मोकळ्या दाही दिशा

आनन्दा's picture
आनन्दा in जे न देखे रवी...
19 Apr 2016 - 12:14 pm

शरदकाकांच्या धाग्याला प्रतिसाद म्हणून तिथे ही कविता टंकली होती. म्हणले धागा पण काढूया. - प्रेरणा
कवितेचा पहिलाच प्रयत्न आहे.

काही नाहीच राहिले
झाले सगळे भोगून
पार अंधारच सारा
ना कवडसा कुठून

माझ्या श्वासांनीच असा
का रे अबोला धरिला
माझ्या केसांचाच असा
कसा गळफास झाला

नाही ओढणार मला
आता कुणाचेच पाश
एकट्याने चालायची
नाही राहिलीच आस

आता मज ऐकू येते
दूरवर किणकिण
एक पाऊल टाकता
थांबेल ही वणवण

नाही उरला मनात
रस आयुष्यात अश्या
प्रवासाला अनंताच्या
उघडल्या दहा दिशा

मुक्तक

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

19 Apr 2016 - 12:17 pm | विजय पुरोहित

सुंदर लिहिलेय. निराशा, दुर्दैव आणि वैराग्य यांत शब्द न्हाऊन निघालेले आहेत.

आता मज ऐकू येते
दूरवर किणकिण
अंगावर काटाच आला...

विजय पुरोहित's picture

19 Apr 2016 - 12:32 pm | विजय पुरोहित

शीर्षकातील विडंबनात्मक टोन काढून टाकला तर बरे होईल असे वाटते!!!

ह्म्म.. काढायला पाहिजे खरा.
संपादकांना विनंती, तो शक्य असल्यास काढावा.

अवांतर - मोकल्या दाही दिशा चे भूत काही मानेवरून उतरू शकत नाही काही झाले तरी :)

टवाळ कार्टा's picture

19 Apr 2016 - 12:49 pm | टवाळ कार्टा

शीर्षक वाचून आलेलो....अपेक्षाभंग झाला ;)

नाखु's picture

19 Apr 2016 - 12:53 pm | नाखु

पार्था उचल ते धनुष्य आणि लाव बाण (विडंबनाचा) !

ता.क. यमकांचा ताजा साठा उपल्ब्ध आहे.

पैसा's picture

19 Apr 2016 - 12:52 pm | पैसा

पण खरंच अंगावर काटा आला. निराशा, वैराग्य, उदासी ओतप्रोत भरली आहे.