PMP सर्टिफिकेशन

यशोधरा's picture
यशोधरा in तंत्रजगत
15 Apr 2016 - 8:49 pm

खरडफळ्यावर गप्पा मारताना PMP सर्टिफिकेशनबद्दल बोलणे सुरु होते. गप्पांमध्ये खफवरील माहिती वाहून जाण्याची वा खफ साफ झाला तर नष्ट होण्याची शक्यता असल्याने ह्या सर्टीफिकेशनबद्दलचे अनुभव, अभ्यासाच्या पद्धती, प्रश्न इत्यादि सर्वासाठी हा धागा.

इथे ह्या सर्टिफिकेटच्या अनुषंगाने सर्व माहिती/ प्रश्न/ अनुभव/ मते असे सर्व काही येऊ द्या.

---------------------
प्रतिसादांतली महत्त्वाची माहिती इथे एकत्र करत आहे.
उप्दते १७/०४/२०१६

पीएमपीबद्दल माहिती
Project Management Institute (PMI) चे Project Management Professional (PMP) हे आंतरराष्ट्रीय स्तराचे पात्रता प्रमाणपत्र (Qualification Certificate) आहे. याला Project Management मधे Gold Standard समजले जाते.

Project Management Institute (PMI) चा दुवा : http://www.pmi.org/

मोठे प्रकल्प करणार्‍या संस्थात प्रकल्पामधे महत्वाचे पद मिळण्यासाठी हे प्रमाणपत्र उपयोगी आहे. किंबहुना अश्या बर्‍याच आंतरराष्ट्रीय संस्थांत पद मिळवण्यासाठी हे प्रमाणपत्र एक आवश्यक अट असते.

.

हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी व टिकविण्यासाठी महत्वाच्या पायर्‍या अश्या आहेत...

१. प्रमाणपत्र परीक्षेला अर्ज करण्यासाठी आवश्यक अटी

अ) Secondary degree (high school diploma, associate’s degree or the global equivalent)
आ) 7,500 hours leading and directing projects *
इ) 35 hours of project management education **

किंवा

अ) Four-year degree
आ) 4,500 hours leading and directing projects *
इ) 35 hours of project management education **

======

* : हा प्रकल्पांवर अधिकारी असल्याचा प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो व तो PMP च्या विशिष्ट फॉर्मॅटमधे सादर करायचा असतो.

** : हे PMI मान्यताप्राप्त संस्थेचा PMI मान्यताप्राप्त अभ्यासक्रम/कार्यक्रम याद्वारे मिळवावे लागतात.

======

२. परीक्षा :

अ) वरील अर्जाची छाननी होऊन तो मान्य झाला की फी भरून प्रोमेट्रिक सेंटरवर घेतल्या जाणार्‍या ऑनलाईन परीक्षेस बसायला परवानगी मिळते.

आ) या परीक्षेत चार तासांत २०० बहुपर्यायी (मल्टिपल चॉईस) प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. म्हणजे, सर्वसाधारणपणे, प्रत्येक प्रश्नाला एक मिनीट व ४० मिनिटे पुनरावलोकन करण्यासाठी असा हिशेब मांडता येईल.

इ) प्रत्येक प्रश्नाखाली दिलेले सर्वच पर्याय बरोबर असतात, त्यापैकी प्रश्नात विशद केलेल्या परिस्थितीत सर्वात जास्त उपयोगी पर्याय निवडायचा असतो. प्रश्नातल्या एखाद्या शब्दाने, वाक्याने अथवा वाक्यरचनेने योग्य उत्तर कोणते हे ठरते. त्यामुळे प्रकल्पांचा सखोल प्रत्यक्ष अनुभव असलेल्यांना ही परीक्षा तितकीशी कठीण नसू शकते.

ई) उत्तीर्ण होण्यासाठी बहुदा ६१% गुण आवश्यक असतात. आता प्रमाण बदललेले असू शकते. खात्रीच्या माहितीसाठी वर दिलेला संस्थेचा दुवा पहावा.

अपडेट : सद्य पीएमपी हँडबूक मधे यासंबधी खालील माहिती दिली आहे...

मुख्य फरक म्हणजे "६१% म्हणजे पासिंग मार्क्स" हा जुन्या हँडबूकमधील उल्लेख काढून टाकला आहे. यासंदर्भात हँडबूकमधील (http://www.pmi.org/Certification/~/media/PDF/Certifications/pdc_pmphandb...) नवीन महत्वाचा भाग खालीलप्रमाणे आहे. अर्थातच,पीएमपी हँडबूक मूळातून वाचणे अनिवार्य आहे हेवेसांन :)

Examination Report

Upon completion of the computer-based examination, you will receive a printed copy of your test results. In addition to the overall pass/fail status, important diagnostic information on your performance is provided for each domain. This information provides specific guidance for both passing and failing candidates.

Understanding Your Exam Report

Your test results are reported in two ways:
1. A pass/fail result score is generated based on your overall performance on the examination.
2. The second level of results is the assignment of one of three proficiency levels to each chapter.

 Each topic domain is assigned one of three levels of proficiency—Proficient, Moderately
Proficient and Below Proficient—based on the number of questions answered correctly within the domain.

 This provides direction about your strengths and weaknesses. PMI defines the levels of “proficiency” as follows:

Proficient – indicates performance is above the average level of knowledge in this chapter.

Moderately Proficient
– indicates performance that is at the average level of knowledge in this chapter.

Below Proficient – indicates performance is below the average level of knowledge in this chapter.

For candidates who pass the examination, the performance information will help identify specific chapters to focus on for continuing education purposes. For candidates who fail the examination, the performance information will identify specific chapters where improvement or further study may be required in order to successfully complete the examination in the future.

३. PMP पात्रता कायम चालू ठेवण्यासाठी आवश्यक गोष्ट

दर तीन वर्षांमधे वेगवेगळ्या अभ्यासक्रमांत / कार्यक्रमांत भाग घेऊन 60 professional development units (PDUs) मिळवावे लागतात. ही युनिट्स वेगवेगळ्या प्रकारची असतात आणि योग्य प्रकारची युनिट्स योग्य संख्येत मिळवणे आवश्यक असते. मात्र, भारतात अनेक ठिकाणी PMI चे चॅप्टर्स असल्याने हे वाटते तेवढे क्लिष्ट नसावे. या चॅप्टर्सची यादी PMI संस्थळावर मिळेल.

=============

महत्वाचे दुवे :

PMI : http://www.pmi.org/

PMP : http://www.pmi.org/certification/project-management-professional-pmp.aspx

माहितीपुस्तक : http://www.pmi.org/~/media/PDF/Certifications/handbooks/project-manageme...

परीक्षेसंबंधी माहिती : http://www.pmi.org/~/media/PDF/Certifications/pmp-certification-exam-out...

=============

महत्वाच्या सूचना :

१. PMP हे खूप प्रसिद्ध प्रमाणपत्र असले तरी PMI हे एकच पात्रता प्रमाणपत्र देते असे नाही. PMI ची इतर पात्रता प्रमाणपत्रे अशी आहेत. PMI च्या दुव्यावर संशोधन करून आपल्या उद्येशाला योग्य ते प्रमाणपत्र निवडावे.

  • Certified Associate in Project Management (CAPM)® certification
  • PMI Agile Certified Practitioner (PMI-ACP)® certification
  • PMI Risk Management Professional (PMI-RMP)® credential
  • PMI Scheduling Professional (PMI-SP)® credential
  • Portfolio Management Professional (PfMP) ® credential
  • Program Management Professional (PgMP)® credential
  • Project Management Professional (PMP)® credential
  • PMI Professional in Business Analysis (PMI-PBA)® credential

२. बदलत्या परिस्थितीत स्वतःला अग्रगण्य ठेवण्यासाठी PMI तिचे नियम व कार्यशैलीत सतत बदल करत असते. तेव्हा अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी http://www.pmi.org/ हा दुवाच सर्वात विश्वासू दुवा आहे.

३. परिक्षेसाठी इतर अनेक पुस्तके व अभ्यासक्रम असले (या प्रमाणत्राची तयारी करण्याला मदत करणार्‍या पुस्तके, सीडी, डीव्हीडी, ऑडिओ, इ ची एक पूर्ण इंडस्ट्री तयार झाली आहे) तरी परिक्षेतील उत्तरे मुख्यतः Project Management Body of Knowledge (PMBOK) या अधिकृत प्रकाशनात दिलेल्या तत्वांवर अवलंबून असावी असा संकेत आहे. तेव्हा हे पुस्तक मुळापासून नीट वाचावे व समजून घ्यावे.

४. PMI ची व तिच्या एखाद्या चॅप्टरचे सभासद होण्यासाठी PMI ची कोणतीही परिक्षा पास असणे आवश्यक नसते. परिक्षा देण्याचा मनसुबा असलेल्यांनी असे सभासदत्व घेणे बर्‍याच दृष्टींनी फायद्याचे ठरते.
अ) Project Management Body of Knowledge (PMBOK) सभासदांसाठी मोफत मिळते.
आ) professional development units (PDUs) मिळविण्यासाठीच्या अभ्यासक्रमांत / कार्यक्रमांच्या फी मधे सवलत मिळू शकते.
इ) PMP परिक्षा फी मधे सवलत मिळू शकते.

पीएमाआयची हेल्पलाईन
http://www.pmi.org/About-Us/Customer-Care.aspx

पीएमपीचे फायदे

डॉ सुहास म्हात्रे लिहितातः

एकंदरीत सभासदत्वाची फी तिच्या पैशाने होणार्‍या किमतीपेक्षा जास्त आर्थिक फायदा देते... आणि आर्थिक नसलेले पण अत्यंत उपयोगी इतर फायदेही होतात... असा माझा अनुभव आहे.

स्वच्छंदी_मनोज लिहितातः

एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की पीएमपी हे एक प्रोजे़ट मॅनॅजमेंट टेक्नीक आहे आणि पीएमपी काय किंवा दुसरी कुठलेही काय ही प्रोफेशनल सर्टीफीकेट्स ही तुमच्या ज्ञानाला जगमान्यता देतात. तुम्ही जेव्हा म्हणता की तुम्हाला प्रोजेक्ट मॅनॅजमेंट येते तेव्हा समोरचा क्लायंट किंवा कंपनी तुमचे विधान तपासून बघण्यासाठी अश्या ग्लोबल सर्टीफीकेशनचा आधार घेते तर जर तुम्ही ग्लोबल टच असलेल्या फिल्डमधे पीएम करत असाल तर अशी सर्टीफिकेशन मस्टच.

पण पीएमपी काही एकच सर्टीफीकेशन नाही जे तुमचे पीएम ज्ञान वॅलीडेट करते. अजुनही काही आहेत जसे प्रिंस२. पीएमपीह हे उत्तर अमेरीका खंडात जास्त प्रचलीत आहे तर प्रिंस२ युरोप मध्ये. याचे कारण पीएमपी क्रेडेंशियल उ.अ. ची ऑर्गनायझेशन देते तर प्रिंस२ युकेतली ओजीसी देते त्यामुळे त्या त्या भागात ती ती पीएम टेक्नीक जास्त प्रचलीत आहेत आणि प्रत्येकाचे क्रेडँशीयल वॅलीडेशन क्रायटेरीया वेगवेगळे आहेत.

पीएमपी तुमचे पीएम फिल्ड मधले (मग ते कुठलेही असो आयटी किंवा कुठलेही) तुमचे ज्ञान चाचपते आणी तुम्हाला एलीजीबल ठरवते. या ज्ञान चाचपण्याच्या दोन स्टेज आहेत. एक पीडीयु आणी दुसरे अ‍ॅक्ट्च्युअल पीएम मधले पुर्वीचे ज्ञान (३५०० तास जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर नाहीतर ७५०० तास) एकदा हे दोन स्टेज वॅलीडेट झाले की तुम्हाला परीक्षा द्यायची असते आणी पीएमपी पास झाल्यावर ते स्टेटस मेंटेन ठेवायचे असते.

प्रत्यक्ष अनुभवाच्या पात्रता निकषाविषयी चर्चा, अनुभव आणि मतं
4,500 hours leading and directing projects

हा क्रायटेरीया आहे कडक खराच पण त्याचा उद्देश तुमचे पीएम ज्ञान माहीती करून घ्यायचा आहे. कारण पीएमआय ऑर्गनायझेशन ला फक्त क्रेडेंशीयल देण्यापेक्षा त्याचा तुम्ही तुमच्या जॉब मध्ये कसा वापर करता यात जास्त रस आहे आणी त्यासाठी ही परीक्षा फक्त बुकीश न ठेवण्याचा कटाक्ष आहे. त्यामुळेच हा अनुभवाचा क्रायटेरीया आहे. हा फक्त ३५०० बेरजेचा अनुभव तर नकोय पीएमपीच्या पाचही प्रोसेस ग्रुप मध्ये प्रत्येकात तरी थोडातरी हवाय.

उपयुक्त पुस्तके
१. पीएमबॉक गाईड - पाचवी आवृत्ती
A Guide to the Project Management Body of Knowledge ( PMBOK® Guide )-Fifth Edition
xx

२. रिता मुलकाई
x

स्वच्छंदी_मनोज लिहितातः

या पुस्तकांव्यतिरिक्त अजून कुठलेही पुस्तक लागत नाही. रादर पीएम्बॉक शिवाय कुठलेच लागत नाही.

अभ्यास कसा करावा

आनंदयात्री सांगतातः

लोकांचे ऐकून आधी वाटले की रिटा मुल्काहीचे (Rita Mulcahy) पुस्तक वाचून होईल अभ्यास! एक आवर्तन झाल्यावर जरा शक्ती परिक्षण करावे म्हणुन एक फुल लेंथ टेस्ट देऊन पहिली, परिक्षा देतांना अंदाज आलाकी पीएमबॉकला पर्याय नाही. मग पीएमबॉक घेऊन अभ्यास सुरु केला, यावेळेस शॉर्ट नोट्स काढायला सुरुवात केली. ते करतांना जो टॉपिक समजायला जड वाटायचा त्याबद्दल रिटा मध्ये पुन्हा वाचायचो, त्यातले पॉईंटसही माझ्या नोट्स मध्ये घ्यायचो. हे झाल्यावर मात्र कॉन्फ़िडन्स वाढला.

माझ्या मते माझा प्लान जर असा असता तर कदाचित मी थोडा वेळ नक्कीच वाचवला असता-

१. तुमचा एम्प्लॉयर जर क्लासरूम ट्रेनिंग देणार असेल तर त्याला एन्रोल करणे.
२. दर ट्रेनिंग नंतर रिटा मधला तो लेसन पुर्ण वाचने
३. पीएमबॉक + रिटा असा मिळुन डिटेल अभ्यास करणे (साधारण २ महिने)
४. भरपूर फुल लेंथ टेस्ट देणे आणि दर टेस्ट मध्ये चुकलेल्या उत्तरांच्या टॉपिक वर अभ्यास करणे. नोटसची रिविजन करणे. (साधारण १ महिना)

श्रीगुरुजी म्हणतातः

काही टिप्स -

(१) PMBOK एकदा शांतपणे संपूर्ण वाचावे. वाचताना महत्त्वाचे परिच्छेद पिवळ्या मार्करने अधोरेखित करावे म्हणजे पुन्हा वाचताना फक्त तोच भाग वाचता येतो.

(२) परीक्षा देण्यापूर्वी PMBOK ची कमीतकमी ३ पारायणे झाली असावीत.

(३) पर्टशी संबंधित गणिते सोडविण्याचा जास्त सराव करावा.

(४) Ethical संबंधी प्रश्नांसाठी कायम पोलिटिकली करेक्ट उत्तर देणे आवश्यक आहे.

उदा.

प्रश्न - तुमचा जवळचा मित्र पीएमपी प्रमाणपत्राची मुदत संपल्यावर सुद्धा वापर करीत असेल तर खालीलपैकी काय कराल?

पर्याय १ - मित्र काय ते बघून घेईल. तुम्ही दुर्लक्ष करा.
पर्याय २ - असे करणे चुकीचे आहे हे मित्राला समजावून सांगाल.
पर्याय ३ - तुमच्या कंपनीकडे तक्रार कराल.
पर्याय ४ - पीएमपी मुख्यालयात मित्राविरूद्ध तक्रार कराल.

व्यावहारिक दृष्ट्या पर्याय १ किंवा २ वापरला जाईल. परंतु या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय ४ आहे कारण तेच पोलिटिकली करेक्ट आहे.

(५) जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर अजिबात माहिती नसेल तर प्रश्न सोडून न देता पर्याय ३ निवडावा.

(६) परीक्षा देताना ज्या उत्तरांची खात्री नाही, ते प्रश्न मार्क करून नंतर सावकाशीने पुन्हा एकदा तपासून बदलता येतात. साधारणपणे ४ तासांपैकी तीन ते सव्वातीन तासात सर्व पेपर संपवून नंतरची २५-३० मिनिटे या मार्क केलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा एकदा तपासण्यासाठी वापरावीत व गरज पडल्यास उत्तर बदलावे. काही वेळा एखाद्या प्रश्नाचे उत्तर सुचले नाही तरी पुढील एखाद्या प्रश्नात आधीच्या प्रश्नाचे उत्तर किंवा त्याची एखादी टीप दडलेली असते. त्यामुळे संयम बाळगावा.

(७) प्रश्न पूर्ण वाचल्याशिवाय व समजल्याशिवाय पर्याय वाचू नयेत. अन्यथा गोंधळ होण्याची शक्यता असते. प्रश्न अर्धा वाचून कधीही उत्तर ठरवू नये.

(८) सलग ४ तास बसण्याचा सराव असणे आवश्यक आहे.

(९) मला ज्या कंपनीने प्रशिक्षण दिले त्यांनी PMBOK बरोबरच एक वेगळा २०० सराव प्रश्नांचा संच दिला होता. PMBOK मध्येही एक २०० प्रश्नांचा पेपर आहे. या ४०० प्रश्नांचा खूप उपयोग झाला. हे प्रश्न व त्यांची उत्तरे मी किमान ३ वेळा वाचली होती.

चतुरंग लिहितातः

१ - प्रत्यक्ष प्रोजेक्ट मॅनेजमेंट्चा अनुभव असण्याला पर्याय नाही.
२ - काहीतरी करुन इकडून तिकडून कामाचे तास भरवून पीएमआय कडे जाणे फायद्याचे नाही कारण प्रत्यक्ष प्रोजेक्टवरती काम करताना तुम्ही उघडे पडता.
३ - प्रोजेक्ट मॅनेजमेंट बॉडी ऑफ नॉलेज - या पुस्तकाला पर्याय नाही. किमान तीनदा हे पुस्तक व्यवस्थित वाचा. पहिले वाचन हे सावकाश आणि व्यवस्थित वेळ देऊन करा. त्यातली थिअरी प्रत्यक्षात कुठेकुठे आणि कशी वापरली जाते याचे तुमच्या दैनंदिन कामात निरीक्षण करता आले तर फारच उत्तम.
दुसरे वाचन करताना तुमचे आणि इतर प्रोजेक्ट मॅनेजर्सचे अनुभव त्या त्या ठिकाणी टिपणाने नोंदवून ठेवा. डीले झालेले प्रोजे़क्ट कशामुळे डीले झाले? व्यवस्थित पूर्ण झालेले कशामुळे झाले? याचा काही अभ्यास करता आला तर उत्तम. तुमच्या कंपनीतले प्रोजेक्ट मॅनेजर्स बोलायला तयार असतील तर त्यांच्याशी बोलून पुष्कळ माहिती मिळते.
तिसर्‍या वाचनानंतर त्यातली २०० प्रश्नांची प्रश्नपत्रिका सोडवा.
४ - प्रत्यक्ष परीक्षेत संगणकावरती ४ तासात २०० प्रश्न सोडवायचे असतात. त्याचा सराव घरी तशाच पद्धतीने करा. किमान तीन चाचणी परीक्षा ऑनलाईन द्याव्यात असे माझे मत.
५ - दर एका तासाने २ मिनिटे पाय मोकळे करुन, थोडे खाऊन आणि पाणी पिऊन या. याचा फार फायदा होतो. वेळ वाया जातो असे वाटते परंतु त्यामानाने फायदा जास्त असतो. शरीराची शुगर लेवल आणि पाण्याची लेवल कमी झाली की विचारशक्तीवरती झपाट्याने परिणाम होतो.
६ - प्रत्यक्ष परीक्षेच्या ठिकाणी तुमचा फोन किंवा इतर साधने एका लॉकरमध्ये ठेवून द्यावी लागतात आणि त्या लॉकरला परीक्षा संपल्याशिवाय हात लावता येत नाही अन्यथा तुम्हाला बाद केले जाते. त्यामुळे तुमच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी अनवधानाने लॉकरमध्ये जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागते! :)
७ - परीक्षेसाठी संगणकासमोर जाऊन बसलात की आधी काही सूचना वाचाव्या लागतात आणि मग परीक्षेचा वेळ सुरु होतो. गेल्या गेल्या आधी दिलेल्या स्क्रॅपपेपर्सवरती 'मेमरी डंप' कराच - म्हणजे महत्त्वाचे फॉर्म्युले, इक्वेशन्स, काही टेबल्स, तुम्ही तयार केलेली काही अ‍ॅक्रोनिम्स अशी सगळी माहिती पाचेक मिनिटात उतरवून काढा म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी आठवाआठवीत वेळ जात नाही आणि प्रेशरमुळे विसरण्याची शक्यता कमी होते.
याचाही सराव घरी करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- मी पीएमपी का केले
चतुरंग लिहितातः

पीएमपी मुद्दाम केले. कारण बर्‍याचदा प्रोजेक्ट करताना असे लक्षात येई की स्टेकहोल्डर्स कोणकोण आहेत? प्रोजेक्टसाठी इनपुट्स कोणती घ्यायला हवीत? मार्केटिंग आणी सेल्सचे लोक काय वाटेल त्या कमिट्मेंट्स देताहेत का? प्रोजेक्टमॅनेजर डेडलाईन्स कशाच्या आधारावर ठरवताहेत? हायर मॅनेजमेंटसमोर नेमके काय चित्र उभे आहे किंवा केले जाते आहे? याचा अंदाज लागत नसे मग लोड प्रत्यक्ष डिझाईन टिमवरती येई. वाटेल त्या कमी रिसोर्सेस मधे आणि कमी वेळात काम दामटवायची शक्यता वाढे आणि चुकांची शक्यताही त्याच प्रमाणात वाढे!
मग हे समजावून घेण्यासाठी पीएमपी केले आणि त्याचा भरपूर फायदा झाला. वरती उल्लेखलेले प्रश्न आणी त्याची कारणे कळायला लागली. मुख्य म्हणजे त्याच्याशी संबंधित लोकांशी मी या सर्टिफिकेशनच्या आधाराने प्रश्न विचारुन त्यांची बाजू समजावून घेऊ लागलो आणि त्यावर चर्चा होऊन डिझाईन टिमवरती लोड कसे येणार नाही किंवा कमी येईल हे ठरवणे शक्य होऊ लागले.

मिपावरचे पीएमपी, भावी पीएमपी आणि इतर इच्छुक रयत
पीएमपी फ्रॅटरनिटी तयार करून पीएमपी करण्याची इच्छा असणार्‍यांना मदत करावी आणि सर्वसाधारणपणे (इन जनरल) उत्तम प्रोजेक्ट मॅनेजमेंट तत्वांचा प्रचार करावा हे पीएमाआयच्या चार्टरचा एक भाग व पीएमआय मेंबर्सची तात्वीक जबाबदारी आहे.

पीएमपी
"मी पीएमपी आहे!"
श्रीगुरुजी, डॉ सुहास म्हात्रे, आनंदयात्री, चतुरंग, नपा

भावी पीएमपी
"मी येत्या १२ महिन्यांत पीएमपी परीक्षा देणार आहे!"
स्वच्छंदी_मनोज, खटपट्या

इच्छुक रयत
"कधीतरी पीएमपी करायचंय!"
यशोधरा, आदूबाळ, कॅप्टन जॅक स्पॅरो, मधुरा देशपांडे, स्नेधा, शिवाजी नाठे, आरोह

प्रतिक्रिया

सुनील's picture

22 Jun 2020 - 8:29 am | सुनील

सध्या भारतीय IT कंपन्यांना व्यवसाय देण्यार्‍या जवळपास सगळ्याच बड्या कंपन्या पारंपरीक (Waterfall) पद्धतीकडून Agile पद्धतीकडे जात असल्याने PMPचा आग्रह सोडून PMI-ACP करणे अधिक श्रेयस्कर ठरेल!

सुनील (PMI-ACP)

निनाद's picture

22 Jun 2020 - 9:50 am | निनाद

Agile ची लाट एका काळात खुप जोरात होती. आता मात्र जरा खाली आल्यासारखी दिसते आहे. तरीही PMI-ACP अधिक श्रेयस्कर यात संशय नाही.

संदिप एस's picture

22 Jun 2020 - 1:01 pm | संदिप एस

मस्त धागा- मी जून २०१९ ला पी एम पी केलं आणी आता ए सी पी किंवा स्क्रम चा विचार करतोय- काही सजेशन्स?

सुनील's picture

22 Jun 2020 - 5:49 pm | सुनील

Scrum हा संपूर्ण Agile Methodology चा एक भाग आहे. जर तुम्ही या विषयात नवीन असाल तर, सुरुवात Scrum Master सर्टिफिकेशनने करा आणि नंतर PMI-ACP कडे वळा.

Scaled Agile (SAFe) चादेखिल विचार करता येईल.