खरडफळ्यावर गप्पा मारताना PMP सर्टिफिकेशनबद्दल बोलणे सुरु होते. गप्पांमध्ये खफवरील माहिती वाहून जाण्याची वा खफ साफ झाला तर नष्ट होण्याची शक्यता असल्याने ह्या सर्टीफिकेशनबद्दलचे अनुभव, अभ्यासाच्या पद्धती, प्रश्न इत्यादि सर्वासाठी हा धागा.
इथे ह्या सर्टिफिकेटच्या अनुषंगाने सर्व माहिती/ प्रश्न/ अनुभव/ मते असे सर्व काही येऊ द्या.
---------------------
प्रतिसादांतली महत्त्वाची माहिती इथे एकत्र करत आहे.
उप्दते १७/०४/२०१६
पीएमपीबद्दल माहिती
Project Management Institute (PMI) चे Project Management Professional (PMP) हे आंतरराष्ट्रीय स्तराचे पात्रता प्रमाणपत्र (Qualification Certificate) आहे. याला Project Management मधे Gold Standard समजले जाते.
Project Management Institute (PMI) चा दुवा : http://www.pmi.org/
मोठे प्रकल्प करणार्या संस्थात प्रकल्पामधे महत्वाचे पद मिळण्यासाठी हे प्रमाणपत्र उपयोगी आहे. किंबहुना अश्या बर्याच आंतरराष्ट्रीय संस्थांत पद मिळवण्यासाठी हे प्रमाणपत्र एक आवश्यक अट असते.
.
हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी व टिकविण्यासाठी महत्वाच्या पायर्या अश्या आहेत...
१. प्रमाणपत्र परीक्षेला अर्ज करण्यासाठी आवश्यक अटी
अ) Secondary degree (high school diploma, associate’s degree or the global equivalent)
आ) 7,500 hours leading and directing projects *
इ) 35 hours of project management education **
किंवा
अ) Four-year degree
आ) 4,500 hours leading and directing projects *
इ) 35 hours of project management education **
======
* : हा प्रकल्पांवर अधिकारी असल्याचा प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो व तो PMP च्या विशिष्ट फॉर्मॅटमधे सादर करायचा असतो.
** : हे PMI मान्यताप्राप्त संस्थेचा PMI मान्यताप्राप्त अभ्यासक्रम/कार्यक्रम याद्वारे मिळवावे लागतात.
======
२. परीक्षा :
अ) वरील अर्जाची छाननी होऊन तो मान्य झाला की फी भरून प्रोमेट्रिक सेंटरवर घेतल्या जाणार्या ऑनलाईन परीक्षेस बसायला परवानगी मिळते.
आ) या परीक्षेत चार तासांत २०० बहुपर्यायी (मल्टिपल चॉईस) प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. म्हणजे, सर्वसाधारणपणे, प्रत्येक प्रश्नाला एक मिनीट व ४० मिनिटे पुनरावलोकन करण्यासाठी असा हिशेब मांडता येईल.
इ) प्रत्येक प्रश्नाखाली दिलेले सर्वच पर्याय बरोबर असतात, त्यापैकी प्रश्नात विशद केलेल्या परिस्थितीत सर्वात जास्त उपयोगी पर्याय निवडायचा असतो. प्रश्नातल्या एखाद्या शब्दाने, वाक्याने अथवा वाक्यरचनेने योग्य उत्तर कोणते हे ठरते. त्यामुळे प्रकल्पांचा सखोल प्रत्यक्ष अनुभव असलेल्यांना ही परीक्षा तितकीशी कठीण नसू शकते.
ई) उत्तीर्ण होण्यासाठी बहुदा ६१% गुण आवश्यक असतात. आता प्रमाण बदललेले असू शकते. खात्रीच्या माहितीसाठी वर दिलेला संस्थेचा दुवा पहावा.
अपडेट : सद्य पीएमपी हँडबूक मधे यासंबधी खालील माहिती दिली आहे...
मुख्य फरक म्हणजे "६१% म्हणजे पासिंग मार्क्स" हा जुन्या हँडबूकमधील उल्लेख काढून टाकला आहे. यासंदर्भात हँडबूकमधील (http://www.pmi.org/Certification/~/media/PDF/Certifications/pdc_pmphandb...) नवीन महत्वाचा भाग खालीलप्रमाणे आहे. अर्थातच,पीएमपी हँडबूक मूळातून वाचणे अनिवार्य आहे हेवेसांन :)
Examination Report
Upon completion of the computer-based examination, you will receive a printed copy of your test results. In addition to the overall pass/fail status, important diagnostic information on your performance is provided for each domain. This information provides specific guidance for both passing and failing candidates.
Understanding Your Exam Report
Your test results are reported in two ways:
1. A pass/fail result score is generated based on your overall performance on the examination.
2. The second level of results is the assignment of one of three proficiency levels to each chapter.
Each topic domain is assigned one of three levels of proficiency—Proficient, Moderately
Proficient and Below Proficient—based on the number of questions answered correctly within the domain.
This provides direction about your strengths and weaknesses. PMI defines the levels of “proficiency” as follows:
Proficient – indicates performance is above the average level of knowledge in this chapter.
Moderately Proficient – indicates performance that is at the average level of knowledge in this chapter.
Below Proficient – indicates performance is below the average level of knowledge in this chapter.
For candidates who pass the examination, the performance information will help identify specific chapters to focus on for continuing education purposes. For candidates who fail the examination, the performance information will identify specific chapters where improvement or further study may be required in order to successfully complete the examination in the future.
३. PMP पात्रता कायम चालू ठेवण्यासाठी आवश्यक गोष्ट
दर तीन वर्षांमधे वेगवेगळ्या अभ्यासक्रमांत / कार्यक्रमांत भाग घेऊन 60 professional development units (PDUs) मिळवावे लागतात. ही युनिट्स वेगवेगळ्या प्रकारची असतात आणि योग्य प्रकारची युनिट्स योग्य संख्येत मिळवणे आवश्यक असते. मात्र, भारतात अनेक ठिकाणी PMI चे चॅप्टर्स असल्याने हे वाटते तेवढे क्लिष्ट नसावे. या चॅप्टर्सची यादी PMI संस्थळावर मिळेल.
=============
महत्वाचे दुवे :
PMI : http://www.pmi.org/
PMP : http://www.pmi.org/certification/project-management-professional-pmp.aspx
माहितीपुस्तक : http://www.pmi.org/~/media/PDF/Certifications/handbooks/project-manageme...
परीक्षेसंबंधी माहिती : http://www.pmi.org/~/media/PDF/Certifications/pmp-certification-exam-out...
=============
महत्वाच्या सूचना :
१. PMP हे खूप प्रसिद्ध प्रमाणपत्र असले तरी PMI हे एकच पात्रता प्रमाणपत्र देते असे नाही. PMI ची इतर पात्रता प्रमाणपत्रे अशी आहेत. PMI च्या दुव्यावर संशोधन करून आपल्या उद्येशाला योग्य ते प्रमाणपत्र निवडावे.
- Certified Associate in Project Management (CAPM)® certification
- PMI Agile Certified Practitioner (PMI-ACP)® certification
- PMI Risk Management Professional (PMI-RMP)® credential
- PMI Scheduling Professional (PMI-SP)® credential
- Portfolio Management Professional (PfMP) ® credential
- Program Management Professional (PgMP)® credential
- Project Management Professional (PMP)® credential
- PMI Professional in Business Analysis (PMI-PBA)® credential
२. बदलत्या परिस्थितीत स्वतःला अग्रगण्य ठेवण्यासाठी PMI तिचे नियम व कार्यशैलीत सतत बदल करत असते. तेव्हा अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी http://www.pmi.org/ हा दुवाच सर्वात विश्वासू दुवा आहे.
३. परिक्षेसाठी इतर अनेक पुस्तके व अभ्यासक्रम असले (या प्रमाणत्राची तयारी करण्याला मदत करणार्या पुस्तके, सीडी, डीव्हीडी, ऑडिओ, इ ची एक पूर्ण इंडस्ट्री तयार झाली आहे) तरी परिक्षेतील उत्तरे मुख्यतः Project Management Body of Knowledge (PMBOK) या अधिकृत प्रकाशनात दिलेल्या तत्वांवर अवलंबून असावी असा संकेत आहे. तेव्हा हे पुस्तक मुळापासून नीट वाचावे व समजून घ्यावे.
४. PMI ची व तिच्या एखाद्या चॅप्टरचे सभासद होण्यासाठी PMI ची कोणतीही परिक्षा पास असणे आवश्यक नसते. परिक्षा देण्याचा मनसुबा असलेल्यांनी असे सभासदत्व घेणे बर्याच दृष्टींनी फायद्याचे ठरते.
अ) Project Management Body of Knowledge (PMBOK) सभासदांसाठी मोफत मिळते.
आ) professional development units (PDUs) मिळविण्यासाठीच्या अभ्यासक्रमांत / कार्यक्रमांच्या फी मधे सवलत मिळू शकते.
इ) PMP परिक्षा फी मधे सवलत मिळू शकते.
पीएमाआयची हेल्पलाईन
http://www.pmi.org/About-Us/Customer-Care.aspx
पीएमपीचे फायदे
डॉ सुहास म्हात्रे लिहितातः
एकंदरीत सभासदत्वाची फी तिच्या पैशाने होणार्या किमतीपेक्षा जास्त आर्थिक फायदा देते... आणि आर्थिक नसलेले पण अत्यंत उपयोगी इतर फायदेही होतात... असा माझा अनुभव आहे.
स्वच्छंदी_मनोज लिहितातः
एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की पीएमपी हे एक प्रोजे़ट मॅनॅजमेंट टेक्नीक आहे आणि पीएमपी काय किंवा दुसरी कुठलेही काय ही प्रोफेशनल सर्टीफीकेट्स ही तुमच्या ज्ञानाला जगमान्यता देतात. तुम्ही जेव्हा म्हणता की तुम्हाला प्रोजेक्ट मॅनॅजमेंट येते तेव्हा समोरचा क्लायंट किंवा कंपनी तुमचे विधान तपासून बघण्यासाठी अश्या ग्लोबल सर्टीफीकेशनचा आधार घेते तर जर तुम्ही ग्लोबल टच असलेल्या फिल्डमधे पीएम करत असाल तर अशी सर्टीफिकेशन मस्टच.
पण पीएमपी काही एकच सर्टीफीकेशन नाही जे तुमचे पीएम ज्ञान वॅलीडेट करते. अजुनही काही आहेत जसे प्रिंस२. पीएमपीह हे उत्तर अमेरीका खंडात जास्त प्रचलीत आहे तर प्रिंस२ युरोप मध्ये. याचे कारण पीएमपी क्रेडेंशियल उ.अ. ची ऑर्गनायझेशन देते तर प्रिंस२ युकेतली ओजीसी देते त्यामुळे त्या त्या भागात ती ती पीएम टेक्नीक जास्त प्रचलीत आहेत आणि प्रत्येकाचे क्रेडँशीयल वॅलीडेशन क्रायटेरीया वेगवेगळे आहेत.
पीएमपी तुमचे पीएम फिल्ड मधले (मग ते कुठलेही असो आयटी किंवा कुठलेही) तुमचे ज्ञान चाचपते आणी तुम्हाला एलीजीबल ठरवते. या ज्ञान चाचपण्याच्या दोन स्टेज आहेत. एक पीडीयु आणी दुसरे अॅक्ट्च्युअल पीएम मधले पुर्वीचे ज्ञान (३५०० तास जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर नाहीतर ७५०० तास) एकदा हे दोन स्टेज वॅलीडेट झाले की तुम्हाला परीक्षा द्यायची असते आणी पीएमपी पास झाल्यावर ते स्टेटस मेंटेन ठेवायचे असते.
प्रत्यक्ष अनुभवाच्या पात्रता निकषाविषयी चर्चा, अनुभव आणि मतं
4,500 hours leading and directing projects
हा क्रायटेरीया आहे कडक खराच पण त्याचा उद्देश तुमचे पीएम ज्ञान माहीती करून घ्यायचा आहे. कारण पीएमआय ऑर्गनायझेशन ला फक्त क्रेडेंशीयल देण्यापेक्षा त्याचा तुम्ही तुमच्या जॉब मध्ये कसा वापर करता यात जास्त रस आहे आणी त्यासाठी ही परीक्षा फक्त बुकीश न ठेवण्याचा कटाक्ष आहे. त्यामुळेच हा अनुभवाचा क्रायटेरीया आहे. हा फक्त ३५०० बेरजेचा अनुभव तर नकोय पीएमपीच्या पाचही प्रोसेस ग्रुप मध्ये प्रत्येकात तरी थोडातरी हवाय.
उपयुक्त पुस्तके
१. पीएमबॉक गाईड - पाचवी आवृत्ती
A Guide to the Project Management Body of Knowledge ( PMBOK® Guide )-Fifth Edition
२. रिता मुलकाई
स्वच्छंदी_मनोज लिहितातः
या पुस्तकांव्यतिरिक्त अजून कुठलेही पुस्तक लागत नाही. रादर पीएम्बॉक शिवाय कुठलेच लागत नाही.
अभ्यास कसा करावा
आनंदयात्री सांगतातः
लोकांचे ऐकून आधी वाटले की रिटा मुल्काहीचे (Rita Mulcahy) पुस्तक वाचून होईल अभ्यास! एक आवर्तन झाल्यावर जरा शक्ती परिक्षण करावे म्हणुन एक फुल लेंथ टेस्ट देऊन पहिली, परिक्षा देतांना अंदाज आलाकी पीएमबॉकला पर्याय नाही. मग पीएमबॉक घेऊन अभ्यास सुरु केला, यावेळेस शॉर्ट नोट्स काढायला सुरुवात केली. ते करतांना जो टॉपिक समजायला जड वाटायचा त्याबद्दल रिटा मध्ये पुन्हा वाचायचो, त्यातले पॉईंटसही माझ्या नोट्स मध्ये घ्यायचो. हे झाल्यावर मात्र कॉन्फ़िडन्स वाढला.
माझ्या मते माझा प्लान जर असा असता तर कदाचित मी थोडा वेळ नक्कीच वाचवला असता-
१. तुमचा एम्प्लॉयर जर क्लासरूम ट्रेनिंग देणार असेल तर त्याला एन्रोल करणे.
२. दर ट्रेनिंग नंतर रिटा मधला तो लेसन पुर्ण वाचने
३. पीएमबॉक + रिटा असा मिळुन डिटेल अभ्यास करणे (साधारण २ महिने)
४. भरपूर फुल लेंथ टेस्ट देणे आणि दर टेस्ट मध्ये चुकलेल्या उत्तरांच्या टॉपिक वर अभ्यास करणे. नोटसची रिविजन करणे. (साधारण १ महिना)
श्रीगुरुजी म्हणतातः
काही टिप्स -
(१) PMBOK एकदा शांतपणे संपूर्ण वाचावे. वाचताना महत्त्वाचे परिच्छेद पिवळ्या मार्करने अधोरेखित करावे म्हणजे पुन्हा वाचताना फक्त तोच भाग वाचता येतो.
(२) परीक्षा देण्यापूर्वी PMBOK ची कमीतकमी ३ पारायणे झाली असावीत.
(३) पर्टशी संबंधित गणिते सोडविण्याचा जास्त सराव करावा.
(४) Ethical संबंधी प्रश्नांसाठी कायम पोलिटिकली करेक्ट उत्तर देणे आवश्यक आहे.
उदा.
प्रश्न - तुमचा जवळचा मित्र पीएमपी प्रमाणपत्राची मुदत संपल्यावर सुद्धा वापर करीत असेल तर खालीलपैकी काय कराल?
पर्याय १ - मित्र काय ते बघून घेईल. तुम्ही दुर्लक्ष करा.
पर्याय २ - असे करणे चुकीचे आहे हे मित्राला समजावून सांगाल.
पर्याय ३ - तुमच्या कंपनीकडे तक्रार कराल.
पर्याय ४ - पीएमपी मुख्यालयात मित्राविरूद्ध तक्रार कराल.व्यावहारिक दृष्ट्या पर्याय १ किंवा २ वापरला जाईल. परंतु या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय ४ आहे कारण तेच पोलिटिकली करेक्ट आहे.
(५) जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर अजिबात माहिती नसेल तर प्रश्न सोडून न देता पर्याय ३ निवडावा.
(६) परीक्षा देताना ज्या उत्तरांची खात्री नाही, ते प्रश्न मार्क करून नंतर सावकाशीने पुन्हा एकदा तपासून बदलता येतात. साधारणपणे ४ तासांपैकी तीन ते सव्वातीन तासात सर्व पेपर संपवून नंतरची २५-३० मिनिटे या मार्क केलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा एकदा तपासण्यासाठी वापरावीत व गरज पडल्यास उत्तर बदलावे. काही वेळा एखाद्या प्रश्नाचे उत्तर सुचले नाही तरी पुढील एखाद्या प्रश्नात आधीच्या प्रश्नाचे उत्तर किंवा त्याची एखादी टीप दडलेली असते. त्यामुळे संयम बाळगावा.
(७) प्रश्न पूर्ण वाचल्याशिवाय व समजल्याशिवाय पर्याय वाचू नयेत. अन्यथा गोंधळ होण्याची शक्यता असते. प्रश्न अर्धा वाचून कधीही उत्तर ठरवू नये.
(८) सलग ४ तास बसण्याचा सराव असणे आवश्यक आहे.
(९) मला ज्या कंपनीने प्रशिक्षण दिले त्यांनी PMBOK बरोबरच एक वेगळा २०० सराव प्रश्नांचा संच दिला होता. PMBOK मध्येही एक २०० प्रश्नांचा पेपर आहे. या ४०० प्रश्नांचा खूप उपयोग झाला. हे प्रश्न व त्यांची उत्तरे मी किमान ३ वेळा वाचली होती.
चतुरंग लिहितातः
१ - प्रत्यक्ष प्रोजेक्ट मॅनेजमेंट्चा अनुभव असण्याला पर्याय नाही.
२ - काहीतरी करुन इकडून तिकडून कामाचे तास भरवून पीएमआय कडे जाणे फायद्याचे नाही कारण प्रत्यक्ष प्रोजेक्टवरती काम करताना तुम्ही उघडे पडता.
३ - प्रोजेक्ट मॅनेजमेंट बॉडी ऑफ नॉलेज - या पुस्तकाला पर्याय नाही. किमान तीनदा हे पुस्तक व्यवस्थित वाचा. पहिले वाचन हे सावकाश आणि व्यवस्थित वेळ देऊन करा. त्यातली थिअरी प्रत्यक्षात कुठेकुठे आणि कशी वापरली जाते याचे तुमच्या दैनंदिन कामात निरीक्षण करता आले तर फारच उत्तम.
दुसरे वाचन करताना तुमचे आणि इतर प्रोजेक्ट मॅनेजर्सचे अनुभव त्या त्या ठिकाणी टिपणाने नोंदवून ठेवा. डीले झालेले प्रोजे़क्ट कशामुळे डीले झाले? व्यवस्थित पूर्ण झालेले कशामुळे झाले? याचा काही अभ्यास करता आला तर उत्तम. तुमच्या कंपनीतले प्रोजेक्ट मॅनेजर्स बोलायला तयार असतील तर त्यांच्याशी बोलून पुष्कळ माहिती मिळते.
तिसर्या वाचनानंतर त्यातली २०० प्रश्नांची प्रश्नपत्रिका सोडवा.
४ - प्रत्यक्ष परीक्षेत संगणकावरती ४ तासात २०० प्रश्न सोडवायचे असतात. त्याचा सराव घरी तशाच पद्धतीने करा. किमान तीन चाचणी परीक्षा ऑनलाईन द्याव्यात असे माझे मत.
५ - दर एका तासाने २ मिनिटे पाय मोकळे करुन, थोडे खाऊन आणि पाणी पिऊन या. याचा फार फायदा होतो. वेळ वाया जातो असे वाटते परंतु त्यामानाने फायदा जास्त असतो. शरीराची शुगर लेवल आणि पाण्याची लेवल कमी झाली की विचारशक्तीवरती झपाट्याने परिणाम होतो.
६ - प्रत्यक्ष परीक्षेच्या ठिकाणी तुमचा फोन किंवा इतर साधने एका लॉकरमध्ये ठेवून द्यावी लागतात आणि त्या लॉकरला परीक्षा संपल्याशिवाय हात लावता येत नाही अन्यथा तुम्हाला बाद केले जाते. त्यामुळे तुमच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी अनवधानाने लॉकरमध्ये जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागते! :)
७ - परीक्षेसाठी संगणकासमोर जाऊन बसलात की आधी काही सूचना वाचाव्या लागतात आणि मग परीक्षेचा वेळ सुरु होतो. गेल्या गेल्या आधी दिलेल्या स्क्रॅपपेपर्सवरती 'मेमरी डंप' कराच - म्हणजे महत्त्वाचे फॉर्म्युले, इक्वेशन्स, काही टेबल्स, तुम्ही तयार केलेली काही अॅक्रोनिम्स अशी सगळी माहिती पाचेक मिनिटात उतरवून काढा म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी आठवाआठवीत वेळ जात नाही आणि प्रेशरमुळे विसरण्याची शक्यता कमी होते.
याचाही सराव घरी करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- मी पीएमपी का केले
चतुरंग लिहितातः
पीएमपी मुद्दाम केले. कारण बर्याचदा प्रोजेक्ट करताना असे लक्षात येई की स्टेकहोल्डर्स कोणकोण आहेत? प्रोजेक्टसाठी इनपुट्स कोणती घ्यायला हवीत? मार्केटिंग आणी सेल्सचे लोक काय वाटेल त्या कमिट्मेंट्स देताहेत का? प्रोजेक्टमॅनेजर डेडलाईन्स कशाच्या आधारावर ठरवताहेत? हायर मॅनेजमेंटसमोर नेमके काय चित्र उभे आहे किंवा केले जाते आहे? याचा अंदाज लागत नसे मग लोड प्रत्यक्ष डिझाईन टिमवरती येई. वाटेल त्या कमी रिसोर्सेस मधे आणि कमी वेळात काम दामटवायची शक्यता वाढे आणि चुकांची शक्यताही त्याच प्रमाणात वाढे!
मग हे समजावून घेण्यासाठी पीएमपी केले आणि त्याचा भरपूर फायदा झाला. वरती उल्लेखलेले प्रश्न आणी त्याची कारणे कळायला लागली. मुख्य म्हणजे त्याच्याशी संबंधित लोकांशी मी या सर्टिफिकेशनच्या आधाराने प्रश्न विचारुन त्यांची बाजू समजावून घेऊ लागलो आणि त्यावर चर्चा होऊन डिझाईन टिमवरती लोड कसे येणार नाही किंवा कमी येईल हे ठरवणे शक्य होऊ लागले.
मिपावरचे पीएमपी, भावी पीएमपी आणि इतर इच्छुक रयत
पीएमपी फ्रॅटरनिटी तयार करून पीएमपी करण्याची इच्छा असणार्यांना मदत करावी आणि सर्वसाधारणपणे (इन जनरल) उत्तम प्रोजेक्ट मॅनेजमेंट तत्वांचा प्रचार करावा हे पीएमाआयच्या चार्टरचा एक भाग व पीएमआय मेंबर्सची तात्वीक जबाबदारी आहे.
पीएमपी
"मी पीएमपी आहे!"
श्रीगुरुजी, डॉ सुहास म्हात्रे, आनंदयात्री, चतुरंग, नपा
भावी पीएमपी
"मी येत्या १२ महिन्यांत पीएमपी परीक्षा देणार आहे!"
स्वच्छंदी_मनोज, खटपट्या
इच्छुक रयत
"कधीतरी पीएमपी करायचंय!"
यशोधरा, आदूबाळ, कॅप्टन जॅक स्पॅरो, मधुरा देशपांडे, स्नेधा, शिवाजी नाठे, आरोह
प्रतिक्रिया
16 Apr 2016 - 12:32 pm | नाखु
भावा सध्या पालक (म्हणजे भाजीपाल्यातला) झालोय. आलु पालक्,पालक-पनीर जमलं तरच जोडीला घेतात.
स्वगतः तुलाबी यील अनुभव मग बघु.
18 Apr 2016 - 12:46 pm | बबन ताम्बे
16 Apr 2016 - 11:54 am | मानसी१
उत्तम धागा. वाखु साठवली आहे.
16 Apr 2016 - 12:10 pm | शिवाजी नाठे
PMP करायचा विचार चालू आहे. अभ्यासाला दिशा देण्यासाठी खूप उपयुक्त माहिती येथे मिळाली. स्टडी ग्रुप बनवला तर भाग घ्यायला नक्की आवडेल.
16 Apr 2016 - 5:38 pm | आरोह
PMI, APMP, PRINCE2

गेल्यावर्षी मी SP Jain Project Management Institute मध्ये चौकशी केली होती. त्यांचा Post Graduation Certification in Advance Project Management (PGC-APM) हा कोर्से PMI मान्यताप्राप्त आहे( फी रु १,०००००), तसेच काही PMP पूर्वतयारी साठी काही कोर्सेस आहेत.
आमची कंपनी युरोप बसेड असल्यामुळे (Oil&Gas, Petrochemical,Power क्षेत्रात ) APMP शी सलग्न आहे आणि siniorty प्रमाणे कंपनीतल्या engineers ना कोर्ससाठी प्रमोट करते (फी कंपनी भरते).
माझे स्वताचे असे निरीक्षण आहे कि PMP ला जगात जास्त मान्यता (preferance )आहे (युरोप, UK सोडून )
16 Apr 2016 - 6:21 pm | आरोह
PMP हि आपल्याला maintain करावी लागते(PDU च्या माध्यमातून). APMP(हिच्या LEVEL असतात) हि one time असते. PMP ला असणारे वलय मी स्वतः पाहिलंय, विषेतः, middle east, आणि तिथे असणाऱ्या american कंपन्यात.
खरंतर PMP करायची कि AAPMP? हे आपले geographical कार्यक्षेत्र कुठे आहे आणि आपली मात्रु/पित्रू कंपनी कुठे आहे त्या प्रमाणे निर्णय घेतसलेला बरा.
मी स्वतःला PMP करायचंय
16 Apr 2016 - 7:37 pm | रेवती
अरे वा! या धाग्याबद्दल नवर्याला सांगते. त्याचे हे सर्टिफिकेशन झाले आहे.
16 Apr 2016 - 9:06 pm | यशोधरा
जरुर सांग रेवाक्का, इथे लिहायलाही सांग प्लीज.
16 Apr 2016 - 9:10 pm | यशोधरा
बरं, माझा एक प्रश्न. कोणाला परी़क्षेसाठी पीएमआयला हवा असेल तितक्या तासांचा अनुभव नसेल, आणि नजीकच्या काळात मिळायची शक्यता नसेल, अशांनी काय करावे? त्यांच्यासाठी काहीच पर्याय नाहीये का?
दुसरे म्हणजे मला एक दोघे असे ठाउक आहेत की ज्यांना ठराविक तासांचा अनुभव नव्हता तरीही पीएमपी केलेय, हे कसे? काहीतरी झालमझोल केला असणार?
16 Apr 2016 - 9:53 pm | स्वच्छंदी_मनोज
>>> नाही काही पर्याय नाहीये..कारण हा ठरावीक तासांचा अनुभव तुम्हाला PMI ला कळवावा लागतो. तिथे रँडम ऑडीट होते आणी जर तुमचे अॅप्लीकेशन सिलेक्ट झाले तर तुम्ही कळवलेला अनुभव सहीनीशी प्रुव्ह करावा लागतो. सो ठरावीक तासांचा अनुभव हा हवाच. जर ३५००/७५०० तास नसतील तर PMP च्या ऐवजी CAPM म्हणून एक क्रेडेंशिअल आहे त्याचा विचार करू शकतो.
>>> हम्म.. काय झोल आहे माहीत नाही. तुम्ही विचारून परत एकदा खात्री करा.
17 Apr 2016 - 5:54 am | चतुरंग
पीएमपी मुद्दाम केले. कारण बर्याचदा प्रोजेक्ट करताना असे लक्षात येई की स्टेकहोल्डर्स कोणकोण आहेत? प्रोजेक्टसाठी इनपुट्स कोणती घ्यायला हवीत? मार्केटिंग आणी सेल्सचे लोक काय वाटेल त्या कमिट्मेंट्स देताहेत का? प्रोजेक्टमॅनेजर डेडलाईन्स कशाच्या आधारावर ठरवताहेत? हायर मॅनेजमेंटसमोर नेमके काय चित्र उभे आहे किंवा केले जाते आहे? याचा अंदाज लागत नसे मग लोड प्रत्यक्ष डिझाईन टिमवरती येई. वाटेल त्या कमी रिसोर्सेस मधे आणि कमी वेळात काम दामटवायची शक्यता वाढे आणि चुकांची शक्यताही त्याच प्रमाणात वाढे!
मग हे समजावून घेण्यासाठी पीएमपी केले आणि त्याचा भरपूर फायदा झाला. वरती उल्लेखलेले प्रश्न आणी त्याची कारणे कळायला लागली. मुख्य म्हणजे त्याच्याशी संबंधित लोकांशी मी या सर्टिफिकेशनच्या आधाराने प्रश्न विचारुन त्यांची बाजू समजावून घेऊ लागलो आणि त्यावर चर्चा होऊन डिझाईन टिमवरती लोड कसे येणार नाही किंवा कमी येईल हे ठरवणे शक्य होऊ लागले.
अभ्यास कसा करावा?
१ - प्रत्यक्ष प्रोजेक्ट मॅनेजमेंट्चा अनुभव असण्याला पर्याय नाही.
२ - काहीतरी करुन इकडून तिकडून कामाचे तास भरवून पीएमआय कडे जाणे फायद्याचे नाही कारण प्रत्यक्ष प्रोजेक्टवरती काम करताना तुम्ही उघडे पडता.
३ - प्रोजेक्ट मॅनेजमेंट बॉडी ऑफ नॉलेज - या पुस्तकाला पर्याय नाही. किमान तीनदा हे पुस्तक व्यवस्थित वाचा. पहिले वाचन हे सावकाश आणि व्यवस्थित वेळ देऊन करा. त्यातली थिअरी प्रत्यक्षात कुठेकुठे आणि कशी वापरली जाते याचे तुमच्या दैनंदिन कामात निरीक्षण करता आले तर फारच उत्तम.
दुसरे वाचन करताना तुमचे आणि इतर प्रोजेक्ट मॅनेजर्सचे अनुभव त्या त्या ठिकाणी टिपणाने नोंदवून ठेवा. डीले झालेले प्रोजे़क्ट कशामुळे डीले झाले? व्यवस्थित पूर्ण झालेले कशामुळे झाले? याचा काही अभ्यास करता आला तर उत्तम. तुमच्या कंपनीतले प्रोजेक्ट मॅनेजर्स बोलायला तयार असतील तर त्यांच्याशी बोलून पुष्कळ माहिती मिळते.
तिसर्या वाचनानंतर त्यातली २०० प्रश्नांची प्रश्नपत्रिका सोडवा.
४ - प्रत्यक्ष परीक्षेत संगणकावरती ४ तासात २०० प्रश्न सोडवायचे असतात. त्याचा सराव घरी तशाच पद्धतीने करा. किमान तीन चाचणी परीक्षा ऑनलाईन द्याव्यात असे माझे मत.
५ - दर एका तासाने २ मिनिटे पाय मोकळे करुन, थोडे खाऊन आणि पाणी पिऊन या. याचा फार फायदा होतो. वेळ वाया जातो असे वाटते परंतु त्यामानाने फायदा जास्त असतो. शरीराची शुगर लेवल आणि पाण्याची लेवल कमी झाली की विचारशक्तीवरती झपाट्याने परिणाम होतो.
६ - प्रत्यक्ष परीक्षेच्या ठिकाणी तुमचा फोन किंवा इतर साधने एका लॉकरमध्ये ठेवून द्यावी लागतात आणि त्या लॉकरला परीक्षा संपल्याशिवाय हात लावता येत नाही अन्यथा तुम्हाला बाद केले जाते. त्यामुळे तुमच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी अनवधानाने लॉकरमध्ये जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागते! :)
७ - परीक्षेसाठी संगणकासमोर जाऊन बसलात की आधी काही सूचना वाचाव्या लागतात आणि मग परीक्षेचा वेळ सुरु होतो. गेल्या गेल्या आधी दिलेल्या स्क्रॅपपेपर्सवरती 'मेमरी डंप' कराच - म्हणजे महत्त्वाचे फॉर्म्युले, इक्वेशन्स, काही टेबल्स, तुम्ही तयार केलेली काही अॅक्रोनिम्स अशी सगळी माहिती पाचेक मिनिटात उतरवून काढा म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी आठवाआठवीत वेळ जात नाही आणि प्रेशरमुळे विसरण्याची शक्यता कमी होते.
याचाही सराव घरी करा.
सर्टिफिकेट करु इच्छिणार्यांना शुभेच्छा! :)
-रंगा
17 Apr 2016 - 10:56 am | सुधीर कांदळकर
प्रकल्प व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा आहेच. पीएमबीओके दोनतीन वेळा वाचल्यानंतर याच अनुभवाची आपल्याला नव्याने पण सखोल स्तरावरची ओळख होते.
माझ्या माहितीप्रमाणे मार्केट डिमांडप्रमाणे दरवर्षी उत्तीर्ण होणे सोपे वा कठीण होते. म्हणजे मागणी जादा असल्यास सोपे आणि त्याउलट.
या शिक्षणक्रमासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य मी एका प्रा. ना दोन वेळा बनवून दिलेले आहे. ४था आवृत्ती साठी २०१० मध्ये आणि गेल्यावर्षी ५व्या आवृत्ती साठी. ५व्या आवृत्तीसाठी ते बनवतांना अभ्यासाची एक वेगळी पद्धत अचानक ध्यानात आली. प्रत्येक नॉलेज एरियातील इनपुट प्रोसेसेसच्या क्रमाने वाचावे. नंतर तसेच टूल्स आणि टेक्निक्स आणि नंतर आऊटपुट्स. उदा. प्रकरण ४ इन्टीग्रेशनमधील प्रोजेक्ट चार्टरचे इनपुट, नंतर प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट प्लान इन्पुट्स ... या क्रमाने. त्यामुळे सुसंगती छान ध्यानात येते आणि स्मरणात पण राहाते.
बीए नंतर एमए याप्रमाणे पीएम आयने पीएमपी नंतर स्पेशलायझेशन्स पण सुरू केलेली आहेत. उदा. आरएमपी - रिस्क मॅनेजमेन्ट वगैरे.
सॉफ्टवेअरवाल्यांसाठी छान धागा. धन्यवाद.
13 Nov 2019 - 1:15 pm | शैलेश लांजेकर
नमस्कार सुधीर साहेब,
"अभ्यासाची एक वेगळी पद्धत अचानक ध्यानात आली. प्रत्येक नॉलेज एरियातील इनपुट प्रोसेसेसच्या क्रमाने वाचावे. नंतर तसेच टूल्स आणि टेक्निक्स आणि नंतर आऊटपुट्स. उदा. प्रकरण ४ इन्टीग्रेशनमधील प्रोजेक्ट चार्टरचे इनपुट, नंतर प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट प्लान इन्पुट्स ... या क्रमाने. त्यामुळे सुसंगती छान ध्यानात येते आणि स्मरणात पण राहाते."
हे जरा विस्कटून सांगाल का? अथ पासून इति पर्यंत संपूर्ण समजावून सांगितलेत तर खूपच छान.. अगोदरच धन्यवाद...
17 Apr 2016 - 11:35 am | नपा
आपल्या दैनंदिन व्यावसायिक आणि वैयक्तीक कार्यात फायदा होवू शकतो. कारण या नंतर आपण व्यवस्थापन, नियोजन अधिक कौशल्यपुर्वक करू शकतो.
PMP ची परीक्षा जरा tricky आहे. २०० पैकी २५ प्रश्नांना गुण नाहीत, म्हणजे २ तासात १७५ पैकी किती योग्य उत्तर दिलीत यावर निकाल अवलंबून आहे. एकदा हि परीक्षा पास झालात कि PMP credential नियमित वापरण्यासाठी PDU - Professional Development Units गोळा करावे लागतात. ३ वर्षासाठी ६० PDU हवेत. ते मिळवणं तसा सोप्पा असता...
हा धागा सगळ्यांना नक्कीच फायद्याचा आहे..
-सगळ्या PMP उमेदवारांना शुभेच्छा..
17 Apr 2016 - 12:46 pm | नपा
तर ४ तासांची आहे...खूप वर्ष झालीत म्हणून विसरायला झालं..
18 Apr 2016 - 12:36 am | संदिप एस
ट्रेनिंग पूर्ण केले आहे आणी सध्या पीमबॉक आणी हेड्फर्स्ट चा अभ्यास सुरु आहे... जमेल तसा सहभागी होत राहिल..
18 Apr 2016 - 7:47 am | माझीही शॅम्पेन
खर सांगू का धागा वाचून जाम हसलो :) , पीएमपी केलेले कितीतरी मॅनेजर्स सपशेल हरताना पाहिलेत , प्रत्यक्ष आयुष्यात येणारे इतके वेगळे असतात की अनुभवशीवाय कुठलाही गुरू ह्या जगात नाही ह्याची खात्री पटते ... माझी मत पटत नसतील तर सोडून द्या पण वाईट वाटून घेऊ नका , धागा काढताना खूप मेहेनत घेतली आहे हे नमूद करतो :)
18 Apr 2016 - 8:09 am | मुक्त विहारि
कदाचित ते पढतमूर्ख असतील किंवा नशीबाने पी.एम.पी. पास झाले असतील.पण अशा काही जणांमूळे पी.एम.पी.चेच नाही तर इतरही व्यावहारिक शिक्षणाचे सर्टीफिकेटसचे महत्व कमी होत नाही.
"प्रत्यक्ष आयुष्यात येणारे इतके वेगळे असतात की अनुभवशीवाय कुठलाही गुरू ह्या जगात नाही ह्याची खात्री पटते."
प्रचंड सहमत.
" धागा काढताना खूप मेहेनत घेतली आहे."
+ १११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
18 Apr 2016 - 12:19 pm | यशोधरा
प्रत्यक्ष अनुभव विचारतातच ना? प्रत्यक्ष अनुभवाला कमी कुठे लेखले आहे?
20 Apr 2016 - 4:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
मलाही हा विरोधाभासाने भरलेला प्रतिसाद वाचून खूपच हसू आले =))
कोणत्याच शिक्षणसंस्थेचे / प्रमाणपत्र देणार्या संस्थेचे १००% पास उमेदवार कायम यशस्वी होतील असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही... आणि खूप अनुभव आहे म्हणून तो माणुस १००% यशस्वी होईल असे म्हणणेही वस्तुस्थितीला धरून होणार नाही. किंबहुना कोणतेही महत्वाचे ग्याह्य प्रमाणपत्र नसताना, केवळ अनुभव आहे म्हणून एखादे उच्च जबाबदारीचे पद नक्की मिळेल असे म्हणणे म्हणजे काय, हे सांगायलाच हवे का ?!
सगळे आयआयटीचे ग्रॅज्युएट्स किंवा आयआयएमचे एमबीए त्यांच्या व्यवसायांत यशस्वी असतीलच असे नाही, तसेच पीएमपीचेही आहे. किंबहुना...
(अ) व्यावहारीक जगात अयशस्वी झालेल्या एखाद-दुसर्या माणसावरून निष्कर्ष काढायचा झाला आणि
(आ) केवळ अनुभवाशिवाय दुसरे काहीच महत्वाचे नाही असे मानले
तर या जगातल्या सर्व शिक्षणसंस्था आणि प्रमाणपत्रे देणार्या संस्था बंद कराव्या असे म्हटल्यासारखे होईल, नाही का ? :)
म्हणूनच. एखाद-दुसर्या अनुभवावरून कोणत्याही बाजूचे सरसकटीकरण करणे हे ना शास्त्रिय होते, ना शहाणपणाचे !
---
अवांतर : दीड दशकापेक्षा जास्त प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या उच्च व्यावसायीक अनुभवानंतर आणि व्यवसायातील शिडीची शक्य तेवढी उच्च पायरी गाठल्यानंतर, अजून कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसतानाही मी पीएमपी परिक्षा केवळ गम्मत/हट्ट म्हणून दिली होती. तरीसुद्धा माझे वरचे मत कायमच आहे. या पार्श्वभूमीवर, ते हितसंबंधरहित असावे असे वाटायला हरकत नसावी, असे वाटते.
20 Apr 2016 - 4:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
अनुभवाबद्दल... जो सर्वसाधारणपणे एखाद्या पदावर व्यतित केलेल्या वर्षांत मोजला जातो... माझे लाडके वचन असे आहे...
"Years only give fair guarantee of gray hair, everything else is conjecture !"
(पांढरे केस हीच एक गोष्ट काळ बर्यापैकी खात्रीलायकरित्या देऊ शकतो, इतर सर्व अनुमान असते ! )
माझ्या अनुभवांत मी अश्या अनेक व्यक्ती पाहिल्या आहेत की ज्यांनी वर्षानुवर्षे उच्च खुर्चीवर बसून तिला गरम करण्यापलिकडे काही साध्य केलेले नाही. याउलट, अशी काही माणसे पाहिली आहेत की ज्यांनी (स्वतः आणि / अथवा इतरांनी) एखाद्या अगोदर कधीच न केलेल्या प्रकल्पात पहिल्या दिवसापासून चमक दाखवायला सुरुवात केली आहे.
18 Apr 2016 - 8:55 am | स्नेहश्री
स्ट्डी ग्रुपमध्ये मला ही सहभाग घ्यायला आवडेल.गेल्यावर्षी मी प्रिन्स२ प्रॅक्ट्श्नर केलेय . पीडीयु च भरुन झाले आहेत. तसच मी सांगेन आधी एक्झाम्ची डेट घ्या आणि मग अभ्यासाला सूरवात करा. कारण पी,एम. पी ची फी भरुन एकदा फुकट घालवुन झाली आहे. आता पेपर बेस टेस्ट द्यायचा प्लन आहे. ठाण्यामध्ये पेपर बेस्ड एक्झाम घेतली जाते.
18 Apr 2016 - 1:00 pm | स्वच्छंदी_मनोज
>>> PBT ह्या फार कमी घेतल्या जातात. आणी PBT अरेंज करणे हे पुर्णपणे REP ची जबाबदारी असते आणी ते त्यांच्यासाठी खर्चीकही असते. त्यामुळे शक्यतो PBT कमी होतात. जर का PBT इच्छुकांची संख्या बरीच असेल तर एखाद्या शहरात PBT होऊ शकते. ठाण्यामध्ये गेल्या डिसेंबरला झाली होती. PBT फायदे आहेत तसे तोटेही आहेत.
फायदे -
१. सगळ्यात मोठा आणी एकमेव फायदा म्हणजे एक्झाम फी - PBT एक्झाम फी फक्त २५०$ आहे (PMI मेंबर्स साठी) जी CBT च्या तुलनेत बरीच कमी आहे.
२. एखाद्या छोट्या शहरात जर प्रोमेट्रीक संटर नसेल तर PMI च्या हेल्प ने तिथे PBT घेता येऊ शकते त्यामुळे छोट्या शहरातील लोकांना पण शहरात PMP Exam देता येऊ शकते.
तोटे -
१. सगळ्यात मोठा तोटा म्हणजे PBT एक्झाम डेट बंधनकारक आहे. त्यामुळे आपल्याला थरलेल्या दिवशी PBT देणे कंपल्सरी असते पण तेच CBT आपण आपल्या एच्छि़क तारखेने प्रोमेट्रीकला जाऊन देऊ शकतो.
२. PBT हे OCR वर अवलंबलेली टेस्ट असते त्यामुळे आपल्याला उत्तराची खुण काळचीपुर्वक करावी लागते.
३. अनलाईक सिबीटी, पीबीटी चा रिझल्ट लगेच कळत नाही त्यासाठी पेपर चेकींगची वाट बघावी लागते.
त्यामुळे PBT or CBT हे आपण आपल्या इच्छेवर निवडावे.
19 Apr 2016 - 7:54 am | उदय
मी साधारण १० वर्षापूर्वी पीएमपी केले. त्याचा हा अनुभव.
- अभ्यास कसा केला
मला साधारणतः २ महिने अभ्यास करावा लागला. सगळ्यात आधी PMBOK पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचले. सुरुवातीला जवळपास ५०% वर शब्दच कळले नाहीत, पण चिकाटीने पुस्तक वाचून संपवले.
सर्वप्रथम ३५ क्रेडिट तासाचे ट्रेनिंग घेतले. इथल्या लोकल पीएमआय चॅप्टरने ते आयोजित केले होते, वर्ग ८ शनिवारी होते आणि पैसे कंपनीने भरले त्यामुळे हे सहज जमून आले. ट्रेनिंग झाल्यावर लगेच २ महिन्यात परीक्षा द्या असे सांगण्यात आले होते, पण मी ६ महिन्यानंतर परीक्षेसाठी अर्ज केला. तो साधारण ८-१० मंजूर होऊन परीक्षा घेण्यास पात्र ठरलो, पण प्रत्यक्ष परीक्षा त्यानंतर जवळपास १० महिन्यानी दिली, तेसुद्धा पैसे वाया जातील या भितीने.
पीएमआय चॅप्टरच्या ट्रेनिंग नोटस PMBOK च्या मानाने बर्या होत्या. पण रीटा मुलकेहीचे पुस्तक समजायला सोपे आहे. मी PMBOK + रीटा मुलकेहीचे पुस्तक अशी २ च पुस्तके वापरली. ईबेवरून सँपल टेस्टसाठी सॉफ्टवेर घेतले होते पण ते चालले नाही. १-२ याहू ग्रूप जॉईन केले होते, ज्यातून थोडे प्रश्न मिळले. मला व्य.नि. केला तर नोट्स देऊ शकेन. एकूण ३ वेळा PMBOK आणि २ वेळा रीटाचे पुस्तक कमीत-कमी वाचावे लागेल. प्रश्नोत्तरे सोडवण्यावर भर द्या आणि त्याची प्रॅक्टिस करा. ४ पैकी १ किंवा २ हमखास चूक आहेत, हे बर्याचदा कळून येईल, ती उत्तरे बाद करा. process of elimination helps a lot. उरलेली दोन्ही उत्तरे जवळपास बरोबर वाटतील, तर सर्व पर्याय शब्द-नि-शब्द वाचा म्हणजे कळेल की कुठले उत्तर अचूक आहे. तुमच्या अनुभवाने तुम्हाला काय उत्तर बरोबर वाटते, ते महत्वाचे नाही. पी.एम.आय.ला काय उत्तर हवे आहे, ते उत्तर निवडा. परीक्षा सुरू होण्याआधी ब्रेनडंप करा म्हणजे दिलेल्या कागदावर फॉर्म्युले वगैरे लिहा. मी mnemonics आणि शॉर्टफॉर्मचा वापर करतो, तुम्हाला आवडले तर तसे करा. (उदा: 5 Process Groups = IPECC ) मला सुरुवातीचे ८-१० प्रश्न खूपच कठीण वाटले होते आणि तेव्हाच वाटले की मी काही आता पास होत नाही. अश्या वेळी रिव्यूसाठी ते प्रश्न मार्क करा आणि पुढे जा. कदाचित पुढच्या प्रश्नांत तुम्हाला काही हिंट मिळू शकेल.
मला इंडट्रीत प्रत्यक्ष कामाचा अनुभव होता त्यामुळे पीएमपी परीक्षा देताना फारसा त्रास झाला नाही. माझ्या अनुभवाशी मी सांगड घालू शकत होतो. कदाचित त्यामुळे पहिल्या प्रयत्नात पास झालो.
पीएमआय. नुसार A project is temporary in that it has a defined beginning and end in time, and therefore defined scope and resources. त्यामुळे ही परीक्षा पास होणे, हेच तुमचे ध्येय ठेवा आणि तेच तुमचे प्रोजेक्ट ठरवा. ६१% पासिंग असेल तर ६२% टक्के मिळाले तरी तुम्ही पास आणि ९९% मिळाले तरी तुम्ही पास, हे लक्षात ठेवा. १००% मिळाले तर पीएमआय तुम्हाला हार-तुरे देणार नाहीये. प्रत्यक्ष अनुभव आणि ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्य पडले आहे.
- मी पीएमपी का केले
स्पष्ट सांगायचे तर मला पीएमपी करावेसे वाटले कारण त्याची खूप जाहिरात होत होती. जिथेतिथे म्हणजे लिन्क्डइन, मॉन्स्टर वगैरे साइटवर पीएमपी ची मागणी दिसत होती. बरेच गुलटी पीएमपी करत होते. मार्केटमध्ये आपण मागे पडू नये, एखादे सर्टिफिकेशन रेज्युमेवर असले तर वाईट दिसणार नाही, या उद्देशाने मी पीएमपी केले. शिवाय कंपनी पैसे देणार होती, हा पण एक फायदा होता. पण त्यांनी पैसे दिले नसते तरी मी स्वतःच्या पैशाने केले असते.
दुसरे खरे वैयक्तिक कारण म्हणजे मला प्रोजेक्ट मॅनेजमेंटबद्दल स्ट्रक्चर्ड अभ्यास करायचा होता. मुख्य म्हणजे प्लानिंग कसे करायचे, पैशाचा अंदाज आणि बजेटिंग कसे करायचे आणि मुख्य म्हणजे रिस्क मॅनेजमेंट्बद्दल मला शिकायचे होते. मिटींगमध्ये ज्या बाता मारल्या जातात, त्या मला समजून घ्यायच्या होत्या आणि ती "विशिष्ट भाषा" शिकायची होती. (उदा. म्हणजे आम्ही अॅसेट्स विकून पैसे उभे केले असे न म्हणता, we did monetization of assets असे कानावर आले की ते कळत नसे.)
- माझा अनुभव आणि मत
पीएमपी साठी बी.ई. नंतर ४५०० तास अनुभव लागतो. वर्षाला २००० तास धरले तर, तर साधारण ३ वर्षांचा तुमचा प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा अनुभव हवा. बी.ई. झाल्याझाल्या लगेच तुम्हाला तसा अनुभव कोणी देणार नाही. आधी ट्रेनी, मग ज्युनियर, मग टीम लीड वगैरे शिकत तुम्ही पुढे जाणार. त्यामुळे इंडस्ट्रीत किमान १० वर्ष अनुभव आल्यावर पीएमपी. च्या मागे पडावे, असे माझे वैयक्तिक मत आहे. जर नुकतेच (गेल्या २-४ वर्षात) पास झाला असाल (कुठलीही डिग्री) तर पीएमपी करण्याऐवजी एम.बी.ए. (विशेषतः फायनान्समध्ये) करा असे मी सुचवीन.
सुरुवातीला लोकल चॅप्टरला मिटींग्सला जात असे, नंतर त्याचा काडीचाही फायदा होत नाही हे लक्षात आल्याने ते सोडून दिले. पी.एम.पी. झालात की PDU मिळवणे खूप सोपे आहे. पी.एम.पी. मुळे तुम्हाला फार मान मिळेल असा काही भ्रम ठेऊ नका कारण आपल्याला स्वतःला नेहमीच शिकत रहावे लागते, मग पी.एम.पी. असो किंवा नसो. पी.एम.पी आणि पी.एम.आय.बद्दल बाकी वैयक्तिक मते इथे देता येणार नाहीत. तुम्हाला या परीक्षेसाठी शुभेच्छा.
20 Apr 2016 - 4:58 pm | जोन
+१
https://www.coursera.org/courses?languages=en&query=project%20management
19 Apr 2016 - 10:44 am | वात्रट
मी पास झालो आहे़
कुणाला मदत हवी असल्यास जरुर सम्पर्क साधा.
19 Apr 2016 - 10:50 am | नागेश कुलकर्णी
स्ट्डी ग्रुप बनवण्याची कल्पना चांगली आहे. त्यामुळे खूपच मदत होईल आणि जास्तीत जास्त प्रश्नसंच विचारविनिमय करून सोडवता येतील.
माझीही तयारी चालू आहे, येत्या २/३ महिन्यात PMP देण्याचा विचार आहे.
20 Apr 2016 - 12:18 pm | पिलीयन रायडर
उत्तम धागा! मुळ धाग्यालाच अपडेट केल्याने जास्त उपयोगी झाला आहे. प्रतिसादांमधुन अपेक्षेपक्षा फार जास्त माहिती मिळाली आणि बरे आयते सापडले लोक डोकं खायला!! ही परीक्षा देण्याची इच्छा तर आहे पण नजीकच्या काळात अनेक कारणांनी ते जमणार नाही असेच दिसते. इतरही अनुषंगिक माहिती मिळत असल्याने इतर कोणकोणत्या परीक्षा देता येतील हे कळतंय.. गुड!.
व्यनि ग्रुप केला तर मलाही अॅडवा. पण त्यापेक्षा धाग्यात चर्चा झाली तर जास्त लोकांपर्यंत माहिती पोहचेल.
एक प्रश्नः-
जेव्हा काही हजार तासांचा अनुभव विचारतात तेव्हा तो कोणत्या फॉर्मट मध्ये द्यायचा असतो? म्हणजे नक्की तुमचे काम प्रोजेक्ट मॅनेजमेंट्च्या क्षेत्रात येते का हे ते कसे बघतात? जसं की आमच्या कंपनीत PM Team फार भलभलती कामं करत असते. आधी project coordinator म्हणुन काम करावे लागते मग पुढे मॅनेजर बनता येते. मग कोऑर्डिनेटर म्हणुन काम केलेला अनुभव दाखवता येतो का?
20 Apr 2016 - 4:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
१. Learn About the Certification Process हे पहा.
२. http://www.pmi.org/ वरून अॅप्लिकेशन फॉर्म डालो करा. तो पूर्णपणे वाचा आणि समजून घ्या.
वरच्या दोन पायर्यांतूनच बहुतेक सर्व फर्स्टहँड माहिती मिळेल.
20 Apr 2016 - 5:57 pm | विजुभाऊ
मी गेल्या वर्षी प्रिन्स २ दिली.
पी एम पी सारखीच आहे ती परिक्शा
20 Apr 2016 - 8:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
अभिनंदन !
अमेरिकेत, अरेबियन गल्फमधे आणि इतर ठिकाणच्या अमेरिकन / अमेरिकन प्रभावाखालील कंपनीत भवितव्य बघत असल्यास पीएमपी जास्त योग्य आहे.
ब्रिटनमधे आणि इतर ठिकाणच्या ब्रिटिश / ब्रिटिश प्रभावाखालील कंपनीत भवितव्य बघत असल्यास प्रिन्स-२ जास्त योग्य आहे.
27 Apr 2016 - 2:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
Project Management National Conference, India 2016
Project Management Indispensable for Vision India
The Renaissance Hotel & Convention Centre, Mumbai | November 17 - 19 , 2016
अधिक माहितीसाठी पीएमआय च्या खालील वेबसाईटवर किंवा स्थानिक चार्टरमधे चौकशी करावी.
www.pmi.org.in/conference
27 Apr 2016 - 5:38 pm | पीशिम्पी
मी डिसेंबर २०१५ मध्ये प्रिन्स २ प्रॅक्टीशनर ची परिक्षा पास झालोय. युरोप मध्ये प्रिन्स २ ला च प्राधान्य आहे
27 Apr 2016 - 10:27 pm | यशोधरा
इथेच कोणी प्रिन्स २ ची माहितीही लिहील का?
28 Apr 2016 - 9:13 am | स्नेहश्री
PRINCE 2 mns Projects In Controlled Environments, version 2. Prince2 hi large umbrella aahe ani PM is small part under large umbrella. Tyache 2 bhag astat. Foundation ani Practitioner. Mi donhi bhag pass zale ahe. Foundation ani Practitioner 2 weeks madhye pass hota yeta. mns mi zale ahe. paper ha case studies based asto. Case study dilya astat tyavar short question vichartat. ekhadya project var tumhi kase react karal or salla dyala or kay karal type. match the following hi asta. Googly denare question astat. pan ek soppi tip mhanje pratyekvela jar tumhi questions swatahachya project la apply karun baghiatalat tar yenara utter correct yeta. exam sopi aste tashi. maazyakade kaahi mi notes ahet ani mi jithun exam appear keliye tyachi mahiti dein. vyani kela tar. Hi certification UK saathi jast valid manala jata. Jyana onsite jayacahay UK la tar baracha value aahe. tasach navin job UK madhye shodhatana additional qualification manala jaata. PMP karata karata Prince2 ekikade hovu shakata. basic concepts are same. so PMP preparation karanyamadhye jo vel milto hyat prince2 che donhi bhag hovun jata.
29 Apr 2016 - 4:56 am | यशोधरा
धन्यवाद स्नेहश्री. PMP करण्यासाठी जसे नियम आहेत, काही अटी आहेत (ठराविक अनुभव वगैरे) त्याचप्रमाणे, PRINCE 2 साठीही आहेत का?
30 Apr 2016 - 11:50 pm | स्नेहश्री
नाही असे अनुभवाच्या अटी नाही आहेत काही. फक्त अनुभवी लोकांनाच उत्तरे लिहीता येतात.
6 May 2016 - 4:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
पीएमपी करु इच्छिणार्यांसाठी ज्ञान, सल्ला, परिक्षेची तयारी, इत्यादी अनेक फायदे असणारे कोर्सेस पीएमआयचे चॅप्टर्स भारभर घेत असतात. त्यांच्याबद्दल्ची माहिती खालच्या अधिकृत दुव्यावर सापडेल...
http://www.pmstudy.com/dates_location_others.asp
6 May 2016 - 9:57 pm | स्वप्क००७
http://www.guru99.com/pmp-tutorial.html
27 Jun 2016 - 2:31 pm | योगी९००
एक आठवड्यासाठी कंपनी पमप कोर्सच्या अभ्यासासाठी पाठवत आहे (परीक्षा नाही). पमप चा अभ्यास कसा करावा याच्यासाठी काही टिप्स मिळतील का?
27 Jun 2016 - 8:46 pm | खटपट्या
कोर्समधेच तुम्हाला अभ्यास कसा करावा याच्या टीप्स मीळतील. बाकी पिम्बोकला पर्याय नाही. अभ्यासक्रम पूर्णझाल्यावर लगेच अभ्यास करुन परीक्षा देण्याचा प्रयत्न करा. जास्त गॅप घेउ नका. एकदा रेंगाळले की राहुन जाते.
28 Jun 2016 - 11:34 am | योगी९००
उत्तराबद्दल आभारी आहे. पण प्रॉब्लेम एवढाच आहे की कोर्स झाल्यावर दीड महिन्याने परीक्षा आहे. तो पर्यंत अभ्यासाचा टेम्पो रहायला हवा.
27 Jun 2016 - 9:32 pm | जीएस
मला वाटते की या परिक्षा कशा पास व्हायच्या याचे एक तंत्र आहे. जेवढा गवगवा केला जातो तेवढे काही हे कठीण नाही.
२०११: मी पीएमपी साठी साधारण ३० तास अभ्यास केला होता. शिवाय सक्तीचा कोर्स होता पीडीयू साठी. तंत्र लक्षात आल्यावर आणि परिक्षा दिल्यावर तो मला जास्त वाटला.
२०१४: मग मी पीजीएंमपी साठी २० तास अभ्यास केला. पुरेसा वाटला. प्रोफिशिअन्ट सह पास झालो.
२०१६: मग थोडी अजून सुधारणा करून पीएफएमपीसाठी १० तास अभ्यास केला. तो थोडा कमी वाटला म्हणजे उत्तरे लिहितांना पहिल्य दोन परिक्षांएवढा कॉन्फिडन्ट नव्हतो पण सुदैवाने पास झालो.
अर्थात प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाचा थोडाफार फायदा झाला असेल. पण अनेकांचे अनुभव वाचून कोचींग क्लासेस सुरू करावे का असे कधी कधी प्रकर्षाने वाटते.
28 Jun 2016 - 11:07 am | शैलेश लांजेकर
मलाही PMP करायची ईच्छा आहे. फक्त कधी आणि कशी सुरुवात करावी ते कळेनासे झाले आहे. ITIL फौंडेशन झाले आहे. या वर्षी कंपनीत प्रमोशन मिळाल्याने नवीन शिकण्याची इच्छा आणि जबाबदारी दोन्ही वाढली आहे. टोटल आयटी एक्सपीरियन्स ९+ वर्षे झाला आहे. सध्या ITIL प्रोसेस वरती काम करीत आहे. तरी अनुभवी मंडळींनी मार्गदर्शन करावे ही विनंती.
8 Nov 2018 - 7:52 am | दिमित
परत वर आणतोय हा धागा.
मागील काळात (जुन २०१६ नतर) कोणी नव्याने हि परीक्शा दिली आहे काय?
आता नवीन PMBOK (आव्रुत्ती ६) आले आहे.
8 Nov 2018 - 12:13 pm | आदूबाळ
मला परीक्षा द्यायला अजूनही जमलेलं नाहीये. पण लौकरच, लौकरच!
8 Nov 2018 - 12:26 pm | यशोधरा
PMBOK 6 देणार का?
8 Nov 2018 - 12:42 pm | दिमित
हि चाचणी द्यायचा विचार आहे.
अर्थात बरेच काहि (किम्बहुना सगळेच) अभ्यास करायचा कन्टाळा केला नाहि तरच शक्य आहे!!
आणि तिच सध्या सगळ्यात मोट्टी अडचण आहे!!
19 Nov 2019 - 6:06 pm | सिरुसेरि
PMP Certification बद्दल खुप उपयुक्त चर्चा . अशीच चर्चा , प्रतिसाद इतर technologies बद्दल ( जसे की cloud technology - azure , aws / SAP ) वाचायला खुप उपयोगी ठरेल .
22 Jun 2020 - 4:29 am | निनाद
सध्या पीएमपी सर्टिफिकेशन साठी प्रेप. ट्रेनिंग देणार्या कंपन्यांचे पेव फुटले आहे. (की एकच कंपनी वेगवेगळ्या नावाने वावरते आहे?)
या बहुतेक सगळ्या गुरुग्राम आणि दिल्ली च्या आहेत. लिंक्ड इन वर सारखे वेगवेगळ्या नावाने मेसेजेस करत राहतात. यातही ट्रेनिंग स्कॅम्स तयार झाले असावेत असा संशय येतो आहे. कुणाचा काही अनुभव?