण ), रिशांक देवाडिगा (२ गुण), बदली खेळाडू विकाश (१ गुण) अशी कमाई चढाईत झाली तर पकडफळीत जीवा कुमार, सुरजित ला प्रत्येकी २ गुण मिळाले. एकंदरीत आज यु मुंबाचा बचाव परत एकदा कमजोर पडला. राकेश कुमारने अखेरच्या चढाईत जे दोन गुण मिळविले ते व शेवटच्या चढाईत विकाश कुमार ने मिळविलेला १ गुण यांच्या जोरावर आज यु मुंबा तेलुगु टायटन्सला बरोबरीत रोखू शकली.

राकेश ने जे २ गुण मिळविले ते खरोखरीच अप्रतिम होते त्यामुळेच त्याला आजच्या 'मोमेंट ऑफ दि मॅच' पुरस्काराने गौरविण्यात आले. खरे तर आज टायटन्स जिंकायचे मात्र विकाश कुमारच्या शेवटच्या चढाईत संदिप नरवाल ने अति आत्मविश्वास दाखवित त्याला पकडण्याचा प्रयत्न केला व तो त्याच्या अंगाशी आला. शेवटच्या क्षणाला केलेल्या ह्या चुकीमुळे टायटन्सला सामना बरोबरीत सोडवावा लागला.

आज मैदानावर पुन्हा एकदा पंचांची ढिसाळ कामगिरी दिसून आली. एकतर मुंबईने पहिल्या ३-४ मिनिटांतच आपला रिव्हियु गमावला. दुसर्‍या सत्रात तशीच पाळी तेलुगु टायटन्सवर आली. मात्र रिशांक देवाडिगा चढाई करुन येत असतांना संदिप कुमारने लगेच पाठलाग करुन त्याला बाद केले. वस्तूतः दुसरा खेळाडू राकेश कुमार जीवनदान मिळाल्यामुळे मैदानात आला देखील नव्हता. तसेच एकदा राकेश कुमार बाद नसतांना देखील पंचांनी घाईगडबडीने त्याला बाद दिले. ह्या दोन तांत्रिक चुकांचा फटका मुंबईला नक्कीच बसला.

यु मुंबा (२५ गुण ) वि. तेलुगु टायटन्स (२५ गुण) - सामना बरोबरीत सुटला.
=======================================================

आज यु मुंबा जिंकले नाहीत मात्र घरच्या मैदानावर अजून एकदाही न पराभूत न होण्याचा यु मुंबाचा विक्रम आजदेखील कायम राहिला याचेच आज समाधान मानावे लागले.

विजेत्यांचे अभिनंदन ! उद्या परत भेटू या ! शुभरात्री !!

आणि धाग्यावर प्रतिसाद देऊन हुरुप वाढविणार्‍या प्रतिसादकांचे तसेच मुक वाचकांचे देखील शतशः आभार. प्रत्येकजणाला प्रतिसाद देऊ शकत नसला तरी धाग्याची एकंदरीत वाचनसंख्या देखील आपले प्रेम दाखविण्यास पुरेसी आहे. पुन्हा एकदा धन्यवाद !

नाखु's picture

22 Jul 2016 - 8:57 am | नाखु

पंचाची मदत घेण्याची पद्धत अजून निर्दोष आणि पारदर्शक हवी (विशेष्तः बोनस गुणाचे वेळी) एकाच बाजूने कॅमेरा अअँगल दाखवितात,

लेखमाला भन्नाट आणि वर्णण तर सुसाट...

नितवाचक नाखु

रघुनाथ.केरकर's picture

22 Jul 2016 - 4:23 pm | रघुनाथ.केरकर

चढाईपटुचा एक पाय बोनस रेषेवर असताना दुसरा पाय हवेत हवा असा नीयम आहे, नुसता बोनस रेषेवर पाय घासुन आल्यास बोनस मीळत नाही, बर्‍याच वेळेस चढाईपटु सुधा बोनस बद्दल शासंक असतो, अश्यावेळी तो मागे वळुन आपल्या संघातल्या खेळाडुंकडुन खात्रि करुन घेतो."सकाळ" च्या माहीती प्रमाणे बूटामध्ये चीप लाउन कसे काय बोनस कळेल.
मला सुचलेला एक उपायः
जसे क्रीकेट मध्ये यष्ट्यांमध्ये कॅमेरे असतात तसा "हाय स्पीड (स्लो मोशन)" कॅमेरा निदान रेषा आणी बोनस रेषा ह्यांच्या मध्ये चीत्रा मध्ये दाखवल्या प्रमाणे मॅट्वर लावावा. test

जगप्रवासी's picture

22 Jul 2016 - 6:26 pm | जगप्रवासी

दिवस २६ वा : सामना क्र. ४४ : जयपुर पिंक पँथर्स वि. दबंग दिल्ली

मिराजने प्रत्येक चढाईत ३० सेकंदातील शेवटी उरलेल्या ४/५ सेकंदात गुण मेहनतीने कमावून आणले होते, ते सचिन शिंगाडेने उगाच घाई करून घालवले आणि सामना जयपूरच्या हवाली केला. काशीला सध्या "ग" पणाची बाधा झाल्यासारखी वाटतेय, वेगळाच ऍटीट्युड घेऊन तो मैदानात वावरत असतो आणि त्यामुळे समोरच्या टीम मधील खेळाडू त्याला सहजरित्या पकडतात. गेल्या मोसमातील काशी यावेळेला वेगळाच वाटतोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2016 - 8:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हरता हरता बरोबरीत राहिली धड़धड़ वाढवली या सामन्याने....

-दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

22 Jul 2016 - 11:43 pm | धर्मराजमुटके

दिवस २७ वा : सामना क्र. ४६ : जयपुर पिंक पँथर्स वि. पटणा पायरेट्स
मजबूत पटणा पायरेटसला नमवत आज जयपुर ने हा सामना खिशात घालून उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश केला. उपांत्य फेरीत प्रवेश करणारा जयपुर हा या मोसमातला पहिला संघ आहे.
आज जयपुरच्या वतीने अजय कुमार ने सर्वात जास्त म्हणजे ७ चढाई गुणांची कमाई केली तर राजेश नरवाल (४ गुण) आणि जसवीर सिंह (३ गुण) अशी त्याला चढाईत साथ मिळाली. अमित हुड्डा ने आज दिमाखदार पकडी करत ५ गुणांची कमाई केली तर रण सिंह ने १ गुणाची कमाई केली.
पाटण्याच्या प्रदिप नरवालने चढाईत ७ गुण घेतले मात्र जयपुर ने त्याला बरेच वेळ बाहेर बसविले. दुसरा चढाईपटू सुरजित सिंह हा देखील आज बर्‍यापैकी यशस्वी ठरला. त्याने चढाईत ५ गुणांची कमाई केली. राजेश मोंडल ला आज केवळ १ गुण मिळाला. आज पटणाची पकडफळी सपशेल अयशस्वी ठरली. बाजीराव होडगे, कुलदीप, फजल अत्राचली, धर्मराज या सगळ्यांनीच नाम बडे और दर्शन छोटे असा खेळ केला. पकडफळीत कुलदीप व फजल ला प्रत्येकी २ गुण मिळाले तर बाकी खेळाडू आज खाते उघडू शकले नाही. पटणा संघ आज २ वेळा सर्वबाद झाला.

पंचांच्या ढिसाळ कारभारामुळे आज दोन्ही संघांमधे शेवटच्या काही क्षणांमधे बरीच बाचाबाची झाली. दोन तीन वेळा पंचांना आपले निर्णय फिरवावे लागले.
जसजसी अंतिम फेरी जवळ जवळ येत जाईल तसतसा चुकीच्या निर्णयांचा फटका संघांना बसल्यास पंचांची अवस्था खराब होऊ शकते. पंच स्वतः तिसर्‍या पंचाचा निर्णय घेऊ शकतात व त्यांनी मनात शंका असेल तर निर्णय रेटून न नेता मदत घ्यायला हवीय !

जयपुर पिंक पँथर्स (२९ गुण) वि. पटणा पायरेट्स (२२ गुण) - जयपुर ७ गुणांनी विजयी.

=================================================
दिवस २७ वा : सामना क्र. ४७ : यु मुंबा वि. बंगाल वॉरीयर्स
कोणताही विक्रम हा मोडण्यासाठीच बनलेला असतो याचा प्रत्यय आजच्या या सामन्यात आला. बंगाल वॉरीयर्स आजपर्यंत कधीही मुंबईविरुद्ध जिंकले नव्हते. मुंबई कधीही आपल्या घरच्या मैदानावर पराभूत झाली नव्हती. आज हे दोन्हीही विक्रम एका फटक्यात मोडीत निघाले. मोडीत निघाले की रद्दीत निघाले कोणास ठाऊक !! कारण मोडीला थोडा तरी भाव असतो. रद्दी मात्र अतिशय कमी भावाने विकली जाते.

बंगालने आज धक्कादायक निकाल नोंदविताना मुंबईला चक्क धुळ चारली. काल सामने संपल्यावर जेव्हा राकेश कुमारची मुलाखत घेतली होती तेव्हा तो म्हणाला होता की बंगालकडे हारण्यासारखे काहीच राहिलेले नाही त्यामुळे ते जास्त धोकादायक ठरु शकतात. आज ते बोल लगेचच खरे ठरले.

यु मुंबाचा बचाव / पकड आज अजिबात म्हणजे अजिबातच चालला नाही. बंगालची पकड फळीची ताकत ल़क्षात घेता आज यु मुंबाने जास्त चढाईपटू सामन्यात उतरविले होते मात्र त्याचा परिणाम स्वतःच्याच पकडफळीवर झाला.

निलेश शिंदेच्या अनुपस्थितीत आज नितिन मदने कडे कप्तानपद होते. यांग कुंग ली ने आज चांगला खेळ करत चढाईत ८ गुणांची कमाई केली. आज तो शेवटपर्यंत अजिंक्य राहिला. तर मोनु गोयत ने ६ गुणांची कमाई केली. नितीनला आज फक्त १ गुण मिळाला. गिरिश एर्नाक ने आज मजबूत पकडी करत ५ गुणांची कमाई केली तर सी. अरुण (३ गुण), विशाल माने (२ गुण), अमित चिल्लर (१ गुण) अशी पकडफळीची कामगिरी होती.
बंगालने आज दोन वेळा मुंबईला सर्वबाद केले.

यु मुंबाचा अनुप कुमार (५ गुण), राकेश कुमार (४ गुण), रिशांक देवाडिगा (७ गुण), सुरेश कुमार, विकाश कुमार व नितिन कुमार प्रत्येकी १ गुण अशी चढाईतील कमाई होती. मात्र पकडफळीत जीवा कुमार १ व सुरजित २ गुण याएकूण फक्त ३ गुण मिळविता आले. एकंदरीत यु मुंबाच्या डिफेन्सने आज सर्वात वाईट प्रतीचा खेळ केला. रिशांक देखील अगदी शेवटी शेवटी चालला. राकेश कुमार ने मात्र आजही खेळात सातत्य दाखविले. बंगाल आज शेवटच्या काही क्षणांकरीता सर्वबाद झाली.
मात्र उत्तम पकडींच्या जोरावर त्यांनी हा सामना जिंकला. आजचा त्यांचा विजय त्यांना स्पर्धेत परत आणू शकला नाही मात्र मुंबईपुढील आव्हान मात्र अधिक खडतर झाले.

आजचा सामना बघून मला आम्हाला शाळेत असलेला डेव्हिड विरुद्ध गोलियथ ह्या धड्याची आठवण झाली.

यु मुंबा (२७ गुण) वि. बंगाल वॉरीयर्स (३१ गुण) - बंगाल ४ गुणांनी विजयी.

------------------------------------------------------------------------------------

आपला संघ हरलेला असतांना दु:खी मनाने वार्तांकन लिहिणे फारच अवघड असते मात्र मुंबईने मला ह्यावेळेस ती शक्ती मिळविण्यास मदत केली आहे. बघू आता उद्या काय होतेय ते !

असो. विजेत्यांचे अभिनंदन ! शुभरात्री !!

धर्मराजमुटके's picture

23 Jul 2016 - 11:11 pm | धर्मराजमुटके

दिवस २८ वा : सामना क्र. ४८ : पुणेरी पलटण वि. पटणा पायरेटस
आजच्या या सामन्यात पटणा पायरेटसने सुरुवातीलाच चांगली पकड घेतली. आज दुखापतीमुळे पुन्हा मनजित चिल्लर संघात सामिल नव्हता. तो नसला की संघाचे मनोधैर्य अगोदरच खच्ची होते की काय अशी परिस्थिती होते. आज पटणाने पुण्याला २ वेळा सर्वबाद केले. पुण्याच्या अजय ठाकूरने चांगली सुरवात केली मात्र दिपक हुड्डा ला २ रे सत्र चालू होईपर्यंत सुर गवसला नव्हता. दुसर्‍या सत्रात दिपक ने बॅकलॉग भरुन काढण्याचा प्रयत्न केला मात्र कबड्डीच्या या खेळात वेगाला फार महत्त्व असते. ४० मिनिटाच्या खेळात शेवटपर्यंत अनिश्चितता असते व काहिही होऊ शकते हे मान्य. मात्र जसजसा वेळ कमी होत जातो तसतसे खेळाडूंवरचा दबाव वाढत जातो व दबावाखाली खेळताना चुका होतात. पहिल्या सत्रातली पिछाडी भरुन काढतांना पुण्याने वेगवान खेळ केला मात्र शेवटी सामना हातचा गमवावा लागला.
चढाईत पुण्याच्या दिपक हुड्डा ने ८ गुण, अजय ठाकूर ने ६ गुण तर बदली खेळाडू प्रमोद नरवाल ने धक्कादायक चढाया करत ३ गुण मिळविले. पकडींमधे रविंदर पहल ४ गुण, सोमविर शेखर ३ गुण तर जोगींदर नरवाल ला एक गुण मिळाला. सोनू नरवाल आज खाते उघडू शकला नाही. राजेश मोंडल २ गुण.
पटण्याचा यशस्वी चढाईपटू प्रदिप नरवालने नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट खेळ करत चढाईत १२ गुण मिळविले तर सुरजित सिंह ला अवघा १ गुण मिळाला. पकडींमधे बाजीराव होडगे ने ५ गुण, कुलदीप व फजल प्रत्येकी २ गुण, तर धर्मराज ने १ गुण मिळविला.

पटणा आज उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. आतापर्यंत जयपुर व पटणा हे २ संघ उपांत्यफेरीत पोहोचले आहेत.

पुणेरी पलटण (२८ गुण) वि. पटणा पायरेटस (३१ गुण) - पटणा पायरेटस ३ गुणांनी विजयी.

-------------------------------------------------------------------------------------------------
दिवस २८ वा : सामना क्र. ४९ : यु मुंबा वि. बंगळुरु बुल्स
हा सामना आज खरोखरीच रक्तदाब वाढवून गेला. हातघाईची लढाई म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर आजचा सामना बघण्याला दुसरा पर्यायच असू शकत नाही.

सुरुवातीला पुढे असणारी मुंबई दुसर्‍या सत्रात पिछाडीवर पडली. नंतर बंगळुरु बुल्स ने जवळ जवळ १०-१२ गुणांची आघाडी घेतली तेव्हा मुंबई हा सामना हरणार हे निश्चित झाले. मात्र शेवटच्या १२-१३ मिनिटांत मुंबईने इतका तडफदार खेळ केला की ते बघूनच डोळ्याचे पारणे फिरले. शेवटून दुसर्‍या चढाईत दोन्ही संघ बरोबरीत होते. आता आजचा सामना देखील बरोबर सुटणार असे वाटत असतांना राकेश कुमार सामन्याच्या शेवटच्या चढाईत पकडला गेला व बंगळुरु अवघ्या १ गुणांनी विजयी झाली. हा धक्का मुंबईच्या चाहत्यांच्या व खेळाडूंच्या अगदी जिव्हारी लागला. इतका की राकेश कुमार ला मैदानातच रडूच कोसळले.
रिशांक, अनुप, राकेश यांनी आज चांगली कामगिरी केली. जीवाने काल व आज चुका अगदी कसोशीने टाळल्या. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत लढणे म्हणजे पराभूत होण्याचे चान्सेस वाढविणे. प्रेक्षकांना जरी अटीतटीचा सामना बघण्यात मजा येत असली तरी स्पर्धेत जिंकण्यासाठी सामना पहिल्यापासून आपलया ताब्यात घेणे केव्हाही उत्तम. आज खरोखरीच अगदी शेवटच्या ३० सेकंदात या सामन्याचा निकाल लागला.

मुंबईचा गुणफलक
अनुप कुमार (७ ) , राकेश कुमार (४), सुरजित (५), रिशांक देवाडीगा (४), जीवा कुमार (२), गुरविंदर सिंह (१).

बंगळुरु बुल्सच्या रोहित कुमारने चढाईत आज केवळ एकदा बाद होत ८ गुण मिळविले तर विनोद कुमार ने २ गुण मिळविले. बदली खेळाडू पवन शेरावत ला १ गुण मिळाला.
आज पहिल्या सत्रात एकदम दुबळी भासणारी पकडफळी दुसर्‍या सत्रात चीनची भिंत बनून समोर आली. व पकड फळीत मोहित चिल्लर (५ गुण), सुरिंदर नाडा (३ गुण), आशिष सांगवान (१) गुण अशी गुणांची कमाई केली.

यु मुंबा (२७ गुण) वि. बंगळुरु बुल्स (२८ गुण) - बुल्स १ गुणांनी विजयी.

----------------------------------------------------------------------------------------------------------
आजचा सामना बघून मला सीजन ३ च्या अंतीम फेरीतील मुंबई वि. पटणाच्या लढतीची आठवण झाली. तेव्हा देखील शेवटच्या चढाईत मुंबईचा पराभव झाला होता व खेळाडू रडवेले झाले होते.

आजचे वार्तांकन लिहायला अजिबातच मूड नव्हता मात्र घेतलेला वसा टाकायचा नाही म्हणून कसाबसा वृत्तांत लिहून पुर्ण करत आहे.

विजेत्यांचे अभिनंदन आणि शुभरात्री !!
------------------------------------------------------------------------------------------------------------

आज हे गीत ऐकत ऐकत झोपी जाण्याचा प्रयत्न करणार आहे.

नया है वह's picture

25 Jul 2016 - 3:14 pm | नया है वह

बंगळुरु बुल्स विजयी होउन सुध्दा हरले.
मुंबईचा पराभव झाला असला तरी कमी फरकाने हरल्यामुळे त्यांना १ गूण मिळाला आणि तोच बंगळुरु बुल्स ला महागात पडणार कारण ते आता ३७गुणांच्य च्या पुढे जाउच शकत नाहीत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2016 - 6:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुंबाचा म्याच बरोबरीत राहिला असता, असो. मुंबा पिछाड़ीवरुन आघाडीला आली होती. मुंबा जिंकेल असं शेवटी वाटलं पण सुरुवातीचा खेळ पाहता जिंकेल अशी देहबोली नव्हती, ना पकड़ी होत्या... जास्त बचाव मुंबाच्या अंगलट येतो.

>>>>>आजचे वार्तांकन लिहायला अजिबातच मूड नव्हता

वो मालक असं नाय करायचं. तुमच्या प्रतिसाद आम्ही रेग्युलर वाचतोय ना राव. असं नका करू. लिहित राहा.:)

-दिलीप बिरुटे

शिद's picture

25 Jul 2016 - 3:18 pm | शिद

सहमत.

मुटके साहेब, आम्ही वाचतो तुमचे सगळे प्रतिसाद.

मॅच पाहताना ज्या गोष्टी लक्षात येत नाहीत ते तुमचे प्रतिसाद वाचून कळतात त्यामुळे मूड असो वा नसो प्रतिसाद जरूर लिहावा ही नम्र विनंती.

धर्मराजमुटके's picture

25 Jul 2016 - 1:00 am | धर्मराजमुटके

दिवस २९ वा : सामना क्र. ५० : दबंग दिल्ली वि. बंगाल वॉरीयर्स
आजपासून ४ दिवस कबड्डीचे सामने दिल्लीमधे सुरु आहेत. आजचा हा ५० वा सामना तळाशी असलेल्या दोन संघांमधे होता. बंगाल अगोदरच स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे ते कसे खेळतील ? मुंबईला धुळ चारणारा हा संघ परत एकदा चमत्कार करेल का ? असे अनेक प्रश्न मनात ठेऊन सामना पाहायला सुरुवात केली. मात्र मुंबईला पराभूत करणारा बंगाल आज चक्क "तो मी नव्हेच" असे म्हणत एकदम ढिसाळ खेळला. दिल्लीने सुरुवातीपासूनच तगडी सुरुवात करत आपण अजुनही उपांत्य फेरीच्या स्पर्धेमधे आहोत हे दाखवून दिले.

बंगालचा कर्णधार निलेश शिंदे आजही मैदानावर उपस्थित नव्हता. मात्र त्याच्या अनुपस्थितीत बंगालची खेळी अतिशय पुचाट म्हणावी अशी झाली. चढाईपटू मोनु गोयत ने आज उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. यांग कुन ली ने आज बर्‍यापैकी खेळ केला मात्र त्यांना पकडफळीतून म्हणावी अशी साथ मिळाली नाही. पकडफळीने आज एकदम खराब खेळ केला.
गुणफलक : चढाई - मोनु गोयत (चढाईत ८ गुण तर पकडींमधे ३ असे एकूण ११ गुण) यांग कुन ली (५ गुण), नितिन मदने - कर्णधार (१ गुण), बदली खेळाडू रवि दलाल (१ गुण).
पकडफळीत गिरिष एर्नाक ला फक्त १ गुण. यावरुन बंगालच्या पकडफळीची कामगिरी लक्षात यावी.

दिल्लीच्या काशिलिंग आडके ने आज घरचे मैदान गाजविले. त्याने चढाईत तब्बल १३ गुणांची कमाई केली. तर सेल्वामणी ने ७ गुण घेत त्याला तितकीच तोलामोलाची साथ दिली. मिराज शे़ख - २ गुण
पकडफळीमधे डी. सुरेश कुमार, सचिन शिंगाडे, प्रशांत चव्हाण यांनी प्रत्येकी ३ गुण तर अनिल कुमारने २ गुणांची कमाई केली.

बंगाल वॉरीयर्स आज चक्क ३ वेळा सर्वबाद झाली. मला वाटते या मोसमात ३ वेळा सर्वबाद होणारी बंगाल बहुधा पहिलाच संघ असावा.
प्रेक्षकांनी आज काशिला जणू डोक्यावर घेतले होते असा माहोल होता.

दबंग दिल्ली (४१ गुण) वि. बंगाल वॉरीयर्स (२० गुण) - दबंग दिल्ली तब्बल २१ गुणांनी विजयी.

आजचा बंगालचा खेळ बघून मी मनातल्या मनात एकच प्रश्न विचारला, "बाबांनो आज जर असेच खेळायचे होते तर मुंबईच्या वाटेत काटे का बरे पेरुन ठेवले ?"

============================================================
दिवस २९ वा : सामना क्र. ५१ : तेलुगु टायटन्स वि. जयपुर पिंक पँथर्स
अगोदरच उपांत्य फेरीत पोहोचलयामुळे जयपुर आजचा सामना जास्त मेहनत घेऊन खेळणार नव्हता हे उघड सत्य होते. पण मन म्हणत होते की त्यांनी तेलुगु टायटन्सला हरवावे म्हणजे मुंबईचा उपांत्य फेरीचा प्रवास थोडा तरी सुखकर होईल मात्र तसे घडले नाही.

प्रमु़ख खेळाडू जसविर सिंह व शब्बीर बापू आज आराम फर्मावत असतांना इतर खेळाडूंनी सुरुवातीला चांगली सुरुवात केली मात्र नंतर टायटन्सने त्यांचा बचाव भेदत सुंदर खेळ केला.

जयपुर तर्फे खेळतांना तुषार पाटीलने आज सर्वाधिक ७ गुण घेतले. त्यापाठोपाठ रण सिंह व महिपत नरवाल प्रत्येकी ३ गुण, राजेश नरवाल व अमित हुडा प्रत्येकी २ गुण अशी संघाची कामगिरी होती. बदली खेळाडू प्रदिप नरवाल व अमित नागर प्रत्येकी १ गुण, तर श्रीकांत तेवठिया यांनी २ गुण कमावले.

जयपुर आज चक्क २ वेळा सर्वबाद झाले. आज त्यांच्यात जिंकायचा जुनुन दिसतच नव्हता. मात्र तो दाखवयची त्यांना आवश्यकताही नव्हती हे ही तितकेच खरे !

टायटन्सकडून त्यांचा स्टार चढाईपटू राहूल चौधरी ने चढाईत ११ गुण, निलेश साळुंके ५ गुण तर पकडींमधे विनोद ३ गुण, जसमेर सिंह गुलीया २ गुण, संदिप धुल २ गुण तर सागर क्रिष्णा आणि संदिप नरवाल ने प्रत्येकी १ गुणांची कमाई केली.

एकंदरीत आजचे दोन्ही सामने जवळपास एकतर्फीच झाले असे म्हटले तरी चालेल.

तेलुगु टायटन्स (३५ गुण) वि. जयपुर पिंक पँथर्स (२३ गुण) - तेलुगु टायटन्स १२ गुणांनी विजयी.

उपांत्य फेरीत पोहोचणारा तेलुगु टायटन्स हा ३ रा संघ आहे.

============================================================

विजेत्यांचे अभिनंदन ! प्रतिसादकांचे आणि वाचकांचे आभार आणि शुभरात्री ! परत भेटूया !

पुणेरी पलटणला जास्त संधी

धर्मराजमुटके's picture

25 Jul 2016 - 10:38 pm | धर्मराजमुटके

दिवस ३० वा : सामना क्र. ५२ : दबंग दिल्ली वि. पटणा पायरेटस
मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही या म्हणीचा प्रत्यय सध्या कबड्डीमधे बाहेर पडणारे संघ देत आहेत. आज अगदी असाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. दबंग दिल्ली ने आज शेवटपर्यंत किल्ला लढविला मात्र शेवटच्या चढाईत पटणा ने काशिची धरपकड करत १ गुणांनी निसटता विजय मिळविला. मात्र पटणा सारख्या संघाला दिल्लीने विजयासाठी शेवटच्या क्षणापर्यंत झुंजविले ते जबरदस्तच होते. याच मोसमात पटणाला दिल्ली ने सर्वप्रथम पराभूत केले होते.

आज काशिलींग आडके आणि मिराज शेखने प्रत्येकी ११ गुण कमावले तर सेल्वामणी ने ३ गुण घेतले. पकडीमधे अनिल (३गुण), सचिन शिंगाडे (२ गुण), तर डी. सुरेश कुमार ला १ गुण मिळाला. प्रशांत चव्हाण ची पाटी आज कोरीच राहिली आणि तो जवळ ३ -४ वेळा प्रदिप नरवालकडून बाद झाला.

दुसर्‍या सत्राच्या सुरुवातीला दिल्ली सर्वबादवर आली होती मात्र एकटया मिराज शेख ने बाजीप्रभू च्या आवेशात जवळ जवळ ८-१० मिनिटे खिंड लढविली. खरोखरीच त्याचा आजच्या कर्तुत्वाला तोड नाही. यापुर्वी देखील जेव्हा जेव्हा दिल्ली सर्वबाद होण्याच्या जवळ पोहोचली आणि तेव्हा तेव्हा मिराज शेख ने एकहाती किल्ला लढविला आहे. हॅटस ऑफ टु मिराज शेख !!

पटण्याचा सुपर हिरो प्रदिप नरवाल ने आज चढाईत ९ गुण, राजेश मोंडल ७ गुण (६ चढाई + १ पकड) , अबुफजल १ गुण, कुलदीप १ गुण तर पकडींमधे फजल अत्राचली ४ गुण, अनिल कुमार २ गुण, विजिन थंगादुराई १ गुण तर बदली खेळाडू हादी १ गुण असा गुणफलक बघायला मिळाला.

पटणाच्या प्रदिप ला आज दिल्लीने बरेचदा बाहेर धाडले मात्र त्याच्या अनुपस्थितीत राजेश मोंडल ने किल्ला लढवत प्रतिस्पर्ध्यांना बाद करत प्रदिप ला पुन्हा पुन्हा जीवदान दिले. पटणा संघाच्या प्रदिप व राजेश या दोन्ही खेळाडूंनी या मोसमात सातत्य दाखविले आहे. या दोन्ही पैकी कोणी ना कोणी संघासाठी प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करतच असतो. त्यामुळे या संघाला यंदाच्या मोसमात अंतीम विजयाच्या संधी जास्त आहेत असे मला वाटते.
आज पकडी व चढाई दोहोंमधे दिल्ली अव्व्ल राहिले मात्र एकदा सर्वबाद आणि बोनस गुणांच्या जोरावर पटणाने बाजी मारली आणि गुणतालीकेतील प्रथम स्थान पक्के केले.

या सामन्याची क्षणचित्र नक्कीच बघा असे सुचवेन.

दबंग दिल्ली (३१ गुण) वि. पटणा पायरेटस (३२ गुण) - पटणा पायरेटस १ गुणांनी विजयी.

=====================================================
महिला कबड्डी सामना : उपांत्य फेरी - फायर वर्डस वि. आईस दिवाज

आज उपांत्य फेरीची लढत फायर बर्डस वि. आईस दिवाज यांच्यात झाली. हा सामना संपुर्ण पाहू शकलो नाही. मात्र शेवटचे काही क्षण पाहता आले. अगोदरच्या सामन्यांप्रमाणे हा ही सामना जवळपास एकतर्फी होऊन फायर बर्डस जिंकले.

आईस दिवाज ची कप्तान अभिलाषा म्हात्रे ला आज आपले खाते उघडता आले नाही. सोनाली शिंगटेला चढाईत ३ गुण तर बदली खेळाडू सुमित्रा शर्माला सुपर रेड मधे एकदाच ३ गुण मिळाले.
पकडफळीत ललीताचा करिश्मा चालला नाही. खुशबू नरवालला ३ गुण तर मोनू २ आणि रक्षा नारकरला १ गुण मिळविता आला.
आईस दिवाज आज एक वेळा सर्वबाद झाले.

फायर बर्डस कडून चढाईत बदली खेळाडू के. रिंजू ( ४गुण), मारिया (२गुण) तर कप्तान ममता पुजारी ला १ गुण प्राप्त झाला.
पकड फळीत बदली खेळाडू गायत्री हिला ४ गुण तर पायल चौधरी ३ गुण ( पकड -२ गुण, चढाई १ गुण), सुवर्णा बारटक्के (२ गुण), रितु नेगी, मोनिका देवी व किशोरी शिंदे यांना प्रत्येकी १ गुण मिळविला.

एकंदरीत आजचा सामना बदली खेळाडूंनीच गाजवला.

आईस दिवाज ( १३ गुण ) वि. फायर बर्डस (२२ गुण) - फायर बर्डस ९ गुणांनी विजयी.

=============================================
महिला कबड्डीचा अंतिम सामना रविवार दि, ३१ जुलै २०१६ रोजी हैदराबाद येथे फायर बर्डस आणि स्टॉर्म क्वीन्स यांच्यात होईल.

उद्या परत भेटूया तोपर्यंत शुभरात्री !
विजेत्यांचे अभिनंदन !!

एकंदरच ही लिग सगळ्या खेळाडुंसाठी चांगली संधी ठरली आहे, जागतीक पातळीवर स्पर्धांमध्ये इराण हा आपल्या संघाचा कडवा प्रतीस्पर्धीं. विश्वचषकात २वेळा अन्तीम लढत भारत वी. ईराण सामने झाले आणी दोन्ही वेळा भारत वीजयी झाला, २००४ चा वडाळ्याला झालेल्या सामन्याला मी हजर होतो. पंचवीसेक गुणानी भारताने इराण ला हरवलं होतं.
सध्याचा इराण्च्या खेळाडुंचा खेळ बघता भवीष्यात इराण आपल्याला भारी पडु शकतो.

पी. के.'s picture

26 Jul 2016 - 2:50 pm | पी. के.

सहमत

तुमच्या मताशी सहमत. फजल अत्राचली, अबोफजल आणि विशेषकरुन मिराज शेख चा यंदाच्या मोसमातला खेळ पाहून मला इराणी खेळाडूंचे फारच कौतुक वाटत आहे. तसेच कौतुक यान कुंग ली चे देखील ! परक्या भुमीतला खेळ यांनी केवळ आत्मसातच केला नाहि तर त्यात विशेष प्राविण्य देखील मिळविले आहे.
मी जर यु मुंबाचा मालक असतो तर मिराज ला हवे त्या बोलीवर संघात घेतले असते :)

तुमचे प्रतिसाद वाचून मला भारत वि. इराण कबड्डी सामन्यांची रेकॉर्डींग बघाविशी वाटू लागले आहे. बघायला पाहिजे कोठे मिळतात काय ते.

राहुल मराठे's picture

1 Aug 2016 - 7:24 pm | राहुल मराठे

धर्मराज साहेब तुमचे बरं हाय तुम्हाला सर्व सामने पाहता येतात.
आम्हाला नऊ नंतर काहे दिया परदेस आणि चाल हवा येऊ ध्य बगाव लागत.

धर्मराजमुटके's picture

26 Jul 2016 - 11:53 pm | धर्मराजमुटके

होय ! या बाबतीत मी खरोखरीच सुदैवी आहे. मंडळी दुसर्‍या दिवशी ह्या मालिका युट्यूबवर बघतात आणि कधीही रिमोट हातात न देणारा मुलगा अगदी कार्टून्स सोडून देखील माझ्या हातात रिमोट देतो. अशा क्षणी तरी मी स्वत:ला नक्कीच भाग्यवान समजतो.

तसे आमच्या घरात सर्वच कबड्डीचे चाहते आहेत त्यामुळे जास्त प्रश्न निर्माण होत नाहित :)

धर्मराजमुटके's picture

26 Jul 2016 - 11:50 pm | धर्मराजमुटके

दिवस ३१ वा : सामना क्र. ५३ : पटणा पायरेटस वि. तेलुगु टायटन्स
आजचा हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय कमी महत्त्वाचा होता. त्यामुळे मैदानात राखीव / बदली खेळाडूच उतरणार याचा अंदाज होताच. पटणाने एखाद दुसरा खेळाडू वगळता जवळपास सर्वच राखीव खेळाडू उतरविले होते. मात्र तेलुगु टायटन्सने हा ही सामना गंभीरपणे घेत संघात फार थोडे बदल केले.
अखेर अनुभवी संघ नवोदितांना भारी पडला आणि तेलुगु टायटन्सने २१ गुणांच्या प्रचंड फरकाने जिंकला.

पटणातर्फे आज प्रदिप नरवाल, सुनील कुमार आणि महेश गौड आज बदली खेळाडू म्हणून खेळले. त्यांनी अनुक्रमे २, १ आणि ३ गुणांची कमाई केली.
पटणाचा इराणी खेळाडू अबोफजल ने आज स्वतःला सिद्ध करत चढाईत ९ गुणांची कमाई केली. तर आजच्या संघाचा कप्तान हादी याने १ गुण घेतला.
पकडफळीमधे केवळ इराणच्या फजल अत्राचलीने ८ गुण मिळविले. इतरांच्या नावासमोर एकही गुण लागला नाही.

टायटन्सतर्फे स्टार खेळाडू राहुल चौधरी ने चढाईत ११ आणि पकडींत २ अशा १३ गुणांची मिळकत केली. तर बदली खेळाडू अतुल ने ७ गुण, सुकेश हेगडे ३ गुण आणि प्रपंचन ने १ गुण घेतला.
पकडफळीत संदिप नरवाल ने ६ गुण, विशाल भारद्वाज ने चढाईत १ आणि पकडींमधे ४ गुण, रुपेश तोमर ने ३ गुण असा धावफलक होता.

पटणा पायरेटस (२५ गुण) वि. तेलुगु टायटन्स (४६ गुण) - टायटन्स २१ गुणांनी विजयी.

पटणाचा आजचा धावफलक हा या मोसमातला सर्वोच्च धावफलक होता.
====================================================================

दिवस ३१ वा : सामना क्र. ५४ : दबंग दिल्ली वि. पुणेरी पलटण
आजही दिल्लीने पुण्याला शेवटपर्यंत कडवी लढत दिली. मात्र शेवटी पुण्याने हा सामना जिंकला.

मनजित चिल्लर आज फक्त मैदानात होता व त्याने फक्त १ च चढाई केली. मात्र त्याची उपस्थिती संघाचे मनोबळ वाढविते याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला.
पुण्याच्या दिपक निवास हुड्डा ने आज चढाईत चक्क १७ गुणांची कमाई केली तर नितिन तोमर ने ६ गुण कमाविले. अजय ठाकूर ला आज केवळ १ गुणावर समाधान मानावे लागले.
पकडफळीत रवींदर पहल ३ गुण तर मनजित चिल्लर आणि जोगींदर नरवाल प्रत्येकी १ गुण.

दिल्लीकडून काशिलिंग आडके ने चढाईत ८ आणि पकडींमधे २ असे १० गुण घेतले तर मिराज शेखला ४ गुणांची कमाई झाली. बदली खेळाडू प्रशांत कुमार राय आणि उमेश म्हात्रे अनुक्रमे ४ आणि २ गुण. सेल्वामणी केवळ १ गुण.
पकडफळीत अनिल कुमार ४, प्रशांत चव्हाण आणि डि. सुरेश प्रत्येकी १ गुण. सचिन शिंगाडे ला आज खाते उघडता आले नाही.
एकंदरीत दिल्लीचा बचाव आज दिपक हुड्डासमोर कोसळून पडला. मात्र सर्वबादच्या स्थितीत आले असतांनाही एकट्या मिराज शेखने जवळपास ५-७ मिनिटे किल्ला लढवत ऑल आऊट रोखून धरला. मिराज खरोखरीच एक जबरदस्त खेळाडू आहे. संकटकाळात तो नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे.
आजच्या पराभवामुळे दिल्ली स्पर्धेतून बाहेर फेकली गेली तर पुण्याचे आव्हान अजुन टिकून आहे. मात्र हरणारी दिल्ली उद्या मुंबईचे आव्हान कायम राहू देते किंवा कसे ते उद्याच कळेल. मात्र दिल्लीने गेल्या तीन दिवसांत जो खेळ दाखविला तो अगोदरपासूनच दाखविला असता तर कदाचित वेगळे निकाल पाहायला मिळाले असते.
मात्र हे बोलणे म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर ह्या प्रकारातलेच आहे त्यामुळे असो !

दबंग दिल्ली (३४ गुण) वि. पुणेरी पलटण (३९ गुण) - पुणे ५ गुणांनी विजयी.
======================================================

विजेत्यांचे अभिनंदन !!
उद्या पुन्हा भेटूया. शुभरात्री !

रघुनाथ.केरकर's picture

27 Jul 2016 - 11:53 am | रघुनाथ.केरकर

कालच्या दिल्ली वी पुणे च्या सामन्यात लक्षात रहाण्या सारख्या दोन गोष्टी होत्या
१. कसं खे़ळु नये याचं छान उदाहरण काशी ने दीलं. (डु ऑर डाय चढाई वर बोनस कन्फर्म न करता पट्ठ्या लगेच
माघारी परतायचा. ३ च्या कवर मध्ये पण भाई सपोर्ट ला आला नाही.)

२. दुसरी म्हणजे दुसर्‍या हाफ च्या १० व्या मिनीटाला मिराज ने मारलेली रेड, अप्रतीम, पुण्याची ७ ची कवर उभी होती, राइट कॉर्नर ला जोगींदर नर्वाल तर लेफ्ट कॉर्नर ला रवींदर पहल, दोन्हि खतरनाक, मीराज ने राईट ला एक अटेंपट करुन लेफ्ट कॉर्नर च्या हाता खालच्या नितिन तोमर ला धावता हात मारायल जात होता, तेवढयात पहल बाहेर आला आणी त्याने वाकुन मिराज चे पाय ब्लॉक करायचा प्रयत्न केला, इथवर बघ्णार्‍याला वाटलं होतं की मीराज ब्लोक झाला, पण सेकंदाच्या १०० व्या हिस्स्याला मीराज ने हनुमान उडी घेत रवींदर पहल ला ओलंडले आणी लॉबीत पोहोचला आणी मध्य रेषा ट्च केली. ज्या पदधतीने मिराज खेळ्तोय ते बघुन वाटत की तो खुप पुढे जाइल.

साधा मुलगा's picture

27 Jul 2016 - 9:54 pm | साधा मुलगा

कालचा सामना बघायला मिळाला. काशी आणि दिल्लीच्या संघाचे वाईट वाटले.
@ धर्मराजमुटके साहेब रोज न चुकता तुम्ही update देत असता. कमाल आहे तुमची ! जियो !

पुणेरी पलटण उपांत्य फेरीत पोहोचली. थँक्स टू यू मुम्बा.

धर्मराजमुटके's picture

28 Jul 2016 - 12:32 am | धर्मराजमुटके

दिवस ३१ वा : सामना क्र. ५५ : बंगळुरु बुल्स वि. पुणेरी पलटण
आजचा हा सामना पुण्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. आजच्या सामन्यातील हार-जीतच पुण्याचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करणार होती. अखेर मनजित चिल्लर च्या संघाने जिगरबाज खेळी करत सामना जिंकला आणी उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.

पुण्याच्या दिपक निवास हुड्डाने पहिली यशस्वी चढाई करुन लढाईस तोंड फोडले. त्याच्या पहिल्याच चढाईत बुल्सचा महत्त्वाचा मोहरा मोहित चिल्लर गारद झाला. मात्र लगेच दुसर्‍याच चढाईत बुल्सच्या रोहित कुमार ने पुण्याचा खेळाडू बाद करत मोहित ला मैदानात आत आणले. नंतर बंगळुरु ने सलग चांगला खेळ करत पुण्यावर आघाडी घेतली. पहिल्या सत्राअखेरीस पुण्याचे १२ गुण होते तर बंगळुरु बुल्सचे २१. बुल्स ९ गुणांनी आघाडीवर होती.

मात्र दुसर्‍या सत्राच्या सुरुवातीपासूनच मनजित चिल्लर ने डावा कोपरा पकडत जबरदस्त पकडी करत बंगळुरुची आघाडी नष्ट करत स्वतः आघाडी घेतली. सामन्याच्या शेवटच्या ४ मिनिटांपर्यंत दोन्ही संघांनी समसमान खेळ केला. मात्र शेवटच्या चार मिनिटात पुण्याने आपला अनुभव पणाला लावत सामना जिंकला.

बंगळुरुच्या रोहित कुमारने आज चढाईत ९ गुण घेतले मात्र त्याच्या खेळात नेहमीचा जोश, तडफ आढळून आली नाही. एकतर तो फार दमलेला असावा किंवा उपांत्य फेरीत पोहोचू न शकल्यामुळे मनोधैर्य खच्ची झाले म्हणा, पण आजचा रोहित निस्तेज दिसत होता.
बदली खेळाडू योगेश हुड्डा ने आज देखील तडफदार खेळ करत ३ गुण घेतले. तर बदली खेळाडू सुमित सिंह ने अगदी मोक्याच्या क्षणांमधे चांगली कामगिरी करीत चढाई व पकडींमधे प्रत्येकी दोन असे एकूण ४ गुण कमाविले. आशिष कुमार सांगवान चढाई व पकडी यांमधे प्रत्येकी १ असे एकूण २ गुण.
पकडींमधे मोहित चिल्लर ६ गुण व चढाईत २ गुण असे एकूण ८ गुण, सुरींदर नाडा ४ गुण,

पुणेरी पलटनचा दिपक हुड्डा नेहमीप्रमाणे यशस्वी ठरला. त्याने चढाईत ९ गुण घेतले तर नितिन तोमरने ५ आणि अजय ठाकूरने ३ गुणांची कमाई केली.
पकडफळीत आज मनजित चिललर ने जबरदस्त कामगिरी करत चक्क ११ गुणांची लयलुट केली. मला वाटते की पकडफळीत एवढे जास्त गुण घेण्याचा विक्रम बहुधा त्याचा नावे असावा. जोगींदर नरवाल १ गुण. केवळ मनजितच्या उपस्थितीने पुण्याची मानसिक अवस्था जेत्याची बनून जाते हे आज पुन्हा एकदा पाहावयास मिळाले.

बंगळुरु बुल्स (३३ गुण) वि. पुणेरी पलटण (३६ गुण) - पुणेरी पलटण ३ गुणांनी विजयी

======================================================
दिवस ३१ वा : सामना क्र. ५६ : यु मुंबा वि. दबंग दिल्ली

पुणे जिंकले तेव्हाच मुंबई बाहेर पडणार हे नक्की झाले होते. आज चक्क मुंबई उपांत्य फेरीत जाणार की नाही हे पुण्याच्या हारण्या जिंकण्यावर अवलंबून होते. मात्र "जो दुसर्‍यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला" या उक्तीचा प्रत्यय मुंबईला आला.

सामन्याच्या सुरुवातच काशीने चढाईत मुंबईचा गडी बाद करुन केली. सुरुवातीच्या सत्रात ११ व्या मिनिटालाच दिल्लीने मुंबईला सर्वबाद करत त्यांच्यावर आणि मुंबईच्या पाठीराख्यांवर जबरदस्त दडपण आणले. तेव्हा मुंबई होती ६ गुणांवर आणि दिल्लीचे गुण होते १२. चक्क ६ गुणांची आघाडी. दुसर्‍या सत्रात मात्र मुंबईच्या खेळाडूंनी जोरदार पुनरागमन करत दिल्लीवर आघाडी घेतली आणि त्यांना २ वेळेस सर्वबाद केले. मिराज शेख पहिल्या सत्रात बाहेरच होता मात्र दुसर्‍या सत्रात तो मैदानावर बदली म्हणून आला मात्र आज त्याला करीश्मा दाखविता आला नाही.

दिल्लीच्या काशिलिंग आडके ने आज चढाईत ७ गुण (चढाईत ६ तर पकडीत १ गुण) घेतले तर प्रशांत कुमार राय ने १० गुणांची कमाई केली. दिपक नरवाल ला २ गुण आणि उमेश म्हात्रे ला ३ गुण (चढाईत १ तर पकडीत २ गुण) मिळाले.
पकडफळीत डी. सुरेश कुमार ३ गुण, सचिन शिंगाडे २ गुण.

मुंबईच्या वतीने रिशांक देवाडिगा ने चढाईत १० गुण, अनुप कुमार ८ गुण (चढाईत ६ तर पकडीत २ गुण), राकेश कुमार ५ गुण (चढाईत ४ गुण तर पकडीत १ गुण)
पकडफळीत जीवा कुमार ३ गुण, सुरजित २ गुण, सुरींदर सिंह १ गुण, तर बदली खेळाडू सुरेशु कुमार ३ गुण (१ चढाई गुण + २ पकडफळीतील गुण).
एकंदरीत दुसर्‍या सत्रात मुंबाचा सर्वांगसुंदर खेळ बघायला मिळाला. रिशांक जाता जाता फॉर्मात आला तर !

यु मुंबा (३८ गुण) वि. दबंग दिल्ली (३४ गुण) - यु मुंबा ४ गुणांनी विजयी.

========================================================

या मोसमातल्या साखळीतील हा शेवटचा सामना. आता केवळ २ उपांत्य आणि शेवटी अंतिम सामना असे ३ सामने व्हायचे बाकी आहेत. ३१ जुलै २०१६ रोजी अंतीम सामना होऊन चौथ्या मोसमातील प्रो कबड्डी स्पर्धेचे सुप वाजेल.

मुंबई ४ गुणांनी जिंकली मात्र हे गुण त्यांना उपांत्यफेरीत पोहोचवू शकले नाहीत.
गुणतालीकेत पुणे व मुंबई दोन्हींचे अंतिम विजयी गुण ४२ होते मात्र एकंदरीत सर्व सामन्यातील एकूण गुणांतील फरकाच्या जोरावर पुण्याने आपला प्रवेश निश्चित केला.

सामन्यांच्या शेवटी झालेल्या मुलाखतीत मनजित चिल्लर ने मुंबईच्या उपांत्य फेरीत नसल्याचे दु:ख व्यक्त केले तर अनुप कुमार ने अंतिम फेरी पुणेरी पलटण वि. तेलुगु टायटन्स मधे होईल असा अंदाज वर्तविला.

उपांत्य फेरीचे सामने याप्रमाणे
सामना क्र. १ - पटणा पायरेटस वि. पुणेरी पलटण - दि. २९ जुलै २०१६, रात्री ८.०० वा. हैदराबाद येथे.
सामना क्र. २ - जयपुर पिंक पँथर्स वि. तेलुगु टायटन्स - दि. २९ जुलै २०१६, रात्री ९.०० वा. हैदराबाद येथे.

अंतिम फेरीची लढत रविवार दि. ३१ जुलै २०१६, रात्री ७.०० वाजता हैदराबाद येथे.
महिला कबड्डी अंतिम फेरीची लढत - ३१ जुलै २०१६, रात्री ८.०० वाजता हैदराबाद येथे.- स्टॉर्म क्वीन्स वि. फायर बर्डस.

===============================================================
मुंबई बाहेर गेलयामुळे आता पाठींबा पुण्याला. जिंकणारा संघ महाराष्ट्राचा असावा असा उदार ( कि उधार ? ) विचार !!

मात्र माझ्या अंदाजाप्रमाणे अंतिम लढत जयपुर वि. पटणा मधे होऊ शकते.
बघू या काय होते ते.

ज्यांना पुर्ण महिनाभर सामने बघता आले नाही त्यांना विनंती की शेवटचे दोन दिवस तरी वेळात वेळ काढून सामने बघा. तुम्ही नक्कीच कबड्डीच्या प्रेमात पडाल !

विजेत्यांचे अभिनंदन !

उद्या लेखणीला आराम ! परत भेटूया २९ जुलै २०१६ ला.

शुभरात्री !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jul 2016 - 11:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुणे जिंकले आणि आमचा मूड गलपटला. तरीही आमच्या मुंबाचा सामना पाहिला. जिंकूनही बी हरलो. मूड गेला माझा.

-दिलीप बिरुटे

मनजीत चिल्लर नि कमाल केली. अगदी मोक्याचा क्षणी खेळ उंचावला. मागच्या वर्षी सारखेच ह्या वर्षी पण नेमके पाटणा पायरेट्स पुण्याचा समोर उभे राहणार उपांत्य सामन्यात. बघूया काय होत ते. पण ह्या वर्षी माझ्या मते खरी मजा आणली ती मिराज शेख नी. वाघासारखा लढला गडी.

सगळे सामने पहिले. मज्जा आली.

पुणेरी पलटण सगळ्या हरलेल्या सामन्यात एक एक गुण मिळवत गेले ज्याचा त्यांना शेवटी फायदा झाला.
यु मुंबा एक सामना जास्त जिंकूनही गुणतालिकेत 5व्या स्थानावर राहिले.

माझा पाठींबा पुण्यालाच होता पहिल्यापासून आणि पुणे जिंकावं अशी इच्छा आहे.

यु मुंबाकडे सरप्राईझ एलिमेंट नव्हता. एकही नवीन प्लेअर नव्हता. त्याचा त्यानां फटका बसला.

तेलगू टायटनसकडून निलेश साळुंखे, संदीप धूल, जयपूरकडून अमित हुडा, दबंग दिल्लीकडून मिराझ शेख, उमेश म्हात्रे, पाटणा पायरेट्सचा पूर्ण संघ, पुणेरी पलटणकडून दीपक हुडा, यु मुंबाकडून सुरजीत सिंग, बेंगळुरू बुल्सकडून रोहित कुमार, बंगाल वॉरियर्सकडून जान कुंग ली यांचा खेळ पाहण्यासारखा होता.

मी-सौरभ's picture

29 Jul 2016 - 10:33 am | मी-सौरभ

जे लोक हे सामने नियमित बघतात त्यांना या सीझन चा सर्वोत्तम ७ चा संघ निवडुन टाकायला संगुया का??
मजा येइल

नया है वह's picture

29 Jul 2016 - 11:22 am | नया है वह

मनजित चिललर (कप्तान)
प्रदिप नरवाल (रेडर)
रोहित कुमार (रेडर)
राकेश कुमार (अष्ट्पैलु)
मिराझ शेख (अष्ट्पैलु)
अमित हुडा (बचावपटु)
फजल अत्रांचली (बचावपटु)

बदली खेळाडु
काशिलींग आडके (रेडर)
राजेश मंडल (रेडर)
संदीप नरवाल (बचावपटु)
दीपक हुडा (बचावपटु)

रघुनाथ.केरकर's picture

29 Jul 2016 - 12:05 pm | रघुनाथ.केरकर

अख्खी च्य अख्खी तेलुगु टाईटन्स ची टीम

मी-सौरभ's picture

1 Aug 2016 - 4:34 pm | मी-सौरभ

अनुप कुमार (रेडर-कप्तान)
प्रदिप नरवाल (रेडर)
रोहित कुमार (रेडर)
मनजित चिललर (अष्ट्पैलु)
मिराझ शेख (अष्ट्पैलु)
संदीप नरवाल (बचावपटु)
फजल अत्रांचली (बचावपटु)

बदली खेळाडु
काशिलींग आडके (रेडर)
अमित हुडा (बचावपटु)
राजेश मंडल (रेडर)
दीपक हुडा (अष्ट्पैलु)
धर्मराज उर्फ अन्ना (बचावपटु)

कबीरा's picture

29 Jul 2016 - 11:46 am | कबीरा

अनूप कुमार (कप्तान)
रोहित कुमार (रेडर)
राहुल चौधरी (रेडर)
संदीप नरवाल (बचावपटू)
मिराज शेख (अष्टपैलू)
रविंदर पहल (बचावपटू)
बाजीराव होडगे (बचावपटू)

बदली खेळाडू
दीपक निवास हुडा
जसवीर सिंग
फजल अत्रांचली
राकेश कुमार

कपिलमुनी's picture

29 Jul 2016 - 2:36 pm | कपिलमुनी

रविंदर पहल (बचावपटू) भंगार आहे त्यपेक्षा मोहित चिल्लर किंवा निलेश शिण्दे चांगले आहेत

नाखु's picture

29 Jul 2016 - 4:04 pm | नाखु

तोही जबरा आहे

रघुनाथ.केरकर's picture

29 Jul 2016 - 4:43 pm | रघुनाथ.केरकर

ह गडी यु मुंबा मध्ये असताना जीवा कुमार च्या साथीने जबराट टर्न लावायचा, या जोडिच्या जिवावर यु मुम्बा ने कैक सामने जींकले. आता जीवा - शिवाची जोडी फुटली. आता ना जीवा चा टर्न लागतो ना विशाल चा लागतो.

भारतमाता थेटराच्या मागे रामदुत चाळीत रहाणारा हा मध्यमवर्गातला मुलगा, खेळाच्या कौशल्यावर आधी मुंबै च्या कबड्डी संघात मग BPCL मध्ये दाखल झाला.

असे अनेक गुणी खेळाडु मुंबई ठाण्यात आहे, जे आता प्रो कबड्डी लिग मुळे लोकांच्या नजरेत येतात.

रघुनाथ.केरकर's picture

29 Jul 2016 - 4:46 pm | रघुनाथ.केरकर

असं नका म्हणु साहेब, ह्या सिजन ला त्याचा कॉर्नर लागला नाही, नाही तर पठ्ठ्या हुकमी चवडा काढतो.

कपिलमुनी's picture

29 Jul 2016 - 4:51 pm | कपिलमुनी

मागच्या सिझनला दिल्ली कडून खेळताना सुद्धा प्रॉब्लेम होता .
असो ! नव्या दमाच्या खेळांडूसमोर जुने कमी पडत आहेत असा दिसत आहे उदा: वजीर सिंग , रविंदर , राकेश कुमार यांच्व्ह्या पेक्षा रोहित कुमार , दीपक हुडा यांचा खेळ प्रभावी आणि वेगवान वाटत आहे

रघुनाथ.केरकर's picture

29 Jul 2016 - 5:14 pm | रघुनाथ.केरकर

मागच्या सिजन ला पहल ने चांगली काम्गीरी केली होती, त्याला इतर खेळाडुंची हवी तशी साथ लाभली नाही.

प्रत्यक्षात सामने बघता नाही आले तरी इथे हजेरी लावल्यावर सगळ्या घडामोडी समजतात.

पुणेरी पलटन (३३) ला नमवून पटणा पायरेट (३७) फायनल मध्ये.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jul 2016 - 9:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनजीतची टीम शेवटच्या पाच मिनिटात बाहेर झाली. पुनेरी पलटनच्या शेवटच्या रेड भारी झाल्या. चांगला म्याच बघायला मिळाला.

आता तेलगू आणि जयपुरचा सामना आहे, मला तेलगू जिंकतील असं वाटतं... बघूया थोड्या वेळात निकाल आहेच.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jul 2016 - 10:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अंतिम सामना बघू रविवारी. माझी टीम आता पटना :)

शूरा.

-दिलीप बिरुटे

जयपुर पिंक पँथर्सने (३४) तेलगू टायटन्सला (२४) चांगलाच धोबीपछाड देवून फायनलमध्ये प्रवेश केला.

मुटकेसाहेबांच्या विश्लेषणाच्या प्रतिक्षेत. :)

मोग्याम्बो's picture

29 Jul 2016 - 10:37 pm | मोग्याम्बो

पुण्याची नेहमीची बोंब, ऑल आऊट करता येत नाही. आजही तीच गत झाली. पटना चे 3 गडी असताना सगळी टीम परत आणून दिली.

धर्मराजमुटके's picture

30 Jul 2016 - 12:13 am | धर्मराजमुटके

दिवस ३२ वा : उपांत्य फेरी सामना क्र. १ : पुणेरी पलटण वि. पटणा पायरेटस

सलग ३१ दिवस चाललेल्या कबड्डी पारायणात कालचा दिवस आराम केला.
मुंबई अगोदरच बाहेर गेल्यामुळे आज मोकळ्या आणि तणाव विरहीत मनाने दोन्ही सामने बघता येणार होते. आजच्या पहिल्या उपांत्य सामन्याची उत्कंठा सकाळपासूनच लागली होती. त्यासाठी आजची संध्याकाळ मोकळीच ठेवली होती. मी घरात पाऊल ठेवायच्या अगोदरच चिरंजीवांनी टिव्ही सुरु करुन परवाच्या सामन्याच्या क्षणचित्रांचे आवर्तन चालू करुन माहौल तयार करुनच ठेवला होता.

पुण्याच्या नितिन तोमरने पहिल्याच 'जिंका किंवा मरा' चढाईत ( डु ऑर डाय रेड) बोनस गुण मिळवून पुण्याचे खाते उघडले. मात्र त्यानंर लगेचच पटण्याच्या राजेश मोंडल ने देखील पटणाचा गुणतक्ता हलविण्यास सुरुवात केली. नंतरच्या काही अयशस्वी चढायांनंतर दिपक निवास हुड्डा ने पटण्याच्या प्रदिप नरवाल ला बाहेर पाठवले. पहिल्या सत्राच्या सुरुवातीला सरस असणारी पुणेरी पलटण पहिल्या सत्राच्या अखेर ३ गुणांनी मागे पडली. दुसर्‍या सत्राच्या प्रारंभाला पुण्याने आपली पिछाडी हळुहळू भरत काढून दोन्ही संघ बरोबरीत आले.
दोन्ही संघ एक एक वेळेस सर्वबाद झाले. मात्र शेवटच्या ५ मिनिटांत बाजी पलटली व पटण्याच्या राजेश मोंडल, प्रदिप नरवाल ने सुरेख खेळ करत आपले अंतिम सामन्यातील स्थान निश्चीत केले.

पुण्याचा दिपक निवास हुड्डा ने आज देखील नेहमीप्रमाणे चांगली कामगिरी करत चढाईत ९ गुण घेतले. नितिन तोमर आणि प्रमोद नरवाल प्रत्येकी ३ गुण. आज अजय ठाकूर चालला नाही. बदली खेळाडू सोनू नरवाल ने २ गुणांची कमाई केली.
कप्तान मनजित चिल्लर ने पकडींमधे ७ गुण घेतले तर सोमविर शेखर आणि जोगिंदर नरवाल ने अनुक्रमे ३ आणि २ गुणांची कमाई केली. मात्र मनजितची आणि दिपक ची मेहनत पुण्याला तारु शकली नाही. मनजित यावेळी दुखापतग्रस्त असल्यामुळे चढाया करु शकला नाही. कदाचित त्याने चढाया देखील केल्या असत्या तर चित्र पालटले असते.

पटणाचा स्टार प्रदिप नरवालला आज पहिल्या सत्रात पुण्याने शत्रुघ्न सिन्हाचा 'खामोश" डायलॉग ऐकून गप्प बसविले होते मात्र दुसर्‍या सत्रात प्रदिप ने शॉटगन शत्रुघ्न बनत सव्याज परतफेड केली. संपुर्ण सामन्यादरम्यान राजेश मोंडल ने संयमी व सातत्यपुर्ण खेळ केला. संपुर्ण मोसमात प्रदिप चमचमता तारा बनून वावरला मात्र राजेशचा खेळ म्हणजे चंद्राची शीतलता होती. प्रदिप ने ससा बनून भराभर आणि भाराभर गुण कमावले पण राजेश ने कासवाच्या गतीने का होईना पण शेवटपर्यंत जिद्दीने खेळ केला. यावेळेस ससा आणि कासव दोघे एकाच संघात होते एवढाच काय तो फरक !

पटणाचा वतीने प्रदिप नरवाल चढाईत ८ आणि पकडींमधे २ असे एकूण १० गुण, राजेश मोंडल ६ गुण, सुरजित सिंह ५ गुण तर बदली खेळाडू अबोफजल १ गुण.
पकडींमधे कुलदीप ५ गुण, फजल अत्राचली ३ गुण, तर बदली खेळाडू हादीने ४ गुण घेतले. सामन्याच्या पहिल्या सत्रात हादीने नेत्रदिपक पकडी केल्या.

पुणेरी पलटण ३३ गुण वि. पटणा पायरेटस ३७ गुण - पटणा पायरेटस ४ गुणांनी विजयी.

==================================================================

दिवस ३२ वा : उपांत्य फेरी सामना क्र. २ : तेलुगु टायटन्स वि. जयपुर पिंक पँथर्स

पहिल्या सामन्याचा प्रभाव मनावर पडतो न पडतो, त्या खेळातील डावपेचांवर मनातल्या मनात रवंथ करतो न करतो तोच दुसरा सामना सुरु झाला. सुरुवातीची काही मिनिटे बरोबरीत, जिंकू किंवा मरु डावांवर चालणारा सामना साधारण १० व्या मिनिटानंतर रंगतदार बनत गेला व त्यानंतर तो इतका रंगला कि पहिल्या सामन्याच्या स्मृती लगेचच धुसर झाल्या. मला पहिल्या सामन्याचे वार्तांकन लिहिणे आज फारच अवघड गेले इतकी मोहिनी दुसर्‍या सामन्याने घातली. बरं मी काही आकडेपटू नाही की केवळ आकड्यांकडेच लक्ष देऊ शकेन. सामन्यांतला थरार अनुभवणे सगळ्यात महत्वाचे. असो.

आज सुरुवातीच्या काही खेळीनंतर तेलुगु टायटन्स ३-४ च्या फरकाने पुढे होते. आज पहिल्या सत्रात जयपुरचा राजेश नरवालला चढायांमधे अजिबात सफलता मिळाली नाही. तसेच त्याने पकडी करतांना देखील ३-४ वेळा घाईगडबड करत प्रतिस्पर्ध्यांना गुण बहाल केले. मात्र जयपुरचा कप्तान जसवीर आज सुरुवातीपासूनच पुर्ण जोषात आणि होश मधे राहून खेळत होता. आज त्याने उत्तम नियोजन करत स्वतः चढाईत ७ व पकडींत २ असे एकूण ९ गुण घेतले. त्याखालोखाल आज अजय कुमार ने ६ गुण घेतले. विशेष म्हणजे आज अजय बर्‍याच डु ऑर डाय वर खेळला. त्यामुळेच जसवीर जास्त वेळ मैदानावर राहू शकला. शब्बीर बापू ला आज यशाने हुलकावणी दिली. असाही त्याच्या ह्या मोसमातला खेळ त्याच्या किर्तीला साजेसा झाला नाही. राजेश नरवालने दुसर्‍या सत्रात एक सुपर रेड, एक उत्तम पकड करत बॅकलॉग भरुन काढत ४ गुणांची कमाई केली.
पकडफळीत आज दोन्ही बाजूच्या पकडपटूंनी कमाल केली. रण सिंह व अमित हुड्डा ने जबरदस्त पकडी करत ४-४ गुण घेतले.

तेलुगु टायटन्सला पाठींबा देतांना आज त्यांच्या घरच्या मैदानावर अनेक फिल्मी तारे आवर्जून उपस्थित होते. राणा दगुबत्ती, व्यंकटेश तर जयपुर संघाचे मालक अभिषेक बच्चन देखील त्यांच्या संघाचा खेळ पाहण्यासाठी आणि त्यांना अधूनमधून उत्साहित करण्यासाठी झटत होते.

तेलुगुचा स्टार चढाईपटू रोहित चौधरी ने आज चढाईत ९ गुण, तर निलेश साळुंके ने ६ गुण घेतले. संदिप नरवाल, सुकेश हेगडे, अतुल प्रत्येकी १ गुण.
पकडफळीमधे संदिप धुल ३ गुण, सागर क्रिष्णा १ गुण. आज तेलुगु ची बचाव फळी / पकड फळी निष्प्रभ ठरली. टायटन्सने चढाईत जास्त गुण मिळविले तर जयपुर ने पकडींमधे जास्त गुण कमाविले. टायटन्स आज चक्क दोनदा सर्वबाद झाली. दुसर्‍या सत्रात आघाडीवर गेलेल्या पिंक पँथर्सला रोखणे टायटन्सच्या पकडफळीला शक्य झाले नाही व दोघांच्या गुणांमधला फरक ७-९-१२-१३ असा वाढत वाढतच गेला.

शेवटी निर्णायक आघाडी मिळविलेल्या जयपुर ने खेळ संथ करीत नेला आणि आघाडी राखत टायटन्सचे अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न धुळीस मिळविले. जयपुर प्रचंड फरकाने विजयी !

तेलुगु टायटन्स(२४ गुण) वि. जयपुर पिंक पँथर्स (३४ गुण) - जयपुर पिंक पँथर्स १० गुणांनी विजयी.

===============================================================

माझ्या मागच्या प्रतिसादात वर्तविलेला अंतिम फेरीतील संघांविषयीचा अंदाज खरा ठरला. आता अंतिम विजय कोणाचा ?
सध्याची स्थिती पाहता ताकदीचा संघ पटणा पायरेटस वाटतोय.
बुद्धीचा कौल पटणा पायरेटसच्या बाजूने तर मनाचा कौल जयपुरच्या बाजुने.

तरी पण मला असे वाटते की जयपुर पिंक पँथर्स जिंकेल मात्र हा केवळ अंदाजच आहे. अर्थात माझ्या मताशी सहमत असणार्‍यांची संख्या देखील कमीच असेल हे मात्र नक्की !

बघुया ! ३१ तारखेला कळेलच काय ते !

===============================================================

विजेत्यांचे अभिनंदन !

आज प्रतिसादकर्त्यांनी धाग्यावर जास्त प्रमाणात उपस्थिती दर्शविली त्याबद्द्ल त्यांचे विशेष आभार !

परत भेटू या ३१ जुलै २०१६ ला. तोपर्यंत शुभरात्री !

महिला कबड्डी अंतिम फेरी, शेवटची दिड मिनिटे... बाप रे

महिला कबड्डी अंतिम फेरी, शेवटची दिड मिनिटे... बाप रे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jul 2016 - 10:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमची पटना जिंकली.धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

31 Jul 2016 - 11:59 pm | धर्मराजमुटके

दिवस ३३ वा : ३ र्‍या क्रमांकासाठीची लढत : पुणेरी पलटण वि. तेलुगु टायटन्स
३ र्‍या क्रमांकासाठीची लढत अगदी चुरशीची झाली. पुण्याचा मनजित चिल्लर आज मैदानात नव्हता त्यामुळे पुण्याच्या विजयाच्या आशा धुसर दिसत होत्या. मात्र पुण्याच्या इतर खेळाडूंनी विशेषतः दिपक निवास हुड्डा आणि जोगिंदर नरवाल ने कमालीचा सुंदर खेळ करत पुण्याला विजय मिळवून दिला.
पुण्याच्या बाजूने चढाईत दिपक निवास हुड्डा १६ गुण + पकडीत १ गुण असे एकुण १७ गुण, नितिन तोमर २ गुण अजय ठाकूर ३ गुण.
पकडींमधे जोगींदर नरवाल ६ गुण, सोमवीर शेखर ३ गुण तर प्रमोद नरवाल १ गुण आणि बदली खेळाडू प्रितम चिल्लर १ गुण.

तेलुगु टायटन्सच्या बाजुने आज राहुल चौधरी ने अप्रतिम खेळ करत तब्बल १८ गुण कमाविले तर निलेश साळूंकेला आज फक्त ३ गुणांवर समाधान मानावे लागले. संदिप नरवाल आज पकडींमधे चालू शकला नाही मात्र त्याला चढाईत एकमेव गुण मिळाला.
पकडफळीत महालिंगम ३ गुण, विशाल भारद्वाज २ गुण, तर सागर क्रिष्णा १ गुण.
टायटन्सची बचाव फळी आज एकदम कमजोर ठरली त्यामुळे राहुल च्या मेहनतीवर पाणी पडले. अखेरपर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात दिपक हुड्डा ने शेवटच्या काहि मिनिटांत टायटन्सला सर्वबाद केले व तिथुनच सामना पुण्याच्या बाजुने फिरला.
दोन्ही संघ आज दोन वेळा सर्वबाद झाले.

पुणेरी पलटण (४० गुण ) - तेलुगु टायटन्स (३५ गुण) - पुणेरी पलटण ५ गुणांनी विजयी.

================================================================
महिला कबड्डी अंतिम फेरी सामना : फायर बर्डस वि. स्टॉर्म क्वीन्स

हा देखील सामना चांगलाच रंगला. सुरुवातीला काही काळ फायर बर्डस पुढे होते नंतर स्टॉर्म क्वीन्सच्या बाजुला झुकलेला सामना परत एकदा फायर बर्डसच्या बाजुने झुकला. शेवटच्या काही क्षणाला अशी परिस्थिती होती की स्टॉर्म क्वीन्स सामना गमावतील असे वाटत असतांना शेवटच्या काही क्षणांत सामना असा फिरला की सामना पुन्हा स्टॉर्म क्वीन्स पुढे गेले आणि अगदी १ गुणांच्या फरकाने जिंकले.
शेवटच्या चढाईत स्टॉर्म क्वीन्स १ गुणाने पिछाडीवर होते मात्र तेजस्विनी बाईने शेवटच्या चढाईत २ गुण घेऊन सामना १ गुणाने जिंकला.

फायर बर्डस कडून चढाईत मारिया मोनिका २ गुण, ममता पुजारी (कप्तान) चढाई व पकड मधे प्रत्येकी १ असे २ गुण, तर केरळाची बदली खेळाडू रिंजू के ने ७ गुणांची कमाई केली. रिंजुच्या खेळानेच काहि वेळेसाठी सामना फायर बर्डसच्या बाजुने झुकविला.

पकडफळीत किशोरी शिंदे ४ गुण, रितु नेगी २ गुण, पायल चौधरी व मोनिका देवी प्रत्येकी १ गुण तर बदली खेळाडू गायत्रीचे चढाई व पकडीमधे प्रत्येकी १ असे एकूण २ गुण.

स्टॉर्म क्वीन्सच्या वतीने चढाईत साक्षीकुमारीने चढाईत ६ आणि पकडीत २ असे सर्वाधिक ८ गुण मिळविले तर तेजस्विनी बाई चढाईत २ आणी पकडफळीत १ असे एकूण ३ गुण. बदली खेळाडू भावना यादव २ गुण तर रश्मिता साहू १ गुण.
पकडफळीत सोनाली इंगळेने जबरदस्त पकडी करत ४ गुण, दिपीका जोसेफ २ गुण तर ज्योती ने १ गुण घेतला.

फायर बर्डस (२३ गुण) वि. स्टॉर्म क्वीन्स (२४ गुण) - स्टॉर्म क्वीन्स १ गुणाने विजयी

================================================================
अंतिम सामना : जयपुर पिंक पँथर्स वि. पटणा पायरेटस

मागच्या प्रतिसादात वर्णन केल्याप्रमाणे बुद्धीचा कौल पटणा ला होता मात्र मनाचा कौल जयपुर कडे होता. शेवटी मनावर बुद्धीचा विजय झाला आणि पटणा प्रो कबड्डीच्या इतिहासात दुसर्‍यांदा जेते बनले.
सुरुवातीपासून जयपुर ने पकड मिळविलेला हा सामना पहिल्या सत्राच्या अखेरीस पटण्याचा बाजुला झुकला आणि मग पटणाने सामन्याची पकड शेवटपर्यंत ढिली हिऊ दिली नाही. मात्र त्यामुळे दुसर्‍या सत्रात हा सामना एकतर्फी व पर्यायाने मिळमिळीत झाला.

पटण्याच्या सुपरस्टार प्रदिप नरवाल ने अपेक्षेप्रमाणे उत्तम कामगिरी करत चढाईत १६ गुण तर सुरजित सिंह आणि राजेश मोंडल ने प्रत्येकी २ गुण घेतले. प्रदिप नरवाल ने आज जवळपास २५-२६ चढाया केल्या. आजचा त्याचा स्टॅमिना आणि खेळ दोन्ही वाखाणण्यासारखे होते.
पकडफफळीमधे इराणी हादी ने ५ गुण, बदली खेळाडू धर्मराज ने ३ गुण, कुलदीप सिंह ३ गुण तर फजल अत्राचली १ गुण. आज बाजीराव होडगे चा खेळ होत होत नव्हता त्यामुळे त्याला संघाने बाहेर पाठवून धर्मराज ला त्याच्या जागेवर खेळविले.

जयपुर कडून जसवीर सिंह ने नेहमीप्रमाणे उत्तम खेळ करत १३ गुण, राजेश नरवाल ७ गुण, तर अजय कुमार ने १ गुण असे चढाईत गुण घेतले.
पकडफळी मात्र आज अपेक्षेप्रमाणे खेळू न शकल्यामुळे जयपुरला हार स्वीकारावी लागली. उताविळपणामुळे बरेच गुण घालवावे लागले. तसेही प्रदिप नरवाल को पकडना नामुंकीन नही लेकीन मुश्कील जरुर है !
पकडफळीत अमित हुड्डा ३ गुण,तर रोहित राणा १ गुण. रण सिंहची पाटी कोरी, शब्बीर बापूची घागर रिकामी. तर बदली खेळाडू महिपत नरवालच्या हाताला देखील काहिच लागले नाही. केवळ २-४ खेळाडू खेळले आणि बाकीच्यांनी त्याच्या पुण्याईवर जगायचे ठरले तर मग हार ही ठरलेलीच ! मात्र जसवीर सिंह चे विशेष कौतुक. या वयातही त्याचा खेळ तरुणांना लाजविणारा आहे.

पटणा पायरेटस (३७ गुण) वि. जयपुर पिंक पँथर्स (२९ गुण ) - पटणा पायरेटस ८ गुणांनी विजयी.

==================================================================
अशाप्रकारे जवळ जवळ ३३ दिवस चाललेला प्रो कबड्डीचा हा ४ था मोसम आज समाप्त झाला. त्याचबरोबर आज कबड्डी पारायणाची सांगता देखील झाली आहे असे जाहिर करतो.

महिनाभर विविध खेळाडूंनी मनास आनंद दिला तर रसिकांनी खेळाडूंना मनात स्थान दिले. कबड्डीचा प्रसार वेगाने होण्यासाठी प्रो कबड्डीचे व्यासपीठ निश्चितच उपयुक्त ठरत आहे याबद्दल देखील आनंद वाटतो.

मिपाचे चालक मालक श्री . निलकांत आणि इतर व्यवस्थापक मंडळींनी मिपासारखे लोकप्रिय संकेतस्थळ माझ्यासारख्या सामान्य माणसा साठी उपलब्ध करुन दिले. ज्यामुळे मी सतत ३३ दिवस येथे लिखाण करु शकलो त्याबद्द्ल मी त्यांचा ऋणी आहे.
मिपावरील सर्व वाचक, प्रतिसादक यांनी जे प्रेम, प्रतिसाद दिला त्याचे आभार माणने शब्दात शक्य नाही.

खरेतर आनंद मोजण्याचे एककच उपलब्ध नाही आणि तो मोजणे देखील योग्य नाही. तो केवळ अनुभवावा या मताचा मी आहे.

यावेळी काही वार्तांकनात काही तांत्रिक / तपशीलातील चुका झाल्या असण्याची शक्यता आहे त्या पुढील वेळेस सुधारण्याच्या प्रयत्न करीन.

पुन्हा एकदा विजेत्यांचे अभिनंदन ! सर्वांचे आभार !

परत परत भेटत राहूया ! शुभरात्री !!

रघुनाथ.केरकर's picture

1 Aug 2016 - 11:41 am | रघुनाथ.केरकर

३३ दीवस सतत लिहिल्याबद्दल आपले धन्यवाद, ऑक्टोबर ला भेटु...................विश्वचषकाला.

नया है वह's picture

1 Aug 2016 - 11:58 am | नया है वह

धन्यवाद! भेटु...................विश्वचषकाला

कब्बडी हा खेळ ऑलिम्पिक मध्ये आला तर आपलं एक पदक नक्की होईल. पण ऑलिम्पिक मध्ये हा खेळ येण्याचे श्यक्यता आहे का? आणि काय निकष असतात एखादा खेळ ऑलिम्पिक मध्ये सामील करण्यासाठी. एंटरटेनमेंट दर्जा आणि खेळातली चुरस ह्या बाबतीत तरी हा खेळ सरस आहे, भारतात कब्बडीची लोकप्रियता पण वाढतआहे.
हल्लीच वाचलेल्या बातमीनुसार गोल्फ आणि कुठलातरी(नाव विसरलो) खेळ ऑलिम्पिक मध्ये सामील करण्यात आले आहेत.

रघुनाथ.केरकर's picture

2 Aug 2016 - 1:20 pm | रघुनाथ.केरकर

कबड्डी तसा बराच लोकप्रिय खेळ आहे, राज्यस्तरीय सोडाच पण साध्या चौरंगी सामन्याला पण पब्लीक तोबा गर्दी करतं फ़ायनल ला तर तुफ़ान गर्दी असते. पावसाचे चार महिने सामने नसतात.
ह्या चार महिन्यात असोसिएशन्सनी इन्डोर सामने भरवले पाहीजेत. जेणेकरुन मुलांचा म्याट वर पण सराव होईल. सध्या सगळीकडे सराव हा मातीवरच होतोय.

अतिशय छान माहिती, पण कबड्डीचं ऑलिम्पिक मध्ये समावेश होण्याच्या शक्यतेचं काय

ऑलिम्पिक मध्ये हा खेळ येण्याचे श्यक्यता आहे का? आणि काय निकष असतात एखादा खेळ ऑलिम्पिक मध्ये सामील करण्यासाठी.

नया है वह's picture

3 Aug 2016 - 2:58 pm | नया है वह

कबड्डीवर एखादा सविस्तर लेख येउ द्या तुम्ही या लेखात बरिच माहिती दिली आहे.
कबड्डी आणि खेळाडुंची आणखी माहिती जाणुन घेण्यास खुप ऊत्सुक आहे.

मस्त धागा, मस्त वार्तांकन.
खूप धन्यवाद धर्मराज. किपीटप.

शलभ's picture

6 Aug 2016 - 1:29 am | शलभ

+१२३४५६